ईश्वरी शिक्षणाविरुद्ध दुरात्म्यांचे शिक्षण
“विश्वासापासून कित्येक लोक दूर जातील, फसव्या आत्म्यांना आणि भूतांच्या शिक्षणाला बळी पडतील.”—१ तीमथ्य ४:१, NW
१. ख्रिस्ती लोक कोणत्या लढाईमध्ये आहेत?
युद्ध होत असलेल्या क्षेत्रात तुमचे सर्व जीवन व्यतित करण्याची कल्पना करा. गोळीबाराचा आवाज होत असतानाच झोपी जाणे व तोफांचा आवाज आल्यावर उठणे कशासारखे असेल? जगाच्या काही भागात अशाच प्रकारे लोक राहत आहेत हे खरोखर दुःखाचे आहे. तथापि, आध्यात्मिक अर्थाने विचार केल्यास सर्व ख्रिस्ती याप्रकारच्याच वातावरणात रहात आहेत. ते ६,००० वर्षापासून चाललेल्या मोठ्या लढाईमध्ये आहेत व ती आमच्या दिवसात तर तीव्र झालेली आहे. हे अनेक काळापासून चाललेले कोणते युद्ध आहे? हे युद्ध सत्य व लबाडीच्या विरूद्ध आहे, ईश्वरी शिक्षणाविरुद्ध दुरात्म्यांच्या शिक्षणाचे आहे. या लढाईला, तिच्यातील प्रमुख सुत्रधार पाहू जाता, मानवजातीच्या इतिहासातील अधिक निर्दयी व अधिक प्राणनाशक संघर्ष म्हटल्याने ते अतिशयोक्तीचे वाटणार नाही.
२. (अ) पौलाने सांगितल्याप्रमाणे, कोणत्या दोन बाजू परस्परांच्या विरोधात आहेत? (ब) पौलाचा, “विश्वास” असे म्हणण्याचा अर्थ काय होत होता?
२ प्रेषित पौलाने तीमथ्याला लिहिताना या संघर्षाच्या दोन बाजूंचा उल्लेख केला: “आत्मा स्पष्ट म्हणतो की, पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक दूर जातील, फसव्या आत्म्यांना आणि भूतांच्या शिक्षणाला बळी पडतील.” (१ तीमथ्य ४:१, NW) दुरात्म्यांकडील शिक्षण हे, विशेषपणे “पुढील काळी” प्रभाव करणारे असेल याकडे लक्ष द्या. पौलाच्या दिवसावरून निरिक्षण केल्यावर, आम्ही अशाच काळामध्ये रहात आहोत. दुरात्म्यांच्या शिक्षणाला कशाने विरोध केला आहे तर, तो “विश्वास” आहे हेही लक्षात घ्या. येथे “विश्वास,” पवित्र शास्त्रातील देवाच्या प्रेरित वचनावर आधारित असलेल्या ईश्वरी शिक्षणाला चित्रित करतो. असा विश्वास जीवन-दायक आहे. तो ख्रिश्चनांना देवाच्या इच्छेनुसार वागण्यासाठी शिकवतो. ते चिरकालिक जीवनाकडे नेणारे सत्य आहे.—योहान ३:१६; ६:४०.
३. (अ) सत्य आणि लबाडीमधील लढाईत मारले जाणाऱ्यांचे काय होते? (ब) दुरात्म्यांच्या शिक्षणाच्या मागे कोण आहे?
३ विश्वासापासून दूर जाणाऱ्या कोणालाही सार्वकालिक जीवन मिळत नाही. ते युद्धात मेलेले लोक आहेत. दुरात्मिक शिक्षणाने स्वतःला फसवू दिल्याचा तो किती भयानक परिणाम! (मत्तय २४:२४) आम्ही वैयक्तिक या नात्याने मारले न जाण्याचे कसे टाळू शकतो? “भूतांचा अधिपती,” दियाबल सैतानाचाच उद्देश पूर्ण करणाऱ्या या लबाड शिक्षणाला पूर्णपणे नाकारण्याद्वारे. (मत्तय १२:२४) सैतान “लबाडीचा बाप” असल्यामुळे त्याचे शिक्षण लबाड आहे हे अगोदरच सांगता येईल. (योहान ८:४४) आपल्या पहिल्या पालकांना फसवण्यासाठी त्याने लबाडीचा वापर किती कुशलतेने केला याचा विचार करा.
दुरात्म्यांचे शिक्षण प्रकट झाले
४, ५. सैतानाने हव्वेला काय खोटे सांगितले, व ते इतके वाईट का होते?
४ त्या घटना पवित्र शास्त्रात, उत्पत्ती ३:१-५ मध्ये नमूद केलेल्या आहेत. सर्पाचा वापर करून सैतानाने हव्वा या स्त्रीला विचारले: “तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हांस सांगितले हे खरे काय?” हा प्रश्न निरूपद्रवी वाटतो, परंतु पुन्हा त्याकडे जरा लक्ष द्या. “हे खरे काय?” सैतान आश्चर्यचकीत झाल्यासारखा वाटत होता, जणू काय तो असे सांगत होता की, ‘देवाने अशी गोष्ट का सांगितली असावी?’
५ हव्वेने अगदी निरागसपणे ते असेच होते हे दर्शवले. याबाबतीत तिला ईश्वरी शिक्षण माहीत होते की, बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाल्ले तर ते मरतील असे देवाने आदामाला सांगितले होते. (उत्पत्ती २:१६, १७) सैतानाच्या प्रश्नाने तिची आस्था जागृत केली हे उघड आहे, यामुळे तो मुख्य मुद्यावर आला तेव्हा तिने ऐकले, “सर्प स्त्रीला म्हणाला: ‘तुम्ही खरोखर मरणार नाही.’” असे सांगणे किती दुष्टतेचे होते! सैतानाने सत्याचा देव, प्रीतीचा देव, निर्माणकर्ता, यहोवा मानवी मुलांबरोबर लबाडी करतो असा त्यावर दोष लावला!—स्तोत्रसंहिता ३१:५; १ योहान ४:१६; प्रकटीकरण ४:११.
६. सैतानाने यहोवाच्या चांगुलपणाला व सार्वभौमत्त्वाला कसे आव्हान केले?
६ परंतु सैतान एवढ्यावरच थांबला नाही. तो पुढे असे म्हणाला: “देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील, आणि तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.” सैतानाच्या म्हणण्यानुसार, यहोवा देव—ज्याने आमच्या पहिल्या पालकांना अधिक उदारपणे पुरवले होते—त्यांना तो काही चांगल्या गोष्टीपासून वंचित ठेवू इच्छित होता. त्यांनी देवासारखे होण्यापासून तो त्यांना परावृत्त करु पाहत होता. अशाप्रकारे, सैतानाने देवाच्या चांगुलपणाला आव्हान केले. त्याने स्व-संतुष्टतेला व देवाच्या नियमांचा जाणूनबूजून भंग करण्याला चालना दिली व म्हटले की अशारीतीने वागणे लाभप्रद ठरेल. वास्तविकपणे, सैतानाने देवाच्या निर्मितीवरील त्याच्या (देवाच्या) सार्वभौमत्त्वाला आव्हान केले, व मनुष्याने जे काय केले त्यावर मर्यादा घालण्यास देवाला काही अधिकार नाही, असा आरोप केला.
७. दुरात्म्यांचे शिक्षण प्रथम केव्हा ऐकण्यात आले, आणि आज ते त्यासारखेच कसे आहे?
७ सैतानाच्या त्या शब्दांनी, दुरात्म्यांचे शिक्षण ऐकू येण्यास सुरवात झाली. हे दुरात्मिक शिक्षण अजूनही त्यासारख्याच अभक्त तत्त्वांना वाढवत आहे. एदेन बागेत केल्याप्रमाणे, सैतान त्याला आता येऊन मिळालेल्या इतर बंडखोर दुरात्म्यांसह, कार्याचा दर्जा ठरवण्याच्या देवाच्या अधिकाराला अजूनही आव्हान करत आहे. तो अजूनही यहोवाच्या सार्वभौमतेला आव्हान करतो व मानवांवर त्यांच्या स्वर्गीय पित्याची आज्ञा मोडण्यासाठी तो प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतो.—१ योहान ३:८, १०.
८. एदेनात आदाम आणि हव्वेने काय गमावले, परंतु यहोवा कशाप्रकारे सत्य ठरला?
८ ईश्वरी शिक्षण व दुरात्मिक शिक्षणांतील पहिल्याच लढाईला तोंड देताना, आदाम आणि हव्वेने चुकीचा निर्णय घेतला व त्यांनी त्यांची सार्वकालिक जीवनाची आशा गमावली. (उत्पत्ती ३:१९) वर्षे जशी निघून गेली, व त्यांच्या शरीरांची अधोगती होण्यास सुरवात झाली तेव्हा, मागे एदेनमध्ये त्यांच्याबरोबर कोणी लबाडी केली होती व कोणी त्यांना सत्य सांगितले होते याची त्यांना पूर्ण खातरी झाली. तथापि, ते शारीरिक अर्थाने मरण्याच्या शेकडो वर्षाआधी जीवनाचा उगम असणाऱ्या त्यांच्या निर्माणकर्त्याने जीवनासाठी अपात्र ठरवल्यावर सत्य व लबाडीच्या लढाईत प्रथम मरणारे ठरले. ते आध्यात्मिक अर्थाने मेले तेव्हा हे घडले.—स्तोत्रसंहिता ३६:९; पडताळा इफिसकर २:१.
आजचे दुरात्म्यांचे शिक्षण
९. शतकांपासून दुरात्म्यांचे शिक्षण केवढे प्रभावी ठरले आहे?
९ प्रकटीकरणाच्या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे, प्रेषित योहानाला आत्म्याने १९१४ मध्ये सुरू झालेल्या ‘प्रभूच्या दिवसात’ नेले. (प्रकटीकरण १:१०) त्यावेळी सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांना स्वर्गातून पृथ्वीच्या सान्निध्यात टाकण्यात आले होते—आमच्या महान निर्माणकर्त्याच्या विरोधकाची ती मोठी परागती होती. तेथून पुढे यहोवाच्या सेवकांवर सतत आरोप करण्याचा त्याचा आवाज स्वर्गात ऐकण्यात आला नाही. (प्रकटीकरण १२:१०) तर मग, एदेनापासून पृथ्वीवर दुरात्म्यांच्या शिक्षणाने कोणती प्रगती केली होती? अहवाल म्हणतो: “मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकविणारा, जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट साप खाली टाकण्यात आला.” (प्रकटीकरण १२:९) सर्व जग सैतानाच्या लबाडीला वश झाले होते! सैतानाला “जगाचा अधिपती” म्हटले आहे यात काही नवलाचे नाही!—योहान १२:३१; १६:११.
१०, ११. सैतान आणि त्याचे दुरात्मे आज कोणत्या मार्गात क्रियाशील आहेत?
१० सैतानाला स्वर्गातून हाकलल्यानंतर त्याने पराभव पत्करला का? निश्चितच नाही! ईश्वरी शिक्षण तसेच जे त्याला धरून राहतात त्यांच्याविरूद्ध लढाई करण्याचे त्याने ठरवले. सैतानाला स्वर्गातून काढून टाकल्यानंतरही, त्याने त्याची लढाई चालू ठेवली: “तेव्हा अजगर [सैतान] स्त्रीवर रागावला आणि देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूविषयी साक्ष देणारे तिच्या संतानापैकी बाकीचे जे लोक होते त्यांच्याबरोबर लढाई करण्यास तो निघून गेला.”—प्रकटीकरण १२:१७.
११ देवाच्या सेवकांबरोबर लढाई करण्यासोबतच, सैतानाने मानवजातीवर त्याची पकड बसवण्यासाठी, खोट्या प्रचाराच्या पुरात जगाला बुडवले आहे. प्रभूच्या दिवसातील प्रकटीकरणाच्या एका दृष्टांतात प्रेषित योहानाने तीन श्वापदे पाहिली, जी लाक्षणिकरित्या सैतान, त्याची पृथ्वीवरील राजकीय संघटना, व आमच्या काळात सत्ता गाजवणाऱ्या जागतिक शक्तीला चित्रित करतात. या तिघांच्या तोंडातून बेडके बाहेर आली. ते कशाला चित्रित करतात? योहान लिहितो: “ते दुरात्म्यांकरवी प्रेरित असणारे उद्गार आहेत व ते चिन्हेही करतात; ते सर्वसमर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी संपूर्ण जगातील राजांस एकत्र करावयास त्यांच्याकडे बाहेर जातात.” (प्रकटीकरण १६:१४, NW) दुरात्म्यांचे शिक्षण पृथ्वीवर फारच क्रियाशील आहे हे स्पष्टच आहे. सैतान आणि त्याचे दुरात्मे अजूनही ईश्वरी शिक्षणाविरूद्ध लढत आहेत, व मशीही राजा येशू ख्रिस्त जोवर त्यांना जबरदस्तीने थांबवत नाही तोवर ते लढाई करत राहतील.—प्रकटीकरण २०:२.
दुरात्म्यांच्या शिक्षणाला ओळखणे
१२. (अ) दुरात्म्यांच्या शिक्षणाला प्रतिकार करणे शक्य का आहे? (ब) देवाच्या सेवकांच्याबाबतीत, सैतान त्याच्या उद्देशांना पूर्ण करण्याचा कोणता प्रयत्न करत आहे?
१२ देवभीरू मानव दुरात्म्यांच्या शिक्षणाचा प्रतिकार करू शकतात का? दोन कारणांमुळे ते खरोखर करू शकतात. प्रथम, ईश्वरी शिक्षण अधिक शक्तीशाली आहे; आणि दुसरी गोष्ट म्हणजे, यहोवाने सैतानाच्या डावपेचांना उघड केल्यामुळे आम्ही त्यांचा प्रतिकार करू शकतो. प्रेषित पौलाने म्हटल्याप्रमाणे, “त्याचे विचार [युक्त्या NW] आपल्याला कळत नाहीत असे नाही.” (२ करिंथकर २:११) सैतान त्याचा उद्देश साध्य करण्यासाठी छळ या माध्यमाचा उपयोग करतो हे आम्हाला माहीत आहे. (२ तीमथ्य ३:१२) त्याहूनही अधिक, तो देवाची सेवा करणाऱ्यांच्या मनांवर व हृदयांवर अतिशय धूर्तपणे प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतो. त्याने हव्वेला फसवून चुकीच्या इच्छा तिच्या हृदयात भरवल्या. आजही तो त्याच गोष्टींचा प्रयत्न करत आहे. पौलाने करिंथकरांना लिहिले: “जसे सापाने कपट करून हव्वेला ठकविले तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता ह्यापासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे.” (२ करिंथकर ११:३) त्याने सर्वसामान्य मानवजातीची विचारसरणी कशी भ्रष्ट केली आहे याचा जरा विचार करा.
१३. सैतानाने मानवजातीला एदेनापासून कोणती लबाडी सांगितली आहे?
१३ सैतानाने हव्वेला, यहोवा लबाड असल्याचा आरोप ठेवला व म्हटले की मानव त्याच्या निर्माणकर्त्याची आज्ञा मोडून देवासारखा होऊ शकतो. आज मानवजातीची पापमय परिस्थिती, यहोवा नव्हे, तर सैतान लबाड होता असे शाबीत करते. मानव आज देव नाहीत! परंतु, सैतानाने पहिल्या लबाडीचा इतर लबाड्यांद्वारे अविरत पिच्छा पुरवला. त्याने, मानवी आत्मा अमर, अविनाशी असल्याच्या कल्पनेची प्रस्तुती करून दिली. याप्रकारे त्याने मानवजातीसमोर दुसऱ्या मार्गाने देवासारखे होण्याची शक्यता प्रस्तुत केली. मग, त्या खोट्या तत्त्वावर आधारित त्याने अग्निनरक, परगेटरी, भूतविद्या, व पूर्वजांची उपासना या शिकवणींना वाढवले. या लबाड्यांनी अब्जावधी लोकांना अजूनही दास्यत्वात ठेवले आहे.—अनुवाद १८:९-१३.
१४, १५. मृत्यू आणि भविष्यासाठी मानवाची आशा याबद्दल सत्य काय आहे?
१४ अर्थातच, यहोवाने आदामाला सांगितलेलेच सत्य होते. देवाविरूद्ध पाप केल्यावर आदाम मरण पावला. (उत्पत्ती ५:५) आदाम आणि त्याचे वंशज मेले तेव्हा, ते बेशुद्ध आणि अक्रियाशील मृत जीव झाले. (उत्पत्ती २:७; उपदेशक ९:५, १०; यहेज्केल १८:४) आदामापासून वारशाने मिळालेल्या पापामुळे सर्व मानवी जीव मरतात. (रोमकर ५:१२) परंतु, यहोवाने, दियाबलाच्या कामाला विरोध करणाऱ्या एका संतानाविषयी, मागे एदेनमध्ये अभिवचन दिले. (उत्पत्ती ३:१५) ते संतान, देवाचा एकुलता एक पुत्र, येशू ख्रिस्त होते. येशू निष्पाप असा मृत्यू पावला, व त्याने अर्पिलेले जीवन, मरणाऱ्या स्थितीतून मानवजातीला परत विकत घेण्यासाठी खंडणी ठरले. येशूवर आज्ञाधारकपणे विश्वास ठेवणाऱ्यांना आदामाने गमावलेले, सार्वकालिक जीवन मिळण्याची सुसंधी आहे.—योहान ३:३६; रोमकर ६:२३; १ तीमथ्य २:५, ६.
१५ खंडणी ही, मृत्युनंतर आत्मा जिवंत राहतो अशी अस्पष्ट कल्पना नव्हे तर, मानवजातीसाठी खरी आशा आहे. हे ईश्वरी शिक्षण आहे. ते सत्य आहे. ते यहोवाच्या प्रीतीचे व बुद्धीचे अद्भुत प्रदर्शन देखील आहे. (योहान ३:१६) हे सत्य शिकल्यामुळे व या विषयासंबंधाने दुरात्म्यांच्या शिक्षणापासून मुक्त झाल्यामुळे आपण किती कृतज्ञ असले पाहिजे!—योहान ८:३२.
१६. मानव त्यांच्या स्वतःच्या बुद्धीचा अवलंब करतात तेव्हा कोणते दीर्घकालीन परिणाम घडतात?
१६ सैतानाने एदेन बागेतील त्याच्या लबाडीद्वारे, आदाम आणि हव्वेला देवापासून स्वतंत्र होण्याच्या उत्कट इच्छेला वाढवून स्वतःच्या बुद्धीवर विसंबून राहण्यासाठी उत्तेजन दिले. आज, आम्ही त्याचे दीर्घकालिन परिणाम म्हणजे, गुन्हे, आर्थिक कष्ट, युद्धे, आणि आज जगात असलेली भयंकर विषमता पाहत आहोत. पवित्र शास्त्र म्हणते ते आश्चर्याचे नाही की: “ह्या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपण आहे”! (१ करिंथकर ३:१९) तरीसुद्धा, यहोवाच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याऐवजी अनेक मानव मूर्खपणे त्रास सहन करण्याची निवड करतात. (स्तोत्रसंहिता १४:१-३; १०७:१७) ईश्वरी शिक्षणाचा स्वीकार केलेले ख्रिस्ती, त्या सापळ्यात पडण्याचा मोह टाळतात.
१७. सैतानाने कोणते ‘चुकीने म्हटलेले ज्ञान’ वाढवले आहे, आणि त्याची कोणती फळे आहेत?
१७ पौलाने तीमथ्याला लिहिले: “हे तीमथ्या, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव संभाळ, अधर्माच्या रिकाम्या वटवटींपासून आणि जिला ‘विद्या’ (ज्ञान, NW) हे नाव चुकीने दिले गेले आहे तिच्या विरोधी मतांपासून दूर राहा. ती विद्या (ज्ञान, NW) स्वीकारून कित्येक विश्वासापासून ढळले आहेत.” (१ तीमथ्य ६:२०, २१) ते ‘ज्ञान’ देखील दुरात्मिक शिक्षणाला सूचित करते. पौलाच्या दिवसात, मंडळ्यांमध्ये काही लोक धर्मत्यागी कल्पनांची वाढ करीत होते त्याला बहुधा हे सूचित करते. (२ तीमथ्य २:१६-१८) नंतर, चुकीने ज्ञान म्हटलेल्या, ज्ञेयवाद आणि ग्रीक तत्त्वज्ञानाने मंडळीला भ्रष्ट केले. आज जगामध्ये, अनीश्वरवाद, अज्ञेयवाद, उत्क्रांतीचा सिद्धांत, व पवित्र शास्त्रावर उच्च टीका, ही चुकीने ज्ञान म्हटलेल्याची काही उदाहरणे आहेत, ज्या आधुनिक धर्मत्यागी लोक वाढवत असलेल्या अशास्त्रीय कल्पना आहेत. चुकीने ज्ञान म्हटलेल्याची फळे, नैतिकतेचा ऱ्हास, अधिकाराला सर्वत्र दाखवला जाणारा अनादर, अप्रामाणिकपणा, व सैतानाच्या व्यवस्थिकरणाला चित्रित करत असलेला स्वार्थीपणा यामध्ये दिसत आहे.
ईश्वरी शिक्षणाला चिकटून राहणे
१८. आज ईश्वरी शिक्षणाचा शोध कोण करत आहेत?
१८ सैतान, एदेनाच्या काळापासून या पृथ्वीला दुरात्मिक शिक्षणाच्या पूरात बुडवत असला तरी, ईश्वरी शिक्षणाचा शोध घेणारे काही लोक नेहमीच होते. आज अशांची संख्या लाखोंवर जात आहे. त्यांच्यामध्ये, येशूबरोबर त्याच्या स्वर्गीय राज्यात राज्य करण्याची आशा असलेले उरलेले अभिषिक्त ख्रिस्ती तसेच त्या राज्यात पृथ्वीवर वास करण्याची आशा असलेले “इतर मेंढरे” यांच्या वाढत असलेल्या मोठ्या लोकसमुदायाचा देखील समावेश आहे. (मत्तय २५:३४; योहान १०:१६; प्रकटीकरण ७:३, ९) आज, त्यांना एका जगव्याप्त संघटनेमध्ये एकत्र केले गेले आहे, जिला यशयाचे शब्द लागू होतात: “तुझी सर्व मुले परमेश्वरापासून [यहोवा, NW] शिक्षण पावतील, तुझ्या मुलांना मोठी शांती प्राप्त होईल.”—यशया ५४:१३.
१९. यहोवाने शिकवलेले यात कशाचा समावेश होतो?
१९ यहोवाने शिकवलेले असण्याचा अर्थ, त्याची खरी तत्त्वे माहीत असणे महत्त्वाचे असले तरी त्यामध्ये अधिक काही गोष्टी समाविष्ट आहेत. यहोवा आम्हाला, आम्ही कसे जगावे व आमच्या वैयक्तिक जीवनात ईश्वरी शिक्षणाचा कसा अवलंब करावा हे शिकवतो. उदाहरणार्थ, जगात आमच्या भोवती बळावत चाललेला स्वार्थीपणा, अनैतिकता, तसेच स्वतंत्रतेच्या आत्म्याचा आम्ही प्रतिकार करतो. या जगात संपत्तीसाठी चाललेला निष्ठूर पाठलाग—मृत्युकडे नेणारा आहे ते आम्हाला माहीत आहे. (याकोब ५:१-३) प्रेषित योहानाच्या शब्दात व्यक्त झालेल्या ईश्वरी शिक्षणाला आम्ही कधीही विसरत नाही की: “जगावर व जगांतल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्याठायी पित्याची प्रीती नाही.”—१ योहान २:१५.
२०, २१. (अ) मानवांना आंधळे करण्याच्या प्रयत्नात सैतान कशाचा उपयोग करतो? (ब) ईश्वरी शिक्षणाला जडून राहणाऱ्यांना कोणते आशीर्वाद मिळतात?
२० दुरात्मिक शिक्षणाला बळी पडलेल्याचा परिणाम पौलाने करिंथकरांना म्हटलेल्या शब्दात दिसून येतो: “विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने [सैतानाने] आंधळी केली आहेत, अशा हेतूने की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त, त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये.” (२ करिंथकर ४:४) अशाचप्रकारे खऱ्या ख्रिश्चनांनाही आंधळे करण्याची सैतानाची इच्छा आहे. मागे एदेनमध्ये त्याने सर्पाचा उपयोग करून देवाच्या एका सेवकाला फसवले. आज, तो हिंसापूर्ण किंवा अनैतिक चित्रपट व दूरदर्शन कार्यक्रमाचा उपयोग करतो. तो रेडिओ, वाङमय, आणि संगीताचा अयोग्य वापर करत आहे. कुसंगती हे त्याच्याजवळील एक शक्तीशाली शस्त्र आहे. (नीतीसूत्रे ४:१४; २८:७; २९:३) या गोष्टी कशासाठी आहेत हे नेहमी ओळखा—त्या दुरात्म्यांच्या योजना व शिक्षण आहेत.
२१ सैतानाचे एदेनमधील शब्द लबाड होते त्याची आठवण करा; यहोवाचे शब्द खरे ठरले. त्या आरंभीच्या दिवसांपासून, तीच गोष्ट कायम राहिली आहे. सैतान सर्वदाच लबाड शाबीत झाला आहे, आणि ईश्वरी शिक्षण अक्षयपणे खरे ठरले आहे. (रोमकर ३:४) आम्ही देवाच्या वचनाला जडून राहिलो तर, सत्य आणि लबाडीच्या लढाईत नेहमीच विजयी होणाऱ्या बाजूने असू. (२ करिंथकर १०:४, ५) तर मग, दुरात्म्यांच्या सर्व शिक्षणाचा प्रतिकार करण्याचा आपण निश्चय करू या. त्या रीतीने सत्य आणि लबाडीमधील लढाई संपण्याच्या समयापर्यंत आपण टिकून राहू. सत्याचा विजय झालेला असेल. सैतान नसणार, आणि पृथ्वीवर फक्त ईश्वरी शिक्षणच ऐकावयाला मिळेल.—यशया ११:९.
तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकता का?
▫ दुरात्मिक शिक्षण प्रथम केव्हा ऐकण्यात आले?
▫ सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांनी कोणत्या लबाड्या वाढवल्या आहेत?
▫ आज, सैतान अधिकच क्रियाशील कसा आहे?
▫ दुरात्म्यांच्या शिक्षणाला वाढविण्यासाठी सैतान कशाचा वापर करतो?
▫ ईश्वरी शिक्षणाला चिकटून राहणाऱ्यांसाठी कोणते आशीर्वाद असतील?
[९ पानांवरील चित्रं]
दुरात्म्यांचे शिक्षण प्रथम एदेन बागेमध्ये ऐकण्यात आले
[१० पानांवरील चित्रं]
खंडणी व राज्याविषयीचे ईश्वरी शिक्षण, मानवजातीसाठी एकमेव आशा प्रदान करते