चांगले जग—जवळ आहे!
“नंदनवनासाठी उत्कट ओढ सतत मानवजातीच्या मनामध्ये असलेल्या एका प्रबळ ओढींपैकी एक आहे. ती सर्वात प्रबळ व चालू राहणारी असू शकते. नंदनवनासाठीच्या विशिष्ट ओढीचे प्रमाण, धार्मिक जीवनाच्या प्रत्येक पातळीवरून दिसून येते,” असे एन्साक्लोपिडीया ऑफ रिलिजन म्हणते.
चांगल्या जगात राहण्याची सर्वसाधारण इच्छा सर्वच संस्कृतींमध्ये आहे असे दिसते. आरंभीचा आदर्श अस्तित्वात नसल्यामुळे जणू त्यासाठी शोक केला जात आहे. हे आरंभीच्या नंदनवनाची शक्यता सुचवते, परंतु कोठे? मनोविश्लेषक कदाचित याविषयी म्हणू शकतील की, ही प्रबळ आकांक्षा मातेच्या गर्भातील गमावलेल्या सुरक्षिततेला परत मिळवण्याच्या इच्छेला प्रकट करते. तरीसुद्धा, हे स्पष्टीकरण धर्माच्या इतिहासाचा अभ्यास केलेल्या विद्वानांची खात्री पटवत नाही.
“नंदनवनासाठी उत्कट ओढ”—का बरे?
काही लोक सुचवतात त्याप्रमाणे, अशी उत्कट ओढ केवळ अडचणी आणि मानवी अस्तित्वाची क्षणभंगुरता अधिक सुसह्य बनवते का? किंवा याविषयी आणखी काही स्पष्टीकरण आहे का?
मानवजातीला चांगल्या जगाची ओढ का लागली आहे? पवित्र शास्त्र त्याविषयीची स्पष्टता, सरळ तसेच अधिक साधेपणात देते: मानवजात चांगल्या जगातून आली आहे! मुळचे नंदनवन अस्तित्वात होते. देवाचे वचन त्याचे वर्णन एका “बागेसारखे” करते, जी मध्य पूर्वेच्या प्रदेशात विशिष्ट ठिकाणी होती. त्यात त्याने “दिसण्यात सुंदर व अन्नासाठी उपयोगी अशी सर्व जातीची झाडे,” दिली होती. त्याची काळजी घेण्याची जबाबदारी देवाने पहिल्या मानवी जोडप्यावर सोपवली. (उत्पत्ती २:७-१५) ती अशी एक व्यवस्था होती ज्यात मानव खरेच आनंदी राहिले असते.
मग, नंदनवनाची ती परिस्थिती का टिकू शकली नाही? प्रथम एका आत्मिक व्यक्तिने व नंतर मानवी जोडप्याने बंडाळी केल्यामुळे. (उत्पत्ती २:१६, १७; ३:१-६, १७-१९) अशाप्रकारे, मानवाने केवळ नंदनवनच नव्हे तर, परिपूर्णता, स्वास्थ्य, आणि अनंत जीवन देखील गमावले. त्यानंतर सुरू झालेल्या परिस्थितीने मानवी जीवनाला निश्चितच सुधारले नाही. उलटपक्षी, आम्ही पाहतो की, सध्याची परिस्थिती आधीपेक्षाही अधिक बिघडलेली आहे.—उपदेशक ३:१८-२०; रोमकर ५:१२; २ तीमथ्य ३:१-५, १३.
नंदनवनासाठी शोध—कल्पनेचा इतिहास
‘नंदनवनासाठी केलेल्या उत्कट ओढीचा’ मोठा इतिहास आहे याची कल्पना केली जाऊ शकते. सुमेरी लोक, सबंध विश्वात ऐक्य नांदत होते तेव्हाची आठवण करीत असत. मेसोपोटेमियातील एक प्राचीन कविता स्मरण करून देते: “तेथे ना भय, ना दहशत, ना मनुष्याला प्रतिस्पर्धी. . . . लोकां ऐक्य नांदे संपूर्ण विश्वभरा, केली स्तुती एक मुखे एन्लीलची त्यांनी.” काही जण, प्राचीन इजिप्तच्या लोकांसारखे, मृत्युनंतर चांगल्या जगात जाण्याची आशा धरत होते. त्यांचा असा विश्वास होता की, अमर आत्मा ऑरू नावाच्या क्षेत्रात जातो. परंतु सुरवातीला तरी, ही आशा केवळ अमीर-उमरावांच्या राज्यासाठीच होती; गरीब लोक आनंददायक जगाचे स्वप्न पाहू शकत नव्हते.
एका वेगळ्या धार्मिक क्षेत्रात, शतकांपासून हिंदू लोक चांगल्या जगाचे युग येणार असल्याची वाट पाहून आहेत. हिंदू शिक्षणानुसार, हे चार युग एका चक्रामध्ये सतत फिरत असतात, आणि सध्या आम्ही वाईटातील वाईट काळात जगत आहोत. काहींच्या मते, कलीयुग (अंधकाराचे युग) सर्व त्रास व दुष्टतेसह अदमासे ४,३२,००० वर्षांपर्यंत राहील. तरीसुद्धा, विश्वासू हिंदू सुवर्ण युगाची, कृत युगाची वाट पाहून आहेत.
दुसऱ्या बाजूला पाहता, ग्रीक आणि रोमी लोकांनी, ॲटलांटिक महासागरामध्ये दंतकथेतील सुदैव आणणाऱ्या लहान बेटावर पोहचण्याचे स्वप्न पाहिले होते. अनेक लेखकांनी, जसे की हेसीयोद, वरजील, व ओव्हिड यांनी आरंभीच्या सुवर्ण युगाविषयी बरेच काही सांगितले, व एक दिवस त्याची पुनःर्स्थापना होईल अशी आशा केली. सा. यु. पूर्वीच्या पहिल्या शतकाच्या अंतास, वरजील या लॅटीन कवीने नवे व टिकणारे आयटस ऑरिया (सुवर्णयुग) त्वरित येण्याबद्दल भाकीत केले होते. पुढील शतकांमध्ये, “सोळा पेक्षा अधिक रोमी सम्राटांनी त्यांच्या राज्याने सुवर्ण युगाची परत सुरवात केल्याचा दावा केला,” असे एन्साक्लोपिडीया ऑफ रिलिजन म्हणते. परंतु, आज आम्हाला चांगले माहीत आहे की तो फक्त राजकारणातील प्रचार होता.
अनेक सेल्ट लोकांना, त्यांना वाटत होते त्याप्रमाणे समुद्राच्या पलिकडील उज्ज्वल भूमीच्या बेटाची ओढ लागली होती. आणि या बेटावर (किंवा द्वीपसमुह) लोक पूर्ण आनंदात जगत असल्याचा त्यांचा विश्वास होता. एका दंतकथेनुसार, आर्थर राजा भयंकर रीतीने जखमी झाला असतानाही, सापडल्यावर ॲव्हालन नावाच्या अद्भुत बेटावर तो राहिला.
प्राचीन काळात व मध्ययुगात अनेकांना वाटले की, शब्दशः आनंददायक बाग, एदेन बाग कोठेतरी अजूनही अस्तित्वात आहे, याबद्दल इतिहासकार जीन डेल्यूमेन्यू स्पष्टीकरण देतात, “पोहचण्यास कठिण असणाऱ्या डोंगरावर किंवा दुर्गम सागराच्या पलीकडे” आहे. इटलीचा कवी डान्टे, स्वर्गीय नंदनवनावर विश्वास ठेवत असला तरी, यरुशलेम शहराच्या विरूद्ध टोकाला असलेल्या त्याच्या परगेटरीच्या डोंगरावर अजूनही पार्थिव नंदनवन अस्तित्वात आहे असा त्याने विचार केला होता. काहींचा विश्वास होता की ते आशियामध्ये, मेसोपोटेमियात, किंवा हिमालयात कोठेतरी आहे. शिवाय, एदेनच्या नंदनवनाविषयी मध्ययुगीन दंतकथा अनेक होत्या. पुष्कळांचा विश्वास होता की नंदनवनाच्या अगदी जवळ एक असे अद्भुत राज्य होते ज्याच्यावर पायस पाळक जॉन राज्य करत होता. पार्थिव नंदनवनाच्या सान्निध्यामुळे, जॉन पाळकाच्या राज्यातील जीवन कल्पितपणे दीर्घ व अतिसुखी, बारमाही विपुलता व संपत्तीचा उगम असणारे होते. इतरांना प्राचीन ग्रीक दंतकथांची जाणीव होती, तरी देखील नंदनवनाचे द्वीप समुह ॲटलांटिक मध्ये सापडतील असा विचार करीत होते. मध्य युगीन नकाशे एदेन बागेच्या अस्तित्वाची खातरी, शिवाय त्याची गृहीत जागाही ते दाखवीत होते.
१५ व्या आणि १६ व्या शतकात दर्यावर्दीयांनी ॲटलांटिक ओलांडल्यावर एकाच वेळी नवे व प्राचीन असलेल्या जगाचा शोध करीत होते. समुद्राच्या दुसऱ्या बाजूला आशियाच्या आग्नेयेकडील बेटेच नव्हे तर, एदेन बाग देखील त्यांना सापडणार असल्याचा त्यांनी विचार केला. उदाहरणार्थ, ख्रिस्तोफर कोलंबस यांनी दक्षिण आणि मध्य अमेरिकेच्या समशीतोष्ण व उष्ण कटिबंधातील डोंगरामध्ये एदेन बागेचा शोध केला. युरोपातील शोधकांना ब्राझीलमध्ये पोहचल्यावर तेथील सौम्य हवामान व भरपूर प्रमाणात वनस्पती पाहून गमावलेले नंदनवन तेच असल्याची खातरी त्यांना वाटत होती. परंतु फार लवकर त्यांना उग्र वास्तविकतेला मान्य करावे लागले.
काल्पनिक राज्य—आदर्श ठिकाणे?
आदर्श जगाला पृथ्वीवरील दूरवरच्या ठिकाणी शोधण्याची पराकाष्ठा करण्यापेक्षा, इतरांनी त्याची योजना करण्याचा प्रयत्न केला. अशाप्रकारे, १५१६ मध्ये, इंग्रज मानवतावादी, थॉमस मोर, यांनी त्यांना माहीत असलेल्या हिणकस जगापेक्षा फारच वेगळ्या काल्पनिक राज्याच्या बेटाचे वर्णन, आश्चर्यकारक, शांतीपूर्ण, आणि सहिष्णू जागा अशारितीने केले. इतरांनी देखील चांगल्या जगाविषयी, न्याय्य जगाच्या योजना करण्याचा प्रयत्न केला: सा. यु. पूर्व सहाव्या शतकात, प्लूटोने त्याच्या गणराज्यासह; १६०२ मध्ये इटलीतील टोमॅसो कॅम्पानिलॉ बंधू व सूर्याचे सुसंघटीत केलेले शहर; काही वर्षांनंतर लगेच फ्रॅन्सिस बेकन या इंग्रज तत्त्वज्ञान्याने त्यांच्या नवीन ॲटलांटिसचे, “आनंदी आणि झपाट्याने वाढत असलेली ठेव” असे कथन केले. काही शतकांच्या ओघात, सर्व प्रकारच्या विचारवंतानी (धर्मावर विश्वास ठेवणारे असोत की नसोत) डझनांपेक्षा अधिक काल्पनिक राज्याविषयीचे वर्णन केले. परंतु, त्यांच्यापैकी काहींवर विश्वास ठेवला जात होता.
असेही काही आहेत की ज्यांनी त्यांचे काल्पनिक राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ, १८२४ मध्ये धनाढ्य इंग्रज मनुष्य, रॉबर्ट ओवन यांनी इंडियाना अमेरिका येथे प्रवास करण्याचे ठरवले जेणेकरून, त्यांनी न्यू हार्मनी हे नाव दिलेल्या गावात ते त्यांच्या काल्पनिक राज्याला पाहू शकतील. योग्य परिस्थितीमध्ये लोक सुधारतील, याची त्यांना खातरी झाली होती यासाठी त्यांनी कल्पना केलेल्या नवीन नैतिक जगाला स्थापन करण्याच्या प्रयत्नात त्यांच्या जवळील बहुतेक सर्वच मिळकतीचा वापर केला. परंतु नवीन जगण्याची परिस्थिती, नवीन लोकांना निर्माण करण्यास पुरेशी ठरली नाही, हे परिणामांनी दिसून आले.
स्वप्नात पाहिलेले नंदनवन पृथ्वीवर आणण्यासाठी, मानवाने जगाची योजना स्वतःच्या ज्ञानाने व त्याच्या दृष्टीने जे बरोबर आहे, त्यानुरूप केली पाहिजे असे सर्वच राजकीय विचारवंतांचे मत आहे. तरीसुद्धा, अशा उत्कट ओढीला मिळवण्याच्या प्रयत्नांचे पर्यवसान युद्ध आणि क्रांत्या, जसे की १७८९ मध्ये फ्रांस क्रांती व १९१७ मध्ये बोल्सेविक क्रांती घडल्या, हे विरोधाभासात्मक आहे. नंदनवनासारखी परिस्थिती आणण्याऐवजी, या प्रयत्नांनी दुःख आणि त्रास वाढवला आहे.
उत्कट ओढी, योजना, काल्पनिक राज्ये, आणि त्यांना मिळवण्याचे प्रयत्न—ही एकामागून एक घडलेली निराशेची गोष्ट आहे. सध्याच्या काळात, काही जण “तुकड्यांचे स्वप्न” व “काल्पनिक राज्याच्या युगाची समाप्तीविषयी” बोलत आहेत, व “काल्पनिक राज्याशिवाय जगण्याचे” ते आम्हाला आमंत्रण देत आहेत. चांगले जग पाहण्याबद्दल काही आशा आहे का, किंवा दैवात लिहिलेले ते केवळ स्वप्नच राहणार आहे?
ख्रिस्ती आणि एक चांगले जग
नवे जग एक स्वप्न कदापि नाही—ती निश्चित आशा आहे! ख्रिस्ती धर्माचा संस्थापक, येशू ख्रिस्ताला हे माहीत होते की, सध्याचे जग संभवनीय जगासाठी उत्तम नाही. मनाने दीन असलेले लोक पृथ्वीचे वतन भोगतील व देवाची इच्छा पूर्ण होईल हे त्याने शिकवले. (मत्तय ५:५; ६:९, १०) त्याला व त्याच्या शिष्यांना दोघांनाही माहीत होते की, सध्याच्या जगावर देवाचा शत्रू, दियाबल सैतानाचे नियंत्रण आहे, व मानवजातीच्या अनेक अनर्थांचे हे एक प्रमुख कारण आहे. (योहान १२:३१; २ करिंथकर ४:४; १ योहान ५:१९; प्रकटीकरण १२:१२) विश्वासू यहुदी, देव पृथ्वीला शांततेच्या प्रेमिकांनी व न्यायी लोकांनी भरविण्यासाठी, एकाच वेळी युद्ध, दुःख, आणि आजारपणातून कायमचे मुक्त करील त्या दिवसाची वाट पाहून होते. अशाचप्रकारे, पहिल्या शतकातील ख्रिस्ती सध्याच्या जगाची जागा नवीन व्यवस्था, “नवे आकाश व नवी पृथ्वी” घेण्याची खातरीने वाट पाहत होते.—२ पेत्र ३:१३; स्तोत्रसंहिता ३७:११; ४६:८, ९; यशया २५:८; ३३:२४; ४५:१८; प्रकटीकरण २१:१.
येशू वधस्तंभावर असताना, एका चोराने त्याच्यावर विश्वास ठेवला तेव्हा त्याने चांगल्या जगाच्या अभिवचनाची पुनरावृत्ती केली. “[येशू] त्याला म्हणाला: ‘मी तुला खचित सांगतो आज, तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील.’” (लूक २३:४०-४३) त्या शब्दांचा अर्थ काय असेल असे तो चोर समजला असावा? काही कॅथोलिक व प्रॉटेस्टंट पवित्र शास्त्र भाषांतरे दाखवतात त्याप्रमाणे, येशूने तो चोर ‘त्याच्याबरोबर’ त्याच दिवशी स्वर्गात जाणार असल्याचे सुचवले का? नाही, येशूच्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता कारण, त्याच्या पुनरूत्थानानंतर येशूने मरीया मग्दालीयाला म्हटले की, ‘मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही.’ (योहान २०:११-१८) सा. यु. ३३ पेन्टेकॉस्टच्या साडे तीन वर्षाआधी, येशूने त्यांना शिकवले असतानाही, त्याच्या प्रेषितांनी देखील स्वर्गीय नंदनवनाची अपेक्षा केली नव्हती. (प्रे. कृत्ये १:६-११) त्या काळात रहात असलेल्या बहुसंख्य यहुद्यांना समजल्याप्रमाणे ह्या चोराने देखील ते समजून घेतले असावे की: येशू, नंदनवनमय पृथ्वीवर चांगले जग येण्याचे अभिवचन देत होता. एका जर्मन विद्वानाने कबूल केले: “जीवनानंतरच्या शिक्षेबद्दलची शिकवण जुन्या करारात बिलकुल सापडत नाही.”
प्रेषित पौलाने आमच्या पृथ्वीवर नंदनवन येण्याविषयी, इब्रीयांना लिहिलेल्या पत्रात प्रमाणित केले आहे. ‘मोठे तारण सांगण्याचा आरंभ प्रभूकडून झाला असून त्याकडे दुर्लक्ष’ न करण्याचे उत्तेजन त्याच्या समविश्वासूंना देत असताना, पौलाने खात्रीपूर्वक प्रतिपादले की, यहोवा देवाने “भावी जगाबद्दलचा” [ग्रीक, ऑय·कौ·मेʹने] येशूला अधिकार दिला. (इब्रीयांस २:३, ५) ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनात, ऑय·कोऊ·मेʹने ही संज्ञा, नेहमी स्वर्गीय जगाचा नव्हे तर, मानवांनी लोकवस्ती केलेल्या आमच्या पृथ्वीचा उल्लेख करते. (पडताळा मत्तय २४:१४; लूक २:१; २१:२६; प्रे. कृत्ये १७:३१.) यास्तव, ख्रिस्त येशूद्वारे चालवलेले देवाचे राज्य संपूर्ण पृथ्वीवर सत्ता गाजविल. ते राहण्यासाठी खरोखर उत्कृष्ट असे ठिकाण असेल!
हे राज्य, स्वर्गीय असताना देखील ते पृथ्वीवरील कारभारात मध्यस्थी करील. कोणत्या परिणामास्तव? रोग, दुष्ट कृत्य, दारिद्य्र, आणि मृत्यू ही स्मरणात राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर निराशा व असंतुष्टता देखील राहणार नाही. (प्रकटीकरण २१:३-५) पवित्र शास्त्र म्हणते की, ‘देव त्याची मुठ उघडून सर्व प्राणीमात्रांची इच्छा पुरी करील.’ (स्तोत्रसंहिता १४५:१६) बेरोजगारी आणि प्रदुषणाच्या समस्यांवर व्यावहारिक आणि कायमचा तोडगा असेल. (यशया ६५:२१-२३; प्रकटीकरण ११:१८) पण यापेक्षा अधिक म्हणजे, देवाच्या आशीर्वादामुळे, सत्य, न्याय, आणि शांती—जवळ जवळ नाहीसे झालेले गुण—यांचा पुन्हा विजय होईल!—स्तोत्रसंहिता ८५:७-१३; गलतीकर ५:२२, २३.
हे सगळे एक स्वप्न काल्पनिक राज्य आहे का? नाही, आम्ही रहात असलेला अधिक कठीण काळ, आम्ही “शेवटल्या दिवसात” असल्याचे प्रदर्शित करतो आणि यामुळे नवीन जग जवळ आहे. (२ तीमथ्य ३:१-५) तेथे रहाण्यास तुम्हाला आवडेल का? यहोवाच्या साक्षीदारांसोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्याद्वारे हे कसे शक्य आहे, त्याविषयी शिका. एक चांगले जग जवळ आहे, आमच्या स्वप्नापेक्षाही ते अधिक चांगले आहे. ते एक काल्पनिक राज्य नसून—एक वास्तविकता आहे!
[७ पानांवरील चित्रं]
चांगले जग—लवकरच एक वास्तविकता