चांगले जग—केवळ एक स्वप्न?
तुम्ही इराणी संदेष्टा झरतुष्ट्र याने प्रचार केलेल्या झरतुष्ट्री धर्माचे (पारशी धर्म) एक अनुयायी असता तर, पृथ्वीला तिची आरंभीची सुंदरता परत मिळण्याच्या दिवसाची वाट पाहत असला असता. तुम्ही पुरातन ग्रीसमध्ये राहणारे असता, तर सा. यु. पू. आठव्या शतकातील हेसीयोद कवीने वर्णन केलेल्या सुदैव आणणाऱ्या आकर्षक लहान बेटापर्यंत पोहचण्याचे, किंवा सुवर्ण युग पुन्हा येण्याचे स्वप्न तुम्ही पाहिले असते. दक्षिण अमेरिकेतील ग्वाराणी इंडियन, दुष्टता नसलेल्या प्रदेशाचा कदाचित अजूनही शोध करीत आहेत. आमच्या काळात रहात असताना, राजकारणातील विचारप्रणालीमुळे किंवा आधुनिक दिवसातील पर्यावरणाच्या जाणीवेच्या परिणामामुळे जगात काही सुधारणा होतील अशी कदाचित तुमची आशा असेल.
सुवर्ण युग, सुदैव आणणारे लहान बेट, दुष्टता नसलेला प्रदेश, ही चांगल्या जगाची आशा त्या ओढीचे वर्णन करण्यासाठी वापरलेल्या अनेक नावांपैकी काही नावे आहेत.
हे जग, आमचे जग, निश्चितच एक उत्कृष्ट ठिकाण नाही. पाशवी हिंसा, हिंसेची अपूर्व भ्रातृहत्येची युद्धे, वंशहत्या, इतरांच्या त्रासाबद्दल बेपर्वाई, गरिबी व उपासमार, बेरोजगारी व दृढ ऐक्याची उणीव, परिस्थितीकीची समस्या, लाखो जणांना पीडित करणारे असाध्य आजार—सध्याच्या अनर्थाची यादी अंतहीन आहे असे दिसते. अलिकडे होत असलेल्या युद्धांचा विचार करता, इटलीच्या एका पत्रकाराने म्हटले: “आमच्या काळात शत्रूता अधिक बळकट भावनाप्रवण आहे का?” हा प्रश्न अगदी स्वाभाविकपणे उभा राहतो. या परिस्थितीचा विचार करता, काहीतरी वेगळी, अधिक चांगली गोष्ट साध्य करण्याची आकांक्षा बाळगणे तुम्हाला व्यावहारिक वाटते का? किंवा अशी उत्कट इच्छा, केवळ काल्पनिक राज्यासाठी कधीही साकार न होणाऱ्या स्वप्नाच्या विचारप्रणालीची ओढ आहे? सर्व काही संभवनीय अशा चांगल्या जगात आपण रहात आहोत का?
या काही नवीन चिंता नाहीत. अनेक शतकांपासून लोक, अशा जगाचे स्वप्न पाहत आहेत जेथे एकोपा, न्याय, समृद्धता आणि प्रीती यांचे साम्राज्य नांदेल. काही काळात, अनेक तत्त्वज्ञानी लोकांनी चांगल्या राज्याबद्दल, उत्कृष्ट जगाविषयी सर्वसाधारण कल्पना सविस्तरपणे व्यक्त केल्या. परंतु, त्या यशस्वीपणे कशा राबवाव्या हे त्यांना कधीही व्यक्त करता आले नाही, हे दुःखाचे आहे.
शतकांची जुनी असलेली स्वप्नांची यादी, काल्पनिक राज्य, व चांगल्या समाजासाठी मानवी उत्कट इच्छा आम्हाला काही शिकवू शकतात का?
[३ पानांवरील चित्रं]
संभवनीय जगाबद्दल हेच सर्वोत्तम आहे का?