राज्य घोषकांचा वृत्तांत
पवित्र शास्त्राचे सत्य कुटुंबाला ऐक्यात आणते
आज, जगाच्या बहुतेक भागात, कौटुंबिक ऐक्यता ही गोष्ट भूतकाळात जमा झाली आहे. परंतु, पवित्र शास्त्र कौटुंबिक ऐक्यता कशी मिळवता येते त्याचे गूढ प्रकट करते. येशूच्या शब्दांचा विचार करा: “जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सूज्ञ मनुष्यासारखा ठरेल; त्याने आपले घर खडकावर बांधले.” (मत्तय ७:२४) यहोवाच्या साक्षीदारांमधील हजारो कुटुंबांनी त्या शब्दांचा अवलंब करण्याद्वारे व कुटुंबाला निकटच्या एकीकरणात बांधण्यासाठी पवित्र शास्त्राला आधार समजून हे ऐक्य मिळवले आहे. खालील अनुभव दाखवतो त्याप्रमाणे इतरांनी देखील अशाप्रकारचे ऐक्य मिळवले आहे.
डॅनीएल फ्रांसमधील लष्करात सेवा करत असताना, लष्करातील एका पाळकाने डॅनीएलाला पवित्र शास्त्र विकत घेण्याचे सुचवले, त्याने ते विकत घेतल्यावर नियमित वाचन सुरू केले. कालांतराने त्याची बदली ताहिती येथे झाली. डॅनीएलाचे काही सह-सैनिक ॲडव्हेंटिस्ट व इतर मरमॉन पंथाचे होते. त्यांचे संभाषण अनेकदा धार्मिक विषयावर होत असे. एके दिवशी लष्करी अधिकाऱ्याने यहोवाची साक्षीदार असलेल्या त्याच्या पत्नीची डॅनीएलासोबत ओळख करून दिली. डॅनीएलाच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तिने संपूर्ण दुपार घालवली व ताहितीच्या स्थानिक मंडळीतील एका यहोवाच्या साक्षीदारांसोबत त्याचा संपर्क जोडून दिला. त्याने लवकरच नियमित पवित्र शास्त्राचा अभ्यास सुरू केला.
फ्रांसमध्ये डॅनीएलाचे पालक अतिशय प्रामाणिक कॅथोलिक होते. त्याचे वडील शाळेत सल्लागार म्हणून काम करत होते व कॅथोलिक शाळेत धार्मिक शिक्षणाचे ते प्रमुख होते. डॅनीएलने, शिकत असलेल्या मोलवान आध्यात्मिक ज्ञानाची सहभागिता त्याच्या पालकांसोबत करण्याच्या इच्छेमुळे, पत्रांमध्ये काही पवित्र शास्त्रीय विचारांना समाविष्ट करण्यास सुरवात केली.
प्रथम डॅनीएलाच्या आईला बरे वाटले, परंतु नंतर, मुलाच्या एका पत्रात यहोवा हे नाव पाहिल्याने तिला धक्काच बसला. काही दिवसानंतर, तिने रेडिओवरील कार्यक्रम ऐकला त्यात यहोवाच्या साक्षीदारांना “घातक पंथ” म्हणून संबोधले गेले. तिने यहोवाच्या साक्षीदारांसोबतचा सर्व संपर्क लगेच तोडून टाकण्याविषयी डॅनीएलाला पत्राने कळवले. परंतु, पवित्र शास्त्राच्या अभ्यासात डॅनीएल प्रगती करत राहिला व लवकरच लष्कर सोडून पुन्हा फ्रांसमध्ये परतण्याची त्याने व्यवस्था केली.
डॅनीएल घरी परतल्यावर लगेचच, त्याने प्रत्येक संध्याकाळ—कधीकधी रात्री उशिरापर्यंत—त्याच्या आईसोबत पवित्र शास्त्राची चर्चा करण्यात घालवली. शेवटी राज्यसभागृहात डॅनीएलासोबत येण्यास ती तयार झाली. प्रथमच सभेला उपस्थित राहिल्यावर, ती इतकी आश्चर्यचकीत झाली की, ज्यामुळे तिने स्वतःकरता पवित्र शास्त्राचा नियमित अभ्यास सुरू केला. तिने जलद प्रगती केली व लवकरच तिचा बाप्तिस्मा झाला.
डॅनीएलाचे वडील सहिष्णू होते, परंतु व्यवसाय व धार्मिक कार्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते. तरीही, एके प्रसंगी त्यांनी त्यांची पत्नी व मुलगा डॅनीएल यांना गाडीने प्रांतीय अधिवेशनास सोडले. तो जुलै १४ चा दिवस होता व शहरातील बस्टाईल डे चे प्रदर्शन पाहण्याचे त्यांच्या मनामध्ये होते. वाट पाहत असताना, कतुहलापायी त्यांनी अधिवेशन सभागृहाला आत जाऊन पाहण्याचे ठरवले. यहोवाच्या लोकांमधील व्यवस्था आणि शांती पाहिल्याने त्यांच्यावर मोठी छाप पडली, आणि ते अधिवेशनाच्या विविध विभागामध्ये जात असताना, प्रत्येक जण त्यांना “बंधू” असे म्हणू लागला. बस्टाईल डे च्या प्रदर्शनाबद्दल ते सर्व काही विसरले व अधिवेशन संपेपर्यंत तेथेच राहिले. त्यांनी पवित्र शास्त्र अभ्यासाची विचारणा केली व सत्य शिकण्यात जलद प्रगती केली. परंतु, ते जसजसे अधिक शिकत होते, तसतसे त्यांना त्यांच्या कामाच्या परिस्थितीमुळे अधिकच गैरसोयीचे होऊ लागले. यामुळे वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी काम सोडले. आता कुटुंबातील तिघेही समर्पित व बाप्तिस्मा घेतलेले असून एकत्र मिळून ऐक्याने यहोवाची सेवा करत आहेत.
पवित्र शास्त्राच्या सत्यानेच डॅनीएलाच्या कुटुंबाला ऐक्यात आणले. इतर कुटुंबांनी ते शिकून घेतले व संपूर्ण अंतःकरणाने त्याचा अवलंब केला तर त्यांना देखील ते ऐक्यात आणू शकते.