वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ३/१ पृ. ३-४
  • स्पर्धा यशाची गुरूकिल्ली आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • स्पर्धा यशाची गुरूकिल्ली आहे का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • खरोखरच प्रतिफलदायी?
  • स्पर्धात्मक समाजात मनाची शांती
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • स्पर्धेची भावना उत्पन्‍न करू नका, शांती राखा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • तारण, केवळ कार्यांमुळे नव्हे तर अपात्री कृपेमुळे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • खेळांतील स्पर्धा अयोग्य आहे का?
    सावध राहा!—१९९६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ३/१ पृ. ३-४

स्पर्धा यशाची गुरूकिल्ली आहे का?

“विजयी होण्याइतकी दुसरी कोणतीही गोष्ट महत्त्वपूर्ण नाही.” आज अनेक लोक, अमेरिकेतील फुटबॉल शिक्षक, वीन्स लॉमबॉरडी यांच्या विचारांशी सहमत आहेत. आता, भूतपूर्व साम्यवादी राष्ट्रे, स्पर्धेच्या तत्त्वाची स्तुती करण्यात सामील झाली आहेत. समृद्धी मिळवण्यासाठी, त्यांच्या बाजारपेठेत स्पर्धा चालू करण्याची गरज आहे असे म्हटले जाते. पूर्वेकडील देशांमध्ये अनेक पालक आपल्या मुलांना इतरांविरूद्ध उभे करतात व प्रखर शिकवणी देणाऱ्‍या अल्पकालीन शाळांमध्ये त्यांना पाठवतात, जेथे त्यांना प्रवेश परिक्षांमध्ये उतीर्ण होण्याचे कौशल्य शिकवले जाते. ह्‍या बाबतीत अतिशय चिंतातुर असलेल्या पालकांची अशी खात्री आहे की, एका प्रतिष्ठित शाळेतील प्रवेश, भवितव्यातील समृद्धीची गुरूकिल्ली आहे.

अनेकांचा अगदी ठामपणे विश्‍वास आहे की, स्पर्धा ही यशाची गुरूकिल्ली आहे. त्यांच्या ह्‍या समजेनुसार, मानवांनी एकदुसऱ्‍यासोबत चढाओढ केल्याने, प्रगती केली आहे. “बढतीसाठी चढाओढ करणे, जपानी संघटित संस्थांच्या सामर्थ्याचा उगम आहे,” असे जपानच्या फेडरेशन ऑफ इकॉनॉमिक ऑर्गनायझेशनने, मोठ्या संघटित संस्थांच्या केलेल्या पाहणीतील ६५.९ टक्के व्यवस्थापकांनी म्हटले. असे दिसते की, जपानी कंपनींना काही काळासाठी यश प्राप्त झाले आहे. तथापि, स्पर्धा ही खरोखर यशाची गुरूकिल्ली आहे का?

खरोखरच प्रतिफलदायी?

जे लोक स्पर्धा करतात ते स्वार्थी, मीपणाची मनोवृत्ती दर्शवितात. इतरांचे वाईट होते तेव्हा ते फार खुश होतात व असा विचार करू लागतात की त्यांचे कार्य चांगले दिसेल. त्यांच्या स्वतःच्या स्वार्थी फायद्यासाठी, ते इतरांना हानीकारक अशा युक्त्यांचा देखील उपयोग करतील. स्पर्धेद्वारे अशा प्रकारचा यशाचा पाठलाग कोठे निरवेल? यॉसुऑ नावाचा एक इसम, त्याच्या कंपनीत, तो जणू काय कोणी मोठा व्यक्‍ती असल्याच्या शर्यतीत पूर्णपणे बुडाला होता, तो त्याचे पूर्वीचे जीवन आठवतो व म्हणतो: “स्पर्धात्मक आत्मा व बढतीच्या विचारांनी पूर्णपणे असा घेरलेला, मी नेहमी माझी तुलना इतरांबरोबर करत होतो व त्यांच्यापेक्षा उच्च असे स्वतःला समजत होतो. ह्‍या लोकांना जेव्हा माझ्यापेक्षा मोठे स्थान दिले जात होते तेव्हा मला खूप संताप येई व दररोज कंपनीतील अधिकारपदी असलेल्या सर्वांविषयी कुरकूर करत होतो. खरे सांगायचे तर माझे कोणीच मित्र नव्हते.”

स्पर्धात्मक आत्मा अकाली मृत्युकडे देखील निरवू शकतो. ते कसे? जपानच्या मायनीची डेली न्यूज या वर्तमानपत्राने, कॉरोशी किंवा अतिकामामुळे घडलेल्या मृत्युचा, प्रथम श्रेणीतील वर्तणुकीसोबत मेळ घातला. तातडीचा काळ, चढाओढ, आणि शत्रुत्वाने येणाऱ्‍या दबावाचा सामना करणाऱ्‍या वर्तणूकीच्या नमुन्याचे वर्णन प्रथम श्रेणी करते. अमेरिकन हृदयशास्त्रज्ञ फ्रेडमॅन आणि रोझनमॅन यांनी प्रथम श्रेणीच्या वर्तणुकीचा मेळ, रक्‍ताच्या गोठण्यामुळे रक्‍तवाहिनी बंद पाडणाऱ्‍या हृदयाच्या आजारासोबत घातला. होय, स्पर्धात्मक आत्मा घातक असू शकतो.

कामाच्या ठिकाणी स्पर्धा करणे इतर शारीरिक तसेच मानसिक विकारांकडेही निरवू शकते. एक उदाहरण केनॉस्के याचे आहे, जो जपानच्या सर्वात मोठ्या कार विक्रेत्याकडे विक्रेता म्हणून काम करत होता. त्याने एकूण १,२५० कार विकून विक्रम प्रस्थापित केला. कंपनीच्या मुख्यालयात, डायरेक्टरांच्या बोर्डातील सदस्य वापरत असलेल्या खोलीत, त्याच्या फोटोला फ्रेम करून टांगले होते. बढती मिळावी म्हणून त्याच्या जोडीदारांचा आधार घेण्याचा त्याला तिटकारा वाटत असला तरी, कंपनीने त्याला स्पर्धा करण्यासाठी पुढे ढकलले. परिणामी, एका वर्षात त्याला जठराचा व डिओडे अल्सर या दोहोंचा आजार जडला. त्याच वर्षी, त्याच्या कंपनीतील १५ अधिकाऱ्‍यांना रुग्णालयात दाखल केले, आणि एकाने आत्महत्या केली.

घरी, शेजाऱ्‍यांपेक्षा अधिक भौतिक वस्तू मिळवण्यासाठी झटण्याची मनोवृत्ती, लोकांना संसाराची फुशारकी करण्यासाठी, अखंड स्पर्धेत उतरवते. (१ योहान २:१६) पृथ्वीवरील व्यापाऱ्‍यांच्या हातात पैसे देत, केवळ व्यापारी क्षेत्रालाच याचा फायदा होतो.—पडताळा प्रकटीकरण १८:११.

जरी चढाओढ आणि स्पर्धात्मक आत्मा कामात प्रावीण्य उत्पन्‍न करत असला तरी, शलमोन राजाने ज्याचे निरीक्षण केले त्यात काही आश्‍चर्य नाही: “मग मी सर्व उद्योग व कारागिरी ही पाहिली; ही सर्व चढाओढीमुळे होतात. हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय.” (उपदेशक ४:४) तर मग, स्पर्धात्मक समाजात राहत असताना आम्ही मनाची शांती कशी टिकवून ठेवू शकतो? हे शोधण्यासाठी, आपण प्रथम स्पर्धेच्या कल्पनेची सुरवात कोठून झाली हे पाहू या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा