ईश्वरी शासन पद्धतीतील मेंढपाळ आणि मेंढरे
“यहोवा आमचा न्यायाधीश आहे, यहोवा आमचा नियमकर्ता आहे, यहोवा आमचा राजा आहे, तो आम्हाला तारील.”—यशया ३३:२२, पं. रमाबाई भाषांतर.
१. पहिल्या शतकातील व आज असलेले ख्रिश्चन ईश्वरी शासन पद्धतीत आहेत हे कसे म्हटले जाऊ शकते?
ईश्वरी शासन पद्धत याचा अर्थ देवाकडील शासन असा होतो. यामध्ये, आम्ही आमच्या जीवनात लहान व मोठे निर्णय घेतांना यहोवाच्या अधिकाराचा स्वीकार करणे व त्याच्या मार्गदर्शनाचे आणि शिक्षणाचे अनुकरण करण्याचा समावेश होतो. पहिल्या शतकातील मंडळी खरेपणाने ईश्वरी शासन पद्धतीची होती. मग, ख्रिश्चन अगदी प्रामाणिकपणे म्हणू शकले की: “यहोवा आमचा न्यायाधीश आहे, यहोवा आमचा नियमकर्ता आहे, यहोवा आमचा राजा आहे.” (यशया ३३:२२, पं. रमाबाई भाषांतर.) अभिषिक्त जण त्याच्या जणू केंद्रस्थानी असल्याने यहोवा देवाची संघटना अशाप्रकारे एक खरी ईश्वरी शासन पद्धत आहे.
आज आम्ही कोणत्या मार्गांमध्ये ईश्वरशासित आहोत?
२. कोणत्या एका मार्गाद्वारे यहोवाचे साक्षीदार यहोवाच्या शासनाला अधीनता दाखवतात?
२ यहोवाची पार्थिव संघटना ईश्वरी शासन पध्दतीची असल्याचे आम्ही कसे सांगू शकतो? कारण, वस्तुतः यात असणारे यहोवाच्या शासनाच्या अधीन आहेत. शिवाय यहोवाने सिंहासनाधिष्ट केलेल्या राजाचे, येशू ख्रिस्ताच्या नेतृत्त्वाचे ते अनुसरण करतात. उदाहरणार्थ, अंत समयाच्या काळात, थोर दैवी शासकाकडील थेट आज्ञा येशूला कळवली जाईल: “तू आपला विळा चालवून कापणी कर, कारण कापणीची वेळ आली आहे, पृथ्वीचे पीक पिकून गेले आहे.” (प्रकटीकरण १४:१५) येशू आज्ञा पालन करतो व पृथ्वीची कापणी करण्याची जबाबदारी घेतो. ख्रिश्चन लोक, सुवार्तेचा आवेशाने प्रचार करण्याद्वारे व शिष्य बनविण्याद्वारे त्यांच्या राजाला पाठिंबा देत आहेत. (मत्तय २८:१९; मार्क १३:१०; प्रे. कृत्ये १:८) असे करण्याद्वारे, ते, थोर दैवी शासक, यहोवा देवाचे सहकारी देखील आहेत.—१ करिंथकर ३:९.
३. नैतिक बाबीसंबंधी ख्रिश्चन लोक कशी अधीनता दाखवतात?
३ ख्रिस्ती जण, आचरणाद्वारे देखील देवाच्या शासनाला अधीनता दाखवतात. येशूने म्हटले: “जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो, ह्यासाठी की आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे.” (योहान ३:२१) आज, नैतिक दर्जाविषयी अमर्याद वादविवाद आहेत, परंतु ख्रिश्चनांमध्ये अशा वादांना कोणतीही जागा नाही. यहोवा ज्याला अनैतिक म्हणतो त्याकडे ते अनैतिक दृष्टीने पाहतात, व त्याला एखाद्या संसर्गजन्य व प्राणघातक आजाराप्रमाणे पूर्णपणे टाळतात! ते त्यांच्या कुटुंबाची देखभाल करतात, त्यांच्या पालकांची आज्ञा पालन करतात, व त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखील अधीन राहतात. (इफिसकर ५:३-५, २२-३३; ६:१-४; १ तीमथ्य ५:८; तीत ३:१) अशाप्रकारे, ते देवाच्या एकवाक्यतेत ईश्वरशासित मार्गाने कार्य करतात.
४. आदाम, हव्वा व शौलाने कोणती चुकीची मनोवृत्ती प्रदर्शित केली होती, आणि ख्रिश्चन वेगळी मनोवृत्ती कशी दाखवू शकतात?
४ आदाम आणि हव्वेने बरोबर आणि चूक याबद्दल स्वतःच निर्णय घेण्याच्या इच्छेमुळे नंदनवन गमावले. येशूची इच्छा अगदी याच्या उलट होती. त्याने म्हटले: “मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर, ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावयाला पाहतो.” ख्रिश्चन देखील असेच करण्याचा प्रयत्न करतात. (योहान ५:३०; लूक २२:४२; रोमकर १२:२; इब्रीयांस १०:७) इस्राएलाचा पहिला राजा शौल याने, यहोवाची आज्ञापालन केले, परंतु काही अंशीच. या कारणास्तव त्याला नाकारले गेले. शमुवेलाने त्याला सांगितले: “यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, एडक्यांच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे.” (१ शमुवेल १५:२२) काही प्रसंगी, कदाचित प्रचार कार्यात नियमित असण्याद्वारे, किंवा सभेतील उपस्थितीद्वारे, यहोवाच्या इच्छेचे अनुकरण करणे ईश्वरशासित आहे, तर मग नैतिकतेच्या बाबतीत किंवा इतर गोष्टींच्या बाबतीत हातमिळवणी करावी का? कदापि नाही! आम्ही ‘देवाची इच्छा मनापासून करण्याचा’ प्रयत्न करतो. (इफिसकर ६:६; १ पेत्र ४:१, २) आम्ही शौलापेक्षा वेगळे, पूर्णपणे देवाच्या शासनाच्या अधीन होतो.
आधुनिक ईश्वरी शासन पद्धत
५, ६. यहोवा, आज मानवजातीसोबत कसा व्यवहार करतो, व या व्यवस्थेतील सहकार्यामुळे काय परिणामित होते?
५ गत काळात, संदेष्टे, राजे व प्रेषित अशा काही वैयक्तिकांद्वारे यहोवाने शासन केले व त्याचे सत्य प्रकट केले. आज ते तसे राहिले नाही; आज ईश्वरप्रेरित संदेष्ट्ये व प्रेषित नाहीत. उलटपक्षी, येशूने म्हटले की, त्याच्या राजेशाही उपस्थिती दरम्यान तो “विश्वासू व बुद्धिमान दास” या विश्वासू मंडळाच्या अनुयायांची ओळख करून देईल व त्याच्या सर्व परिवारावर त्यांची नेमणूक करील. (मत्तय २४:४५-४७; यशया ४३:१०) त्या दासाला १९१९ मध्ये अभिषिक्त ख्रिश्चनांचे शेष असे ओळखले गेले. तेव्हापासून, नियमन मंडळाचे प्रतिनिधीत्त्व केलेले पृथ्वीवरील ईश्वरी शासन पद्धतीचे ते केंद्र राहिले आहे. जगभरात, यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे प्रतिनिधीत्त्व, शाखा समिती, प्रवासी पर्यवेक्षक व मंडळीतील वडिलांद्वारे केले जाते.
६ ईश्वरशासित संघटनेला सहकार्य देणे हा ईश्वरी शासन पद्धतीच्या अधीन होण्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे. असे सहकार्य, जगभरातील ‘बंधुवर्गातील’ एकता व व्यवस्था घडवून आणते. (१ पेत्र २:१७) यामुळे यहोवा देव संतुष्ट होतो, कारण तो “अव्यवस्था माजविणारा नाही, तर शांतीचा देव आहे.”—१ करिंथकर १४:३३.
ईश्वरी शासन पद्धतीत असणारे वडील
७. ख्रिस्ती वडिलांची नेमणूक ईश्वरशासित पद्धतीने केली जाते असे का म्हटले जाऊ शकते?
७ नेमलेले सर्व वडील जन, त्यांचा कोणताही अधिकार असला तरी, अध्यक्षाच्या किंवा वडील जनाच्याबाबतीत पवित्र शास्त्रात दिलेल्या योग्यता पूर्ण करतात. (१ तीमथ्य ३:१-७; तीत १:५-९) याखेरीज, पौलाने इफिसमधील वडिलांना सांगितलेले त्याचे शब्द सर्व वडिलांना लागू होतात: “तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हास अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, ह्यासाठी की देवाची जी मंडळी . . . तिचे पालन तुम्ही करावे.” (प्रे. कृत्ये २०:२८) होय, वडिलांची नेमणूक यहोवाकडून येणाऱ्या पवित्र आत्म्याकरवी केली जाते. (योहान १४:२६) त्यांची नेमणूक ईश्वरशासित आहे. शिवाय, ते देवाच्या कळपाचे पालन करतात. हा कळप वडिलांचा नसून यहोवाचा आहे. म्हणूनच देवाची संघटना ईश्वरी शासन पद्धतीची आहे.
८. वडिलांच्या आज सामान्यपणे कोणत्या जबाबदाऱ्या आहेत?
८ प्रेषित पौलाने इफिसकरांना लिहिलेल्या त्याच्या पत्रात वडिलांच्या काही जबाबदाऱ्या असे म्हणत उद्धृत केल्या: “त्याने कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक (मेंढपाळ) व शिक्षक असे नेमून दिले; ते ह्यासाठी की, त्यांनी पवित्र जनांस सेवेच्या कार्याकरिता वा ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरता सिद्ध करावे.” (इफिसकर ४:११, १२) ‘ख्रिस्ताच्या शरीराच्या’ बाल्यावस्थेनंतर कोणतेच प्रेषित व संदेष्टे राहिले नाहीत. (पडताळा १ करिंथकर १३:८.) परंतु वडील, सुवार्तिक, मेंढपाळकत्त्व, व शिकवण्याच्या कार्यात आताही फार व्यग्र आहेत.—२ तीमथ्य ४:२; तीत १:९.
९. मंडळीत देवाच्या इच्छेचे प्रतिनिधीत्त्व करण्यासाठी वडिलांनी स्वत:ला कसे तयार केले पाहिजे?
९ देवाचे शासन, ईश्वरी शासन पद्धतीचे असल्यामुळे, प्रभावशाली वडील देवाच्या इच्छेसोबत चांगले परिचित आहेत. यहोशवाला दररोज नियमशास्त्र वाचण्याची आज्ञा दिली होती. वडिलांनी देखील अभ्यास करण्याची व नियमितपणे शास्त्रवचनांना पडताळण्याची गरज आहे, तसेच विश्वासू व बुद्धिमान दास वर्गाने प्रकाशित केलेल्या पवित्र शास्त्र प्रकाशनांशी पूर्णपणे परिचित असले पाहिजे. (२ तीमथ्य ३:१४, १५) यामध्ये वॉचटावर व अवेक! मासिके व इतर प्रकाशनांचा देखील समावेश आहे, व ही प्रकाशने विशिष्ट परिस्थितीमध्ये पवित्र शास्त्राचे तत्त्व कसे लागू होते हे दाखवतात.a तथापि, वडिलाला हे माहीत असणे व वॉचटावर संस्थेच्या प्रकाशनात दिलेल्या मार्गांचे अनुकरण करणे महत्त्वपूर्ण असल्यामुळे, त्याने मार्गदर्शनासाठी असलेल्या शास्त्रवचनीय तत्त्वांशी चांगले परिचित असले पाहिजे. मगच तो शास्त्रवचनीय मार्गदर्शनाचा अवलंब, समज व दयेने करण्याच्या स्थितीत असेल.—पडताळा मीखा ६:८.
ख्रिस्ती आत्म्याने सेवा करणे
१०. वडिलांनी कोणत्या वाईट मनोवृत्तीपासून सावध राहिले पाहिजे व कशाप्रकारे?
१० प्रेषित पौलाने करिंथ मंडळीला त्याचे पहिले पत्र सुमारे इ. सन ५५ मध्ये लिहिले होते. मंडळीत त्यांना श्रेष्ठपणा दिला जावा असे काहींना वाटत होते, ही त्याने हाताळलेल्या समस्येपैकी एक समस्या होती. पौलाने लिहिले: “तुम्ही इतक्यातच तृप्त झाला आहा! इतक्यातच धनवान् झाला आहा! आम्हाला सोडून तुम्ही तर राजे बनला आहा! तुम्ही राजे बनलाच असता तर ठीक झाले असते, कारण मग आम्हीही तुमच्याबरोबर राजे बनलो असतो.” (१ करिंथकर ४:८) पहिल्या शतकातील सर्व ख्रिश्चनांना स्वर्गात राजे व याजक बनून येशूसह राज्य करण्याची आशा होती. (प्रकटीकरण २०:४, ६) स्पष्टपणे, असे असतानाही करिंथमधील काही जण, ख्रिश्चन ईश्वरी शासन पद्धतीत पृथ्वीवर राजे नाहीत ही गोष्ट विसरले. जगातील राजांप्रमाणे कार्य करण्याऐवजी, ख्रिस्ती मेंढपाळ यहोवाला आवडत असलेल्या लीनतेच्या गुणात वाढ करतात.—स्तोत्रसंहिता १३८:६; लूक २२:२५-२७.
११. (अ) लीनतेची कोणती उल्लेखनीय उदाहरणे आहेत? (ब) वडील तसेच इतर सर्व ख्रिश्चनांनी स्वतःविषयी कोणता दृष्टिकोन बाळगला पाहिजे?
११ लीनता म्हणजे अशक्तपणा आहे का? कदापि नाही! यहोवाचे वर्णन देखील लीन असे केले आहे. (स्तोत्रसंहिता १८:३५) इस्राएलाच्या राजांनी लढाईला सैन्य पाठवून यहोवाच्या अधीन राष्ट्रावर राज्य केले. तरीही, प्रत्येकाने ‘त्याचे हृदय आपल्या भाऊबंदाच्याबाबतीत उन्मत्त होणार नाही’ याची खबरदारी बाळगावयाची होती. (अनुवाद १७:२०) पुनरूत्थित येशू स्वर्गीय राजा आहे. तथापि, पृथ्वीवर असताना, त्याने त्याच्या शिष्यांचे पाय धुतले. केवढी ती लीनता! त्याच्या शिष्यांनी देखील अशाचप्रकारे लीन असले पाहिजे हे दाखवत त्याने म्हटले: “मी प्रभु व गुरू असूनही, जर तुमचे पाय धुतले, तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत.” (योहान १३:१४; फिलिप्पैकर २:५-८) सर्व गौरव कोणा मनुष्याला नव्हे तर यहोवाला दिले पाहिजे. (प्रकटीकरण ४:११) ते वडील असोत किंवा नसोत, सर्व ख्रिश्चनांनी स्वतःविषयी येशूच्या शब्दांच्या प्रकाशात विचार केला पाहिजे: “आम्ही निरूपयोगी दास आहोत. आम्ही आमचे कर्तव्य केले आहे.” (लूक १७:१०) आणखी इतर दृष्टिकोन गैरईश्वरशासित आहे.
१२. ख्रिस्ती वडिलांनी प्रीती विकसित करावी असा हा महत्त्वपूर्ण गुण का आहे?
१२ ख्रिस्ती वडील लीनतेसोबतच प्रीती विकसित करतात. प्रेषित योहानाने प्रीतीचे महत्त्व दाखवताना असे म्हटले: “जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही, कारण देव प्रीती आहे.” (१ योहान ४:८) प्रेमळ नसलेल्या व्यक्ती ईश्वरशासित नसतात. त्यांना यहोवाची ओळख नसते. देवाच्या पुत्राबद्दल पवित्र शास्त्र सांगते: “येशूने, ह्या जगातील स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते, ते त्याने शेवटपर्यंत केले” (योहान १३:१) ख्रिस्ती मंडळीतील नियमन मंडळाचे भाग होणाऱ्या त्या ११ मनुष्यांना बोलताना, येशूने म्हटले: “जशी मी तुम्हांवर प्रीती केली, तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे.” (योहान १५:१२) प्रीती खऱ्या ख्रिस्ती धर्माचे ओळखचिन्ह आहे. ते भग्नहृदयांना, शोक करणाऱ्यांना, व मुक्ततेची ओढ असणाऱ्या आध्यात्मिक दास्यत्त्वातील लोकांना आकर्षित करते. (यशया ६१:१, २; योहान १३:३५) प्रीती दाखवण्यात वडिलांनी उदाहरणशील असले पाहिजे.
१३. आज समस्या कठीण असल्या तरी, वडील सर्व परिस्थितीमध्ये एक चांगले सामर्थ्य कसे असू शकतात?
१३ आज, वडिलांना गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यास मदत करण्याचे अनेकदा सांगितले जाते. वैवाहिक समस्या चटकन काढून टाकण्यासारख्या नसणाऱ्या व निरंतर स्वरुपाच्या असू शकतील. तरूणांच्या समस्या प्रौढांना समजण्यास कठीण वाटत असतील. अनेकदा भावनात्मक आजारपण आकलनास अवघड असते. वडिलांना अशा गोष्टींचा सामना करण्यासाठी काय केले जाऊ शकते याची खात्री नसते. परंतु एखादा वडील, यहोवाच्या बुद्धिवर प्रार्थनापूर्वक विसंबून राहिल्यास, त्याने पवित्र शास्त्र आणि विश्वासू व बुद्धिमान दासाने प्रकाशित केलेल्या माहितीवर संशोधन केल्यास व मेंढरासोबत लीनतेने व प्रेमळपणे व्यवहार केल्यास, अधिक कठीण परिस्थितीत देखील त्याचा लाभदायक प्रभाव होऊ शकतो हा आत्मविश्वास ते बाळगू शकतील.
१४, १५. यहोवाने त्याच्या लोकांना उत्तम वडील देऊन आशीर्वादित केल्याची काही विवेचने कोणती आहेत?
१४ “मानवांना देणग्या” देण्याद्वारे यहोवाने त्याच्या संघटनेला भरपूर आशीर्वाद दिला आहे. (इफिसकर ४:८) वेळोवेळी, वॉचटावर संस्थेला, लीन वडिलांनी देवाच्या मेंढरांचे दयाशीलपणे पालन केल्याची साक्ष देणारी हर्षदायक पत्रे मिळतात. उदाहरणार्थ, एका मंडळीतील वडील लिहितात: “माझ्यावर अधिक प्रभाव टाकणारी किंवा मंडळीत त्याविषयी अजूनही बोलले जाते, अशी विभागिय पर्यवेक्षकांची यासारखी झालेली दुसरी कोणतीही भेट मला आठवत नाही. विभागिय पर्यवेक्षकांनी मला बांधवांसोबत व्यवहार करताना प्रशंसेवर जोर देत, सकारात्मक मनोवृत्तीचे महत्त्व पाहण्याची मदत केली.”
१५ एका बहिणीला उपचार घेण्यासाठी दूर असलेल्या इस्पितळात जावे लागत होते, ती लिहिते: “घरापासून दूर असलेल्या इस्पितळातील त्या पहिल्या चिंतातूर रात्री एका वडिलांना भेटणे किती धीर देणारे होते! त्यांनी व इतर बांधवांनी माझ्यासोबत अधिक वेळ घालवला. इतकेच नव्हे तर मी ज्या परिस्थितीमधून जात होते ते माहीत असलेल्या लोकांना देखील वाटले की, त्या प्रेमळ व समर्पित बांधवांचे सांत्वन, काळजी, व प्रार्थना याशिवाय मी जगूच शकले नसते.” आणखी एक बहीण लिहिते: “वडील वर्गाने, माझ्या मोठ्या निराशेच्या लढतीतून धीराने नेल्यामुळे मी आज जिवंत आहे. . . . एक बांधव व त्याच्या पत्नीला मला काय विचारावे ते कळत नव्हते. . . . मी कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे त्यांना पूर्णपणे समजले नसतानाही, त्यांनी प्रेमळपणे माझी काळजी घेतल्यामुळे त्याचा माझ्यावर प्रभाव पडला.”
१६. वडिलांना, पेत्र कोणता उपदेश देतो?
१६ होय, अनेक वडील प्रेषित पेत्राच्या सल्ल्याचा अवलंब करत आहेत: “तुम्हामधील देवाच्या कळपाचे पालन करा; करावे लागते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा, द्रव्यलोभाने नव्हे तर उत्सुकतेने करा; तुमच्या हाती सोपविलेल्या लोकांवर धनीपण करणारे असे नव्हे, तर कळपाला कित्ते व्हा.” (१ पेत्र ५:१-३) असे ईश्वरशासित वडील असणे किती आशीर्वादाचे आहेत!
ईश्वरी शासन पद्धतीतील मेंढरे
१७. मंडळीतील सर्व सदस्यांनी वाढ केली पाहिजे अशा काही गुणांची नावे सांगा.
१७ तथापि, ईश्वरी शासन पद्धत केवळ वडिलांची मिळून तयार झाली नाही. मेंढपाळांनी ईश्वरशासित असले पाहिजे तर, मेंढरांनी देखील तसेच असले पाहिजे. कोणत्या मार्गांनी? मेंढपाळांना मार्गदर्शित करणारेच तत्त्व मेंढरांना देखील मार्गदर्शित केले पाहिजे. यहोवाचा आशीर्वाद मिळण्यासाठी केवळ वडिलांनीच नव्हे तर, सर्व ख्रिश्चनांनी लीन असले पाहिजे. (याकोब ४:६) सर्वांनी प्रीती वाढवली पाहिजे कारण प्रीतीविना यहोवाला दिलेली आमची अर्पणे त्याला संतोषविणार नाही. (१ करिंथकर १३:१-३) केवळ वडिलांनीच नव्हे तर, आम्ही सर्वांनी “सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी ह्यांच्याद्वारे . . . त्याच्या [यहोवाच्या] इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे.”—कलस्सैकर १:९.
१८. (अ) सत्याचे केवळ वरवरचे ज्ञान का पुरसे नाही? (ब) आम्ही सर्वच अचूक ज्ञानाने कसे भरले जाऊ शकतो?
१८ तरूण आणि वयस्करांनासुद्धा सैतानाच्या जगात विश्वासू राहण्याचा प्रयत्न करत असताना, सतत कठीण निर्णयांना तोंड द्यावे लागते. जगातील, कपडे, संगीत, सिनेमा, व साहित्याच्या झोकाने काहींच्या आध्यात्मिकतेला आव्हान प्रस्तुत केले आहे. आमचा तोल सांभाळण्यासाठी, सत्याचे केवळ वरवरचे ज्ञान पुरेसे नाही. विश्वासू राहण्याच्या खात्रीने, अचूक ज्ञानाने स्वतःला भरवण्याची गरज आहे. आम्हाला समजबुद्धी व बुद्धीची गरज आहे व ते केवळ देवाचे वचनच आम्हाला देऊ शकते. (नीतीसूत्रे २:१-५) याचा अर्थ अभ्यासाची चांगली सवय विकसित करणे, शिकलेल्या गोष्टीवर मनन करणे, व कार्यात ते उतरवणे. (स्तोत्रसंहिता १:१-३; प्रकटीकरण १:३) पौल केवळ वडिलांनाच नव्हे तर, सर्व ख्रिश्चनांना लिहित असताना, म्हणाला: “ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे.”—इब्रीयांस ५:१४.
मेंढपाळ आणि मेंढरे एकत्र काम करतात
१९, २०. वडिलांना सहकार्य देण्याच्या बाबतीत सर्वांना कोणता उपदेश केला आहे, व का?
१९ शेवटी, वडिलांना सहकार्य देणारे खरेपणाने ईश्वरशासित आत्मा प्रदर्शित करतात असे म्हटले जाऊ शकते. पौलाने तीमथ्याला लिहिले: “जे वडील चांगल्या प्रकारे आपला अधिकार चालवतात, विशेषकरून जे उपदेश व शिक्षण ह्या बाबतीत श्रम घेतात ते दुप्पट सन्मानास योग्य गणले जावे.” (१ तीमथ्य ५:१७; १ पेत्र ५:५, ६) वडिलाचे पद हा एक अद्भुत विशेषाधिकार आहे, परंतु अनेक वडिलांना कुटुंब असून प्रत्येक दिवशी त्यांच्या प्रापंचिक कामाला त्यांना जावे लागते व पत्नी तसेच मुलांची काळजी घ्यावी लागते. सेवा करण्यासाठी ते आनंदी असताना, मंडळी फाजील टीकात्मक व अवाजवी मागणी करणारी असण्याऐवजी मदत करणारी असल्यास त्यांची सेवा अधिक सोपी आणि फलदायक होऊ शकते.—इब्रीयांस १३:१७.
२० प्रेषित पौलाने म्हटले: “जे तुमचे अधिकारी होते, ज्यांनी तुम्हाला देवाचे वचन सांगितले त्यांची आठवण करा, त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात आणून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा.” (इब्रीयांस १३:७) नाही, बांधवांना वडिलांचे अनुकरण करण्याचे उत्तेजन पौलाने दिले नाही. (१ करिंथकर १:१२) मनुष्याचे अनुकरण करणे ईश्वरशासित असणार नाही. परंतु सुवार्तिक कार्यामध्ये क्रियाशील असलेल्या, सभेला नियमित असलेल्या, व मंडळीसोबत लीनतेने व प्रेमळपणे व्यवहार करणाऱ्या वडिलाने प्रकट केलेल्या ईश्वरशासित विश्वासाचे अनुकरण करणे नक्कीच समंजसपणाचे ठरेल.
विश्वासाची साक्ष
२१. मोशेसारखा दृढ विश्वास ख्रिश्चन लोक कसा दाखवतात?
२१ खरोखर, मानवी इतिहासाच्या ऱ्हास होत असलेल्या समयातील ईश्वरशासित संघटनेचे अस्तित्त्व, ही, थोर दैवी शासकाच्या सामर्थ्याची साक्ष आहे. (यशया २:२-५) तसेच, जीवनाच्या दैनंदिन समस्यासोबत झगडत असताना यहोवा त्यांचा शासक आहे हे कधीही न विसरणाऱ्या ५० लाख ख्रिस्ती पुरूष, स्त्रिया, व मुलांच्या विश्वासाची ती एक साक्ष आहे. विश्वासू मोशेने ज्याप्रमाणे “जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा धीर धरला,” तशाचप्रकारचा दृढ विश्वास आज ख्रिश्चनांना आहे. (इब्रीयांस ११:२७) ईश्वरी शासन पद्धतीत राहण्याचा त्यांना विशेषाधिकार आहे, त्यासाठी ते रोज यहोवाचे आभार मानतात. (स्तोत्रसंहिता १००:४, ५) यहोवाच्या बचाव करण्याच्या सामर्थ्याचा अनुभव घेत असताना, हे घोषित करण्यासाठी त्यांना आनंद वाटतो की, “यहोवा आमचा न्यायाधीश आहे, यहोवा आमचा नियमकर्ता आहे, यहोवा आमचा राजा आहे.”—यशया ३३:२२.
[तळटीपा]
a अशा प्रकाशनामध्ये, “पे अटेन्शन टू युवरसेल्फ ॲण्ड टू ऑल द फ्लॉक,” हे शास्त्रवचनीय मार्गदर्शन पुरवलेले पुस्तक आहे, व हे मंडळीतील नेमलेल्या पर्यवेक्षकांसाठी किंवा वडिलांसाठी पुरवले आहे.
पवित्र शास्त्र काय दाखवते?
▫ कोणत्या मार्गाने ख्रिश्चन, ईश्वरी शासन पद्धतीच्या अधीन आहेत?
▫ आज ईश्वरी शासन पद्धतीला कसे संघटीत केले आहे?
▫ वडिलांनी त्यांची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी कोणत्या मार्गांनी स्वतःची तयारी केली पाहिजे?
▫ वडिलांना वाढ करण्यास व प्रदर्शित करण्यासाठी कोणते ख्रिस्ती गुण महत्त्वाचे आहेत?
▫ ईश्वरी शासन पद्धतीत, मेंढपाळ आणि मेंढरात कोणता नातेसंबंध अस्तित्त्वात असला पाहिजे?
[२८ पानांवरील चित्रं]
आदाम आणि हव्वेने बरोबर आणि चूक याबद्दल स्वतःच निर्णय घेण्याच्या इच्छेमुळे नंदनवन गमावले
[३० पानांवरील चित्रं]
वडिलांनी, मेंढरासोबत लीनतेने व प्रेमळपणे व्यवहार केल्यास, ते नेहमीच चांगल्यासाठी सामर्थ्य ठरतील