दुरात्म्यांवर कोण विश्वास ठेवतात?
अदृश्य आत्म्यांचा तुमच्या जीवनावर प्रभाव होऊ शकतो यावर तुमचा विश्वास आहे का? पुष्कळ जण त्याचे उत्तर जोरदारपणे नाही, असे देतील. देवाचे अस्तित्व मान्य करीत असले तरी ते दुष्टाईच्या अमानुष कार्यकर्त्यांच्या कल्पनांचा उपहास करतात.
पाश्चिमात्य जगात, आत्म्यांवरील पसरलेला अविश्वास हा ख्रिस्ती धर्मजगताच्या प्रभावामुळे काही प्रमाणात दिसून येतो. कारण शतकांपर्यंत त्यांनी असे शिकवले होते की, पृथ्वी ही विश्वाचे केंद्र असून ती स्वर्ग आणि भूमिगत नरकाच्या मध्यभागी या शिक्षणानुसार, देवदूतांनी स्वर्गीय आशीर्वादांचा आनंद उपभोगला तर दुरात्म्यांनी नरकावर अधिपत्य चालवले.
विज्ञानाच्या शोधाने विश्वाच्या रचनेच्या बाबतीत असलेल्या चुकीच्या कल्पनांना नाकारण्यासाठी कारणीभूत केले असताना, आत्मिक प्राण्यांवरील विश्वास असंस्कृत झाला. द न्यू एन्साक्लोपिडीया ब्रिटानिका म्हणते: “१६व्या शतकाच्या कोपरनिकस क्रांतीच्या परिणामात (पोलिश खगोलशास्त्रवेत्ता कोपरनिकस याच्या सिद्धांतावर आधारित), . . . पृथ्वीला जगाचे केंद्रस्थान म्हणून पाहिले गेले नाही तर, त्याऐवजी, असीम विश्वातील एका आकाशगंगेचा अतिशय लहान असलेल्या सौर ग्रहमालेतील फक्त एक ग्रह आहे—देवदूत आणि दुरात्म्यांच्या कल्पना आता उचित वाटत नाहीत.”
अनेकांचा दुरात्म्यांवर विश्वास नसला तरी, लाखोंचा आहे. अनेक धर्मात, भूतकाळात व वर्तमान काळात देखील पतित देवदूत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आध्यात्मिकतेत भ्रष्ट या नात्याने असलेल्या त्यांच्या भूमिकेव्यतिरिक्त, हे वाईट देवदूत विपत्ती, जसे की युद्ध, दुष्काळ आणि भूमिकंपाचे प्रतिनिधी तसेच आजारपण, मानसिक आजार आणि मृत्यूच्या पुरस्कर्त्याप्रमाणे दिसत आहेत.
ख्रिस्ती धर्मराज्यातील तसेच यहुदी धर्मातील प्रमुख दुरात्मा, दियाबल सैतानाला मुसलमान लोक इब्लिस म्हणतात. प्राचीन पर्शियाच्या (इराण) झोरोॲसस्ट्रियनिझम धर्मात तो अँग्र मन्यू दिसतो [नंतर त्याला अहरीमन असे म्हटले गेले]. दुसऱ्या आणि तिसऱ्या शतकात भरभराट होत असलेल्या ज्ञेयवादी धर्मात, दियाबलाला यक्ष समजले जात होते, ही संज्ञा अशा ईर्ष्याळू व निर्माणकर्त्यापेक्षा कमी असलेल्या देवाला दिली गेली व याचीच मानवजातीतील बहुसंख्य लोकांनी अजाणतेत भक्ती केली आहे.
दुष्टाचे कमी प्रतीचे आत्मे पूर्वेकडील धर्मामध्ये उठून दिसतात. असुर (दुरात्मे) देवांचा विरोध करतात असा हिंदू लोक विश्वास ठेवतात. विशेषपणे, राक्षस ही असुरातील मोठी भयग्रस्त जात आहे, कारण ते भेसूर व्यक्ती असून स्मशानभूमीत फिरत असतात.
बुद्ध धर्माचे लोक, दुरात्म्यांची कल्पना, व्यक्तिमत्त्वाच्या शक्तीबरोबर, जी माणसाला निर्वाणा, लुप्त झालेली इच्छा प्राप्त करण्यापासून परावृत्त करते अशी करतात. त्यांच्यामधील छळ करणारा प्रमुख, मारा हा आहे, व त्याच्या सोबत त्याच्या तीन मुली, रती (इच्छा), राग (सुख), आणि तन्हा (अस्वस्थता) ह्या आहेत.
चीनमधील उपासक ग्वा किंवा स्वाभाविक दुरात्म्यांपासून संरक्षण मिळण्यासाठी होळी, मशाली किंवा फटाक्यांचा वापर करतात. जपानी धर्मांचाही पुष्कळ दुरात्मे असल्याचा विश्वास आहे त्यात टेंग्यू हे भयानक दुरात्मे असल्याचे ते मानतात. हे दुरात्मे मांत्रिकांनी काढून टाकण्यापर्यंत लोकांना पछाडतात.
आशिया, आफ्रिका, ओशॅनिया, अमेरिकातील अशिक्षित धर्मामध्ये, असा विश्वास केला जातो की, आत्मिक प्राणी परिस्थितीप्रमाणे किंवा त्यांच्या प्रचलित वृत्तीवरून साहाय्यक किंवा हानीकारक असू शकतात. विपत्ती टाळण्यासाठी तसेच कृपापसंती मिळवण्यासाठी लोक या आत्म्यांची पूजा करतात.
यात अधिक भर म्हणजे जादू व भूतविद्यामधील विस्तृत प्रमाणातील आवड ही आहे, दुरात्म्यांवरील विश्वासाचा अनेक काळापासूनचा व्यापक इतिहास आहे हे स्पष्टच आहे. परंतु, अशा प्रकारचे आत्मिक प्राणी अस्तित्वात असल्याचा विश्वास बाळगणे समंजसपणाचे आहे का? पवित्र शास्त्र म्हणते की, ते अस्तित्वात आहेत. तथापि, ते अस्तित्वात असल्यास, मानवांवर हानीकारक प्रभाव करण्यासाठी देव त्यांना परवानगी का देतो बरे?