धडा २०
ख्रिस्ती मंडळीचं काम कसं चालतं?
यहोवा हा व्यवस्थेचा देव आहे. (१ करिंथकर १४:३३) त्यामुळे साहजिकच, त्याचे लोक सगळं काही व्यवस्थित रितीने करतात. तर मग, ख्रिस्ती मंडळीचं काम कसं चालतं? आणि ते सुरळीत चालावं म्हणून आपण काय करू शकतो?
१. ख्रिस्ती मंडळीचा प्रमुख कोण आहे?
“ख्रिस्त मंडळीचं मस्तक” आहे. (इफिसकर ५:२३) तो स्वर्गातून, सबंध जगात असलेल्या यहोवाच्या लोकांच्या कार्यांवर देखरेख करतो. त्याने ‘विश्वासू आणि बुद्धिमान दासालाही’ नेमलंय. हा अनुभवी वडिलांनी मिळून बनलेला एक लहानसा गट आहे. याला नियमन मंडळ असंही म्हटलं जातं. (मत्तय २४:४५-४७ वाचा.) पहिल्या शतकात यरुशलेममध्ये असलेले वडील आणि प्रेषित, ख्रिस्ती मंडळीचं मार्गदर्शन करायचे. त्याच प्रकारे आजसुद्धा नियमन मंडळ जगभरातल्या मंडळ्यांचं मार्गदर्शन करतं. (प्रेषितांची कार्यं १५:२) पण हे बांधव आमच्या संघटनेचे प्रमुख नाहीत. तर ते मार्गदर्शनासाठी यहोवावर आणि त्याच्या वचनावर अवलंबून राहतात आणि येशूच्या नेतृत्वाखाली काम करतात.
२. मंडळीत वडील कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडतात?
वडील हे अनुभवी ख्रिस्ती बांधव आहेत, जे यहोवाच्या लोकांना बायबलमधून शिकवतात, त्यांना मदत करतात आणि त्यांना प्रोत्साहनही देतात. यासाठी त्यांना पगार दिला जात नाही. उलट, ते “देवासमोर स्वखुषीने” हे काम करतात आणि “बेइमानीने कमवलेल्या पैशाच्या लोभाने नाही, तर उत्सुकतेने” करतात. (१ पेत्र ५:१, २) सहायक सेवक म्हणून काम करणारे बांधव वडिलांना मदत करतात. काही काळाने यांपैकी काही बांधव वडील म्हणून सेवा करू शकतात.
नियमन मंडळ काही वडिलांना विभागीय पर्यवेक्षक (सर्किट ओव्हरसियर) म्हणून सेवा करण्यासाठी नेमतं. हे विभागीय पर्यवेक्षक वेगवेगळ्या मंडळ्यांना भेटी देऊन त्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देतात. तसंच, ते बायबलमधल्या पात्रता पूर्ण करणाऱ्या बांधवांची वडील आणि सहायक सेवक म्हणून नेमणूक करतात.—१ तीमथ्य ३:१-१०, १२; तीत १:५-९.
३. प्रत्येक यहोवाच्या साक्षीदाराची काय भूमिका आहे?
मंडळीतले सर्व जण आपापल्या परिस्थितीप्रमाणे सभांमध्ये आणि सेवाकार्यात सहभाग घेऊन “यहोवाच्या नावाची स्तुती” करतात.—स्तोत्र १४८:१२, १३ वाचा.
आणखी जाणून घेऊ या
येशू मंडळीचं नेतृत्व कसं करतो, वडील त्याच्या उदाहरणाप्रमाणे कसं चालतात आणि आपण येशूला आणि वडिलांना सहकार्य कसं करू शकतो, हे जाणून घेऊ या.
४. येशू प्रेमळपणे नेतृत्व करतो
येशूने आपल्याला एक आमंत्रण दिलंय, ज्यावरून आपल्याला त्याचं प्रेम दिसून येतं. मत्तय ११:२८-३० वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
येशू कशा प्रकारे नेतृत्व करतो? आणि यामुळे आपल्याला कसं वाटतं?
वडील येशूच्या उदाहरणाप्रमाणे कसं वागतात? व्हिडिओ पाहा.
वडिलांनी मंडळीत कशा प्रकारे सेवा केली पाहिजे हे बायबलमध्ये स्पष्टपणे सांगितलंय.
यशया ३२:२ आणि १ पेत्र ५:१-३ वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
येशूप्रमाणेच वडीलसुद्धा मंडळीतल्या भाऊबहिणींना प्रेमळपणे मदत करायचा प्रयत्न करतात. हे समजल्यावर तुम्हाला कसं वाटतं?
वडील आणखी कशा प्रकारे येशूचं अनुकरण करतात?
५. वडील जे शिकवतात त्याप्रमाणे वागतातसुद्धा
वडिलांनी आपल्या जबाबदारीकडे कोणत्या दृष्टीने पाहावं असं येशूला वाटतं? व्हिडिओ पाहा.
मंडळीत पुढाकार घेणाऱ्या बांधवांनी कसं वागलं पाहिजे, याबद्दल येशूने सांगितलं. मत्तय २३:८-१२ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
बायबलमध्ये वडिलांसाठी काय सांगितलेलं आहे? धर्मपुढारी याप्रमाणे वागतात असं तुम्हाला वाटतं का?
१. वडील स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा विश्वास मजबूत ठेवायला मेहनत घेतात
२. वडील मंडळीतल्या सर्वांची काळजी घेतात
३. वडील नियमितपणे प्रचार करतात
४. वडील मंडळीत शिकवतात. तसंच, ते साफसफाईच्या आणि इतर कामांतही मदत करतात
६. आपण वडिलांना सहकार्य केलं पाहिजे
आपण वडिलांना सहकार्य का केलं पाहिजे? बायबल याचं एक महत्त्वाचं कारण सांगतं. इब्री लोकांना १३:१७ वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
बायबल आपल्याला पुढाकार घेणाऱ्यांच्या आज्ञा पाळायचं आणि त्यांच्या अधीन राहायचं प्रोत्साहन देतं. हे तुम्हाला योग्य वाटतं का? का वाटतं, किंवा का नाही?
लूक १६:१० वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
अगदी किरकोळ वाटणाऱ्या गोष्टींमध्येही आपण वडिलांना सहकार्य का केलं पाहिजे?
काही जण म्हणतात: “प्रत्येक जण आपल्या मनाप्रमाणे देवाची भक्ती करू शकतो.”
मंडळीचा भाग बनून देवाची उपासना केल्यामुळे कोणते फायदे होतात असं तुम्हाला वाटतं?
थोडक्यात
येशू मंडळीचा प्रमुख आहे. त्याच्या नेतृत्वाखाली काम करणारे वडील प्रेमळपणे आपली काळजी घेतात आणि स्वतःच्या उदाहरणातून शिकवतात. म्हणून आपण आनंदाने त्यांना सहकार्य करतो.
उजळणी
मंडळीचा प्रमुख कोण आहे?
वडील मंडळीला मदत कशी करतात?
यहोवाच्या उपासकांपैकी प्रत्येकाची काय भूमिका आहे?
हेसुद्धा पाहा
नियमन मंडळाला आणि वडिलांना ख्रिस्ती बांधवांची किती काळजी आहे याचा एक पुरावा पाहा.
विभागीय पर्यवेक्षकांच्या कामाबद्दल जाणून घ्या.
ख्रिस्ती मंडळीत स्त्रियांच्या भूमिकेबद्दल वाचा.
“क्या यहोवा के साक्षियों में औरतें भी सिखाती हैं?” (ऑनलाईन लेख)
मंडळीतल्या भाऊबहिणींना प्रोत्साहन देण्यासाठी वडील कशी मेहनत घेतात हे जाणून घ्या.
“ख्रिस्ती वडील—आपल्या ‘आनंदात साहाय्यकारी’” (टेहळणी बुरूज, १५ जानेवारी, २०१३)