यहोवा, पूर्व आणि पश्चिमेकडील त्याच्या लोकांना दृढ करतो
यहोवा त्याच्या साक्षीदारांना, प्रचारकार्यावर बंदी असलेल्या क्षेत्रांमध्ये, हिंसाचाराने विभाजित झालेल्या देशांमध्ये, व अलिकडेच ज्या राष्ट्रांतील बंदी उठवली त्या राष्ट्रांमध्ये, खरेच, संपूर्ण जगव्याप्त क्षेत्रात “सामर्थ्याची पराकोटी” निरंतर पुरवत आहे.—२ करिंथकर ४:७.
बंदी असताना भरभराट
अतिपूर्वेच्या द्वीपसमुहात, प्रचारकार्याच्या कामावर आता १७ वर्षांपासून बंदी आहे. यामुळे तेथील साक्षीदार नाउमेद झाले का? मुळीच नाही! मागील मे महिन्यात, त्यांनी १०,७५६ प्रचारकांचा नवा उच्चांक गाठला, ज्यामध्ये १,२९७ प्रचारक पूर्ण वेळचे सेवक या नात्याने सेवा करत होते. जसजशी जागतिक परिस्थिती अधोगतीस जात आहे तसे, बेटांवरील लोक सत्य ऐकण्यासाठी अधिक प्रवृत्त होत आहेत. यामुळेच ते आस्थेवाईक लोकांच्या घरी जाऊन १५,६५४ पवित्र शास्त्राभ्यास चालविल्याचा अहवाल देत आहेत. येशूच्या मरणाचा स्मरणदिन साजरा करण्यासाठी ज्या सभा गुप्तपणे भरविल्या गेल्या तेथे सुरवातीला, २५,३९७ लोक उपस्थित होते.
पुन्हा स्थानिक परिस्थितीला अनुलक्षून, सुज्ञपणे जेव्हा “ईश्वरी शिक्षण” प्रांतिय अधिवेशने भरवली तेव्हा आमच्या बांधवांना, अमेरिकेत प्रकाशित झालेली प्रकाशने त्यांच्या भाषेत मिळाल्यावर खूप आनंद झाला. भाषांतरकार, मुद्रितशोधक आणि इतर जण, शेकडो पाने असलेले मुख्य प्रकाशन वेळेवर तयार करण्यासाठी जादा वेळ काम करण्यासाठी आपण होऊन पुढे सरसावले. तसेच साक्षीदार नसलेले लोक मुद्रणालय, छापण्याचे व बांधणी करण्याचे चांगले काम करण्यास आनंदाने पुढे आले. अधिवेशनाला उपस्थित असलेल्या सर्वांना, हजारापेक्षा अधिक रंगीबेरंगी चित्रांची मांडणी केलेले प्रकाशन प्राप्त करण्यास अत्यानंद झाला. अनेक सरकारी अधिकारी यहोवाच्या साक्षीदारांचा मान राखतात, मुख्यत्वे ख्रिस्ती धर्मराज्याच्या पाळक वर्गाकडून विरोध येत असतो. फार लवकर ही बंदी उठवली जाईल अशी आशा केली जाते.
अमेरिकेतील रहिवाशांविषयी काय?
या पश्चिमेकडील राष्ट्रांतील यहोवाचे साक्षीदार, पूर्वेकडील त्यांच्या बांधवांसोबत समस्यांना धैर्याने तोंड देण्यात एकवटलेले आहेत, आणि यहोवाचा आत्मा त्यांना कठीण परिस्थितींवर मात करण्यास मदत करतो. उदाहरणार्थ, बेकायदेशीर मादक पदार्थांचे उत्पादन आणि व्यापार यावर ताबा ठेवणारा गट नियमितपणे जंगलातून प्रवास करतो त्या लॅटीन अमेरिकेच्या देशातील हा पुढील अहवाल विचारात घ्या.
साक्षीदारांचा एक गट, एकांती क्षेत्रात बस घेऊन गेला. बसमधून उतरल्यावर, त्यांना खेडेगावाच्या बाहेर जाणारी एक पायवाट दिसली. यास्तव, भगिणींना व मुलांना खेड्यात कार्य करण्यासाठी नेमणूक देऊन पाच बांधव ती पायवाट कोठे जाते हे पाहण्यासाठी गेले. त्यातील एक बांधव सांगतो:
“त्या पायवाटेने दोन तास चालत जाताना फारच तुरळक घरे दिसली. मग, अचानक आठ शस्त्रधारी पुरुष झाडीतून निघाले. काहींकडे मशिनगन्स् होत्या तर काहींकडे कोयते होते. आम्ही कोठे येऊन फसलो होतो? त्यांना काय हवे असे आम्ही विचारू लागलो, पण आम्हाला, एकही शब्द न बोलता तोंड बंद करून पुढे चालण्याची आज्ञा दिली गेली. आणि आम्ही चालू लागलो! आणखी दोन तासांसाठी दाट जंगलाच्या झुडुपातून चालत गेल्यावर आम्ही, निसंशये एका सशस्त्र छावणीत आलो. सगळीकडे बंदुका असलेले रक्षक होते. मध्यभागी सुंदर बांधलेले एक घर होते जेथे आम्हाला जाण्यास सांगितले.
“बसल्यानंतर छावणीचा नेता वाटत असणाऱ्या मनुष्याकडून आमची चौकशी सुरू झाली. तो टापटिप, सुशिक्षित, व प्रतिष्ठित होता. आमच्यातील एका बांधवाकडे बोट दाखवत त्याने त्याला उभे राहण्यास सांगितले. आणि त्याने त्याला विचारले: ‘तुला [आमच्या] गटाविषयी काय वाटते?’ आम्ही कोठे होतो याची पूर्ण जाणीव असल्यामुळे त्या बांधवाने उत्तर दिले: ‘हे पाहा, आम्हाला तुमच्या गटाविषयी माहिती आहे, परंतु आम्हाला यामध्ये किंवा इतर कोणत्याही राजकीय गटाविषयी काही आस्था नाही. येथे येण्याचा आमचा उद्देश, येशू ख्रिस्ताकरवी येणाऱ्या यहोवा देवाच्या राज्याचा प्रचार करणे हाच केवळ आहे. ते राज्य लवकरच सद्य व्यवस्थिकरणातील सर्व राजकीय सरकारांचा नाश करील व कोणीही मनुष्य किंवा गट करू शकणार नाही असे आश्चर्यकारक आशीर्वाद लोकांसाठी ह्या पृथ्वीवर नंदवनातील परिस्थितीत आणील.’
“त्या माणसाची मनोवृत्ती बदलली. आणि तो प्रश्ने विचारू लागला. ‘तुम्ही ह्या सर्व गोष्टी कोठे शिकलात? असे बोलण्यासाठी तुम्हाला कसे तयार करण्यात आले?’ दीड तास आम्ही त्याला जागतिक परिस्थितीबद्दल व मानवजातीसाठी असलेल्या एकमेव आशेची ओळख केवळ पवित्र शास्त्र देते याची चांगली साक्ष देऊ शकलो. आम्ही रोमकरास १३ व्या अध्यायाची देखील स्पष्टता दिली की, आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना आज्ञाधारकता दाखवतो, परंतु यहोवाच्या वचनात व त्यांच्यामध्ये जेव्हा विरोध होतो तेव्हा, आम्ही आमचा देव, यहोवा याला पहिल्यांदा आज्ञाधारकता दाखवतो. शेवटी, आमच्याकडे असलेली पुस्तके आम्ही त्याला सादर केली. त्यातील त्याने तीन पुस्तके घेतली आणि एक पवित्र शास्त्र घेतले व आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने आम्हाला त्या सर्वांची किंमत देखील दिली. तो ती पुस्तके वाचेल असे म्हणाला.
“नंतर, त्या नेत्याने एका पुरूषाला, आम्हाला छावणीच्या बाहेर घेऊन जाण्यास खुणवून सांगितले. लगेच आम्ही पुन्हा आमच्या मार्गावर आलो, व साक्षकार्याच्या दुसऱ्या एका क्षेत्रात विजय मिळवून दिल्याबद्दल आम्ही यहोवाचे आभार मानले.”
झगड्यांनी ग्रस्त झालेल्या आफ्रिकेत
अति पूर्व आणि अति पश्चिमेच्या मध्यभागी आफ्रिकन खंड आहे. वंशीय झगड्यांनी तेथील काही राष्ट्रांना हिंसेचा अतिप्रचंड भोवरा बनवले आहे. लायबेरियात, पुन्हा एकदा मुलकी युद्धाचा उद्रेक झाल्यामुळे यहोवाच्या लोकांवर त्याचा अत्यंत खोलवर परिणाम झाला आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर १९९२ च्या दरम्यान सुरवातीला राजधानीच्या शहरात व आसपासच्या शहरात झगडे होत होते. मग, जसजसे हे युद्ध राष्ट्रांमध्ये पसरत गेले, तसतसे सर्व मंडळ्या विस्कळीत होऊ लागल्या व बांधव उरलेल्या लोकसंख्येसोबत झाडींमध्ये आश्रयासाठी धावले. तथापि, त्यांचा आवेश कमी झालेला नाही. पळून जात असताना, त्यांनी प्रचार केला, आणि याचा परिणाम असा झाला की आतील भागाच्या दूरपर्यंत एक महान साक्ष दिली गेली.
एका मंडळीतील, घरे सोडावयास लागणाऱ्या बांधवांनी रबर वृक्षांच्या लागवडीच्या मध्यभागी तात्पुरते राज्य सभागृह बांधले. लष्करी सैन्याच्या दर्शनी भागाच्या शेजारी असलेल्या एका गावात, मुलकी लोक हवेतून होणाऱ्या बॉम्ब माऱ्यातून वाचण्यासाठी दिवसा आजूबाजूच्या रबर वृक्षांच्या वनराजीत पळून जात होते. स्थानिक बांधवांनी (तसेच राजधानी, मोनरोविया येथील अनेक निर्वासित प्रचारकांनी) क्षेत्र कार्याची व्यवस्था केली व ते, रबर वृक्षांखाली आश्रय घेणाऱ्या हजारोंना प्रचार करताना नियमितपणे दिसत होते! जेव्हा एखादे लढाऊ विमान येत असे, बांधव आणि बहिणी जवळपासच्या खड्ड्यांमध्ये उड्या टाकत, आणि मग धोका टळल्यावर पुन्हा साक्षकार्य करत असत.
आश्चर्यकारकपणे, हजारापेक्षा अधिक मंडळीचे प्रचारक मुलकी युद्धाची परिस्थिती असतानाही, क्षेत्र कार्यामध्ये १८.१ तासांची व महिन्याला ३,१११ चालवत असलेल्या पवित्र शास्त्र अभ्यासांची सरासरी गाठल्याचा अहवाल संस्थेला पाठवू शकले.
मागील चार वर्षांमध्ये आफ्रिकेत, १८ राष्ट्रांमध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या कामावरची बंदी उठवली आहे. व आनंदी आनंदच! ऑक्टोबर १९६७ मध्ये मलावीतील यहोवाच्या साक्षीदारांवर आणलेल्या बंदीला ऑगस्ट १२ रोजी उठवण्यात आले. भूमिगतपणे सुवार्ता प्रचाराचे काम नेहमीच तेजीच होते, विरोधकांनी त्यांच्या अनेक प्रिय सहकाऱ्यांचा वध केल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी पुनरूत्थानापर्यंत थांबून राहवे लागणार असले तरी आता स्वातंत्र्य असल्यामुळे साक्षीदारांना पुढे जाणे शक्य झाले आहे.
पुढे मोझांबिक येथे, ऑक्टोबर ४, १९९२ पासून एक शांतीचा करार अमलात आणला गेला, मागील १६ वर्षांपासून चाललेल्या हानीकारक युद्धामुळे पूर्वी सुलभ नसलेल्या क्षेत्रांमध्ये आता पोहोंचणे शक्य झाले आहे. कॉरीओको क्षेत्रात, मागील सात वर्षांपासून संस्थेशी कोणताच संपर्क नव्हता अशा ३७५ बंधू आणि भगिणींसोबत पुन्हा संपर्क जोडण्यात आला. यहोवाच्या साक्षीदारांचे मन बदलवण्यासाठी, पूर्वी छळछावण्याचे क्षेत्र व छळ करणारे व्यक्ती यांचे क्षेत्र समजल्या जाणाऱ्या प्रदेशाच्या राजधानीत म्हणजे मीलांझ येथे, एक खास दिवसीय संमेलन भरवले होते ज्यामध्ये मलावीतील आश्रितांपैकी अनेकजण होते. एकूण २,९१५ व्यक्तींची उपस्थिती आश्चर्यजनक होती. यामध्ये गावचा अधिकारी उपस्थित होता व त्यानेच यहोवाच्या साक्षीदारांचे स्वागत केले. अशाप्रकारे, आधी “यहोवाच्या साक्षीदारांचे मन बदलण्यासाठी छळ करणाऱ्यांचे असलेले केंद्र,” त्या दिवसासाठी ईश्वरी शिक्षण देणारे केंद्र बनले.
एका मिशनऱ्याने लिहिले: “टेट प्रांतातील आश्रितांसाठी असलेल्या छावण्यांमध्ये आलेल्या बांधवाविषयी, एका युएनएचसीआरच्या (युनाएटेड नेशन्स् हाय कमिशनर फॉर रेफ्युजीज.) प्रतिनिधीने मनोरंजक पाहणी केली. त्यांनी म्हटले की यहोवाच्या साक्षीदारांनी त्यांच्या स्वतःच्या छावण्याची इतर गटांपासून वेगळी, व्यवस्था केली होती. ते म्हणाले, ‘सुव्यवस्थित चालणारी केवळ त्यांचीच छावणी होती,’ व पुढे त्यांनी असे म्हटले, ‘यहोवाचे साक्षीदार स्वच्छ, सुव्यवस्थित व सुशिक्षित आहेत.’ मग माझी स्वतःची खात्री होण्यासाठी त्यांनी त्यांच्या विमानात बसण्याचे आमंत्रण मला दिले. वर आकाशातून वैमानिकाने मला दोन छावण्या दाखवल्या. त्यातील एका छावणीतील घरे गलिच्छ व घाणेरडी होती, कोणतीही योजना न करता अव्यवस्थितपणे जवळजवळ बांधलेली मातीची घरे होती. दुसऱ्या छावणीमधील घरे योग्य रीतीने योजना केल्याप्रमाणे होती, व रस्त्याच्या शेजारी एका ओळीने अशी घरे वेगवेगळी बांधली होती. त्या घरांचे स्वरूप नीट, व समोरील पटांगण झाडलेले होते. काही घरांना, घरात बनवलेला रंग लावला होता. ‘यातील तुमच्या लोकांचे कोणते हे ओळखा पाहू?’ वैमानिकाने विचारले. छावण्यांतील बांधवांना भेटून मला अतिशय आनंद झाला. ह्या साक्षीदार खेडेगावामध्ये आता आठ मंडळ्या आहेत.”
“गरुडांच्या देशा”मध्ये
नाही, गरुडाचे चिन्ह असणारी ही अमेरिका नाही! पूर्व आणि पश्चिमेच्या मध्ये एक युरोपियन राष्ट्र आहे, अल्बेनिया, ज्याचे औपचारिक भाषेत श्किपरिय हे नाव आहे, ज्याचा अर्थ “गरुडांचा देश” असा होतो. अलिकडेच, या राष्ट्रांतील यहोवाच्या साक्षीदारांवर ५० वर्षांपासून असलेली क्रुर बंदी उठवण्यात आली आणि ते पूर्व व पश्चिमेतील त्यांच्या बांधवांसोबत भक्तीच्या स्वातंत्र्याचा आनंद लुटण्यास एक झाले आहेत. ते खरोखरच “संधी साधून घेत आहेत.” (इफिसकरास ५:१६, न्यूव) अल्बेनियाच्या इतिहासात पहिल्यांदा, मार्च २१ रोजी रविवारी, एक दिवसीय संमेलन राजधानीतील टिरेन येथील नॅशनल थिएटर मध्ये झाले. शनिवारी दुपारी ७५ साक्षीदार स्वयंसेवकांच्या एका गटाने मोडकळीस आलेल्या सभेच्या ठिकाणाला तेजस्वी, स्वच्छ संमेलन गृह बनवले होते. तेथील व्यवस्थापकवर्ग आश्चर्यचकित झाला. आणि हे लक्षात घेतले पाहिजे की ७५ स्वयंसेवकांपैकी केवळ २० जणांचाच बाप्तिस्मा झाला होता!
यापेक्षा अधिक चांगले वातावरण असू शकले नसते. परदेशातील प्रतिनिधी आले, तेव्हा मोठ्या प्रमाणात हस्तांदोलन व आलिंगन देणे या अभिवादनाच्या प्रकारांनी खास संमेलनाला अतिशय खास बनवले. आकाशाकडे हात करून बंधू नॉशो डोरी यांनी सुरवातीची प्रार्थना केली. त्यांचा बाप्तिस्मा १९३० मध्ये झाला होता आणि आता ते पूर्णपणे अंध आहेत. तेथील कार्यक्रम अल्बेनियन भाषेत झाला, त्यातील बहुतेक भाग विदेशी खास पायनियरांनी सादर केला. उपस्थित असलेले ५८५ जण, “ख्रिस्ती समर्पण” हे संमेलनासाठी भाषांतरीत केलेल्या सहा गाण्यातील एक गीत गात असताना भेट देणाऱ्या ग्रीक बांधवांनी दयाळूपणे स्थानिक राज्यसभागृहात बाप्तिस्म्यासाठी तयार केलेल्या तलावाकडे, ४१ नवे बंधू व बहिणी चालू लागले. किती मोठा तो बदल! पूर्वी, पवित्र शास्त्र बाळगले तर शिक्षा म्हणून काम करण्यासाठी छावणीत जावे लागत होते, व सभा दोन किंवा तीन लोकांच्या गटापुरत्याच मर्यादित स्वरुपाच्या होत्या.
संमेलन झाल्यानंतरच्या दिवशी, वॉचटावरच्या दप्तराला सभागृहाच्या मुख्य अधिकाऱ्याकडून फोन आला. सभागृहाचा वापर कोण करतात त्याविषयी सामान्यपणे ते कमी लक्ष घालतात. ते साहाय्यक अधिकाऱ्याचे काम आहे. परंतु त्यांनी म्हटले: “आपले आभार मानण्यासाठीच मला तुम्हाला फोन करणे भाग पडले. ही जागा इतकी स्वच्छ मी कधीही पाहिली नव्हती. त्याचे वर्णन जर मला करावयाचे झाल्यास, काल आमच्या सभागृहावर स्वर्गातून वारा उतरला होता, असे मी म्हणेन, आमच्या सुविधांचा तुम्हाला कधीही वापर करावयाचा असल्यास कृपया पुन्हा या, व आम्ही तुम्हाला प्रथम स्थान देऊ. तुम्ही प्रत्येक तीन महिन्यांनी यावे अशी आमची इच्छा आहे व तुमच्याकडून कोणतेही भाडे आम्ही स्वीकारणार नाही.”
दृढ व कृतज्ञ होऊन साक्षीदार पुन्हा त्यांच्या शहरास परतले व येशूच्या मृत्यूच्या स्मारकविधीची तयारी सुरू केली. केवळ १५ दिवसानंतर, मंगळवारी, एप्रिल ६ रोजी, सात ठिकाणी, पहिल्यांदाच उघड रीतीने स्मारकविधीचा कार्यक्रम पार पडला.
बरॉट शहरात, सभेच्या उपस्थितीत जवळजवळ १७० वाढ झाली, व स्थानिक पाळक त्वेषयुक्त होतो. बरॉटच्या ३३ राज्य घोषकांतील २१ जणांचा संमेलनात बाप्तिस्मा झाला. बरॉटने स्मारकविधीसाठी उपस्थित असलेल्या ४७२ जणांचा अहवाल दिला. बहुतांशी, खास पायनियरांनी उत्तम नेतृत्त्व केल्याच्या परिणामामुळे स्मारकविधीची इतर उपस्थिती देखील उल्लेखनीय होती.
अल्बेनिया, स्कॉडर या कॅथोलिक शहरात असलेल्या चर्च इमारतीच्या आवारात, चर्चने प्रत्येक महिन्याला बातमीपत्र छापण्यास सुरवात केली, व प्रत्येक अंकात “यहोवाच्या साक्षीदारांना कसे टाळावे?” या गोष्टीवर चर्चा केली. मागील अंकाने म्हटले: “यहोवाच्या साक्षीदारांनी स्कॉडरवर हल्ला चढवला आहे.”! तेथे स्मारकविधीसाठी दोन साक्षीदारांच्या मोठ्या सैन्याने ७४ योग्य वर्तनाचे व गांभीर्याने विचार करणाऱ्या लोकांना एकत्र केले. स्मारकविधीचे भाषण ऐकल्यावर, १५ कुटुंबांनी पवित्र शास्त्र अभ्यासाची विचारणा केली. चार साक्षीदारांचे सैन्य असलेल्या ड्युरस, या दुसऱ्या शहरातील उपस्थिती ७९ इतकी उल्लेखनीय होती.
विरोध करणाऱ्या कॅथोलिक युवकांनी साक्षीदारांना दगडमार करून हाकलून देण्याची धमकी दिल्यामुळे, कालमटी अ फॉगल या डोंगराळ भागातील गावात होणारी स्मारकविधीची सभा एका स्थानिक बांधवाच्या घरात हालवली होती व तेथे २२ जण शांतीने उपस्थितीत राहिले. टिराने येथील संमेलनात बाप्तिस्मा झालेल्या तीन प्रचारकासहित पाच प्रचारक आहेत.
लोरमधील दोन तरुणांना द वॉचटावरची प्रत मिळाल्यावर त्यांनी ती वाचली व संस्थेला लिहिले: “द वॉचटावर मधून सत्य शिकल्यामुळे आता आम्ही स्वतःला यहोवाचे साक्षीदार म्हणतो. कृपया आम्हाला मदत पाठवा.” दोन खास पायनियरांची तेथे नेमणूक केली, व यातील एक तरुण लगेच प्रचारक होण्यासाठी लायक झाला. लोर मधील स्मारकविधीसाठी ६४ जणांच्या उपस्थितांपैकी एक असल्यामुळे तो आनंदी होता.
अमेरिकेत सत्य शिकलेला एक अल्बेनियन बांधव १९५० मध्ये त्याची जन्मभूमी असलेल्या जिजीरोकास्टेअर शहरात परतला, तेथे त्याने शक्य तेवढ्या प्रमाणात मरेपर्यंत सेवा केली. त्याने त्याच्या मुलाच्या अंतःकरणात सत्याची बीजे पेरली. बंदी उठवल्यावर, त्याच्या मुलाने वॉचटावर संस्थेकडे मदतीची विचारणा केली. गावात उत्तरेकडे राहत असलेल्या दुसऱ्या एका आस्थेवाईक व्यक्तीने देखील मदतीसाठी लिहिले, यामुळे चार खास पायनियरांना तेथे पाठवण्यात आले. स्मारकविधी झाल्यानंतर बुधवारी सकाळी, त्यांच्यातील एकाने संस्थेच्या तीरान दप्तराला फोन केला: “यहोवाच्या आत्म्याने किती कार्य केले त्याविषयी तुम्हाला सांगण्यापासून मी स्वतःला आवरू शकत नाही. आम्ही फार आनंदी आहोत. स्मारकविधी यशस्वीरित्या पार पडला.” त्यांच्या सात राज्य प्रचारकांसहित १०६ लोकांची उपस्थिती होती.
स्मारकविधीची एकूण उपस्थिती किती होती? १९९२ मध्ये केवळ ३० राज्य घोषक असताना, उपस्थिती ३२५ होती. १९९३ मध्ये १३१ प्रचारकांनी १,३१८ उपस्थितांना एकत्र केले होते. दोन्ही वर्षी, उपस्थिती प्रचारकांपेक्षा दहा पटीने अधिक होती. अगदी कमी काळात, “सर्वात लहान त्याचे सहस्र” झाल्याचे पाहणे किती उद्दीपित करणारे आहे!—यशया ६०:२२.
“आपल्या दोऱ्या लांब कर”
यहोवाच्या साक्षीदारांचे प्रचाराचे कार्य जगभरातील सर्व कानाकोपऱ्यापर्यंत वाढत असताना, ही वाणी होते: “आपल्या डेऱ्याची जागा वाढीव. आपल्या राहुट्यांच्या (भव्य निवासस्थान, न्यूव.) कनाथी पसरू दे. अटकाव करू नको. आपल्या दोऱ्या लांब कर, मेखा पक्क्या ठोक. कारण उजवीकडे व डावीकडे तुझा विस्तार होईल.” (यशया ५४:२, ३) देवाच्या या ‘भव्य निवासस्थानाच्या’ विस्ताराने—त्याच्या जगभरातील उपासकांच्या मंडळ्यांना चित्रित केले—पूर्व युरोप, व खासपणे आधीच्या सोविएत संघराज्याच्याबाबतीत ते स्पष्टपणे दिसून आले. दशकांपर्यंत असलेल्या दडपशाहीच्या दरम्यान यहोवाने त्याच्या सेवकांचे भरणपोषण केल्यानंतर, तो आता त्याच्या साक्षीदारांना संघटनेचा विस्तार व तिला दृढ करण्यासाठी आवश्यक असलेले महासामर्थ्य पुरवत आहे.
रशियाच्या मॉस्कोमधील लोकोमोटिव्ह क्रिडांगणावर, जुलै २२-२५ रोजी, मागील वर्षाच्या “ईश्वरी शिक्षण” शृंखलेतील नवी कलाटणी मिळालेल्या या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला २३,७४३ इतक्या उच्चांकाने उपस्थिती होती. हे शक्य होईल असा, दोन वर्षापूर्वी देखील कोणी विचार केला असता का? पण आता ते तेथे होते! जपान व कोरियातून १,००० पेक्षा अधिक आले, अमेरिका व कॅनडातून जवळजवळ ४,००० आले व इतर काही हजार दक्षिण पॅसिफिक, आफ्रिका, युरोप तसेच दुसऱ्या क्षेत्रातील ३० वेगवेगळ्या देशातून आले—खरोखर पूर्व पश्चिमेचे मिलन घडले. या सर्वांना, रशियातील त्यांच्या १५,००० पेक्षा अधिक असलेल्या बंधू व बहिणीसोबत मिसळणे किती उत्तेजनदायक होते! आनंदाच्या भावना उचंबळत होत्या.
एकूण १,४८९ आश्चर्यकारक संख्येच्या नव्या साक्षीदारांचा बाप्तिस्मा झाला. बाप्तिस्म्याचे प्रसारण जगभरातील माध्यमातून तसेच द न्यूयॉर्क टाईम्स वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर बाप्तिस्म्याचे चित्र प्रकाशित करण्याद्वारे मोठी प्रसिद्धी झाली. बाप्तिस्म्यादरम्यान टाळ्यांचा मोठा गजर झाला असतानाही, अंतिम भाषणाच्या दरम्यान वक्त्याने ४,७५२ स्वयंसेवकाचे व अधिवेशनाला यशस्वी करण्यात मदत करणाऱ्या अधिकारी वर्गाचे आभार मानल्यानंतर तो गजर वाढत गेला, व त्यांनी म्हटले: “या सर्वांपेक्षा आम्ही यहोवाचे अधिक आभार मानतो!” होय, यहोवाच्या आत्म्याने सनातन मतवादी धर्मियांकडून येणाऱ्या कडक विरोधाला थांबून ठेवले होते व आवश्यक बळ दिल्याने अधिवेशनाला एक शिरशिरी आणणारी वास्तविकता बनवले होते.
तथापि, किवच्या युक्रेनी शहरात ऑगस्ट ५-८ मध्ये पुढे अधिक काही घडणार होते. पुन्हा, ऐच्छिक स्वयंसेवकांनी क्रिडांगणाला पूर्णपणे स्वच्छ करून ठेवले होते, व या प्रचंड राज्य सभागृहात ६४,७१४ च्या उपस्थितीचा उच्चांक असणारे सामावू शकले. आणखी एकदा, साक्षीदार पूर्व व पश्चिमेकडून, तसेच जगभरातील सर्व भागातून आले. मुख्य भाषणांचे १२ भाषांत अनुवाद करण्यात आले होते. विमान, रेल्वे, किंवा बसने आलेल्या जवळजवळ ५३,००० प्रतिनिधींना रेल्वे स्टेशन, विमानतळावर भेटून त्यांच्या राहण्याची व्यवस्था केलेल्या हॉटेल, शाळा व खाजगी घरी तसेच होडीवर नेऊन घालावयाचे होते. या सर्व गोष्टी संघटनेचा सुरळितपणा व कार्यक्षमतेसह कमीत कमी खर्चात साध्य केल्यामुळे शहरातील पोलिसांनी आश्चर्याचे वक्तव्य व प्रशंसा केली.
बाप्तिस्म्याचा उच्च कळस असणाऱ्या हर्षदायक अधिवेशनाच्या कार्यक्रमाने अडीच तास घेतला. टाळ्यांच्या गजराचे पडसाद पुनःपुन्हा क्रिडांगणावर उमटत असताना एकूण ७,४०२ बंधू आणि बहिणींनी यहोवाला केलेले समर्पण प्रदर्शित केले. ही संख्या यापूर्वी १९५८ मध्ये न्यूयॉर्क शहरात २,५३,९२२ अधिवेशन प्रतिनिधी जमले असताना ७,१३६ बाप्तिस्म्याचा सर्वकाळ उच्चांक असलेल्या संख्येपेक्षा अधिक होती.
आता न्यायाचा काळ जसा त्याच्या अंतास पोहचत आहे, तसे मेंढरासमान लोकांना, पूर्व, पश्चिमेकडून व “पृथ्वीच्या शेवटा” पासून, सर्व मानवी इतिहासाच्या अतुलनीय एकतेत एकत्र केले जात आहे. खरोखर, “सर्व राष्ट्रे, वंश, लोक, व निरनिराळ्या भाषा बोलणारा . . . मोठा लोकसमुदाय” यहोवाच्या सार्वभौमतेच्या शासनाचे समर्थन करण्यासाठी जे काही साध्य केले जात आहे त्याचा प्रमुख आधार असलेल्या येशूच्या मुल्यवान खंडणी यज्ञार्पणावर विश्वास घोषित करून, आध्यात्मिक इस्राएलाला जाऊन मिळत आहेत.—प्रे. कृत्ये १:८; प्रकटीकरण ७:४, ९, १०.
[८, ९ पानांवरील चित्रं]
मॉस्को व किवमध्ये पूर्व पश्चिमेला मिळते