पूर्व पश्चिमेला मिळते तेव्हा
“अहो, पूर्व ही पूर्वच आहे, आणि पश्चिम ही पश्चिमच आहे, व या दोन्ही एकमेकींना कधीही मिळू शकणार नाहीत.” रडयार्ड किपलिंग या एका ब्रिटिश कवीचे हे शब्द, तीव्र सांस्कृतिक भेदभावाने मानवजातीला वेगळे केल्याने वंशीय, जातीय आणि राष्ट्रीय भावनेचा द्वेष आमच्या सभोवती वाढत असल्याची आठवण आम्हाला करून देतात. पुष्कळजण विचारतात, या विषयी देव काही करू शकत नाही का? होय, तो करू शकतो! आणि तो आताही काही करत आहे! याचा उल्लेख किपलिंगच्या कवितेतील पुढची ओळ करते. किती काळापर्यंत पूर्व व पश्चिम विभाजित राहू शकतील? कवीने म्हटले: “देवाच्या महान न्यायदंडासाठी सध्याची पृथ्वी आणि आकाश राखून ठेवले आहे तोवर.”
देवाने न्याय करण्याची जबाबदारी त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त याला सुपूर्त केली आहे. (योहान ५:२२-२४, ३०) परंतु त्या न्यायदंडाच्या काळाची सुरवात केव्हा होते? कोणाचा न्याय केला जातो, व कोणत्या परिणामासह? मानवजातीला १९१४ पासून त्रस्त करणारी जागतिक युद्धे आणि त्यासोबतच्या पीडांविषयीचे वर्णन भविष्यवाणीतून सांगणारा येशू होता. त्याने म्हटले की, हे त्याच्या अदृश्य, “उपस्थितीचे व युगाच्या समाप्तीचे” “चिन्ह,” याला चिन्हांकित करतात.—मत्तय २४:३-८.
येशू, या महान भविष्यवाणीच्या शेवटाला, आमचा सद्याचा काळ एकप्रकारच्या न्यायनिवाड्याचा आहे, अशी ओळख करून देताना स्वतःविषयी म्हणतो: “जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने, सर्व देवदूतांसह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. त्याच्यापुढे सर्व रा जमविली जातील आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो तसे तो त्यांस, एकमेकांपासून वेगळे करील. आणि मेंढरांस तो आपल्या उजवीकडे व शेरडांस तो डावीकडे ठेवील.” लाक्षणिक अर्थाने, पृथ्वीवरील सर्व लोकांना आज न्यायाधीशासमोर गोळा केले जात आहे व तारणाच्या त्याच्या संदेशाला कसा प्रतिसाद देतात यासाठी ते जबाबदार आहेत. लवकरच महासंकटात न्यायदंड बजावल्यावर, आज्ञाभंजक शेरडासमान असलेले लोक “सार्वकालिक शिक्षा भोगावयास जातील, परंतु नीतिमान [मेंढरासमान असलेले आज्ञाधारक लोक] सार्वकालिक जीवन उपभोगावयास जातील.”—मत्तय २५:३१-३३, ४६; प्रकटीकरण १६:१४-१६.
‘उगवतीकडून व मावळतीकडून’
या जगाचा न्याय, खरेपणाने, पहिल्या जागतिक महायुद्धाच्या वादळी वर्षामध्ये सुरू झाला. त्यावेळी, ख्रिस्ती धर्मजगताच्या पाळकांनी प्रतिस्पर्धी गटांना संपूर्ण हृदयाने पाठिंबा दिला. यामुळे ‘देवाच्या क्रोधाला’ पात्र असलेल्या भ्रष्ट जगाचे भाग आहेत अशी त्यांची ओळख करून दिली. (योहान ३:३६) तरीही, देवावर विश्वास ठेवलेल्या शांतताप्रिय ख्रिश्चनांविषयी काय? त्यांनी १९१९ या वर्षाच्या सुरवातीला, राजाच्या, ख्रिस्त येशूच्या बाजूला एकत्र होण्यास आरंभ केला.
जगभरातील सर्व भागातून ते आलेले आहेत, ख्रिस्ती शकाच्या शतकभर प्रथम, १,४४,००० अभिषिक्त जणांमधील उरलेल्यांची निवड केली गेली. हे त्याच्या स्वर्गीय राज्यात, “ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस” असतील. (रोमकर ८:१७) देवाचा संदेष्टा यांना म्हणतो: “भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे. मी तुझा वंश उगवतीकडून आणीन, मावळतीकडून तुला मी एकवट करीन. मी उत्तरेला म्हणेन, ‘देऊन टाक!’ दक्षिणेला म्हणेन, ‘अटकाव करू नको. माझे पुत्र दुरून व माझ्या कन्या दिगंतापासून घेऊन या, ज्यांस माझे नाव ठेवले ज्यांस माझ्या गौरवासाठी उत्पन्न केले, निर्माण केले, आणि घडले, त्या सर्वांस घेऊन या.’”—यशया ४३:५-७.
परंतु हेच सर्वकाही नव्हे! विशेषपणे, १९३० पासून लाखोत गणला जाणारा मोठा लोकसमुदाय एकत्र येण्यास आरंभ झाला. याच ‘मेंढरांचा’ उल्लेख येशूने मत्तय २५:३१-४६ मध्ये केला. त्यांच्या आधी असलेल्या अभिषिक्तांप्रमाणेच यांनी देखील, ‘तुम्ही माझे साक्षी आहात व मी तुमचा देव आहे’ असे घोषित करणाऱ्यावर “भाव” ठेवला आहे. (यशया ४३:१०-१२) मोठ्या समुदायाच्या एकत्र जमण्याची सुरवात देखील ‘उगवतीकडून व मावळतीकडून, उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून व पृथ्वीच्या दिगंतापासून’ होत आहे.
ही शांतताप्रिय मेंढरे आंतरराष्ट्रीय बंधुत्त्वात जोडली जात आहेत. ते राहत असलेल्या २३१ देशातील विविध भाषा बोलतात. असे असतानाही, “परमेश्वराची [यहोवा, न्यूव.] सेवा घडावी म्हणून, ते सर्व त्याच्या नामाचा धावा एकचित्ताने” करण्यासाठी, पवित्र शास्त्रातील राज्य संदेशाची “शुद्ध वाणी” शिकण्यासाठी आध्यात्मिकरित्या ऐक्यतेत आहेत. (सफन्या ३:९) त्यांच्या विश्वास, उद्देश, आणि कार्याची ऐक्यता, पूर्व पश्चिमेला मिळाली असल्याची, आणि सार्वभौम प्रभू यहोवाची सेवा व स्तुती करण्यासाठी सर्व दिशांकडून लोक आल्याची अद्भुत साक्ष देतात.
काही देशांमध्ये असे एकत्र येणे उल्लेखनीय परिस्थितीमध्ये देखील चालू आहे, हे पुढील अहवाल आम्हाला दाखवील.