वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w93 १०/१ पृ. ८-१२
  • देव वास्तविकपणे तुम्हाला ओळखतो का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देव वास्तविकपणे तुम्हाला ओळखतो का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आमचे सर्व मार्ग पाहणारा
  • आम्ही कोठेही असलो तरी, देव आम्हाला मदत करू शकतो
  • आम्हाला खरोखर समजून घेणारा
  • आपली ‘अद्‌भुत रीतीने घडण’ झाली आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • इतरांकडे यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • योनाला यहोवाची दया प्रत्ययास येते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • तो स्वतःच्या चुकांतून धडा शिकला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
w93 १०/१ पृ. ८-१२

देव वास्तविकपणे तुम्हाला ओळखतो का?

“हे परमेश्‍वरा [यहोवा, न्यूव.] . . . माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे.” —स्तोत्रसंहिता १३९:१, ३.

१. आम्ही सामना करीत असलेल्या चिंता, समस्या आणि तणावांना ‘इतर जण समजून घेत नाहीत’ ही भावना किती विस्तृत प्रमाणात आहे?

तुम्ही अनुभवत असलेल्या चिंता, तणाव, आणि समस्या कोणाला वास्तविकपणे समजतात का? जगभरात, तरूण आणि वयस्कर असे लाखो लोक आहेत की ज्यांना काळजी करणारे कुटुंब सदस्य किंवा कोणी नातेवाईक नाहीत. कुटुंबातसुद्धा अनेक पत्नी तसेच पतींना देखील त्यांना खिन्‍न करत असलेल्या तणावांना त्यांचा वैवाहिक सोबती समजत नाही असे वाटते. कधीकधी, त्राग्याने चिडून ते बोलतात: “पण तुला [तुम्हाला] समजत कसे नाही!” आणि अनेक तरूणांचे सुद्धा असे मत झाले आहे की आपल्यालाही कोणी समजून घेत नाही. तरीही, इतरांकडून अधिक समजूतदारपणाची अपेक्षा ज्यांनी केली त्यांच्यातील काहींचे जीवन नंतर अर्थभरीत झाले आहे. ते कसे शक्य आहे?

२. यहोवाच्या उपासकांना जीवन अधिक समाधानकारक असण्यासाठी काय मदत करते?

२ कारण, सहमानवांना त्यांच्या भावना समजोत अगर न समजोत, ते ज्या परिस्थितीतून जात आहेत ते देवाला माहीत आहे आणि त्याचे सेवक असल्यामुळे त्यांना एकट्यांना त्यांच्या समस्यांचा सामना करावा लागणार नाही याचा त्यांना आत्मविश्‍वास आहे. (स्तोत्रसंहिता ४६:१) त्याशिवाय, देवाच्या वचनासोबतच सुज्ञ ख्रिस्ती वडिलांची मदत असल्यामुळे ते त्यांच्या वैयक्‍तिक समस्यांच्याही पलिकडे पाहण्यास त्यांना समर्थ करतात. शास्त्रवचने, देवाच्या दृष्टीत त्यांची विश्‍वासू सेवा बहुमोलाची आहे तसेच येशू ख्रिस्ताद्वारे त्याने ज्या योजना बनविल्या आहेत त्यावर जे त्यांची आशा ठेवतात त्यांच्यासाठी एक सुरक्षित भवितव्य आहे हे समजण्यास त्यांची मदत करतात.—नीतीसूत्रे २७:११; २ करिंथकर ४:१७, १८.

३, ४. (अ) “यहोवा देव आहे” आणि त्याने “आम्हाला निर्माण केले” या वास्तविकतेची गुणग्राहकता त्याच्या सेवेत आनंद मिळण्यासाठी आम्हाला कशी मदत करते? (ब) यहोवाच्या प्रेमळ काळजीवर आमचा संपूर्ण भरवसा का आहे?

३ स्तोत्रसंहिता १००:२ कदाचित तुमच्या परिचयाचे असेल, ते म्हणते: “हर्षाने परमेश्‍वराची [यहोवा, न्यूव.] सेवा करा, गीत गात त्याच्यापुढे या.” अशाप्रकारे किती जण त्यांची भक्‍ती यहोवाला देत आहेत? तिसऱ्‍या वचनात तसे करण्यासाठी विश्‍वसनीय कारणे पुरवली आहेत, ते आम्हाला आठवण करून देते: “परमेश्‍वर [यहोवा, न्यूव.] हाच देव आहे हे जाणा; त्यानेच आम्हाला उत्पन्‍न केले; आम्ही त्याचेच आहो, आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहो.” इब्री लिखाणात त्याला ʼएलो·हीमʹ असे म्हटले आहे, यास्तव त्याद्वारे त्याचे ऐश्‍वर्य, मोठेपणा आणि श्रेष्ठता सूचित होते. तोच केवळ खरा देव आहे. (अनुवाद ४:३९; ७:९; योहान १७:३) देवाच्या सेवकांना त्याचे देवपण, केवळ वास्तविकता म्हणून त्यांना शिकवण्यात आल्यामुळे नव्हे तर अनुभवाद्वारे आणि आपला आज्ञाधारकपणा, भरवसा आणि भक्‍ती याद्वारे कळून येते.—१ इतिहास २८:९; रोमकर १:२०.

४ यहोवा जिवंत देव असल्यामुळे, तसेच तो आमचे हृदय देखील पाहू शकत असल्यामुळे त्याच्या नजरेस काहीही लपत नाही. आमच्या जीवनात काय घडत आहे त्याविषयी त्याला सर्व माहीत आहे. आम्ही सामना करत असलेल्या समस्या कशामुळे येतात, तसेच त्यापासून होणाऱ्‍या मानसिक आणि शारीरिक त्रासाची त्याला कल्पना आहे. निर्माणकर्ता या नात्याने, आम्ही स्वतःविषयी जे जाणतो त्यापेक्षाही उत्तम रीतीने तो आम्हाला जाणतो. आमच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मदत कशी करावी तसेच दीर्घकालिन सुटका कशी पुरवावी हे देखील त्याला माहीत आहे. आम्ही आमच्या संपूर्ण हृदयाने त्यावर भरवसा ठेवल्यास—मेंढपाळ कोकराला जसे आपल्या कवेत घेऊन उराशी धरून ठेवतो—त्याप्रमाणे तो आम्हाला प्रेमळ मदत देईल. (नीतीसूत्रे ३:५, ६; यशया ४०:१०, ११) स्तोत्रसंहिता १३९ चा अभ्यास आमचा भरवसा दृढ करण्यासाठी अधिक काही करू शकतो.

आमचे सर्व मार्ग पाहणारा

५. यहोवा ‘आमची झडती घेतो’ याचा काय अर्थ होतो आणि ते इष्ट का आहे?

५ गाढ गुणग्राहकता बाळगून स्तोत्रकर्त्या दाविदाने लिहिले: “हे परमेश्‍वरा [यहोवा, न्यूव.] तू मला पारखले आहे, तू मला ओळखतोस.” (स्तोत्रसंहिता १३९:१) दाविदाला हा आत्मविश्‍वास होता की यहोवाला त्याच्याविषयी असलेले ज्ञान वरकरणी नाही. देवाने दाविदाच्या बाबतीत मानवाप्रमाणे, केवळ त्याची शरीरयष्टी, त्याची बोलण्याची क्षमता, किंवा तंतूवाद्य वाजविण्यात तो किती निपुण होता या गोष्टी पाहिल्या नाहीत. (१ शमुवेल १६:७, १८) यहोवाने दाविदाच्या आतील व्यक्‍तिमत्त्वाला “पारखले” आणि ही त्याच्या आध्यात्मिक हिताच्या दृष्टीने त्याने प्रेमळ आस्था दाखवली. तुम्ही यहोवाचे एक समर्पित सेवक असल्यास, दाविदाला जसे तो ओळखत होता तसेच तुम्हाला देखील तो ओळखतो. यामुळे तुमच्यात कृतज्ञता आणि भीतीयुक्‍त आदराची भावना चेतवली जात नाही का?

६. आम्ही जे काही करतो, इतकेच नव्हे तर आमचे सर्व विचार देखील यहोवाला माहीत असतात ते स्तोत्रसंहिता १३९:२, ३ कसे दाखवते?

६ यहोवाच्या नजरेत दाविदाच्या सर्व हालचाली उघड होत्या, आणि दाविदाला याची कल्पना होती. स्तोत्रकर्त्याने लिहिले: “माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तू दुरुन माझे मनोगत समजतोस. तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस. आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे.” (स्तोत्रसंहिता १३९:२, ३) यहोवा स्वर्गात, पृथ्वीपासून दूर आहे ही वस्तुस्थिती, दावीद काय करत होता किंवा तो काय विचार करत होता हे जाणण्यापासून यहोवाला अडथळा आणू शकत नाही. त्याला “माहिती होती,” किंवा त्याने दाविदाच्या हालचालीचे दिवसा आणि रात्री त्यांची पार्श्‍वभूमी कळण्यासाठी काळजीपूर्वक परीक्षण केले होते.

७. (अ) दाविदाच्या जीवनातील घटनेचा आधार घेऊन, देवाला माहीत असणाऱ्‍या आमच्या जीवनातील काही गोष्टींबद्दल विवेचन मांडा. (ब) हे माहीत असल्यामुळे आमच्यावर कसा परिणाम झाला पाहिजे?

७ देवाबद्दलची प्रीती आणि मुक्‍तता करण्याचे त्याचे सामर्थ्य यावरील आत्मविश्‍वासाने या युवकाला, दावीदाला, धिप्पाड पलिष्टी गल्याथाबरोबर स्वेच्छेने लढत द्यायला प्रवृत्त केले हे यहोवाला माहीत होते. (१ शमुवेल १७:३२-३७, ४५-४७) नंतर शत्रूकडील त्रासामुळे दाविदाला फार दुःख झाले आणि तीव्र दबावामुळे रात्री तो रडला तेव्हा, यहोवाने त्याची विनंती ऐकली या ज्ञानामुळे त्याला सांत्वन मिळाले. (स्तोत्रसंहिता ६:६, ९; ५५:२-५, २२) अशाच रीतीने, यहोवाला माहीत होते की, दाविदाचे हृदय कृतज्ञतेने भरलेले असताना निद्रारहित रात्री त्याने त्याच्याविषयी मनन केले आहे. (स्तोत्रसंहिता ६३:६; पडताळा फिलिप्पैकर ४:८, ९.) संध्याकाळच्या एके प्रसंगी दाविदाने शेजाऱ्‍याच्या पत्नीला अंघोळ करताना पाहिले, ते देखील यहोवाला माहीत होते, आणि दाविदाने थोड्या काळाकरता त्याच्या पापी इच्छांना भरू देऊन देवाला विचारातून काढून टाकले आहे हेही यहोवाला दिसले. (२ शमुवेल ११:२-४) यानंतर नाथानाला दाविदाच्या पापाचे गांभीर्य त्याच्या समोर उघड करण्यासाठी पाठवले होते तेव्हा, दाविदाच्या मूखातून आलेल्या शब्दांनाच केवळ यहोवाने ऐकले नाही, तर ते पश्‍चातापी हृदयातून आल्याचे त्याला समजले. (२ शमुवेल १२:१-१४; स्तोत्रसंहिता ५१:१, १७) यामुळे आम्ही कोठे जात आहोत, आम्ही काय करतो, आणि आमच्या हृदयात काय आहे यावर स्वतःला गंभीर विचार करायला लावू नये का?

८. (अ) ‘आमच्या जिभेवरील शब्द’ कशाप्रकारे देवाबरोबरील आमच्या भूमिकेवर प्रभाव पाडू शकतात? (ब) जिभेचा वापर करण्याच्या कमतरतेवर कशी मात केली जाऊ शकते? (मत्तय १५:१८; लूक ६:४५)

८ आम्ही करत असलेली प्रत्येक गोष्ट देवाला माहीत असल्यामुळे, आम्ही जीभ या लहानशा शारीरिक अवयवाचा देखील कसा वापर करतो याची त्याला कल्पना असल्यामुळे आम्हाला याचे आश्‍चर्य वाटू नये. दावीद राजाला हे समजले, म्हणून त्याने लिहिले: “हे परमेश्‍वरा [यहोवा, न्यूव.] तुला मुळीच ठाऊक नाही, असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही.” (स्तोत्रसंहिता १३९:४) यहोवाच्या मंदिरात पाहुणे म्हणून आमंत्रित केलेले लोक दुसऱ्‍यांची निंदा करणारे नव्हते आणि ज्यांनी सलगीच्या सोबत्यावर ठपका आणण्यासाठी चहाडीचे मनोरंजक चुटके पसरविण्यासाठी त्यांच्या जिभेचा वापर करण्याचे नाकारले आहे असे ते लोक असतील हे दाविदाला माहीत होते. यहोवा ज्यांना कृपापसंती दाखवतो ते लोक त्यांच्या हृदयात सत्य बोलणारे असतील. (स्तोत्रसंहिता १५:१-३; नीतीसूत्रे ६:१६-१९) आम्हातील कोणीही स्वतःच्या जिभेवर पूर्ण नियंत्रण ठेवू शकत नाही, परंतु परिस्थिती सुधारण्यासाठी काहीही करू शकत नाही असा दुर्बळ निष्कर्ष दाविदाने काढला नाही. यहोवाच्या स्तुतीसाठी त्याने स्तोत्रांचे संकलन करण्यात आणि त्यांचे गायन करण्यात अधिक वेळ व्यतीत केला. त्याला मदतीची गरज आहे हे त्याने स्वेच्छेने कबूल केले आणि त्यासाठी देवाकडे त्याने प्रार्थना केली. (स्तोत्रसंहिता १९:१२-१४) आमच्या जिभेचा वापर करण्याकडे देखील प्रार्थनापूर्वक लक्ष देण्याची गरज आहे का?

९. (अ) देवाला आमची परिस्थिती किती पूर्णपणे माहीत आहे हे स्तोत्रसंहिता १३९:५ च्या वर्णनावरून कसे सूचित होते? (ब) ते आम्हाला कशाविषयीचा भरवसा देते?

९ यहोवा आम्हाला किंवा आमच्या परिस्थितीची मर्यादित दृष्टीने, केवळ एकच बाजू पाहत नाही. त्या गोष्टीची त्याला पूर्ण कल्पना असते, तो तिच्या सर्व बाजू पाहतो. वेढलेल्या नगराचे उदाहरण घेऊन दाविदाने लिहिले: “तू मागून पुढून मला वेढिले आहे.” दाविदाच्या बाबतीत, देव एक वेढा घातलेला शत्रू नव्हता; त्याऐवजी तो एक जागृत पालक होता. “माझ्यावर तू आपला हात ठेवला आहे,” पुढे दाविदाने त्यात भर टाकून, जे देवावर प्रीती करतात त्यांच्या चिरकालिक फायद्यासाठी त्याचे नियंत्रण आणि संरक्षण देतो हे सूचित केले. दाविदाने कबूल केले की, “हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडचे आहे; हे अगम्य आहे, हे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे.” (स्तोत्रसंहिता १३९:५, ६) देवाला त्याच्या सेवकांबद्दलचे ज्ञान इतके पूर्ण, बारीकसारीक गोष्टी सुद्धा त्याला माहीत असतात की ज्यांचे आपणाला पूर्णपणे आकलन होत नाही. परंतु यहोवा आपल्याला खरोखर समजून घेतो आणि तो पुरवत असलेली मदत उत्तम प्रकारची असते हे आम्हाला आत्मविश्‍वास बाळगण्यासाठी पुरेसे आहे.—यशया ४८:१७, १८.

आम्ही कोठेही असलो तरी, देव आम्हाला मदत करू शकतो

१०. स्तोत्रसंहिता १३९:७-१२ मधील विविध वर्णनाद्वारे कोणते उत्तेजनदायक सत्य व्यक्‍त केले आहे?

१० यहोवाच्या प्रेमळ काळजीला दुसऱ्‍या दृष्टिकोनातून पाहत स्तोत्रकर्ता पुढे सांगतो: “मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ? मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ?” यहोवापासून दूर जाण्याची त्याची इच्छा नव्हती, उलटपक्षी, त्याला माहीत होते की तो कोठेही असला तरी यहोवाला ते ठाऊक आहे आणि त्याच्या पवित्र आत्म्याकरवी तो त्याला मदत करू शकतो. “मी वर आकाशात [स्वर्गात] चढलो तरी,” तो पुढे असे म्हणतो, “तेथे तू आहेस; अधोलोकी [शिओल] मी आपले अंथरूण केले तरी पाहा, तेथे तू आहेस. मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो, तरी तेथेही तुझा हात मला चालवील; तुझा हात मला धरून ठेवील. अंधकार मला लपवो, ‘माझ्या भोवतालच्या प्रकाशाचा काळोख होवो’, असे जरी मी म्हणालो, तरी अंधकार देखील तुझ्यापासून काही एक लपवीत नाही; रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते, काळोख आणि उजेड हे तुला सारखेच आहेत.” (स्तोत्रसंहिता १३९:७-१२) यहोवाच्या नजरेच्या पलीकडे किंवा त्याचा पवित्र आत्मा आम्हाला मदत करू शकण्याच्या पलीकडे नेणारी अशी कोणतीही जागा नाही किंवा आम्हाला सामना करावी लागणारी कोणतीही परिस्थितीसुद्धा नाही.

११, १२. (अ) काही वेळेपर्यंत योनाला विसर पडला तरी त्याला पाहण्याचे आणि मदत करण्याच्या यहोवाच्या क्षमतेचे प्रदर्शन योनाच्या बाबतीत कसे झाले? (ब) योनाच्या अनुभवाचा आम्हाला कसा लाभ झाला पाहिजे?

११ एके प्रसंगी संदेष्टा योना ते विसरला होता. यहोवाने त्याला निनवेतील लोकांना प्रचार करण्याची नेमणूक दिली होती. काही कारणामुळे त्याने विचार केला की तो ही नेमणूक पूर्ण करू शकणार नाही. कदाचित अश्‍शुरी लोकांच्या क्रूर प्रसिद्धीमुळे निनवेत सेवा करण्याच्या विचाराचे त्याला भय वाटले असावे. यास्तव त्याने लपण्याचा प्रयत्न केला. यापोच्या बंदरात त्याने तार्शिशला (निनवेच्या पश्‍चिमेपासून ३,५०० किलोमीटर पेक्षा अधिक दूर व साधारणपणे स्पेनशी संबंध असणारे) जाणाऱ्‍या जहाजात जागा मिळवली. तथापि, त्याने जहाज धरले ते यहोवाने पाहिले आणि जहाजाच्या तळाशी जाऊन झोपी गेल्याचेही त्याने पाहिले होते. योनाला जहाजातून खाली टाकून दिल्यानंतर तो कोठे होता हे देखील यहोवाला माहीत होते, आणि मोठ्या माशाच्या पोटातून योनाने, त्याचे वचन पूर्ण करील असे अभिवचन दिल्याचे यहोवाने ऐकले होते. कोरड्या भूमीवर त्याची सुटका झाल्यानंतर त्याची नेमणूक पूर्ण करण्याची योनाला आणखी एक संधी दिली गेली.—योना १:३, १७; २:१–३:४.

१२ योनाला त्याची नेमणूक पूर्ण करण्यासाठी मदत मिळावी म्हणून सुरवातीपासूनच तो यहोवाच्या आत्म्यावर अवलंबून राहिला असता तर ते किती उत्तम झाले असते! तरीसुद्धा नंतर योनाने नम्रपणे त्याचा अनुभव लिहून ठेवला, आणि योनाला यहोवावर आत्मविश्‍वास ठेवण्यास जे कठीण वाटले तोच आत्मविश्‍वास प्रदर्शित करण्यासाठी त्या अहवालाने त्यानंतर पुष्कळांना मदत केली.—रोमकर १५:४.

१३. (अ) ईजबेल राणीपासून पळून जाण्याआधी एलियाने कोणत्या नेमणूका विश्‍वासूपणे पूर्ण केल्या होत्या? (ब) एलियाने इस्राएला बाहेरील प्रदेशात जाऊन लपण्याचा प्रयत्न केला असतानाही यहोवाने त्याला कशी मदत केली?

१३ एलियाचा अनुभव थोडासा वेगळा होता. इस्राएलांनी केलेल्या पापाची शिक्षा म्हणून त्यांना दुष्काळ (अवर्षण) सहन करावा लागेल, ही यहोवाची आज्ञा त्याने विश्‍वासूपणे कळवली. (१ राजे १६:३०-३३; १७:१) कर्मेल डोंगरावर यहोवा आणि बआल त्यांच्यातील कसोटीत जाहीरपणे खऱ्‍या भक्‍तीस त्याने उंचावले. व यानंतर त्याने बआलाच्या ४५० संदेष्ट्यांचा किशोन ओहळाजवळ आणून वध केला. परंतु ईजबेल राणीने क्रोधाविष्ट होऊन एलियाला मारून टाकण्याची शपथ वाहिली तेव्हा मात्र तो देश सोडून तेथून पळून गेला. (१ राजे १८:१८-४०; १९:१-४) त्याला त्या कठीण काळात यहोवा मदत देण्यासाठी तयार होता का? होय, निश्‍चितच. एलिया जर स्वर्गाला जाण्याएवढ्या उंचीचा डोंगर चढू शकला असता; शिओलाप्रमाणे पृथ्वीच्या अगदी खोल भागातील गुहेत तो लपू शकला असता; पृथ्वीवर पहाटेच्या समयी पडणाऱ्‍या किरणांच्या वेगाप्रमाणे तो दूरच्या द्वीपावर पळून गेला असता—तरीही त्याला मदत करण्यासाठी आणि त्याचे नेतृत्त्व करण्यासाठी यहोवाचा हात पुढे झाला असता. (पडताळा रोमकर ८:३८, ३९.) आणि यहोवाने एलियाला त्याच्या प्रवासात केवळ भोजनाद्वारेच नव्हे तर त्याच्या कार्यकारी शक्‍तीचे प्रदर्शन करून दृढ केले. अशारीतीने दृढ होऊन एलियाने त्याची दुसरी भविष्यवादित नेमणूक स्वीकारली.—१ राजे १९:५-१८.

१४. (अ) देव विश्‍वव्यापी आहे असा निष्कर्ष काढणे का चुकीचे आहे? (ब) आधुनिक दिवसात कोणत्या परिस्थितीत यहोवाने त्याच्या सेवकांचे प्रेमळपणे संगोपन केले? (क) आम्ही शिओलमध्ये, असलो तरी देव तेथे असेल हे कसे?

१४ स्तोत्रसंहिता १३९:७-१२ चा अर्थ, देव विश्‍वव्यापी आहे, तो सर्वठिकाणी सर्ववेळी उपस्थित असतो असा होत नाही. शास्त्रवचने अगदी याच्या उलट सांगतात. (अनुवाद २६:१५; इब्रीयांस ९:२४) तथापि, त्याचे सेवक त्याच्यापासून दूर नाहीत. हे खरे आहे की काहींच्या ईश्‍वरशासित नेमणूकीमुळे ते दूरच्या ठिकाणी गेले आहेत. ते दुसऱ्‍या महायुद्धाच्या वेळी नाझी छळ-छावण्यातील निष्ठावंत साक्षीदारांच्या बाबतीत खरे होते, आणि त्याचप्रमाणे १९५८ ते १९६५ च्या दरम्यान चीनमध्ये एकांत कोठडीतील तुरुंगवासात अडकून पडलेल्या मिशनऱ्‍यांच्या बाबतीत देखील हे खरे होते. मध्य आफ्रिकेच्या देशातील गावांतून आणि इतकेच नव्हे तर त्यांच्या देशातून वारंवार पळून जाणाऱ्‍या बंधू आणि बहिणींच्या बाबतीतही हे खरे होते. गरज भासल्यास यहोवा शिओल, मानवजातीच्या कबरेत जाऊन पुनरूत्थानाच्याद्वारे विश्‍वासू जणांना परत आणू शकतो.—ईयोब १४:१३-१५; लूक २०:३७, ३८.

आम्हाला खरोखर समजून घेणारा

१५. (अ) आमची वाढ होत असल्याचे यहोवाने कधीपासून निरीक्षण केले? (ब) स्तोत्रकर्त्याने अंतर्यामाचा उल्लेख करण्याद्वारे, आमच्याविषयी देवाच्या ज्ञानाची व्याप्ती कशी सूचित केली?

१५ देवाला, आमचा जन्म होण्याच्या आधीपासूनच आमच्याविषयीचे ज्ञान आहे या वस्तुस्थितीकडे ईश्‍वरी प्रेरणेने स्तोत्रकर्ता आमचे लक्ष वेधतो, तो म्हणतो: “तूच माझे अंतर्याम निर्माण केले; तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केली. भयप्रद आणि अद्‌भुत रितीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करतो तुझी कृत्ये अद्‌भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे.” (स्तोत्रसंहिता १३९:१३, १४) गर्भधारणेच्या वेळी आमच्या वडिलाच्या आणि मातेच्या गुणधर्मांना एकत्र आणल्यामुळे जो नमुना उत्पन्‍न केला जातो तो आमच्या शारीरिक आणि मानसिक शक्यतेवर खोल प्रभाव पाडतो. देव त्या शक्यतेला समजतो. आमच्या आंतरिक व्यक्‍तिमत्त्वाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी अनेकदा शास्त्रवचनात, या स्तोत्रात अंतर्यामविषयी खासपणे उल्लेख आढळतो.a (स्तोत्रसंहिता ७:९; यिर्मया १७:१०) आमचा जन्म होण्याच्या आधीपासूनच यहोवाला याचे सविस्तरपणे ज्ञान असते. प्रेमळ आस्था बाळगून मानवी शरीराची रचना देखील त्याने केली आहे, जेणेकडून मातेच्या गर्भात फलित झालेली कोशीका गर्भाची वाढ होत असताना त्याचे रक्षण करण्यासाठी ‘पडद्याआड’ एक संरक्षक तट निर्माण करते.

१६. (अ) कशाप्रकारे स्तोत्रसंहिता १३९:१५, १६ देवाच्या दृष्टीच्या भेदक शक्‍तीला स्पष्ट करते? (ब) ते आमच्यासाठी उत्तेजनदायक का असले पाहिजे?

१६ देवाच्या दृष्टीचे आकलन होण्याच्या सामर्थ्याला स्पष्ट करताना नंतर स्तोत्रकर्ता त्यात भर टाकतो: “मी गुप्त स्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. [निश्‍चितच त्याच्या मातेच्या गर्भाबद्दलचा हा काव्यमय संदर्भ आहे परंतु त्याचबरोबर मातीपासून आदामाची निर्मिती केल्याचा तो उल्लेख आहे]. मी गर्भात पिंडरुपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले, आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते.” (स्तोत्रसंहिता १३९:१५, १६) सहमानव आम्हाला समजून घेत असोत किंवा घेत नसोत—यात कोणताही संशय नाही की यहोवा आम्हाला समजून घेतो. त्याचा आमच्यावर कसा परिणाम झाला पाहिजे?

१७. देवाची कृत्ये आश्‍चर्यकारक असल्याचे आपण पाहतो तेव्हा ते काय करण्यास आम्हाला प्रवृत्त करते?

१७ स्तोत्रसंहिता १३९च्या लेखकाने तो लिहित असलेली देवाची कृत्ये अद्‌भुत होती हे कबूल केले. तुम्हाला देखील असेच वाटते का? एखादी गोष्ट अधिक अद्‌भुतकारक असल्यामुळे ती एखाद्या व्यक्‍तिला अधिक विचार करावयाला लावते आणि पूर्णपणे केंद्रित करते. बहुधा यहोवाच्या भौतिक निर्मितीच्या बाबतीत तुम्ही तशाचप्रकारे प्रतिक्रिया दाखवत असणार. (पडताळा स्तोत्रसंहिता ८:३, ४, ९.) तुम्हीही अशाच प्रकारचा विचार, मशीही राज्य स्थापित करण्यासाठी त्याने काय केले आहे, सर्व पृथ्वीभरात राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी तो काय करत आहे व मानवी व्यक्‍तिमत्त्वात त्याचे वचन कसा बदल करते या संबंधाने केला आहे का?—पडताळा १ पेत्र १:१०-१२.

१८. आम्हाला देवाचे कृत्य भयप्रेरक दिसून आल्यास, त्याचा आम्हांवर कसा परिणाम होईल?

१८ देवाची कृत्ये भयप्रेरक आहेत, जे तुमच्यात हितकर भय निर्माण करते, तुम्हाला सामर्थ्याने प्रवृत्त करते, आणि तुमच्या व्यक्‍तिमत्त्वावर व ज्याप्रकारे तुम्ही तुमचे जीवन व्यतीत करता त्यावर गंभीर परिणाम करते असा तुमचा अनुभव आहे का? (पडताळा स्तोत्रसंहिता ६६:५.) असल्यास, यहोवाची महिमा वर्णिण्यास, त्याची स्तुती करण्यास, त्याच्या उद्देशाबद्दल आणि जे त्याच्यावर प्रीती करतात त्यांच्यासाठी त्याने ठेवलेल्या आश्‍चर्यकारक गोष्टी इतरांना सांगण्यासाठी तुमचे हृदय तुम्हाला प्रवृत्त करील.—स्तोत्रसंहिता १४५:१-३.

[तळटीपा]

a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, इन्कॉ. यांनी प्रकाशित केलेला इन्साईट ऑन द स्क्रिपचर्स, खंड २, पृष्ठ १५० पहा.

तुमचे विवेचन काय आहे?

▫ “यहोवा देव आहे,” हे आम्हाला माहीत असल्यामुळे त्याची सेवा आनंदाने करण्यासाठी ते आम्हाला कशी मदत करते?

▫ आम्ही करीत असलेले सर्वकाही, देवाला माहीत असल्यामुळे, त्याचा आमच्या जीवनावर कसा प्रभाव पडला पाहिजे?

▫ देवाच्या दृष्टीपासून आम्ही कधीही दूर नसतो ही वास्तविकता उत्तेजनदायक का आहे?

▫ कोणाही मानवापेक्षा देव आम्हाला का समजून घेऊ शकतो?

▫ अशाप्रकारचा अभ्यास आम्हाला यहोवाची महिमा करण्याच्या गरजेला कसे दाखवतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा