चोर नसलेले जग
ते फारच लवकर घडले. ब्राझीलमधील सॅओ पाऊलो येथे, चांगले कपडे घातलेल्या एका मनुष्याने ॲन्टोनियोa यांच्या घरासमोरच, त्यांच्या डोक्यावर बंदूक रोखून धरली, व त्यांच्या मोटारीची मालकी असलेल्या दस्तऐवजांची तसेच किल्ल्यांची मागणी केली, आणि लगेच पळून गेला.
रिओ डि जानिरो येथे, पाऊलो नावाच्या मनुष्याला, त्याच्या दहा वर्षाच्या मुलीदेखत, चार सशस्त्र लोकांनी ताब्यात घेतले. त्यानंतर गाडीने त्याच्या घरापर्यंत आल्यावर, चोर त्याच्या घरात शिरले आणि त्यांना जे काही पाहिजे ते त्यांनी पाऊलोच्या दोन गाड्यांत भरून नेले. पाऊलोच्या पत्नीला मारून टाकण्याची धमकी देऊन त्यांनी तिला व एका कर्मचाऱ्याला ओलीस करून बाजारपेठेत असलेल्या पाऊलोच्या दागिण्यांच्या दुकानात नेले तेथून त्यांनी सर्व किंमतीच्या वस्तू ओरबाडून नेल्या. नंतर अनपेक्षितपणे, चोरांनी फोन करून त्यांनी गाड्या कोठे ठेवल्या आहेत ते सांगितले.
परिश्रम करून मिळवलेला पैसा आणि मालमत्तेची चोरी झाल्याने खरेच किती त्रेधा उडते! असे असतानाही, इतरजण कायद्याला धाब्यावर बसवून स्वतः कार्य करतात त्याप्रमाणे ॲन्टोनियो किंवा पाऊलो यांनी कायद्याला त्यांच्या हातात घेतले नाही. इतरजण चोराला मारून टाकतात किंवा अधू करतात, किंवा ते स्वतः त्यांचे जीवन गमावू शकतात. उदाहरणार्थ, एका तरुणाने ब्राझीलच्या स्त्रीचे घड्याळ हिसकावून घेतले तेव्हा त्या संतापलेल्या स्त्रीने तिच्या बॅगेतून पिस्तूल काढली आणि त्या चोराला जागीच ठार केले. याचा परिणाम काय झाला? ओ एस्टॅडो डि एस. पाऊलो याने अहवाल दिला: “या घटनेच्या प्रसंगी असलेल्या लोकांनी त्या अनोखळी स्त्रीच्या मनोवृत्तीसाठी तिची वाहवा केली, आणि तिची ओळख मिळावी यासाठी पोलिसांना मदत करण्याची कोणाचीही इच्छा नव्हती.” चोर नसलेल्या जगाची ख्रिश्चन वाट पाहात असले तरी ते त्या स्त्रीप्रमाणे जशास तसे करीत नाहीत. सूड घेणे देवाकडे असल्यामुळे ते नीतीसूत्रे २४:१९, २० मध्ये दिलेले शब्द ऐकतात: “दुष्कर्म्यांवर जळफळू नको; दुर्जनांचा मत्सर करू नको. कारण दुष्कर्म्यास चांगली गती नाही.”
परंतु हल्ला झाल्यास, तुम्ही काय करावे? रिओ डि जानिरो येथील घटना दाखवते की, शांत राहणे किती महत्त्वपूर्ण आहे. इलॉइजा नावाची एक ख्रिस्ती स्त्री पवित्र शास्त्र अभ्यास घेण्यासाठी बसमधून जात होती. दोन लोकांनी प्रवाशांना लुटण्यास सुरवात केली. तिचा उतरण्याचा बस स्टॉप आल्यावर, इलॉइजाने त्यांना सांगितले की ती एक यहोवाची साक्षीदार आहे व ती पवित्र शास्त्राचा अभ्यास घेण्यासाठी जात आहे. तिने तिचे पवित्र शास्त्र आणि अभ्यासाचे साहित्य दाखवले. तिच्याकडून काहीही न लुटता तिला उतरण्यासाठी त्यांनी परवानगी दिली. परंतु, दुसऱ्या एका प्रवाशाला उतरण्याची अनुमती दिली नाही. वाहकाने नंतर म्हटले की, असे त्याने कधीही पाहिले नव्हते.
रेजिनाला दोन शस्त्रधारी मनुष्यांनी तिच्या मोटारीत बसण्यास आज्ञा दिली तेव्हा ती देखील शांत राहिली. रेजिनाने स्वतःच्या अवेक! मासिकाची प्रत दाखवून साक्ष दिली. चोर निराश असल्यामुळे तिने त्यांना मोटारीच्या डॅशबोर्डमधील कप्पा उघडण्यास सांगितले, तेथे तिने काही मिठाई ठेवली होती. परंतु किंगडम मेलडीज्च्या कॅसेट टेप पाहिल्यावर ते संगीत ऐकू लागले. आता वातावरण अधिक मैत्रीपूर्ण झाल्यामुळे, रेजिनाला काहीही न करता महामार्गावर सोडून देण्याचे चोरांनी ठरवले, व एखादा दयाळू व्यक्ती तिला मदत करील याचीही खात्री त्यांनी दिली. दहा मिनिटे चालल्यावर, तिला एक घर दिसले, तिने घडलेली सर्व हकीगत सांगितली, परंतु घरमालकाने तिच्यावर विश्वास ठेवला नाही, त्याने म्हटले: “तुझ्यावर हल्ला झाला आहे असे तर दिसत नाही; तू किती शांत आहेस.”
बळी पडलेल्या एखाद्याला शारीरिकरित्या जरी हानी झाली नसली, तरी बेचैन करणाऱ्या अशा अनुभवाचा नंतर गंभीर परिणाम होऊ शकतो. ओ एस्टॅडो डि एस. पाऊलो कळवतात की, ‘बळी पडलेला व्यक्ती नंतर घरातील सदस्यांच्या बाबतीत किंवा जे मदत करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या बाबतीत त्याला असुरक्षित, द्वेषपूर्ण वाटते, इतरांवर भरवसा ठेवू शकत नसल्यामुळे सविस्तर माहिती गोळा केल्याने जग त्याला अन्यायी वाटू लागते.’ उलटपक्षी, यहोवावर भरवसा ठेवणारी, बळी पडलेली व्यक्ती शारीरिक आणि भावनात्मक हानीच्या अनुभवातून बहुधा वाचत असते. तरीसुद्धा, जर गुन्हेच नसले किंवा भीती निर्माण करणारे काहीच नसले तर तो एक आशीर्वाद असेल याला तुमची सहमती नाही का?
“चोरी करणाऱ्याने पुन्हा चोरी करू नये”
अनेक जणांनी त्यांच्या लोभिष्ट जीवनशैलीला पसंत केले असले तरी, देवाच्या वचनाने चोरांना त्यांच्या अभिलाषा तसेच त्यांचे व्यक्तिमत्त्व बदलण्यासाठी मदत केली आहे. (इफिसकर ४:२३) जीवनात पवित्र शास्त्रावर आधारित असलेला एक खरा उद्देश असल्यावर, ते या शब्दाकडे लक्ष देतात: “अन्यायाने मिळवलेल्या मोठ्या मिळकतीहून, न्यायाने कमावलेले थोडे बरे.” (नीतीसूत्रे १६:८) क्लॉडियो कळवतो: “माझ्या कुटुंबातील सर्वचजण साक्षीदार होते, परंतु यहोवा आणि त्याच्या उद्देशाबद्दल त्यांना काय सांगायचे आहे ते मी कधी ऐकत नसे. चोरलेला माल घेऊन जवळजवळ २,००० किलोमीटरच्या प्रवासानंतर परतत असताना, मला रस्त्यावरील पोलिसांच्या अनेक तपासणी-नाक्यांना पार करून जायचे होते. अशा या परिस्थितीत मला कळले की, मी माझ्या जीवनात बदल केला पाहिजे. तसे करण्याचा मी पूर्वी प्रयत्न केला होता परंतु तो व्यर्थ ठरला होता. यहोवाचे साक्षीदार असलेल्या माझ्या नातेवाईकांविषयी या वेळी मी विचार करू लागलो आणि ते किती वेगळे आहेत, त्यांच्याजवळ आनंद, सुख आणि शांती आहे.” या परिणामस्वरूपात, क्लॉडियोने देवाच्या वचनाचा अभ्यास सुरू केला, अमली पदार्थ आणि पूर्वीच्या मित्रांना सोडून दिले व तो एक ख्रिस्ती सेवक झाला.
आता इतरजण देखील या शब्दांकडे लक्ष देतात: “जुलुमजबरदस्तीवर भिस्त ठेवू नका, लूट केल्याची शेखी मिरवू नका.” (स्तोत्रसंहिता ६२:१०) चोरी करताना एका मनुष्याला मारून टाकण्याचा प्रयत्न केल्यामुळे तुरुंगाची शिक्षा झालेला जोस, अमली पदार्थाचा व्यसनी व अमली पदार्थांचा बेकायदेशीर व्यापार करीत होता, त्याच्या मेहुण्याबरोबर पवित्र शास्त्राचा अभ्यास केल्यामुळे त्याला फायदा झाला. देवाच्या वचनाचा अभ्यास चालू करण्यात याचे पर्यवसान झाले, अमली पदार्थांचा वापर व व्यापार करण्याचे त्याने सोडून दिले व तो आता एक आवेशी साक्षीदार आहे.
तथापि, नवे व्यक्तिमत्त्व अचानक किंवा आश्चर्यकारकपणे येत नाही. ऑस्कर नावाचा व्यक्ती अमली पदार्थ तसेच चोरी करण्यात फार गुंतलेला होता, तो असे कळवतो: “यहोवाला मी इतकी कळकळीने प्रार्थना केली की समोरची जागा माझ्या अश्रूंमुळे मला एका लहान तळ्याप्रमाणे वाटत होती.” होय, देवाच्या वचनाच्या परिश्रमपूर्वक अभ्यासाव्यतिरिक्त अंतःकरणापासून प्रार्थना करणे आवश्यक आहे. प्रार्थनापूर्वक दृष्टिकोनातील सुज्ञतेकडे लक्ष द्या: “दारिद्य्र किंवा श्रीमंती मला देऊ नको, मला आवश्यक तेवढे अन्न खावयास दे. माझी अतितृप्ती झाल्यास मी कदाचित तुझा अव्हेर करीन, आणि परमेश्वर [यहोवा, न्यूव.] कोण आहे, असे म्हणेन; मी दरिद्री राहिल्यास कदाचित चोरी करीन, आणि माझ्या देवाच्या नामाची निंदा करीन.”—नीतीसूत्रे ३०:८, ९.
स्वार्थाची जागा अस्सल प्रीतीने घेतली गेली पाहिजे: “चोरी करणाऱ्याने पुन्हा चोरी करु नये; तर त्यापेक्षा गरजवंताला द्यावयास आपल्याजवळ काही असावे म्हणून जे चांगले ते आपल्या हातांनी करून उद्योग करीत राहावे.” (इफिसकर ४:२८) पहिल्या शतकातील पूर्वी ‘चोर किंवा लोभी’ असणाऱ्या काही ख्रिश्चनांच्या बाबतीत, येशू ख्रिस्ताच्या खंडणी द्वारे पश्चाताप करणाऱ्यांना यहोवा दयाळूपणे क्षमा करतो. (१ करिंथकर ६:९-११) आम्ही गतकाळात कसेही असलो तरी आमच्या जीवनशैलीत बदल करून देवाची कृपा संपादन करू शकतो हे किती सांत्वनदायक आहे!—योहान ३:१६.
देवाच्या नव्या जगातील सुरक्षितता
चोर नसलेल्या पृथ्वीची कल्पना करा. तुम्हाला न्यायाधीश, वकील, पोलिस आणि तुरूंगाच्या बाबतीत कायद्याची अंमल बजावणी करणाऱ्या महागड्या व्यवस्थेची गरज भासणार नाही! ते एक समृद्ध जग असेल त्यातील प्रत्येक नागरिक इतरांचा व त्यांच्या मालमत्तेचा आदर दाखविणारा असेल! हे अविश्वसनीय वाटते का? देव खरोखरच, मानवाच्या कारभारात हस्तक्षेप करून स्वैराचाराचा अंत करील का? पवित्र शास्त्र देवाचे वचन आहे व त्याच्या भविष्यवाण्या विश्वसनीय आहेत याविषयीच्या पुराव्याचे परीक्षण करण्यासाठी आम्ही तुम्हाला निमंत्रण देतो. तो बदल पुढे होणार यावर भरवसा ठेवण्यासाठी तुम्हाला सबळ पुरावा दिसेल. धार्मिकतेवर प्रीती करणाऱ्यांना मुक्तता देण्याच्या अभिवचनापासून देवाला कोणीही अटकाव करणार नाही: “दुष्कर्म्यावर जळफळू नको. अन्याय करणाऱ्यांचा हेवा करू नको. कारण ते गवताप्रमाणे लवकर कापले जातात, हिरवळीसारखे वाळून जातात.” (स्तोत्रसंहिता ३७:१, २) बऱ्याच काळापूर्वी लिहिलेल्या त्या शब्दांची लवकरच पूर्णपणे पूर्तता होईल.
देवाचे राज्य आशाहीनता आणि अनिश्चितपणा आणलेल्या दुःखाचा व अधार्मिकतेचा अंत करील. तणावामुळे चोरी करावी असे कोणालाही वाटणार नाही, कोणीही दरिद्री असणार नाही. भविष्यवाणीत आम्हाला याची हमी दिली आहे: “पृथ्वीवरील डोंगराच्या माथ्यावर भरपूर धान्य होईल; तिचे फळ [प्राचीन] लबानोनासारखे डोलेल, आणि नगरातले लोक भूमीच्या गवतासारखे भरभराटीस येतील.” (स्तोत्रसंहिता ७२:१६, पंडिता रमाबाई भाषांतर) खरोखर, पुनःर्स्थापित नंदनवनात, खऱ्या देवाची ओळख व त्याची उपासना करीत असलेल्या मानवांची शांती कोणतीही गोष्ट भंग करू शकणार नाही.—यशया ३२:१८.
या लोभिष्ट जगाच्या मार्गांचा विरोध केल्यामुळे ते बक्षीस कसे असेल! नीतीसूत्रे ११:१९ म्हणते: “ज्याच्याठायी अढळ नीती असते त्याला जीवन प्राप्त होते; जो दुष्कर्मामागे लागतो तो आपणावर मृत्यू आणतो.” होय, दुष्ट लोकांचा नाश झाल्यावर, कोणालाही त्यांच्या जीवनाविषयी व त्यांच्या मिळकतीसाठी भय वाटण्याचे कारण नसणार. स्तोत्रसंहिता ३७:११ आम्हाला हे अभिवचन देते: “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील, ते उदंड शांतीसुखाचा उपभोग घेतील.”
[तळटीपा]
a यातील काही नावे बदलली गेली आहेत.
[५ पानांवरील चौकट]
चोरीच्या वास्तविकतेचा सामना करणे
घरामध्ये—तुम्ही घरात असला किंवा नसला तरी, चोर तुमच्यावर हल्ला करीत असल्यामुळे, दरवाजे बंद आणि कुलूप लावून ठेवा. सूचना देणारा गजर किंवा पहारा करणारा कुत्रा असावा याविषयी काही तज्ज्ञ शिफारस करतात. सुटीवर जाणार असाल तर भरवसा ठेवण्यालायक शेजाऱ्याला त्याची कल्पना द्या. चोर अतिशय त्वरीत काम करतात, निराश झाल्यास, अचानक त्यांच्या योजना बदलू शकतात म्हणून शांत राहा. तुम्ही यहोवाचे एक साक्षीदार असल्यास, याची ओळख करून द्या आणि साक्ष देण्याचा प्रयत्न करा. तुम्ही मैत्रीभाव किंवा सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न करू शकता. शारीरिक हल्ला होत नाही तोवर विरोध करू नका.
सार्वजनिक ठिकाणी—कोणी तुमच्या मागे येत असल्यास सावधानी बाळगा. फूटपाथच्या मधून चाला. अंधार असलेल्या व लोक नसलेल्या रस्त्यावरून जाण्याचे टाळा. तुमची पर्स किंवा बहुमोल गोष्टी सुरक्षित ठेवा. तुम्ही कोठेतरी घाईने जात असल्यासारखे जोराने चाला. भारी कपडे आणि चकाकणारे दागिने घालण्याचे टाळा. परिस्थिती योग्य असल्यास सोबत्याबरोबर खरेदी करा. आवश्यक तेवढेच पैसे जवळ ठेवा, वेगवेगळ्या खिशात आणि ठिकाणी पैशाची वाटणी करून ठेवा.
कारमध्ये—“कारमध्ये लुटण्याची गोष्ट” तुमच्या भागात सामान्य झाली असल्यास, थांबवलेल्या कारमध्ये बसून राहू नका. कामाला जाण्या-येण्याच्या मार्गात फेरफार करा. लांबचा मार्ग असला तरी त्या अधिक सुरक्षित असलेल्या मार्गाने जा. गाडी उभी करण्याआधी काही संशयास्पद आहे का याची सभोवती पाहणी करा. लोकवस्ती नसलेल्या ठिकाणी डिकीतील सामान उघडण्याचे टाळा. मोटारीत किंमतीच्या वस्तु दिसतील अशा ठेवू नका. दिसेल अशी कुलूप असलेली साखळी किंवा चोरी करता न येणाऱ्या इतर साधनामुळे प्रासंगिक चोर नाउमेद होऊ शकतो.
[६ पानांवरील संक्षिप्त आशय]
“पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका; तेथे कसर व जंग खाऊन नाश करतात, आणि चोर घर फोडून चोरी करतात. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा, तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत व चोर घरफोडी करीत नाहीत व चोरीही करीत नाहीत.”—मत्तय ६:१९, २०