विवाहातील बंधन कसे बळकट करावे
“कोणत्याही कारणावरून बायको टाकणे सशास्त्र आहे काय?” परुशांनी थोर शिक्षक, येशू ख्रिस्ताला पकडण्यासाठी असे विचारले. पहिल्या मानवी विवाहाचा उल्लेख करुन त्याने उत्तर दिले व या गोष्टीबाबत त्याने आदर्श घालून दिला: “देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.”
मोशाने घटस्फोटासाठी “सुटपत्र” देण्याबद्दलची योजना बनवली होती असा परुशांनी युक्तिवाद मांडला. येशूने त्यांना उत्तर दिले: “तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे मोशाने तुम्हास आपल्या बायका टाकू दिल्या; तरी सुरवातीपासून असे नव्हते. मी तुम्हास सांगतो की, जो कोणी आपल्या बायकोला जारकर्माच्या कारणाशिवाय टाकून दुसरी करतो तो व्यभिचार करतो.”—मत्तय १९:३-९.
मूलतः विवाह कायमचे बंधन होते. सार्वकालिक जीवन लक्षात ठेऊन त्यांची सृष्टी केल्यामुळे मृत्यूने देखील पहिल्या मानवी जोडप्याला विभक्त केले नसते. तथापि, त्यांनी पाप केले. त्यांच्या पापाने मानवी विवाहावर कलंक लावला. मरण या शत्रूने विवाहित जोडप्याला विभक्त करण्यास सुरवात केली. पवित्र शास्त्रात आम्ही वाचतो की, देव मृत्यूकडे विवाहाचा शेवट अशा दृष्टिने पाहतो: “पती जिवंत आहे तोपर्यंत पत्नी बांधलेली आहे; पती मेल्यावर तिची इच्छा असेल त्याच्याबरोबर, पण केवळ प्रभूमध्ये, लग्न करावयास ती मोकळी आहे.” (१ करिंथकर ७:३९) हे सती या धार्मिक कल्पनेपासून फार वेगळे आहे, ती प्रथा पतीचा मृत्यू झाल्यावर पत्नीने स्वतःला अग्नीत जाळून घेऊन मरण्यास भाग पाडीत होती, जेणेकडून ते विवाहाचे बंधन जीवनानंतर कायम टिकवून ठेवतात असा विश्वास होता.
मोशेच्या नियमशास्त्रातील व्यवस्था
मोशेचे नियमशास्त्र दिले जाईपर्यंत, वैवाहिक नातेसंबंधाचा ऱ्हास येथपर्यंत झाला होता की, यहोवाने इस्राएलांच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे घटस्फोटासाठी व्यवस्था केली. (अनुवाद २४:१) इस्राएलांनी क्षुल्लक चुकांमुळे या नियमाचा दुरूपयोग करून त्यांच्या बायकांना घटस्फोट द्यावा हा यहोवा देवाचा उद्देश नव्हता. त्यांनी त्यांच्या शेजाऱ्यांवर स्वतःसारखी प्रीती करावयाची होती या त्याच्या आज्ञेनुसार हे अगदी स्पष्टच होते. (लेवीय १९:१८) एवढेच नव्हे तर सुटपत्र प्राप्त करणे हे एका प्रतिबंधकाप्रमाणे होते, घटस्फोटाची मागणी करणाऱ्या पतीने योग्य अधिकार असलेल्या मनुष्याकडे संपर्क साधायचा होता, व तो असा मनुष्य असेल की ज्याने समेट घडविण्यासाठी प्रयत्न केलेला असेल. नाही, देवाने “कोणत्याही कारणांवरुन” बायकोला टाकण्यासाठी हा नियम दिला नव्हता.—मत्तय १९:३.
तथापि, इस्राएलांनी नियमशास्त्रातील सामान्य हेतू व खऱ्या अर्थाकडे दुर्लक्ष केले व त्यांच्या लहरीप्रमाणे कोणत्याही कारणांवरुन घटस्फोट घेण्यासाठी या नियमाचा पूर्ण उपयोग केला. इ.स.पूर्व पाचव्या शतकापर्यंत, त्यांच्या तारुण्याच्या पत्नीबरोबर ते कपटीपणाने वागत असत, हर प्रकारच्या कारणांवरुन ते त्यांना घटस्फोट देत. (मलाखी २:१४-१६) इस्राएली येशूच्या दिवसात ज्याचे आचरण करीत होते त्या पार्श्वभूमीविरुद्ध असल्यामुळे त्याने घटस्फोटाचा निषेध केला.
घटस्फोटासाठी केवळ कायदेशीर आधार
तथापि, येशूने घटस्फोटासाठी एक कायदेशीर आधार सांगितला: जारकर्म. (मत्तय ५:३१, ३२; १९:८, ९) “जारकर्म” यासाठी अनुवादित केलेल्या शब्दात, शास्त्रानुरूप असलेल्या विवाहाबाहेरील सर्व प्रकारचा बेकायदेशीर लैंगिक समागमाचा यात समावेश आहे, तो कदाचित सारख्याच लिंगामधील किंवा विरुद्ध लिंगामधील किंवा प्राण्यांबरोबरचा असू शकतो.
तरी देखील येशू अविश्वासू सोबत्याकडून घटस्फोट घेण्याची शिफारस करीत नाही. त्याला किंवा तिला घटस्फोट पाहिजे असल्यास, त्यात समाविष्ट असणाऱ्या परिणामांचा नीट विचार करुन मग ठरवणे हे निर्दोष सोबत्यावर अवलंबून आहे. या शास्त्रवचनीय आधारावर घटस्फोट घेण्याविषयी ज्या बायकांनी विचार केला असेल त्यांनी, पहिल्या स्त्रीवर, तिने केलेल्या पापासाठी न्यायदंड बजावताना देवाने जे म्हटले त्याचा विचार करावा. मृत्यू दंडाच्या व्यतिरिक्त, देवाने विशेषकरून हव्वेला सांगितले: “तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवील.” (उत्पत्ती ३:१६) सी. एफ. केल व एफ. डेलिट्झ, यांच्या द कॉमेंटरी ऑन द ओल्ड टेस्टमेंट मध्ये, त्यांनी “ओढा” याचे वर्णन “ही इच्छा एका आजाराप्रमाणेच आहे” असे केले आहे. हा ओढा प्रत्येक बायकांमध्ये तितका तीव्रपणे दिसून येत नाही हे कबूल करावे लागेल. परंतु जर निर्दोष पत्नी घटस्फोटाचा विचार करीत असेल, तर तिने, हव्वेकडून वारशाने मिळवलेल्या भावनात्मक गरजांचा विचार केला पाहिजे. तथापि, दोषी सोबत्याच्या विवाहाबाहेरील लैंगिकतेमुळे निर्दोष सोबत्याला लैंगिक संक्रमणापासून झालेल्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो, यात एडस् या आजाराचा देखील समावेश होतो, यामुळे येशूने स्पष्ट केल्याप्रमाणे, काही जणांनी घटस्फोट घेण्याचे ठरवले आहे.
कौटुंबिक त्रासाचे बी पेरले गेले
लोकांच्या कठोरपणाचा उगम पहिल्या मानवी दांपत्याने देवाविरुद्ध केलेल्या पापात सापडतो. (रोमकर ५:१२) पहिल्या मानवी दांपत्याने त्यांच्या स्वर्गीय पित्याविरुद्ध पाप केल्यावर कौटुंबिक झगड्याचे बी पेरले गेले. हे कशाप्रकारे खरे आहे बरे? पहिली स्त्री, हव्वा हिला सर्पाने मना केलेल्या झाडाचे फळ खाण्यासाठी मोहीत केले तेव्हा, तिने पुढे जाऊन ते फळ खाल्ले. तो अभुतपूर्व निर्णय घेतल्यानंतरच त्या सर्पाने तिला काय सांगितले याविषयी आपल्या पतीला तिने सांगितले. (उत्पत्ती ३:६) होय, तिने तिच्या पतीचा विचार न घेताच कार्य केले होते. या मूळ नमुन्यासारख्याच समस्यांचा—मोकळ्या मनाने केलेल्या दळणवळणाची उणीव याचा सामना लोकांना करावा लागत आहे.
यानंतर, आदाम आणि हव्वा, यांजवर त्यांच्या पापाचा परिणाम भोगण्याची वेळ आली तेव्हा दोघांनीही सारख्याच युक्त्यांचा अवलंब केला जो आज अनेक जोडपी समस्यात अडकल्यावर करतात; ती युक्ती म्हणजे एकमेकांवर दोष ढकलणे. पहिला मनुष्य आदाम याने, जे काही केले होते त्याबद्दल त्याने त्याच्या पत्नीला व यहोवालाही दोष दिला, त्याने म्हटले: “जी स्त्री तू मला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले.” यानंतर स्त्रीने म्हटले: “सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले.”—उत्पत्ती ३:१२, १३.
आदाम आणि हव्वेवरील यहोवाच्या न्यायदंडाच्या निकालाने, वाढ होईल अशा आणखी एका त्रासाच्या घटकांचे आगाऊ अनुमान केले. पतीबरोबरच्या तिच्या संबंधाच्याबाबतीत यहोवाने हव्वेला सांगितले: “तो तुझ्यावर स्वामित्व चालवील.” आज अनेक पती, आमच्या पहिल्या लेखात उद्धृत केलेल्या इसॉ सारखे, त्यांच्या पत्नींच्या भावना विचारात न घेता त्यांच्यावर निर्दयीपणाने स्वामित्व चालवतात. असे असतानाही, अनेक बायकांचा ओढा त्यांच्या नवऱ्यांकडे असतो. त्या ओढ्याचे समाधान झाले नाही तर, बायका त्यांच्याकडे लक्ष देण्याची मागणी किंवा स्वार्थीपणाने कार्य करु लागतात. अनेक पती त्यांच्या बायकांवर स्वामित्व चालवीत असल्यामुळे व अनेक बायका त्यांच्या पतीचे लक्ष असण्याचा ओढा धरीत असल्यामुळे, स्वार्थीपणा वरचढ होतो व शांती उडून जाते. “आजच्या घटस्फोटाचे पृथ्थकरण कसे करावे” या वर्तमान पत्राच्या लेखात शुनशक शेरीझ्वा यांनी म्हटले: “या वादविषयात सामावलेल्या मुलभूत समस्येकडे विशेषपणे, आज लोक त्यांच्या स्वतःच्या आस्थांना प्रथम स्थान देत आहेत, याकडे आम्ही दुर्लक्ष केल्यास, घटस्फोटाचा बारकाईने अभ्यास करणे आज अजिबात शक्य होणार नाही.”
तथापि, यहोवाने त्याच्या वचनात मार्गदर्शन पुरविले असल्याने, आज्ञाधारक विवाहित कुटुंबे त्यांच्या अपरिपूर्ण अवस्थेत देखील वैवाहिक सुखाचा भरपूर आनंद उपभोगू शकतात. इसॉ याने देवाच्या मार्गदर्शनाचा अवलंब केला आणि तो आनंदी कौटुंबिक जीवनाचा आनंद उपभोगत आहे. आता लोकांना वैवाहिक बंधनाला दृढ करण्यासाठी पवित्र शास्त्राचे तत्त्व कसे मदत करते ते आपण पाहू या.
गोष्टी बोलून दाखवा
अनेक विवाहात, दळणवळणाची उणीव, इतरांना दोष देण्याची प्रवृत्ती आणि स्वार्थी मनोवृत्ती असल्यामुळे पती पत्नीला एकदुसऱ्यांच्या भावना समजून घेण्यासाठी फार कठीण बनवते. “सलोख्यासाठी भावनांची सहभागिता करणे ही आगाऊ अट असल्यामुळे, सलोखा पूर्तता करण्याच्या भरवशाची मागणी करतो. आणि भरवसा आज तुटपुंजा आहे,” असे संशोधक कॅरल एस. अव्हेरी यांनी म्हटले. एक दुसऱ्यांच्या आंतरिक भावनांनी भरलेल्या गोष्टींची सहभागिता अशाप्रकारच्या भरवशाला दृढ करते. ही गोष्ट पती आणि पत्नीने मोकळ्या मनाने केलेल्या दळणवळणाची मागणी करते.
सलोख्याच्या विचारांची सहभागिता करण्याचे उत्तेजन देताना नीतीसूत्रे एका दृष्टांताचा वापर करते, ते म्हणते: “मनुष्याच्या मनातील मसलत खोल पाण्यासारखी असते, तरी समंजस ती बाहेर काढतो.” (नीतीसूत्रे २०:५) वैवाहिक सोबती, पती पत्नीने अंतःकरणातील खोल विचार काढण्यासाठी समंजस असले पाहिजे. तुमचा सोबती नाराज झाला आहे अशी कल्पना करा. “आज मला खूपच त्रास झाला,” असा प्रतिसाद देण्याऐवजी, दयाळूपणे असे का विचारु नये की: “आज तुला [किंवा तुम्हांला] काही त्रास झाला का? काय झाले?” परंतु, तुमच्या सोबत्याकडे दुर्लक्ष केल्यावर नंतर उद्भवणाऱ्या उसळत्या भावनांबरोबर व्यवहार करण्यात वेळ खर्च करण्यापेक्षा, तुमच्या पतीचे किंवा पत्नीचे ऐकण्यासाठी वेळ आणि परिश्रम घेणे आनंददायक, समाधानी आणि वेळेची बचत करणारे आहे.
भरवसा प्राप्त करण्यासाठी, प्रत्येक जण प्रामाणिक असला पाहिजे आणि दुसरा सोबती समजू शकेल अशाप्रकारे भावना प्रकट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देवाचे वचन आर्जवते की “खरे बोला, कारण आपण एकमेकांचे अवयव आहो.” (इफिसकर ४:२५) खरे बोलण्यासाठी समजंसपणाची आवश्यकता असते. समजा पत्नीला असे वाटले की तिचे ऐकले जात नाही. ते बोलण्याआधी तिने नीतीसूत्राचा विचार केला पहिजे: “जो मितभाषण करतो त्याच्या अंगी शहाणपण असते; ज्याची वृत्ती शांत तो समंजस असतो.” (नीतीसूत्रे १७:२७) “तुम्ही माझे कधीच ऐकत नाही!” असा तिने तिच्या पतीवर आरोप करण्याऐवजी, तिच्या विफलता आणि निराशा यांनी तिच्यात जागा घेण्याआधी तिने तिच्या भावना आधीच शांतपणे व्यक्त करणे फारच बरे असेल. कदाचित असे काही बोलण्याद्वारे ते ती प्रकट करु शकेल की, “मला माहीत आहे की तुम्ही फार व्यग्र आहात, तुमच्याबरोबर थोडा वेळ घालविल्याने मला फार आनंद वाटेल.”
खरेच, “मसलत मिळाली नाही म्हणजे बेत निष्फळ होतात.” (नीतीसूत्रे १५:२२) तुमची सहचरी तुमच्यावर प्रीती करते, परंतु ती तुमच्या मनात काय आहे ते जाणू शकते असा याचा अर्थ होत नाही. चतुराईने तुम्ही तुमच्या सोबत्याला तुम्हाला कसे वाटते ते कळवू शकता. यामुळे वैवाहिक ख्रिस्ती दांपत्य या नात्याने, “आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटत” राहून प्रेमळपणे सुधारणा करण्यासाठी हे तुम्हाला मदत करील.—इफिसकर ४:२, ३.
कॉझूवो यांच्या उदाहरणाचा विचार करा, तो स्त्रीवश झालेला तसेच जुगार खेळण्याची तीव्र इच्छा असलेला पती होता. हजारो डॉलरच्या कर्जात तो बुडाला होता. त्याचे कर्ज देण्यासाठी उसने पैसे घेण्याद्वारे तो अधिकच गाळात रुतत चालला होता. नंतर त्याने पवित्र शास्त्राचा अभ्यास सुरू केला, शेवटी त्याची समस्या पत्नीला सांगण्याचे धैर्य त्याला झाले. तिच्या आरोपाचा सामना करण्याची तयारी त्याने केली. तथापि, त्याला आश्चर्य वाटले की त्याची पत्नी, जी बऱ्याच दिवसापासून पवित्र शास्त्राचा अभ्यास करीत होती, तिने शांतपणे उत्तर दिले: “कर्ज कसे फेडता येऊ शकते हे आपण पाहू या.”
दुसरा दिवस उजाडल्यावर त्यांनी त्यांच्या सावकारांला भेट दिली, व त्यांचे कर्ज चुकते करायला सुरवात केली यात त्यांनी त्यांचे घरदेखील विकण्याची तयारी केली. त्यांच्या कर्जाची फेड करण्यास जवळजवळ एक वर्ष लागले. त्याची पत्नी किमी हिच्यात कशाने बदल घडून आणला? ती म्हणते की: “फिलिप्पैकर अध्याय ४, व ६ आणि ७ वचने खरोखर सत्य आहेत. ‘कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करुन आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.’” ती म्हणते: “इतके कष्ट असतानाही मी किती आनंदी आहे हे बघून माझ्या एका मैत्रिणीला आश्चर्य वाटले व तिने माझ्याबरोबर पवित्र शास्त्राचा अभ्यास सुरू केला.” त्यानंतर कॉझूवो आणि त्याच्या पत्नीचा बाप्तिस्मा झाला व तेव्हापासून ते एका आनंदी कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटत आहेत.
एकदुसऱ्याला खरे बोलण्याद्वारे भरवसा ठेवण्याव्यतिरिक्त, ज्यांना वरील अनुभव मिळाला आहे अशा पती आणि पत्नींनी, असे काही केले ज्यामुळे वैवाहिक समस्या सोडविण्यास जोडप्यांना मदत मिळते. त्यांनी वैवाहिक योजनेचा उगम यहोवा देवासोबत दळणवळण ठेवले. जर जोडप्यांनी त्याच्या तत्त्वांचे अवलंबन करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि बाकीचे त्याच्यावर सोपवले तर दबाब आणि त्रासांचा सामना करीत असतानाही, देवाने दिलेली शांती त्यांचे विचार राखण्याद्वारे तो त्यांना आशीर्वाद देईल. एकत्र मिळून प्रार्थना करण्याने देखील विशेषपणे मदत मिळते. यात देवासमोर अंतःकरण उघडे करुन बोलण्यासाठी पतीने पुढाकार घेतला पाहिजे, त्याने आणि त्याच्या पत्नीने कोणत्याही समस्याचा सामना करीत असताना त्याचे मार्गदर्शन आणि निर्देशन मिळण्याचा शोध केला पाहिजे. (स्तोत्रसंहिता ६२:८) यहोवा देव अशा प्रार्थना जरुर ऐकेल.
होय, विवाहाचे बंधन दृढ करणे शक्य आहे. आता देखील, प्रक्षुब्ध समाजात आमच्या सर्व अपरिपूर्णतासहित राहत असताना वैवाहिक दांपत्यांना त्यांच्या नातेसंबंधात पुरेसा आनंद मिळू शकतो. वॉचटावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केलेल्या तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे या पुस्तकात अधिक व्यावहारिक सुचना आणि ईश्वरी सल्ले तुम्हाला मिळतील. याशिवाय, पवित्र शास्त्राच्या तत्त्वांचे अवलंबन करण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या दांपत्यांना देव निर्माण करीत असलेल्या, लवकरच येणाऱ्या नवीन जगात प्रीतीच्या बंधनात एकत्र राहण्याची आशा आहे.