कमकुवत होत चाललेले वैवाहिक बंधन
एका तरुण मातेने तिच्या दोन महिन्याच्या बाळाला कुरवाळले. पण, लगेच उन्मादीत होऊन तिने त्याला जमिनीवर आपटले. काही तासानंतर ते मूल मरण पावले. ती माता म्हणाली, “मी त्याला जाणूनबुजून आपटले,” “कारण माझा पती त्याच्या कुटुंबाची जरा देखील काळजी घेत नाही.” या बाबतीत पतीसोबत बोलण्याऐवजी, तिने त्या निष्पाप बालकावर आपल्या रागाच्या उद्रेकाला वाट करुन दिली.
काही थोडक्याच माता अशा प्रकारचा पराकोटीचा मार्ग अवलंबितात, पण अनेकांना तिच्यासारखे वाटत असते. विवाहीत दांपत्यांस आपल्या विवाहास यशस्वी बनविणे जास्तीतजास्त कठीण बनत आहे. “आज अमेरिकेमध्ये विवाहाच्या यशस्वीयतेची संभवनीयता ऱ्हास पावत आहे,” असे जर्नल ऑफ मॅरेज अँन्ड द फॅमिली म्हणते, “त्यामुळे विवाहाचे दृढपणे वचन देणे . . . हे इतके धोक्याचे बनले आहे की कोणताही समजंस व्यक्ती तसे करणार नाही.”
अशा प्रक्षुब्ध काळात, अनैतिकता, विसंगती, कर्तव्य, सासरच्या नातेवाईकांशी मतभेद, व स्वार्थीपणा हे सर्व घरगुती संघर्षाच्या आगीत तेल ओतत आहे, जे की अनेकदा घटस्फोटापर्यंत प्रयाण करते. जपान मध्ये घटस्फोटाच्या विरुद्ध भक्कम पवित्रा घेण्याच्या बाबतीत सुपरिचित असणाऱ्या कॅथोलिक चर्चमध्येही इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे की, त्यासाठी एका खास समितीची स्थापना करण्यात आली जी घटस्फोट व पुर्नविवाह अशा सारख्या समस्यांपासून सुटका करु शकेल. वाढत्या प्रमाणात चर्चला जाणाऱ्या सदस्यांवर घटस्फोटाविषयीच्या समस्यांचा परिणाम होत आहे.
तथापि, घटस्फोटाची संख्या हे इतर मोठ्या समस्यांचा छोटासा भाग दर्शविते. अमेरिकेतील पाहाणी हे दाखविते की केवळ सामाजिक कल यापेक्षा वैवाहिक जीवनाचा अधोगतीस चाललेला दर्जाच घटस्फोटात वाढ करण्यास कारणीभूत आहे. कमी प्रयत्न व कमी जबाबदारी यामुळे वैवाहिक जीवन त्यातील सर्वोत्तम आकर्षण गमावत आहे. अनेकजन वरवर वैवाहिक दापंत्य असल्याचे भासवितात, पण ते वैवाहिक हक्काचे देणे देण्यात सहभागी होत नाहीत, तसेच ते क्वचितच एकमेकांशी संभाषण करतात. काहीजनांना त्या पौवार्त्य स्त्रीप्रमाणे वाटते की जिने कबरेसाठी वेगळी जागा आधीच घेऊन ठेवली, ती म्हणते, ‘माझ्या पतीसमवेत कबरेत असणे मी नाकारते.’ आता तिच्या पतीला घटस्फोट देण्यास शक्य नसल्याने, मृत्यूनंतर घटस्फोट प्राप्त करण्याचा तिचा हेतू आहे. हे दुःखाचे आहे की, जरी असे लोक घटस्फोटीत नसले तरी, त्यांचे वैवाहिक जीवन हे त्यांच्याकरता आनंदाचा उगम नाही.
तीच गोष्ट इसॉच्या बाबतीत खरी होती, त्याने लहरीपणात त्याच्या पत्नीशी विवाह केला, पण आपल्या अहंकारी जीवनात काही बदल करावा असे त्याला वाटले नाही. लांब प्रवास करणारा ट्रक ड्रायव्हर या नात्याने त्याचे उत्पन्न चांगले होते, पण आपली सारी कमाई त्याने खाणे व पिणे यातच घालविली, आपल्या कुटुंबाची कोणत्याही प्रकारची काळजी त्याने बाळगली नाही. याचा परिणाम, त्याच्या पत्नीसोबतचे त्याचे झगडे विकोपास जात. “जेव्हा केव्हा माझ्या बाबतीत चुकीची गोष्ट होत असे,” इसॉ म्हणतो, “तेव्हा मी घरी येई व माझ्या रागाचा उद्रेक मी माझ्या कुटुंबावर काढीत असे.” अशांत ज्वालामुखी जसा असतो, तसा घटस्फोटाच्या विषयाचा दररोज उद्रेक होत असे.
अनेक पुरुष व स्त्रिया असा पीडादायी विवाह सहन करीत आहेत. ते घटस्फोटीत असोत अथवा नसोत, त्यांना आनंद मिळत नाही. मग त्यांचे विवाह यशस्वी बनविण्याकरीता त्यांच्यासाठी कोणता तरी मार्ग आहे का? त्यांच्या वैवाहिक बंधनास दृढ करण्यास काय केले जाऊ शकते?