वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w93 ५/१ पृ. १८-२३
  • “लग्न सर्वस्वी आदरणीय असावे”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “लग्न सर्वस्वी आदरणीय असावे”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बदलणारे वातावरण
  • ख्रिस्ती मंडळीवर परिणाम होतो
  • ओढलेला आणि भुलविलेला
  • प्रतिकार करण्याची गुरूकिल्ली
  • सर्वांसाठी सामान्य परीक्षा
  • आजच्या जगातही यशस्वी वैवाहिक जीवन शक्य आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • यहोवाच्या साहाय्यानं आपल्या विवाहाचं रक्षण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • “लग्न सर्वस्वी आदरणीय असावे”
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
  • विवाह मोडण्याच्या बेतात असल्यास
    कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
w93 ५/१ पृ. १८-२३

“लग्न सर्वस्वी आदरणीय असावे”

“लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंथरूण निर्दोष असावे.”—इब्रीयांस १३:४. मराठी रिव्हाईज्ड रेफरन्स

१. यशस्वी विवाहासंबंधी काही लोक काय शिकले आहेत?

आज घटस्फोटास साधारण समजल्या जाणाऱ्‍या या युगात लाखो लोकांनी त्यांचा विवाह आनंदाने टिकवून ठेवला आहे. भिन्‍न व्यक्‍तिमत्त्व आणि पार्श्‍वभूमी असतानाही त्यांना यशाचे सूत्र सापडले आहे. असे विवाह यहोवाच्या साक्षीदारांमध्ये पाहायला मिळतात. पुष्कळ बाबतीत चढउताराचा अनुभव आला, तसेच एकदुसऱ्‍याविरूद्ध तक्रार करण्याची कारणेही घडलेली होती हे ते मान्य करतात. तरीसुद्धा क्षुल्लक वैवाहिक समस्यात ते तग धरुन राहण्यास शिकले व आपल्या विवाहरुपी जहाजास आता ते योग्य दिशेने जाऊ देत आहेत. त्यांना पुढे जाण्यास मदत करणाऱ्‍या कोणत्या काही गोष्टी आहेत?—कलस्सैकर ३:१३.

२. (अ) विवाहास बळकट करण्यासाठी काही गोष्टी कोणत्या आहेत? (ब) विवाहास उलथून पाडणाऱ्‍या काही गोष्टी कोणत्या आहेत? (पृष्ठ २० वरील पेटी पहा.)

२ काहींनी असे विवेचन केले की त्यांचे ख्रिस्ती विवाह आनंदी तसेच टिकाऊ ठेवणे ज्यामुळे शक्य झाले आहे, याबद्दल दिल्या गेलेल्या विवेचनावरून पुष्कळ काही प्रकट होते. विवाहास १६ वर्षे झालेल्या एका पतीने म्हटलेः “कोणत्याही वेळी समस्या आली असता, आम्ही एकदुसऱ्‍याचे विचार ऐकण्यासाठी प्रयत्न करतो.” ‘ही, अनेक विवाहातील एक मजबूत गोष्ट ठळकपणे मांडते—उघडपणे, मोकळ्या मनाने केलेले दळणवळण. जिच्या विवाहास ३१ वर्षे झाली होती अशा एका पत्नीने म्हटलेः “हात धरणे आणि प्रणय आमच्यातच ठेऊन मजा करणे याला आम्ही नेहमी प्राधान्य देतो.” आणि ही देखील दळणवळणाची आणखी एक गोष्ट आहे. त्यांच्या विवाहाला जवळजवळ ४० वर्षे झालेल्या जोडप्याने, विनोद समजण्याच्या कुवतेचे महत्त्व किंवा स्वतःशीच व आपसाकडे पाहून हसणे याची स्पष्टता केली. त्यांनी आणखी असे म्हटले की, एकदुसऱ्‍यात त्यामुळे गुण आणि अवगुण पाहण्यास आणि तसेच निष्ठावान प्रीती दाखविण्यास मदत मिळू शकली. पतीने स्वेच्छेने चूका कबूल करुन क्षमा मागणे हे सांगितले. नमते घेणारा आत्मा असतो तेव्हा विवाह मोडण्यापेक्षा लवचिकपणा त्यात येतो.—फिलिप्पैकर २:१-४; ४:५, किंगडम इंटरलिनियर.

बदलणारे वातावरण

३, ४. विवाहातील इमानीपणाबद्दल मनोवृत्तीत कोणता बदल घडून आला आहे? तुम्ही उदाहरण देऊ शकता का?

३ संपूर्ण जगभरात मागील काही दशकामध्ये, विवाहाकडे इमानीपणाने पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. काही विवाहित लोकांचा असा विश्‍वास आहे की एखाद-दुसरी बाहेरची लफडी चालण्याजोगी आहेत आणि वैवाहिक सोबत्याला याची कल्पना आहे व तो किंवा ती तशी मान्यताही देत असेल तर ते निश्‍चितच चालण्याजोगे आहे. अशाप्रकारे ही लफडी म्हणजेच व्यभिचाराचे सौम्यीकरण होय.

४ एका ख्रिस्ती पर्यवेक्षकाने परिस्थितीविषयी असे भाष्य केलेः “जगाने नैतिक कायद्याप्रमाणे राहण्यासाठी गंभीरपणे प्रयत्न करण्याचे खरेपणाने सोडून दिले आहे. शुद्धाचरणाकडे आज जुनी वहिवाट या दृष्टीने पाहिले जाते.” महत्त्वाकांक्षी राजकारण, क्रिडा आणि मनोरंजन या क्षेत्रात ठळकपणे दिसणाऱ्‍या व्यक्‍ती नैतिकतेसंबंधाने असणाऱ्‍या पवित्र शास्त्रीय तत्त्वांचे उघडपणे उल्लंघन करतात तरी देखील अशा व्यक्‍तींना नेहमी प्रसिद्धी मिळत असते. कोणत्याही प्रकारचा नैतिक अपराध किंवा दुरुपयोग केल्यास कोणताही कलंक लावला जात नाही. उच्च वर्गीयामध्ये शुद्धता आणि सात्विकतेला क्वचितच मानले जाते. आणि ‘पळसाला पाने तीनच’ ह्‍या म्हणीप्रमाणे लोक अंधानुकरण करतात आणि देवाने धिक्कारलेल्या गोष्टींना ते चालू ठेवतात. पौलाने सांगितल्याप्रमाणेच ते आहेतः “ते बधिर झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातुरपणाच्या स्वाधीन केले.”—इफिसकर ४:१९; नीतीसूत्रे १७:१५; रोमकर १:२४-२८; १ करिंथकर ५:११.

५. (अ) व्यभिचाराबद्दल देवाचा काय दृष्टिकोन आहे? (ब) पवित्र शास्त्र “व्यभिचार” हा शब्द वापरते त्यात काय समाविष्ट आहे?

५ देवाचे दर्जे बदलले नाहीत. विवाह न करता नवरा बायकोप्रमाणे राहणे म्हणजे व्यभिचार करणे असे त्याचे मत आहे. विवाहातील बेईमानीपणा देखील व्यभिचारच आहे.a प्रेषित पौलाने स्पष्टपणे मांडलेः “अनीतिमान मनुष्याला देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हास ठाऊक नाही काय? फसू नका. जारकर्मी, मूर्तीपूजक, व्यभिचारी, चैनबाज, पुमैथूनकारी. . .यास देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आणि तुम्हापैकी कित्येक तसे होते; तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरविलेले असे झाला आहा.”—१ करिंथकर ६:९-११.

६. पौलाचे १ करिंथकर ६:९-११ मधील शब्दात कोणते उत्तेजन आम्हाला मिळते?

६ त्या शास्त्रवचनात पौलाने मांडलेला एक मुद्दा उभारणीकारक आहे, “तथापि तुम्हातील तसे होते. परंतु तुम्ही. . .धुतलेले असे झाला आहात.” होय, गतकाळात अनेक लोक जगाच्या “बेहद्द विषयविलासा”त ते पडले होते, ताळ्यावर येऊन त्यांनी येशूचा तसेच बलिदानाचा स्वीकार केला, आणि स्वतःला शुद्ध केले नैतिकतेने जीवन जगण्याची निवड केल्यामुळे त्यांनी देवाला संतुष्ट केले आणि परिणामात स्वतःही आनंद मिळविला.—१ पेत्र ४:३, ४, मराठी कॉमन लँग्वेज बायबल

७. “अनैतिक”तेच्या समजाविषयी कोणता मतभेद अस्तित्वात आहे, आणि याबाबत पवित्र शास्त्राचा काय दृष्टिकोन आहे?

७ दुसऱ्‍या बाजूला पाहता, अनैतिकतेची जगाने केलेली व्याख्या फारच क्षुल्लक प्रतीची आहे ती देवाच्या दर्जास जुळत नाही. एक डिक्शनरी “अनैतिक”तेची व्याख्या “नैतिकतेच्या विरुद्ध असणारे” अशाप्रकारे करते. आज “अस्तित्वात असलेली नैतिकता” जिचा अनैतिकता म्हणून पवित्र शास्त्र निषेध करते त्याकडे म्हणजे विवाहाआधी तसेच विवाहातील लैंगिक संबंधाच्या अतिरिक्‍त केलेल्या लैंगिक समागमाकडे दुर्लक्ष करते. होय, अनैतिकता ही देवाच्या नैतिक नियमाचे निंद्य उल्लंघन होय.—निर्गम २०:१४, १७; १ करिंथकर ६:१८.

ख्रिस्ती मंडळीवर परिणाम होतो

८. ख्रिस्ती मंडळीत असणाऱ्‍यांवर अनैतिकतेचा कसा प्रभाव होऊ शकतो?

८ अनैतिकता आज इतकी प्रचलित झाली आहे की तिचा प्रभाव ख्रिस्ती मंडळीत असणाऱ्‍यांवर होऊ शकतो. ती त्यांच्यावर मानहानिकारक दूरदर्शन कार्यक्रम, व्हिडीओ आणि बीभत्स वाचनाच्या साहित्याद्वारे मोठ्या व्यापकरितीने प्रभाव करु शकतो. जरी त्याचा परिणाम कमी ख्रिश्‍चनांवर घडला असला तरी हे मान्य करावेच लागेल की यहोवाच्या साक्षीदारांमध्ये ख्रिश्‍चनास साजेशी नसणारी कृत्ये आचरल्यामुळे व त्याबद्दल पश्‍चाताप न दाखवल्यामुळे ज्यांना बहिकृत करण्यात आले होते त्यांचा लैंगिक अनैतिकतेच्या काही प्रकाराशी संबंध होता. दुसरी चांगली बाजू पाहता, बहिकृत केलेल्या अनेकांनी शेवटी त्यांच्या चूका कबूल केल्या व शुद्ध जीवनक्रम सुरू केला व नंतर काही काळातच त्यांना मंडळीत पुन्हा घेतले गेले.—पडताळा लूक १५:११-३२.

९. सैतान बेसावध जनांना लबाडीने कसे फसवितो?

९ सैतान हा गर्जनाऱ्‍या सिंहासारखा असून तो बेसावध जनांना गिळंकृत करु पाहत आहे यात कोणताही संशय नाही. दर वर्षी त्याच्या योजना, किंवा “धूर्त कृत्ये” बेसावध जनांना फुसलावित आहे. त्याच्या जगात स्वार्थी आत्मा, कर्मवादी, आणि कामुक असणारा नेहमीच उपस्थित असतो. तो शरीराच्या लालसा पुऱ्‍या करतो. तो आत्मसंयमाचा विरोध करतो.—इफिसकर २:१, २; ६:११, १२, तळटीप (न्यू.व); १ पेत्र ५:८.

१०. मोहाला बळी कोण पडू शकतात आणि का?

१० अनैतिकतेच्या मोहाला मंडळीतील कोणाला उघड केले जाऊ शकते? बहुतेक ख्रिश्‍चन मग ते, स्थानिक मंडळीतील वडील असोत, फिरते पर्यवेक्षक, बेथेल सदस्य, प्रत्येक महिन्यात अनेक तास प्रचारकार्य केलेले पायनियर, कुटुंबाचा सांभाळ करणारे कार्यमग्न पालक, किंवा तरूण यांना त्याच्या समवयस्कांकडून दबाव येत राहतो. शारीरिक मोह सर्वांसाठी सारखाच आहे. फक्‍त जरी अपेक्षा केली तरी ते लैंगिक आकर्षणास सुरूवात करुन देते. यामुळे पौल लिहू शकलाः “यास्तव आपण उभे आहोत असे ज्यांस वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळा. मनुष्यास [आणि स्त्रियांना] सहन होते तिच्याशिवाय दुसरी परीक्षा तुम्हांवर गुदरली नाही.” हे शोचनीय आहे, परंतु तरी जबाबदार पदावर असणारे काही ख्रिश्‍चन अनैतिकतेच्या आमिषास बळी पडले आहेत.—१ करिंथकर १०:१२, १३.

ओढलेला आणि भुलविलेला

११-१३. ज्यांनी अनैतिकतेप्रत निरविले अशा काही परिस्थिती कोणत्या आहेत?

११ काहींना कोणत्या मोहाने व परिस्थितीने व्यभिचार आणि जारकर्म करण्यासाठी निरविले आहे? मोह आणि परिस्थिती अनेक आहेत आणि त्या किचकटही आहेत व देशादेशात किंवा संस्कृतीत याबाबतीत फरक असू शकतो. तथापि, अशी काही मुलभूत परिस्थिती जी थोडेबहुदा सर्वच देशात सारखीच असते. उदाहरणार्थ, काहींनी मादक पेये पिण्यावर कसलाही प्रतिबंध न ठेवणाऱ्‍या पार्ट्यांची आयोजना केली. असा अहवाल दिला आहे. काही जन अश्‍लील गोष्टींना चेतना देणारे संगीत आणि उद्‌क्षोभक नाच यांच्या आहारी गेले आहेत. आफ्रिकेच्या काही भागात, काही विश्‍वासात नसणारे—श्रीमंत लोक आहेत—ज्यांना काही रखेल्या आहेत; अशा परिस्थितीत जरी अनैतिकतेचा समावेश असला तरी आर्थिक सुरक्षितता मिळण्याची काही स्त्रियांना लालूच होते. काही भागात जीवनाच्या चरितार्थासाठी ख्रिस्ती पतीला त्यांच्या कुटुंबाला सोडून खाणीत किंवा इतर ठिकाणी काम करावे लागते. मग घरी असताना त्यांनी कधी अनुभव घेतला नसेल त्या निष्ठावंतपणा आणि इमानीपणाची परीक्षा घेतली जाते.

१२ समृद्ध देशात, अनेकदा तिऱ्‍हाईत व्यक्‍ती समोर नसताना विरुद्ध लिंगी व्यक्‍ती बरोबर राहिल्यामुळे काही सैतानाच्या जाळ्यात सापडले आहेत—जसे की कारमध्ये वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेताना चालकासोबत जी जवळीक मिळते ती.b वडिलांनी मेंढपाळकत्वाच्या भेटी घेताना बहिणीना सल्ला देताना एकटे न राहण्याबाबत खबरदारी घेतली पाहिजे. संभाषणाला भावनात्मक स्वरुपाचे वळण लागून दोघांसाठी त्याचा परिणाम अडचणीत सापडण्यात होऊ शकतो.—मार्क ६:७; प्रे. कृत्ये १५:४० पडताळा.

१३ वर उल्लेखिलेल्या परिस्थितीमुळे काही ख्रिश्‍चनांनी आपली दक्षता गमावली. आणि त्यांनी अनैतिक कृत्ये केली. पहिल्या शतकात देखील असेच झाले, त्यांनी स्वतःला ‘आपल्या वासनेने ओढलेले व भूलविलेले’ होऊ दिले, याने त्यांना पाप करण्याप्रत नेले.—याकोब १:१४, १५; १ करिंथकर ५:१; गलतीकर ५:१९-२१.

१४. व्यभिचाराच्या संबंधाने स्वार्थीपणा का मुलभूत गोष्ट आहे?

१४ बहिष्कृत प्रकरणांबद्दल काळजीपूर्वक केलेला विचार दाखवतो की अनैतिक कामात काही मुलभूत गोष्टी सामान्य आहेत. अशा या कामात स्वार्थीपणाचा काही अंश दिसतो. आम्ही असे का म्हणतो बरे? कारण व्यभिचाराच्या बाबतीत, एखाद्या निर्दोष व्यक्‍तीला किंवा व्यर्क्‍तिना दुःखित केले जाऊ शकते. तो कदाचित कायदेशीर पती वा पत्नी असेल. व्यभिचाराचा परिणाम घटस्फोटात झाल्यास, कौटुंबिक एकतेत सुरक्षितता इच्छिणाऱ्‍या मुलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. व्यभिचारी, त्याचा किंवा तिच्या सुखाचा आणि फायद्याचा विचार करीत असतात. तो स्वार्थीपणा आहे.—फिलिप्पैकर २:१-४.

१५. व्यभिचार करायला लावणारी काही कारणे कोणती आहेत?

१५ बहुधा, व्यभिचार अशक्‍तपणाचे अचानक केलेले कृत्य नाही. विवाहाचा हळुवारपणे, न जाणवताच, ऱ्‍हास होऊ लागलेला असतो. कदाचित दळणवळण नित्यक्रमाचे झाले असेल किंवा वायफळ बनले असेल. त्यात परस्परांच्या उत्तेजनाला वाव मिळाला नसेल. प्रत्येकजन एकदुसऱ्‍याची गुणग्राहकता बाळगण्यास अपयशी ठरला असेल. काही काळासाठी पती पत्नी लैंगिक गोष्टीत एकदुसऱ्‍याला तृप्त करीत नसतील. निश्‍चितच जेव्हा व्यभिचार केला जातो तेव्हा देवाबरोबरचे नातेसंबंध तुटत असतात. यहोवाला आमचे सर्व विचार आणि काम माहीत आहेत व तो जिवंत देव आहे असा विचार यापुढे राहत नाही. एवढेच नव्हे तर व्यभिचारीच्या मनात “देव” केवळ एक शब्द बनतो, तो नित्य जीवनाचा भाग म्हणून अस्तित्वात असणारी व्यक्‍ती नाही असे समजले जाते. मग देवाविरुद्ध पाप करण्यास अधिक सोपे जाते.—स्तोत्रसंहिता ५१:३, ४; १ करिंथकर ७:३-५; इब्रीयांस ४:१३; ११:२७.

प्रतिकार करण्याची गुरूकिल्ली

१६. अविश्‍वासूपणाच्या मोहाचा विरोध ख्रिस्ती कसा करु शकतात?

१६ जर कोणा ख्रिश्‍चनाने त्याला स्वतःला किंवा तिने स्वतःला अविश्‍वासूपणाच्या मार्गावर मोहीत झाल्याचे पाहिल्यास, कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे? सर्वात प्रथम, ख्रिस्ती प्रीती पूर्णपणे, पवित्र शास्त्राच्या तत्त्वांवर आधारीत आहे याचा विचार केला पाहिजे. स्वार्थीपणात लवकर पडून शारीरिक किंवा वैषयिक प्रेमास कधीही वरचढ होऊ देऊन इतरांना दुःख देऊ नये. उलटपक्षी, परिस्थितीचा यहोवाच्या दृष्टीकोनातून विचार केला पाहिजे. मंडळी, तसेच यहोवाच्या नावाचा वाईट कामामुळे अपमान केला जातो हे मंडळीच्या बाबतीत विचारात घेतले पाहिजे. (स्तोत्रसंहिता १०१:३) त्या संबंधी ख्रिस्ताचे मन धारण करून व त्यानुसार कार्य करुन विपत्ती टाळली जाऊ शकते. ख्रिस्तासारखी निःस्वार्थी प्रीती कधी खचत नाही हे लक्षात ठेवा.—नीतीसूत्रे ६:३२, ३३; मत्तय २२:३७-४०; १ करिंथकर १३:५, ८.

१७. विश्‍वासूपणाची कोणती उभारणीकारक उदाहरणे आम्हाजवळ आहेत?

१७ एखाद्याचा विश्‍वास व पुढे असलेली आशा दृढ करणे ही प्रतिकार करण्याची गुरूकिल्ली आहे. याचा अर्थ सात्विकता राखलेल्या गतकाळातील विश्‍वासू पुरूष व स्त्रिया तसेच स्वतः येशूने ठेवलेल्या उदाहरणास हृदयात सर्वोच्च ठिकाणी ठेवणे होय. पौलाने लिहिलेः “तर मग आपण आपल्या इतक्या साक्षीरूपी मेघाने वेढिलेले आहो म्हणून आपणही सर्व दडपण व सहज गुंतविणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. आपण आपल्या विश्‍वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याजकडे पाहत असावे; त्याजपुढे जो आनंद ठेवलेला होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. ज्याने आपणाविरुद्ध पाप करणाऱ्‍यांनी केलेला इतका विरोध सहन केला त्याची तुलना करा, म्हणजे तुमची मने खचून धीर सुटणार नाही.” (इब्रीयांस १२:१-३) तुटलेल्या जहाजरूपी विवाहापासून पलायन करण्यापेक्षा समजदार व्यक्‍ती ते खराब झालेले सुधरविण्याचा प्रयत्न करील, यास्तव लबाडी आणि दुटप्पीपणामुळे खड्डयात पडण्याचे टाळले जाऊ शकते.—ईयोब २४:१५.

१८. (अ) व्यभिचाराचे वर्णन करण्यासाठी फितुरी हा शब्द अधिक जोरदार का नाही? (ब) विवाहातील शपथा देण्याविषयी देव कोणता दृष्टिकोन राखतो?

१८ अनैतिकतेसंबंधी वापरलेला लबाडी म्हणजे फितुरी हा अधिक जोरदार शब्द आहे का? फितुरी म्हणजे भरवशाचा किंवा विश्‍वासाचा घात करणे होय. विवाहातील शपथांमध्ये चांगली आणि वाईट परिस्थिती असतानाही, किंवा चढउतारामध्ये प्रीती आणि काळजी घेण्याचा भरवसा व्यक्‍त करण्याचा निश्‍चितपणे समावेश असतो. ज्या काळात आम्ही राहात आहोत त्यात पुष्कळजन ज्याचा कालबाह्‍य असा विचार करतात त्याचा त्यात समावेश असतो—विवाहातील शपथेमध्ये दुसऱ्‍याला सन्मान बहाल करण्याची दिलेली कबुली. त्या भरवशाचा विश्‍वासघात करणे म्हणजे आपल्या सोबत्याशी फितुरी करणे होय. पवित्र शास्त्रात शपथांबद्दल देवाचा दृष्टिकोन स्पष्टपणे लिखित केलेला आहेः “तू देवाला नवस केला असल्यास तो फेडण्यास विलंब करु नको, कारण देव मूर्खावर प्रसन्‍न होत नसतो. जो नवस तू केला असेल त्याची फेड कर.”—उपदेशक ५:४.

१९. साक्षीदार जेव्हा अपयशी होतो तेव्हा सैतानाला प्रतिकूलरित्या कोणता आनंद होतो?

१९ याविषयी कोणताही संशय नसो. एका पाप्याच्या तारणामुळे जसा स्वर्गात मोठा आनंद होतो, तसाच एखादा यहोवाचा साक्षीदार त्याची किंवा तिची सात्विकता टिकवून ठेवण्यास अपयशी झाला तर पृथ्वीवरील सैतानाचा दृश्‍य आणि अदृश्‍य जमावास देखील मोठा आनंद होत असतो.—लूक १५:७; प्रकटीकरण १२:१२.

सर्वांसाठी सामान्य परीक्षा

२०. आम्ही मोहाचा विरोध कसा करु शकतो? (२ पेत्र २:९, १०)

२० अनैतिकता काही गोष्टीत अपरिहार्य आहे का? आमचा देह आणि सैतान एवढे शक्‍तीशाली आहेत का की जेणेकडून ख्रिश्‍चन त्याचा विरोध करुन सात्विकता टिकवू शकत नाही? पौल या शब्दात सांत्वन देतोः “देव विश्‍वासपात्र आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्‍तीपलीकडे होऊ देणार नाही तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपाय करील असे की तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे.” आजच्या जगात सर्वच परीक्षांना आम्ही टाळू शकत नाही. परंतु देवाकडे प्रार्थना करून आम्ही जरूर कोणत्याही परीक्षेत विजयी होऊन आणि त्यावर मात करू शकू.—१ करिंथकर १०:१३.

२१. आमच्या पुढील अभ्यासात कोणत्या प्रश्‍नांची उत्तरे दिली जातील?

२१ परीक्षेत धीर धरून विजयी होण्यासाठी देव कोणती मदत आम्हाला पुरवितो? आमचा विवाह, आमचे कुटुंब, तसेच यहोवाचे नाव आणि मंडळीची प्रतिष्ठा यांचे संरक्षण करण्यासाठी आम्हा वैयक्‍तिकाला कशाची गरज आहे? आमचा पुढील लेख या प्रश्‍नांची चर्चा करील.

[तळटीपा]

a “‘व्यभिचार’ याचा व्यापक अर्थ, तसेच मत्तय ५:३२ व १९:९ मध्ये त्याचा केलेला वापर, बेकायदेशीर किंवा विवाहाबाहेरील अवैध लैंगिक संबंधाला सूचित करतो. पोर्निआ [त्या वचनात वापरलेला ग्रीक शब्द] यात फाजीलपणे एक व्यक्‍तिच्या (स्वाभाविक किंवा दुरूपयोगी रितीने) जनन लिंगाचा वापर करणे; तसेच, स्त्री किंवा पुरूष किंवा पशु—अनैतिकतेच्या आचारात सहभागी होणारा असू शकतो.” (द वॉचटावर, मार्च १५, १९८३, पृष्ठ ३०) व्यभिचारः “वैवाहिक व्यक्‍ती आणि कायदेशीर पती किंवा पत्नीशिवाय इतर कोणाशी तरी स्वेच्छेने केलला लैंगिक समागम.”—द अमेरिकन हेरीटेज डिक्शनरी ऑफ द इंग्लिश लँग्वेज.

b अर्थातच, काही उचित प्रसंग असतील जेव्हा बहिणीला स्वतःच्या वाहनावर नेण्याची व्यवस्था बांधव करू शकतात, आणि अशा परिस्थितीत गैरसमज होऊ देता कामा नये.

तुम्हाला आठवते का?

▫ विवाहास दृढ करण्यासाठी काही गोष्टी कोणत्या आहेत?

▫ जगाने नैतिक बाबतीत घेतलेला दृष्टिकोन आम्ही का टाळला पाहिजे?

▫ अनैतिकतेकडे कोणता मोह व परिस्थिती आम्हाला निरवू शकते?

▫ पापाचा विरोध करण्याची कोणती गुरूकिल्ली आहे?

▫ मोहाच्या प्रसंगी देव आमची कशी मदत करतो?

[२० पानांवरील चौकट]

टिकाऊ विवाहातील सर्वसाधारण गोष्टी

▫ पवित्र शास्त्रीय तत्त्वांना चिकटून राहणे

▫ दोन्ही सोबत्यांचा यहोवाबरोबर दृढ नातेसंबंध पाहिजे

▫ पतीने त्याच्या पत्नीचा, तिच्या भावनांचा आणि तिच्या विचारांचा आदर करावा

▫ दैनंदिन आधारावर चांगले दळणवळण

▫ एकदुसऱ्‍यांना संतुष्ट करण्याचा शोध घेत राहा

▫ विनोदी असणे; स्वतः मुळे हसणे

▫ चुका स्वेच्छेने कबुल करा; स्वेच्छेने क्षमा करा

▫ प्रणयास जिवंत ठेवा

▫ मुलांचे संगोपन करण्यास व त्यांना शिक्षा देण्यास एक विचारी असा

▫ यहोवाला नियमितपणे प्रार्थना करण्यामध्ये एकत्र या

विवाहास बिघडविणाऱ्‍या नकारात्मक गोष्टी

▫ स्वार्थीपणा आणि हट्टीपणा

▫ एकत्र मिळून गोष्टी करण्यामध्ये मागे पडणे

▫ अपुरे दळणवळण

▫ नवरा-बायकोत अपुरा विचारविनिमय

▫ पैशाचे अपुरे व्यवस्थापन

▫ मुलांना किंवा सावत्र मुलांना सांभाळण्यामध्ये होणारे मतभेद

▫ पती, उशीरापर्यंत काम करणे किंवा इतर कामांसाठी कुटुंबाकडे दूर्लक्ष करणे

▫ कुटुंबाच्या आध्यात्मिक गरजांची काळजी वाहण्यामध्ये मागे पडणे

[२१ पानांवरील चित्रं]

विवाहास आदरणीय ठेवल्याने दीर्घकालीन आनंद मिळतो

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा