वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w93 ५/१ पृ. १२-१७
  • ईश्‍वरी अधीनता आमच्याकडून काय अपेक्षिते

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरी अधीनता आमच्याकडून काय अपेक्षिते
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • चांगला विवेक बाळगणे
  • देवाच्या संघटनेला अधीनता
  • शिस्तीचा स्वीकार करणे
  • वरिष्ठ अधिकाऱ्‍यांना अधीनता
  • कौटुंबिक वर्तुळात ईश्‍वरी अधीनता
  • ईश्‍वरी अधीनता प्रकट करण्यासाठी मदत
  • ईश्‍वरी अधीनता प्रदर्शित केल्यामुळे मिळणारे फायदे
  • ईश्‍वरी अधीनता—का आणि कोणाकरवी?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • पत्नीची अधीनता—म्हणजे नेमके काय?
    सावध राहा!—१९९७
  • तुम्ही कोणाच्या अधिकाराला ओळखले पाहिजे?
    सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
  • पत्नींनो—आपल्या पतींचा मनापासून आदर करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
w93 ५/१ पृ. १२-१७

ईश्‍वरी अधीनता आमच्याकडून काय अपेक्षिते

“यास्तव देवाच्या अधीन व्हा.”—याकोब ४:७.

१. आम्ही ज्या देवाची भक्‍ति करत आहोत त्याच्या बद्दल काय म्हटले जाऊ शकते?

यहोवा हा केवढा अद्‌भुत देव आहे! तो कितीतरी प्रकारात अद्वितीय, अतुल्य, अतुलनीय आणि अप्रतिम असा आहे! तो सर्वसमर्थ, विश्‍वाचा सार्वभौम, आणि सर्व गोष्टींचा हक्कदार आहे. तो अनादिकालापासून अनंतकाळापर्यंत आहे, तसेच इतका दैदिप्यमान आहे की, त्याला पाहून कोणा माणसाला जिवंत राहता येणे शक्य नाही. (निर्गम ३३:२०; रोमकर १६:२६) तो ज्ञान व सामर्थ्य यात अमर्याद असून न्यायात सर्वतोपरि पूर्ण आहे आणि प्रेमाचे व्यक्‍तीत्वच आहे. तो आमचा निर्माणकर्ता, न्यायाधीश, नियंता, आणि राजा आहे. प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान त्याच्याकडून येते.—स्तोत्रसंहिता १००:३; यशया ३३:२२; याकोब १:१७.

२. ईश्‍वरी अधीनतेते कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत?

२ या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर यहोवा देवाच्या अधीन राहणे हे आमच्याच भल्याचे आहे यात कसलाही प्रश्‍न राहात नाही. पण यात आमच्यासाठी काय गोवलेले आहे? पुष्कळशा गोष्टी. यहोवा देवास आम्ही व्यक्‍तिगतरित्या पाहू शकत नाही तर त्याच्या अधीन राहणे म्हणजे प्रशिक्षित विवेकाचे ऐकणे, देवाच्या पार्थिव संघटनेला सहकार्य देणे, प्रापंचिक अधिकाऱ्‍यांना ओळखणे, व कौटुंबिक वर्तुळात मस्तकपदाचा सन्मान करणे या गोष्टी समाविष्ट आहेत.

चांगला विवेक बाळगणे

३. चांगला विवेक असण्यासाठी कोणत्या निषेदात्मक गोष्टींना आज्ञाधारक असले पाहिजे?

३ चांगला विवेक बाळगण्यासाठी आपण, अमलात आणता न येण्याजोग्या—म्हणजेच ज्यांना लागू करण्याची जबरदस्ती मानवांना करता येत नाही अशा, नियमांना वा तत्त्वांना आज्ञाधारक असले पाहिजे. उदाहरणार्थ, लोभाविरुध्द असलेली, दशांज्ञामधली दहावी आज्ञा, मानवी अधिकाऱ्‍यांना लागू न करता येण्यासारखी होती. जाता जाता लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, नियमभंग केल्यास शिक्षेत ज्या नियमाची अमलबजावणी करता येत नाही. असा नियम कोणत्याही मानवी विधिमंडळाने केला नसता. यावरुन दहा आज्ञांचा दैवी उगम सिद्ध होतो. या नियमाने यहोवा देवाने प्रत्येक इस्राएली व्यक्‍तिला चांगला विवेक हवा असल्यास स्वत:वर ताबा ठेवण्याची जबाबदारी दिली. (निर्गम २०:१७) तद्वत, देवाच्या राज्याचे वतन प्राप्त करण्यास मज्जाव करणाऱ्‍या देहाच्या कर्मांमधील “मत्सर” आणि “हेवा” ही आहेत. मानवी न्यायाधीशांना शिक्षेची अमंलबजावणी करता न येण्याजोग्या या प्रतिक्रिया आहेत. (गलतीकर ५:१९-२१) परंतु चांगला विवेक बाळगण्यासाठी आपण यांना टाळलेच पाहिजे.

४. चांगला विवेक असण्यासाठी पवित्र शास्त्राच्या कोणत्या तत्त्वांनुसार आम्ही चालले पाहिजे?

४ होय, आम्ही पवित्र शास्त्र तत्त्वांनुसार जीवन व्यतित केले पाहिजे. अशी तत्त्वे दोन आज्ञामध्ये थोडक्यात सांगितली जाऊ शकतात, ज्यांच्याबद्दल येशूला विचारण्यात आले की, मोशेच्या नियमांत सर्वात मोठी आज्ञा कोणती तेव्हा त्याने दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटलेः “तू आपला देव [यहोवा न्यू.व] परमेश्‍वर याजवर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति कर.  . . तू आपल्या शेजाऱ्‍यांवर आपल्यासारखी प्रीति कर.” (मत्तय २२:३६-४०) ह्‍या आज्ञांमध्ये आणखी काय गोवलेले आहे ते मत्तय ७:१२ मध्ये येशूच्या शब्दांमध्ये दृष्टांतरुपाने अशाप्रकारे दिसते: “ह्‍याकरिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र व संदेष्टग्रंथ हेच आहे.”

५. यहोवा देवाबरोबर आम्ही चांगले नातेसंबंध कसे ठेऊ शकतो?

५ जे बरोबर आहे ते आम्ही केले पाहिजे व कोणी पाहो अगर न पाहो, जे चुकीचे आम्हाला माहीत आहे ते आम्ही करु नये. हे अशासाठी की, जे करावयाचे असते पण ते करण्याची आम्ही टाळाटाळ केली किंवा जे करु नये ते करीत असलो तरी जरुरीचे आहे. याचा अर्थ की आपल्या स्वर्गीय पित्याबरोबर चांगला नातेसंबंध जोडणे व प्रेषित पौलाने इब्री ४:१३ मध्ये दिलेला सल्ला लक्षात ठेवणे की: “आणि त्याच्या दृष्टीला अदृश्‍य अशी कोणतीही निर्मिती नाही, तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रगट आहे.” योग्य ते करण्यासाठी आम्ही झटलो तर ते दियाबलाच्या कावेबाज युक्त्यांबरोबर झगडण्यासाठी मदत करील, जगाच्या दबावाचा प्रतिकार करु शकतो आणि वारशाने मिळालेल्या स्वार्थीपणाकडे झुकलेला आमचा कल या विरुद्ध आम्ही लढू शकतो.—पडताळा इफिसकर ६:११.

देवाच्या संघटनेला अधीनता

६. ख्रिश्‍चनांच्या काळाधी, यहोवाने दळणवळणाच्या कोणत्या मार्गांचा उपयोग केला?

६ आमच्या जीवनात व्यक्‍तिगतपणे आम्ही पवित्र शास्त्रीय तत्त्वांना कसे लागू करावे याचा निर्णय घेण्यासाठी यहोवा देवाने संपूर्णतया आम्हांवर सोपविलेले नाही. मानवजातीच्या इतिहासाच्या सुरवातीपासूनच, देवाने मानवांचा दळणवळण करण्याचा मार्ग असा उपयोग केला आहे. यास्तव, आदाम हव्वेकरीता देवाच्या वतीने बोलणारा असा होता. हव्वेला निर्माण करण्याआधी मना केलेल्या फळाची आज्ञा आदामाला दिली होती, तर मग देवाची इच्छा तिच्याबद्दल काय आहे हे त्याने तिला कळविले असेल. (उत्पत्ती २:१६-२३) नोहा त्याच्या कुटुंबासाठी व प्रलयकाळापूर्वीच्या जगासाठी देवाचा संदेष्टा होता. (उत्पत्ती ६:१३; २ पेत्र २:५) अब्राहाम त्याच्या कुटुंबासाठी देवाच्या वतीने बोलणारा होता. (उत्पत्ती १८:१९) इस्राएल राष्ट्रासाठी देवाचा संदेष्टा व दळणवळणाचा मार्ग म्हणजे मोशे होय. (निर्गम ३:१५, १६; १९:३, ७) त्याच्या नंतर बाप्तिस्मा करणारा योहान याच्यापर्यंत त्याच्या लोकांबरोबर त्याच्या इच्छेचे दळणवळण करण्यासाठी देवाने पुष्कळ संदेष्टे, याजक व राजे यांचा उपयोग केला.

७, ८. (अ) मशीहाच्या आगमनानंतर, देवाच्या वतीने बोलणारे म्हणून कोणाचा उपयोग केला गेला? (ब) ईश्‍वरी अधीनता आज यहोवाच्या साक्षीदारांकडून काय अपेक्षिते?

७ मशीहा, येशू ख्रिस्त ह्‍याच्या आगमनाने देवाने त्याचा व त्याच्या शिष्यांचा व प्रेषितांचा त्याच्या वतीने बोलण्यासाठी उपयोग केला. नंतर, येशू ख्रिस्ताच्या विश्‍वासू अभिषिक्‍त अनुयायांना यहोवाच्या लोकांनी पवित्र शास्त्रीय तत्त्वे त्यांच्या जीवनात कसे लागू केले पाहिजेत ते सांगण्यासाठी “विश्‍वासू आणि बुद्धिमान दास” म्हणून काम करावयाचे होते. ईश्‍वरी अधीनतेचा अर्थ यहोवा देव उपयोग करीत असलेल्या साधनाला ओळखणे असा होत होता.—मत्तय २४:४५-४७; इफिसकर ४:११-१४.

८ यहोवाच्या साक्षीदारांसोबत “विश्‍वासू आणि बुद्धिमान दास” संगतीत आहेत व साक्षीदारांचे नियमन मंडळ याचे प्रतिनिधीत्व करतात अशी परिस्थिती स्पष्ट दाखविते. मग ते मंडळ, हे कार्य स्थानिक पातळीच्या मार्गदर्शनासाठी वेगवेगळ्या क्षमतेनुसार पर्यवेक्षकांची नियुक्‍ती करते—जसे की वडील आणि फिरते प्रतिनिधी. इब्री १३:१७च्या अनुषंगाने प्रत्येक साक्षीदाराने ह्‍या पर्यवेक्षकांच्या अधीन राहणे ईश्‍वरी अधीनतेसाठी जरुरी आहे: “आपल्या अधिकाऱ्‍यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा, कारण आपणांस हिशोब द्यावयाचा आहे हे समजून ते तुमच्या जिवांची राखण करितात. ते त्यांना आनंदाने करता यावे, कण्हत नव्हे; तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही.”

शिस्तीचा स्वीकार करणे

९. ईश्‍वरी अधीनतेत काय समाविष्ट आहे?

९ पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्‍यांकडून शिस्तीचा स्वीकार करणे ही ईश्‍वरी अधीनतेची बाब होय. जर आम्ही स्वत:ला नेहमी योग्य शिस्त लावली नाही तर, आमच्या मंडळीच्या वडिलांकडून, ज्यांना अनुभव व अधिकार आहे त्यांकडून शिस्त मिळण्याची गरज असेल. अशा शिस्तीचा स्वीकार करणे म्हणजे सुज्ञतेचे काम ठरेल.—नीतीसूत्रे १२:१५; १९:२०.

१०. शिस्तीचा अवलंब करणाऱ्‍यांवर कोणते बंधन आहे?

१० शिस्तीचा अवलंब करणाऱ्‍या वडिलांनी देखील स्वतः ईश्‍वरी अधीनता प्रदर्शित केली पाहिजे. ते कसे करता येईल? गलतीकर ६:१ नुसार ते सल्ला देण्याच्या त्याच पद्धतीनुसारच नव्हे तर उदाहरणशील राहण्याद्वारे देखील दाखवली पाहिजे. ते वचन म्हणतेः “बंधुजनहो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहा ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा; तूही परिक्षेत पडू नये म्हणून स्वत:कडे लक्ष दे.” दुसऱ्‍या शब्दात सांगायचे म्हणजे वडिलांचा सल्ला त्यांच्या उदाहरणाप्रमाणे असला पाहिजे. २ तीमथ्य २:२४, २५ तसेच तीत १:९ नुसार हा सल्ला पाहिजे. होय, सल्ला देणारे किंवा चूक दर्शवणारे कठोर होऊ नयेत याची खबरदारी घेतली पाहिजे. ते सौम्य, दयाळू व देवाच्या वचनातील तत्त्वांना उंचावून धरण्यास दृढ असले पाहिजे. त्यांनी निपक्षपाती ऐकणारे असले पाहिजे, जे कष्टी आणि भाराक्रांत लोक आहेत अशांना तजेला देणारे असले पाहिजे.—पडताळा मत्तय ११:२८-३०.

वरिष्ठ अधिकाऱ्‍यांना अधीनता

११. प्रापंचिक अधिकाऱ्‍यांबरोबर ख्रिश्‍चनांनी कसे वागण्याची गरज आहे?

११ ईश्‍वरी अधीनता आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या अधीन राहण्याची मागणी करते. रोमकर १३:१ मध्ये आम्हाला सल्ला दिला आहे: “प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या अधीन असावे; कारण देवापासून नाही असा अधिकार नाही, जे अधिकारी आहेत ते देवापासून नेमलेले आहेत.” प्रेषित पौलाने रोमकर १३:७ मध्ये म्हटल्यानुसार हे शब्द आम्हाला इतर गोष्टीं सोबत रहदारीचे नियम पाळणे, प्रामाणिकपणे कर व जकात भरणे यांची मागणी करते.

१२. कैसराला आमची अधीनता कोणत्या अर्थाने सापेक्ष आहे?

१२ अर्थात, कैसराला दाखवली जाणारी ही अधीनता सापेक्ष आहे. येशूने मत्तय २२:२१ मध्ये तत्त्व सांगितले, त्याकडे नेहमी लक्ष द्यावेः “कैसराचे ते कैसराला,” पण “देवाचे ते देवाला भरून द्या.” ऑक्सफर्ड एनआयव्ही [न्यू इंटरनॅशनल वर्जन] स्कोफिल्ड स्टडी बायबल या पुस्तकाच्या तळटीपेने रोमकर १३:१ विषयी असे म्हटले: “ह्‍याचा अर्थ हा होत नाही की त्याने अनैतिक किंवा ख्रिस्ती विरोधी नियमांचे पालन केलेच पाहिजे. अशा बाबतीत त्याची जबाबदारी आहे की त्याने मानवाच्या नियमांच्या ऐवजी देवाच्या नियमांचे पालन करावे. (प्रे. कृत्ये ५:२९; cp. दानीएल ३:१६-१८; ६:१० ff).”

कौटुंबिक वर्तुळात ईश्‍वरी अधीनता

१३. कौटुंबिक वर्तुळातील सदस्यांकडून ईश्‍वरी अधीनता काय अपेक्षिते?

१३ कौटुंबिक वर्तुळात, पती हा पिता व मस्तकाची भूमिका पार पाडतो. यामुळे इफिसकर ५:२२, २३ मध्ये दिलेला सल्ला पत्नींनी पाळावा: “स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपआपल्या पतीच्या अधीन असा, कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे.”a मुलांच्या बाबतीत बघता, त्यांना स्वतःचेच नियम बनवण्याची आज्ञा नाही तर पिता व माता या दोघांच्या आज्ञा मानून त्यांच्या अधीन राहण्याची अपेक्षा आहे, जसे पौलाने इफिसकर ६:१-३ मध्ये म्हटले: “मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई-बापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे, ‘आपला बाप व आई यांचा मान राख,’ (ही पहिली वचनयुक्‍त आज्ञा आहे); यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायु असावे.”

१४. कौटुंबिक मस्तकांकडून ईश्‍वरी अधीनता काय अपेक्षिते?

१४ निश्‍चितच, जेव्हा पती आणि पिता स्वत: ईश्‍वरी अधीनता दाखवतात, तेव्हा ते पत्नींना व मुलांनाही ईश्‍वरी अधीनता दाखवण्यासाठी सहज होते. इफिसकर ५:२८, २९ आणि ६:४ मधील पवित्र शास्त्रीय तत्त्वांचे पालन करीत ते त्यांचे मस्तकपद चालवतातः “त्याचप्रमाणे पतींनी आपआपली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीति करावी जो आपल्या पत्नीवर प्रीति करितो तो स्वत:वरच प्रीति करतो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही; तर तो त्याचे पालनपोषण करितो; जसे ख्रिस्तही मंडळीचे पालनपोषण करितो तसे तो करितो.” “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका; तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.”

ईश्‍वरी अधीनता प्रकट करण्यासाठी मदत

१५. ईश्‍वरी अधीनता व्यक्‍त करण्यासाठी आत्म्याचे कोणते फळ आम्हाला मदत करील?

१५ या विविध प्रकारात ईश्‍वरी अधीनता दाखवण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला साहाय्यक ठरेल? पहिली गोष्ट, निस्वार्थ प्रेम—यहोवा देव व ज्यांना आम्हावर देखरेख करण्याची नियुक्‍ती मिळाली आहे अशांबद्दल प्रेम राखणे. या कारणास्तव आम्हाला १ले योहान ५:३ मध्ये सांगितले आहेः “देवावर प्रीती करणे म्हणजे आपण त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.” येशूने देखील हाच मुद्दा योहान १४:१५ मध्ये असे बोलून स्पष्ट केलाः “माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल.” खरेच, आत्म्याच्या फळातील सर्वात प्रथम प्रेम—यहोवाने आमच्यासाठी जे काही केले त्याबद्दल गुणग्राहकता दाखवण्यासाठी तसेच ईश्‍वरी अधीनता उपयोगात आणण्यासाठी मदत करील.—गलतीकर ५:२२

१६. ईश्‍वरी अधीनता दाखवण्यासाठी ईश्‍वरी भय कोणते मदत देते?

१६ दुसरी गोष्ट, ईश्‍वरी भय हे आहे. यहोवास असंतुष्ट करण्याबद्दल भय बाळगणे हे आमची मदत करील, कारण त्याचा अर्थ “दुष्कर्मांचा द्वेष करणे होय.” (नीती. ८:१३) यहोवाला असंतुष्ट करण्याची भीती, आम्हाला माणसांची भीती सामोरी आली असता त्यात हातमिळवणी करण्यापासून निश्‍चये दूर राखील. कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागला तरी देवाच्या नियमांचे पालन करण्यासाठी ते आम्हाला मदत करील. पुढे, दुष्कृत्ये करण्याच्या प्रलोभनापासून व नमते घेण्यापासून ते आम्हाला दूर राखील. शास्त्र वचने दाखवतात की यहोवाच्याच भयामुळे अब्राहामने त्याचा प्रिय पुत्र इसहाक याचे बलिदान करण्यास प्रवृत्त झाला, तसेच, पोटीफरच्या बायकोच्या अनैतिक कल्पनेपासून योसेफाला यशस्वीरित्या धिक्कारण्यासाठी ईश्‍वरी भयाने मदत केली.—उत्पत्ती २२:१२; ३९:९.

१७. ईश्‍वरी अधीनता व्यक्‍त करताना विश्‍वास कोणती भूमिका पार पाडतो?

१७ अधीन राहण्यामधील आम्हाला उपलब्ध असणारी तिसरी मदत म्हणजे,—यहोवा देवावारील विश्‍वास. विश्‍वासामुळेच आपण नीतीसूत्रे ३:५, ६मध्ये सांगितलेल्या सल्ल्याकडे लक्ष देऊः “तू आपल्या अगदी मनापासून [“अंतःकरणापासून,” न्यू.व.] परमेश्‍वरावर [यहोवा, न्यू.व.] भाव ठेव; आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” यहोवा देवावरील विश्‍वास आपल्याला, आपणावर अन्यायाने त्रास ओढवल्याचे दिसते तेव्हा खासपणे मदत देईल. उदाहरणार्थ, आमचा वंश, राष्ट्रीयत्व किंवा काही व्यक्‍तिगत झगड्यामुळे आपल्याबद्दल भेदभाव होत असल्याचे आम्हाला जाणवेल. कदाचित, आमची वडील किंवा उपाध्य सेवक म्हणून शिफारस करण्यात आली नसेल तेव्हा आम्हाकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष झाले आहे असे काहींना वाटण्याची शक्यता असते. अशावेळी सर्व गोष्टी आपल्या हाती घेण्यापेक्षा अशा प्रकरणात आम्ही यहोवावर त्याच्या नियुक्‍त वेळी सर्व गोष्टी यथास्थित होईपर्यंत विसंबून राहण्यास शिकले पाहिजे.—विलापगीत ३:२६.

१८. ईश्‍वरी अधीनता दाखवण्यासाठी चवथी मदत कोणती आहे?

१८ अधीन राहण्यासाठी आणखी एक उपलब्ध असणारी चवथी मदत ही नम्रता आहे. नम्र व्यक्‍तिला अधीन राहण्यास कोणतीही अडचण वाटत नाही, कारण ‘लीनतेने तो आपणापेक्षा इतरांना श्रेष्ठ मानतो.’ एक लीन व्यक्‍ति “कनिष्ठ” असण्यास इच्छितो. (फिलिप्यैकर २:२-४; लूक ९:२८) पण ज्याठायी नम्रता नाही असा गर्विष्ठ माणूस अधीन राहण्यास प्रतिकार दर्शवतो व त्याला तशा गोष्टीचा संताप वाटतो. अशा गर्विष्ठ लोकांबद्दल असे उचितपणे म्हटले गेले की, अशा लोकांचा टिकात्मक गोष्टींमुळे बचाव होण्यापेक्षा स्तुतिमुळे नाश होतो.

१९. वॉचटावर संस्थेच्या माजी अध्यक्षांनी नम्रतेचे कोणते चांगले उदाहरण मांडले आहे?

१९ नम्रतेचे तसेच ईश्‍वरी अधीनतेचे चांगले उदाहरण, एकदा वॉचटावर संस्थेचे अध्यक्ष ब्रदर रदरफोर्ड यांनी दाखवले. जर्मनीमध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या कामावर हिटलरने बंदी घातली होती तेव्हा बांधवांनी ब्रदर रदरफोर्ड यांना लिहून विचारले की, त्यांच्या येथे सभांना व कार्याला बंदी आहे तर त्यांनी काय करावे. त्यांनी ही गोष्ट बेथेल कुटुंबियांपुढे बोलून दाखवली व स्पष्टपणे म्हटले की, जर्मन बांधवांवर जो कडक निर्बंध हिटलरच्या सरकारने घातला होता ते पाहता त्यांना काय सांगावे ते त्यांना ठाऊक नाही. काय करावे याबद्दल कोणाला काही सांगायचे असेल तर ते आनंदाने ऐकून घेतील. किती तो नम्र आत्मा!b

ईश्‍वरी अधीनता प्रदर्शित केल्यामुळे मिळणारे फायदे

२०. ईश्‍वरी अधीनता दाखवल्याने कोणते आशीर्वाद परिणामित होतात?

२० आता आपण असे विचारु शकतो की, ईश्‍वरी अधीनता दाखवल्यामुळे आपल्याला कोणते लाभ मिळणार? आम्हाला खरेच पुष्कळ लाभ मिळू शकतात! जे ईश्‍वरशासित अधीनता नाकारतात अशांना लागून असलेली काळजी व नैराश्‍य यापासून आपला बचाव होतो. आम्ही यहोवासोबत चांगल्या नातेसंबंधाचा आनंद घेऊ शकतो. आम्हाला आमच्या ख्रिस्ती बांधवांचा उत्तम सहवास मिळतो. आम्ही जागतिक सरकार व अधिकाऱ्‍यांसोबत देखील कायद्यानुरुप व चांगला विवेकभाव राखून वागणूक ठेवू शकू. आम्हाला पती व पत्नी, पालक व मुले यांचे आनंदी कौटुंबिक जीवन अनुभवास येते. तसेच, ईश्‍वरी अधीनतेत राहील्याने, आपण नीतिसूत्रे २७:११ मध्ये दिलेल्या सूचनेच्या सहमतात राहू की: “माझ्या मुला, सूज्ञ होऊन माझे मन [“अंतःकरण,” न्यू.व.] आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्‍यास मी प्रत्त्युतर देईन.”

[तळटीपा]

a एका पायनियर सेवकाने आपल्या बायकोच्या प्रेमळ व आदरणीय पाठिंब्याची स्तुती एका अविवाहीत पायनियरजवळ केली. त्या अविवाहीत पायनियरने असा विचार केला की त्याच्या मित्राने त्याच्या बायकोच्या आणखी काही गुणांबद्दल सांगायला हवे होते. परंतु काही वर्षांनी जेव्हा त्या अविवाहीत पायनियरने विवाह केला, तेव्हा त्याने त्याच्या विवाहाच्या अत्यंत आनंदाचा मुख्य भाग त्याच्या बायकोचा प्रेमळ पाठिंबा आहे हे जाणले.

b पुष्कळ प्रार्थना व देवाच्या वचनाचा अभ्यास याद्वारे ब्रदर रदरफोर्ड यांना जर्मन बांधवांना कोणते उत्तर द्यावे ते अगदी स्पष्ट दिसले. ते हे होतेः काय करावे हे त्यांनी त्यांना सांगायचे नव्हते. त्यांच्याकडे देवाचे वचन आहे व तेच त्यांना एकत्र भेटण्याबद्दल व साक्षीकार्याबद्दल काय करावे ते सांगते. अशाप्रकारे, आमचे जर्मन बांधव भूमिगत झाले व त्यांनी एकत्र मिळणे व देवाचे नाव आणि त्याचे राज्य याबद्दल साक्ष देण्याविषयीच्या यहोवाच्या आज्ञेचे पालन केले.

उजळणीचे प्रश्‍न

▫ दळणवळणाचा मार्ग म्हणून देवाने कोणत्या लोकांचा उपयोग केला आहे, आणि त्याच्या सेवकांना त्या मार्गाबद्दल कोणते बंधन होते?

▫ ईश्‍वरी अधीनता कोणत्या विविध क्षेत्रात लागू होती?

▫ ईश्‍वरी अधीनता प्रदर्शित करण्यासाठी कोणते गुण आम्हाला मदत करतील?

▫ ईश्‍वरी अधीनतेचे कोणते आशीर्वाद परिणामित होतील?

[१४ पानांवरील चित्रं]

देवाने त्याच्या इच्छेचे लोकांबरोबर दळणवळण होण्यासाठी यरुशलेमच्या मंदिर संघटनेचा उपयोग केला

[१६ पानांवरील चित्रं]

आम्ही ईश्‍वरी अधीनता दाखवू शकतो अशी क्षेत्रे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा