वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w93 ५/१ पृ. २३-२८
  • विवाहात नवे व्यक्‍तिमत्त्व विकसित करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विवाहात नवे व्यक्‍तिमत्त्व विकसित करणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • विवाहातील दबावांचा सामना करणे
  • शक्‍तिला दृढ करा
  • वर्तनाची परस्परविरोधी उदाहरणे
  • वैवाहिक बंधन दृढ करा
  • आजच्या जगातही यशस्वी वैवाहिक जीवन शक्य आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • तुमच्या विवाहाची “तीनपदरी दोरी” जपा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • तुमच्या विवाहास टिकाऊ बंधन बनवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • विवाह—प्रेमळ देवाकडून मिळालेली देणगी
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
w93 ५/१ पृ. २३-२८

विवाहात नवे व्यक्‍तिमत्त्व विकसित करणे

“तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हावे आणि धार्मिकता व सत्याची पवित्रता यांनी युक्‍त असा देवानुरूप उत्पन्‍न केलेला नवा मनुष्य धारण करावा.”—इफिसकर ४:२३, २४.

१. विवाहाकडे क्षुल्लक दृष्टिने का पाहू नये?

विवाह म्हणजे एखाद्याने त्याच्या जीवनात उचलेले एक गंभीर पाऊल होय, यामुळे याला क्षुल्लक समजू नये. हे असे का बरे? कारण दुसऱ्‍या व्यक्‍तिबरोबरचा हा जीवनभरचा करार आहे. याचा अर्थ एखाद्याच्या संपूर्ण जीवनाची सहभागिता त्या व्यक्‍तिबरोबर करणे होय. तो करार योग्य असण्यासाठी काळजीपूर्वक निर्णयाची आवश्‍यकता असते. याचबरोबर ‘मनोवृत्तीत नवे होण्यास आणि नवे मनुष्यत्व घडविण्यास’ सकारात्मक प्रभाव होण्याची जरुरी असते.—इफिसकर ४:२३, २४; पडताळा उत्पत्ती २४:१०-५८; मत्तय १९:५, ६.

२, ३. (अ) वैवाहिक सोबत्याची सुज्ञपणे निवड करण्यासाठी कशाची जरुरी आहे? (ब) विवाहामध्ये कशाचा समावेश आहे?

२ देहाच्या प्रबळ वासनेत वाहवत जाऊन, विवाहासाठी घाई न करण्यासाठी चांगले कारण आहे. प्रौढ मनुष्यत्व आणि व्यक्‍तिमत्वाची वाढ होण्यास वेळेची गरज असते. काळाच्या अवधीत अनुभव आणि ज्ञान येत असते ज्यामुळे योग्य निर्णय घेण्यास ते आधारभूत ठरतात. यानंतर अनुरुप जीवनसाथीची निवड केल्याने मोठ्या प्रमाणात यश मिळत असते. एक स्पॅनिश म्हण अशी स्पष्टपणे सांगतेः “वाईट रितीने विवाह करण्यापेक्षा एकटे राहणे बरे”—नीतीसूत्रे २१:९; उपदेशक ५:२.

३ यशस्वी विवाहासाठी योग्य सोबती निवडणे हे साहजिक अत्यंत महत्त्वाचे आहे. याकरता शारीरिक आकर्षण आणि फाजील भावना व प्रणयाच्या दबावामुळे नव्हे तर ख्रिश्‍चनाने पवित्र शास्त्रीय मार्गदर्शकांचा उपयोग करण्यास हवा. विवाह म्हणजे दोन व्यक्‍तींचे एकत्र येणे यापेक्षा अधिक काही आहे. ते दोन व्यक्‍तित्वांचे एकत्र मिळणे, दोन वेगळे कुटुंब आणि शैक्षणिक पार्श्‍वभूमी, कदाचित दोन संस्कृती व भाषा यांचा समेट करते. जेव्हा दोन व्यक्‍ती विवाहामुळे एकत्र येतात तेव्हा तेथे जिव्हेचा योग्यरितीने वापर करण्याच्या गरजेला ते हाक देत असते, कारण बोलण्याच्या शक्‍तीने आम्ही एकतर हानी करु किंवा उभारणी करु शकतो. या सर्वांवरुन, ‘केवळ प्रभूमध्ये लग्न करा’ म्हणजे समविश्‍वासूबरोबर, या पौलाने दिलेल्या सल्ल्यात आम्ही त्याची सुज्ञता पाहू शकतो.—१ करिंथकर ७:३९; उत्पत्ती २४:१-४; नीतीसूत्रे १२:१८; १६:२४.

विवाहातील दबावांचा सामना करणे

४. विवाहामध्ये काहीवेळा मतभेद आणि मानसिक ताण का उद्‌भवतात?

४ चांगला पाया घातला असतानाही कधी मतभेद, दबाव आणि मानसिक ताण असण्याची वेळ येत असते. ही, कोणत्याही व्यक्‍तिला, विवाहित असो किंवा नसो दोहोंच्या बाबतीत सर्वसाधारण गोष्ट आहे. आर्थिक आणि आरोग्याच्या समस्येमुळे कोणत्याही संबंधात ताण आणला जातो. चांगल्या विवाहात देखील मनःस्थितीच्या बदलामुळे व्यक्‍तिमत्वात मतभेद होण्याकडे कल जातो. याकोबाने लिहिल्यानुसार, दुसरे कारण म्हणजे जिभेवर कोणीही पूर्ण ताबा ठेवू शकत नाहीः “आपण सगळेच पुष्कळ गोष्टींविषयी चूकतो. जर कोणी बोलण्यात चुकत नाही तर तो पूर्ण मनुष्य, तो सर्व शरीरही कह्‍यात ठेवण्यास शक्‍तिमान आहे. . .तशीच जिभही लहानसे अंग असून मोठ्या गोष्टीची फुशारकी मारते. पहा! किती थोडका विस्तव केवढ्या रानाला पेटवितो!”—याकोब ३:२, ५.

५, ६. (अ) गैरसमज निर्माण होतात तेव्हा कशाची जरुरी आहे? (ब) तुटलेले नातेसंबंध जोडण्यासाठी कशाची गरज आहे?

५ विवाहात तणाव निर्माण होतात, तेव्हा आम्ही परिस्थिती कशी आटोक्यात आणू शकतो? गैरसमजामुळे होणारे भांडण आणि त्यामुळे बिघडणारे नातेसंबंध आम्ही कसे टाळू शकतो? येथे मनाला प्रवृत्त करणारी शक्‍ती कार्य करते. ती कार्यप्रवर्तक शक्‍ती सकारात्मक किंवा नकारात्मक, उभारणीकारक आणि आध्यात्मिकतेला प्रवृत्त करणारी, किंवा मानहानीकारक, आणि दैहिक वासनांवर वर्चस्व गाजवणारी असू शकते. जर ही उभारणीकारक असेल, तर त्याचा उपयोग तुटलेल्या संबंधाचा समेट—घडला जाऊन त्याचा किंवा तिचा विवाह योग्य दिशेने जाण्यामध्ये होऊ शकेल. वादविवाद आणि मतभेदामुळे विवाहाचा अंत होऊ नये. तंग हवा काढून टाकली जाऊ शकते आणि पवित्र शास्त्रीय सल्ल्याचे अनुकरण केल्यामुळे एकमेकांचा आदर आणि समजूतदारपणा स्थापित केला जाऊ शकतो.—रोमकर १४:१९; इफिसकर ४:२३, २६, २७.

६ या परिस्थितीसंबंधाने पौलाचे शब्द अगदी उचित आहेतः “तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहा, म्हणून करुणायुक्‍त हृदय, ममता, नम्रभाव, लीनता, सहनशीलता ही अंगी ल्या. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्‍हाणे असल्यास आपसांत क्षमा करा. प्रभूने [यहोवा न्यू.व.] तुम्हांला क्षमा केली तशी तुम्हीही करा. पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वांवर अंगी ल्या.”—कलस्सैकर ३:१२-१४.

७. काहींच्या विवाहात कोणत्या समस्या आहेत?

७ ते वचन वाचण्यास फार सोपे आहे, पण आधूनिक जीवनातील दबावामुळे त्याचे अनुकरण करणे नेहमीच सोपे नसते. समस्याचे मूळ काय असले पाहिजे? काहीवेळा, अजाणतेत एखादा ख्रिस्ती दुहेरी जीवन जगत असेल. राज्यसभागृहात, बांधवासोबत असताना तो दयाळूपणे व विचारीपणाने वागतो. नंतर, घरी, घरगुती नित्यक्रमात, आध्यात्मिक संबंध विसरण्याकडे त्याचा कल जातो. आता फक्‍त पती आणि पत्नी, “तो” आणि “ती” आहे. तणावाखाली असताना तो (किंवा ती) राज्य सभागृहामध्ये कधीही न बोललेल्या निर्दयी गोष्टी ते बोलून जातो. काय झाले आहे? क्षणभर, त्याचे ख्रिस्ती मनुष्यत्व नाहीसे झाले. देवाचा सेवक हे विसरला की तो (किंवा ती) घरात देखील एक ख्रिस्ती बांधव व (किंवा बहीण) आहे. मनाला प्रवृत्त करणारी शक्‍ती सकारात्मक होण्याऐवजी नकारात्मक झाली.—याकोब १:२२-२५.

८. मनाला प्रवृत्त करणारी शक्‍ती नकारात्मक असल्यास तिचा काय परिणाम होतो?

८ याचा काय परिणाम दिसतो? पती ‘आपल्या पत्नीबरोबर ती अधिक नाजूक पात्र आहे म्हणून सुज्ञतेने सहवास ठेव’ण्याचे थांबवतो. पत्नी तिच्या पतीस आता आदर देत नसेल; तिचा “सौम्य व शांत आत्मा” गमावला आहे. मनाचे रुपांतर करणारी शक्‍ती आध्यात्मिकतेऐवजी शारीरिक झाली. “देहबुद्धी”ने याची जागा घेतली. तरमग ती प्रवृत्त करणारी शक्‍ती आध्यात्मिक आणि सकारात्मक ठेवण्यासाठी काय केले जाऊ शकते? आम्ही आमची आध्यात्मिकता दृढ केली पाहिजे.—१ पेत्र ३:१-४, ७; कलस्सैकर २:१८.

शक्‍तिला दृढ करा

९. दैनंदिन जीवनात कोणत्या निवडी आम्हाला कराव्या लागतात?

९ आम्हाला जेव्हा निर्णय व निवड करावी लागते तेव्हा प्रवृत्त करणारी शक्‍ती, मानसिक कल, कार्य करु लागते. जीवनात अनेक गोष्टीसंबंधी निवड करावी लागते—चांगले किंवा वाईट, स्वार्थी किंवा निःस्वार्थी, नैतिक किंवा अनैतिक. योग्य निर्णय घेण्यासाठी आम्हाला काय मदत करील? मनास प्रवृत्त करणारी शक्‍ती, यहोवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी जर केंद्रित असेल तरच. स्तोत्रकर्त्याने प्रार्थना केलीः “हे परमेश्‍वरा [यहोवा, न्यू.व.] तू आपल्या नियमांचा मार्ग मला दाखीव, म्हणजे तो मी शेवटपर्यंत धरुन राहीन.”—स्तोत्रसंहिता ११९:३३; यहेज्केल १८:३१; रोमकर १२:२.

१०. मनाला प्रवृत्त करणाऱ्‍या शक्‍तीला सकारात्मकरितीने आम्ही कसे दृढ करु शकतो?

१० यहोवाबरोबर असणारे दृढ नातेसंबंध त्याला संतुष्ट करण्यासाठी तसेच विवाहातील बेईमानीपणा सोबतच इतर वाईट गोष्टी करण्यापासून दूर राहण्यासाठी आम्हाला मदत करतील. इस्राएलांना, “तुझा देव परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] याच्या दृष्टिने जे चांगले व योग्य ते तू कर” असे उत्तेजन दिले होते. परंतु देवाने हा देखील सल्ला दिलाः “अहो परमेश्‍वरावर [यहोवा, न्यू.व.] प्रीती करणाऱ्‍यांनो वाईटाचा द्वेष करा.” “व्यभिचार करू नका,” या दहा आज्ञेतील सातव्या आज्ञेच्या अनुषंगाने इस्राएलांना व्यभिचाराचा द्वेष करावयाचा होता. त्या आज्ञेद्वारे विवाहात विश्‍वासूपणा राखण्याबद्दल देवाचा कडक दृष्टिकोन दिसून येतो.—अनुवाद १२:२८; स्तोत्रसंहिता ९७:१०; निर्गम २०:१४; लेवीय २०:१०.

११. आमच्या मनाला प्रवृत्त करणाऱ्‍या शक्‍तीला आम्ही आणखी मजबूत कसे करु शकतो?

११ मनाला प्रवृत्त करणाऱ्‍या शक्‍तीला आम्ही आणखी कसे दृढ करू शकतो? आध्यात्मिक कार्यहालचाली व मुल्यांची गुणग्राहकता बाळगण्याद्वारे आम्ही हे करु शकतो. याचाच अर्थ आम्ही देवाच्या वचनाचा नियमितपणे अभ्यास करण्याच्या गरजेला पूर्ण केले पाहिजे आणि यहोवाचे विचार व सल्ल्याची एकत्रितपणे आनंददायक चर्चा करण्यासाठी शिकले पाहिजे. आमच्या हृदयपूर्ण भावना स्तोत्रकर्त्याप्रमाणे असल्या पाहिजेतः “सर्व मनाने मी तुला शरण आलो आहे. तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नको. मी तुझ्याविरुद्ध पाप करु नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. हे परमेश्‍वरा [यहोवा, न्यू.व.] तू आपल्या नियमांचा मार्ग मला दाखीव. म्हणजे तो मी शेवटपर्यंत धरुन राहीन. मला बुद्धी दे म्हणजे मी तुझे शास्त्र पाळीन खरोखर पूर्ण मनोभावे ते मी पाळीन.”—स्तोत्रसंहिता ११९:१०, ११, ३३, ३४.

१२. ख्रिस्ताचे मन प्रदर्शित करण्यासाठी कोणत्या गोष्टी आम्हाला एक करतील?

१२ यहोवाच्या धार्मिक तत्त्वांबद्दल अशाप्रकारची गुणग्राहकता केवळ पवित्र शास्त्राचा अभ्यासच नाही तर ख्रिस्ती सभांमध्ये व ख्रिस्ती उपाध्यपणात नियमितपणे भाग घेण्याद्वारे देखील आम्ही दाखवू शकतो. हे दोन प्रबळ प्रभाव आमच्या मनाला प्रवृत्त करणाऱ्‍या शक्‍तीला नित्य दृढ करीत राहतील यामुळे आमच्या निःस्वार्थी जीवनाचा मार्ग नेहमी ख्रिस्ताचे मन प्रदर्शित करील.—रोमकर १५:५; १ करिंथकर २:१६.

१३. (अ) मनाला प्रवृत्त करणाऱ्‍या शक्‍तीला दृढ करण्यासाठी प्रार्थना ही बहुमोल गोष्ट का आहे? (ब) या संबंधाच्या अनुषंगाने येशूने कोणते उदाहरण प्रस्तुत केले?

१३ दुसरी गोष्ट पौलाने इफिसकरांना लिहिलेल्या त्याच्या पत्रात स्पष्ट केलीः “सर्व प्रकारे प्रार्थना व विनंती करा. सर्व समयी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करीत राहा.” (इफिसकर ६:१८) पती पत्नीने एकत्र मिळून प्रार्थना करण्याची गरज आहे. अनेकदा अशा प्रार्थना अंतःकरण मोकळे करतात व स्पष्ट संभाषण करण्यास निरवितात, यामुळे आपसातील फूट दूर केली जाते. परीक्षा आणि मोहाच्या प्रसंगी, ख्रिस्ताच्या मनाच्या सहमतात राहण्यासाठी आध्यात्मिक बळासाठी आम्ही प्रार्थनेत देवाकडे वळून मदत मागितली पाहिजे. परिपूर्ण मनुष्य येशू ख्रिस्ताने देखील बळ मिळण्यासाठी अनेक प्रसंगी पित्याला प्रार्थना केली. त्याच्या प्रार्थना मनःपूर्वक आणि भावनाप्रधान होत्या. अशाचप्रकारे आज देखील, अनेक मोहाच्या प्रसंगी, देहाच्या वासनेत विलीन होऊन वैवाहिक वचनाचा विश्‍वासघात करण्याला विरोध करण्यासाठी यहोवाकडे मदतीचा धावा करुन आम्हाला बळ मिळू शकते.—स्तोत्रसंहिता ११९:१०१, १०२.

वर्तनाची परस्परविरोधी उदाहरणे

१४, १५. (अ) योसेफाने मोहाचा प्रतिकार कसा केला? (ब) मोहाचा विरोध करण्यासाठी योसेफाला कशाने मदत मिळाली?

१४ आम्ही मोहाचा सामना कसा करावा? यासंबंधाने योसेफ आणि दाविदाने जे केले त्यावरुन स्पष्ट फरक दिसून येतो. पोटीफराच्या पत्नीने कदाचित त्यावेळी अविवाहित व त्या सुंदर दिसणाऱ्‍या योसेफास सतत फसविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने शेवटी तिला असे उत्तर दिलेः “या घरात मजहून तो मोठा नाही आणि तू त्याची पत्नी आहेस म्हणून तुझ्याखेरीज माझ्या अखत्याराबाहेर असे काहीच नाही. असे असता एवढे घोर कर्म करुन मी देवाचा अपराधी कसा होऊ?”—उत्पत्ती ३९:६-९.

१५ योसेफ अगदी सहज त्याला बळी पडू शकला असता पण योग्य कार्य करण्यासाठी त्याला कशाने मदत मिळाली? त्याच्या मनाला प्रवृत्त करणारी सामर्थ्यवान शक्‍ती त्याच्याजवळ होती. यहोवाबरोबरील त्याच्या नातेसंबंधाविषयी तो फार दक्ष होता. त्याला माहीत होते की ह्‍या अति-मोहित झालेल्या स्त्रीबरोबर जारकर्म करणे म्हणजे वास्तविकपणे केवळ तिच्या पतीविरुद्धच पाप करणे नव्हे तर अधिक महत्त्वाचे म्हणजे यहोवाविरुद्ध पाप करणे होय.—उत्पत्ती ३९:१२.

१६. दाविदाने मोहाचा प्रतिकार कसा केला?

१६ उलटपक्षी, दाविदाने काय केले? तो विवाहित मनुष्य होता, व नियमशास्त्रात अनुज्ञा दिल्यामुळे त्याला अनेक बायका होत्या. एका संध्याकाळी त्याने एका स्त्रीला स्नान करताना त्याच्या राजवाड्यातून पाहिले. ती सुंदर स्त्री बथशेबा, उरीयाची पत्नी होती. दावीदापुढे याची निवड करण्याची संधी होती सतत पाहण्याद्वारे त्याच्या हृदयातील तीव्र वासनांना वाढू देणे किंवा दूर जाऊन मोहाचा विरोध करणे. त्याने काय करण्याचे निवडले? त्याने तिला त्याच्या राजवाड्यात बोलावले, आणि तिच्याबरोबर व्यभिचार केला. यापेक्षाही वाईट म्हणजे तो तिच्या पतीच्या मृत्यूला कारणीभूत झाला.—२ शमुवेल ११:२-४, १२-२७.

१७. दाविदाच्या आध्यात्मिक स्थितीबद्दल आम्ही कोणते अनुमान काढू शकतो?

१७ दाविदाची समस्या काय होती? नंतर स्तोत्रसंहिता ५१ मध्ये केलेल्या पापाबद्दल त्याच्या पश्‍चातापावरून आम्ही काही अनुमान काढू शकतो. त्याने म्हटलेः “हे माझ्या देवा माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्‍न कर, माझ्या ठायी स्थिर असा आत्मा घाल.” त्याला मोह होण्याच्या प्रसंगी, त्याच्या ठायी शुद्ध व खंबीर आत्मा नव्हता हे अगदी उघड आहे. कदाचित त्याने यहोवाच्या नियमाचे वाचन करण्याकडे दुर्लक्ष केले असावे, त्याचा परिणाम तो आध्यात्मिकतेत दुर्बळ होण्यावर झाला. किंवा राजा या नात्याने त्याने त्याच्या शक्‍तीचा वापर त्याचे विचार भ्रष्ट होऊ देण्यात केला असेल ज्यामुळे तो तीव्र वासनांचा शिकार बनला असावा. निश्‍चितच, त्यावेळी त्याच्या मनाला प्रवृत्त करणारी शक्‍ती स्वार्थी आणि पापी होती. यास्तव, “शुद्ध हृदय, स्थिर आत्म्या”ची गरज आहे असे त्याने ओळखले.—स्तोत्रसंहिता ५१:१०; अनुवाद १७:१८-२०.

१८. येशूने व्यभिचाराविषयी कोणता सल्ला दिला?

१८ दाविद राजाप्रमाणेच एकाने किंवा दोघांनीही स्वतःला आध्यात्मिक दुर्बळ स्थितीत पडू दिल्यामुळे काही ख्रिस्ती विवाह तुटले आहेत. त्याचे उदाहरण, दुसऱ्‍या स्त्रीकडे, किंवा पुरुषाकडे व्यभिचार करण्याच्या दृष्टिने सतत पाहत राहून शेवटी ते पूर्ण करण्याविरुद्ध आम्हाला इशारा देते. यासंबंधाने येशूला मानवाच्या भावना समजत होत्या असे दिसते व यामुळेच त्याने म्हटलेः “‘व्यभिचार करु नका,’ असे म्हणून सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हास सांगतो जो कोणी स्त्रीकडे कामदृष्टीने पाहतो त्याने आपल्या अंतःकरणाने तिजबरोबर व्यभिचार केलाच आहे.” अशा या परिस्थितीत, मनाला प्रवृत्त करणारी शक्‍ती आध्यात्मिक असण्याऐवजी स्वार्थी आणि वैषयिक असते. तर मग खिश्‍चनांनी व्यभिचार टाळून त्यांचे विवाह आनंदी आणि समाधानी ठेवण्यासाठी काय करु शकतात?—मत्तय ५:२७, २८.

वैवाहिक बंधन दृढ करा

१९. विवाह कशाप्रकारे दृढ केला जाऊ शकतो?

१९ शलमोन राजाने लिहिलेः “जो एकटा असतो त्याला कोणी माणूस भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांला करता येईल. तीनपदरी दोरी सहसा तुटत नाही.” निश्‍चितच, संकटात असताना एकापेक्षा विवाहात एकमेकांचा मिलाफ पावलेले दोघे खंबीरपणे टिकून राहतात. पण, देवाला त्यात घेतल्यावर तीन पदरी झालेल्या त्यांच्या बंधनामुळे विवाह मजबूत बनतो. परंतु देव विवाहात कसा असू शकतो? विवाहात जोडप्यांनी देवाच्या तत्त्वांचे आणि सल्ल्याचे अनुकरण करण्याद्वारे.—उपदेशक ४:१२.

२०. पतीस कोणता पवित्र शास्त्रीय सल्ला मदत करू शकतो?

२० जर पतीने खालील वचनातील सल्ल्याचे अनुकरण खात्रीने केले तर त्याच्या विवाहास यश मिळण्याचा चांगला आधार असेलः

“नवऱ्‍यांनो, तसे तुम्ही आपल्या स्त्रियांबरोबर त्या अधिक नाजूक पात्र आहेत म्हणून सूज्ञतेने सहवास ठेवा. जीवनरूपी कृपादानाचे त्यांचे वतनबंधु असे तुम्ही त्यांना मान द्या. म्हणजे तुमच्या प्रार्थनांला व्यत्यय येणार नाही.”—१ पेत्र ३:७.

“नवऱ्‍यांनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःचे तिच्यासाठी अर्पण केले तशी तुम्हीही आपल्या बायकोवर प्रीती करा. त्याचप्रमाणे नवऱ्‍यांनी आपापल्या बायकोला आपले शरीर असे मानून तिजवर प्रीती करावी. जो आपल्या बायकोवर प्रीती करतो तो स्वतःवर प्रीती करतो.”—इफिसकर ५:२५, २८.

“तिचा नवरा उठून तिची प्रशंसा करतो. बहुत स्त्रियांनी सद्‌गुण दाखविले आहेत पण तु सर्वांहून वरचढ आहेस.”—नीतीसूत्रे ३१:२८, २९.

“कोणी निखाऱ्‍यावरून चालला तर त्याचे पाय पोळणार नाहीत काय? जो कोणी आपल्या शेजाऱ्‍याच्या स्त्रीशी गमन करतो तो असा आहे. जो कोणी तिला स्पर्श करितो तो निर्दोष असणार नाही. जारकर्म करणारा. . .आपल्या जिवाचा नाश करून घेऊ पाहतो.”—नीतीसूत्रे ६:२८, २९, ३२.

२१. पत्नीला कोणता पवित्र शास्त्रीय सल्ला साहाय्यक ठरू शकतो?

२१ पत्नीने खालील पवित्र शास्त्रीय तत्त्वाकडे लक्ष दिल्यास, ते तिच्या विवाहास स्थायीपणा आणू शकतेः

“स्त्रियांनो तुम्ही तशाच आपापल्या नवऱ्‍याच्या अधीन असा. यासाठी की कोणी वचनाला अमान्य असले तरी तुमचे भिडस्तपणाचे पवित्र वर्तन पाहून वचनांवाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने ते मिळवून घेण्यात यावे, तर जो [तुमचा] सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे.”—१ पेत्र ३:१-४.

“नवऱ्‍याने बायकोला तिचा हक्क द्यावा. आणि बायकोनेही नवऱ्‍याला द्यावा. . . एकमेकांबरोबर वंचना करू नका. . . असल्यास तो काही वेळ सम्मतीने करा.”—१ करिंथकर ७:३-५.

२२. (अ) विवाहात आणखी कोणत्या गोष्टी चांगला परिणाम घडवून आणू शकतात? (ब) यहोवा सुटपत्राकडे कोणत्या दृष्टीने पाहतो?

२२ पवित्र शास्त्र दाखवते की विवाह हा रत्नाप्रमाणे आहे ज्याचे प्रीती, कृपाळुपणा, दयाळुपणा, सहनशील, समजूतदारपणा, उत्तेजन आणि स्तुती आणि इतर आवश्‍यक पैलू आहेत. विवाहात जर हे गुण नसतील तर सूर्यप्रकाश व पाणी न मिळणाऱ्‍या वनस्पतीप्रमाणे ते आहे—जे बहरत नाही. यास्तव आमच्या विवाहात एकमेकांना उत्तेजन आणि उत्साह देण्यासाठी आमच्या मनाला प्रवृत्त करणारी शक्‍ती आम्हाला भाग पाडो. यहोवा ‘सुटपत्राचा तिटकारा’ करतो याची आठवण ठेवा. ख्रिस्ती प्रीतीचे अनुकरण केल्यास, व्यभिचार आणि विवाह तुटण्यास कोणतीही शक्यता राहणार नाही. का बरे? कारण “प्रीती कधी खचत नाही.”—मलाखी २:१६; १ करिंथकर १३:४-८; इफिसकर ५:३-५.

तुम्ही विवेचीत करु शकता का?

▫ आनंदी विवाहासाठी कोणत्या मुलभूत गोष्टी आहेत?

▫ मनाला प्रवृत्त करणारी शक्‍ती विवाहात कसा परिणाम घडवून आणू शकते?

▫ आमच्या मनाला प्रवृत्त करणारी शक्‍ती दृढ करण्यासाठी आम्ही काय करु शकतो?

▫ मोहाचा सामना करताना दाविद आणि योसेफ यांनी कशी वेगवेगळी प्रतिक्रिया दाखवली?

▫ विवाहाचे बंधन दृढ करण्यासाठी कोणता पवित्र शास्त्रीय सल्ला पती पत्नीला मदत करील?

[२४ पानांवरील चित्रं]

आम्ही दुहेरी जीवन जगतो का—राज्यसभागृहात दयाळूपणाचे आणि घरात निष्ठुरतेचे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा