हरतऱ्हेच्या मूर्तीपूजेपासून स्वतःला दूर राखा
“देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार?”—२ करिंथकर ६:१६.
१. इस्राएलाचा निवासमंडप व मंदिरांद्वारे कशाची पडछाया दाखविण्यात आली?
यहोवाला असे एक मंदिर आहे ज्यामध्ये मूर्त्त्याच नाहीत. ते मोशाने बांधलेला इस्राएलातील निवासमंडप आणि नंतर यरुशलेमात बांधण्यात आलेल्या मंदिरांद्वारे प्रतिछायित होत होते. या वास्तुंनी यहोवाचे थोर आध्यात्मिक मंदिर, “खरा मंडप,” याचे प्रतिनिधित्व केले. (इब्रीयांस ८:१-५) हे मंदिर, देवाकडे येशू ख्रिस्ताच्या खंडणी यज्ञापर्णाच्या आधारावर येऊन भक्ती करण्याची व्यवस्था असे आहे.—इब्रीयांस ९:२-१०, २३.
२. देवाच्या मोठ्या आध्यात्मिक मंदिरात कोण स्तंभ होतात, आणि मोठ्या लोकसमुदायाला कोणत्या भूमिकेचा आनंद वाटतो?
२ प्रत्येक अभिषिक्त ख्रिस्ती येथे “देवाच्या मंदिरातील स्तंभ,” बनतो, याचा अर्थ त्याला स्वर्गात जागा मिळते. यहोवाच्या इतर उपासकांचा “मोठा लोकसमुदाय,” हेरोदाने पुन्हा बांधलेल्या मंदिरात जे विदेश्यांचे अंगण होते त्याद्वारे प्रतिनिधित्व केल्या जाणाऱ्या जागी देवाची “[पवित्र] सेवा करीत” आहे. येशूच्या यज्ञार्पणावर विश्वास ठेवल्यामुळे त्यांना नीतीमान भूमिका मिळालेली आहे व यामुळेच त्यांना “मोठे संकट” यातून निभावण्याचा परिणाम मिळतो.—प्रकटीकरण ३:१२; ७:९-१५.
३, ४. पृथ्वीवरील अभिषिक्त ख्रिश्चनांच्या मंडळीची कशासोबत तुलना करण्यात आली आहे, आणि त्यांनी कोणत्या भ्रष्टतेपासून स्वतंत्र असावयास हवे?
३ पृथ्वीवर असणारी अभिषिक्तांची मंडळी हिला देखील मूर्तीपूजेपासून स्वतंत्र असणाऱ्या एका मंदिराची लाक्षणिक उपमा देण्यात आली आहे. अशा, ‘पवित्र आत्म्याने शिक्कामोर्तब’ करण्यात आलेल्या लोकांना प्रेषित पौलाने म्हटलेः “प्रेषित व संदेष्टे यांच्या पायावर तुम्ही रचलेले आहा व ख्रिस्त येशू हाच कोनशिला आहे; त्याच्यामध्ये प्रत्येक इमारत जोडून रचली असता वाढत वाढत प्रभूच्या ठायी पवित्र मंदिर होते. त्यात तुम्हीही आत्म्याने देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचलेले आहा.” (इफिसकर १:१३; २:२०-२२) हे १,४४,००० शिक्कामोर्तब करण्यात आलेले लोक “जिवंत धोंडे” असून ते “आध्यात्मिक स्वरुपाचे . . . याजकगण असे रचिले जात” आहेत.—१ पेत्र २:५; प्रकटीकरण ७:४; १४:१.
४ हे सहयाजक “देवाची इमारत” असल्यामुळे या मंदिराची कशाही प्रकाराने भ्रष्टता घडावी अशी देवाची इच्छा नाही. (१ करिंथकर ३:९, १६, १७) “तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर जडून विजोड होऊ नका,” असा इशारा पौलाने दिला. पुढे तो म्हणतोः “कारण धर्म व अधर्म यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार यांचा कसा मिलाफ होणार? ख्रिस्ताचे बलियालाबरोबर कसे ऐक्य होणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे कसे वाटेकरी होणार? देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार?” “सर्वसत्ताधारी प्रभूच्या” मालकीचे असणाऱ्या अभिषिक्त ख्रिश्चनांनी मूर्तीपूजेपासून स्वतंत्र असावयास हवे. (२ करिंथकर ६:१४-१८) याशिवाय, मोठ्या लोकसमुदायाचा भाग असणाऱ्यांनी देखील हर तऱ्हेची मूर्तीपूजा टाळण्यास हवी.
५. यहोवा हा सर्वस्वाची भक्ती अपेक्षून आहे याची जाणीव बाळगल्यामुळे खरे ख्रिस्ती काय करतात?
५ मूर्तीपूजेचे प्रत्यक्ष व युक्तिबाज मार्ग आहेत. मूर्तीपूजा ही केवळ खोटी दैवते व देवता यांच्या भक्तीपुरतीच मर्यादित नाही. यामध्ये यहोवाऐवजी इतर कशाचाही किंवा कोणाबद्दलच्या भक्तीचा देखील समावेश होतो. यहोवा विश्वव्याप्त सार्वभौम असल्यामुळे तोच केवळ सर्वस्वाची भक्ती अपेक्षिण्याच्या पात्रतेचा आहे. (अनुवाद ४:२४) याची जाणीव असल्यामुळे खरे ख्रिस्ती सर्व मूर्तीपूजेबद्दल जो शास्त्रवचनीय इशारा दिलेला आहे तो ऐकतात. (१ करिंथकर १०:७) तर आता, यहोवाच्या सेवकांनी ज्या विशिष्ट प्रकारातील मूर्तीपूजेची पद्धत टाळली पाहिजे त्याचा विचार करू या.
ख्रिस्ती धर्मजगताची मूर्तीपूजा आधीच प्रतिछायित करण्यात आली
६. यहेज्केलने कोणत्या घृणित गोष्टी चालू असलेल्या बघितल्या?
६ यहेज्केल संदेष्टा बाबेलोनी बंदिवासात असताना त्याला इ. स. पू. ६१२ मध्ये, यरुशलेमातील यहोवाच्या मंदिरात धर्मत्यागी यहूदी कोणत्या चालीरिती आचरीत होते त्याचा दृष्टांत लाभला. यहेज्केलने “ईर्ष्येस पेटविणाऱ्या मूर्तीचे आसन” पाहिले. मंदिरात सत्तर याजक धूप जाळीत असलेले पाहण्यात आले. स्त्रिया खोट्या दैवतांसाठी रूदन करीत असलेल्या दिसल्या. शिवाय २५ माणसे सूर्याची उपासना करीत होते. या सर्व धर्मत्यागी गोष्टी कशाला सूचक होत्या?
७, ८. “ईर्ष्येस पेटविणारी मूर्ती” काय असावी व तिने यहोवाला का ईर्ष्येस पेटविले?
७ यहेज्केलने दृष्टांतात बघितलेल्या घृणित गोष्टींद्वारे ख्रिस्ती धर्मजगताच्या मूर्तीपूजेची पडछाया दाखवण्यात आली. उदाहरणार्थ, तो म्हणालाः “वेदीवेशीच्या उत्तरेस मंदिराच्या प्रवेशमार्गात ही ईर्ष्येस पेटविणारी मूर्ती होती. [यहोवा देव] मला म्हणालाः ‘मानवपुत्रा, ते काय करीत आहेत ते पाहतोस ना? मी आपल्या पवित्रस्थानातून दूर निघून जावे म्हणून अशी अमंगळ कृत्ये इस्राएल घराणे येथे करीत आहे.’”—यहेज्केल ८:१-६.
८ ती ईर्ष्येस पेटविणारी मूर्ती ही बहुधा तो पवित्र स्तंभ असावा जो, अशा खोट्या देवीचे प्रतिनिधित्व करीत होता, ज्याला कनानी लोक बाल दैवताची बायको या दृष्टीने बघत. ते कसलेही सूचक असो, पण यामुळे यहोवाला इर्ष्येस आणले गेले, कारण त्याने इस्राएलांना ज्या आज्ञा दिलेल्या होत्या त्यानुरुप त्याला सर्वस्वाची भक्ती वाहण्यामध्ये ती खोटी भक्ती बाधा घालीत होती. त्याने इस्राएलांना दिलेली आज्ञा याप्रमाणे होतीः “मी परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] तुझा देव आहे, माझ्यासमोर तुला अन्य देव नसावे. आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नको. त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची पूजा करू नको, कारण मी परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] तुझा ईर्ष्यावान देव आहे.”—निर्गम २०:२-५.
९. ख्रिस्ती धर्मजगताने देवाला ईर्ष्येस कसे पेटवले आहे?
९ देवाच्या स्वतःच्या मंदिरात अशी ही ईर्ष्येस पेटविणारी मूर्ती ठेवून तिची धर्मत्यागी इस्राएलांनी उपासना करणे ही गोष्ट अत्यंत घृणित अशी होती. याचप्रमाणे, ख्रिस्ती धर्मजगतातील मंदिरे देवाचा अपमान करणारी चिन्हे व मूर्त्या यांनी भ्रष्ट झाली आहेत. या गोष्टी, ते ज्याची सेवा करीत असल्याचा दावा करतात त्याच्या सर्वस्वाच्या भक्तीची विभागणी करतात. तसेच, पाळकांनी देवाचे राज्य हीच मानवजातीची एकमात्र आशा आहे याला नकार दर्शवून त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाला आपली आळवणी केली असल्यामुळे देवाला अधिक ईर्ष्येला पेटवले गेले आहे. हा संयुक्त राष्ट्र संघ, जेथे नको त्या ठिकाणी म्हणजे, “पवित्रस्थानात उभा असलेला,” “ओसाडीचा अमंगळ पदार्थ” आहे.—मत्तय २४:१५, १६; मार्क १३:१४.
१०. यहेज्केलने मंदिराच्या आत काय पाहिले, आणि या गोष्टी ख्रिस्ती धर्मजगतात जे पाहायला मिळते त्याच्याशी कशा समांतर आहेत?
१० मंदिरात आल्यावर यहेज्केल कळवतोः “सरपटणारे प्राणी, अमंगळ पशु, व इस्राएल घराण्याच्या सर्व मूर्ती यांची चित्रे भिंतीवर चोहोकडे काढलेली होती. त्यांच्यापुढे इस्राएल घराण्याच्या वडिलातले सत्तर पुरुष उभे असून . . . त्या प्रत्येक माणसाच्या हाती धुपाटणे होते. तेथे धुपाच्या दाट धुराचा परिमळ वर जात होता.” जरा विचार करा! यहोवाच्या मंदिरात भिंतीवर कोरण्यात आलेल्या चित्रांद्वारे सूचित असणाऱ्या खोट्या दैवतांना इस्राएली वडील धूप दाखवत होते. (यहेज्केल ८:१०-१२) यालाच अनुलक्षून, आज ख्रिस्ती धर्मराज्याच्या देशांना पक्षी व जंगली पशु यांची प्रतिके आहेत व यांना लोक आपली निष्ठा दाखवून आहेत. त्याचप्रमाणे, यहोवा देवाकडील निर्मितीच्या खऱ्या पवित्र शास्त्र अहवालाला उंचावून धरण्याऐवजी पुष्कळ पाळकांनी बहुजन समाजाला प्राणी जीवनातून माणसाची उत्क्रांती होत गेली या चुकीच्या सिद्धांताचा प्रसार करण्याचा दोष स्वतःवर आणला आहे.—प्रे. कृत्ये १७:२४-२८.
११. धर्मत्यागी इस्राएली स्त्रिया तामुजसाठी का शोक करीत होत्या?
११ यहोवाच्या मंदिराच्या प्रवेश द्वारापाशी यहेज्केलने धर्मत्यागी इस्राएली स्त्रियांना तामुजसाठी रुदन करताना पाहिले. (यहेज्केल ८:१३, १४) तामुज हे दैवत पावसाळी ऋतुत वाढणाऱ्या व कोरड्या काळात नष्ट होणाऱ्या वनस्पतीचे प्रतिनिधित्व करणारे दैवत असल्याचा बाबेलोनी व अरामी लोकांनी दृष्टीकोन धरला होता. वनस्पती नष्ट होणे हे तामुजच्या मृत्युचे प्रतिक होते व यासाठी दरवर्षी ग्रीष्मकाळात त्याचे उपासक त्याच्यासाठी शोक करीत. मग, पुन्हा वनस्पती दिसू लागल्यावर तामुज खाली असलेल्या जगतातून परतला असे समजले जाई. त्याला त्याच्या नावातील पहिल्या अक्षरावरुन ओळखण्यात येई. ते अक्षर ताऊ असून ते क्रूसाच्या आकाराचे होते. ही गोष्ट, आपल्याला ख्रिस्ती धर्मजगत क्रूसाची जी मूर्तीपूजक भक्ती करीत आहे त्याला चांगल्या प्रकाराने स्मरणात आणून देते.
१२. यहेज्केलने २५ धर्मत्यागी इस्राएली माणसांना काय करीत असल्याचे पाहिले, आणि यासारखीच कोणती कृति ख्रिस्ती धर्मजगतात होत आहे?
१२ पुढे, मंदिराच्या आतील अंगणात यहेज्केलने २५ धर्मत्यागी इस्राएली पुरुषांना सूर्याची भक्ती करीत असलेले पाहिले. अशाप्रकारची मूर्तीपूजा करण्याविरुद्ध यहोवाने दिलेल्या कायद्याचा हा थेट भंग होता. (अनुवाद ४:१५-१९) या मूर्तीपूजकांनी देवाच्या नाकापुढे, मानवी पौरुषाच्या अंगाचे प्रतिनिधित्व करणारी अमंगळ डहाळी धरली होती. या कारणास्तव, देव त्यांच्या प्रार्थनांना उत्तर देत नव्हता हे उघड होते; याचप्रमाणे तो, ख्रिस्ती धर्मजगत “मोठ्या संकटा”त त्याची मदत घेण्याचा यत्न करील अशा वेळी उत्तर देणार नाही व हे सर्व व्यर्थ होईल. (मत्तय २४:२१) ते धर्मत्यागी इस्राएली यहोवाच्या मंदिराकडे आपली पाठ फिरवून प्रकाश देणाऱ्या सूर्याची भक्ती करीत होते, तसेच ख्रिस्ती धर्मजगत देखील आपली पाठ फिरवून देवाकडून येणारा प्रकाश नाकारतो, व खोटी तत्त्वे शिकवतो, जगीक ज्ञानाची प्रशंसा करतो, आणि अनैतिक गोष्टींकडे कानाडोळा करतो.—यहेज्केल ८:१५-१८.
१३. यहेज्केलच्या दृष्टांतात पाहण्यात आलेल्या कोणत्या प्रकारातील मूर्तीपूजेला यहोवाचे साक्षीदार टाळतात?
१३ ख्रिस्ती धर्मजगतात किंवा मूळ यरुशलेमात यहेज्केलने बघितलेली, आचरली जाणारी मूर्तीपूजा यहोवाचे साक्षीदार टाळतात. आम्ही देवाचा अपमान करणाऱ्या चिन्हांना आळवीत नाही. आम्ही सरकारी “वरिष्ठ अधिकारी” यांना आदर दाखवत असलो तरी, त्यांना दाखवीत असलेली अधीनता ही सापेक्ष रुपातील आहे. (रोमकर १३:१-७; मार्क १२:१७; प्रे. कृत्ये ५:२९) आम्ही देव व त्याच्या राज्याला आमच्या अंतःकरणातील निष्ठा वाहिलेली आहे. निर्माता व त्याची निर्मिती यांची बदली आम्ही उत्क्रांती तत्त्वासोबत करीत नाही. (प्रकटीकरण ४:११) आम्ही क्रूसाची तर कधीच भक्ती करत नाही, आणि या जगाचे बुद्धिवाद, तत्त्वज्ञान किंवा इतर प्रकारचे ज्ञान यांचा अंगीकार करीत नाही. (१ तीमथ्य ६:२०, २१) आम्ही हरतऱ्हेच्या मूर्तीपूजेपासून दूर राहतो. यापैकीचे काही प्रकार कोणते आहेत?
इतर प्रकारातील मूर्तीपूजा
१४. प्रकटीकरण १३:१ मध्ये दाखवण्यात आलेल्या “श्वापदा”च्या बाबतीत यहोवाचे सेवक कोणती भूमिका घेतात?
१४ मानवजातीसोबत लाक्षणिक “श्वापद” याची भक्ती करण्यात ख्रिस्ती लोक सहभागी होत नाहीत. प्रेषित योहानाने असे म्हटलेः “मी एक श्वापद समुद्रातून वर येताना पाहिले; त्याला दहा शिंगे व सात डोकी असून त्याच्या शिंगावर दहा मुगूट होते . . . पृथ्वीवर राहणारे सर्व जण त्या श्वापदाला नमन करतील.” (प्रकटीकरण १३:१, ८) श्वापदे “राजे,” किंवा राजकीय सत्तांना सूचित करू शकतात. (दानीएल ७:१७; ८:३-८, २०-२५) या कारणास्तव, श्वापदाची सात डोकी मिसर, अश्शुर, बाबेल, मेद-पारस, ग्रीस, रोम व ब्रिटीश व अमेरिका यांच्या संयुक्त मिश्रणाने तयार झालेली अँग्लो-अमेरिकन सत्ता यांचे प्रतिनिधित्व करतात. ख्रिस्ती धर्मजगतातील पाळक वर्ग मानवजातीला “या जगाचा अधिपती” सैतान याच्या राजकीय व्यवस्थेला पूजण्यात मदत देऊन देव व ख्रिस्त यांचा मोठा अपमान करीत आहेत. (योहान १२:३१) तथापि, यहोवाचे सेवक ख्रिस्ती तटस्थ व राज्याचे पुरस्कर्ते म्हणून अशा प्रकारच्या मूर्तीपूजेस धिक्कारत आहेत.—याकोब १:२७.
१५. जगातील कलाकारांच्या बाबतीत यहोवाचे लोक कोणता दृष्टिकोन बाळगून आहेत, आणि एका साक्षीदाराने याबद्दल काय म्हटले?
१५ जगात मनोरंजन व क्रीडा क्षेत्रात चमकणारे तारे यांना पुजण्यात देवाचे लोक स्वतःला आवरतात. यहोवाचा साक्षीदार झाल्यावर एका संगीतकाराने असे म्हटलेः “मनोरंजन व नृत्य यासाठी देण्यात येणारे संगीत चुकीच्या इच्छा प्रज्वलित करू शकते . . . गायक आनंद व कोमलतेची गीते गाताना पुष्कळांना हे गुण आपल्या वैवाहिक सोबत्यामध्ये नसल्याचे जाणवू लागते. मग, हा कलाकार जे गाणे गातो त्याच गाण्याद्वारे त्याला प्रसिद्धी मिळते. मला असे व्यावसायिक संगीतकार व गायक माहीत आहेत, जे याच कारणामुळे स्त्रियांचे चाहते बनले आहेत. जेव्हा एखादा अशा काल्पनिक जगात उडी घेतो तेव्हा त्याला कलाकाराबद्दल पूज्यभाव वाटू लागतो. याची सुरवात अगदी अजाणपणे, प्रथम त्याचे स्मरण राहावे या उद्देशाने त्याची स्वाक्षरी घेणे येथून होते. पण काही तर या कलाकाराला आपला आदर्श मानू लागतात, आणि त्याला अवास्तव प्रतिष्ठा बहाल करून ते जणू त्याची मूर्तीच बनवतात. ते या कलाकाराचा फोटो आपल्या घरात टांगवतात आणि त्याच्याप्रमाणेच केशभूषा व वेशभूषा करू लागतात. ख्रिश्चनांनी लक्षात ठेवले पाहिजे की, पूज्यभाव केवळ देवाला दाखवण्यास हवा.”
१६. नीतीमान देवदूतांना देखील मूर्तीपूजेचा वीट वाटतो हे कशावरून दिसते?
१६ होय, केवळ देवच पूज्यतेच्या किंवा भक्तीच्या लायक आहे. स्वतः योहान, त्याला आश्चर्यकारक गोष्टी दाखवणाऱ्या “देवदूताला नमस्कार घालण्यास . . . त्याच्या पाया” पडला तेव्हा त्या आत्मिक प्राण्याने कशाही प्रकाराने आपली भक्ती होण्यास हरकत घेतली आणि म्हटलेः “संभाळ! असे करू नको; मी तुझा, तुझे बंधु संदेष्टे व या पुस्तकातील वचने पाळणारे लोक यांचा सोबतीचा दास आहे; नमस्कार देवाला घाल.” (प्रकटीकरण २२:८, ९, न्यू.व.) यहोवाबद्दल असणारे भय किंवा त्याच्याबद्दल वाटणारी पूज्यता या गोष्टी आम्हाला केवळ त्याचीच भक्ती करण्यासाठी प्रवृत्त करतात. (प्रकटीकरण १४:७) अशाप्रकारे, खरी ईश्वरी निष्ठा आम्हाला मूर्तीपूजेपासून दूर राखते.—१ तीमथ्य ४:८.
१७. मूर्तीपूजक लैंगिक अनैतिकता याविरुद्ध आम्ही कसे दक्ष राहू शकतो?
१७ यहोवाचे सेवक लैंगिक अनैतिकता या आणखी एका प्रकारच्या मूर्तीपूजेला टाळतात. त्यांना ठाऊक आहे की, “जारकर्मी, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी—हा मूर्तीपूजक आहे—असल्या कोणासही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही.” (इफिसकर ५:५) निषिद्ध सुखोपभोगाची लालसा ही भक्तीचे स्थान घेते तेव्हा ही मूर्तीपूजा घडते. अयोग्य लैंगिक वासनांमुळे ईश्वरी गुणांची अधोगती होते. बीभत्स चित्रांकडे आपले डोळे लावण्यामुळे तसेच बीभत्स गोष्टी ऐकण्याकडे आपले कान लावल्यामुळे एखादा, पवित्र देव यहोवा याच्यासोबत असणारे नातेसंबंध धोक्यात आणत असतो. (यशया ६:३) अशा मूर्तीपूजेविरुद्ध दक्ष राहण्यासाठी देवाच्या सेवकांनी अश्लील चित्रे व भ्रष्ट संगीत यांना टाळले पाहिजे. त्यांनी शास्त्रवचनांवर आधारलेल्या मजबूत आध्यात्मिक मूल्यांना जडून राहिले पाहिजे, आणि “धार्मिकता व सत्याची पवित्रता [“निष्ठावंतपणा,” न्यू.व.] यांनी युक्त असा देवानुरुप उत्पन्न केलेला नवा मनुष्य धारण” करीत राहण्यास हवे.—इफिसकर ४:२२-२४.
लोभ व अभिलाषा टाळणे
१८, १९. (अ) लोभ व अभिलाषा काय आहेत? (ब) अशा या मूर्तीपूजक लोभ व अभिलाषेविरुद्ध आपण कसे दक्ष राहू शकतो?
१८ मूर्तीपूजेच्या प्रकाराशी घनिष्ट संबंध राखून असणाऱ्या लोभ व अभिलाषा या गुणांविरुद्ध ख्रिस्ती लोक दक्ष राहतात. लोभ ही फाजील किंवा अपहारी इच्छा आहे तर, अभिलाषा दुसऱ्याच्या मालकी हक्काच्या कोणत्याही वस्तुबद्दल राखलेला लोभ असतो. येशूने अभिलाषेबद्दल इशारा दिला आणि एका लोभिष्ट माणसाबद्दल म्हटले, ज्याला आपल्या मरणाच्या वेळी स्वतःपाशी असणाऱ्या धनाचा काहीही उपयोग करता आला नाही आणि “देवविषयक बाबतीत धनवान” नसल्यामुळे त्याची वाईट स्थिती झाली. (लूक १२:१५-२१) पौलाने आपल्या सहकाऱ्यांना हा योग्य सल्ला दिलाः “पृथ्वीवरील तुमचे अवयव जिवे मारा म्हणजे . . . लोभ, ह्याला मूर्तीपूजा म्हणावे.”—कलस्सैकर ३:५.
१९ जे पैशाचे प्रेम, खाणे-पिणे याबाबतीत अधाशीपणा, किंवा सत्ताप्राप्तीची लालसा यांनी झपाटलेले आहेत ते अशा इच्छांना मूर्ती बनवतात. पौलाने हे दर्शविले आहेच की, लोभी मनुष्य हा मूर्तीपूजक आहे आणि याला देवाच्या राज्यात जागा नाही. (१ करिंथकर ६:९, १०; इफिसकर ५:५) या कारणास्तव, लोभी मनुष्य या अर्थाने जे मूर्तीपूजा आचरतात अशांना ख्रिस्ती मंडळीतून बहिष्कृत व्हावे लागेल. तथापि, शास्त्रवचनांचा अवलंब आणि सातत्याने प्रार्थना करण्याद्वारे हा लोभीपणा टाळता येऊ शकतो. नीतीसूत्रे ३०:७-९ म्हणतेः “मी तुजजवळ [यहोवा देव] दोन वर मागतो; मी मरण्यापूर्वी ते मला दे, नाही म्हणू नको. व्यर्थ अभिमान व लबाडी मजपासून दूर राख. दारिद्य्र किंवा श्रीमंती मला देऊ नको; मला आवश्यक तेवढे अन्न खावयास दे. माझी अतितृप्ती झाल्यास मी कदाचित तुझा अव्हेर करीन, आणि ‘परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] कोण आहे?’ असे म्हणेन; मी दरिद्री झाल्यास कदाचित चोरी करीन आणि माझ्या देवाच्या नामाची निंदा करीन.” असा हा भाव आम्हाला मूर्तीपूजक लोभीपणा व अभिलाषा टाळण्यात मदत करू शकेल.
व्यक्तीपूजेविरुद्ध दक्ष असा
२०, २१. व्यक्तीपूजेविरुद्ध यहोवाचे लोक कशी दक्षता घेतात?
२० यहोवाचे लोक व्यक्तीपूजेविरुद्ध देखील दक्ष राहतात. स्वतःला किंवा स्वतःच्या इच्छेला पूज्य बनवणे हे जगात सर्वसाधारण झाले आहे. याचप्रमाणे किर्ती व वैभवासाठी पुष्कळांना कावेबाज मार्गांनी कृति करावीशी वाटते. त्यांना देवाची नव्हे, तर स्वतःच्या इच्छेची पूर्ति व्हावी असे वाटत असते. पण आम्ही कावेबाज पद्धतीने आपला मार्ग साधला आणि इतरांवर धनीपण गाजवले तर त्यामुळे आपला देवासोबत चांगला संबंध राहणार नाही. (नीतीसूत्रे ३:३२; मत्तय २०:२०-२८; १ पेत्र ५:२, ३) येशूचे अनुयायी असल्यामुळे आम्ही जगातील चलाखीच्या गोष्टींचा त्याग केला आहे.—२ करिंथकर ४:१, २.
२१ देवाचे लोक किर्ती संपादण्याऐवजी पौलाचा हा सल्ला मान्य करतातः “तुम्ही खाता, पिता, किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.” (१ करिंथकर १०:३१) यहोवाचे सेवक असल्यामुळे आम्ही आमच्याच मार्गाप्रमाणे व्हावे असा लोभी, मूर्तीपूजक अट्टाहास धरीत नाही, तर उलट ईश्वरी इच्छेनुरुप वागण्याचे आनंदाने पत्करतो, “विश्वासू व बुद्धिमान दासा”मार्फत मिळणारे मार्गदर्शन स्वीकारतो आणि यहोवाच्या संघटनेसोबत पूर्ण रुपाने सहकार्य देतो.—मत्तय २४:४५-४७.
दक्ष राहा!
२२, २३. आम्ही हरतऱ्हेच्या मूर्तीपूजेपासून स्वतःला कसे दूर राखू शकतो?
२२ आम्ही यहोवाचे लोक जडवादी मूर्तीपुढे नमन करीत नाही. तसेच मूर्तीपूजेच्या कावेबाज मार्गाविरुद्ध देखील दक्षता राखतो. खरे म्हणजे, आम्ही हरतऱ्हेच्या मूर्तीपूजेपासून दूर राहिले पाहिजे. या कारणास्तव, आम्ही योहानाची ही सूचना मान्य करतो की, “मूर्तीपासून स्वतःस दूर राखा.”—१ योहान ५:२१.
२३ तुम्ही यहोवाच्या सेवकांपैकी आहात तर तुमच्या पवित्र शास्त्राची तालीम लाभलेल्या विवेकाचा आणि ज्ञानेंद्रियांचा उपयोग करा. (इब्रीयांस ५:१४) मग, तुम्हाला जगाच्या मूर्तीपूजक आत्म्याची झळ लागणार नाही, तर तुम्ही त्या तीन विश्वासू इब्र्यांसारखे आणि आरंभीच्या निष्ठावंत ख्रिश्चनांसारखे व्हाल. तुम्ही यहोवाला सर्वस्वाची भक्ती देऊ शकाल आणि तो तुम्हाला हरतऱ्हेच्या मूर्तीपूजेपासून दूर राहण्यात तुमची मदत करील.
तुमचे विचार काय आहेत?
▫ यहेज्केलच्या दृष्टांतात बघितलेला मूर्तीपूजेचा प्रकार यहोवाचे साक्षीदार कसा टाळतात?
▫ प्रकटीकरण १३:१ मधील “श्वापद” काय आहे, आणि यहोवाचे सेवक त्याच्याबद्दल आपली कोणती भूमिका ग्रहण करून आहेत?
▫ मनोरंजन तसेच क्रिडा क्षेत्रात चमकणाऱ्या ताऱ्यांची पूजा करण्याविरुद्ध का दक्ष असावे?
▫ व्यक्तीपूजा करण्याच्या बाबतीत एखादा कशी दक्षता राखू शकतो?
▫ हरतऱ्हेच्या मूर्तीपूजेपासून स्वतःला का दूर ठेवावे?
[२८ पानांवरील चित्रं]
यहेज्केलच्या दृष्टांतात पाहिलेल्या घृणित गोष्टी ख्रिस्ती धर्मजगतातील मूर्तीपूजा कशा प्रतिछायित करीत होत्या हे तुम्हाला माहीत आहे का?