तुम्ही कोणत्या प्रकारच्या लोकांना कृपापसंती दाखवता?
“वधु पाहिजे. गोरीपान, सडपातळ, पदवीधर किंवा उच्चशिक्षित असलेली पाहिजे, सुस्थितीतील, स्वजातीय चालेल.”
भारताच्या वर्तमानपत्रातील विवाहसंबंधाने असणाऱ्या जाहिरातीत तुम्ही कदाचित असे वाचले असेल. याचप्रमाणे, जगाच्या इतर भागातही असेच काहीतरी तुम्ही पाहिले असेल. भारतात भावी वराचे पालक बहुदा अशी जाहिरात देतात. प्रतित्त्युरात मुलीचा लाल साडी नेसलेला व भरपूर दागदागिने घातलेला फोटो पाठवण्यात येतो. मुलाकडील कुटुंबाने मान्यता दिली, तर लग्नाचा दृष्टीकोण ठेवून बोलणी चालू होती.
सामान्य दर्जांची मुल्ये
भारतात रंगाने गोरीपान असलेल्या वधूला प्राधान्य दिले जाते ही गोष्ट सर्वसाधारण आहे. याचे कारण खालच्या जमातीमधील हिंदू समाज काळ्या वर्णाचे आहेत असा खोलवर रुजलेला विश्वास आहे. अलिकडेच, भारतीय दूरदर्शनवर दोन मुलींची गोष्ट सांगितली, ज्यात एक मुलगी रंगाने गोरी तर दुसरी मुलगी रंगाने काळी होती. गोरी मुलगी निष्ठुर व बेशिस्त होती; परंतु ती काळी मुलगी नम्र व सौम्य होती. एक जादूचा फरक झाला, गोरी मुलगी शिक्षा म्हणून काळी झाली, तर काळ्या मुलीला गोरे होण्याचे वरदान मिळाले. ह्या गोष्टीचा सारांश हा की चांगुलपणा नेहमी जिंकतो, गोऱ्या रंगाचे बक्षीस मिळवण्याची अपेक्षा असते.
अशाप्रकारचे रंगभेद, अजाणतेत इतके रुजलेले आहेत की त्याची कल्पनाही सहसा येणार नाही. उदाहरणार्थ, आशियामधील एखादा व्यक्ति पाश्चात्य देशात जाऊन आल्यावर तक्रार करत म्हणेल की त्याच्या त्वचेच्या रंगामुळे व तिरप्या डोळ्यांमुळे ते त्याच्या बरोबर गैरवर्तणूकीने वागले. ह्याप्रकारची वर्तणूक त्या व्यक्तिला विचलीत करते व तो दुजाभावाने वागू लागतो. पण जेव्हा तो त्याच्या मायदेशी पुन्हा परततो, तेव्हा तो भिन्नजातीच्या गटाच्या लोकांसोबत त्याच प्रकारे वागतो. आज पुष्कळ लोक दुसऱ्यांची योग्यता ज्या आधारावर करतात त्यामध्ये रंगभेद व भिन्न पार्श्वभूमि अधिक प्राबल्य राखून आहे.
प्राचीन काळचा राजा शलमोन याने लिहिले: “पैशाने सर्वकाही साध्य होते.” (उपदेशक १०:१९) ते किती सत्य आहे! संपत्ती सुध्दा लोकांच्या दृष्टीकोणावर प्रभाव पाडते. त्या संपत्तिचा उगम कोठून झाला हे फार क्वचितच विचारले जाते. एखादा माणूस काबाड कष्टाने किंवा योग्य व्यवस्था केल्याने श्रीमंत झाला का बेइमानी करुन झाला? याचा प्रश्न नसतो. संपत्ती ही कुमार्गाने मिळवलेली असो वा नसो, ज्याच्या कडे ती अधिक आहे त्याच्याबद्दल लोक कृपामय दृष्टीकोन चटकन घेतात.
चढाओढीच्या ह्या जगात उच्च शिक्षणाला सुध्दा वरचा मान दिला जातो. एखादे मूल जन्मल्यावर लगेचच, पालकांनी त्याच्या शिक्षणासाठी पैसा बाजूला काढून ठेवावा हे आर्जविण्यात येते. तो दोन किंवा तीन वर्षाच्या होतो-न-होतो, तोच ते काळजी करु लागतात की त्याला एका योग्य बालवाडीत किंवा बालोद्यान शिक्षणसंस्थेत घालावे ही उच्च पदवी मिळवण्याचा लांबचा पल्ला गाठण्याची पहिलीच पायरी आहे. काही लोक असा विचार करतात की प्रतिष्ठीत पदवी मिळवली की त्याबरोबर इतरांकडून पसंती व आदर मिळवण्याचा अधिकार मिळतो.
होय, त्वचेचा रंग, शिक्षण, पैसा, भिन्नजाती—हे सर्व असे दर्जे बनले आहेत ज्यावरून लोक दुसऱ्यांचा न्याय, किंवा इतरांबद्दल पूर्वग्रह धरतात. या काही गोष्टी आहेत यावरून कोणाला पसंती देता येईल व कोणाला देता येणार नाही हे ठरविले जाते. तुमच्याबद्दल काय? तुम्ही कोणाला कृपापसंती दाखवता? तुम्ही एखाद्याजवळ पैसा, गोरा रंग, किंवा उच्चशिक्षण आहे यावरुन ते अधिक पसंतीस व आदरास पात्र आहेत असा विचार करता का? असे आहे, तर तुमच्या भावनांच्या आधाराचा तुम्ही गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे.
हे योग्य दर्जे आहेत का?
हिंदू वर्ल्ड या पुस्तकाने हे निरिक्षिले: “मागास वर्गातील कोणी एकाने एखाद्या ब्राह्मणाला मारले तर त्याचा मरूपर्यंत छळ केला जाई व त्याची मालमत्ता जप्त करण्यात येत असे, व त्याचा आत्मा सर्वकाळासाठी धिक्कारला जाई. ब्राह्मणाने कोणाला मारल्यास त्याला केवळ दंड केला जाई व मृत्यूची शिक्षा त्याला कधीच होत नव्हती.” जरी हे पुस्तक प्राचीन काळाबद्दल बोलते पण आज काय? ह्या विसाव्या शतकात सुद्धा जातीय कलुषितपणा आणि वर्णभेदाच्या तणावामुळे रक्ताचे पाट वाहिले आहेत. व हे केवळ भारतापुरतेच मर्यादित नाही. आफ्रिकातील वर्णभेदाच्या विरोधी धोरणामुळे घृणा व हिंसाचार चिरस्थायी आहे, अमेरिकेतील कलुषितपणा, बाल्टीकमधील राष्ट्रवादी कलुषितपणा—ही यादी अशीच वाढत जाते—हे सर्व जन्मापासून श्रेष्ठत्वाच्या भावनांमुळे झाले आहे. निश्चितच जातीभेदामुळे किंवा राष्ट्रीयत्वामुळे एखाद्यास इतरांपेक्षा अधिक पसंत केल्याने चांगली, शांतीदायक फळे निर्माण झाली नाहीत.
संपत्तीविषयी काय? पुष्कळ लोक ईमानदारी, काबाडकष्ट करुन श्रीमंत झाले आहेत यात काहीही शंका नाही. तथापि, मोठी मालमत्ता छुप्या रितीने काम करणाऱ्या लोकांनी म्हणजे चोर, काळा बाजार करणारे, मादक औषधांचा व्यापार करणारे, बेकायदेशीर हत्यारे विकणारे, आणि इतरांनी साठवली आहे. हे सत्य आहे की यातील काही धर्मार्थ संस्थाना दान देतात किंवा गरीबांना मदत करणाऱ्या काही योजनांना पाठिंबा देतात. तरीसुद्धा, त्यांच्या गुन्हेगारीच्या कृत्याचे शिकार बनलेल्यांना पुष्कळ दुःख व अत्यंत दारिद्य्र आणले आहे. जे लाच घेतात असे लोक, किंवा लुच्चेगिरीचा व्यापार विनिमय करणाऱ्यांना त्यांच्या उत्पादनात किंवा सेवेत अपयश आल्याने, व अपुऱ्या कार्यामुळे त्यांच्यावर निराशा, दुखापत आणि मृत्यू देखील ओढावला आहे. खरोखर, संपत्ती मालमत्ता अनुकूल निर्णयासाठी आधार ठरत नाही.
मग आता शिक्षणाच्या बाबतीत काय? एखाद्याच्या नावापुढे मोठ्या पदव्या व सन्मानाची यादी असली तर ती तो व्यक्ती ईमानदार व चांगला आहे याची हमी देते का? याचा अर्थ त्या व्यक्तीकडे आम्ही पसंतीने पहावे असा होतो का? शिक्षण एखाद्याची सीमा वाढवू शकते, ही गोष्ट खरी आहे आणि अनेकांनी त्यांच्या शिक्षणाचा उपयोग इतरांच्या फायद्यासाठी केल्यामुळे ते सन्मान व आदर मिळण्याच्या पात्रतेचे आहेत. परंतु इतिहास सर्वसामान्य लोकांची सुशिक्षित वर्गाकडून पिळवणूक व दडपशाही यांच्या उदाहरणाने पूर्ण भरलेला आहे. महाविद्यालय किंवा विद्यापीठात आज काय होत आहे याचाही विचार करा. विद्यापीठाच्या आवारात मादक औषधांचा दुरूपयोग आणि लैंगिक संक्रमणामुळे झालेल्या आजारांच्या समस्यां जडलेल्या आहेत, आणि पुष्कळ विद्यार्थी केवळ पैसा, अधिकार व नावलौकिक मिळवण्यासाठी विद्यापिठात प्रवेश घेतात. एखाद्या व्यक्तिचे केवळ शिक्षण त्याचे खरे चारित्र्य दर्शवित नाही.
दुसऱ्या व्यक्तीची योग्यता मोजण्यासाठी त्वचेचा रंग, शिक्षण, पैसा, भिन्नजाती किंवा इतर गोष्टी योग्य आधार देत नाहीत. इतरांकडून कृपापसंती मिळविण्याच्या प्रयत्नात ख्रिश्चनांनी अधिक मग्न होऊ नये. तर मग एखाद्याने कशाविषयी काळजी करावी? कोणत्या दर्जानुसार एखाद्याने चालले पाहिजे?