शिक्षण—यहोवाची स्तुती करण्यासाठी त्याचा वापर करा
“जो आपल्या मनचे बोलतो तो स्वतःचेच गौरव पाहतो; परंतु आपणाला ज्याने पाठविले त्याचे गौरव जो पाहतो तो खरा आहे व त्याच्यामध्ये अनीति नाही.”—योहान ७:१८.
१. शिक्षणाच्या प्रक्रियेची सुरवात कधी आणि कशाप्रकारे झाली?
शिक्षणाची सुरवात अनेक वर्षांआधी झाली. महान शिक्षक आणि प्रशिक्षक यहोवा देवाने त्याच्या ज्येष्ठ पुत्राची निर्मिती केल्यानंतर लगेचच शिक्षणाची प्रक्रिया चालू झाली. (यशया ३०:२०; कलस्सैकर १:१५) हाच पहिला विद्यार्थी होता जो महान शिक्षकाकडून थेट प्रशिक्षण प्राप्त करू शकत होता! पित्यासोबतच्या अगणित सहस्रकांच्या निकट सहवासामध्ये, त्या पुत्राने—जो येशू ख्रिस्त म्हणून प्रचलित झाला—यहोवा देवाच्या गुणांचे, कार्यांचे आणि उद्देशांचे अनमोल प्रशिक्षण प्राप्त केले. त्यानंतर, पृथ्वीवर मानव या नात्याने येशू म्हणू शकला: “मी आपण होऊन काही करत नाही तर मला पित्याने शिकविल्याप्रमाणे मी ह्या गोष्टी बोलतो.” (तिरपे वळण आमचे.)—योहान ८:२८.
२-४. (अ) योहानाच्या ७ व्या अध्यायानुसार, सा. यु. ३२ मध्ये मंडपाच्या सणाच्या वेळी येशू उपस्थित असताना त्याच्या सभोवार कोणती परिस्थिती होती? (ब) येशूच्या शिकवण्याच्या क्षमतेबद्दल यहुदी बुचकळ्यात का पडले होते?
२ येशूला मिळालेल्या प्रशिक्षणाचा त्याने कसा उपयोग केला? त्याने त्याच्या साडेतीन वर्षांच्या पार्थिव सेवेदरम्यान अविश्रांतपणे, जे काही शिकले होते ते इतरांना सांगितले. परंतु मनात एक मुख्य उद्देश ठेवून हे करण्यात आले होते. मग, तो उद्देश कोणता? येशूचे योहानाच्या ७ व्या अध्यायातील शब्द त्याच्या शिक्षणाचा उगम आणि उद्देशाबद्दल जे वर्णन देतात त्याचे आपण परीक्षण करू या.
३ या दृश्याची कल्पना करा. तो शरदऋतू होता, येशूचा बाप्तिस्मा होऊन जवळजवळ तीन वर्षांनंतर म्हणजे, सा. यु. ३२ चा तो काळ होता. यहुदी लोक निवासमंडपाच्या सणासाठी जेरुसलेममध्ये एकत्र जमले होते. सणाच्या सुरवातीच्या काही दिवसांमध्ये, येशूविषयी खूप चर्चा झाली होती. अर्धा सण झाल्यावर येशू मंदिरात जाऊन शिकवू लागला. (योहान ७:२, १०-१४) नेहमीप्रमाणे, त्याने स्वतःला थोर शिक्षक शाबीत केले.—मत्तय १३:५४; लूक ४:२२.
४ योहानाच्या ७ व्या अध्यायाचे १५ वे वचन म्हणते: “ह्यावरून यहूदी आश्चर्य करून म्हणू लागले, ‘शिकवल्यावाचून ह्याला विद्या कशी आली?’” ते बुचकळ्यात का पडले होते त्याचे कारण तुम्हाला माहीत आहे का? येशू कोणत्याही प्रकारच्या रब्बींच्या शाळेमध्ये गेला नसल्यामुळे तो अशिक्षित होता की काय—असे त्यांना वाटत होते! तरीही, येशू इब्री पवित्र लिखाणांतील भाग सहजपणे काढून वाचू शकत होता. (लूक ४:१६-२१) अहो, या गलिली सुताराने तर त्यांना मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षण देखील दिले! (योहान ७:१९-२३) हे कसे शक्य होते?
५, ६. (अ) येशूने त्याच्या शिक्षणाच्या उगमाचे विवरण कसे दिले? (ब) येशूने त्याच्या शिक्षणाचा उपयोग कसा केला?
५ येशूने स्पष्टीकरण दिले, ते आपण १६ आणि १७ वचनात वाचतो: “माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठविले त्याची आहे. जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे करावयाची मनीषा बाळगील त्याला ही शिकवण देवापासून आहे किंवा मी आपल्या मनचे बोलतो हे समजेल.” येशूला कोणाकडून शिक्षण मिळाले होते ते त्यांना माहीत करून घ्यावयाचे होते, व त्याने त्यांना स्पष्टपणे सांगितले, की त्याने देवाकडून शिक्षण प्राप्त केले होते!—योहान १२:४९; १४:१०.
६ येशूने त्याच्या प्रशिक्षणाचा वापर कसा केला? योहान ७:१८, मध्ये लिहिल्याप्रमाणे येशू म्हणाला: “जो आपल्या मनचे बोलतो तो स्वतःचेच गौरव पाहतो; परंतु आपणाला ज्याने पाठविले त्याचे गौरव जो पाहतो तो खरा आहे व त्याच्यामध्ये अनीति नाही.” ‘सर्वज्ञ’ असलेल्या यहोवाचे गौरव करण्यासाठी येशूने त्याच्या प्रशिक्षणाचा उपयोग केला हे किती उचित आहे! (तिरपे वळण आमचे.)—ईयोब ३७:१६.
७, ८. (अ) शिक्षणाचा उपयोग कसा केला पाहिजे? (ब) समतोल शिक्षणाचे चार मूलभूत हेतू कोणते आहेत?
७ अशा प्रकारे आपण येशूकडून एक मौल्यवान धडा शिकतो—स्वतःचे गौरव करण्यासाठी नव्हे तर यहोवाचे गौरव करण्यासाठी शिक्षणाचा उपयोग केला पाहिजे. शिक्षणाचा योग्य वापर करण्याचा यापेक्षा कोणताही उत्तम मार्ग नाही. तेव्हा, यहोवाचे गौरव करण्यासाठी तुम्ही शिक्षणाचा कसा वापर करू शकता?
८ शिक्षण देणे याचा अर्थ, “औपचारिक प्रशिक्षणाद्वारे शिक्षण देणे तसेच खासकरून एखादे कौशल्य, व्यापार किंवा धंद्यात देखरेखीखाली परिपाठ करणे,” असा होतो. आता आपण समतोल शिक्षणाच्या चार हेतुंचा विचार करू या आणि यहोवाचे गौरव करण्यासाठी त्या प्रत्येकाचा वापर कसा करता येतो ते पाहू या. समतोल शिक्षणामुळे आपल्याला (१) वाचण्यास, (२) सुवाच्य लिहिण्यास, (३) मानसिक तसेच नैतिकरीत्या विकसित होण्यास, आणि (४) दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेले व्यावहारिक प्रशिक्षण प्राप्त करण्यास मदत झाली पाहिजे.
चांगले वाचण्यास शिकणे
९. चांगला वाचक होणे महत्त्वपूर्ण का आहे?
९ चांगले वाचण्यास शिकणे हे यादीत सर्वात प्रथम आहे. चांगला वाचक होणे इतके महत्त्वपूर्ण का आहे? द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिआ स्पष्टीकरण देतो: “वाचणे, . . . शिकण्यास मूलभूत तसेच दैनंदिन जीवनातील सर्वात महत्त्वपूर्ण कौशल्यांमधील एक आहे. . . . कुशल वाचक समृद्ध, उत्पादक समाज निर्माण करण्यासाठी हातभार लावतात. त्यासोबतच, ते स्वतः संपूर्ण, अधिक समाधानकारी जीवनाचा आनंद लुटतात.”
१०. देवाच्या वचनाचे वाचन कशा प्रकारे आपल्याला संपूर्णतेत, अधिक समाधानकारी जीवनाचा आनंद लुटण्यास मदत करते?
१० सामान्यतः, वाचन आपल्याला “संपूर्ण, अधिक समाधानकारी जीवनाचा आनंद” लुटण्यास मदत करत असल्यास, देवाच्या वचनाचे वाचन करण्याबाबत हे किती खरे असेल! अशा प्रकारचे वाचन, यहोवाचे विचार आणि उद्देश समजण्यासाठी आपल्या मनाला आणि अंतःकरणाला ग्रहणक्षम्य बनवते आणि यांची स्पष्ट समज मिळाल्याने आपल्या जीवनाला अर्थ मिळतो. त्याचबरोबर, “देवाचे वचन सजीव, सक्रिय” आहे असे इब्रीयांस ४:१२ म्हणते. आपण जसजसे देवाच्या वचनाचे वाचन व त्यावर मनन करतो तसे आपल्याला त्याच्या लेखकाच्या अगदी समीप आणले जाते व त्याचे अधिक प्रिय लोक होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये बदल करण्यास प्रवृत्त होतो. (गलतीकर ५:२२, २३; इफिसकर ४:२२-२४) आपण जे मौल्यवान सत्य वाचतो ते इतरांना सांगण्यास देखील प्रवृत्त होतो. या सर्वांमुळे महान शिक्षक, यहोवा देवाचे गौरव होते. नक्कीच, वाचण्याच्या आपल्या क्षमतांचा उपयोग करण्याचा यापेक्षा कोणताही उत्तम मार्ग नाही!
११. व्यक्तिगत अभ्यासाच्या समतोल कार्यक्रमात काय समाविष्ट असले पाहिजे?
११ आपल्यातील सर्व आबालवृद्धांना चांगल्याप्रकारे वाचण्यासाठी उत्तेजन दिले जाते कारण वाचणे आपल्या ख्रिस्ती जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. देवाच्या वचनाच्या नियमित वाचनासोबत, व्यक्तिगत अभ्यासाच्या समतोल कार्यक्रमात, शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे यातील बायबल वचनांवर विचार-विमर्श, टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांचे लक्षपूर्वक वाचन आणि ख्रिस्ती सभांची तयारी हे सर्व समाविष्ट असेल. आणि ख्रिस्ती सेवेबद्दल काय? स्पष्टतः, जाहीरपणे प्रचार करण्यासाठी, आस्थेवाईक लोकांकडे जाऊन पुनर्भेटी देण्यासाठी व गृह बायबल अभ्यास चालवण्यासाठी चांगल्याप्रकारे वाचता आले पाहिजे.
सुवाच्य लिहिण्यास शिकणे
१२. (अ) सुवाच्य लिहिण्यास शिकणे इतके महत्त्वपूर्ण का आहे? (ब) पूर्वी कधीही न केलेले सर्वात महान लिखाण कोणते?
१२ समतोल शिक्षणाने आपल्याला सुवाच्य लिहिण्यास मदत केली पाहिजे हा दुसरा हेतू होय. लेखन, केवळ आपले शब्द आणि कल्पनाच व्यक्त करत नाहीत तर त्यांना जतन करून देखील ठेवते. अनेक शतकांआधी, सुमारे ४० यहुदी लोकांनी, ज्याला प्रेरित शास्त्रवचने म्हटली जातात ती वचने पपायरस किंवा चर्मपत्रावर कोरली. (२ तीमथ्य ३:१६) ते सर्वोत्तम लिखाण अपूर्व होते! यहोवाने त्या पवित्र वचनांच्या पुष्कळ नकला करण्यासाठी अनेक शतकांपासून मार्गदर्शन केले यात काही शंका नाही म्हणूनच ती पवित्र वचने आपल्यापर्यंत विश्वसनीय रूपात पोहंचली आहेत. यहोवाने त्याचे शब्द मौखिकरीत्या पाठवण्यावर अवलंबून न राहता ते लिहून ठेवले त्याबद्दल आपण त्याचे आभारी नाही का?—पडताळा निर्गम ३४:२७, २८.
१३. इस्राएलांना लिहावयास येत होते हे कशावरून सूचित होते?
१३ प्राचीन काळी, मेसोपोटामिया आणि इजिप्तमधील शास्त्र्यांप्रमाणे केवळ काही विशिष्ट विशेषाधिकार प्राप्त वर्ग साक्षर होते. इतर राष्ट्रांच्या अगदी विरुद्धतेत, इस्राएलमधील प्रत्येकाला साक्षर होण्याचे उत्तेजन दिले होते. अनुवाद ६:८, ९ मध्ये, इस्राएलांना त्यांच्या घराच्या बाह्यांवर लिहिण्याची आज्ञा स्पष्टरीत्या लाक्षणिक असली तरी, त्यांना लिहिणे माहीत होते हे त्यावरून सूचित होते. लहानपणापासूनच मुलांना लिहिण्यास शिकवले जात असे. प्राचीन इब्री लिखाणांचे सर्वात जुने उदाहरण म्हणजे गेझर दिनदर्शिका, शाळेत जाणाऱ्या मुलाचा स्मरण पाठ होता असे काही विद्वानांना वाटते.
१४, १५. लिहिण्याच्या क्षमतेचा उपयोग करण्याचे काही सकारात्मक आणि हितकारक मार्ग कोणते?
१४ परंतु आपण सकारात्मक आणि हितकारक मार्गाने लिहिण्याच्या क्षमतेचा कशा प्रकारे उपयोग करू शकतो? निश्चितच, सभा, संमेलने आणि अधिवेशनांमध्ये टिपण घेण्याद्वारे. ‘थोडक्यात लिहिलेले’ एखादे पत्र देखील, आजारी असलेल्या कोणा व्यक्तीला उत्तेजन देऊ शकते किंवा ज्यांनी आपल्याला दया वा आदरातिथ्य दाखवले त्या आध्यात्मिक बंधू किंवा भगिनीचे आभार प्रकट करू शकते. (१ पेत्र ५:१२) मंडळीतील कोणी, मृत्यूमध्ये आपल्या प्रिय व्यक्तीला गमावले असेल तर एखादे संक्षिप्त पत्र किंवा कार्ड आपल्या वतीने त्या व्यक्तीला “धीर” देईल. (१ थेस्सलनीकाकर ५:१४) कर्करोगामुळे आपल्या आईला गमावलेल्या एका ख्रिस्ती बहिणीने म्हटले: “एका मैत्रिणीने मला एक छानसे पत्र लिहिले. त्यामुळे मला बरीचशी मदत मिळाली कारण मी ते पत्र वारंवार वाचू शकत होते.”
१५ लिहिण्याच्या क्षमतेचा उपयोग करण्याचा एक सर्वोत्तम मार्ग म्हणजे राज्याची साक्ष देण्यासाठी एखादे पत्र लिहून यहोवाचे गौरव करणे होय. काही वेळा, एकाकी क्षेत्रांमध्ये राहणाऱ्या नव्यानेच आस्था घेणाऱ्यांसोबत संपर्क साधणे जरुरीचे असेल. आजारपणामुळे तुम्हाला तात्पुरत्या काळासाठी घरोघरी जाणे कठीण होईल. तेव्हा एखाद्या व्यक्तीबरोबर तुम्ही सामान्यपणे जे बोलाल तेच एका पत्राद्वारे कळवू शकता.
१६, १७. (अ) कोणता अनुभव, राज्याची साक्ष देण्यासाठी पत्र लिहिण्याचे मूल्य दर्शवतो? (ब) तुम्ही असाच एखादा अनुभव सांगू शकता का?
१६ एका उदाहरणाचा विचार करा. अनेक वर्षांआधी, स्थानिक वृत्तपत्रामध्ये एका मनुष्याच्या मृत्यूविषयीची बातमी आल्यावर एका साक्षीदाराने त्या मनुष्याच्या विधवा पत्नीला पत्राद्वारे राज्याची साक्ष दिली. पण तिचे काही उत्तर आले नाही. त्यानंतर, नोव्हेंबर १९९४ मध्ये म्हणजे जवळजवळ २१ वर्षांनंतर, त्या साक्षीदाराला त्या स्त्रीच्या मुलीकडून एक पत्र मिळाले. मुलीने लिहिले होते:
१७ “एप्रिल १९७३ मध्ये, तुम्ही माझ्या आईला माझ्या बाबांच्या मृत्यूनंतर सांत्वनपर पत्र लिहिले होते. मी त्या वेळेला नऊ वर्षांची होते. माझ्या आईने बायबलचा अभ्यास केला खरा परंतु ती अजूनही यहोवाची सेविका झालेली नाही. परंतु, तिच्या अभ्यासामुळे मी सत्याच्या संपर्कात आले. सन १९८८ मध्ये—तुमचे पत्र मिळाल्याच्या १५ वर्षांनंतर मी बायबलचा अभ्यास करण्यास आरंभ केला. मार्च ९, १९९० रोजी माझा बाप्तिस्मा झाला. अनेक वर्षांआधी तुम्ही लिहिलेल्या पत्रासाठी मी आपले खूप आभार मानते आणि तुम्ही पेरलेले बीज यहोवाच्या साहाय्याने वाढले हे सांगावयास मला अतिशय आनंद होत आहे. माझ्या आईने मला आपले पत्र सांभाळून ठेवावयास दिले, व तुम्ही कोण आहात हे मी जाणू इच्छिते. माझे पत्र तुम्हाला मिळेलच अशी मी आशा करते.” अनेक वर्षांपूर्वी पत्र लिहिणाऱ्या साक्षीदाराला, त्या मुलीचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक असलेले पत्र मिळाले. त्या तरुण स्त्रीला साक्षीदाराकडून दूरध्वनी आला तेव्हा किती आनंद झाला असेल याची कल्पना करा. साक्षीदार व्यक्ती आजही पत्राद्वारे राज्य आशा इतरांना सांगत आहे!
मानसिक, नैतिक, आणि आध्यात्मिकरीत्या विकास करणे
१८. बायबल काळामध्ये, पालकांनी त्यांच्या मुलांच्या मानसिक आणि नैतिक शिक्षणाची काळजी कशा प्रकारे घेतली?
१८ समतोल शिक्षणाने आपल्याला मदत झाली पाहिजे असा तिसरा हेतू म्हणजे मानसिक आणि नैतिकरीत्या विकास करणे. बायबल काळामध्ये मुलांचे मानसिक आणि नैतिक शिक्षण, पालकांच्या प्राथमिक जबाबदाऱ्यांपैकी एक समजले जात होते. मुलांना केवळ लिहिण्यास व वाचण्यासच शिकवले जात नव्हते तर अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना देवाच्या नियमानुसार शिक्षण दिले जात होते ज्यामध्ये त्यांच्या जीवनाच्या सर्व कार्यांचा समावेश होता. अशा प्रकारे, शिक्षणामध्ये त्यांच्या धार्मिक बंधनांविषयीचे आणि विवाह, कौटुंबिक नातेसंबंध आणि लैंगिक नैतिकतांवर नियमन करणाऱ्या तत्त्वांविषयीचे तसेच त्यांच्या सहमानवाबाबत त्यांच्या कर्तव्याविषयीचे प्रशिक्षण समाविष्ट होते. ह्या शिक्षणाने त्यांना केवळ मानसिकरीत्या व नैतिकरीत्या विकास करण्यासच मदत केली नाही तर आध्यात्मिकरीत्या देखील मदत केली.—अनुवाद ६:४-९, २०, २१; ११:१८-२१.
१९. उत्तम नैतिक मूल्यांनुसार जीवन जगण्याचे दाखवणारे व आध्यात्मिकरीत्या वाढण्यास मदत करणारे शिक्षण आपल्याला कोठे मिळू शकेल?
१९ आजची परिस्थिती काय आहे? योग्य प्रकारचे प्रापंचिक शिक्षण महत्त्वाचे आहे. ते आपल्याला मानसिकरीत्या विकसित होण्यास मदत करते. परंतु, जगण्याकरता तसेच आध्यात्मिकरीत्या विकास करण्याकरता उत्तम प्रकारची नैतिक मूल्ये दाखवणाऱ्या शिक्षणासाठी आपण कोठे जाऊ शकतो? ख्रिस्ती मंडळीमध्ये आपल्याला ईश्वरशासित शिक्षण कार्यक्रम सुलभ आहे व हा कार्यक्रम पृथ्वीवर इतरत्र कोठेही उपलब्ध नाही. बायबलच्या आपल्या व्यक्तिगत अभ्यासाद्वारे आणि बायबल आधारित प्रकाशनांद्वारे तसेच मंडळीच्या सभा, संमेलने आणि अधिवेशने यांच्याद्वारे आपण हे अमुल्य, सतत चालू असलेले शिक्षण—ईश्वरी शिक्षण—मोफत प्राप्त करू शकतो! ते आपल्याला काय शिकविते?
२०. ईश्वरी शिक्षण आपल्याला काय शिकवते व त्याचे कोणते परिणाम आहेत?
२० आपण बायबलचा अभ्यास करण्यास सुरवात करतो तेव्हा मूलभूत शास्त्रवचनीय शिकवणी, ‘प्राथमिक बाबी’ शिकतो. (इब्रीयांस ६:२) आपण जसजसे प्रगती करतो तसे “जड अन्न”—म्हणजेच, सखोल सत्यांना आत्मसात करतो. (इब्रीयांस ५:१४) परंतु त्याहूनही अधिक म्हणजे, देव जसे इच्छितो तसे जीवन व्यतीत करण्यास शिकवणारी ईश्वरी तत्त्वे आपण शिकतो. उदाहरणार्थ, आपण ‘देहाला अशुद्ध’ करणाऱ्या सवयी आणि रीती टाळण्यास आणि अधिकार, शरीर आणि इतरांच्या मालमत्तेचा आदर करण्यास शिकतो. (२ करिंथकर ७:१; तीत ३:१, २; इब्रीयांस १३:४) यासोबतच, आपल्या कार्यांमध्ये प्रामाणिक तसेच कष्टाळू होण्याच्या महत्त्वाची तसेच लैगिंक नैतिकतेबद्दल असलेल्या बायबल आज्ञांनुसार जगण्याच्या मूल्याची गुणग्राहकता आपण बाळगू लागतो. (१ करिंथकर ६:९, १०; इफिसकर ४:२८) या तत्त्वांना आपल्या जीवनात लागू करून आपण जशी प्रगती करत जातो तसे आपण आध्यात्मिकरीत्या वाढत राहतो आणि देवासोबतचा आपला नातेसंबंध अधिक गाढ होतो. त्याशिवाय, आपले ईश्वरी आचरण आपण कोठेही राहत असलो तरी आपल्याला चांगले नागरिक बनवते. आणि हे, ईश्वरी शिक्षणाच्या उगमाचे—यहोवा देवाचे गौरव करण्यास इतरांना प्रवृत्त करू शकते.—१ पेत्र २:१२.
दैनंदिन जीवनासाठी व्यावहारिक प्रशिक्षण
२१. बायबलच्या काळात मुलांना कोणते व्यावहारिक प्रशिक्षण मिळाले?
२१ एखाद्या व्यक्तीला दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेली व्यावहारिक मदत पुरवणे हा समतोल शिक्षणाचा चौथा हेतू आहे. बायबल काळातील पालकीय शिक्षणात व्यावहारिक प्रशिक्षणाचा समावेश होता. मुलींना घरातील कामे शिकवली जात. नीतिसूत्राचा शेवटला अध्याय दाखवतो की ती अनेक व वेगवेगळी कामे असावीत. अशा प्रकारे मुली कताई, विणकाम, स्वयंपाक, व घरातील सामान्य कामांची काळजी घेणे, व्यापार आणि स्थावर संपदेचा व्यवहार करण्यास सज्ज झाल्या. मुलांना सामान्यपणे त्यांच्या वडिलांचा प्रापंचिक व्यवसाय म्हणजे शेती किंवा दुसरा व्यापार वा हस्तकला शिकवली जाई. येशू त्याचा दत्तक पिता, योसेफकडून सुतारकाम शिकला; म्हणूनच त्याला केवळ “सुताराचा पुत्र” असेच नव्हे तर “सुतार” असेही संबोधले जात होते.—मत्तय १३:५५; मार्क ६:३.
२२, २३. (अ) शिक्षणाने मुलांना कशासाठी तयार केले पाहिजे? (ब) आवश्यकता असल्यास पुढील शिक्षण घेण्याची निवड करण्यामागे आपला कोणता हेतू असला पाहिजे?
२२ आज देखील तारतम्य असलेल्या शिक्षणात, काही दिवसांसाठी एखाद्या कुटुंबाच्या गरजांची काळजी घेण्यासाठी तयारी करण्याचा समावेश होतो. १ तीमथ्य ५:८ मधील प्रेषित पौलाचे शब्द सूचित करतात, की एखाद्याच्या कुटुंबाची तरतूद करणे ही एक पवित्र जबाबदारी आहे. त्याने लिहिले: “जर कोणी स्वकीयांची व विशेषेकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे; [तो] माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसापेक्षा वाईट आहे.” तेव्हा, शिक्षणाने मुलांना जीवनातील भावी जबाबदाऱ्यांसाठी तयार केले पाहिजे तसेच समाजातील कष्टाळू सदस्य होण्यास सुसज्ज केले पाहिजे.
२३ आपण किती प्रापंचिक शिक्षण घेतले पाहिजे? राष्ट्राराष्ट्रांमध्ये त्यात फरक असेल. पण कायद्याने मागणी केलेल्या कमीतकमी शिक्षणाव्यतिरिक्त नोकऱ्यांची उपलब्धता अधिक प्रशिक्षणाची मागणी करत असल्यास, अशाप्रकारचे जादा शिक्षण किंवा प्रशिक्षण यांचे संभवनीय फायदे अथवा तोटे यांना तोलून त्याबद्दल निर्णय घेण्याकरता मुलांना मार्गदर्शन देणे पालकांवर अवलंबून आहे. परंतु, जेव्हा आवश्यकता असते तेव्हा पुढील शिक्षणाची निवड करताना एखाद्याचे कोणते हेतू असले पाहिजेत? धन, आत्म-सन्मान किंवा गौरव हे नक्कीच नसावे. (नीतिसूत्रे १५:२५; १ तीमथ्य ६:१७) आपण येशूच्या उदाहरणातून जो धडा शिकलो त्याची आठवण करा—यहोवाचे गौरव करण्यासाठी शिक्षणाचा उपयोग केला पाहिजे. आपण पुढील शिक्षण निवडले तर ख्रिस्ती सेवेमध्ये शक्य तितक्या प्रमाणात यहोवाची सेवा करता येऊ शकेल म्हणून स्वतःची पर्याप्त रीतीने तरतूद करण्याच्या इच्छेने आपण प्रवृत्त झाले पाहिजे.—कलस्सैकर ३:२३, २४.
२४. येशूकडून शिकलेला कोणता धडा आपण कदापि विसरू नये?
२४ यास्तव, समतोल प्रापंचिक शिक्षण प्राप्त करण्यासाठी आपण मनःपूर्वक प्रयत्न करू या. यहोवाच्या संघटनेमधील सतत चालू असलेल्या ईश्वरी शिक्षणाच्या कार्यक्रमाचा आपण पूर्ण फायदा घेऊ या. तसेच आपण येशू ख्रिस्त, पृथ्वीवरील सुविद्य मनुष्य—याजकडून जो धडा शिकलो तो कधीही विसरू नये—की शिक्षणाचा उपयोग, स्वतःचे गौरव करण्यासाठी नव्हे तर सर्वांचा शिक्षक, यहोवा देव याचे गौरव करण्यासाठी केला पाहिजे!
तुमचे उत्तर काय आहे?
◻येशूने त्याच्या शिक्षणाचा वापर कसा केला?
◻चांगल्याप्रकारे वाचण्यास शिकणे महत्त्वपूर्ण का आहे?
◻यहोवाचे गौरव करण्यासाठी आपण लिहिण्याच्या क्षमतेचा उपयोग कसा करू शकतो?
◻ईश्वरी शिक्षण आपल्याला नैतिकरीत्या आणि आध्यात्मिकरीत्या विकास करण्यामध्ये कशाप्रकारे मदत करते?
◻समतोल शिक्षणात कोणते व्यावहारिक प्रशिक्षण समाविष्ट असले पाहिजे?
[१३ पानांवरील चौकट]
शिक्षकांसाठी व्यावहारिक मदत
“आनंदी स्तुतीकर्ते” या १९९५/९६ दरम्यानच्या प्रांतीय अधिवेशनांमध्ये वॉच टावर संस्थेने यहोवाचे साक्षीदार आणि शिक्षण (इंग्रजी), हे नवे माहितीपत्रक प्रकाशित केले. हे ३२ पानांचे रंगीत माहितीपत्रक शिक्षकांसाठी प्रकाशित करण्यात आले आहे. म्हणून आतापर्यंत त्याचे ५८ भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे.
शिक्षकांसाठी माहितीपत्रक कशासाठी? यहोवाच्या साक्षीदारांची मुले असलेल्या विद्यार्थ्यांचे विश्वास योग्य प्रकारे समजण्यासाठी. या माहितीपत्रकात काय आहे? पूरक शिक्षण, वाढदिवस, नाताळ आणि झेंडावंदन यासारख्या बाबींबद्दल आपल्या दृष्टिकोनांचे ते सोप्या आणि रचनात्मक पद्धतीने स्पष्टीकरण देते. ते माहितीपत्रक याची देखील खात्री देते, की आपल्या मुलांनी शाळेचा होता होईल तितका फायदा घ्यावा असे आम्ही इच्छितो तसेच आमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये सक्रिय आस्था घेऊन आम्ही शिक्षकांना प्रामाणिकपणे सहकार्य देऊ इच्छितो.
शिक्षण माहितीपत्रक कसे वापरता येऊ शकते? ते शिक्षकांसाठी बनवण्यात आल्यामुळे आपण शिक्षक, मुख्याध्यापक आणि शाळेतील इतर अधिकाऱ्यांबरोबर त्याची चर्चा करू या. या नवीन माहितीपत्रकाने सर्व शिक्षकांना आपले दृष्टिकोन आणि विश्वास तसेच काही वेळा आपण वेगळे राहण्याच्या आपल्या हक्काचा दावा का करत असतो ते समजण्यास मदत करावी. पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षकांसोबत व्यक्तिगत चर्चा करण्यासाठी या माहितीपत्रकाचा उपयोग करावा असे त्यांना उत्तेजन दिले जाते.
[१० पानांवरील चित्रं]
प्राचीन इस्राएलमध्ये शिक्षणाला खूप महत्त्व दिले जात होते