देवाची कृपा कोणास आहे?
आमच्या मित्रांनी आम्हाला पसंत केले पाहिजे असे आम्हा सर्वांना वाटते. एका ख्रिश्चन व्यक्तीला देवाची कृपा मिळवण्याची तीव्र इच्छा असते. यहोवा देवाबद्दल स्तोत्रसंहिता ८४:११ मध्ये स्पष्ट केले आहे: “परमेश्वर [यहोवा न्यू.व.] अनुग्रह व गौरव देतो. जे सात्विकपणे चालतात त्यास उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही.” येशूच्या जन्माच्या वेळी, स्वर्गीय दूतांच्या आनंदी जयघोषाने “ज्यावर त्याची कृपा झाली आहे अशा मनुष्यांना पृथ्वीवर शांती” प्राप्त होण्याचे अभिवचन दिले!—लूक २:१४, मॉफॅट.
परंतु देव कोणाला कृपा दाखवतो? देवाचे दर्जे मनुष्याच्या दर्जाप्रमाणेच आहेत का? यथायोग्यपणे, या आधीच्या लेखात चर्चिल्यानुसार ते नाहीत. खरे म्हणजे, ख्रिश्चनांना “देवाचे अनुकरण करणारे व्हा” अशी आज्ञा दिली असल्यामुळे, आम्हातील प्रत्येक विचारू शकतो, देव ज्यांना कृपा दाखवतो त्यांना मी कृपापसंती दाखवतो का, किंवा लोकांचा निवाडा करण्यासाठी जगीक दर्जांचे अनुकरण करण्याकडे माझा कल असतो? (इफिसकर ५:१) यहोवाची कृपा व संमती मिळण्यासाठी, आम्ही त्याच्या दृष्टिने पाहण्याची खबरदारी घेतली पाहिजे.
देवाचे उच्च दर्जे
“देव पक्षपाती नाही,” असे प्रेषित पेत्राने म्हटले “तर सर्व राष्ट्रांपैकी जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये धर्मशील आहेत तो त्याला मान्य आहे.” पुढे प्रेषित पौलाने जाहीर केले की देवाने “एकापासून मनुष्याची सर्व रा उत्पन्न केली.” (प्रे. कृत्ये १०:३४, ३५; १७:२६) यामुळे असा निष्कर्ष काढणे योग्य आहे की, त्यांचे कोणतेही शारीरिक गुणधर्म असले तरी सर्व मानव देवाच्या दृष्टिने सारखेच आहेत. असे असल्यामुळे, एखाद्यास तो विशिष्ट धर्मातून आला आहे, किंवा त्याच्या त्वचेच्या रंगामुळे, किंवा तो दुसऱ्या जातीचा आहे म्हणून त्याला कृपा दाखवणे ख्रिश्चनांना शोभणार नाही. उलटपक्षी, त्याने येशू ख्रिस्ताच्या उदाहरणाचे अनुकरण करावे, त्याने कोणताही पक्षपात दाखवला नाही. याची त्याच्या शत्रूंनीसुद्धा साक्ष दिली.—मत्तय २२:१६.
“वर-वर” हा शब्दप्रयोग काही वेळा जे उथळ आहे किंवा खोल नाही त्याचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. त्वचेचा रंग त्याप्रमाणेच आहे; तो केवळ वरवरचाच आहे. एखाद्याच्या त्वचेचा रंग त्याचे व्यक्तीत्व किंवा आंतरी गुण प्रदर्शित करीत नाही. मैत्री करण्याची निवड करण्याबाबतीत, खाण्याच्या, किंवा हात मिळवण्यासंबंधाने आम्ही निश्चितच त्वचेचा रंग पाहू नये. लक्षात असू द्या, की अत्यंत सुंदर व प्रेमाची कविता रचलेल्या कुमारीने स्वतःविषयी असे म्हटले: “मी काळीसावळी पण सुरुप आहे, . . .मी काळीसावळी आहे, कारण मी उन्हाने होरपळले आहे.” (गीतरत्न १:५, ६) कृपा दाखवण्यासाठी जात व रंग योग्य आधार नाहीत. महत्वाची गोष्ट म्हणजे एखादा यहोवाचे भय बाळगून धार्मिकतेची कामे करतो का ही आहे.
भौतिक मालमत्ता असणे याविषयी देवाला काय वाटते? देव ज्या लोकांवर प्रीती करतो व कृपा दाखवतो त्यात सर्व प्रथम त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त आहे. तरीही, पृथ्वीवर असताना येशूला “डोके टेकावयास ठिकाण नव्हते.” (मत्तय ८:२०) त्याच्या मालकीची जमीन, घरे, शेती, फळझाडे, किंवा गुरेढोरे नव्हती. असे असूनही, यहोवाने त्याचा सन्मान केला व त्याला सृष्टीत स्वतः देवाव्यतिरिक्त इतर सर्वांपेक्षा उंच केले.—फिलिप्पैकर २:९.
येशूने देवाची कृपा, तो भौतिक मालमत्तेत संपन्न होता म्हणून नव्हे तर, चांगल्या कामात श्रीमंत होता म्हणून संपादन केली. (पडताळा १ तीमथ्य ६:१७, १८.) त्याने त्याच्या अनुयायांना असा बोध केला: “पृथ्वीवर आपणांकरिता संपत्ती साठवू नका. तेथे कसर व जंग खाऊन नाश करतात, आणि चोर घर फोडून चोरी करतात. तर स्वर्गात आपणांकरता संपत्ती साठवा. तेथे कसर व जंग खाऊन नाश करत नाहीत व चोर घर फोडून चोरी करीत नाहीत.” (मत्तय ६:१९, २०) यास्तव, जे या जगाच्या मालमत्तेत समृद्ध आहेत केवळ त्यांनाच पसंत करण्याऐवजी, ख्रिस्ती जगीक संपत्तीच्या जोरावर कोणताही भेदभाव करणार नाहीत. भौतिक दृष्टिने गरीब किंवा श्रीमंत असोत, तरी देवाठायी श्रीमंत असणाऱ्यांचा ते शोधून काढतील. हे कधीही विसरु नका की, “लोक दृष्टिने जे दरिद्री त्यांस विश्वासासंबंधाने धनवान होण्यास आणि जे राज्य देवाने आपणांवर प्रीती करणाऱ्यांस देऊ केले त्यांचे वारीस होण्यास त्याने निवडले आहे.” (याकोब २:५) तुम्ही देवाचा दृष्टिकोन बाळगल्यास, भौतिकरित्या श्रीमंत असणाऱ्यांची मर्जी संपादन करण्याच्या सामान्य रीतीचे किंवा दुसऱ्याची पसंती मिळवण्यासाठी भक्ष्य बनणार नाहीत.
शिक्षणासंबंधाने, पवित्र शास्त्र स्पष्ट दाखवते की ज्ञान व बुद्धीचा शोध करण्याचे देव आम्हाला आर्जवतो, येशू ख्रिस्त पृथ्वीवर होऊन गेलेला एक थोर शिक्षक होता. (नीतीसूत्रे ४:७; मत्तय ७:२९; योहान ७:४६) परंतु जगीक बुद्धी किंवा शिक्षण देवाबरोबर कृपा मिळवीत नाही. याच्या विपरीत प्रेषित पौल आम्हाला सांगतो की “ज्ञानी असे फार नाहीत. तरी ज्ञान्यांस लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले.”— १ करिंथकर १:२६, २७.
देव शिक्षण संस्थेतील उच्च प्रापंचिक शिक्षणात शिकवल्या जाणाऱ्या विषयात नव्हे, तर त्याचा शब्द पवित्र शास्त्रात सापडणारी “शुद्ध भाषा” याच्या सत्यात चांगल्यारितीने शिक्षित झालेल्यांना कृपा दाखवतो. (सफन्या ३:९) वास्तविकपणे, पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे यहोवाच स्वतः त्याच्या लोकांना शिकवत आहे. यशया संदेष्ट्याने भाकित केल्यानुसार, सर्व राष्ट्रातील लोक असे म्हणून प्रतिसाद देतात की “चला आपण परमेश्वर [यहोवा न्यू. व.] च्या पर्वतावर याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ तो आम्हास आपले मार्ग शिकवो म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू.” यास्तव, जगीक शिक्षणाची स्तुती करण्याऐवजी, ख्रिश्चन त्यांच्या शब्दाद्वारे, व कामाद्वारे हे दाखवतील की खरोखर त्यांनी “परमेश्वरापासून [यहोवा, न्यू.व.] शिक्षण” घेतलेले आहे. असे करण्याद्वारे, देव देत असलेली “मोठी शांती” त्यांना मिळेल.—यशया २:३; ५४:१३.
आम्हाला देवाची कृपा मिळू शकते
होय, दुसऱ्यांना कृपा बहाल करण्यात देवाचे दर्जे, मनुष्याच्या दर्जापेक्षा फारच वेगळे आहेत. तरीसुद्धा, त्याच्या दृष्टीत आम्हाला कृपा प्राप्त करावयाची असेल तर आम्ही त्याच्याच मार्गाने स्वत:ला मार्गदर्शित होऊ देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याचाच अर्थ आम्ही इतरांकडे देव जसा पाहतो तसे पाहण्यास शिकले पाहिजे, मनुष्याच्या दर्जाप्रमाणे नाही कारण ते स्वार्थी किंवा कलुषित असू शकतात. आम्ही हे कसे करु शकतो?
यहोवा देव मनुष्याचे हृदय पारखतो, व जे प्रीती, चांगुलपणा, दया आणि सहनशीलता दाखवतात त्यांना तो कृपा दाखवतो. (१ शमुवेल १६:७; गलतीकर ५:२२, २३) आम्ही मानवांना त्याच्या त्वचेचा रंग किंवा भिन्न जातीयता पाहण्याऐवजी होता होईल तेवढे आंतरी व्यक्तीस पाहण्याची जरूरी आहे. जे भौतिक गोष्टीत समृद्ध आहेत अशांचा शोध घेत राहण्यापेक्षा, आम्ही समृद्धतेच्या बाबतीत देवाचा दृष्टिकोन लक्षात घेणे जरुरीचे आहे व “सत्कर्मांविषयी धनवान असावे, दानशील, परोपकारी असण्या”साठी प्रयत्न केला पाहिजे. (१ तीमथ्य ६:१८) देवाची कृपा मिळवण्यासाठी, आम्ही देवाचे व त्याचा पुत्र येशू ख्रिस्ताचे अचूक ज्ञान घेण्याचा सतत शोध व सत्याच्या शुद्ध भाषेत सुशिक्षित झाले पाहिजे. (योहान १७:३, १७) असे केल्याने, देव ज्यांना कृपा दाखवितो त्यातील आम्ही देखील असू.