यहोवाची सेवा निष्ठावंतपणे करा
“निष्ठावान जनाशी तू निष्ठेने वागतोस.”—२ शमुवेल २२:२६, न्यू.व.
१. जे यहोवाशी निष्ठावान राहातात त्यांच्याशी तो कसे कार्य करतो?
यहोवा त्याच्या लोकांसाठी जे करीत आहे त्याबद्दल त्याला परत फेड करता येऊ शकणार नाही. (स्तोत्रसंहिता ११६:१२) त्याच्या आध्यात्मिक आणि शारीरिक देणग्या व करुण दया किती विस्मयकारक आहेत! पुरातन इस्त्राएलाच्या दाविद राजाला हे माहित होते की जे देवाशी नष्ठावान राहतात त्यांच्याशी तो निष्ठावान राहतो. “त्याला परमेश्वराने [यहोवा, न्यू.व.] त्याच्या सर्व शत्रूपासून व शौलाच्या हातातून सोडविले” तेव्हा त्याने ज्या गाण्याचे संकलन केले त्यात त्याने तसे म्हटले.—२ शमुवेल २२:१.
२. दाविदाच्या २ शमुवेलाच्या २२व्या अध्यायात उधृत केलेल्या गीतातून कोणते मुद्दे सादर केले आहेत?
२ प्रार्थनेचे उत्तर देताना यहोवा “सोडविणारा” अशा स्तुतीने दाविदाने त्याच्या (स्तोत्रसंहिता १८च्या समांतरतेत) गीताचा आरंभ केला. (२ शमुवेल २२:२-७) त्याच्या स्वर्गीय मंदिरातून, त्याच्या निष्ठावान सेवकाला शक्तिशाली सैन्यापासून सोडविण्यासाठी देवाने कार्य केले. (वचन ८-१९) यासाठीच दाविदाला त्याचे बक्षीस मिळाले कारण त्याने योग्य मार्ग अनुसरला व यहोवाच्याच मार्गाने चालला. (वचन २०-२७) देवाने दिलेल्या शक्तिमुळे त्याने केलेल्या महत्कृत्यांची यादी आता यानंतर आहे. (वचन २८-४३) शेवटी, दाविदाने त्याच्या घरच्या निंदकापासून व इतर राष्ट्रांतील शत्रूपासून मिळालेल्या सुटकेचे वर्णन केले व यहोवाचे उपकार मानिले की “तो आपल्या राजाचा मोठा उद्धार करितो; आपल्या अभिषिक्ताला वात्सल्य दाखवतो.” (वचने ४४-५१) आम्ही नेकीचा मार्ग धरला व शक्तीसाठी त्याच्यावर अवलंबून राहीलो तर यहोवा आम्हाला देखील सोडवू शकतो.
निष्ठावान राहण्याचा काय अर्थ होतो
३. शास्त्रवचनीय दृष्टिकोनातून, निष्ठावान होण्याचा काय अर्थ होतो?
३ दाविदाचे सुटकेचे गीत आम्हाला हे सांत्वनदायक हमी देते: “दयाळू [“निष्ठावान” न्यू.व.] जनाशी तू दयेने [“निष्ठेने” न्यू.व.] वागतोस.” (२ शमुवेल २२:२६) चा․सीदʹ इब्री विशेषण आहे ज्याचा अर्थ “कोणी निष्ठावान,” किंवा “प्रेमळ कृपा असलेला” असा होतो. (स्तोत्रसंहिता १८:२५, तळटीप) चेʹसेह ही संज्ञेत दयेचा विचार समाविष्ट आहे व ही त्याबाबतीत असलेला उद्देश पूर्ण होत नाही तोपर्यंत एखाद्या गोष्टीला चिकटून राहाते. ही दया यहोवा त्याच्या सेवकासाठी व्यक्त करतो, व त्याचे सेवकही त्याच्यासाठी व्यक्त करतात. या धार्मिक पवित्र निष्ठावंतपणास “प्रेमळ कृपा” व “निष्ठावान प्रेम” असे अनुवादित केले आहे. (उत्त्पत्ती २०:१३; २१:२३) ग्रीक शास्त्रवचनात, “निष्ठावंतपणा”चा पवित्रता आणि खोल आदर अशा अर्थाने बोध होतो व त्याचे होसिओट्स हे नाम व होसिओस हे विशेषण बनते. अशा निष्ठावंतपणात विश्वासूपणा व भक्ती आणि देवाच्या बाबतीत सर्व कर्तव्याचे काळजीपूर्वक पालन करणे समाविष्ट आहे. यहोवाशी निष्ठावान राहण्याचा अर्थ, उपासनेद्वारे त्याला मजबूत रितीने एखाद्या शक्तीशाली चिकटपट्टीसारखे चिकटून राहणे होय.
४. यहोवाचा निष्ठावंतपणा कसा दिसून येतो?
४ यहोवाचा निष्ठावंतपणा अनेक मार्गांद्वारे दिसून येतो. उदाहरणार्थ, त्याच्या लोकांवरील निष्ठावान प्रेम व त्याच्या न्यायासोबत आणि धार्मिकतेशी निष्ठावंतपणामुळे यहोवा दुष्टांविरूद्ध कायदेशीर कारवाई करतो. (प्रकटीकरण १५:३, ४; १६:५) अब्राहामाबरोबर केलेल्या कराराशी निष्ठावंतपणा राखल्यामुळे त्याला इस्राएलांच्या बाबतीत सहनशील राहण्याकडे निरविले. (२ राजे १३:२३) जे देवाशी निष्ठावान राहतात त्यांनी त्याच्या मदतीची अपेक्षा त्यांच्या निष्ठावान मार्गाक्रमणाच्या शेवटपर्यंत बाळगता येईल व याची खात्री बाळगता येईल की तो त्यांची आठवण ठेवील. (स्तोत्रसंहिता ३७:२७, २८; ९७:१०) देवाचा प्रमुख “निष्ठावान जन” असल्यामुळे त्याचा जीव शिओलात राहू दिला जाणार नाही या माहितीमुळे येशूला शक्ती मिळाली.—स्तोत्रसंहिता १६:१०; प्रेषितांची कृत्ये २:२५, २७.
५. यहोवा निष्ठावान असल्यामुळे, तो त्याच्या सेवकाकडून कशाची अपेक्षा करतो, आणि कोणते प्रश्न विचारात घेण्याजोगे आहेत?
५ यहोवा देव निष्ठावान असल्यामुळे त्याच्या सेवकाकडून तो निष्ठावंतपणाची अपेक्षा करतो. (इफिसकर ४:२४) उदाहरणार्थ, मंडळीत वडील या नात्याने नेमणूक करण्यासाठी लोकांनी योग्य बनण्यासाठी निष्ठावान असले पाहिजे. (तीतास पत्र १८) यहोवाची सेवा निष्ठावानपणे करीत राहण्यासाठी त्याच्या लोकांना कोणत्या गोष्टी प्रवृत्त करतील?
शिकलेल्या गोष्टींबद्दल गुणग्राहकता
६. ज्या शास्त्रवचनीय गोष्टी आपण शिकलो त्याबद्दल आम्हाला कसे वाटले पाहिजे, ह्या ज्ञानाविषयी आम्ही काय आठवणीत ठेवले पाहिजे?
६ शिकलेल्या शास्त्रीय गोष्टींबद्दल कृतज्ञता आम्हाला यहोवाची सेवा निष्ठावानपणे करीत राहण्यास प्रवृत्त करील. प्रेषित पौलाने तीमथ्याला आर्जविले: “तू ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी खात्री झाली त्या धरुन राहा. त्या कोणापासून शिकलास हे आणि तुला पवित्र शास्त्राची माहिती बालपणापासून आहे हे तुला ठाऊक आहे, ते ख्रिस्त येशूमधील तुझ्या विश्वासाच्याद्वारे तारणासाठी तुला ज्ञानी करावयास समर्थ आहे.” (२ तीमथ्य ३:१४, १५) हे ज्ञान देवाकडून “विश्वासू व बुद्धिमान दासां”करवी आले आहे याची आठवण ठेवा.—मत्तय २४:४५-४७.
७. विश्वासू दासांकरवी देव पुरवित असलेल्या आध्यात्मिक अन्नाकडे वडीलांनी कोणत्या दृष्टिने पाहावे?
७ विश्वासू दासांकरवी देवाने पुरविलेल्या आध्यात्मिक अन्नाची गुणग्राहकता खासपणे नियुक्त वडीलांनी बाळगली पाहिजे. काही वर्षापूर्वी काही वडील गुणग्राहकता दाखवण्यास उणे पडले. एका निदर्शिकेने निरक्षिले ही मनुष्ये “द वॉचटावर मधील लेखाच्या बाबतीत टीका करणारे होते, सत्य शिकवण्यासाठी. . .देवाचे माध्यम म्हणून त्याचा स्वीकार त्यांना करायचा नव्हता, त्यांच्या विचाराप्रमाणे दुसऱ्यांवर प्रभाव पाडण्यासाठी ते कायम प्रयत्न करीत असत.” तथापि, निष्ठावान वडील विश्वासू दासाकरवी देव पुरवित असलेल्या कोणत्याही आध्यात्मिक अन्नाचा कोणी नकार करावा असा प्रभाव पाडत नाहीत.
८. विश्वासू दासाने सादर केलेल्या काही शास्त्रीय मुद्यांची जर आम्ही पूर्णपणे समज मिळवू शकलो नाही तर मग काय?
८ यहोवाचे समर्पित सेवक असल्यामुळे आम्ही सर्व त्याला व त्याच्या संस्थेला निष्ठावान असले पाहिजे. धर्मत्यागी मार्ग पत्करून आम्ही देवाच्या विस्मयकारक प्रकाशातून बाजूला होण्याचे मनातही आणू नये कारण तो मार्ग आता आध्यात्मिक मृत्यूस प्रवृत्त करू शकतो व कालांतराने नाश आणू शकतो. (यिर्मया १७:१३) परंतु समजा, विश्वासू दासाने सादर केलेले काही मुद्दे स्वीकार करण्यासाठी किंवा पूर्णपणे त्याची गुणग्राहकता बाळगणे कठीण वाटले तर मग काय? मग आम्ही सत्य कोठे शिकलो हे नम्रपणे कबूल करा व याचा शेवट संबंधित प्रकरणाचे अधिक स्पष्टरूपाने स्पष्टीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या संकटांचा सामना करण्यासाठी प्रार्थना करा.—याकोब १:५-८.
खिस्ती बंधुत्वाची गुणग्राहकता बाळगा
९. ख्रिश्चनांना संगतीचा आत्मा असला पाहिजे हे १ योहान १:३-६ कसे दाखविते?
९ आमच्या ख्रिस्ती बंधुत्वात अस्तित्वात असलेल्या संगतीचा आत्म्याबद्दलची मनःपूर्वक गुणग्राहकता, यहोवाची सेवा निष्ठावानपणे करण्याची आणखी प्रेरणा देतो. खरे पाहता, देव व ख्रिस्ताबरोबरचे आमचे नाते ह्या आत्म्याविना आध्यात्मिक दृष्टिने बळकट होऊ शकत नाही. प्रेषित योहानाने अभिषिक्त ख्रिश्चनांना सांगितले: “जे आम्ही पाहिजे व ऐकले आहे ते तुम्हासही यासाठी कळवितो की तुमचीही आम्हाबरोबर भागी [“संगत,” डायग्लॉट] व्हावी. आपली भागी तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याजबरोबर आहे. त्याच्याबरोबर आपली भागी आहे असे जर आपण म्हणतो आणि अंधारात चालतो तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही.” (१ योहान १:३-६) हे तत्व सर्व ख्रिश्चनांना, त्यांची आशा स्वर्गीय असो की पार्थिव असो लागू होते.
१०. युवदीया व सुंतुखेला वैयक्तिक समस्या सोडविण्यास त्रास झाला होता, तरी पौलाने या स्त्रियांकडे कोणत्या दृष्टिने पाहिले?
१० संगतीचा आत्मा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नांची जरूरी आहे. उदाहरणार्थ, ख्रिस्ती स्त्रिया युवदीया व सुंतुखेला दोघीमधील समस्या सोडविणे फारच अवघड वाटले. पौलाने त्यांना आर्जविले: “प्रभूच्या ठायी एकचित्त व्हा.” त्याने पुढे म्हटले: “माझ्या जोडीच्या हे खऱ्या सोबत्या, मी तुलाहि विनंती करितो की ह्या ज्या स्त्रियांनी सुवार्वेच्या कामी मजबरोबर श्रम केले त्यांना साहाय्य कर, तसेच क्लेमेंत व ज्यांची नावे जीवनी पुस्तकात आहेत असे माझे बाकीचे सहकारी यानांही कर.” (फिलिप्पैकर ४:२, ३) ह्या धार्मिक स्त्रिया व इतरांनी पौलासोबत मिळून “सुवार्तेच्या कामी” लढत दिली, व त्याला याची खात्री होती की ते ‘ज्यांची नावे जीवनी पुस्तकात होती’ यांच्यामधील होते.
११. एखादा निष्ठावान ख्रिस्ती जेव्हा आध्यात्मिक समस्येचा सामना करतो, कोणती गोष्ट लक्षात ठेवणे योग्य असेल?
११ यहोवाच्या संस्थेत जे काही करण्याचा ख्रिश्चनांना विशेषाधिकार मिळाला आहे व त्याची सेवा ते कशी निष्ठावानपणे करीत आहे हे दाखविण्यासाठी ते सन्मान चिन्ह लावत नाही. त्यांना आध्यात्मिक समस्या आहे, तर अनेक वर्षापासून यहोवाला करीत असलेल्या निष्ठावान सेवेकडे दुर्लक्ष करण्यात खरोखर प्रेमाचा किती अभाव दिसून येईल! ज्याला “जोडीचा खरा सोबती” म्हटलेला निष्ठावान बंधू होता, जो इतरांना मदत करण्यासाठी तयार होतात. तुम्ही जर वडील आहात, तर तुम्ही “खरा सोबती” आहात का व तुम्ही दयाशील मार्गाने मदत देण्यासाठी तयार असता का? देवाप्रमाणे आम्ही सर्वांनीच, समविश्वासूनी केलेल्या चांगल्या गोष्टीना विचारात घेतले पाहिजे, व त्यांची ओझी वाहण्यास प्रेमळपणे त्यांना साहाय्य केले पाहिजे.—गलतीकर ६:२; इब्रीयांस ६:१०
दुसरा पर्याय नाही
१२. येशूच्या विधानामुळे ‘शिष्यातील पुष्कळ जण परत गेले,’ तेव्हा पेत्राने कोणती भूमिका घेतली होती?
१२ सार्वकालिक जीवनासाठी दुसरा पर्याय नाही नाही हे जर आम्ही लक्षात ठेवले तर यहोवाच्या संस्थेसोबत यहोवाची निष्ठावंतपणे सेवा करण्यासाठी आम्ही प्रवृत्त होऊ शकू. येशूच्या विधानाने ‘शिष्यातील पुष्कळ जण परत गेले,’ तेव्हा त्याने त्याच्या प्रेषितांना विचारले: “तुम्हालाही निघून जाण्याची इच्छा आहे काय?” पेत्राने उत्तर दिले: “प्रभूजी आम्ही कोणाकडे जावे? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळच आहेत; आणि आपण देवाचे पुत्र आहा असा आम्ही विश्वास धरिला आहे व ओळखले आहे.”—योहान ६:६६-६९.
१३, १४. (अ) पहिल्या शतकातील यहुदी धर्माला ईश्वरी मर्जी का मिळू शकली नाही? (ब) देवाच्या दृश्य संस्थेविषयी अनेक वर्षापासून असलेला एक यहोवाचा साक्षीदार काय म्हणतो?
१३ “सार्वकालिक जीवनाची वचने” पहिल्या शतकातील यहूद्यांच्या धर्मसंप्रदायात सापडली नाहीत. त्याचे मुळ पाप येशूचा मसीहा म्हणून स्वीकार केला नाही हे होते. यहुदी धर्मसंप्रदाय कोणत्याही प्रकाराने एकनिष्ठतेने इब्री शास्त्रवचनावर आधारलेला नव्हता. सदुकी देवदूतांच्या अस्तित्वाचा स्वीकार करीत नव्हते व पुनरुत्थानावर त्यांचा विश्वास नव्हता. परूशी त्यांच्या या विचाराशी सहमत नव्हते, तरी त्यांनी अशास्त्रीय संप्रदायाद्वारे पापाने देवाचे वचन व्यर्थ बनविले. (मत्तय १५:१-११; प्रे. कृत्ये २३:६-९) या संप्रदायांनी यहूद्यांना दास बनविले आणि येशूचा स्वीकार करण्यास अनेकांना मुश्किलीचे केले. (कलस्सैकर २:८) शौल (पौल) त्याच्या ‘पित्याच्या संप्रदायाच्या आवेशामुळे’ अजानतेत ख्रिस्ताच्या शिष्यांचा फार वाईट रितीने छळ करत होता.—गलतीकर १:१३, १४, २३.
१४ यहुदी धर्म देवाच्या मर्जीस अंतरला, परंतु त्याच्या पुत्राच्या मिळून बनलेल्या अनुयायांना—‘चांगल्या कामात तत्पर असे लोक’ यांना यहोवाने आशीर्वादीत केले. (तीतास पत्र २:१४) ती संस्था आजही अस्तित्वात आहे व अनेक वर्षापासून असलेल्या एका यहोवाच्या साक्षीदाराने तिच्याबद्दल म्हटले: “माझ्यासाठी एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे व ती म्हणजे यहोवाच्या संस्थेच्या जवळ राहणे होय. माझ्या गत अनुभवाने मला शिकवले की मानवाच्या तर्कावर भरवसा ठेवणे किती असमाधानकारक आहे. एकदा त्यावर मी दृढ निश्चय केला, तेव्हापासून विश्वासू संस्थेत राहण्याचा दृढ संकल्प केला. यहोवाची मर्जी व आशीर्वाद एखाद्याला कसे मिळू शकतील?” ईश्वरी मर्जी व सार्वकालिक जीवनासाठी दुसरा पर्याय नाही.
१५. यहोवाच्या दृश्य संस्थेला व जे त्यात जबाबदारी पार पाडीत आहेत अशांना सहयोग का दिला पाहिजे?
१५ यहोवाच्या संस्थेला सहयोग देण्यासाठी आमच्या हृदयाने आम्हास प्रवृत्त केले पाहिजे कारण तिलाच केवळ त्याच्या आत्म्याने मार्गदर्शित केले जात आहे व केवळ तीच त्याचे नाव आणि उद्देश कळवीत आहे. अर्थातच, त्यामध्ये जबाबदाऱ्या सांभाळणारे लोक अपूर्ण आहेत. (रोमकर ५:१२) परंतु, अहरोन व मिर्याम मोशेने मध्ये दोष शोधला व देवाने त्यांना नव्हे तर त्याला जबाबदारी दिलेली आहे हे ते विसरले तेव्हा त्यांच्यावर “परमेश्वराचा [यहोवा, न्यू.व.] क्रोध भडकला.” (गणना १२:७-९) आज निष्ठावान ख्रिस्ती “जे पुढाकार घेतात” त्यांना सहयोग देतात कारण यहोवा याचीच अपेक्षितो करतो. (इब्रीयांस १३:७, १७[न्यू.व.]) आमच्या निष्ठावंतपणात ख्रिस्ती सभांना नियमितपणे उपस्थित राहणे व विवेचन मांडणे याचा समावेश आहे यामुळे इतरांना ‘प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन’ मिळते.—इब्रीयांस १०:२४, २५.
उभारणीकारक असा
१६. इतरांसाठी काय करण्याची इच्छा देखील यहोवाची सेवा निष्ठावानपणे करीत राहण्यास आम्हाला प्रवृत्त करील?
१६ उभारणीकारक असण्याची इच्छा इतरांना यहोवाची सेवा निष्ठावानपणे करीत राहण्यास प्रवृत्त करील. पौलाने लिहिले: “ज्ञान फुगवते, प्रीती वृद्धि करिते.” (१ करिंथकर ८:१) एखाद्या प्रकारचे ज्ञान संपादन करणाऱ्यास जसे फुगविते, तसे प्रीती देखील प्रदर्शित करणाऱ्यास उभारणीकारक ठरू शकते असा पौलाने अर्थ घेतला असावा. विस आणि इंग्लिश या दोन प्राध्यापकांकरवी लिहिण्यात आलेल्या पुस्तकात म्हटले आहे: “ज्या व्यक्तिकडे प्रीती करण्याची योग्यता आहे त्याच्यावर देखील परत प्रीती केली जाते. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सदिच्छा व इतरांची कदर वाढविण्याची योग्यता. . . या उभारणीकारक प्रभावांमुळे जे ही भावना वाढवतात त्यांच्यासाठी व जे तिचा स्वीकार करतात या दोघांनाही आनंद मिळतो.” प्रीती दाखविल्यामुळे आम्ही स्वतःची व त्याचप्रमाणे इतरांची उभारणी करीत असतो हे येशूच्या शब्दावरुन सूचित होते: “घेण्यापेक्षा देणे ह्यात धन्यता आहे.”—प्रे. कृत्ये २०:३५.
१७. प्रीती उभारणीकारक कशी ठरते आणि काय करण्यापासून ती आम्हाला सुरक्षित ठेवील?
१७ पौलाने १ करिंथकर ८:१ मध्ये वापरलेला अ․गाʹपे हा ग्रीक शब्द तात्विक प्रेम सूचित करतो. ती उभारणी करते कारण ती सहनशील आहे दयाळू, सर्व काही सहन करते, कधी खचत नाही. ही प्रीती गर्व, ईर्ष्या अशा घातक भावनांना काढून टाकते. (१ करिंथकर १३:४-८) आमच्याप्रमाणेच आमचेही बांधव अपूर्ण आहेत यामुळे ही प्रीती त्यांच्याविषयी कुरकूर करण्यापासून आम्हाला सुरक्षित ठेवील. पहिल्या शतकातील खऱ्या ख्रिश्चनामध्ये “अभक्तीने वागणारी मनुष्ये” जी “नकळत आत शिरली” यांच्यासारखे न होण्यासाठी आम्हाला ही सुरक्षित ठेवील. ही मनुष्ये ‘प्रभूत्व तुच्छ लेखत होते व थोर जनांची निंदा करत होते,’ आणि साहजिकच अभिषिक्त ख्रिस्ती पर्यवेक्षक ज्यांना विशेष गौरवाची अनुमती होती त्यांची निंदा करत होते. (यहुदा ३, ४ ८) यहोवाला निष्ठावंत राहून, यासारख्या प्रलोभनास आम्ही कधीही बळी न पडो.
दियाबलास विरोध करा!
१८. यहोवाच्या लोकांना काय करण्याची सैतानाची इच्छा आहे, परंतु तो हे का करु शकत नाही?
१८ देवाचे लोक या नात्याने सैतानाला आमची एकता नष्ट करावयाची आहे याचे ज्ञान आम्हाला निष्ठेने यहोवाच्या सेवेत वाढ करण्यास मदत करील. देवाच्या सर्व लोकांना त्यापासून दूर करायला सैतानाला इच्छा आहे व पृथ्वीवरील दियाबलाचे सेवक कधी कधी सत्य उपासकांना मारूनही टाकतात. परंतु, त्या सर्व उपासकांना मारून टाकण्यास देव त्याला अनुमती देणार नाही. येशू “मरणावर धनीपणा करणारा म्हणजे सैतान, याला आपल्या मरणाने नाहीसे करावे” म्हणून मरण पावला. (इब्रीयांस २:१४) खासपणे, १९१४मध्ये येशू स्वर्गात राजा झाला व त्याने वरून खाली टाकल्यामुळे सैतानाचे अधिपत्य गाजविण्याचे क्षेत्र मर्यादित झाले आहे. यहोवाच्या नियुक्त वेळी येशू सैतान व त्याच्या संस्थेचा नाश करील.
१९. (अ) वर्षांपूर्वी या मासिकाने सैतानाच्या प्रयत्नांबद्दल कोणता इशारा दिला? (ब) सैतानाचे पाश टाळण्यासाठी, समविश्वासूबरोबर वागताना कोणती काळजी आम्ही घेण्यास हवी?
१९ या मासिकाने एकदा इशारा दिला होता: “दियाबल सैतानाने देवाच्या लोकात अव्यवस्थितपणा आणला, त्यांच्या मधील झगडे व भांडणास कारणीभूत झाला, किंवा स्वार्थी प्रवृत्ती दाखविण्यामुळे किंवा तिच्या वाढीमुळे भाऊबंदातील प्रीती नाश होत असेल तर यामुळे त्यांना गिळंकृत करण्यास त्याला यश मिळू शकते.” (द वॉचटावर, मे १, १९२१, पृष्ठ १३४) निंदा, एक दुसऱ्याबरोबर भांडण करण्याद्वारे दियाबलाला आमची एकता तोडू देऊ नका. (लेवीय १९:१६) यहोवाची निष्ठावानपणे सेवा करणाऱ्यांची आम्ही व्यक्तीगतपणे हानी किंवा त्यांच्यासाठी जीवन अधिक मुश्कीलीचे करून सैतानाला आम्हावर मात करू देऊ नये. (पडताळा २ करिंथकर २:१०, ११.) याऐवजी, पेत्राचे शब्दाचे आम्ही अनुकरण करू या: “सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू, सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो. पण त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा.” (१ पेत्र ५:८, ९) सैतानाच्या विरुद्ध दृढ उभे राहिल्याने आम्ही आमची आशीर्वादित एकता यहोवाचे लोक या नात्याने टिकवून ठेवू शकतो.—स्तोत्रसंहिता १३३:१-३.
प्रार्थनाशीलपणे देवावर अवलंबून राहा
२०, २१. प्रार्थनाशीलपणे यहोवावर भरवसा ठेवण्याचा संबंध निष्ठावंतपणे त्याची सेवा करण्याशी कसा आहे?
२० प्रार्थनाशीलपणे देवावरील भरवसा यहोवाची सेवा निष्ठावानपणे करीत राहण्यास मदत करतो. आम्ही जेव्हा पाहतो की तो आमच्या प्रार्थनांना उत्तर देतो, तेव्हा आम्ही त्याच्या अधिकच निकट जातो. प्रेषित पौलाने लिहिले तेव्हा त्याने प्रार्थनाशीलपणे यहोवा देवावर भरवसा ठेवण्याचे आर्जविले होते: “माझी इच्छा अशी आहे की प्रत्येक ठिकाणी पुरूषांनी राग व विवाद ह्यांचा स्पर्श होऊ न देता पवित्र हस्त उच्च करून प्रार्थना करावी.” (१ तीमथ्य २:८) उदाहरणार्थ, वडीलांनी देवावर प्रार्थनाशीलपणे अवलंबून राहाणे किती महत्वपूर्ण आहे! यहोवाशी असलेल्या निष्ठावंतपणाचा पुरावा मंडळीतील बाबींची चर्चा करण्यासाठी एकत्र येत असताना न संपणारा वादविवाद आणि राग टाळण्यास मदत होऊ शकते.
२१ प्रार्थनाशीलपणे यहोवा देवावर भरवसा ठेवल्याने त्याच्या सेवेत विशेषाधिकार सांभाळण्यास साहाय्य होऊ शकते. एक व्यक्तीने यहोवाची सेवा निष्ठावंतपणे काही दशके केली तो म्हणू शकला: “देवाच्या जगव्याप्त संस्थेत आम्हाला दिलेल्या कोणत्याही जबाबदारीचा स्वेच्छेने स्वीकार करणे, आणि आम्हाला दिलेल्या नियुक्तीत स्थिर टिकून राहिल्याने आमच्या प्रयत्नांवर देवाची पसंती आणली जाते. आम्हाला मिळालेली नियुक्ती जरी कमी प्रतीची असेल, तरी ती पूर्ण केल्याशिवाय इतर कोणतीही महत्वाची कामे होऊ शकत नाहीत. यास्तव आम्ही नम्र असलो व आमचे नव्हे तर यहोवाच्या नावाचा महिमा करण्याची आस्था असेल तर मग आम्हाला ही खात्री असेल की आम्ही नेहमीच ‘स्थिर, अढळ व प्रभूच्या कामात सर्वदा अति तत्पर आहोत”—१ करिंथकर १५:५८.
२२. यहोवाच्या अनेक आशीर्वादांचा आमच्या निष्ठावंतपणावर कसा परिणाम झाला पाहिजे?
२२ यहोवाच्या सेवेत आम्ही काहीही करीत असलो, तरी आम्हासाठी जे काही तो करीत आहे त्याची आम्ही कधीही परतफेड करू शकत नाही. देवाच्या संस्थेत आम्ही खरोखर किती सुरक्षित आहोत, व अशा लोकांनी आम्ही वेढलेलो आहोत जे देवाचे मित्र आहेत! (याकोब २:२३) यहोवाने आम्हाला बंधू प्रीतीमधून उत्पन्न होणारा एकतेचा आशीर्वाद दिला आहे; ही प्रीती इतकी खोलवर मुळावलेली असल्यामुळे सैतान स्वतःदेखील ती उपटून काढू शकत नाही. यास्तव आमच्या निष्ठावान स्वर्गीय पित्याला चिकटून राहा व त्याचे लोक या नात्याने ऐक्यतेत काम करा. आता व सदासर्वकाळासाठी यहोवाची निष्ठावंतपणे आपण सेवा करू या.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
▫ निष्ठावान असण्याचा काय अर्थ होतो?
▫ यहोवाची सेवा निष्ठावंतपणे करीत राहण्यास प्रवृत्त करणाऱ्या काही कोणत्या गोष्टी आहेत?
▫ दियाबलाचा विरोध आम्ही का करावा?
▫ यहोवाचा निष्ठावान सेवक होण्यासाठी प्रार्थना आम्हाला कशी मदत करते?
[३० पानांवरील चित्रं]
यहोवाचे निष्ठावंत सेवक त्यांच्या एकतेचा भंग करण्यासाठी त्यांचा सिंहासारखा विरोधक, दियाबलास वाव देत नाही