वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w93 २/१ पृ. २०-२५
  • यहोवाला दोष देता येणार नाही

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाला दोष देता येणार नाही
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “स्वतःच्या चुका कोणाला दिसतात?”
  • देवाला दोष देण्याचे पातक
  • देवाच्या सेवकासाठी सुद्धा एक धोका
  • यहोवाविरूद्ध कधीच क्रोधिष्ट होऊ नका!
  • यहोवावर कधीच नाराज होऊ नका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • नव्या जगात जाण्यासाठी मुक्‍ततेची तयारी करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • लोटच्या बायकोला आठवणीत ठेवा
    बायबलमधून शिकू या!
  • आपण देवाला खुष करू शकतो का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
w93 २/१ पृ. २०-२५

यहोवाला दोष देता येणार नाही

“जसा बाप आपल्या मुलांवर ममता करितो, तसा परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] आपले भय धरणाऱ्‍यांवर ममता करितो. कारण तो आमची प्रकृति जाणतो, आम्ही केवळ माती आहो हे तो लक्षात ठेवितो.”—स्तोत्रसंहिता १०३:१३, १४.

१, २. अब्राहाम कोण होता, व त्याचा पुतन्या लोट दुष्ट सदोम शहरात राहण्यासाठी कसा आला?

आमच्या चुकांमुळे आम्हाला जो त्रास होतो त्यासाठी यहोवाला जबाबार धरता येणार नाही. या संदर्भात ३,९०० वर्षापूर्वी जे घडले त्याचा विचार करा. देवाचा मित्र अब्राहाम (अब्राम) व त्याचा पुतण्या लोट फार समृध्द झाले होते. (याकोब २:२३) तद्वत, त्यांची मालमत्ता व अन्‍नसामुग्री एवढी होती की ‘त्यांना एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना.’ शिवाय, या दोघांच्या गुराख्यांमध्ये भांडणे होऊ लागली. (उत्पत्ती १३:५-७) मग याबद्दल काय केले जावे?

२ भांडण मिटविण्यासाठी, अब्राहामाने विभक्‍त होण्याचे सुचविले, व पहिली निवड करण्याची संधी त्याने लोटाला प्रथम दिली. अब्राहाम हा वडीलधारी होता व यामुळे त्याच्या पुतण्याने त्याला चांगला प्रदेश प्रथम घेऊ द्यावा हे योग्यच होते—तथापि, यार्देनच्या तळवटीतील सर्वत्र महामूर पाणी असलेल्या उत्त्कृष्ट प्रदेशाची निवड लोटाने केली. त्याचे बाहेरील स्वरूप फसवे होते, त्याच्या जवळपास नैतिकरित्या बिघडलेली सदोम गमोरा ही नगरे होती. लोट व त्याचे कुटुंब ओघाओघाने सदोमात आले, व याने त्यांना आध्यात्मिक जोखीमेत घातले. याशिवाय, कदार्लागोमर व त्याच्या सोबत्यांनी सदोमच्या राजाचा पराजय केल्यावर त्यांना धरून नेले. अब्राहाम व त्याच्या लोकांनी त्यांची सुटका केली, परंतु लोट व त्याचे कुटुंब सदोमात परतले.—उत्पत्ती १३:८-१३; १४:४-१६.

३, ४. देवाने सदोम व गमोराचा नाश केला तेव्हा लोट व त्याच्या कौटुंबिक सदस्याचे काय झाले?

३ सदोम व गमोराच्या लैंगिक कुटिलता व नैतिकतेच्या नीच अवस्थेमुळे यहोवाने त्या नगरांचा नाश करण्याचे ठरवले. दयाशीलपणा दाखवून यहोवाने दोन देवदूतांना पाठविले, ज्यांनी लोट व त्याची पत्नी, व त्यांच्या दोन मुलींना सदोमातून बाहेर काढले. त्यांना मागे पाहायचे नव्हते, परंतु, कदाचित मागे सोडलेल्या भौतिक गोष्टींच्या अभिलाषेमुळे लोटाच्या बायकोने मागे पाहिले असावे. तो ती मिठाचा खांब झाली.—उत्पत्ती १९:१-२६.

४ लोट व त्याच्या मुलींनी किती सहन केले! त्या मुलींना ज्या पुरूषांसोबत त्यांचा विवाह होणार होता त्यांना सोडावे लागले. आता लोट त्याची पत्नी व भौतिक संपत्तीविना होता. ओघाने त्याला त्याच्या दोन्ही कन्येसह गुहेत राहण्याची पाळी आली. (उत्पत्ती १९:३०-३८) त्याला स्वतःला जे चांगले दिसले होते, त्याच्या अगदी विपरीत घडले. त्याने काही गंभीर चुका केल्या होत्या, तरी नंतर त्याला “धार्मिक लोट” म्हटले गेले. (२ पेत्र २:७, ८) यास्तव, लोटाच्या चुकामुळे यहोवाला निश्‍चितपणे दोष देता येणार नव्हता.

“स्वतःच्या चुका कोणाला दिसतात?”

५. चुका व घमंडीपणा याबद्दल दाविदाला कसे वाटले?

५ अपूर्ण व पापी असल्यामुळे आपण सर्व चुका करतो. (रोमकर ५:१२; याकोब ३:२) लोटाप्रमाणे आम्ही बाह्‍य स्वरुपामुळे फसविले जाऊ शकतो व निर्णय घेण्यात चुका करू शकतो. यामुळे दाविदाने विनंती केली: “स्वतःच्या चुका कोणाला दिसतात? गुप्त दोषांपासून मला मुक्‍त कर. तसेच जाणूनबुजून घडणाऱ्‍या पातकांपासून आपल्या सेवकाला आवर; त्यांची सत्ता मजवर न चालो. म्हणजे मी पूर्ण होईन आणि महापातकापासून अलिप्त राहीन.” (स्तोत्रसंहिता १९:१२, १३) दाविदाला हे माहित होते की तो अशाप्रकारचे पातक करील ज्याची त्याला जाणीवही नसेल. यास्तव, त्याच्यापासून कदाचित लपलेल्या काही पापांची क्षमा व्हावी असे त्याने विनवले. चुकीचा मार्ग घेण्यासाठी त्याच्या अपरिपूर्ण शरीराने त्याला टुमणी लावली, व त्याने गंभीर पातक केले तेव्हा त्याने यहोवाच्या मदतीची अपेक्षा केली. देवाने त्याला घमंडीपणाच्या कामातून सोडवावे असे त्याला वाटत होते. घमंडीपणा ही त्यावर वर्चस्व गाजविणारी वृत्ती दाविदाला नको होती. तर यहोवा देवाला त्याने पूर्ण भक्‍ती देण्याची इच्छा प्रकट केली.

६. स्तोत्रसंहिता १०३:१०-१४ यातून कोणती सांत्वना मिळू शकते?

६ आधुनिक दिवसातील यहोवाचे समर्पित सेवक असताना, आम्हीदेखील अपूर्ण आहोत व यामुळे चुका करतो. उदाहरणार्थ लोटाप्रमाणे, आमच्या राहण्याच्या जागेसंबंधी आम्ही देखील वाईट निवड करू शकतो. देवाच्या पवित्र सेवेत वाढ करण्याची जबाबदारी आम्ही कदाचित टाळतो. यहोवा अशा चुका पाहतो, परंतु ज्यांचा कल धार्मिकतेकडे आहे अशांना तो ओळखतो. जरी आम्ही घोर पातक केले असेल, परंतु पश्‍चाताप केला तर यहोवा क्षमा करतो, व आम्हाला मदत करतो आणि ईश्‍वरी व्यक्‍ती आहोत अशारितीने तो आमच्याकडे पाहत असतो. “आमच्या पातकांच्या मानाने त्याने आमचे पारिपत्य केले नाही, त्याने आमच्या दुष्कर्मांच्या मानाने आम्हास प्रतिफल दिले नाही,” असे दाविदाने स्पष्ट केले. “कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश फार उंच आहे, तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्‍यांवर विपुल आहे. पश्‍चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आम्हांपासून दूर केले आहेत. जसा बाप आपल्या मुलांवर ममता करितो, तसा परमेश्‍वर आपले भय धरणाऱ्‍यांवर ममता करितो. कारण तो आमची प्रकृती जाणतो; आम्ही केवळ माती आहो हे तो लक्षात ठेवितो.” (स्तोत्रसंहिता १०३:१०-१४) आमचा दयावंत स्वर्गीय पिता आमच्या चुका सुधारण्यास किंवा आमच्या पवित्र सेवेत त्याची स्तुति करण्यासाठी वाढ करण्यास तो आणखी संधी पुरवितो.

देवाला दोष देण्याचे पातक

७. आम्हाला आपत्ती का सहन करावी लागते?

७ जेव्हा चुकीच्या गोष्टी घडतात, तेव्हा दुसऱ्‍याला किंवा कशासाठी तरी झालेल्या चुकीबद्दल दोष देण्याचा मानवी कल असतो. काही तर देवाला दोष देतात. परंतु यहोवा लोकांवर अशी खडतर परिस्थिती आणत नाही. तो चांगले ते करतो नुकसानकारक अशा गोष्टी तो करीत नाही. “तो वाईटावर व चांगल्यावर आपला सूर्य उगवतो, आणि धार्मिकावर व अधार्मिकावरही पाऊस पाडितो.”! (मत्तय ५:४५) आम्हाला आपत्तींचा सामना करावा लागण्याचे प्रमुख कारण म्हणजे ज्या जगात आपण राहत आहोत ते स्वार्थी तत्वानुसार चालत आहे व सैतानाच्या अधीन आहे हे आहे.—१ योहान ५:१९.

८. आदामाच्या विचाराप्रमाणे ज्या गोष्टी झाल्या नाहीत तेव्हा त्याने काय केले?

८ आमच्या चुकामुळे आम्हावर त्रास ओढवतो व यामुळे देवाला दोष दिला जातो. पण हे मूर्खतेचे व धोकादायक आहे. असे करण्यामुळे कदाचित आम्हाला जीवनाची किंमत द्यावी लागेल. पहिला मनुष्य आदाम याने ज्या चांगल्या गोष्टी त्याला मिळाल्या त्याबद्दल देवाला श्रेय दिले पाहिजे होते. होय, जीवनाबद्दल व बागेसमान घर असणाऱ्‍या एदेन बागेतील ज्या आशीर्वादांचा आनंद त्याने घेतला होता त्याविषयी आदामाने यहोवाला अधिक कृतज्ञ असले पाहिजे होते. (उत्पत्ती २:७-९) यहोवाला अवज्ञाकारी बनून मना केलेले फळ खाल्ल्यामुळे ज्या गोष्टी योग्य झाल्या नाहीत त्याबद्दल आदामाने काय केले? आदामाने देवाकडे तक्रार केली: “जी स्त्री तू मला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले.” (उत्पत्ती २:१५-१७; ३:१-१२) निश्‍चितच, आदामाप्रमाणे आम्ही यहोवाला दोष देऊ नये

९. (अ) आमच्या निर्बुध्दि कार्यामुळे संकटांचा सामना करताना आम्हाला कोठून सांत्वन मिळू शकते? (ब) नीतीसुत्रे १९:३ नुसार, काही स्वतःवर संकटे आणतात तेव्हा ते काय करतात?

९ आमच्या मूर्ख कृतिमुळे आम्हाला संकटाचा सामना करावा लागत असेल तर, आमच्या कमतरता आम्हापेक्षा यहोवा अधिक चांगल्यारितीने समजतो व जर आम्ही त्याला एकनिष्ठ भक्‍ती दिली तर तो आम्हाला संकटातून सोडवू शकेल. या गोष्टीद्वारे आम्हाला सात्वंन मिळू शकेल. ईश्‍वरी मदत मिळत असल्यामुळे आम्ही गुणग्राहकता बाळगली पाहिजे. आम्ही स्वतः आमच्यावर जी बिकट अवस्था व संकटे येतात त्याबद्दल देवाला कधीच दोष देऊ नये. पाहिजे. यासंबंधात सूज्ञ नीतीसूत्रे म्हणते: “मनुष्याची मूर्खता त्याला मार्गभ्रष्ट करिते, आणि त्याचे मन परमेश्‍वरावर [यहोवा न्यू.व] रुष्ट होते.” (नीतीसूत्रे १९:३) दुसरा अनुवाद म्हणतो: “काही त्यांच्याच स्वतःच्या मूर्ख कार्यामुळे नाश पावतात व प्रभूला दोष देतात.” (टुडेज इंग्लिश व्हर्शन) आणखी एक अनुवाद असे म्हणतो: “मनुष्याची मूर्खता त्याचे व्यवहार अस्ताव्यस्त करते व तो यहोवापासून दूर पळून जातो.”—बाईंग्टन.

१०. आदामाच्या मूर्खपणाने ‘त्याचा मार्ग कसा विरुप केला’?

१० नीतीसूत्रातील या तत्वाच्या अनुषंगाने आदामाने स्वार्थीपणाने कार्य केले त्याच्या मूर्ख विचाराने ‘त्याचा मार्ग विरूप बनला.’ त्याचे हृदय यहोवा देवापासून दुरावले, व त्याने त्याच्या स्वार्थी मुक्‍त विचारांना पुढे ठेवले. आदाम इतका कृतघ्न बनला की त्याने त्याच्या निर्माकर्त्यास दोष दिला व यामुळे त्याने स्वतःला सर्वसमर्थाचा शत्रू बनविले! आदामाच्या पापाने त्याचा व त्याच्या कुटुंबाचा मार्ग नाशाप्रत नेला. यामध्ये किती मोठा इशारा आहे! ज्यांचा अनिष्ट परिस्थितीबद्दल यहोवाला दोष देण्याचा कल आहे ते स्वतःला असे विचारु शकतात: मी ज्या चांगल्या गोष्टीचा आनंद घेत आहे त्याबद्दल यहोवाला श्रेय देतो का? त्याच्या सृष्टितील एक असल्यामुळे मला जीवन मिळाले याबद्दल मी कृतज्ञ आहे का? माझ्या स्वतःच्या चुकांमुळे कदाचित माझ्यावर संकट आले तर नाही ना? त्याच्या ईश्‍वर प्रेरित वचनात, पवित्र शास्त्रात लिखित करुन ठेवलेल्या मार्गदर्शनाचे अवलंबन करून यहोवाची कृपा व मदतीला मी पात्र आहे का?

देवाच्या सेवकासाठी सुद्धा एक धोका

११. देवाच्या संबंधात, कशाबद्दल पहिल्या शतकातील यहुदी धार्मिक नेते दोषी होते?

११ पहिल्या शतकातील यहुदी धार्मिक नेते यांनी देवाची सेवा करीत असल्याचा दावा केला परंतु त्यांनी त्याच्या सत्य वचनाकडे दुर्लक्ष केले व स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहिले. (मत्तय १५:८, ९) येशूने त्यांची चुकीची धारणा काढून उघड केल्यामुळे, त्यांनी त्याला मारून टाकले. नतंर त्याच्या शिष्यांवर त्यांनी मोठा क्रोध प्रकट केला. (प्रे. कृत्ये ७:५४-६०) त्या लोकांचा मार्ग इतका विरुप होता की ते खरे पाहता यहोवाच्याच विरूद्ध क्रोधित झाले होते.—पडताळा प्रे. कृत्ये ५:३४, ३८, ३९.

१२. कोणते उदाहरण दाखविते की खिस्ती मंडळीबरोबर सहवास राखणारे काही लोक त्यांच्यावर आलेल्या संकटामुळे यहोवाला दोष देण्याचा प्रयत्न करतात?

१२ ख्रिस्ती मंडळ्यातील काहींनी देखील धोकेदायक विचारसरणीत वाढ केली, व ज्या संकटाना त्यांना सामोरे जावे लागले त्याबद्दल त्यांनी देवास जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ, कोणा एका मंडळीतील नेमस्त वडीलांना एका तरूण विवाहीत स्त्रीला जगीक व्यक्‍तीबरोबर संगती न ठेवण्याविषयी दयाळूपणे पण जोरदाररितीने शास्त्रीय सल्ला देणे आवश्‍यक वाटले. एकदा एका चर्चेच्या वेळी, त्या माणसाबरोबर निरतंर संगत ठेवण्याच्या प्रलोभनापासून दृढ राहण्यासाठी देवाने तिला मदत केली नाही म्हणून तिने देवाला दोष दिला! खरे पाहता तिने असे म्हटले की देवाचे नाव काढल्यास ती त्रस्त होत असे! शास्त्रवचनातून समजावणूकीचा व मदतीसाठी केलेल्या प्रयत्नांचा काही उपयोग झाला नाही, तिच्या अनैतिक कामामुळे तिला नंतर मंडळीतून बहिष्कृत करावे लागले.

१३. कुरकुरीची मनोवृत्ती का टाळावी?

१३ कुरकुरीचा आत्मादेखील एखाद्यास देवाला दोष देण्याप्रत निरवू शकतो. पहिल्या शतकातील खिस्ती मंडळ्यात शिरलेल्या “अभक्‍त मनुष्ये” यांच्यात तो वाईट आत्मा होता, व त्याला आध्यात्मिक भ्रष्ट विचारांची साथ मिळाली होती. शिष्य यहुदाने म्हटले, ही मनुष्ये “देवाची कृपा पालटून तिला कामातूरपणाचे स्वरूप आणितात; आणि आपला एकच स्वामी व प्रभू येशू खिस्त याला ते नाकरितात.” यहुदाने हेही म्हटले: “ते लोक कुरकुर करणारे, असंतुष्ट व वासनायुक्‍त असे आहेत.” (यहुदा ३, ४, १६) यहोवाचे निष्ठावंत सेवक त्यांच्या जवळ गुणग्राहकतेचा आत्मा आहे म्हणून, तसेच कालांतराने त्यांना इतकी दुःखी करु शकणारी व देवावरील विश्‍वास ते गमावू शकतील व त्याच्याबरोबरील त्यांचे नातेसंबंध धोक्यात येतील. अशी कुरकुर करण्याची मनोवृत्ती नसावी म्हणून देवाकडे समंजसपणाने प्रार्थना करतील.

१४. सह विश्‍वासू ख्रिश्‍चनाने नाराज केल्यास एखादा कशी प्रतिक्रिया दाखवू शकतो, परंतु हे योग्य का ठरणार नाही?

१४ तुम्हाला असे वाटेल की हे तुमच्या बाबतीत घडणार नाही. तथापि, आमच्या व इतरांच्या चुकांमुळे काही गोष्टी चुकीच्या घडतात, यामुळे शेवटी देवाला दोष देण्याप्रत आम्हाला नेले जाऊ शकते. उदाहरणार्थ, सहविश्‍वासू जे बोलतो व करतो याबद्दल एखादा दुःखीत होऊ शकतो. दुःखीत झालेला व्यक्‍ती—कदाचित त्याने यहोवाची सेवा निष्ठावंतपणे अनेक वर्षापासून केली असेल—नंतर तो असा म्हणू शकतो: ‘तो व्यक्‍ती मंडळीत आहे, तर मी सभांना उपस्थित राहणार नाही.’ तो व्यक्‍ती इतका नाराज झालेला असेल की तो आपल्या हृदयात असे म्हणतो: ‘जर अशाच गोष्टी घडत राहिल्या तर मला मंडळीचा सदस्य या नात्याने राहायचे नाही.’ परंतु ख्रिश्‍चनाठायी अशी मनोवृत्ती असावी का? एखाद्या अपूर्ण मानवाने तुम्हाला नाराज केले आहे, तर मंडळीतील इतर सदस्य ज्यांची देवाला स्वीकृती आहे व ते त्याची सेवा निष्ठावंतपणे करीत आहेत त्यांच्यावर क्रोधित होऊन एवढे का नाराज व्हावे? एखाद्याने यहोवाला समर्पण केले आहे तर त्याने ईश्‍वरी इच्छा करण्याचे थांबून देवापासून दूर का जावे? एखाद्या व्यक्‍तीला किंवा परिस्थितीला एखाद्याचे यहोवाबरोबरील नातेसंबंध तोडू देणे किती समंजसपणाचे ठरेल? निश्‍चितपणे, कोणत्याही कारणामुळे यहोवाची सेवा करण्यापासून थांबविणे हे मूर्खपणाचे व पापी ठरेल.—याकोब ४:१७.

१५, १६. दियत्रफेस कशाबद्दल दोषी होता, परंतु गायसने स्वतःचे वर्तन कसे ठेवले?

१५ कल्पना करा की तुम्ही गायस या प्रेमळ ख्रिश्‍चनाच्या मंडळीत होता. तो भेट देत असलेल्या सह उपासकांना व अनोळखी यांना आदरातिथ्य दाखवित होता. हे त्याचे “विश्‍वासाचे” कृत्य होते. परंतु त्याच मंडळीत, दियत्रफेस हा घमंडी माणूस होता. योहान येशूचा एक प्रेषित आहे व त्याकडील तो कशाचाही आदराने स्वीकार करीत नव्हता. खरे पाहता, दियत्रफेस योहानाविषयी अपशब्द बोलून बडबड करीत असे. प्रेषिताने म्हटले: “तेवढ्याने त्याचे [दियत्रफेस] समाधान न होता तो बंधुजनाचा स्वीकार करीत नाही, आणि जे त्यांचा स्वीकार करावयास पाहतात त्यांस तो मना करितो व मंडळीबाहेर घालवितो.”—३ योहान १, ५-१०.

१६ जर योहान मंडळीत आला, तर दियत्रफेस काय करीत होता याची आठवण करून देण्याकडे त्याचा हेतू असणार होता. याच्या दरम्यान, गायस व इतर आदरातिथ्य करणाऱ्‍या ख्रिश्‍चनांनी कशी प्रतिक्रिया दाखवली? त्यांनी असे म्हटल्याचा कोणताही पुरावा नाही की: ‘जोपर्यंत दियत्रफेस मंडळीत आहे, मी तिचा सदस्य बनू इच्छित नाही. तुम्ही मला सभेत पाहणार नाही.’ निसंशये, गायस व त्यासारख्या इतरांनी दृढ भूमिका राखली. ईश्‍वरी इच्छा करण्यापासून थांबविण्यासाठी त्यांनी कशाला ही कारण होऊ दिले नाही, यामुळे यहोवाविरूद्ध ते क्रोधी बनले नाहीत. ते दियाबल सैतानाच्या धूर्त युक्त्यांना वश झालेच नाहीत, जर त्यांनी यहोवाला अविश्‍वासूपणा दाखवला असता व देवाला दोष दिला असता तर त्याला आनंद झाला असता.—इफिसकर ६:१०-१८.

यहोवाविरूद्ध कधीच क्रोधिष्ट होऊ नका!

१७. जर काही व्यक्‍ती किंवा परिस्थिती आम्हाला असंतुष्ट किंवा नाराज करील तेव्हा आम्ही कसे वागले पाहिजे?

१७ देवाच्या सेवकाला मंडळीतील काही व्यक्‍ती किंवा मंडळीतील परिस्थिती असंतुष्ट किंवा नाराज करीत असेल, जर त्याने यहोवाच्या लोकांबरोबर सहवास राखण्याचे थांबवले तर बदला घेण्याद्वारे तो स्वतःचा मार्ग विचलित करीत असतो. असा व्यक्‍ती स्वतःच्या ज्ञानेंद्रियांचा योग्य वापर करीत नाही. (इब्रीयांस ५:१४) सत्व रक्षक या नात्याने सर्व संकटांचा सामना करण्यासाठी निश्‍चय करा. यहोवा देव, येशू ख्रिस्त, आणि ख्रिस्ती मंडळीस निष्ठावंतपणा टिकवा. (इब्रीयांस १०:२४, २५) चिरकालिक जीवनाप्रत निरविणारे सत्य इतर कोठेही सापडणार नाही.

१८. आम्हाला नेहमीच ईश्‍वरी कृत्ये समजत नसतील, तेव्हा यहोवाबद्दल आम्ही कोणती खात्री बाळगू शकतो?

१८ हे देखील आठवणीत ठेवा की, यहोवा कोणाची परीक्षा वाईट गोष्टीने घेत नाही. (याकोब १:१३) देव प्रेमाचा सारांश आहे, खासपणे जे त्यावर प्रीती करतात, त्यांचे तो चांगले करतो, (१ योहान ४:८) जरी नेहमीच ईश्‍वरी कृत्ये समजत नसतील, तरी आम्हाला हा आत्मविश्‍वास असू शकतो की यहोवा देव त्याच्या सेवकांसाठी चांगले ते करण्यासाठी कधी अपयशी होणार नाही. पेत्राने म्हटले: “देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. त्याजवर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो.” (१ पेत्र ५:६, ७) होय, यहोवा त्याच्या लोकांची खरोखर काळजी घेतो.—स्तोत्रसंहिता ९४:१४.

१९, २०. आमच्या समस्या आम्हाला कधी नाराज करीत असतानादेखील आम्ही कस वर्तावे?

१९ यास्तव, कशाचाही किंवा कोणाचेही तुम्हास अडखळण होऊ देऊ नये. स्तोत्रकत्याने अगदी योग्यपणे म्हटले, “तुझे शास्त्र प्रिय मानणाऱ्‍यांस फार शांती असते त्यांस कशाचाही अडखळा नाही.” (स्तोत्रसंहिता ११९:१६५) आम्ही सर्वच संकटाचा सामना करतो, हे काही वेळा आम्हाला काहीसे नाराज आणि नाउमेद करू शकते. परंतु खासपणे यहोवाविरूद्ध कटूतेला कधीही तुमच्या हृदयात वाढू देऊ नका. (नीतीसूत्रे ४:२३) त्याच्या मदतीमुळे व शास्त्रवचनाच्या आधारे, तुम्हाला सोडविता येणाऱ्‍या समस्यांना हाताळा, व सतत कायमच असतात त्यात धीराने टिकून राहा.—मत्तय १८:१५-१७; इफिसकर ४:२६, २७.

२० तुमच्या भावनांना तुम्ही मूर्खतेने कार्य करू देऊ नका की ज्यामुळे तुमचा मार्ग विचलित बनू शकेल. अशाप्रकारे बोला व वागा ज्यामुळे देवाचे हृदय आनंदी बनू शकेल. (नीतीसूत्रे २७:११) त्याचा एक सेवक या नात्याने तो तुमची काळजी घेतो हे ओळखून यहोवाला कळकळीने प्रार्थना करा. व जीवनाच्या मार्गावर त्याच्या लोकांबरोबर टिकून राहण्यासाठी तो तुम्हास आवश्‍यक समज देईल. (नीतीसूत्रे ३:५, ६) यापेक्षा अधिक म्हणजे यहोवाविरूद्ध क्रोधी होऊ नका. जेव्हा चुकीच्या गोष्टी घडतात यहोवाला दोष देऊ नका.

तुम्ही उत्तर कसे द्याल?

▫ लोटाने कोणती चूक केली, परंतु देवाने त्याकडे कोणत्या दृष्टिने पाहिले?

▫ चुका व घमंडीपणा याविषयी दाविदाला काय वाटले?

▫ जेव्हा चुकीच्या गोष्टी घडतात, तेव्हा आम्ही देवाला दोष का देऊ नये?

▫ यहोवाविरूद्ध क्रोधिष्ट होण्यापासून आम्हाला काय मदत करू शकेल?

[२२ पानांवरील चित्रं]

अब्राहामापासून वेगळे होत असताना, लोटाने त्याच्या राहण्याच्या जागेसंबंधी चुकीची निवड केली

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा