शुद्ध वाणी बोलत राहा व सर्वदा जिवंत राहा!
“परमेश्वराचा [यहोवा, न्यू.व.] आश्रय करा . . . धार्मिकता व नम्रता यांचे अवलंबन करा, म्हणजे कदाचित परमेश्वराच्या [यहोवा, न्यू.व.] क्रोधदिनी तुम्ही दृष्टीआड व्हाल.”—सफन्या २:३.
१. (अ) विदेशी भाषा शिकण्यासाठी विद्यार्थी कोणती पद्धत वापरतात? (ब) शुद्ध वाणी का बोलावी?
व्याकरण किंवा बोली भाषा या पद्धतीचा वापर करून विद्यार्थी नवी भाषा शिकत असतो. व्याकरण पद्धतीत बहुधा पुस्तकाचा वापर होतो व व्याकरणाचे नियम शिकून घ्यावे लागतात. पण, बोली भाषा पद्धतीत शिक्षक ज्या पद्धतीने ती भाषा बोलतात ती ऐकून व शब्दांचे प्रघात लक्षात घेऊन ती शिकता येते. “शुद्ध वाणी”बद्दल शिकताना या दोन्ही प्रकारांचा उपयोग होतो. आपल्या “परमेश्वराच्या [यहोवा, न्यू.व.] क्रोधदिनी . . . दृष्टीआड” व्हावयाचे आहे तर आम्ही ही शुद्ध वाणी बोलली पाहिजे हे आवश्यक आहे.—सफन्या २:१-३; ३:८, ९.
२. ज्याला आपण व्याकरणाचे नियम म्हणतो ते शुद्ध वाणीमध्ये कसे शिकता येतील?
२ ही शुद्ध वाणी शिकण्यासाठी जे क्रमिक पुस्तक प्रामुख्याने वापरले जाते ते आहे, बायबल किंवा पवित्र शास्त्र. याचा तसेच पवित्र शास्त्र आधारीत प्रकाशनांचा परिश्रमी अभ्यास तुम्हाला शुद्ध वाणीचे जणू व्याकरणाचे नियम शिकवील. यासाठी यहोवाच्या साक्षीदारांमार्फत चालविला जाणारा मोफत घरगुती अभ्यास चांगली सुरवात ठरतो. ज्यांनी आधीच देवाला आपले समर्पण केले आहे अशांनी शास्त्रवचनांचा नियमित व परिश्रमी अभ्यास करणे जरुरीचे आहे. पण, ही शुद्ध भाषा शिकून घेण्याचे आणखी काही प्रभावी मार्ग आहेत का? शिवाय ती बोलण्यामुळे कोणते फायदे परिणामित होत असतात?
शुद्ध वाणी कशी शिकावी
३. शुद्ध वाणी शिकण्याचा एक मार्ग कोणता?
३ भाषा शिकून घेणारा विद्यार्थी जसे विविध व्याकरणाचे नियम प्रगतिशीलपणे शिकून घेऊन ते विदित करू शकतो, तसेच जे सत्य तुम्ही शिकत आहात त्याचा तुम्ही आधीच शिकलेल्या गोष्टीसोबत सबंध जुळविणे हा तो शुद्ध वाणी शिकण्याचा एक मार्ग आहे. उदाहरणार्थ, येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे हे तुम्ही कधी तरी शिकून घेतलेले असेल; पण त्याच्या कर्तव्याबद्दल तुम्हाला खूपच कमी माहिती असेल. पण त्यानंतर तुम्ही केलेल्या पवित्र शास्त्राच्या अभ्यासात ख्रिस्त आता स्वर्गीय राजा या नात्याने राज्य करीत आहे आणि आपल्या हजार वर्षीय राज्यकिर्दीत तो आज्ञाधारक मानवजातीचे पूर्णतेप्रत उत्थान करील हे शिकला असाल. (प्रकटीकरण २०:५, ६) खरेच, तुम्ही आधी शिकून घेतलेल्या माहितीसोबत नवी माहिती व नवे विचार संग्रहीत करेण हे शुद्ध वाणीबद्दलची तुमची पकड अधिक दृढ करते.
४. (अ) शुद्ध वाणीचे ‘व्याकरणाचे नियम’ शिकून घेण्याचा आणखी एक मार्ग कोणता, आणि कोणता पवित्र शास्त्रीय अहवाल हे चित्रित करतो? (ब) गिदोन व त्याच्या तीनशे माणसांनी हालचाल सुरु केली तेव्हा काय घडले? (क) गिदोनाचा अहवाल आपल्याला कोणता धडा शिकवतो?
४ शुद्ध वाणीचे ‘व्याकरण नियम’ शिकून घेण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे पवित्र शास्त्रातील घटनांचे डोळ्यासमोर चित्र उभे करणे. शास्ते ७:१५-२३ मधील लिखित अहवाल ‘पहाण्याचा व ऐकण्याचा’ प्रयत्न करा. पाहा! इस्राएली शास्त्रा गिदोनाने आपल्या सैन्याच्या तीन तुकड्या केल्या आहेत व त्यात त्याने प्रत्येकी शंभर सैनिक ठेवले आहेत. रात्रीच्या अंधारात ते गिबोवा डोंगरावरुन अगदी गुपचूप खाली येत आहेत. त्यांनी निद्रिस्त असलेल्या मिद्यानांच्या छावणीला गराडा दिला आहे. हे तीनशे पुरुष शस्त्रसिद्ध आहेत का? लष्करीदृष्ट्या नाहीत. घमंडी लष्करी सैनिकांना तर यांचे हसूच येईल! या सैनिकातील प्रत्येकापाशी एक शिंग, मोठे पाण्याचे घडे व घड्यात मशाली आहेत. पण ऐका! ठरवून दिलेल्या वेळी गिदोनासोबत असणारी शंभर माणसे आपली शिंगे वाजवतात आणि आपले घडे फोडतात. याचप्रमाणे बाकीचे दोनशे लोकही करतात. सर्व आपल्या मशाली पेटवून उंचावतात तेव्हा तुम्ही त्यांना असे ओरडताना ऐकताः “यहोवाची तरवार, गिदोनाची तरवार!” हे मिद्यानी लोकांना केवढे घाबरे करते! ते अडखळतच आपल्या डेऱ्याबाहेर येतात, त्यांचे निद्रिस्त डोळे मशालीच्या प्रकाशाने सताड उघडे होतात; आणि मशालीमुळे होणाऱ्या धिप्पाड सावल्यांच्या हालचालीमुळे या मिद्यान्यांठायी अपशकुनी भीती जडते. मिद्यानी पळ काढू लागतात तसे गिदोनाची माणसे आपली शिंगे वाजवतच राहतात तेव्हा देव त्यांच्या शत्रूंचा एकमेकातच गोंधळ करून त्यांना आपसात लढायला लावतो. हा शुद्ध वाणीचा केवढा प्रबळ धडा! कोणाही मानवी लष्कराशिवाय देव आपल्या सेवकांची सुटका करू शकतो. तसेच “परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] आपल्या थोर नामास्तव आपल्या लोकांचा त्याग करणार नाही.”—१ शमुवेल १२:२२.
५. ख्रिस्ती सभा आमची बोली कशी शुद्ध करू शकतात?
५ जेव्हा बोली भाषेच्या पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांना विदेशी भाषा शिकवली जाते तेव्हा ते शिक्षकाचे बोल व त्यांचा आवाज यांचे हुबेहुब अनुकरण करतात. याचप्रमाणे, शुद्ध वाणी बोलण्याची ख्रिस्ती सभांमध्ये केवढी चांगली संधि मिळते! येथे आम्ही इतरांना शास्त्रवचनीय सत्याच्या त्या भाषेत बोलत असलेले ऐकत असतो. तसेच आपल्यालाही बोलण्याची संधि मिळते. आपण काही चुकीचे बोलू अशी आपल्याला भीती वाटते का? ती गोष्ट आपल्याला महत्त्वाची वाटू नये, कारण साप्ताहिक टेहळणी बुरुज सभेसारखी सभा चालवणारा वडील जेव्हा दयावंतपणे ती चूक सुधारुन सांगतो ती आमची भाषा शुद्ध करते. यास्तव, अशा ख्रिस्ती सभेला नियमितपणे उपस्थित राहा व त्यात सहभाग घ्या.—इब्रीयांस १०:२४, २५.
अशुद्धतेची घुसखोरी
६. यहोवाचे साक्षीदार तसेच ख्रिस्ती धर्मजगाच्या धार्मिक संघटना यात एवढा फरक का आहे?
६ यहोवाचे उद्देश घोषित करणारे व त्याच्या स्वर्गीय राज्याची घोषणा करणारे ती शुद्ध वाणी त्याचे साक्षीदार या नात्याने बोलत असतात. ते त्याचे नाव जाहीर करतात व “खांद्याला खांदा लावून” किंवा एकचित्ताने त्याची सेवा करतात. (सफन्या ३:९) ख्रिस्ती धर्मराज्यातील धर्मांकडे बायबल आहे तरी ते शुद्ध वाणी बोलत नाहीत किंवा देवाच्या नावाचा विश्वासाने धावा करीत नाही. (योएल २:३२) त्यांना शास्त्रवचनांवर आधारलेला सुसंगत असा संदेश देता येत नाही. ते का? कारण ते देववचनापेक्षा धार्मिक संप्रदाय, जागतिक तत्त्वज्ञान, आणि राजकारणी निष्ठा यांना अधिक प्राधान्य देत आहेत. त्यांचे उद्देश, आशा व पद्धती या दुष्ट जगाच्या आहेत.
७. १ ले योहान ४:४-६ मध्ये यहोवाचे साक्षीदार व खोटे धर्म यांजमध्ये कोणते फरक दाखविण्यात आले आहेत?
७ यहोवाचे साक्षीदार बोलतात तशी शुद्ध वाणी ख्रिस्ती धर्मराज्य व खोट्या धर्माचे जगव्याप्त साम्राज्य बोलत नाहीत. यासाठीच, शुद्ध वाणी बोलणाऱ्यांना प्रेषित योहानाने जे लिहिले आहे ते लक्षात घेणे मनोरंजक आहे. तो म्हणतोः “तुम्ही देवापासून आहा आणि त्याजवर तुम्ही विजय मिळवला आहे; कारण जगात जो आहे त्यापेक्षा तुम्हात जो आहे तो मोठा आहे. ते जगाचे आहेत म्हणून त्यांचे भाषण ऐहिक आहे; आणि जग त्यांचे ऐकून घेते. आपण देवापासून आहोत. जो देवाला ओळखतो, तो आपले ऐकतो; जो देवापासून नाही तो आपले ऐकत नाही. यावरुन सत्याचा आत्मा कोणता व भ्रांतीचा आत्मा कोणता हे आपण ओळखितो.” (१ योहान ४:४-६) यहोवाच्या सेवकांनी खोट्या शिक्षकांना जिंकले आहे कारण देव जो आपल्या लोकांसोबत आहे, तो “जगात [म्हणजे अनीतीमान मानवी समाज] जो [दियाबल सैतान] आहे त्यापेक्षा . . . मोठा आहे.” धर्मत्यागी “जगाचे आहेत” व दुष्ट आत्मा राखून आहेत त्यामुळे “त्यांचे भाषण ऐहिक आहे, आणि जग त्यांचे ऐकून घेते.” पण मेंढरासमान वृत्ती राखणारे लोक देवाकडून असलेल्यांचे ऐकून घेतात, कारण यहोवाचे लोक त्याच्या दृश्य संस्थेद्वारे पवित्र शास्त्रीय सत्याची भाषा बोलतात याची ते जाणीव राखून आहेत.
८. धर्मत्यागी पुरुषाची ओळख काय आहे?
८ एका मोठ्या धर्मत्यागाचे भाकित करण्यात आले होते व पहिल्या शतकात ‘अधर्माचे गूज’ आधीच कामाला लागले होते. काही काळात, मंडळीमध्ये प्रमुख स्थान स्वीकारणाऱ्या किंवा ते हिसकावून घेणाऱ्या लोकांनी पुष्कळ खोट्या तत्त्वांचे शिक्षण देण्यास सुरवात केली. त्यांची वाणी शुद्धतेपासून खूपच दूर गेली होती. या कारणामुळे “धर्मत्यागी पुरुष” ख्रिस्ती धर्मराज्यातील धार्मिक पुढारीवर्ग पूर्णपणे बहरला. तो खोट्या धार्मिक सांप्रदाय, जागतिक तत्त्वज्ञान व अशास्त्रीय शिक्षण यांना जडून राहिला.—२ थेस्सलीनकाकर २:३, ७.
शुद्ध वाणी जगभरात ऐकविली जाते
९. १९ व्या शतकात कोणत्या धार्मिक घडमोडी घडल्या?
९ “पवित्र जनांच्या एकदाच स्वाधीन केलेल्या विश्वासाचे समर्थन” देवभिरु लोकांचा लहानसा गट करीत आहे. (यहूदा ३) असे विश्वासू जन कोठे आढळतील? खरे तर, कित्येक शतके खोट्या धर्माने मोठ्या संख्येला आध्यात्मिक काळोखात दडपून ठेवले होते, पण देवाला ठाऊक होते की कोणावर त्याची मर्जी आहे. (२ तीमथ्य २:१९) मग, १९ व्या शतकात व्यापारी, औद्योगिक आणि सामाजिक बदल होत असता खोट्या धर्माच्या गोंधळाच्या सर्वसाधारण बाबेलातून काही आवाज उंचावले. छोट्या गटांनी पवित्र शास्त्रतील चिन्हाचे वाचन आरंभिले व येशूच्या दुसऱ्या येण्याबद्दल भाकिते केली. पण सर्वांची वाणी शुद्ध नव्हती.
१०. शुद्ध वाणी बोलण्यासाठी “दुसरे येणे” सांगणाऱ्या कोणत्या गटाला देवाने निवडले, आणि यांच्यावर यहोवाचा हात होता हे का दिसून आले?
१० तथापि, यहोवाने कोणत्या “दुसऱ्या येण्याचे” भाकित करणाऱ्या वाणीला आपले साक्षीदार म्हणून निवडून शुद्ध वाणी बोलण्याची नियुक्ती दिली ते १८७९ ला दिसले. यावेळी अमेरिकेतील पिटस्बर्ग येथे चार्ल्स टेझ रसेल यांच्या मार्गदर्शनाखाली एक छोटा पवित्र शास्त्राचा गट अभ्यासाला एकत्र येत होता. यांची खात्री झाली की, येशूचे दुसरे येणे ही त्याची अदृश्य उपस्थिती असेल, अशावेळी जगाला त्रासाचा काळ अनुभवावा लागेल व त्यानंतर ख्रिस्ताची हजार वर्षांची कारकीर्द सुरु होईल व ती पृथ्वीवर नंदनवनाची प्रस्थापना करून आज्ञाधारक मानवांना चिरकालिक जीवन देईल. जुलै १८७९ मध्ये या पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांनी आता द वॉचटावर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मासिकाचे प्रकाशन सुरु केले. याच्या पहिल्या अंकाच्या केवळ ६,००० प्रतींचे वितरण झाले. पण त्या साक्षीदारांसोबत “यहोवाचा हात” होता हे स्पष्ट दिसते, कारण आज हेच मासिक १११ भाषांमध्ये प्रकाशित होत असून त्याची दर अंकाला १,५०,००,००० पेक्षा अधिक छपाई होते.—पडताळा प्रे. कृत्ये ११:१९-२१.
११, १२. शुद्ध वाणी बोलणाऱ्यांना कोणती शास्त्रवचनीय सत्ये समजली आहेत?
११ अशाप्रकारे, पवित्र शास्त्र, यहोवाच्या साक्षीदारांची प्रकाशने व खासपणे सुवार्ता घोषित करणाऱ्या या आवेशी ख्रिश्चनांद्वारे ही शुद्ध वाणी पृथ्वीभरात सर्वत्र माहीत झाली. ही वाणी बोलणाऱ्यांना आज केवढ्या गौरवी लाभांचा आनंद मिळत आहे! आता त्रैक्याच्या गूढ तत्वप्रणालीस अनुसरुन “देव हा देव आहे, ख्रिस्त हा देव आहे आणि पवित्र आत्मा हा देव आहे,’ असे म्हणण्याऐवजी ते, यहोवा हा सर्वसमर्थ देव आहे, येशू हा त्यापेक्षा कनिष्ठ असून तो देवाचा पुत्र आहे आणि पवित्र आत्मा ही देवाची अद्भूत क्रियाशील शक्ती आहे या पवित्र शास्त्रीय मताशी सहमत बनले आहेत. (उत्पत्ती १:२; स्तोत्रसंहिता ८३:१८; मत्तय ३:१६, १७) शुद्ध वाणी बोलणाऱ्यांना, मानव कोणा जीवनाच्या खालच्या पातळीवरून उत्क्रांत झाला नसून त्याची प्रेमळ देवामार्फत निर्मिती झाली हे माहीत आहे. (उत्पत्ती १:२७; २:७) त्यांना ठाऊक आहे की, जीव हा मरणाच्या वेळी अस्तित्वहीन होतो व यामुळे मृतांचे भय काढून टाकले जाते. (उपदेशक ९:५, १०; यहेज्केल १८:४) नरक ही मानवजातीची सर्वसाधारण कबर असून ती कोणा जुलमी दैवताकरवी यातनामय स्थळ नव्हे असे समजले आहेत. (ईयोब १४:१३) शिवाय, मृतांना पुनरुत्थान ही देवाने दिलेली आशा आहे हेही त्यांना ठाऊक आहे.—योहान ५:२८, २९; ११:२५; प्रे. कृत्ये २४:१५.
१२ शुद्ध वाणी बोलणारे रक्त व जीवन याबद्दल आदर दाखवतात. (उत्पत्ती ९:३, ४; प्रे. कृत्ये १५:२८, २९) ख्रिस्ताचे पृथ्वीवरील जीवन हे आज्ञाधारक मानवजातीसाठी खंडणीची किंमत होते हेही त्यांना कळते. (मत्तय २०:२८; १ योहान २:१, २) ते आता कोणा “संतां”ना प्रार्थना करीत नाही, कारण प्रार्थना ही यहोवा देवाला येशू ख्रिस्ताद्वारे केली पाहिजे हे त्यांना कळून आले आहे. (योहान १४:६, १३, १४) देवाचे वचन मूर्त्यांचा धिक्कार करीत असल्यामुळे ते आपल्या उपासनेत मूर्त्यांचा वापर करीत नाहीत. (निर्गम २०:४-६; १ करिंथकर १०:१४) पवित्र शास्त्र भूतविद्येचा धिक्कार करीत असल्यामुळे ते ती टाळतात व यामुळे त्यांजवर दुरात्मिक संकटे येत नाहीत.—अनुवाद १८:१०-१२; गलतीकर ५:१९-२१.
१३. शुद्ध वाणी बोलणारे आज गोंधळात का नाहीत?
१३ शुद्ध वाणी बोलणाऱ्या यहोवाच्या सेवकांना आपण काळाच्या ओघात कोठे आहोत याबद्दलचा गोंधळ वाटत नाही. ते “शेवटल्या काळा”त आहेत आणि येशू हा वैभवी असा अदृश्य आत्मा या नात्याने उपस्थित आहे हे यहोवाने त्यांना शिकवले आहे. (दानीएल १२:४; मत्तय २४:३-१४; २ तीमथ्य ३:१-५; १ पेत्र ३:१८) आता त्याच्या पाठीशी बलाढ्य स्वर्गीय सेना असता तो या व्यवस्थेवर देवाच्या दंडाच्या अमलबजावणीसाठी पुढे सरसावणार आहे. (दानीएल २:४४; प्रकटीकरण १६:१४, १६; १८:१-८; १९:११-२१) होय व यालाच अनुलक्षून शुद्ध वाणी बोलणारे हे घोषित करण्यात मग्न आहेत की, ख्रिस्ताच्या हाती असणारे देवाचे राज्य लवकरच सर्व आज्ञाधारक मानवजातीला एका नंदनवनमय पृथ्वीवर भव्य आशीर्वाद मिळवून देईल. (यशया ९:६, ७; दानीएल ७:१३, १४; मत्तय ६:९, १०) २४:१४; लूक २३:४३) हे आणि आणखी कितीतरी आहे, पण सध्याला तर आपण वरवरचा पृष्ठभाग पाहिला आहे! खरेच शुद्ध वाणी ही खऱ्या अर्थाने समृद्ध, पृथ्वीवरील सर्वात मोलाची वाणी आहे!
१४. शुद्ध वाणी बोलणाऱ्यांना आणखी कोणत्या लाभांचा अनुभव मिळत आहे?
१४ शुद्ध वाणी बोलणारे जे लाभ अनुभवीत आहेत, त्यामध्ये अंतःकरण व मानसिक बळाचे संरक्षण करणारी “देवाची शांती” समाविष्ट आहे. (फिलिप्पैकर ४:६, ७) ते पवित्र शास्त्रातील नियमांचे पालन करतात, हे नियम आरोग्य, सुख, व यहोवास संतुष्ट करण्यामुळे मिळणारे समाधान या गोष्टींना वाढीस लावतात. (१ करिंथकर ६:९, १०) याखेरीज, शुद्ध वाणी बोलणाऱ्यांठायी देवाने वचन दिलेल्या नव्या जगातील चिरकालिक जीवनाची आशा आहे.—२ पेत्र ३:१३.
तिचा उपयोग करा किंवा ती हरवून टाका
१५. शुद्ध वाणीवरील मजबूत पकड धरल्यामुळे तुम्ही कोणता लाभ मिळवू शकाल?
१५ तुम्हाला जर नव्या जगात शुद्ध वाणी बोलायीच आहे तर मग, ती तुम्हाला सध्या अशी आली पाहिजे की, तुमचे विचारही त्या वाणीनुरुप असण्यास हवेत. कोणी एखादी नवी भाषा शिकतो तेव्हा तो प्रथम तिचा स्वतःच्या भाषेत विचार करतो व ते विचार नव्या भाषेत अनुवादित करतो. पण जसजसा तो या नव्या भाषेत पारंगत होत जातो तसतसे त्याला अनुवादित करण्याच्या पद्धतीची गरज राहात नाही. याचप्रमाणे, आपल्या परिश्रमी अभ्यासाद्वारे तुम्हाला शुद्ध वाणीची पकड मजबूत करता येऊन पवित्र शास्त्रीय नियमांचा व तत्त्वांचा कसा समस्या सोडविण्यासाठी आणि “जीवनाचा मार्ग” यावर टिकून राहण्यासाठी उपयोग करावा हे कळू लागते.—स्तोत्रसंहिता १६:११.
१६. तुम्ही शुद्ध वाणीचा नियमितपण उपयोग न केल्यास काय घडू शकते?
१६ तुम्ही शुद्ध वाणीचा सतत उपयोग केला पाहिजे; अन्यथा तुम्हाला ती चांगल्या रितीने बोलण्याचे कसब हरवावे लागेल. याचे उदाहरण पाहू जाता, काही वर्षांआधी आपण कोणती तरी विदेशी भाषा शिकलो असू. आता त्या भाषेचे काही शब्द आम्हाला आठवत असतील, पण तिचा नित्याचा सराव न ठेवल्यामुळे आता तिजवरील प्रभूत्व गमावले असेल. हेच शुद्ध भाषेचे देखील घडू शकते. आपण तिचा नित्य वापर न केल्यास तिजवरील प्रभूत्व गमावून बसू व मग आम्हाला आध्यात्मिक रितीने भयंकर नुकसान सहन करावे लागेल. या कारणास्तव आपण ती नियमाने सभा व आमच्या ख्रिस्ती सेवकपणात बोलू या. ही कार्ये तसेच व्यक्तीगत अभ्यास आम्हाला सर्व गोष्टी शुद्ध भाषेमध्ये बरोबर बोलण्यास मदत देतील. हे किती महत्त्वाचे आहे!
१७. बोलणे जीवनप्रदायक अथवा मरणप्रायही ठरू शकते हे कशावरुन दिसते?
१७ बोलणे हे एकतर जीवनदायी किंवा मरणप्राय असेही ठरू शकते. हे इस्राएलचा एफ्राईम वंश आणि गिलादातील शास्ता इफ्ताह यांच्यातील चकमकीत दिसले. यार्देन नदी उतरुन पळून जाणाऱ्या एफ्राइमी लोकांना ओळखण्यासाठी गिलादी लोकांनी “शिब्बोलेथ” हा शब्द सामान्यपणे उच्चारण्यासाठी ठेवला, यातील पहिल्या उच्चाराचा ध्वनि “श” हा होता. एफ्राइमी लोकांनी यार्देनेच्या प्रवाहापाशी राखण करणाऱ्या गारद्यांपुढे “शिब्बोलेथ” म्हणण्यापेक्षा “सिब्बोलेथ” असे म्हणून स्वतःचीच फसवणूक करून घेतली. याचा परिणाम हा झाला की, ४२,००० एफ्राइमी लोकांचा वध करण्यात आला! (शास्ते १२:५, ६) याचप्रमाणे, ख्रिस्ती धर्मजगताचे पुढारी शिकवीत असलेल्या गोष्टी, पवित्र शास्त्रीय सत्याशी पूर्ण रुपाने परिचित नसणाऱ्यांना शुद्ध वाणीच्या निकट असल्याच्या वाटतील. पण त्याचे कथन खोट्या धर्माच्या पद्धतीने केल्यास ते यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी विनाशकारीच होईल.
आपण एकतेत राहू या
१८, १९. सफन्या ३:१-५ ची कोणती अर्थसूचकता आहे?
१८ प्राचीन अविश्वासू यरुशलेमास व तिच्या आधुनिक नमुन्यास, ख्रिस्ती धर्मजगताला उद्देशून सफन्या ३:१-५ मध्ये म्हटले आहेः “ती बंडखोर, भ्रष्ट व बलात्कारी नगरी, तिला धिक्कार असो! तिने वचन मानिले नाही, बोध घेतला नाही. परमेश्वरावर [यहोवा, न्यू.व.] श्रद्धा ठेवली नाही; ती आपल्या देवासमीप आली नाही. तिच्यातले तिचे सरदार गर्जना करणारे सिंह आहेत, तिचे न्यायाधीश संध्याकाळी बाहेर पडणारे लांडगे आहेत, ते सकाळाच्यासाठी काही शिल्लक राहू देत नाहीत. तिचे संदेष्टे बढाईखोर व विश्वासघातकी आहेत; तिचे याजक पवित्रस्थान भ्रष्ट करतात, त्यांनी धर्मशास्त्राचे अतिक्रमण केले आहे. तिच्यामध्ये परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] न्यायी आहे. तो काही अन्याय करीत नाही. रोज सकाळी तो आपला न्याय प्रकट करतो, चुकत नाही; अधार्मिकांस तर लाज कशी ती ठाऊक नाही.” या शब्दांमागील अर्थसूचकता काय आहे?
१९ प्राचीन यरुशलेम तसेच आधुनिक ख्रिस्ती धर्मजगत यांनी यहोवाविरुद्ध बंड करून स्वतःला खोट्या भक्तीने प्रदुषित केले आहे. त्यांच्या पुढाऱ्यांच्या चुकीमुळे जाच उद्भवला आहे. देवाने वारंवार सूचना केल्या तरी त्यांनी ऐकले नाही व ते त्याच्यासमीप आले नाही. त्यांचे राजकुमार तर अधाशी सिंह असून ते नीतीमत्तेचा उद्धटपणे अवमान करतात. फाडून खाणाऱ्या लांडग्यांप्रमाणे न्यायाधिशांनी न्याय फाडून टाकला आहे. त्यांच्या याजकांनी ‘पवित्र स्थान भष्ट केले आहे व धर्मशास्त्राचे अतिक्रमण केले आहे.’ या कारणास्तव, यहोवा ‘रा एकत्र जमवीत आहे, राज्ये एकत्र मिळवीत आहे, त्यावर त्याचा क्रोध, त्याचा सर्व संतप्त क्रोध पाडणार आहे.’—सफन्या ३:८.
२०. (अ) यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी बचाव मिळविण्याकरता काय करण्यास हवे? (ब) देवाकडील चिरकालिक आशीर्वाद उपभोगण्याची तुम्ही कशी आशा बाळगू शकाल?
२० यहोवाच्या क्रोधाचा दिवस झपाट्याने पुढे येत आहे. यास्तव, देवाच्या नव्या जगात बचावून जायचे आहे, तर कोणताही विलंब न करता शुद्ध वाणी शिका व ती बोला. असे केल्यामुळेच सध्या तुम्हाला आध्यात्मिक विपत्तीपासून व पुढे जलद गतीने येणाऱ्या गोलार्धव्याप्त विनाशापासून संरक्षण मिळू शकेल. यहोवाचे साक्षीदार या देवाच्या क्रोधाच्या दिवसाची तसेच देवाच्या राज्याचा अंतःकरणास उबविणारा संदेश याची घोषणा करीत आहेत. त्याचे राजत्व व त्याचे वैभव याबद्दल बोलण्यात त्यांना केवढा आनंद वाटतो! (स्तोत्रसंहिता १४५:१०-१३) त्यांच्यासोबत एकवटलेले व्हा, तुम्हाला चिरकालिक जीवनाचा व इतर आशीर्वादांचा आनंद सार्वभौम प्रभु यहोवा, जो शुद्ध वाणीचा उत्पादक याजकडून मिळविण्याची आशा राखता येईल.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
▫ शुद्ध वाणी शिकण्याचे काही मार्ग कोणते आहेत?
▫ शुद्ध वाणी बोलणे हे लाभाचे का आहे?
▫ आपण शुद्ध वाणीचा वापर नियमितपणे केला नाही तर काय घडू शकते?
▫ एखाद्या व्यक्तीला यहोवाच्या क्रोधाचे दिवसात बचावण्याचे व चिरकालिक आशीर्वाद अनुभवण्याचे कसे शक्य होईल?
[२२ पानांवरील चित्रं]
गिदोन व त्याचे लोक शिंगे वाजवीत आहेत आणि मशाली उंचावीत आहेत
[२४ पानांवरील चित्रं]
१८७९ पासून पुढे चार्ल्स टेझ रसेल व त्याच्या सहकाऱ्यांना देव शुद्ध वाणीची वाढ करण्यासाठी वापरीत आहे हे स्पष्ट करण्यात आले
[२६ पानांवरील चित्रं]
तुम्ही शुद्ध वाणी बोलण्यात यहोवाच्या साक्षीदारांसोबत ऐक्य राखीत आहात का?