देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | उत्पत्ति ९-११
सर्व पृथ्वीची एकच भाषा होती
यहोवाने बाबेलमध्ये त्याची आज्ञा मोडणाऱ्या लोकांच्या भाषेत गोंधळ करून संपूर्ण पृथ्वीवर त्यांची पांगापांग केली. पण आज तो सर्व राष्ट्र आणि भाषा बोलणाऱ्या लोकांमधून मोठ्या लोकसमुदायाला गोळा करत आहे. आणि त्या सर्वांनी “त्याच्या नामाचा धावा एकचित्ताने” करावा म्हणून त्यांना एक “शुद्ध वाणी” किंवा भाषा शिकवत आहे. (सफ ३:९; प्रक ७:९) ही “शुद्ध वाणी” किंवा भाषा म्हणजे यहोवा आणि त्याच्या उद्देशांबद्दल बायबलमध्ये दिलेलं सत्य.
एखादी नवीन भाषा शिकायची असेल तर त्या भाषेचे फक्त शब्द शिकून घेणं पुरेसं नाही. तर त्या भाषेची विचार करण्याची पद्धतही शिकून घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे आपण जसजसं सत्याची शुद्ध भाषा शिकत राहू तसतसं आपल्या विचार करण्याच्या पद्धतीतही बदल होत जाईल. (रोम १२:२) या सतत चालू असणाऱ्या प्रक्रियेमुळे देवाच्या लोकांमध्ये एकता टिकून राहते.—१कर १:१०.