वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 ६/१ पृ. ३२
  • धर्मत्याग्यांबद्दल दक्षता राखा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • धर्मत्याग्यांबद्दल दक्षता राखा!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ‘विश्‍वासाचे समर्थन करणे’
  • आम्हापुढे ठेवलेला इशारा
  • प्रतिकार करीत राहा
  • ‘विश्‍वासासाठी जोरदार लढा!’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • योहानाच्या व यहूदाच्या पत्रांतील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • सत्यात टिकून राहण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न केला पाहिजे
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • खोट्या शिक्षकांपासून सावधान!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 ६/१ पृ. ३२

धर्मत्याग्यांबद्दल दक्षता राखा!

यहूदाच्या पत्रातील ठळक वैशिष्ट्ये

यहोवाच्या सेवकांनी “वाईटाचा वीट मान”ला पाहिजे व “बऱ्‍याला चिकटून” राहावे. (रोमकर १२:९) याविषयीची मदत यहूदा या पवित्र शास्त्र लेखकाने आपल्या पत्राद्वारे इतरांना देऊ केली. हे पत्र त्याने पॅलेस्टाईनमधून साधारणतः इ. स. ६५ला लिहिले असावे.

यहूदा आपली ओळख “येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा बंधू” अशी देतो. हा याकोब म्हणजेच येशू ख्रिस्ताचा दुधभाऊ. (मार्क ६:३; प्रे. कृत्ये १५:१३-२१; गलतीकर १:१९) यामुळे यहूदा हा देखील येशूचा दूधभाऊ होता. तथापि, येशूची त्यावेळेची स्थिती लक्षात आणून की, तो आता स्वर्गातील वैभवशाली आत्मा आहे, म्हणून आपल्या शारीरिक नात्याचा उल्लेख करणे त्याला प्रशस्त वाटले नसावे. यहूदाचे पत्र आम्हाला “बऱ्‍याला चिकटून” राहण्यास व धर्मत्याग्यांविरुद्ध दक्षता राखण्यास मदत देणारे व थेट सूचना पुरविणारे आहे.

‘विश्‍वासाचे समर्थन करणे’

यहूदाला ख्रिश्‍चनांच्या समाईक तारणाविषयी लिहिण्याची मोठी इच्छा होती, पण त्याला आपल्या वाचकांना ‘विश्‍वासाचे समर्थन करण्याविषयीचा बोध’ लिहिण्याचे अगत्याचे वाटले. (वचने १-४) ते का? कारण अभक्‍तीने वागणारी माणसे मंडळीत शिरली होती व ते “देवाच्या कृपेचा विपर्यास करून तिला कामातुरपणाचे स्वरुप” आणीत होते. त्यांनी ही चुकीची धारणा करून घेतली होती की, आपल्याला देवाच्या नियमांचा भंग करूनही त्याच्या लोकांमध्ये राहता येईल. अशा या दुष्ट विचारसरणीस आपण कधीही अनुसरु नये, तर धार्मिकता, आणि देवाने आमची पापे येशूच्या रक्‍ताकरवी धुऊन टाकली आहे याच्या कृतज्ञतेने नेहमी जीवन व्यतित करावे.—१ करिंथकर ६:९-११; १ योहान १:७.

आम्हापुढे ठेवलेला इशारा

विशिष्ठ प्रवृत्त्या, वागणूक व लोक यांच्याबद्दल दक्षता बाळगणे हे जरुरीचे आहे. (वचने ५-१६) काही इस्राएलांचा मिसरातून बचाव झाला, पण त्यांनी अविश्‍वास दाखविल्यामुळे ते नष्ट झाले. देवदूतांनी आपले स्थान सोडून दिले व त्यांना “निरंतरच्या बंधनात, निबिड [आध्यात्मिक] काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरिता राखून ठेवले” गेले. सदोम व गमोरा या शहरांना भयंकर अनैतिक कृत्ये आचरल्यामुळे “सार्वकालिक अग्निदंडाची शिक्षा” मिळाली. यासाठीच, आम्ही देवाला संतुष्ट करण्याचा नेहमी प्रयत्न करावा व “जीवनाचा मार्ग” कधीच सोडू नये.—स्तोत्रसंहिता १६:११.

आद्यदेवदूत मीखाएल याने दियाबलाविरुद्ध शापाच्या रुपात न्यायदंड घोषित करण्याचे धाडस केले नाही, पण अभक्‍तीने वागणारी माणसे “थोरांची” निंदा करीत होते. हे “थोर” म्हणजे देव व ख्रिस्त याजमार्फत अभिषिक्‍त वडील म्हणून जे वैभव देण्यात आले होते ते लोक होते. आपण देव-प्रणीत अधिकाराचा कधीही अनादर करू नये!

ही अभक्‍तीने वागणारी माणसे काईन, बलाम व कोराह यांचा मार्ग अनुसरीत होते. पाण्याखाली दडून राहिलेल्या खडकाप्रमाणे ते मंडळीला आध्यात्मिक धोका निर्माण करीत होते. तसेच ते निर्जल मेघ व मेलेली व उपटलेली निष्फळ झाडे असे आहेत. ते धर्मत्यागी कुरकुर करणारे, असंतुष्ट, आणि “लाभासाठी कोणाचा तोंडपुजेपणा” करणारे होते.

प्रतिकार करीत राहा

वाईट प्रभावाचा प्रतिकार करीत राहण्याविषयीची सूचना यहूदा यानंतर करतो. (वचने १७-२५) “शेवटल्या काळी” थट्टेखोर लोक असतील व खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी आज यात तसेच त्यांच्या टोमण्यात टिकून राहिले पाहिजे. या वाईट प्रभावाचा प्रतिकार करण्यासाठी आम्ही आपला “परम पवित्र विश्‍वास” वाढवला पाहिजे, पवित्र आत्म्याने प्रार्थना केली पाहिजे व स्वतःला देवाच्या कृपेत ठेऊन येशू ख्रिस्ताची दया प्रकट होण्याची वाट पाहिली पाहिजे.

खोट्या शिक्षकांची भूमिका करीत असताना या अभक्‍तीने वागणाऱ्‍या माणसांनी काहींमध्ये संशयाचे बीजारोपण केले. (पडताळा २ पेत्र २:१-३.) मग, अशा शंकाग्रस्त लोकांना कशाची गरज आहे? सार्वकालिक नाशाच्या “अग्नी”तून बाहेर ओढून काढण्याची आध्यात्मिक मदत! (मत्तय १८:८, ९) पण भक्‍तीमान लोकांना या नाशाची भीती बाळगण्याची गरज नाही, कारण यहोवा अशांना पापाच्या “पतनापासून” तसेच धर्मत्याग्यांसाठी थांबून असलेल्या नाशातून सुरक्षित ठेवील.

[३२ पानावरील चौकट]

झाकलेले खडक: यहूदा सहख्रिश्‍चनांना ‘त्यांच्या प्रीतीभोजनात झालेले खडक’ याविषयीचा इशारा देतो. (यहूदा १२) विश्‍वासूंसाठी प्रीती असल्याचे ढोंग करून हे धर्मत्यागी, जहाजास मोडणाऱ्‍या व पोहणाऱ्‍यास ठार करणाऱ्‍या पाण्याखाली झाकलेल्या खडकाप्रमाणे होते. प्रीतीभोजन ही ती मेजवानी असावी जी भौतिकदृष्ट्या समृद्ध असणारे ख्रिस्ती आपल्या गरीब बांधवांस देत. ख्राईसोस्टोम या चर्च फादरने (इ. स. ३४७?-४०७) म्हटलेः “ते सर्वजण साधारण मेजवानीत येत: श्रीमंत आपणासोबत खाद्यपदार्थ आणीत व गरीब आणि ज्यांच्यापाशी काही नव्हते त्यांना आमंत्रण दिले जाई. ते सर्व एकत्रपणे भोजन करीत.” प्रीतीभोजनाचे आरंभीचे स्वरुप कसेही असले तरी यहूदाने दिलेला इशारा, ‘झाकलेले खडक’ असणाऱ्‍या धर्मत्याग्यांपासून दक्ष राहण्यात व आपणावर आध्यात्मिक मृत्यु न आणण्यात साहाय्यक ठरला. ख्रिश्‍चनांना प्रीतीभोजन करावेच अशी आज्ञा नव्हती व ही प्रीतीभोजने आज केली जात नाहीत, पण यहोवाचे लोक गरजेच्या वेळी एकमेकांना मदत देतात व आपसात सुखकारी सहवास राखतात.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा