राज्य घोषकांचा वृत्तांत
“तिने वाचलेले प्रत्येक वचन माझ्या हृदयास भिडले”
“देवाचे वचन सजीव, सतेज” आहे असे प्रेषित पौलाने म्हटले आहे. (इब्रीयांस ४:१२) हे, जिची वाढ बुद्ध शिकवणीत झाली होती अशा एका व्हिएतनामाची स्त्रीच्या जीवनात खरे ठरले. तिची ही गोष्ट आहे.
माझे पालक, जे अद्याप व्हिएतनाममध्ये आहेत ते नामधारी बुद्ध आहेत. यास्तव, वयाच्या २२ व्या वर्षी माझा विवाह होईपर्यंत माझी वाढ बुद्ध शिकवणूकीत झाली. माझ्या नवऱ्याकडील कुटुंबाने मला बळेच कॅथोलिक चर्चचा बाप्तिस्मा दिला. त्यांचे हे म्हणणे होते की, मी बुद्ध होते, ह्याकारणास्तव, माझ्या मृत सासूला स्वर्गप्रवेशास अडथळा होता. प्रथम मी नकार दिला, पण नंतर त्यांना खुष करण्यास बाप्तिस्मा घेतला. तरीही माझ्या अंतर्यामी खूप मनस्ताप होई. कारण मला कॅथोलिक चर्चमधील दांभिकतेचा राग येई. त्यात आणि बुद्ध धर्मात काही विशेष फरक नव्हता. युद्ध आणि राजकारणात दोहोंचे हात गुंतलेले होते तसेच पूर्वजांची भक्ती दोन्ही धर्मात चालते.
मी जर तशीच व्हिएतनामला राहिले असते तर सत्य शिकण्याचा मला कदाचित योगच आला नसता. माझी वाढ दक्षिण व्हिएतनाममध्ये राजकीय उलाढाली चालू असताना होत होती; व मी राहात असलेले गाव सायगॉनपासून खूप दूरवर होते. यामुळेच ऑस्ट्रेलियात पळून जाण्याचे आशीर्वाद मला प्राप्त झाले.
होडीतील प्रवाशापैकी मी एक अधिक सुदैवी म्हणायची. काखेतील दोन महिन्याच्या मुलीसह मला पोलिसांना चुकविण्याकरिता दाट काळोखातील अंधारी वाटेने तो टप्पा गाठता आला जेथून छोट्याशा मच्छीमारी होडीने पुढे गेलो. समुद्रावर सात दिवस काढल्यावर आम्ही मलेशियाला पोहंचलो, जेथून ऑस्ट्रेलियाला जाण्याआधी काही महिने निर्वासित तळावर राहिलो.
ऑस्ट्रेलियात येऊन सुमारे अडीच वर्षे लोटल्यावर, त्यांची घरोघरची सेवा करताना माझी यहोवाच्या साक्षीदारांशी भेट झाली. पहिल्याच भेटीत मी नियमितपणे बायबल अभ्यासास सहमती दिली; कारण इंग्रजी शिकण्याची ही उत्तम संधि आहे असे मला वाटले. पण ज्यांना मी भेटले तिची वागणूक आणि जे सत्य तिने मला शिकविले त्याचा मजवर फारच चांगला परिणाम झाला. तिने वाचलेले प्रत्येक वचन माझ्या हृदयास भिडले, शिवाय मला यहोवाच्या संस्थेत कोणताही दांभिकपणा आढळला नाही. सुमारे दीड वर्ष बायबलचा अभ्यास केल्यानंतर मी माझे जीवन यहोवास समर्पित करून बाप्तिस्मा घेतला.
मी हे कबूल करते की, सत्याने, जीवनाबद्दलच्या माझ्या सबंध दृष्टीकोनात बदल घडवून आणला. माझे पती जरी अद्याप अविश्वासू असले तरी यहोवानेच माझी माझ्या छोट्याशा कुटुंबासह बचावून राहण्यात मदत केली. तेच माझे सर्वथोर शिक्षक आहेत व त्यांनीच मला एक अधिक चांगली पत्नी तसेच माता बनण्याचे शिक्षण दिले. मी सतत यहोवाचे, ज्यांनी मला आध्यात्मिक अंधःकारातून काढून बायबलच्या सत्य प्रकाशात आणले, सतत आभार मानते.
खरेच, देवाच्या प्रेरित वचनाने या प्रकरणात आपले तेज पाडले. बायबलचा अभ्यास करणे व जे काही शिकतो ते आचरणात आणिल्याने ते जीवनास अर्थभरीत व उद्देशपूर्ण बनविते, व देवाकडील नवीन जगातील अनंतकालिक जीवनाप्रत निरविते. हे तसेच जसे देवाने मोशेला म्हणण्यास प्रेरित केलेः “हे काही तुम्हाला निरर्थक नाही. हे केवळ तुमचे जीवन होय.”—अनुवाद ३२:४७.