सुवार्ता सांगण्यात निमग्न राहणे
प्रेषित पौल, बिकट परिस्थितीत होता हे यहोवाच्या साक्षीदारांतील जे पूर्ण वेळचे कामकरी आहेत अशांना चांगले परिचित आहे—त्याजपुढे आर्थिक समस्या होती. यास्तव त्याने करिंथमध्ये, जो उद्योग तो त्याच्या तरुणपणात शिकला होता तो, तंबु विणण्याचा हलक्या दर्जाचा कामधंदा करण्यास सुरवात केली. काम बरेच कठीण होते व काही वेळा तंबुचे जाडेभरडे कापड हाताळल्यामुळे हातांना जखमाही झाल्या असतील. त्याच्या कमाईत अन्नवस्त्र मात्र निघत असेल. पण त्यातच तो समाधान मानून होता. कारण प्रत्येक दिवसाचे काम संपताचे तो आपली हत्यारे गोळा करून त्यांच्या जागी ठेवी व करिंथमध्ये मुळात जे काही करण्यास आला होता—सुवार्ता प्रचार करण्यास—ते करी.—फिलिप्पैकर ४:११, १२.
शब्बाथ आला की, पौल मंदिरात जाई. हे खरे की सुरवातीस पौल त्याच्या करिंथकर मंडळीसोबत “अशक्त भयभीत व अति कंपित असा” राहून व्यवहार करी. (१ करिंथकर २:१-३) पण जेव्हा त्याचा संदेश ऐकून काहींच्याठायी स्फुर्ति निर्माण होऊ लागली तेव्हा तो “दर शब्बाथ दिवशी सभास्थानात (भाषण देई व) वाद करून यहूद्यांची, हेल्लेण्यांची समजून घालीत असे.”—प्रे. कृत्ये १८:१-४.
असेच काही काळ कमी अधिक प्रमाणात तो प्रचारकाम करीत राहिला. मग, मासेदोनियाहून दानशूरपणे दिलेल्या मदतीसह सीला व तीमथ्य आले, जिच्यामुळे त्याला “भासलेली वाण भरून” निघाली. (२ करिंथकर ११:९; फिलिप्पैकर ४:१५) तसेच हे ऐकणेही मनास आनंदविणारे होते की, थेस्सलनीकामधील बंधू छळ सोसूनही स्थिर राहिले होते.—१ थेस्सलनीकाकर ३:६.
याचा पौलावर काय परिणाम झाला? “येशू हाच ख्रिस्त आहे, अशी साक्ष यहूद्यांस देऊन वचन सांगण्यात [“त्याचा सर्व वेळ उपदेश करण्यात,” द जरुसलेम बायबल; टूडेज् इंग्लिश व्हर्शन] पौल निमग्न झाला होता.” (प्रे. कृत्ये १८:५) काही काळाकरिता आर्थिक दबावापासून सुटका मिळवून पौल सर्ववेळचे प्रचार कार्य केल्याविना विश्राम घेत नसे. तो, आपणाठायीच्या संपूर्ण खऱ्या आवडीसह या कामास परत लागला व ते केवळ यहूद्यांना उपदेश करून नव्हे तर त्याने थेस्सलनीकाकरांस त्याचे पहिले उपदेशपर प्रेरित पत्रही लिहिले.
आज आम्हाकरिता एक नमुना
पौलाने करिंथमध्ये जे एवढ्या जोमाने काम केले, ते याकरिता की, त्याद्वारे सर्व ख्रिश्चनांना सुवार्ता गाजविण्यात उत्तेजन मिळून त्यांनी त्यात निमग्न असावे. पौल याची चांगली जाणीव राखून होता की, प्रभू येशूने स्वतः त्याच्या शिष्यांना “जगाचा प्रकाश” हा उच्च दर्जा सोपवून दिला आहे. त्यांनी हा प्रकाश लपवून ठेवणे नव्हेत. येशूने त्यांना म्हटलेः “तुमचा उजेड लोकांपुढे पडो, यासाठी की, त्यांनी तुमची चांगली कामे पहावी, आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे.” (मत्तय ५:१४-१६) याचा अर्थ येशूने भाकित केल्यानुसार उपदेश कामात पूर्णपणे सहभागी होणे. (मत्तय २४:१४क्ष २८:१९, २०; प्रे. कृत्ये १:६-८) राज्याची ही सुवार्ता गाजविणे हेच ख्रिश्चन मंडळीच्या अस्तित्वाचे सर्व प्रमुख कारण आहे.
पौलासारख्या सुरवातीच्या ख्रिश्चनांनी हे उपदेश कार्य मोठ्या गंभीरतेने करण्याचे मनावर घेतले होते. जरी, देवाच्या शत्रूंना वाटले की, त्यांनी जेव्हा, जो “जीवनाचा अधिकारी” त्यालाच क्रुरतेने ठार केले तेव्हाच सत्याच्या प्रकाशास विझविले, तरी त्याच्या अनुयायांनी जगाचे प्रकाश यानाते उपदेश कार्यास नेटाने पुढे चालू ठेविले. (प्रे. कृत्ये ३:१५) छळणूकीतही ते अभेद्य राहिले. बायबल अहवाल म्हणतोः “येशू हा ख्रिस्त आहे असे ते मंदिरात व घरोघरी नित्य शिकविता व सुवार्ता गाजविता राहिले नाहीत.” (प्रे. कृत्ये ५:४२) काहीही त्यांस रोखू शकत नव्हते.
आधुनिक काळातील ख्रिश्चनही उपदेश कार्याच्या हालचालीत तसेच निमग्न होते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात देववचनाच्या अभ्यासू विद्यार्थ्यांना इतरांसोबत बायबल सत्याची भागीदारी करण्याची गरज दिसून आली. झायन्स वॉच टावर ट्रॅक्ट सोसायटी नामक संस्था १८८४ मध्ये स्थापित करण्यात आली; जी पुढे जाता आंतरराष्ट्रीय पातळीवर दृढ झाली. हे बायबल विद्यार्थी १९३१ पासून यहोवाचे साक्षीदार म्हणून ओळखण्यात येऊ लागले; व त्यांनी अक्षरशः देववचनांच्या ज्ञानाने पृथ्वीस भरून टाकिले आहे. त्यांच्या या भावनाप्रधान हालचालीचा प्रभाव आज पन्नास लक्षापेक्षा अधिकांच्या बलाढ्य सेनेत दिसून येतो. शिवाय यात कोणताच संशय नाही की, यहोवाच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा हा आकडा असाच अधिक वाढत जाणार.—यशया ६०:२२.
तुम्ही आपली भूमिका पार पाडता का?
येशूने म्हटले, “पीक फार, कामकरी थोडे आहेत.” (मत्तय ९:३७, ३८) १९९० मधील ख्रिस्ताच्या मृत्युच्या स्मरणसभेस सुमारे एक करोड लोक उपस्थित होते. मग, आंतरराष्ट्रीय स्तरावर कापणीच्या मोसमाचा व्याप वाढवीत राहण्यास ही संधि केवढी अद्भूत आहे बरे! तरी सतत वाढीच्या या आनंदाचा सतत स्वाद अनुभवीत असता प्रत्येकाने स्वतःस विचारावे: या गौरवी कामात मी कितपत सहभागी होत आहे. मी ते नियमितपणे—शक्यतो दर आठवडी करीत आहे का?
वडीलवर्गाने “कळपाला कित्ता” व्हावे म्हणून या कामात पुढाकार घेतला पाहिजे. (१ पेत्र ५:३) हे खरे की, त्यांच्यापैकी बहुतेक कामावर आहेत. पौलही करिंथमध्ये असता तसेच करी. तरी त्याने उपदेश कार्य नियमितपणे करीत राहण्यास वेळ राखून ठेवला होता. तसेच आजही अनेक वडील असे आहेत जे आठवड्याच्या शेवटी आध्यात्मिक हालचालीत स्वतःस निमग्न ठेवतात. याचा कदाचित शक्तीशाली आणि उत्तेजनपर प्रभाव सबंध मंडळीवर पडण्याचा संभव असतो. काही महिन्यात जेव्हा काही खास प्रयोजन आयोजित केले जाते त्या काळात अनेक मंडळ्यातील बहुतांश प्रचारक पायनियरींग करतात. याचे गुपित? वडीलवर्ग उपदेश कार्य करण्यात तसेच क्षेत्रकार्याची व्यवस्थित रचना आखण्यात पुढाकार घेतात.
शिवाय, उपाध्य सेवकही क्षेत्रसेवेत नियमितपणे सहभागी होऊन मंडळीवर आपला हितावह प्रभाव पाडू शकतील. आठवते ना की, शास्त्रवचने म्हणतात की त्यांनी: “गंभीर असावे, आपले सेवकपण चांगले चालवीत” असावे. (१ तीमथ्य ३:८, १३) क्षेत्र सेवेत विश्वासू असणे हे एखाद्या बंधूस वडील किंवा उपाध्य सेवक बनण्याच्या पात्रतेची आवश्यकता असे आहे.—तीत १:८, ९.
पौलाप्रमाणे काही जन आपला वेळ साधून पायनियर सेवा करतात. अशाप्रकारे, केवळ दहा वर्षापूर्वी ज्या नियमित, साहाय्यक आणि खास पायनियरांची संख्या १,३७,८३१ होती ती १९०० मध्ये ५,३६,५०८ पर्यंत पोहंचली. निश्चितच की यहोवाचे आर्शिवाद आणि संमती यामुळेच हे साध्य होऊ शकले. पायनियरांस जरी वेळ मोजावा लागतो तरी त्यात केवळ वेळेची मोजणी हेच सर्व नसते. तर अहो, पायनियरांनो, तुम्ही सर्व आपल्या सेवकपणात उत्तम पूर्वतयारीत असलेले व प्रभावी आहात का? तुम्ही आपल्या सेवकपणात उत्तम सतत सुधारणा करीत आहात का की, ज्याचा परिणाम तुमच्या खरोखरीच्या फलदायी उपाध्यपणात दिसून येईल?
समतोल उपाध्यपणाचा मोबदला
दर महिन्यास वॉच टावर (टेहळणी बुरुज) आणि त्याचा साथीदार अवेक! या पाक्षिकातून जी जीवनास पोषक अशी माहिती पुरविली जाते ती आपणास आवडते का? यात संशय तो काय, ती तुम्हास आवडते. मग या आवडीने आपणास ही पाक्षिके खपविण्यात सहभागी होण्याचे प्रोत्साहन दिलेय का? बोस्टवाना येथील एका भगिनीने तसे केले. त्या आधी ती सत्यास विरोध करीत असे, पण तिचा नवरा या मासिकातून तिला वाचून दाखवी. कालांतराने तिचे हृदय पालटले आणि तीही साक्षीदार बनली. जरी वाचता येत नसे तरी मासिके खपविण्यात ती फार यशस्वी ठरली. ती म्हणेः “मला तर वाचता येत नाही; पण माझे यजमान मला ही मासिके वाचून दाखवितात. मला ते केवढे फायदेकारक वाटते; शिवाय माझी खात्री आहे की आपणासही ते मिळतील.”
मग या जीवन वाचविण्याच्या कामात दर आठवडी सहभागी का होऊ नये? आपणास आध्यात्मिक पात्रता प्राप्त होताच ज्या ख्रिश्चन मंडळीत असणार ती तुमचे, सुरवात करून देण्यास सहाय्य करील. अर्थात, मासिके खपविणे हे सेवेचे एक अंग आहे. जो कोणी सुवार्ता प्रचारात अगदी निमग्न राहू इच्छितो, तो नेहमी आपले सेवकपण समतोल ठेवण्याच्या प्रयत्नात असतो. उदाहरणार्थ, वॉच टावर संस्था लाखोंच्या संख्येने पुस्तकांचे प्रकाशन करते, जी लोकांस कायम स्वरुपातील उत्तम आध्यात्मिक अन्न साठा म्हणून सादर केली जातात. जर आपण, तुम्ही पृथ्वीवरील नंदनवनात अनंतकालीक जीवन मिळवू शकाल यासारखी पुस्तके आपल्या सेवकपणात खपविण्यात तरबेज झालेले आहात का?
मग जे आवड प्रदर्शित करतात अशा लोकांबाबत काय? अशांचे परत भेट घेता याची म्हणून व्यवस्थित टिपणे तुम्ही ठेवीत आहात का? अशा भेटी घेत राहणे सेवेतील त्या अंगाप्रत निरवील जे सर्वात अधिक आनंदवीत असते—ते आहे घरगुती बायबल अभ्यास कार्य. आठवत असेल की, येशूने मत्तय २८:१९, २० मध्ये शिष्य बनविण्याचे व त्यांना बाप्तिस्मा देण्याचे आज्ञापिले आहे. याचा अर्थच, त्यांचे सोबत बायबलचा अभ्यास करणे. हे खरे की, अभ्यास करण्यास चिकाटीची गरज असते. एका साक्षीदारास एक वृद्ध जोडपे भेटले, व त्यांनी आनंदाने घरीच बायबल अभ्यास करण्यास संमति दिली. पण तो अभ्यास तीन आठवडे पुढे ढकलला. अखेरीस अभ्यासास एकदाची सुरवात झाली. पण मग काही वेळा त्या जोडप्याने एक आठवड्यानंतरच्या पुढील आठवड्याचा रहित करण्यास सुरवात केली. सरतेशेवटी बायकोने बाप्तिस्मा घेण्याप्रत प्रगति केली. “बाप्तिस्मा उरकल्यावर,” बंधूला आठवते की, “तिचे डोळे आनंदाश्रूंनी डबडबले होते.” होय, सुवार्ता प्रचार कार्यात निमग्न राहिल्यास अवर्णनीय आनंद प्राप्त होतो.
आपणा स्वतःला उपलब्ध करा
सुभक्तीची सर्वोत्तम उदाहरणे जी आमच्या अनुकरणार्थ आहेत, ती येशू ख्रिस्त तसेच प्रेषित पौलाची आहेत. शिवाय, यहोवाच्या साक्षीदारांमध्ये आजही अशी अनेक उल्लेखनीय उदाहरणे आम्हापाशी आहेत. हा समय, ज्यांना सुवार्तेची ओळख आहे अशांचेकरिता अगदी परिपक्व झालेला आहे की, त्यांनी ती इतरांस कळविण्यात होईल तितके करावे. बायबल ही हमी देते की, हे त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाहीत.—१ करिंथकर १५:५८.
पौलाप्रमाणेच अनेकांवर आर्थिक जबाबदाऱ्यांचा बोझा असेल; यामुळेच कदाचित अनेकांस पायनियर सेवका करणे अशक्य असू शकेल. पण यहोवाच्या साहाय्याने सर्वांस रोमकर १२:११ मधील उचित सल्ला पाळता येण्याजोगा आहे: “[आपल्याच व्यवहारात राहून, न्यू.व.] आस्थेविषयी मंद नसणारे; आत्म्यात उत्सुक; प्रभूची [यहोवा, न्यू.व.] सेवा करणारे,” असे व्हा. शिवाय जर परिस्थितीत बदल घडले व यहोवाच्या सेवेत अधिक वेळ खर्चण्याची संधि असली तर पौलाप्रमाणे कोणीही, जर त्यांचे यहोवावर खरेच प्रेम आहे तर, तिला साध्य करील. सुवार्ता प्रचारात निमग्न असा. असे केल्याने, केवळ सध्या पुरतेच त्याजवर यहोवाचे आशीर्वाद असतील असे नसून भवितव्यही अनंतकालिक आनंद व सौख्यानंदाने सार्वकालिक जीवन प्राप्त होईल.—मत्तय १९:२८, २९.
पौलास जरी काम करणे भाग पडले तरी, तो दर शब्बाथवारी उपदेश कार्य करीत असे
वडीलवर्गाने व उपाध्य सेवक वर्गाने त्यांना प्राप्त असलेल्या हक्कांना पात्रीत ठरण्यास क्षेत्र सेवेत पुढाकार घेतलाच पाहिजे. तसे केल्यास त्यांचे उदाहरण मंडळीतील सर्वांस उत्तेजन देणारे असते
काही काळ आर्थिक अडचणीतून मुक्त झाल्यावर पौल आपल्या सर्ववेळच्या प्रचार सेवेत परतूनच स्वस्थ झाला
एक निरिक्षर भगिनी मासिके सादर करतेवेळी म्हणतेः “मला तर वाचता येत नाही, पण माझे यजमान मला ही मासिके वाचून दाखवितात, मला ते केवढे फायदेकारक वाटते. माझी खात्री आहे की, आपणासही ते मिळू शकतील.”