वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w92 ४/१ पृ. २४-२९
  • रक्‍ताने जीवन वाचविणे—कसे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • रक्‍ताने जीवन वाचविणे—कसे?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • रक्‍ताबद्दल त्याची भूमिका
  • रक्‍ताचा औषध म्हणून वापर
  • औषधीदृष्ट्या जीवनप्रदायक?
  • रक्‍ताला काही पर्याय आहे का?
  • अत्यंत महत्त्वपूर्ण असे रक्‍त
  • रक्‍त–जीवनासाठी अत्यावश्‍यक
    रक्‍ताने तुमचे जीवन कसे वाचू शकते?
  • रक्‍ताने तुमचे जीवन कसे वाचू शकते? या माहितीपत्रकाच्या अभ्यासासाठी प्रश्‍न
    आमची राज्य सेवा—२००१
  • जीवन खरेपणाने वाचविणारे रक्‍त
    रक्‍ताने तुमचे जीवन कसे वाचू शकते?
  • रक्‍त संक्रमण–किती सुरक्षित?
    रक्‍ताने तुमचे जीवन कसे वाचू शकते?
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
w92 ४/१ पृ. २४-२९

रक्‍ताने जीवन वाचविणे—कसे?

“तू जीवन निवडून . . . [देवाची] वाणी ऐक . . . कारण त्यातच तुझे जीवन आहे, त्यातच तुझी आयुर्वृद्धी आहे.”—अनुवाद ३०:१९, २०.

१. खरे ख्रिस्ती जीवनाबद्दलचा आदर दाखविण्यामध्ये कसे अद्वितीय आहेत?

आपल्याला जीवन प्रिय आहे असे पुष्कळ लोक म्हणतात. याबद्दलचा पुरावा ते, मरणदंडाची शिक्षा, गर्भपात व शिकार करणे याबद्दल जो दृष्टीकोण राखून आहेत त्याद्वारे व्यक्‍त होतो. तथापि, खरे ख्रिस्ती एका खास प्रकाराने जीवनाबद्दलचा हा आदर दाखवीत आहेत. स्तोत्रसंहिता ३६:९ म्हणतेः “जीवनाचा झरा तुजजवळ [देव] आहे.” जीवन ही देवाकडील देणगी असल्यामुळे ते जीवनी रक्‍ताबद्दल त्याचा दृष्टीकोण ग्रहण करून आहेत.

२, ३. रक्‍तासंबंधाने आपण देवाला विचारात का घेतले पाहिजे? (प्रे. कृत्ये १७:२५, २८)

२ आमचे जीवन रक्‍तावर टिकते. ते आमच्या शरीरभर प्राणवायु नेते, कर्बद्विप्राणिल वायु बाहेर काढते आणि वातावरणातील तपमानाशी जुळते घेण्यास तसेच रोगाचा प्रतिकार करण्याची मदत करते. ज्याने आम्हाला जीवन दिले त्यानेच अद्‌भूत व जीवनप्रदायक घटक रक्‍त याची रचना व तरतूद केली आहे. हे, त्याची मानवी जीवन टिकवून ठेवण्याची केवढी आस्था आहे हे दाखविते.—उत्पत्ती ४५:५; अनुवाद २८:६६; ३०:१५, १६.

३ ख्रिस्ती जनांनी तसेच सर्वसाधारण लोकांनी देखील स्वतःला हे विचारून पहावेः ‘रक्‍त हे माझे जीवन केवळ स्वाभाविक प्रक्रियेनेच वाचवू शकते की, ते जीवनास अनाकलनीय मार्गाने वाचवू शकते?’ बहुतेक लोकांना जीवन आणि रक्‍ताची स्वाभाविक कार्यप्रणाली यामधील संबंध माहीत असला तरी यात खरे पाहता आणखी खूप समाविष्ट आहे. ख्रिस्ती, मुस्लीम व यहूद्यांचे नीतीशास्त्र एका जीवनदात्याकडे निर्देश करतात, ज्याने जीवन व रक्‍त याबद्दल आपला अभिप्राय दिला आहे. होय, आमच्या निर्माणकर्त्याला रक्‍ताबद्दल बरेच सांगायचे आहे.

रक्‍ताबद्दल त्याची भूमिका

४. मानवी इतिहासाच्या आरंभालाच देवाने रक्‍ताबद्दल काय म्हटले?

४ देवाच्या वचनात, पवित्र शास्त्रात, रक्‍ताचा ४०० पेक्षा अधिक वेळा उल्लेख आला आहे. अगदी सुरवातीचा उल्लेख यहोवाने दिलेल्या आज्ञेत दिसतोः “सर्व संचार करणारे प्राणी तुमचे अन्‍न होतील, . . . पण ज्यात रक्‍त आहे असे मांस खाऊ नका.” त्याने पुढे म्हटलेः “मी तुमच्या रक्‍ताबद्दल, जिवाबद्दल झाडा घेईन.” (उत्पत्ती ९:३-५; न्यू इंटरनॅशनल व्हर्शन) हे यहोवाने नोहा, मानवी कुटुंबाच्या पूर्वजाला सांगितले. अशाप्रकारे रक्‍त हे जीवनाचे प्रतिनिधित्व करीत असल्याचा निर्माणकर्त्याचा दृष्टीकोण आहे हे सबंध मानवजातीला त्याद्वारे कळवण्यात आले. जो देवाला, जीवनदाता या नात्याने ओळखतो त्याने, देव रक्‍ताच्या वापराबद्दल दृढ भूमिका राखून आहे हेही ओळखलेच पाहिजे.

५. इस्राएल लोक रक्‍त का घेत नव्हते याला सर्वोच्च कारण काय होते?

५ देवाने इस्राएलाला त्याचे नियमशास्त्र दिले तेव्हा देखील त्याने रक्‍ताचा उल्लेख केला. लेवीय १७:१०, ११ हे वचन यहूदी तनख आवृत्तीनुसार असे वाचण्यात येतेः “इस्राएल घराण्यापैकी किंवा त्यांच्यात राहणाऱ्‍या उपरी लोकांपैकी कोणी कोणत्याही प्रकारे रक्‍त सेवन केले तर त्या रक्‍त सेवन करणाऱ्‍या मनुष्याला विमुख होऊन त्याचा स्वजनातून उच्छेद करीन. कारण शरीराचे जीवन रक्‍तात असते.” त्या नियमात आरोग्यविषयक फायदे होतेच, पण त्याहीपेक्षा अधिक काही समाविष्ट होते. रक्‍ताला खासपणे समजण्याद्वारे इस्राएलांनी, जीवनासाठी आपले देवावर अवलंबत्व आहे हे दाखवून द्यायचे होते. (अनुवाद ३०:१९, २०) होय, रक्‍त न स्वीकारण्यामागील केंद्रीय कारण, ते आरोग्याला हानीकारक होते म्हणून नव्हे तर देव रक्‍ताबद्दल खास अर्थ राखून होता हे होते.

६. येशूने देवाची रक्‍ताबद्दल असणारी भूमिका उचलून धरली याबद्दल आम्ही कशी खात्री राखू शकतो?

६ तर मग, रक्‍ताद्वारे मानवी जीवन वाचविण्याच्या संदर्भात ख्रिस्ती धर्म कोठे उभा आहे? रक्‍ताच्या वापराबद्दल येशूला त्याच्या पित्याने जे म्हटले होते ते माहीत होते. येशूने “काही चूक केली नाही [आणि] त्याच्या ओठात कसलाही घातकीपणा आढळला नाही.” याचा अर्थ, त्याने नियमशास्त्र, ज्यात रक्‍ताबद्दलचा नियमही होता ते, पूर्णपणे आचरले. (१ पेत्र २:२२, नॉक्स) अशाप्रकारे त्याने आपल्या अनुयायांसाठी एक नमुना घालून दिला, ज्यामध्ये जीवन व रक्‍त याबद्दल आदर्श दाखविण्याचा कित्ताही समाविष्ट होता.

७, ८. देवाने रक्‍ताबद्दल दिलेला नियम ख्रिश्‍चनांनाही बंधनकारक आहे हे कसे स्पष्ट झाले?

७ इतिहासामध्ये आपल्याला हे दिसते की, नंतर ख्रिस्ती नियमन मंडळाच्या परिषदेत, ख्रिश्‍चनांनी इस्राएलांना दिलेले सर्व नियम आचरण्याची गरज आहे की नाही याबद्दल कोणता निर्णय दिला. ईश्‍वरी मार्गदर्शनाआधारे त्यांनी म्हटले की, ख्रिस्ती मोशेचे नियमशास्त्र आचरण्याच्या बंधनात नाही, तरीपण “मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्‍त, गुदमरुन [न कापलेले मांस] मेलेले प्राणी व जारकर्म ही . . . वर्ज्य” करणे “अगत्याचे” आहे. (प्रे. कृत्ये १५:२२-२९) त्यांनी हे स्पष्ट केले की, रक्‍त नैतिकदृष्ट्या टाळणे हे मूर्तिपूजा तसेच गहन अनैतिकता टाळण्यासमान आहे.a

८ आरंभाच्या ख्रिस्तीजनांनी ती ईश्‍वरी मनाई उंचावून धरली होती. याबद्दल भाष्य करताना ब्रिटीश प्रामाण्य जोसेफ बेन्सन यांनी म्हटलेः “रक्‍त न खाण्याची मनाई, नोहा व त्याच्या सर्व वंशजांना देण्यात आली होती. ती परत इस्राएलांना सांगण्यात आली. . . . ती कधीच रद्द झालेली नाही, पण उलटपक्षी, नव्या करारात प्रे. कृत्ये याच्या १५ व्या अध्यायात तिला पुन्हा पुष्टी देण्यात आलेली आहे. याद्वारे ती मनाई शाश्‍वत झाली आहे.” आता पवित्र शास्त्र रक्‍ताबद्दल जे काही म्हणते त्याच्या अनुषंगाने पाहता, रक्‍ताचा वैद्यकीय वर्तुळात होणारा सध्याचा वापर, जसे की, रक्‍त संक्रमण, नोहाच्या काळी किंवा प्रेषितांच्या काळी होत नव्हते, म्हणून नियमबाह्‍य ठरणार का?

रक्‍ताचा औषध म्हणून वापर

९. प्राचीन काळी रक्‍ताचा कसा औषधी वापर होत होता, पण याच्या विरुद्ध ख्रिश्‍चनांची कोणती भूमिका होती?

९ रक्‍ताचा औषध म्हणून वापर काही नवा नाही. फ्लेश ॲण्ड ब्लड हे, रे तानहिल यांनी लिहिलेले पुस्तक दर्शविते की, जवळजवळ २,००० वर्षे मिसर आणि इतरत्र “रक्‍त हे महारोगावर गुणकारी औषध म्हणून मानण्यात येत होते.” मानवी रक्‍ताच्या प्राशनामुळे फेंफरे आजार बरा होतो असा रोमी लोकांचा विश्‍वास होता. रक्‍ताचा या “औषधी” वापराबद्दल टर्टुलियनने लिहिलेः “आपल्या लोभिष्ट तहानेने आखाड्यातील कार्यक्रमात हे अधाशीपणे दुष्ट गुन्हेगारांचे रक्‍त घेतात . . . आणि आपल्या महारोगावर इलाज करण्यासाठी ते सोबत नेतात त्यांच्याकडे बघा.” हे, ख्रिश्‍चनांच्या आचाराच्या अगदी विरुद्ध होते. “आम्ही तर प्राण्यांचे रक्‍त देखील आपल्या आहारात घेत नाही. . . . ख्रिश्‍चनांची परिक्षा घेताना तुम्ही रक्‍ताने भरलेले पदार्थ त्यांच्यापुढे मांडता. पण तुम्हाला तर याची खात्री आहे की, हे त्यांच्यासाठी बेकायदेशीर कृत्य आहे.” यामागील मतितार्थ लक्षात आणाः जीवनाचे प्रतिनिधित्व करणारे रक्‍त घेण्यापेक्षा आरंभीच्या ख्रिश्‍चनांनी मरणाचीही जोखीम पत्करली होती.—पडताळा २ शमुवेल २३:१५-१७.

१०, ११. देवाने रक्‍ताबद्दल राखलेला दर्जा हा रक्‍तसंक्रमण स्वीकारण्याविरुद्ध कल राखून आहे हे का म्हणता येते?

१० अर्थात, तेव्हा रक्‍ताचे संक्रमण दिले जात नव्हते, संक्रमणाच्या दृष्टीकोणातून संशोधन केवळ १६ व्या शतकात आरंभिले गेले. तरीही, १७व्या शतकात, कोपनहेगन विश्‍वविद्यालयातील शरीरशास्त्राच्या एका प्राध्यापकांनी हा आक्षेप घेतलाः ‘रोगाच्या अंतरिक इलाजासाठी मानवी रक्‍त घेण्याकडे ज्यांचा कल आहे ते त्याचा गैरवापर करून महापाप करीत आहेत. आपण नरमांसभक्षकांचा धिक्कार करतो. तर मग, आपली अन्‍ननलिका मानवी रक्‍ताने डागविणाऱ्‍यांचा आपण का तिरस्कार करीत नाही? तसेच कापलेल्या नसातून वाहणारे कोणाचे परके रक्‍त मुखाद्वारे किंवा संक्रमणाच्या उपकरणांद्वारे घेणे देखील तेच आहे. या कार्यवाहीच्या संपादकांना ईश्‍वरी कायद्याची मोठी भीती आहे.’

११ होय, शतके निघून गेली तरी देवाच्या नियमाने रक्‍त नसामधून किंवा तोंडावाटे घेणे नियमबाह्‍य असल्याचे सांगितलेले लोकांनी मान्य केले. याची जाणीव राखल्यामुळे लोकांना, यहोवाच्या साक्षीदारांनी रक्‍ताबद्दल, देवाच्या भूमिकेनुसार जी भूमिका ग्रहण केली आहे ती समजण्यास मदत मिळू शकेल. जीवनाबद्दल नितांत आदर असला आणि औषधी उपचारांबद्दल कदर वाटत असली तरी खऱ्‍या ख्रिश्‍चनांना जीवन हे निर्मात्याकडील देणगी आहे असे वाटते, त्यामुळे ते रक्‍त घेऊन जीवन वाचविण्याचा प्रयत्न करीत नाहीत.—१ शमुवेल २५:२९.

औषधीदृष्ट्या जीवनप्रदायक?

१२. विचारी लोक रक्‍त संक्रमणाबद्दल कसला विचार करू शकतात?

१२ रक्‍त जीवन वाचविते असा तज्ञांनी कित्येक वर्षापासून दावा केला होता. डॉक्टर कदाचित कोणाबद्दलचा अनुभव सांगतील की, त्याचे खूपच रक्‍त कमी होते, पण त्याला रक्‍त संक्रमित केले गेले व तो बरा झाला. यास्तव, लोकांना याचे नवल वाटू लागेल की, ‘ख्रिस्ती भूमिका ही औषधीय दृष्ट्या किती सूज्ञ वा मूर्खतेची आहे?’ कोणत्याही वैद्यकीय पद्धतीचा गंभीरपणे विचार करण्याआधी विचारी माणूस फायद्यांची शक्यता तसेच संभाव्य धोके याबद्दलची निश्‍चिती करील. रक्‍त संक्रमणाबद्दल काय? रक्‍त संक्रमणे ही पुष्कळ धोक्यांनी भरलेली असतात ही वस्तुस्थिती आहे. ती घातक ठरू शकतात.

१३, १४. (अ) रक्‍त संक्रमण हे कोणत्या प्रकारात धोकादायक असल्याचे दिसले? (ब) रक्‍ताकडून जीवघेणा धोका उद्‌भवू शकतो हे पोपच्या अनुभवावरून कसे दिसते?

१३ अलिकडेच एल. टी. गुडनफ व जे. एम. शक या डॉक्टरांनी लिहिलेः “वैद्यकीय वर्तुळाला आधीपासूनच माहीत आहे की, रक्‍ताचा पुरवठा आम्हाला माहीत आहे तितका सुरक्षित असला तरी रक्‍त संक्रमणात नेहमीच जोखीम असते. रक्‍त संक्रमणात नेहमी आढळणारी गुंतागुंत ही एन-ए, एन-बी कावीळीचा गूढ विषाणू (एन ए एन बी एच) ही आहे; इतर संभाव्य गुंतागुंतीमध्ये कावीळ बी; ॲलोइम्युनायझेशन, संक्रमण प्रतिक्रिया, इम्युनोलॉजिक सप्रेशन आणि लोह अतिरेकता यांचा समावेश होतो.” या गंभीर धोक्यातील ‘कमीत कमी’ एकाचा विचार करता अहवालात पुढे म्हटले आहेः “असा अंदाज केला जातो की, [केवळ अमेरिकेत] साधारण ४०,००० लोकांना वार्षिकरित्या एन ए एन बी एच जडेल व यातील १० टक्के लोकात युकृताचा वाढता आजार व/किंवा हेपाटोमा [यकृताचा कर्करोग] जडेल.”—द अमेरिकन जर्नल ऑफ सर्जरी. जून १९९०.

१४ संक्रमित रक्‍तापासून आजार जडण्याचा धोका आता सर्वत्र परिचित झाला आहे. यामुळे लोक आता संक्रमणाबद्दलच्या आपल्या दृष्टीकोणाचा पुन्हा विचार करीत असलेले दिसतात. उदाहरणार्थ, १९८१ मध्ये पोपना गोळी लागल्यावर त्यांना इस्पितळात उपचार करण्यात आले व नंतर ते परतले. नंतर पुन्हा त्यांना दोन महिन्यांसाठी परत यावे लागले, त्यांची स्थिती इतकी खालावली की, ते निकामी होतील अशी भीती वाटू लागली. का बरे? त्यांना जे रक्‍त देण्यात आले होते त्यामुळे सायटोमेगॅलो व्हायरसची लागण झाली होती. काहींना नवल वाटेल, ‘पोपना देण्यात आलेले रक्‍त जर इतके असुरक्षित होते तर मग, आम्हा सर्वसाधारण लोकांना देण्यात येणाऱ्‍या रक्‍ताबाबत काय?’

१५, १६. रक्‍ताची रोगासाठी चाचणी झालेली असली तरी रक्‍त संक्रमणे इतकी का सुरक्षित नाहीत?

१५ ‘पण रक्‍तात आजार आहे की नाही याची आधी परिक्षा करता येत नाही का?’ कोणी असेही विचारील. याबद्दल ब कावीळीचे रक्‍त परिक्षणाच्या उदाहरणाचा विचार करा. पेशंट केअर (फेब्रुवारी २८, १९९०) हे दर्शविलेः “रक्‍ताचे सर्वसाधारण परिक्षण झाल्यावर संक्रमणानंतरच्या कावीळीचा उद्‌भव कमी होतो; तथापि, संक्रमणानंतरच्या कावीळीची ५ ते १०टक्के प्रकरणे ही ब कावीळीद्वारे उद्‌भवत राहतात.”

१६ अशा परिक्षणात किती सदोषता आहे हे आणखी एका रक्‍तामधून निर्माण होणाऱ्‍या जोखीमेने—एडस्‌ने—दिसून येते. एडस्‌च्या साथीने लोकांमध्ये संसर्गित रक्‍तामुळे जडणाऱ्‍या धोक्याबद्दल जागृतता निर्मिली आहे. रक्‍तात विषाणुचा पुरावा आहे हे पाहण्यासाठी रक्‍ताची चाचणी केली जाऊ शकते हे मान्य आहे. तथापि, रक्‍ताची सर्वच ठिकाणी चाचणी होते असे नाही; आणि असे दिसते की, लोक आपल्या रक्‍तात कित्येक वर्षे एडस्‌चे विषाणु राखून असू शकतील जे अलिकडील परिक्षणाद्वारे सामोरे येऊ शकले नाहीत. अशाप्रकारे रोग्यांना चाचणी करण्यात आलेल्या रक्‍तापासून एडस्‌ होऊ शकतो—त्यांना एडस्‌ असू शकतो!

१७. रक्‍त संक्रमण केवढी हानि करते, जी लगेच दृष्टीस येत नाही?

१७ गुडनफ व शक या डॉक्टरांनी “प्रतिकारक दाब” याबद्दलचाही उल्लेख केला आहे. होय, योग्यपणे चाचणी केलेले व जुळवलेले रक्‍त देखील रोग्याच्या प्रतिकारक क्षमतेचा विध्वंस करून कर्करोग व मृत्यु यांचे दार उघडे करू शकते याबद्दलचे पुरावे वाढतच आहे. अशाप्रकारे एक कॅनडाचा अभ्यास दाखवितो की, “डोके व मान याचा कर्करोग असणाऱ्‍या रोग्याला त्याची सूज काढून टाकण्याच्या दरम्यान जे रक्‍त संक्रमण देण्यात आले होते त्याकडून नंतर त्याची प्रतिकारक शक्‍ती विलक्षणरित्या खचली गेली.” (द मेडिकल पोस्ट, जुलै १०, १९९०) दक्षिण कॅलिफोर्निया विश्‍वविद्यालयाच्या डॉक्टरांनी कळवलेः “स्वरयंत्राचा कर्करोग झालेल्या सर्वांमध्ये रक्‍त न घेणाऱ्‍यात १४% व घेणाऱ्‍यांमध्ये ६५% लोकांना त्या रोगाची पुनर्बाधा झाली. तोंड, घसा, नाक व सायनस यांच्या कर्करोगात पुनर्बाधा होण्याचे प्रमाण संक्रमण न घेणाऱ्‍यात ३१% व संक्रमण घेणाऱ्‍यात ७१% होते.” (ॲनल्स ऑफ ऑटॉलॉजी, ऱ्‍हीनॉलॉजी ॲण्ड लॅरिंगॉलॉजी, मार्च १९८९) प्रतिकारक क्षमता दाबली गेल्यामुळे शस्त्रक्रियेच्या वेळी रक्‍त दिलेल्या रोग्याला संसर्ग जडण्याची अधिक संभाव्यता राहते.—१० पानावरील तक्‍ता बघा.

रक्‍ताला काही पर्याय आहे का?

१८. (अ) रक्‍त संक्रमणात ज्या जोखीमा उद्‌भवत आहेत त्यामुळे आता वैद्यांचा कल कोठे जात आहे? (ब) पर्यायाबद्दल कोणती माहिती तुम्हाला आपल्या वैद्याला देता येईल?

१८ ‘संक्रमण धोकादायक आहे, मग याला काही पर्याय आहेत का?’ असे काहींना वाटेल. आम्हा सर्वांना उत्तम प्रतीची स्वास्थ-सेवा हवी आहे, तेव्हा रक्‍त न वापरता गंभीर वैद्यकीय समस्या हाताळण्याचे कायदेशीर व परिणामकारक मार्ग आहेत का? होय, आहे. द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन (जून ७, १९९०) कळवतेः “वैद्यांना आता [एडस्‌ची] तसेच संक्रमणाद्वारे लागणाऱ्‍या इतर संसर्गाची अधिक जोखीम जाणवू लागली आहे, त्यामुळे ते संक्रमणाद्वारे लाभ आणि जोखीमा यांचा पुनर्विचार करू लागले असताना त्यांनी पर्याय निवडून घेतला आहे व त्यांनी संक्रमण सर्वतोपरि टाळण्याचाही निर्णय घेतला आहे.”b

१९. रक्‍त नाकारुन देखील तुम्हाला वैद्यकीयदृष्ट्या यशस्वीपणे इलाज घेण्याबद्दल का आत्मविश्‍वास राखता येईल?

१९ यहोवाच्या साक्षीदारांनी खूप आधीपासूनच रक्‍त संक्रमणांना नाकारले आहे ते आरोग्याला अपायकारक म्हणूनच नव्हे, तर रक्‍ताबद्दलच्या देवाच्या नियमाला आज्ञाधारकता म्हणून नाकारले. (प्रे. कृत्ये १५:२८, २९) तरीही, कुशल डॉक्टरांनी साक्षीदार रुग्णांना रक्‍ताचा वापर न करता, त्यासंबंधाने उद्‌भवणाऱ्‍या जोखीमा टाळून अगदी यशस्वीरित्या हाताळले आहे. यापैकीच्या पुष्कळ उदाहरणातील एक आर्खिव ऑफ सर्जरी (नोव्हेंबर १९९०) या वैद्यकीय प्रकाशनात दिलेले आहे जेथे, साक्षीदाराने आपल्या विवेकाच्या संमतीनुसार हृदयाचे कलम रक्‍ताचा कसलाच वापर न करता करण्याची अनुमती दिल्याची माहिती आहे. तो अहवाल म्हणतोः “यहोवाच्या साक्षीदारांवर हृदयाची शस्त्रक्रिया करण्याचा २५ पेक्षा अधिक वर्षांचा अनुभवामुळे रक्‍ताची उत्पादने न वापरता हृदयाचे आरोपण यशस्वीपणे करता येणे शक्य झाले. . . . शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यु घडला नाही, आणि आधीच्या अभ्यासक्रमाचा मागोवा घेतल्यावर हे दिसले की, या रुग्णात उच्च कलम करण्यास नकार देण्यात तितकी संवेदना दिसून येत नाही.”

अत्यंत महत्त्वपूर्ण असे रक्‍त

२०, २१. “रक्‍त हे वाईट औषध आहे,” अशी प्रवृत्ती वाढवू न देण्याबद्दल ख्रिश्‍चनांनी का सावधान राहावे?

२० तथापि, प्रत्येक आपल्या जिवाचा शोध घेणारा प्रश्‍न स्वतःला विचारुन पाहण्यास हवा. ‘मी रक्‍त संक्रमण न घेण्याचा निश्‍चय केलेला आहे तर का? प्रामाणिकपणे, माझे याबद्दलचे मूलभूत, मुख्य कारण काय आहे?’

२१ आम्ही आधीच उल्लेख केल्याप्रमाणे संक्रमणाच्या धोक्याशी संबंधित नसणारे कित्येक प्रभावकारी पर्याय उपलब्ध आहेत. कावीळ किंवा एडस्‌सारख्या धोक्यामुळे पुष्कळांनी धार्मिक कारणांशिवाय रक्‍त घेण्याचे नाकारले आहे. काही तर याबद्दल स्पष्टवक्‍ते आहेत, जणू ते “रक्‍त हे वाईट औषध आहे,” अशी पताका घेऊन सर्वांना सांगू शकतात. ख्रिश्‍चन देखील या मोर्च्यात सामील होण्याची शक्यता आहे. पण असा हा मोर्चा रस्त्याच्या टोकाला, विनाशाकडे नेणारा आहे. ते कसे?

२२. जीवन व मरणाबद्दलचा कोणता वास्तववादी दृष्टीकोण आपण घेतला पाहिजे? (उपदेशक ७:२)

२२ खऱ्‍या ख्रिश्‍चनांना याची जाणीव आहे की, अगदी सर्वोत्तम हॉस्पिटलमध्ये सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळूनही कधी ना कधी लोक मरतात. रक्‍त संक्रमण करून वा त्याच्याविनाही ते मरतात. हे म्हणणे दैववादी नव्हे, तर वास्तववादी आहे. मृत्यु हे जीवनातील एक सत्य आहे. रक्‍तासंबंधीच्या देवाच्या नियमाचा अनादर करणाऱ्‍या लोकांना अनेकदा तत्काळ वा उशीराने का होईना, नुकसान भोगावे लागते. काही तर संक्रमित केलेल्या रक्‍तामुळेच मरतात. तरी जे वाचतात त्यांना अनंत जीवन लाभलेले नसते हे आम्हाला समजलेच पाहिजे. याचा अर्थ, रक्‍ताच्या संक्रमणाने जीवन कायमचे वाचत नाही. उलटपक्षी, धार्मिक आणि/वा वैद्यकीय कारणांसाठी रक्‍त नाकारून पर्यायी वैद्यकीय उपचार पद्धती स्वीकारणाऱ्‍या बहुतेक लोकांचे बरे होते. अशा रितीने ते आपले आयुष्य अनेक वर्षे वाढवू शकतात; पण अनंतकालिकपणे नाही.

२३. देवाचा रक्‍ताविषयीचा कायदा, आपण पापी असण्याच्या व खंडणीची गरज असण्याच्या स्थितीशी कसा संबंधित आहे?

२३ सर्व माणसे अपूर्ण असून हळू हळू मरत आहेत ही गोष्ट आपल्याला, पवित्र शास्त्रामध्ये रक्‍ताविषयी म्हटल्या गेलेल्या मध्यवर्ती सत्याकडे नेते. देवाने सर्व मानवजातीला सांगितले होते की, त्यांनी रक्‍त खाऊ नये. का बरे? कारण रक्‍त जीवनाचे प्रतिक आहे. (उत्पत्ती ९:३-६) त्याने नियमशास्त्रात दिलेल्या कायद्यांनी, सर्व माणसे अपूर्ण व पापी असल्याचे स्पष्ट केले. देवाने इस्राएल लोकांना सांगितले की, त्यांनी त्याला वाहिलेल्या प्राण्यांच्या अर्पणाद्वारे आपली पापे झाकण्याची गरज असल्याच्या जाणीवेचे ते प्रदर्शन करू शकत होते. (लेवीय ४:४-७, १३-१८, २२-३०) तो आज जरी याची मागणी करीत नसला तरी त्यामध्ये काही अर्थ होता. देवाने सर्व विश्‍वासू लोकांच्या पापांचे पूर्ण प्रायश्‍चित करील अशा एका सिद्ध अर्पणाची योजना करण्याचे ठरविले. (मत्तय २०:२८) या कारणामुळेच आपण रक्‍ताबद्दल देवाला वाटणारा दृष्टीकोण ग्रहण केला पाहिजे.

२४. (अ) आरोग्य जोखीमा हा रक्‍ताचा केंद्रीभूत भाग समजणे का चुकीचे आहे? (ब) रक्‍ताच्या वापरासंबंधाने आमचा दृष्टीकोण कशाने अधोरेखित होण्यास हवा?

२४ रक्‍ताचा केवळ आरोग्यविषयक दृष्टीकोण प्रामुख्यत्वे ग्रहण करणे चुकीचे ठरेल; कारण देवाने तो केंद्रीभूत समजला नव्हता. रक्‍त न घेण्यामुळे प्राचीन इस्राएलांना बराच स्वास्थ्य लाभ झाला असेल. असा लाभ त्यांनी डुकरे किंवा कुजलेल्या प्राण्यांचे मांस खाण्याचे वर्ज केल्यामुळे मिळाला असेल. (अनुवाद १२:१५, १६; १४:७, ८, ११, १२) पण हे लक्षात घ्या की, जेव्हा देवाने नोहाला मांस खाण्याची मुभा दिली होती तेव्हा त्याने या प्राण्यांचे मांस खाण्याची मनाई केली नव्हती. देव प्रामुख्यत्वे आरोग्यविषयक जोखीमांवर लक्ष देत नव्हता. हा त्याने रक्‍ताबद्दल दिलेल्या फर्मानाचा केंद्रीभूत भाग नव्हता. त्याच्या उपासकांनी रक्‍ताने आपले जीवन वाचवायचे टाळायचे होते, ते आरोग्याला अपायकारक होते म्हणून नव्हे, तर ते पवित्र होते म्हणून टाळायचे होते. त्यांनी रक्‍त नाकारले याचे कारण ते दूषित होते म्हणून नव्हे तर ते बहुमूल्य होते म्हणून. केवळ यज्ञार्पित रक्‍तामुळेच त्यांचे पालक्षालन होऊ शकत होते.

२५. रक्‍त सरतेशेवटी जीवन कसे वाचवू शकते?

२५ हेच सत्य आजही आहे. इफिसकर १:७ मध्ये प्रेषित पौलाने विवेचीत केलेः “त्याच्या कृपेच्या विपुलतेप्रमाणे त्याच्या [ख्रिस्त] रक्‍ताच्या द्वारे आपल्याला मुक्‍ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा मिळाली आहे.” देव ज्याच्या पापांची क्षमा करतो व त्याला नीतीमान असे समजतो, त्या माणसाला चिरकालिक जीवनाचे भवितव्य आहे. अशाप्रकारे येशूचे खंडणीचे रक्‍त जीवन वाचवू शकते—सर्वकाळ व खरे पाहता कायमचे.

[तळटीपा]

a तो जाहीरनामा असा संपलाः “ह्‍यापासून आपणास सांभाळाल तर तुमचे बरे होईल; कल्याण असो.” (प्रे. कृत्ये १५:२९) “कल्याण असो” हे उद्‌गार, ‘जर तुम्ही रक्‍त किंवा जारकर्म वर्ज्य केले तर तुमचे बरे होईल,’ याच्या अनुषंगाने नव्हते. तर ते जसे की, “कळावे,” यासारखे पत्राची समाप्ती दर्शविणारे होते.

b रक्‍त संक्रमणास जे विविध पर्याय आहेत त्याबद्दलची उजळणी रक्‍ताने तुमचे जीवन कसे वाचू शकते? या वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने १९९१ मध्ये प्रकाशित केलेल्या माहितीपत्रकात आढळेल.

तुम्हाला विवेचीत करता येईल का?

▫ यहोवाचे साक्षीदार रक्‍त नाकारतात त्याचे प्रमुख कारण काय आहे?

▫ रक्‍ताबद्दल पवित्र शास्त्राची जी भूमिका आहे ती वैद्यकीय दृष्टीने व्यावहारिक आहे याच्याबद्दल कोणता पुरावा पुष्टी देतो?

▫ रक्‍ताबद्दल पवित्र शास्त्राच्या नियमासोबत खंडणी कशी जुळते?

▫ रक्‍तामुळे जीवन कायमचे वाचू शकते याचा एकमेव मार्ग कोणता आहे?

[२६ पानांवरील चौकट]

संक्रमण व संसर्ग

रक्‍त संक्रमण हे रुग्णाला संसर्ग होण्यास अधिक संवदेनाक्षम ठरु शकते काय याबद्दल विस्तारीत उजळणी केल्यावर डॉ. नेईल बल्युमबर्ग यांनी हा निर्वाळा दिला: “[या प्रकरणाबद्दल] केलेल्या १२ वैद्यकीय अभ्यासात १० अभ्यासामध्ये संक्रमण हे अतिसूक्ष्म जंतूंच्या संसर्गाच्या वाढत्या धोक्याशी अभूतपूर्व रितीने व स्वतंत्रपणे निगडीत असल्याचे आढळून आले आहे . . . याचप्रमाणे शस्त्रक्रियेच्या बऱ्‍याच काळाआधी संक्रमण दिलेले असल्यास ते रुग्णाला संसर्गाची लागण होण्याला प्रतिकार करण्याच्या क्षमतेला, संक्रमण केल्या गेलेल्या रक्‍तातील प्रतिकारक क्षमता अधिक काळ राहिली गेली असल्यास, परिणाम करणारी ठरू शकते असे काही अभ्यासांनी सुचविले आहे. . . . या गृहीत धरलेल्या गोष्टी वाढत गेल्या व स्वीकारल्या गेल्या तर असे दिसते की, शस्त्रक्रियेनंतर होणारे तीव्र संसर्ग ही विविध घटकांचा समावेश असणारी संक्रमणाच्या माध्यमातून होणारी एकमेव व अत्यंत सर्वसाधारण अशी गुंतागुंत संलग्न असू शकेल.”—ट्रान्सफ्यूशन मेडिसीन रिव्ह्‌युज्‌, ऑक्टोबर १९९०.

[२४ पानांवरील चित्रं]

सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारे मोठी करून दाखविलेली रक्‍ताची पेशी. “रक्‍ताच्या प्रत्येक मायक्रोलिटर (०.०००३ औंस) मध्ये ४० ते ६० लक्ष लाल पेशी असतात.” —“द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिआ”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा