“देवाची शांती” तुमच्या अंतःकरणाचे रक्षण करो
“परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] तुजकडे प्रसन्न मुख करो, आणि तुला शांती देवो.”—गणना ६:२६.
१. आपल्या मृत्युच्या थोड्याच आधी पौलाने तीमथ्याला काय लिहिले व त्याद्वारे काय प्रकटविले?
इ.स. ६५ या वर्षी प्रेषित पौल रोममध्ये कैदी होता. त्याला रोमी दंडाधिकाऱ्याकडून हिंसाचारी मरण येणार होते तरी तो शांतीत होता. हे, त्याने त्याचा तरुण मित्र तीमथ्य याला जे लिहिले त्यावरुन स्पष्ट होते. तो म्हणालाः “जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपविली आहे, विश्वास राखला आहे. आता राहिले ते हेच की, मजसाठी नीतीमत्वाचा मुगुट ठेवला आहे तो त्या दिवशी नीतीमान न्यायाधीश प्रभु मला देईल.”—२ तीमथ्य ४:७, ८.
२. पौलाच्या घटनामय जीवनात व त्याच्या मृत्युपर्यंत त्याच्या अंतःकरणाला कोणी संरक्षण दिले होते?
२ मृत्यु समोर असताना पौल एवढा शांत का असू शकला? याचे कारण, “सर्व बुद्धि सामर्थ्याच्या पलिकडे असणारी देवाची शांती” त्याच्या अंतःकरणाचे रक्षण करीत होती. (फिलिप्पैकर ४:७) याच शांतीने, त्याचे ख्रिस्ती धर्मात परिवर्तन झाल्यावर त्याच्या कार्यहालचालीची जितकी काही वर्षे गेली त्यामध्ये रक्षण केले होते. या शांतीने त्याला जमावाचा हल्ला, तुरुंगवास, पीडा आणि दगडमार यामध्ये पाठबळ दिले होते. त्याने धर्मत्याग व यहूदी मताभिमानी वर्चस्वासोबत लढत देताना या शांतीने त्याला बळ दिले होते. याशिवाय अदृश्य आत्मिक शक्तींबरोबर झुंज देताना सुद्धा तिने त्याला मदत केली होती. यास्तव, या शांतीने त्याला अगदी शेवटपर्यंत बळ दिले होते हे उघड आहे.—२ करिंथकर १०:४, ५; ११:२१-२७; इफिसकर ६:११, १२.
३. देवाकडील शांतीसंबंधाने कोणते प्रश्न उभे राहतात?
३ शांती सामर्थ्ययुक्त ताकद असू शकते हे पौलाला किती प्रकर्षाने दिसून आले होते! आज, आम्हाला यापासून काही शिकता येऊ शकेल का? सध्याच्या अडचणीच्या “कठीण दिवसा”त आम्ही “विश्वासाचे सुयुद्ध” लढवीत असता ती आमच्या अंतःकरणाचे रक्षण करून आम्हाला बळ देऊ शकेल का?—१ तीमथ्य ६:१२; २ तीमथ्य ३:१.
देवाबरोबरील शांती—कशी हरपली गेली?
४. पवित्र शास्त्रात “शांती” या शब्दाचे कोणते विविध अर्थ दिसतात?
४ पवित्र शास्त्रात “शांती” हा शब्द विविध अर्थाने वापरण्यात आला आहे. याबद्दलची माहिती द न्यू इंटरनॅशनल डिक्शनरी ऑफ न्यू टेस्टमेंट थिऑलॉजी या शब्दकोषातून मिळते: “जु[ना] क[रार] मध्ये [शा·लोहमʹ] (शांती) ही त्या शब्दाचा विस्तारीत रुपाने अर्थ राखून आहे (शास्ते १९:२०); समृद्धी (स्तोत्र ७३:३), अभक्ताच्या संदर्भात सुद्धा; शारीरिक आरोग्य (यशया ५७:१८[, १९]; स्तोत्र ३८:३); समाधान . . . (उत्प. १५:१५ इत्यादि.); रा व मनुष्ये यांजमधील चांगले नातेसंबंध ( . . . शास्ते ४:१७; १ इति. १२:१७, १८); तारण ( . . . यिर्म. २९:११; तळटीप यिर्म. १४:१३).” यात यहोवासोबतचे शांतीसंबंध सर्वात महत्त्वाचे आहेत आणि याशिवाय इतर सर्व शांतीसंबंध हे क्षणिक व मर्यादित स्वरुपाचे आहेत.—२ करिंथकर १३:११.
५. देवाच्या निर्मितीतील शांती आरंभाला कशी भंग पावली?
५ आरंभाला सबंध सृष्टी यहोवासोबत पूर्ण शांतीसंबंधात होती. या कारणास्तव, देवाने आपल्या सर्व निर्मिती कृत्यांबद्दल, ती सर्व चांगली आहेत असे उचित कारणास्तव घोषित केले होते. ती बघून स्वर्गीय देवदूतांनी मोठा जयघोष केला होता. (उत्पत्ती १:३१; ईयोब ३८:४-७) तथापि, ती विश्वव्याप्त शांती टिकली नाही ही वाईट गोष्ट घडली. आता सैतान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आत्मिक प्राण्याने तेव्हा देवाच्या बुद्धिजीवी प्राण्यातील सर्वात नवी निर्मिती हव्वा हिला देवाच्या आज्ञा पाळण्यापासून दूर करण्यामध्ये चिथाविले तेव्हा ही शांती भंग पावली. हव्वेचा पती आदाम याने तिचा मागोवा अनुसरला; आणि तीन बंडखोर झाल्यामुळे विश्वात विषमता निर्माण झाली.—उत्पत्ती ३:१-६.
६. देवाबरोबरील शांती नष्ट झाल्यामुळे मानवजातीवर कसा परिणाम झाला?
६ देवाबरोबरील शांती हरपल्यामुळे आदाम व हव्वा यांजवर विनाश ओढावला. ते हळूवारपणे शारीरिकदृष्ट्या खंगू लागले व शेवटी मरणात विलीन झाले. नंदनवनातील शांती उपभोगण्यापेक्षा आदामाला एदेनाबाहेरील मशागत न झालेल्या जमिनीवर कष्ट करुन आपल्या वाढत्या कुटुंबाचे पोषण करावे लागले. हव्वेने समाधानकारकरित्या परिपूर्ण मानवी वंशास जन्म देण्याऐवजी तिने दुःख व यातनेच्या रुपात अपूर्ण संतती निपजविली. देवाबरोबरील शांती नष्ट झाल्यामुळे मानवात ईर्ष्या व हिंसाचार यांचा उदय झाला. काईनाने आपला भाऊ हाबेल याचा वध केला. जलप्रलय येईपर्यंत सबंध पृथ्वी हिंसाचाराने भरुन गेली होती. (उत्पत्ती ३:७–४:१६; ५:५; ६:११, १२) आपले पहिले पालक वारले तेव्हा ते, कालांतराने अब्राहाम “शांतीने” आपल्या पितरांस जाऊन मिळाला तसे गेले नाहीत.—उत्पत्ती १५:१५.
७. (अ) संपूर्ण शांतीच्या पुनर्स्थापनेकडे सूचित करणारा कोणता भविष्यवाद देवाने उच्चारला? (ब) देवाचा वैरी सैतान केवढा प्रभावशील ठरला?
७ आदाम व हव्वा आपली शांती गमावून बसल्यानंतर आपल्याला पवित्र शास्त्रात पहिल्यांदाच शत्रूत्वाबद्दलची माहिती मिळते. देवाने सैतानाशी संभाषण केले व म्हटलेः “तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील.” (उत्पत्ती ३:१५) काळ गेला तसतसा सैतानाचा प्रभाव वाढत राहिला व यामुळे प्रेषित योहान असे म्हणू शकला की, “सगळे जग त्या दुष्टाच्या अधीन आहे.” (१ योहान ५:१९) सैतानाच्या ताब्यात असणारे जग निश्चितच देवासोबत शांतीसंबंधात नाही. या कारणास्तव, शिष्य याकोबाने ख्रिश्चनांना हा इशारा दिलाः “जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे हे तुम्हास ठाऊक नाही काय?”—याकोब ४:४.
वैरभाव असलेल्या जगात शांती
८, ९. आदामाच्या पापानंतर मानव देवासोबत कसे शांतीसख्य जोडू शकत होता?
८ मागे एदेनात, देवाने “वैर” हा शब्द प्रथम उच्चारला तेव्हाच त्याने निर्मितीमध्ये संपूर्ण शांतीची कशी पुनर्स्थापना केली जाईल त्याचेही भाकित केले. देवाच्या स्त्रीचे वचनयुक्त संतान त्या मूळ शांतीभंजकाचे डोके फोडणार होता. एदेनाच्या काळापासून पुढे जे त्या अभिवचनावर विश्वास प्रदर्शित करीत गेले अशांनी देवासोबत शांतीसख्य अनुभवले. अब्राहामाने याद्वारे देवाचे मित्रत्व संपादले.—२ इतिहास २०:७; याकोब २:२३.
९ मोशेच्या काळापर्यंत देवाने अब्राहामाचा नातू, इस्राएल, याच्या मुलांना एका राष्ट्रात संघटित केले. त्याने या राष्ट्राला शांती देऊ केली हे अहरोन या प्रमुख याजकाने त्यांना जो आशीर्वाद दिला त्यामध्ये दिसून येतेः “परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] तुला आशीर्वाद देवो व तुझे संरक्षण करो; परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] आपला मुखप्रकाश तुजवर पाडो व तुजवर कृपा करो; परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] तुजकडे प्रसन्नमुख करो आणि तुला शांती देवो.” (गणना ६:२४-२६) यहोवाकडील शांती समृद्ध आशीर्वाद देणार होती पण ती सशर्त होती.
१०, ११. इस्राएलांसाठी देवाची शांती कोणत्या शर्तीवर आधारलेली होती व याचा परिणाम कशामध्ये दिसून येणार होता?
१० यहोवाने त्या राष्ट्राला सांगितलेः “तुम्ही माझ्या विधीप्रमाणे चालला आणि माझ्या आज्ञा पाळून त्याप्रमाणे वर्तला, तर योग्य काळी तुम्हाकरिता मी पर्जन्यवृष्टी करीन, जमीन आपला उपज देईल व मळ्यातील वृक्ष आपापली फळे देतील. मी तुमच्या देशास शांतता [शांती] देईन व तुम्ही निजाल तेव्हा तुम्हास कोणापासून भय प्राप्त होणार नाही. मी देशातून दुष्ट पशू नाहीसे करीन; आणि तुमच्या देशात तरवार चालणार नाही. तुमच्याबरोबर माझा समागम होईल; मी तुमचा देव होईन व तुम्ही माझी प्रजा व्हाल.” (लेवीय २६:३, ४, ६, १२) इस्राएलांना शत्रूंपासून सुरक्षितता, भौतिक समृद्धता, आणि यहोवासोबत जवळचे नातेसंबंध याजद्वारे शांतीचा अनुभव घेता येऊ शकत होता. पण हे सर्व, त्यांनी यहोवाच्या कायद्यांचे पालन करण्यावर अवलंबून होते.—स्तोत्रसंहिता ११९:१६५.
११ इस्राएलांच्या सबंध इतिहासभर बघता, ज्या इस्राएलांनी यहोवाचे निर्बंध विश्वासूपणे पाळले त्यांना त्याच्या शांतीचा अनुभव घेता आला व यामुळे त्यांच्यावर इतर अधिक आशीर्वाद आले. शलमोन राजाच्या आरंभाच्या कारकिर्दीत देवाबरोबरील शांतीने भौतिक समृद्धता तसेच इस्राएलांच्या शेजारील राष्ट्रांकडील युद्धापासून विसावा दिला. या काळाचे वर्णन करताना पवित्र शास्त्र म्हणतेः “दानापासून बैर-शेब्यापर्यंत सारे यहूदी व इस्राएल आपआपली द्राक्षलता व अंजीर वृक्ष ह्यांच्याखाली शलमोनाच्या सर्व कारकिर्दीत निर्भय राहात होते.” (१ राजे ४:२५) शेजारील देशांसोबत शत्रूत्व उद्भवले तेव्हाही विश्वासू इस्राएलांना खऱ्या अर्थाची देवाबरोबरील शांती मिळू शकली. या कारणास्तव, प्रसिद्ध योद्धा राजा दावीद याने म्हटलेः “मी स्वस्थपणे पडून लागलाच झोपी जातो; कारण हे परमेश्वरा [यहोवा, न्यू.व.], तू मला एकांतात निर्भय ठेवतोस.”—स्तोत्रसंहिता ४:८.
शांतीसाठी चांगला आधार
१२. इस्राएलाने सरतेशवटी देवासोबत असणारी आपली शांती कशी घालविली?
१२ जे संतान संपूर्ण शांतीची पुनर्स्थापना करणार होते ते येशूच्या रुपात सामोरे आले. त्याच्या जन्माच्या वेळी देवदूतांनी हे गीत गायिलेः “उर्ध्वलोकी देवाला गौरव, आणि पृथ्वीवर मनुष्यांत शांती.” (लूक २:१४) येशू इस्राएल लोकात आला, पण त्या राष्ट्राने देवाच्या करारात असताना त्याचा पूर्णपणे धिक्कार केला व त्याला ठार मारण्यासाठी रोमी लोकांच्या स्वाधीन केले. आपल्या मृत्युच्या थोड्याच आधी येशू यरुशलेमाकडे पाहून रडला व म्हणालाः “जर तूही या दिवशी शांतीच्या गाष्टी ओळखून घेतल्या असत्या तर किती बरे होते! परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त केल्या आहेत.” (लूक १९:४२; योहान १:११) येशूचा धिक्कार केल्यामुळे इस्राएलाने देवासोबतची आपली शांती पूर्णपणे गमाविली.
१३. मानवाने देवासोबत शांती मिळवण्याकरता यहोवाने कोणता नवा मार्ग प्रस्थापित केला?
१३ तरीही, देवाचा उद्देश अपयशी ठरला नाही. येशूचे मृतातून पुनरुत्थान करण्यात आले आणि त्याने यहोवाला सरळ अंतःकरणाच्या लोकांप्रीत्यर्थ आपल्या परिपूर्ण जीवनाच्या खंडणीचे मोल सादर केले. (इब्रीयांस ९:११-१४) देवासोबत शांती मिळवण्याकरता येशूचे यज्ञार्पण मानवासाठी —स्वाभाविक इस्राएल व विदेश्यांसाठी—नवा व चांगला मार्ग ठरला. पौलाने रोममधील ख्रिश्चनांना लिहिलेल्या आपल्या पत्रात असे म्हटलेः “आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्युद्वारे आपला समेट झाला.” (रोमकर ५:१०) ज्यांनी पहिल्या शतकात शांतीसाठी या मार्गाचा अवलंब केला त्यांचा पवित्र आत्म्याने अभिषेक होऊन त्यांना देवाचे पुत्र म्हणून दत्तक घेण्यात आले व “देवाचा इस्राएल” म्हटलेल्या त्याच्या नव्या आध्यात्मिक राष्ट्राचे सदस्यत्व त्यांना बहाल करण्यात आले.—गलतीकर ६:१६; योहान १:१२, १३; २ करिंथकर १:२१, २२; १ पेत्र २:९.
१४, १५. देवाकडील शांतीचे वर्णन करा व ही शांती सैतानाच्या वैरभावाचे निशाण असतानाही ख्रिश्चनांचे कसे संरक्षण करते ते सांगा.
१४ हे नवे आध्यात्मिक इस्राएल सैतान व त्याच्या जगाचे वैरत्व अनुभवणार होते. (योहान १७:१४) तथापि, त्यांना “देवपिता व ख्रिस्त येशू आपला प्रभु यांजपासून . . . शांती” मिळणार होती. (२ तीमथ्य १:२) येशूने त्यांना म्हटलेच होतेः “या गोष्टी मी तुम्हास अशासाठी सांगितल्या आहेत की, माझ्याठायी तुम्हास शांती मिळावी. जगात तुम्हास क्लेश होतील, तरी धीर धरा; मी जगाला जिंकिले आहे.”—योहान १६:३३.
१५ याच शांतीमुळे पौल व त्याच्या सहकाऱ्यांना सर्व त्रासात व संकटात सांत्वन व सहनशीलता मिळाली. या शांतीमुळे शांत स्थिती तसेच येशूच्या यज्ञार्पणामुळे देवासोबतचे सुसंगत संबंध मिळतात. ती एखाद्याला यहोवा काळजी घेणारा देव आहे अशी जाणीव देऊन त्याच्याठायी मनाची शांती उभारते. प्रेमळ बापाच्या हाताच्या कड्यात मुलाला विश्राम मिळतो, आणि आपली कोणीतरी काळजी घेत आहे व आपल्याकडे लक्ष देत आहे ही निसंशय खात्री त्याला मिळत राहते. अशाच प्रकारे पौलाने फिलिप्पैकरांना उत्तेजन दिलेः “कशाचीही काळजी करू नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलिकडे असलेली देवाची शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये राखील.”—फिलिप्पैकर ४:६, ७.
१६. देवाच्या शांतीने पहिल्या शतकातील ख्रिश्चनांच्या आपसातील नातेसंबंधावर कसा परिणाम घडवून आणला?
१६ आरंभी मानवाने देवासोबत शांती गमावल्यामुळे द्वेष व विसंगती निर्माण झाली. पण, पहिल्या शतकातील ख्रिश्चनांनी देवाची शांती प्राप्त केल्यामुळे याच्या अगदी उलट परिणाम घडला व तो म्हणजे, त्यांच्यामध्ये आपसात शांती व ऐक्यता; यालाच पौलाने “शांतीचे बंधन” असे म्हटले. (इफिसकर ४:३) ते ‘एकमताचा विचार करीत असत, शांतीने राहात असत; आणि शांतीचा व प्रीतीचा देव त्यांच्यासोबत होता.’ याखेरीज, त्यांनी “शांतीची सुवार्ता” घोषित केली; ही सुवार्तेला प्रतिसाद देणाऱ्या ‘शांतीच्या मित्रां’साठी तारणाची सुवार्ता होती. —२ करिंथकर १३:११; प्रे. कृत्ये १०:३६; लूक १०:५, ६.
शांतीचा करार
१७. आपल्या काळी देवाने त्याच्या लोकांसोबत काय केले आहे?
१७ आज ही शांती आढळू शकेल काय? होय, आढळू शकते. १९१४ मध्ये वैभवी येशू ख्रिस्ताच्या वर्चस्वाखाली देवाच्या राज्याची प्रस्थापना झाल्यावर यहोवाने या जगातून ‘देवाचे इस्राएल’ यापैकीच्या राहिलेल्यांना गोळा केले व त्यांच्यासोबत शांतीचा करार प्रस्थापित केला. याद्वारे, त्याने यहेज्केल संदेष्ट्याद्वारे जे अभिवचन दिले होते ते पूर्ण केले. तो म्हणाला होताः “मी त्यांजबरोबर शांततेचा [शांतीचा] करार करीन. तो करार सर्वकाळचा होईल. मी त्यांस वसवीन, त्यांची संख्या वाढवीन, आणि सर्वकाळ राहील असे माझे पवित्रस्थान त्यांच्यामध्ये स्थापीन.” (यहेज्केल ३७:२६) यहोवाने हा करार अभिषिक्त ख्रिश्चनांसोबत केला; यांनी पहिल्या शतकातील आपल्या ख्रिस्ती बांधवाप्रमाणे येशूच्या यज्ञार्पणावर आपला विश्वास ठेवला. आध्यात्मिक प्रदूषित स्थितीतून आपणाला दूर करून त्यांनी स्वर्गीय पित्याला आपले समर्पण केले आणि त्याच्या आज्ञांचे पालन करण्याचा कसोशीने प्रयत्न केला; खासपणे, देवाच्या प्रस्थापित राज्याची सुवार्ता जगभर प्रसारीत करण्याच्या कामात त्यांनी पुढाकार घेतला.—मत्तय २४:१४.
१८. देवाचे इस्राएल यावर देवाचे नाव असल्याचे राष्ट्रातील काहींनी बघितले तेव्हा त्यांनी कसा प्रतिसाद दिला आहे?
१८ भविष्यवाद पुढे म्हणतोः “माझा निवासमंडप त्यांच्यावर राहील. मी त्यांचा देव व ते माझे लोक असे होईल. माझे पवित्रस्थान त्यांच्यामध्ये सर्वकाळ राहील. तेव्हा राष्ट्रांस समजेल की, इस्राएलास पवित्र करणारा मी परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] आहे. (यहेज्केल ३७:२७, २८) याच्या सहमतात, “राष्ट्रां”च्या हजारो, होय लाखो लोकांना हे कळले आहे की यहोवाचे नाव देवाचा इस्राएल याजवर आहे. (जखर्या ८:२३) हे सर्व राष्ट्रांमधून सामोरे येऊन ते त्या आध्यात्मिक राष्ट्रासोबत यहोवाची सेवा करीत आहेत; यांचा प्रकटीकरणात आधीच बघितलेला “मोठा लोकसमुदाय” निर्माण झाला आहे. यांनी “आपली वस्त्रे कोकऱ्याच्या रक्तात धुऊन शुभ्र केल्यामुळे” ते मोठ्या संकटातून वाचतील आणि शांतीमय नव्या जगात प्रवेश मिळवतील.—प्रकटीकरण ७:९, १४.
१९. देवाचे लोक आज कोणत्या शांतीचा आनंद घेत आहेत?
१९ देवाचा इस्राएल आणि मोठा लोकसमुदाय हे एकत्र मिळून आध्यात्मिक शांतीचा अनुभव घेत आहेत. याची तुलना इस्राएलांनी शलमोन राजाच्या काळी जी शांती अनुभवली त्याच्यासोबत करता येऊ शकते. त्यांच्याबद्दल मीखाने आधी भविष्य सांगितले होतेः “ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करतील, आपल्या भाल्यांच्या कोयत्या करतील. यापुढे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही. ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत. ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील. कोणी त्यांस घाबरविणार नाही.” (मीखा ४:३, ४; यशया २:२-४) याच्या सहमतात त्यांनी युद्ध व झगडे यांच्याकडे आपली पाठ फिरविली आहे, लाक्षणिकपणे आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ केले आहेत व आपल्या भाल्यांच्या कोयत्या केल्या आहेत. अशाप्रकारे ते, त्यांचे राष्ट्रीयत्व, त्यांची भाषा, त्यांचा वंश किंवा सामाजिक पार्श्वभूमि कसलीही असली तरी आपल्या आंतरराष्ट्रीय वसाहतीत शांतीप्रिय बंधुत्वाचा अनुभव घेत आहेत. शिवाय, आपणावर यहोवाचे संरक्षणयुक्त निरिक्षण आहे याचा त्यांना निश्चितच आनंद वाटतो. ‘त्यांना कोणीही घाबरे करु शकत नाही.’ खरेच, ‘परमेश्वराने [यहोवा, न्यू.व.] आपल्या लोकांस सामर्थ्य दिले आहे; परमेश्वराने [यहोवा, न्यू.व.] आपल्या लोकांस शांतीचे वरदान दिले आहे.’—स्तोत्रसंहिता २९:११.
२०, २१. (अ) आम्ही देवासोबत असणारी आमची शांती टिकवून ठेवण्यासाठी का परिश्रम घेतले पाहिजे? (ब) देवाच्या लोकांची शांती नष्ट करण्याच्या सैतानाच्या प्रयत्नांबद्दल आपल्याला काय म्हणता येईल?
२० तथापि, पहिल्या शतकातील देवाच्या सेवकांच्या शांतीने सैतानाच्या शत्रूत्वाला डिवचले. देवाच्या राज्याची स्वर्गात १९१४ मध्ये प्रस्थापना झाल्यावर खाली टाकून दिल्यानंतर सैतान “[स्त्रीच्या] संतानापैकीचे बाकीचे लोक” यांजबरोबर युद्ध करीत आहे. (प्रकटीकरण १२:१७) पौलाने त्याच्याही काळी हा इशारा दिला होताः “आपले युद्ध रक्तमांसाबरोबर नव्हे, तर . . . आकाशातील दुरात्मासमूह ह्याबरोबर आहे.” (इफिसकर ६:१२) सध्या सैतान पृथ्वीच्या आसमंतात भ्रमण करीत असल्यामुळे तो इशारा आज तातडीचा आहे.
२१ देवाच्या लोकांची शांती नष्ट करण्यासाठी सैतानाने आपल्या हाती असलेल्या सर्व युक्त्यांचा वापर केला आहे, पण यात तो अपयशी ठरला. मागे, १९१९ मध्ये देवाची विश्वासूपणे सेवा करणाऱ्यांची संख्या १०,००० देखील नव्हती. पण आज, चाळीस लाखांपेक्षा अधिकांनी आपल्या विश्वासाद्वारे जगावर विजय मिळविलेला आहे. (१ योहान ५:४) हे सैतान व त्याच्या संतानाद्वारे शत्रूत्व अनुभवीत असता देव तसेच एकमेकांसोबत खरेपणाने शांतीने राहात आहेत. पण हे शत्रूत्व लक्षात घेता, तसेच आमची स्वतःची अपूर्णता आणि आपण ज्या दिवसात राहात आहोत तो “कठीण काळ” लक्षात आणता आम्हाला आमच्या शांतीचे रक्षण करण्यासाठी झटून काम केले पाहिजे. (२ तीमथ्य ३:१) यामध्ये काय समाविष्ट आहे हे आपण पुढील लेखात पाहू.
तुम्हाला विवेचीत करता यईल का?
◻ मानवाने आरंभाला देवासोबत असणारी शांती का गमावली?
◻ इस्राएलांसाठी देवाबरोबरील शांती कोणत्या शर्तीवर आधारलेली होती?
◻ आज देवासोबत शांती कशावर आधारलेली आहे?
◻ आमच्या अंतःकरणाचे रक्षण करणारी “देवाची शांती” काय आहे?
◻ आपण देवासोबत शांतीसंबंधात असलो तर इतर कोणकोणते आशीर्वाद आपल्याला अनुभवता येतात?