वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w92 १/१ पृ. १३-१७
  • यहोवाच्या वैभवी रथासोबत आपली मजल ठेवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाच्या वैभवी रथासोबत आपली मजल ठेवा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • नेमणूकीचा स्वीकार व पूर्तता
  • देवाची वचने आपल्या हृदयात घेणे
  • बेपर्वा वृत्तीने खचून न जाणे
  • मजल राखण्यासाठी चालना मिळते
  • मजल पुढे चालू ठेवा
  • यहोवाचा वैभवी रथ पुढे प्रगमन करीत आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • ऐका यहोवाचा पहारेकरी बोलत आहे!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • यहोवा आपल्याला आपली सेवा पूर्ण करायला कशी मदत करतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • यहेज्केल पुस्तकातील ठळक मुद्दे—भाग १
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
w92 १/१ पृ. १३-१७

यहोवाच्या वैभवी रथासोबत आपली मजल ठेवा

“ते ऐकोत न ऐकोत, तू माझी वचने त्यांस सांग.”—यहेज्केल २:७.

१, २. यहेज्केलने कोणता वैभवी रथ पाहिला व त्याला काय सांगण्यात आले?

यहोवाचा वैभवी रथ त्याच्या सेवकांपुढे उभा आहे. ते आपल्या विश्‍वासरुपी नेत्रांनी त्यांच्या सार्वभौम प्रभुच्या बादशाही रथास पहात आहेत. तो खराच वैभवी, आश्‍चर्यावह व ऐश्‍वर्यशाली आहे.

२ साधारण २,६०० वर्षांपूर्वी हाच बादशाही रथ देवाचा संदेष्टा यहेज्केल याजपुढे उभा होता. या सिंहासन असलेल्या रथातून—देवाच्या आत्मिक प्राण्यांच्या स्वर्गीय संस्थेमधून—यहोवा ही नाट्यमय आज्ञा यहेज्केलास देतोः “हे त्यांचे वंशज उद्धट व कठीण हृदयाचे आहेत,—मी तुला त्यांजकडे पाठवीत आहे. ‘प्रभु परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] असे म्हणतो हे त्यांस सांग.’ ते तुझे ऐकोत न ऐकोत, निदान त्यांजकडे कोणी संदेष्टा गेला होता हे त्यांस समजेल; ती तर बोलूनचालून फितुरी जात आहे.”—यहेज्केल २:४, ५.

३. आज यहेज्केलचा कोणता आधुनिक प्रतिनमुना आहे?

३ ती आज्ञा यहेज्केलने निश्‍चयपूर्वक पार पाडली व त्याने ईश्‍वरी हातातील एकमेव साधन या नात्याने सेवा केली. याचप्रमाणे आज, देव आपल्या ताब्यात एकच संघटनात्मक साधन राखून आहे. यामध्ये यहेज्केल वर्ग, अभिषिक्‍त शेष अंतिम साक्ष देण्याच्या कामात आघाडीवर आहेत व “दुसरी मेंढरे” यांचा “मोठा लोकसमुदाय” त्यांच्यासोबत जोडीला आहे. (प्रकटीकरण ७:९, १०; योहान १०:१६) यांचा मिळून उत्तम मेंढपाळ, येशू ख्रिस्त याचा “एक कळप” तयार होतो व तो याला रथाचा वैभवी चालक, यहोवा देवाच्या सार्वभौमत्वाखाली निरवीत आहे.

४, ५. देवाची दृश्‍य संघटना कशी अस्तित्वात आली, आणि यशया ६०:२२ च्या अनुषंगाने तिला कसला अनुभव आला?

४ यहोवाच्या मार्गदर्शनानेच या जागतिक संघटनेचे लहानशा आरंभापासून प्रबळ संघटनेपर्यंत प्रगमन झाले व ती, “देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा, कारण त्याची न्यायनिवाडा करावयाची घटिका आली आहे,” या आज्ञेची घोषणा करणारी त्याचे माध्यम बनली आहे. (प्रकटीकरण १४:७) जसे यहेज्केलने स्वतःच उठून स्वतःला संदेष्टा बनवले नाही, त्याचप्रमाणे देवाच्या या दृश्‍य संस्थेने स्वतःची निर्मिती किंवा नेमणूक स्वतःच केली नाही. ती कोणा माणसाच्या इच्छेने किंवा प्रयत्नांनी उदयास आली नाही. रथाच्या ईश्‍वरी चालकाने या संस्थेला अस्तित्वात आणले. देवाच्या आत्म्याने प्रबळ होऊन व पवित्र देवदूतांच्या पाठबळाने यहोवाच्या लोकांनी ही नाट्यमय वाढ अनुभवली की, ‘जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल.’—यशया ६०:२२.

५ आता २१२ देशात ४०,००,००० पेक्षा अधिक यहोवाचे साक्षीदार राज्याचा संदेश घोषित करीत आहेत. त्यांची वर्गवारी ६३,००० पेक्षा अधिक मंडळ्यातून विभाग व प्रांत यात संघटित केलेली आहे. संस्थेच्या मुख्यालयातील केंद्रभागी असलेल्या नियमन मंडळाच्या मार्गदर्शनाखाली विस्तारीत रुपाचे शाखा दप्तर तसेच छपाई यंत्रणा कार्यवाहित होत आहे. जणू काय एक व्यक्‍ती या नात्याने ते सुवार्तेचा प्रचार करीत, जे प्रतिसाद देत आहेत अशांना शिक्षण देत व सभांची स्थळे उभारुन पुढे जात आहेत. होय, यहोवाची दृश्‍य संघटना ही त्याचा वैभवी रथ व त्यावरील चालक यांच्याबरोबर आपली मजल ठेवीत आहे.

६. यहोवाच्या दृश्‍य संघटनेसोबत आपली मजल राखण्यामध्ये कशाचा समावेश होतो?

६ तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांपैकी एक आहात, तर तुम्ही देखील देवाच्या दृश्‍य संघटनेसोबत आपली मजल ठेवीत आहात का? याचा अर्थ ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणे व क्षेत्रकार्यात वेळ खर्च करणे एवढाच नाही. वास्तविकपणे, मजल याचा संबंध प्रगति व आध्यात्मिक वाढ याच्याशी आहे. त्यात सकारात्मक दृष्टीकोण, योग्य त्या गोष्टींना प्राधान्य देणे, आणि अद्ययावत असणे या गोष्टी अंतर्भूत आहेत. आम्ही यहोवाच्या वैभवी रथासोबत आपली मजल ठेवून आहोत तर मग, आम्ही घोषित करतो त्या संदेशाच्या सहमतात आपले जीवन असेल.

७. यहेज्केलची देवाचा संदेष्टा या नात्याची वागणूक का विचारात घेण्यास हवी?

७ यहोवाच्या आधुनिक सेवकांना मजल राखण्याच्या बाबतीत यहेज्केलच्या उदाहरणापासून बरेच काही शिकता येण्याजोगे आहे. यहोवाने यहेज्केलची खासपणे संदेष्टा म्हणून नियुक्‍ती केली होती तरी त्याला भावना, काळजी व गरजा ह्‍या होत्या. उदाहरणार्थ, तरुणपणीच विवाहबद्ध झालेल्या या गृहस्थाला आपल्या बायकोला मृत्युत गमावण्याचे दुःख मिळाले. पण, आपण देवाचा संदेष्टा आहोत या नेमणूकीला त्याने कधीही दृष्टीआड होऊ दिले नाही. तसेच, यहेज्केलने इतर बाबतीत सुद्धा स्वतःला कसे वागविले याचा विचार करता, आम्हाला देखील यहोवाच्या दृश्‍य संघटनेसोबत आपली मजल ठेवण्यासाठी दृढता मिळवता येईल. यामुळेच आपली मजल देवाच्या अदृश्‍य संघटनसोबत राखता येईल.

नेमणूकीचा स्वीकार व पूर्तता

८. यहेज्केलने आपल्या नेमणूकीसंबंधाने कोणते उदाहरण राखले?

८ नेमणूकीचा स्वीकार करून तिची पूर्णता करण्याच्या बाबतीत यहेज्केलने स्वतःचे उत्तम उदाहरण राखले. तरीपण, यांच्या पूर्ततेसाठी आज्ञाधारकपणा व धैर्य यांची गरज होती. आम्ही असे वाचतोः “हे मानवपुत्रा, तुझ्याभोवती काटेझुडपे व काटे असले, तू विंचवांमध्ये असलास, तरी त्यांना भिऊ नकोस, त्यांच्या शब्दांस भिऊ नको. ती फितुरी जात आहे, तरी त्यांच्या शब्दांस भिऊ नको. त्यांच्या चर्येस भिऊ नको; ते ऐकोत न ऐकोत, तू माझी वचने त्यांस सांग; ते तर अत्यंत फितुरी आहेत. हे मानवपुत्रा, मी सांगतो ते ऐक; त्या फितुरी जातीप्रमाणे तू फितुरी होऊ नको.”—यहेज्केल २:६-८.

९. काय केल्यामुळे यहेज्केल रक्‍तदोषापासून मुक्‍त राहणार होता?

९ यहेज्केलने उदासीन किंवा भयभीत व्हावयाचे नव्हते; तसेच आपल्या नेमणूकीची पूर्णता करण्यासाठी सतत टोचणी देण्याची गरज पडू द्यायची नव्हती. त्याने यहोवाचे वचन स्वेच्छेने व धैर्याने सांगितले तरच तो रक्‍तदोषापासून मुक्‍त असणार होता. त्याला सांगण्यात आलेः “तू त्या पातक्यास बजावले असून त्याने आपली दुष्टाई व कुमार्ग ही सोडिली नाहीत, तर तो आपल्या दुष्टाईमुळे मरेल; आणि तू आपला जीव वाचविला असे होईल.”—यहेज्केल ३:१९.

१०. यहेज्केल वर्ग संदेष्ट्याप्रमाणे कसा योग्य ठरला आहे?

१० यहेज्केलप्रमाणेच अभिषिक्‍त यहेज्केल वर्गाने आपल्या देव-प्रणीत नेमणूकीचा स्वीकार केला आहे व ती पूर्ण करीत आहेत. आपण यहोवाचे साक्षीदार आहोत तर, आपले स्वतःचे जीवन तसेच दुसऱ्‍यांचेही जीवन आपल्या आज्ञाधारकपणावर अवलंबून आहे हे आपण लक्षात ठेवलेच पाहिजे. (१ तीमथ्य ४:१५, १६) प्रत्येक साक्षीदाराने यहोवाच्या संघटनेसोबत आपली मजल ठेवण्यास हवी. देव आपल्यापैकी कोणाला त्याच्या रथाला बांधून ओढत नेणार नाही. उदासीनता व द्विधा झालेले अंतःकरण हे रथाच्या चालकाचा अपमान करते. याच कारणास्तव, यहोवाची दृश्‍य संस्था आपल्याला आपल्या जीवनाच्या केंद्रभागी ईश्‍वरी आस्था ठेवण्यास सांगते. अशा आर्जवास नित्य दिलेला प्रतिसाद आपल्याला देवाच्या संघटनेबरोबर पाऊल टाकण्यास व आमचे पवित्र सेवकपण रुळलेल्या व एकाच प्रकारच्या पद्धतीपासून वर उंचावण्यात साहाय्य देते. यहोवाचे लोक सर्वतोपरि अप्रतिम निष्ठा खरीच दाखवीत आहेत. त्याच्याशी आपली मजल राखणे हे आम्हा वैयक्‍तीकांचे कर्तव्य आहे.

देवाची वचने आपल्या हृदयात घेणे

११. देवाच्या वचनांबद्दल यहेज्केलने कोणते उदाहरण राखले?

११ देवाची वचने आपल्या हृदयात साठविण्याच्या बाबतीत यहेज्केलने सुंदर उदाहरण मांडले. त्याला आज्ञा झाल्याप्रमाणे त्याने देवाकडील पट किंवा गुंडळी खाल्ली. “तो माझ्या तोंडात मधासारखा मधुर लागला,” असे यहेज्केलने म्हटले. त्या पटात “विलाप, शोक व आकांत” होता तरी तो यहेज्केलला मधुर होता, कारण यहोवाचे प्रतिनिधित्व करण्याच्या सन्मानास त्याने बहुमोल समजले. त्याची देव-नियुक्‍त नेमणूक पूर्ण करण्याचा मधुर अनुभव संदेष्ट्याने घेतला. देवाने त्याला म्हटलेः “मानवपुत्रा, जी सर्व वचने मी तुला सांगतो ती आपल्या हृदयात साठीव; ती कानाने ऐक.” (यहेज्केल २:९–३:३, १०) त्या दृष्टांतांनी यहेज्केलला, देवाने त्याला ज्यामध्ये सहभागी होण्याची मुभा दिली होती त्याची तीव्र जाणीव करुन दिली व त्याचे यहोवाबरोबरील नातेसंबंध दृढ केले.

१२. दोन दशकापेक्षा अधिक अशा आपल्या भविष्यवादित सेवेमध्ये यहेज्केलने काय काय केले?

१२ यहेज्केलला विविध उद्देशास्तव व मुलाखतीसाठी दृष्टांत व संदेश पुरवण्यात आले. त्याला काळजीपूर्वक ऐकून घेऊन मग बोलायचे व सांगितल्यानुसार कृती करायची होती. त्याच्या २२ वर्षांच्या भविष्यवादित सेवेमध्ये त्याला नवी माहिती व पद्धती प्रगतिशीलपणे कळविण्यात आल्या. कधीकधी यहेज्केलने खास शब्दांनी युक्‍त असलेला संदेश घोषित केला. इतर वेळी त्याने, यरुशलेमाभोवती विटांचे मोर्चे रचीत असल्यासारखा मूक अभिनय करून दाखविला. (यहेज्केल ४:१-८) बायकोच्या मृत्युबद्दल त्याने दाखविलेली प्रतिक्रिया यासारख्या व्यक्‍तीगत गोष्टीतील त्याच्या उदाहरणाने देखील संदेश दिला. (यहेज्केल २४:१५-१९) त्याने अद्ययावत असावयाचे होते, योग्य संदेश द्यायचा होता व योग्य वेळी योग्य ती हालचाल करावयाची होती. यहेज्केल यहोवाच्या नातेसंबंधासोबत अगदी निकटपणे व प्रगतिशीलपणे कार्य करणारा असा जडला होता.

१३. आपल्याला यहोवासोबत जवळचे नातेसंबंध कसे उभारता येतील?

१३ याचप्रमाणे, यहोवा देवाचे सहकारी या नात्याने त्याच्याशी जवळचे नातेसंबंध उभारुन ते राखण्यासाठी आम्ही देखील देवाची वचने आपल्या हृदयी साठविली पाहिजेत. (१ करिंथकर ३:९) या बाबतीत आपल्याला देवाच्या दृश्‍य संस्थेशी मजल राखावयाची आहे तर यथाकाळी पुरविण्यात येत असलेल्या आध्यात्मिक अन्‍नाच्या प्रवाहासोबत आपण जुळवून घेतले पाहिजे. (मत्तय २४:४५-४७) “शुद्ध वाणी” हिचा सतत विस्तार होत आहे. (सफन्या ३:९) आपण अद्ययावत राहिलो तरच आपल्याला रथाच्या चालकाकडून मिळणाऱ्‍या मार्गदर्शनाचे आज्ञाधारकपणे पालन करता येईल.

१४, १५. देवाच्या संस्थेसोबत आपली मजल ठेवण्यासाठी कोणता प्रघात अनुसरण्याची गरज आहे?

१४ यासाठी आपल्याला व्यक्‍तीगत प्रार्थना, खाजगी अभ्यास व सुवार्तेच्या पवित्र सेवेत सहभाग याचा उत्तम प्रघात राखण्यास हवा. (रोमकर १५:१६) यहेज्केलने देवाचा संदेश असणारा पट खाल्ला होता हे लक्षात आणा. हा पट त्याने अर्धवट नव्हे तर पूर्णपणे सेवन केला होता. त्याने आपल्या व्यक्‍तीगत चवीला अनुसरुन असणारा घास खाल्ला नाही. तसेच आम्ही पवित्र शास्त्राचा व ख्रिस्ती प्रकाशनांचा करीत असलेल्या वैयक्‍तीक अभ्यासाने स्वतःला आध्यात्मिक अन्‍नाच्या प्रवाहाशी ठेवले पाहिजे आणि आध्यात्मिक मेजावर जे येते ते सर्व, अधिक खोल सत्येदेखील सेवन करण्यास हवीत.

१५ त्या जडान्‍नाचा अर्थ समजावून घेण्याचा आम्ही प्रार्थनाशील प्रयत्न करतो का? मजल राखण्याचा अर्थ आम्ही आमचे ज्ञान व समज प्राथमिक शिक्षणाच्या पुढे नेले पाहिजे. कारण आम्ही असे वाचतोः “दुधावर राहणारा नीतीमत्वाविषयी अपरिचित असतो; कारण तो बाळक आहे. तथापि, ज्यांच्या इंद्रियांस वहिवाटीने पथ्यापथ्य समजण्याचा अभ्यास झाला आहे अशा प्रौढ मनुष्यांसाठी जडान्‍न आहे.” (इब्रीयांस ५:१३, १४) होय, आध्यात्मिक प्रगती करीत राहणे हे देवाच्या संस्थेसोबत आपली मजल राखण्यासाठी आवश्‍यक आहे.

बेपर्वा वृत्तीने खचून न जाणे

१६, १७. यहेज्केलने बेपर्वा वृत्ती, थट्टा व कमी स्वरुपाचा प्रतिसाद यांच्याशी कसा सामना केला?

१६ यहेज्केलने आज्ञाधारक राहून व स्वतःला लोकांच्या बेपर्वा वृत्तीमुळे किंवा थट्टेने खचून जाऊ न देण्यामध्ये चांगले उदाहरण राखले. याचप्रमाणे, शुद्ध वाणीच्या वाढीसोबत स्वतःला बद्ध ठेवून आपल्याला बादशाही रथाचा चालक कोणती दिशा घेत आहे ते चांगले परिचित होऊ शकते. यामुळे आपल्याला त्याच्या आज्ञेला प्रतिसाद देता येतो, आणि ज्यांना आपण यहोवाच्या न्यायदंडाचा संदेश घोषित करतो त्या लोकांच्या बेपर्वा वृत्तीने व थट्टेने खचून न जाण्याचे बळ मिळते. यहेज्केलप्रमाणेच देवाने आपल्यालाही आधीच याची ताकीद दिली आहे की, काही लोक सक्रियपणे विरोध करतील, ते कठीण माथ्याचे व कठीण अंतःकरणाचे असतील. इतर काही यहोवाचे ऐकून घेऊ इच्छित नाही, म्हणून आमचे ऐकणार नाही. (यहेज्केल ३:७-९) तसेच आणखी काही लोक दांभिक असतील, हे यहेज्केल ३३:३१, ३२ वचन सांगतेः “जनसभेतल्याप्रमाणे ते तुजकडे येऊन माझ्या लोकांच्या रीतीप्रमाणे तुजपुढे बसतात, ते तुझी वचने ऐकतात, पण त्याप्रमाणे चालत नाहीत; ते तोंडाने गोडगोड गोष्टी बोलतात, पण त्यांचे मन लोभवश झाले आहे; आणि पाहा, एखादा मधुर कंठाचा व वाद्ये चांगली वाजविणारा प्रेमगीत गातो तसा तू त्यांस वाटतोस, कारण ते तुझी वचन ऐकतात पण त्याप्रमाणे चालत नाहीत.”

१७ याचा परिणाम काय होणार? ३३वे वचन पुढे म्हणतेः “तरीपण हे घडून येईल—पाहा, ते आता घडत आहे—तेव्हा आपल्यात एक संदेष्टा होता असे त्यांस समजून येईल.” ही वचने प्रकटवितात की, लोकांचा प्रतिसाद कमी होता म्हणून यहेज्केलने माघार घेतली नाही. दुसऱ्‍यांच्या उदासीन वृत्तीमुळे तो स्वतः उदासीन बनला नाही. लोक ऐकोत वा न ऐकोत, त्याने देवाची आज्ञा मानली व आपली नेमणूक पूर्ण केली.

१८. तुम्ही स्वतःला कोणते प्रश्‍न विचारुन बघावेत?

१८ देवाचे भय बाळगून त्याचे गौरव करावे ही घोषणा यहोवाची दृश्‍य संस्था आता अधिक प्रखर बनवीत आहे. तुम्ही राज्य संदेशाच्या बाबतीत निर्भिड भूमिका घेतल्याबद्दल, सदाचारी जीवनमान राखल्याबद्दल जेव्हा तुमची टिका करण्यात येते तेव्हा ती सहन करता का? तसेच रक्‍ताचा स्वीकार न केल्यामुळे, राष्ट्रीय द्योतकांची भक्‍ती न करण्यामुळे आणि जागतिक सण न पाळल्यामुळे तुम्ही जेव्हा दबावाचे निशाण बनता तेव्हा दृढपणे टिकून राहता का?—मत्तय ५:११, १२; १ पेत्र ४:४, ५.

१९. आपण यहोवाच्या वैभवी रथासोबत आपली मजल ठेवीत असल्यास मार्गदर्शनांबद्दल काय करू?

१९ हे मार्गाक्रमण सोपे नाही, पण जे टिकून राहतील अशांचाच बचाव होईल. (मत्तय २४:१३) आपण यहोवाच्या मदतीद्वारेच, जगातील लोकांना आम्हाला त्यांच्यासारखे बनवू देणार नाही आणि यहोवाच्या वैभवी रथासोबत आपली असणारी वाटचाल थांबवू देणार नाही. (यहेज्केल २:८; रोमकर १२:२१) देवाच्या रथरुपी दिव्यदूतीय संघटनेशी आपण आपली मजल ठेवीत आहोत तर मग, देवाच्या दृश्‍य संघटनेमार्फत येणाऱ्‍या सूचना व मार्गदर्शन यांचे त्वरित अवलंबन करू. आमच्या विश्‍वासावर होणाऱ्‍या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी, जीवनी वचनावरील आपली पकड मजबूत ठेवण्यासाठी आणि वैभवी रथाच्या बादशाही चालकावर केंद्रित असणाऱ्‍या आध्यात्मिक वास्तविकतांवर आपली दृष्टी खिळून ठेवण्यासाठी आपल्याला जे जे हवे आहे त्याची पुरवणूक यहोवा करीत असतो.

मजल राखण्यासाठी चालना मिळते

२०. यहेज्केलने अशा कोणत्या गोष्टींचे लिखाण करून ठेवले आहे, ज्यामुळे आपल्याला मजल ठेवण्यास चालना मिळू शकेल?

२० यहेज्केलच्या दृष्टांतांनी आपल्याला मजल राखण्याची चालना दिली पाहिजे. त्याने केवळ देवाचे न्यायदंडच घोषित केले नाही, तर पुनर्स्थापनेबद्दलचे भविष्यवाद देखील लिहून ठेवले. नियुक्‍त वेळी, यहोवाच्या सिंहासनावर बसून कोण कायदेशीरपणे अधिपत्य गाजवील त्याच्याबद्दल यहेज्केलने दर्शविले. (यहेज्केल २१:२७) “दावीद,” हा बादशाही सेवक देवाच्या लोकांचे पुन्हा एकत्रीकरण करून त्यांची राखण करील. (यहेज्केल ३४:२३, २४) त्यांच्यावर गोग मागोगचा हल्ला झाला तरी देव त्यांची सुटका करील व त्याच्या शत्रूंना त्यांचा नाश होत असता तो ‘यहोवा आहे’ असे कळून येईल. (यहेज्केल ३८:८-१२; ३९:४, ७) तेव्हा देवाचे सेवक शुद्ध उपासनेच्या व्यवस्थेत, आध्यात्मिक मंदिरानिशी अनंतकाल जीवनाचा आनंद उपभोगतील. पवित्र स्थानातून वाहत येणाऱ्‍या जीवनदायी पाण्यामुळे तजेला मिळू शकेल व आरोग्य देखील प्राप्त होईल. प्रत्येकाला भूप्रदेशाचे वतन दिले जाऊन आशीर्वादित करण्यात येईल.—यहेज्केल ४०:२; ४७:९, १२, २१.

२१. यहोवाच्या आधुनिक काळातील साक्षीदारांची भूमिका यहेज्केलपेक्षा का मोठी आहे?

२१ त्या भविष्यवादांचे लिखाण करताना यहेज्केल किती शहारला असावा! तथापि, यहोवाच्या आधुनिक काळातील साक्षीदारांची भूमिका मोठी आहे. आपण आज अशा काळात जगत आहोत जेव्हा हे भविष्यवाद पूर्ण होत आहेत. खरे म्हणजे, काही भविष्यवादांच्या पूर्णतेत आपण सक्रियपणे सहभाग घेत आहोत. तर मग, आपण ज्या पद्धतीने जीवन व्यतित करीत आहोत त्याद्वारे, येशू हा तो कायदेशीर हक्क असणारा असा राज्य करीत आहे असा आपला विश्‍वास असल्याचे आपण दाखवून देत आहोत का? यहोवा त्याच्या नावाचे लवकरच पवित्रीकरण करील व जे त्याच्या संस्थेशी आपली मजल राखीत आहेत अशांना तो त्याच्या नव्या जगात नेईल अशी आमची व्यक्‍तीगत खात्री आहे का? (२ पेत्र ३:१३) ही खात्री व सोबत विश्‍वासाची कामे, आपण यहोवाच्या वैभवी रथासोबत खरीच आपली वाटचाल ठेवून आहोत हे प्रदर्शित करते.

मजल पुढे चालू ठेवा

२२. आपली आध्यात्मिक दृष्टी स्पष्ट व सरळ राहण्यासाठी अडथळ्यांना दूर करण्यामध्ये काय करता येण्याजोगे आहे?

२२ एकदा ‘नांगराला हात घातल्यामुळे’ आपण, हे जग सादर करीत आहे त्याकडे लोभिष्टपणे मागे वळून बघू नये. (लूक ९:६२; १७:३२; तीतास २:११-१३) यासाठीच पृथ्वीवर धनसंचय करीत राहण्यासाठी आमचा जो कल निर्माण होण्याची शक्यता आहे तो उपटून काढू आणि आपण आपली दृष्टी साधी राखून ती देवाच्या राज्यावर केंद्रित करू. (मत्तय ६:१९-२२, ३३) आपल्या जीवनात साधेपणा राखणे, शक्य आहे तेथे अनावश्‍यक भार बाजूला टाकून देणे या गोष्टी यहोवाच्या संस्थेसोबत आम्हाला आपली मजल ठेवण्यात मदत करतील. (इब्री १२:१-३) अडथळ्यांमुळे आपली नजर वैभवी रथ व त्याच्या चालकाच्या दृष्टांतापासून दूर होईल. पण देवाकडील मदतीनेच आपण यहेज्केलप्रमाणे आपली आध्यात्मिक दृष्टी स्पष्ट राखू शकू.

२३. नव्या लोकांच्या बाबतीत विश्‍वासू साक्षीदारांनी काय करण्याची गरज आहे?

२३ यहोवाचे साक्षीदार या नात्याने, पुष्कळ नव्या लोकांना देवाच्या वैभवी रथासोबत आपली मजल ठेवण्यामध्ये मदत करणे हा आमच्या जबाबदारीतील एक भाग आहे. १९९० मध्ये येशूच्या मृत्युच्या स्मारकप्रसंगी जवळजवळ १,००,००,००० लोक उपस्थित होते. यांच्यापैकी काहीजण आता काही ख्रिस्ती सभांना येत असतील तरी, अशांनी यहोवाच्या दृश्‍य संघटनेसोबत प्रगति करीत राहण्याचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. आपण त्यांच्यासोबत दाखवीत असलेला आत्मा व त्यांना देऊ करणारे प्रोत्साहन याद्वारे विश्‍वासू साक्षीदार या नात्याने त्यांना मदत करीत राहू या.

२४. सध्याच्या काळातील वातावरणामध्ये आपण काय केले पाहिजे?

२४ सध्याचा काळ अभूतपूर्व वातावरणाचा आहे. आपण आपल्या विश्‍वासरुपी नेत्रांनी आधीच वैभवी रथाची आपल्यापुढील वाटचाल बघितली आहे. बादशाही रथाच्या चालकाने आपल्या दृश्‍य संघटनेला सर्व राष्ट्रांना प्रचार करण्याची आज्ञा दिली आहे की ज्यामुळे शेवटी सर्वांना यहोवा कोण आहे हे समजून येईल. (यहेज्केल ३९:७) तर मग, या भव्य संधीचा लाभ घेऊन देवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करण्यात तसेच त्याच्या पवित्र नामाचे पवित्रीकरण करण्यामध्ये सहभाग घ्या व हे यहोवाच्या वैभवी रथासोबत आपली मजल राखून करीत राहा.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ यहेज्केलने आपल्या नेमणूकीच्या दृष्टीकोणातून बघता कोणते उदाहरण राखले?

◻ देवाच्या संघटनेसोबत आपली मजल ठेवणे याचा काय अर्थ होतो?

◻ यहेज्केलने यहोवाच्या वचनांविषयी कसा दृष्टीकोण धरला?

◻ बेपर्वा वृत्तीचा सामना करण्यात आपल्याला यहेज्केलचे उदाहरण कसे अनुसरता येईल?

◻ यहोवाच्या सेवकांना त्याच्या वैभवी रथासोबत आपली मजल ठेवण्यासाठी कशाने चालना देण्यास हवी?

[१४ पानांवरील चित्रं]

यहोवाच्या वैभवी रथासोबत आपली मजल ठेवण्यासाठी काय करण्याची गरज आहे?

[१५ पानांवरील चित्रं]

यहेज्केलने आपल्या देव-प्रणीत हक्कांबद्दल कदर दाखवली. तुम्ही दाखवता का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा