वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 ८/१ पृ. ७-९
  • मानवाला शांतीकडे कोण नेऊ शकेल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मानवाला शांतीकडे कोण नेऊ शकेल?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मानवी गुणवत्तेपेक्षा अधिक
  • शांतीकडे निरविणारी पावले
  • पुढचे पाऊल
  • सरतेशेवटी शांतीमय जग
  • बळकट आशा
  • “देवाची शांती” तुमच्या अंतःकरणाचे रक्षण करो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • खरी शांती—कोणत्या उगमाकडून?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • खऱ्‍या शांतीच्या प्राप्तीसाठी झटा व तिचा मार्ग धरा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • “शांतीप्रीत्यर्थ प्रयत्न करुन तिचे अवलंबन करा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 ८/१ पृ. ७-९

मानवाला शांतीकडे कोण नेऊ शकेल?

मानव शांती आणू शकणार नाही हे जरी खरे असले तरी याचा अर्थ असा होईल का की आम्हाला शांती प्राप्तच होणार नाही? नाही. आम्हापेक्षा अतिप्रबळ असणारा सैतान हा शांतीचा अडथळा असला तरी त्याच्यापेक्षाही अधिक सामर्थ्यशाली असणारा एक आहे जो सरतेशेवटी मानवजातीला शांतीकडे निरवणार आहे. सैतानाविषयी माहिती देणारे पवित्र शास्त्रच त्या एकाविषयी माहिती देते. ते म्हणते की, “त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्‌भूत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील.” (यशया ९:६, ७) हा शांतीचा अधिपती कोण आहे? येशू ख्रिस्ताखेरीज दुसरा कोणीही नाही. तो नक्कीच शांती आणू शकेल, कारण आम्हापेक्षा त्याची गुणवत्ता अधिक आहे. ते कसे?

मानवी गुणवत्तेपेक्षा अधिक

एक गोष्ट ही की, येशू मर्त्य, मरणाधीन असा नाही. तो मानव म्हणून जगला व त्याला यज्ञार्पित मरण आले हे खरे आहे. पण मग, त्याचे स्वर्गीय अमर जीवनासाठी पुनरुत्थान करण्यात आले व त्याच्या या सद्यस्थितीमुळे तो शांतीचा अधिपती बनू शकतो. या कारणास्तव, भविष्यवाद देखील हे म्हणतो की, “त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.” (लूक १:३२, ३३) पौर्वात्य सम्राट अशोकप्रमाणे नव्हे तर, येशू हा चिरकाल जिवंत राहणार आहे व त्यामुळे आपल्या उत्तम कार्याला कोणी कनिष्ठ स्वरुपाचा वारस नष्ट करू शकणार नाही याची तो सतत ग्वाही देत राहील.

याचप्रमाणे येशू हा पापापासून निष्कलंक आहे. त्याची सत्ता ही ईश्‍वरी सूज्ञता व योग्य तत्त्वांवर आधारलेली आहे. यशया संदेष्ट्याने असे भाकित केलेः “यहोवाचा आत्मा, सूज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पनाचा व सामर्थ्याचा आत्मा, यहोवाच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याजवर राहील. तो डोळ्यांनी पाहील तेवढ्यावरूनच न्याय करणार नाही, कानांनी ऐकेल एवढ्यावरुनच तो निर्णय करणार नाही. तर तो दुबळ्यांचा न्याय यथार्थतेने करील.” (यशया ११:२-४) आरंभीच्या युगातील युरोपियन लोकांप्रमाणे येशू बाहेरील प्रांतात युद्धे लढत राहून आपल्या घरची शांती टिकवणार नाही. त्याच्या अधिपत्याखाली शांती विश्‍वव्यापी असेल.

याखेरीज, येशूला शांती आणविण्याचे सामर्थ्य आहे. भविष्यवाद सांगतोः “यहोवाचा आत्मा . . . सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा” त्याच्यावर असेल. हाच आत्मा विश्‍वाच्या निर्मितीमागे व नीतीमत्तेच्या सर्व सामर्थ्यशाली कार्यामागे होता याची नोंद पवित्र शास्त्रामध्ये आहे. सर्वात मोठा विरोधक सैतान याच्यापाशीही देवाच्या आत्म्याचा सामना करणारी यशस्वी शस्त्रे नाहीत.

शांतीकडे निरविणारी पावले

येशू मानवजातीला शांतीकडे कसा नेऊ शकेल? त्याने या कार्याला सुरवातही केली आहे हे समजल्यावर तुम्हाला कदाचित आश्‍चर्य वाटेल. प्रकटीकरणाच्या भविष्यवादित पुस्तकात येशू स्वर्गीय राज्याचे आधिपत्य देवाकडून स्वीकारत असल्याचे दाखवले आहे. (प्रकटीकरण ११:१५) पवित्र शास्त्रातील भविष्यवादांचे आम्ही बारकाईने परिक्षण केले व आमच्या शतकातील घटनांशी त्यांची तुलना करून पाहिली तर आम्हाला समजते की, येशूच्या राज्यारोहणाचा सोहळा १९१४ मध्ये स्वर्गात संपन्‍न झाला आहे. (मत्तय २४:३-४२) पृथ्वीवर शांती आणण्यातील ते एक महत्त्वाचे पाऊल होते.

असे आहे तर मग, १९१४ मध्येच पहिल्या महायुद्धाचा पृथ्वीवर का भडका उडाला बरे? तसेच इतिहासात पूर्वी नव्हती इतकी युद्धे आमच्या शतकात का झाली बरे? याचे कारण हे की, सैतानाला सर्वकाळासाठी स्वर्गातून हद्दपार करून पृथ्वीच्या आसमंतात फेकून देणे हे त्या स्वर्गीय राज्याचे प्रथम कार्य होते. याचा परिणाम काय झाला? भविष्यवाद सांगतोः “पृथ्वी व समुद्र यावर अनर्थ ओढवला आहे; कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हाकडे आला आहे.” (प्रकटीकरण १२:७-१२) आमच्या शतकातील लढाया सैतानाच्या क्रोधाशी संबंधित आहेत. पण लक्षात घ्याः सैतानाचा हा क्रोध ‘थोड्या काळासाठी’ आहे. तेव्हा ही आणीबाणी लवकरच संपुष्टात येणार आहे!

तथापि, या आधीच शांतीचा अधिपती शांतीसाठी महत्त्वपूर्ण तयारी करीत आहे. प्रथमतः देवाचा येशूद्वारे शांती आणण्याचा उद्देश मानवाला समजला पाहिजे. यालाच अनुलक्षून येशूने हे भाकित केले की, आमच्या काळी, “सर्व राष्ट्रांना साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल.” (मत्तय २४:१४) याच्या पूर्णतेला अनुलक्षून, यहोवाचे साक्षीदार ही सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्‍यात गाजवीत आहेत.

तसेच, सरळ अंतःकरणाच्या लोकांनी या शांतीच्या मार्गाचे शिक्षण प्राप्त करून घेतले पाहिजे. पवित्र शास्त्र हे अभिवचन देतेः “तुझी सर्व मुले यहोवापासून शिक्षण पावतील. तुझ्या मुलांना मोठी शांती प्राप्त होईल.” (यशया ५४:१३) आज लाखो सरळ अंतःकरणाचे लोक हे शिक्षण घेत आहेत.

पुढचे पाऊल

शांतीच्या प्रगतीपथाकडे नेणारे निर्णायक पाऊल उचलण्याची वेळ जवळजवळ आलीच आहे. हे कोणते पाऊल? याची माहिती पुष्कळांना नावापुरतीच असेल, पण खूपच थोडे जण त्याचा खरा उद्देश जाणून आहेत. पवित्र शास्त्र याला “सर्वसमर्थ देवाची मोठ्या दिवसाची लढाई” किंवा “हर्मगिदोन” असे म्हणते. (प्रकटीकरण १६:१४, १६) पुष्कळांना हर्मगिदोन म्हणजे संस्कृतीच नष्ट करणारे आण्विक युद्ध वाटते. पण ते तसे नाही. ते येशू हा शांतीचा अधिपती याकरवी शांतीसाठी आवश्‍यक असणाऱ्‍या घटना सिद्धीस नेणारे कार्य आहे.

आधी हे हर्मगिदोन शांतीला प्रस्थापित करणारे सर्व मानवी अडथळे दूर करील. स्तोत्रसंहिता ३७:१० मधील भविष्यवाद सांगतोः “थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल. तू त्याचे ठिकाण शोधिशील, तरी त्याचा पत्ता लागणार नाही.” होय, येशू सर्व ‘दुर्जनांचा,’ युद्ध करणारे, गुन्हेगार, दहशतवादी, तसेच जे शांतीच्या अधिपतीचा स्वीकार करणार नाहीत अशा सर्वांचा पृथ्वीतील दृश्‍यातून नायनाट करील. अशांना या ग्रहावर पुढे जगण्याचा हक्क मिळणार नाही.—प्रकटीकरण १९:१९-२१.

दुसरे असे की, या हर्मगिदोनमध्ये दानीएलच्या पुढील भविष्यवादाची पूर्णता होणार आहेः “त्या राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील; त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसऱ्‍यांच्या हाती कधी जाणार नाही, तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.” (दानीएल २:४४) युद्धांना वाट करून देणाऱ्‍या सर्व राष्ट्रीय विभाजनांचाही नाश केला जाईल. सरतेशेवटी, एका अधिपत्याखाली एकच जागतिक सरकार अस्तित्वात येईल, ज्यावर आपल्याला भिस्त ठेवता येईल!

पण हे हर्मगिदोन कधी येणार? ते पवित्र शास्त्र सांगत नाही. तथापि, भविष्यवादांच्या पूर्ततेत घडणाऱ्‍या जगव्याप्त घटना हे दर्शवितात की ते लवकरच होईल. पवित्र शास्त्र अगदी स्पष्टपणे अशा घटनेचा उल्लेख करते जे आम्हासाठी एक सूचक चिन्ह असेल. याविषयी प्रेषित पौल म्हणतोः “‘शांती आहे, निर्भय आहे,’ असे ते म्हणतात तेव्हाच त्यांचा अकस्मात नाश होतो.” (१ थेस्सलनीकाकर ५:३) हर्मगिदोनचे शिखर गाठणाऱ्‍या या अचानक नाशानंतर शांतीचा सर्वात मोठा अडसर दूर केला जाईल. सैतानाचा “थोडा काळ” तेव्हा संपलेला असेल व त्याला एका अशा परिस्थितीत डांबले जाईल जेथून तो या पृथ्वीवर उत्पात घडवू शकणार नाही. (प्रकटीकरण २०:१-३) केवढी ही सुटका!

सरतेशेवटी शांतीमय जग

त्या वेळेच्या परिस्थितीचे चित्र आपल्या डोळ्यांपुढे उभे करा. स्तोत्रकर्त्याने हे भविष्य वर्तविलेः “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतीसुखाचा उपभोग घेतील.” (स्तोत्रसंहिता ३७:११) हे लीन लोक यशयाच्या या उदात्त भविष्यवादाची पूर्णता करतीलः “ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करतील; आपल्या भाल्यांच्या कोयत्या करतील. यापुढे एक राष्ट्र दुसऱ्‍या राष्ट्रावर तरवार उचलणार नाहीत; ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत.”—यशया २:४.

मग, सरतेशेवटी एदेनच्या काळानंतर प्रथमच सर्व मानवजात यहोवाकडील आशीर्वादांचा अनुभव घेऊ लागेल; तो त्यांच्याविषयी आपले हे अभिवचन पूर्ण करीलः “पाहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे; त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील. ते त्याचे लोक होतील व देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण हे नाही; शोक, रडणे व कष्ट हीही नाहीत; कारण पहिले होऊन गेले.”—प्रकटीकरण २१:३, ४.

बळकट आशा

मग, आता मानवाला शांतीकडे कोण घेऊन जाईल? तो नियुक्‍त झालेला शांतीचा अधिपती, येशू ख्रिस्त आहे. ही आमच्यासाठी एक व्यवहार्य आशा आहे का? पवित्र शास्त्रातील अभिवचने खात्रीलायक नसती तर मात्र शांतीसाठी खरी आशा राहिली नसती. मानव एकमेकांसोबत युद्ध करीत राहून त्यांना ठार करीत राहिले असते व याचा शेवट दृष्टीपथात दिसला नसता. पण पवित्र शास्त्र हे खरेच खात्रीलायक आहे, आणि ख्रिस्ताच्या अधिपत्याखाली असणारे देवाचे राज्य निश्‍चितपणे शांती आणील. यासाठी, तुमच्या घरी यहोवाचे साक्षीदार जी देवाच्या राज्याची सुवार्ता आणीत आहेत त्याकडे लक्ष देण्याचे आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देत आहोत. तुम्ही स्वतः त्या सुवार्तेचे परिक्षण करा. मग, वेळ आल्यावर तुम्ही इतर लीन जनांसोबत पृथ्वीचे वतन पावाल व उदंड शांतीचा उपभोग घ्याल. (w90 4/1)

[९ पानावरील चौकट]

या लेखात चर्चा करण्यात आलेली शांतीची आशा ही पवित्र शास्त्रामधून आहे. आज पुष्कळ जण पवित्र शास्त्रावर आपला विश्‍वास दाखवीत नाहीत हे पाहता, तुम्हाला, ही आशा खरीच व्यवहार्य आहे का असे वाटू लागेल. ती व्यवहार्य आहे असा यहोवाच्या साक्षीदारांचा ठाम विश्‍वास आहे. ते पवित्र शास्त्राचा देवाकडील प्रेरित वचन असा स्वीकार करतात व म्हणून ते त्याला पूर्ण खात्रीलायक मानतात. त्यांनी १९८९ मध्ये द बायबल—गॉडस्‌ वर्ड ऑर मॅन्स? हे पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकात पवित्र शास्त्राच्या सत्यतेविषयी बरीच माहिती दिलेली आहे. त्या पुस्तकाचेही आपण वाचन करावे अशी आम्ही आपल्याला शिफारस करतो.

पवित्र शास्त्र शांतीविषयी जे अभिवचन देते त्याविषयीचा आणखी एक लेख, “जगव्याप्त शांती—त्याचा खरा अर्थ काय होतो” हा या टेहळणी बुरुज मासिकात नोव्हेंबर १, १९९१ च्या अंकात प्रसिद्ध करण्यात येईल.

[८ पानावरील चौकट/चित्र]

मानवजातीला शांतीकडे घेऊन जाण्याची पात्रता केवळ येशूठायी आहे

[९ पानावरील चौकट]

देवाच्या राज्याची सुवार्ता आज जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्‍यात गाजविली जात आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा