“स्वातंत्र्याचे चाहते” प्रांतिय अधिवेशनाला येण्याचे तुम्हाला निमंत्रण आहे
नोव्हेंबर १९८९ पासून स्वातंत्र्य हा विषय पूर्वी नव्हता इतक्या ठळकपणे मांडण्यात येत आहे. पूर्वेकडील युरोपियन देशात खासपणे राजकीय स्वातंत्र्याचा अनुभव येऊ लागला आहे; हा अनुभव त्यांना ४० व अधिक वर्षांत मिळाला नव्हता.
तथापि, राजकीय स्वातंत्र्यापेक्षा अधिक महत्त्व राखून असणारे आणखी एक स्वातंत्र्य आहे. याविषयी आम्हाला देवाचे वचन, पवित्र शास्त्र यामध्ये माहिती मिळते. येशू ख्रिस्ताने एकदा म्हटले होतेः “तुम्हास सत्य समजेल व सत्य तुम्हास स्वतंत्र करील.” (योहान ८:३२) होय, समर्पित ख्रिस्तीजनांना मानवाचे भय तसेच पाप व मरण यांचे बंधन यापासूनच्या भयापासूनची मुक्तता मिळाली आहे. हे रोमकर ६:१८, २२ मध्ये लिखित आहे. आम्ही असेही वाचतोः “जेथे यहोवाचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे.” (२ करिंथकर ३:१७) खरे म्हणजे, देवाचे वचन ही तेजोमय आशा राखून आहे की, “सृष्टी स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता” मिळेल.—रोमकर ८:२१.
सध्याच्या काळी कोणाला ख्रिस्ती स्वातंत्र्याविषयीची आवड आहे तर मग त्याने खरा प्रयत्न केला पाहिजे. हा काही फारच कमी प्रतिकाराचा मार्ग घेण्याचा प्रकार नाही. या स्वातंत्र्याचा सतत उपभोग घेण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील, कारण दियाबल सैतान, त्याचे दुष्ट जग तसेच आम्हाला वारशाने लाभलेल्या पापीष्ठ प्रवृत्त्या या गोष्टी आमचे स्वातंत्र्य हिरावण्याच्या मागे आहेत. यासाठी, यहोवाने त्याचे प्रेरित वचन, त्याचा पवित्र आत्मा व त्याची दृश्य संस्था यांच्या माध्यमाने आम्हाला मदत देऊ केली आहे.—लूक ११:१३.
स्वातंत्र्याच्या सर्व चाहत्यांची स्वातंत्र्यावर आपली पकड घट्ट ठेवण्यासाठी या वर्षी यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रांतिय अधिवेशनासाठी “स्वातंत्र्याचे चाहते” हाच विषय निवडून घेण्यात आला आहे. हे अधिवेशन तीन दिवसांचे असेल, ते शुक्रवारी सकाळी १०:२०ला सुरु होऊन रविवारी सायंकाळी ४ पर्यंत चालेल. सर्व उपस्थितांना आध्यात्मिक तजेला मिळेल आणि प्रज्वलित भाषणे, आनंददायी अनुभव, प्रभावी प्रात्यक्षिके आणि पवित्र शास्त्रावर आधारलेले थरारक नाटक यामुळे सर्वांची उभारणी केली जाईल. तसेच आमचे नवे व जुने परिचित यांच्यासमवेत मिळणारा उबदार सहवास आणि इतरांसोबत मिळून राज्याची गाणी गाण्यापासून मिळणारा आनंद व जाहीर प्रार्थनेत अंतःकरणपूर्वक रितीने सहभागी होण्याचा हक्क या गोष्टींकडेही दुर्लक्ष करता येणार नाही.
यास्तव, शुक्रवारी सकाळी अधिवेशन सुरु होईल तेव्हा तेथे उपस्थित राहण्याचे हरप्रयत्न यहोवाच्या सर्व समर्पित सेवकांनी करावेत. कोठल्याही गोष्टीला अडखळण बनू देऊ नये. अधिवेशनाला येताना केवळ पवित्र शास्त्र व गायनाचे पुस्तकच नव्हे तर लिखाणाचे साहित्य व नोंद घेण्यासाठी एखादी वहीही सोबत आणावी. स्वतंत्र लोकात सहभागी होणारे या नात्याने आध्यात्मिक गोष्टीची जाणीव राखून या अधिवेशनाला या.—मत्तय ५:३.