वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 ५/१ पृ. २३-२८
  • घातक चहाड्यांपासून स्वतःला आवरा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घातक चहाड्यांपासून स्वतःला आवरा!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ते कसे भिन्‍न आहेत
  • चहाडी निंदा कशी बनते
  • जेव्हा अडचणी उद्‌भवतात
  • का दक्ष राहिले पाहिजे?
  • ती निंदा आहे का?
  • घातक चहाडी कशी चिरडता येईल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • गप्पागोष्टी करण्यात कोणते नुकसान आहे?
    सावध राहा!—१९९९
  • इतर जण माझ्याबद्दल माझ्यामागे बोलत असतील तर मी काय करू?
    तरुण लोक विचारतात
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 ५/१ पृ. २३-२८

घातक चहाड्यांपासून स्वतःला आवरा!

“फार वाचाळता असली म्हणजे पापाला तोटा नाही, पण जो आपली वाणी स्वाधीन ठेवतो तो शहाणा.”—नीतीसूत्रे १०:१९.

१. घातक चहाडी किंवा निंदा ही केवढी अपायकारक असते?

घातक विष कोणालाही आरोग्यदायी पेयात बदलविता येणार नाही. यामुळेच द्वेषपूर्ण चहाडी, किंवा निंदा याचीही तुलना विषासोबत करण्यात आली आहे ती योग्यच आहे. ती माणसाचे चांगले नाव वाईट करते. जुवेनल या रोमी कवीने निंदेस “विषामधील सर्वात वाईट विष” असे म्हटले आहे. तसेच इंग्लिश नाटककार विल्यम शेक्सपीअर एका पात्राच्या तोंडी हे शब्द घालतोः “जो माझे चांगले नाव मजपासून काढून घेतो, तो मला, त्याला समृद्धकारी न ठरणाऱ्‍या गोष्टीपासून वंचित करतो आणि मला खऱ्‍या अर्थाने दरिद्री बनवतो.”

२. कोणत्या प्रश्‍नांचा आपल्याला विचार करायचा आहे?

२ पण चहाडी ही काय असते? ती निंदा यापासून कशी वेगळी ठरू शकते? घातक चहाड्यांपासून स्वतःला आवरण्याची का गरज आहे? हे कसे करता येईल?

ते कसे भिन्‍न आहेत

३. चहाडी व निंदा यात फरक काय?

३ चहाडी म्हणजे “इतर लोक व त्याची कामे याविषयी केलेल्या रिकामटेकड्या गप्पा, ज्या बहुधा खऱ्‍या नसतात.” ती “लहान-सहान परिचित बोली किंवा लिखाण” असते. आम्ही सर्व जण लोकांमध्ये आस्था घेत असतो व म्हणून आम्ही त्यांच्याविषयी चांगले, उभारणीकारक बोलणे इतरांपाशी करीत असतो. पण निंदा ही वेगळी आहे. ती “दुसऱ्‍याचे चांगले नाव व ख्याति डागळण्यासाठी देण्यात आलेला खोटा अहवाल” असते. असे हे भाषण बहुधा द्वेषपूर्ण असते व म्हणून ते ख्रिश्‍चनांना साजेसे नाही.

४. एका लेखकाच्या मते निंदेला कशी सुरवात होते, व ती कशामधून उद्‌भवते?

४ निरुपद्रवी चहाडीचे नाठाळ निंदेत रुपांतर होऊ शकते. आर्थर मी या लेखकांनी म्हटलेः “माणसाला उपद्रव देणारी व त्याचा विनाश घडविणारी निंदा ही सहसा चहाडीपासून सुरवात होते. चहाडी रिकामटेकडेपणाने उद्‌भवत असते. ती जगातील सर्वात वाईट गोष्ट आहे, पण तिचा उद्‌भव साधारणतः अजाणपणात होतो. ज्यांना करण्यासाठी फारच कमी असते आणि ज्यांच्या जीवनात विशिष्ठ हेतू नसतो त्यांच्यामध्ये ही सहसा दिसून येते.”

५. पौलाने १ तीमथ्य ५:११-१५ मध्ये जी सूचना दिली तिचा सारांश काय आहे?

५ रिकामटेकड्या गप्पा निंदा करण्याप्रत निरवीत असल्यामुळे प्रेषित पौलाने विशिष्ट चहाडखोरांविरूद्ध बोलणे केले. मंडळीकडून अर्थसाहाय्य मिळण्यास पात्र आहेत त्या विधवांविषयीची माहिती दिल्यावर तो म्हणालाः “तरुण विधवांस घेऊ नये. कारण त्यांनी कामुक होऊन ख्रिस्ताला [सोडले आहे.] . . . घरोघर फिरून त्या आळशी होतात . . . इतकेच नव्हे तर वटवट्या व लुडबुड्या होतात आणि बोलू नये ते बोलतात. यास्तव माझी अशी इच्छा आहे की, तरुण विधवांनी लग्न करावे, मुले प्रसवावी, घर चालवावे आणि विरोध्याला निंदा करावयाला निमित्त सापडू देऊ नये. कित्येक तर आधीच बहकून सैतानामागे जाऊन चुकल्या आहेत.”—१ तीमथ्य ५:११-१५.

६. ज्या चहाडीच्या प्रकारामुळे निंदा करण्यापर्यंत निरविले जाते तो व्यक्‍तीगत कमकुवतपणा दूर करण्यासाठी काय केले पाहिजे?

६ पौलाने ही गोष्ट ईश्‍वरी प्रेरणेद्वारे लिहिली असल्यामुळे तो येथे त्या स्त्रियांविषयी वाईट शेरे देत नव्हता. त्याने जे म्हटले त्यामुळे आपल्या विचाराला खाद्य मिळते. कोणाही भक्‍तीमान स्त्रीची ‘बहकून सैतानामागे जाण्याची इच्छा’ नसते. पण तेच कोणा ख्रिस्ती स्त्रीला हे दिसते की, ज्यामुळे तिजवर निंदा केल्याचा दोष येतो असे भाषण तिजकडून होत आहे व ती तिजठायी असणारी कमतरता आहे. तर अशावेळी तिने पौलाच्या या सूचनकडे नम्रपणे लक्ष द्यावेः “स्त्रिया गंभीर असाव्या, चहाड नसाव्या.” तो असेही म्हणालाः “वृद्ध स्त्रियांनी चालचलणूकीत वंदनशील असावे. त्या चहाड नसाव्या.” (१ तीमथ्य ३:११; तीत २:३) बांधवांनी देखील या सूचनेचा गंभीरपणे अवलंब करावा.

७. आम्ही जे बोलत असतो त्यावर आम्ही सर्वांनीच का ताबा ठेवला पाहिजे हे शास्त्रवचनीय दृष्टीकोणाने तुम्ही का म्हणता?

७ आम्ही अर्थातच इतर लोकांविषयी, त्यांचे प्रचारकार्यातील अनुभव इत्यादि गोष्टींविषयी बोलत असतो. तरीपण आपण कधीच ‘सहोदराची चहाडी करू नये.’ (स्तोत्रसंहिता ५०:१९, २०) खरे म्हणजे, अधिक बोलणे करूच नये कारण, “फार वाचाळता असली म्हणजे पापाला तोटा नाही, पण जो आपली वाणी स्वाधीन ठेवतो तो शहाणा.” (नीतीसूत्रे १०:१९) या कारणास्तव, चहाडी ही निरुपद्रवी दिसत असली तरी आम्ही ती करण्याचे टाळावे. आम्हाला लोकांविषयी सर्वदा बोलण्याची गरज नाही कारण जर आपण न्याय्य, शुद्ध, प्रिय, सद्‌गुण आणि प्रशंसनीय गोष्टींचा विचार केला तर यामधून निवडून घेण्याजोगे बरेच काही आपल्याला सापडेल.—फिलिप्पैकर ४:८.

चहाडी निंदा कशी बनते

८. सह ख्रिश्‍चनांविषयी बोलणी करणे हे नेहमीच का चुकीचे नसते?

८ आपण जे बोलतो ते अचूक आहे व आमच्या वक्‍तव्याकडून जर इजा होण्याचा परिणाम घडत नाही तर मग, आमच्या समविश्‍वासूंच्या क्षेत्रकार्याविषयी व इतर ईश्‍वरी हालचालीविषयी बोलायला काही हरकत नाही. खरे म्हणजे, अशा प्रकारचे सरळ अभिप्राय हे इतरांची उन्‍नती करू शकतात. (पडताळा प्रे. कृत्ये १५:३०-३३.) काही लोकांनी विश्‍वासू वडीलजन गायस याविषयी बोलणी केली. त्याच्याबद्दल प्रेषित योहानाने असे लिहिलेः “प्रिय बंधो, परकीय बंधुजनांसाठी तू जे काही करतोस ते तुझे करणे विश्‍वासाचे आहे. त्यांनी मंडळीसमोर तुझ्या प्रीतीविषयी साक्ष दिली आहे.” (३ योहान ५, ६) यास्तव, आपल्या सह ख्रिश्‍चनांविषयी बोलणी करणे हे नेहमीच चुकीचे नसते.

९. (अ) क्षुद्र भाषण सरळ लोकांची ख्याति निंदेत कशी बदलू शकते? (ब) आम्ही कोणते प्रश्‍न उचितपणे स्वतःला विचारून पाहिले पाहिजेत?

९ पण तेच, आम्ही कोणाच्या खाजगी जीवनात घुसलो, त्यांच्या हेतूविषयी शंका उपस्थित केल्या किंवा त्यांच्या वागणुकविषयी संशय धरला तर मग, अशा सरळ माणसाची आपल्या क्षुद्र भाषणामुळे निंदा घडू शकते. यास्तव, आपण आपल्याला नेहमी हे प्रश्‍न विचारावेतः माझे बोलणे इतरांची ख्याति वाईट करील का? मी जे बोलतो ते खरे असते का? (प्रकटीकरण २१:८) तेच बोलणे मी त्याच्या उपस्थितीत करून शकेन का? यामुळे मंडळीत विसंगति निर्माण केली जाईल का? माझ्या वक्‍तव्यामुळे त्याच्या सेवेचे हक्क हिरावले जातील का? माझ्या अंतःकरणात तर द्वेषभाव नाही ना? (गलतीकर ५:२५, २६; तीत ३:३) माझ्या बोलण्याची फलप्राप्ती चांगली की वाईट निघेल? (मत्तय ७:१७-२०) हेच मी प्रेषितांच्या संबंधाने बोललो असतो का? (२ करिंथकर १०:१०-१२; ३ योहान ९, १०) अशी ही बोलणी यहोवाला पूज्य मानणाऱ्‍या लोकांना शोभणारी आहेत का?

१०, ११. देवासोबत वस्तीस असावे अशी आपली इच्छा आहे तर मग, आपण स्तोत्रसंहिता १५:१, ३ प्रमाणे काय करणार नाही?

१० देवास सन्मान देतात अशांना अनुलक्षून बोलताना स्तोत्रसंहिता १५:१ विचारतेः “हे यहोवा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील?” त्या व्यक्‍तीविषयीची माहिती पुरविताना स्तोत्रकर्ता दावीद उत्तर देतोः “जो आपल्या जिव्हेने चुगली करती नाही, आपल्या सोबत्याचे वाईट करीत नाही, आपल्या शेजाऱ्‍याची निंदा ऐकत नाही” तो. (स्तोत्रसंहिता १५:३) येथे जो “चुगली” असा शब्द वापरण्यात आला तो “पायाने जाणे,” किंवा “जाणे” या इब्री क्रियापदाचे रूप आहे. इस्राएलांना आज्ञा देण्यात आली होतीः “आपल्या लोकात इकडेतिकडे चहाड्या करीत फिरू नको.” (लेवीय १९:१६, न्यू इंटरनॅशनल व्हर्शन) जो ‘चहाड्या करीत फिरतो,’ तो देवासमागमे राहणारा व त्याचा मित्र नाही.

११ देवाचे मित्र आपल्या सोबत्याचे वाईट करीत नाहीत आणि आपल्या सद्‌गुणी मित्रांविषयी कोणत्याही निंद्य कहाण्या खऱ्‍या मानणार नाहीत. आमच्या समविश्‍वासूंविषयी खोट्या कहाण्या इकडेतिकडे पसरविण्यापेक्षा व वाईट आरोप लावण्यापेक्षा आम्ही त्यांच्याविषयी नेहमी चांगले बोलत राहावे. निंद्य गोष्टी बोलून आपण आपल्या विश्‍वासू बंधूभगिनींचे ओझे वाढविण्याची इच्छा कधीही धरू नये.

जेव्हा अडचणी उद्‌भवतात

१२. आमचे कोणाशी मतभेद असले व त्याच्याविरुद्ध चहाड्या सांगण्याचा आम्हाला मोह झाला तर यावेळी प्रे. कृत्ये १५:३६-४१ आम्हाला कशी मदत देऊ शकते?

१२ आम्हाठायी अपूर्णता असल्यामुळे, आमचे कोणासोबत गंभीर स्वरुपाचे मतभेद आहेत तर त्याच्याविरुद्ध बोलण्याचा आम्हाला मोह होईल. पण, प्रेषित पौलाचा, तो आपल्या दुसऱ्‍या सुवार्तिक यात्रेला निघाला होता, त्यावेळेचा जरा विचार करा . बर्णबाची इच्छा होती की, मार्कने त्यांच्याबरोबर यावे. पण पौलाची इच्छा नव्हती, कारण “पंफुल्याहून [मार्क] . . . सोडून गेला व कामाला आला” नव्हता. तेव्हा “ते संतप्त झाले,” आणि एकमत न झाल्यामुळे ते विभक्‍त झाले. बर्णबाने मार्कला आपल्यासोबत घेतले व तो कुप्र येथे गेला, तर पौलाने सीला यास सोबतीला घेतले व तो सुरिया आणि किलिकिया येथे गेला. (प्रे. कृत्ये १५:३६-४१) काही काळानंतर पौल, बर्णबा व मार्क यांजमधील फूट संपली, कारण मार्क प्रेषितासोबत रोम येथे होता व पौलाने त्याच्याविषयीचे चांगले बोलणे केले. (कलस्सैकर ४:१०) त्यांच्यामध्ये मतभेद झाले तरी या ख्रिश्‍चनांनी समविश्‍वासूंमध्ये एकमेकांबद्दल चहाड्या सांगितल्या याविषयी कोठेच माहिती नाही.

१३. पेत्राशी संबंधित असणाऱ्‍या कोणत्या प्रसंगाच्या बाबतीत पौलाने चहाडी करण्याच्या मोहास टाळले?

१३ पौलाने केफा (पेत्र) याची कानउघाडणी केली तेव्हा पेत्राने केलेल्या कृत्यांविषयीची घातक चहाडी इतरांमध्ये पसरविण्याचा संभाव्य मोह पौलाने आवरला. यरुशलेमातून काही यहुदी ख्रिस्ती आल्यामुळे पेत्राला विदेशी विश्‍वासूंसोबत पंक्‍तीस बसण्यास व त्यांच्याशी सहवास राखण्यास लाज वाटली. पेत्राच्या या कृत्याची त्याच्या पाठीमागे चहाडी लावण्यापेक्षा पौलाने “त्याला तोंडावर अडवले.” त्याने “सर्वांसमक्ष” त्याची कानउघाडणी केली. (गलतीकर २:११-१४) याचप्रमाणे, पेत्राने देखील त्याची कानउघाडणी करणाऱ्‍याची चहाडी केली नाही. खरे म्हणजे, त्याने नंतर पौलाविषयी “आपला प्रिय बंधू” असे उद्‌गार काढले. (२ पेत्र ३:१५) याप्रकारे, जरी कोणा विश्‍वासातील सहकाऱ्‍याची सुधारणा करण्याची गरज प्रस्तुत झाली असेल तरीही हे त्याच्याविषयी चहाड्या पसरविण्याची सबब देत नाही. असे बोलणे आवरणे व घातक चहाड्या पसरविण्याचा मोह टाळणे यासाठी चांगली कारणे आहेत.

का दक्ष राहिले पाहिजे?

१४. घातक चहाड्या न ऐकणे किंवा त्या न परविण्याचे प्रमुख कारण काय आहे?

१४ आम्ही घातक चहाड्यांना का ऐकू नये व त्या पसरविण्यात का सहभागी होऊ नये याचे प्रमुख कारण म्हणजे चहाडीचा धिक्कार करणाऱ्‍या यहोवा देवास संतुष्ट करण्याची आमची इच्छा असली पाहिजे. आम्ही आधीच परिक्षिले आहे त्याप्रमाणे देव अशा बोलण्याविषयी जो दृष्टीकोण राखून आहे तो त्याने इस्राएलांना आधीच याप्रकारे कळवला होताः “आपल्या लोकांमध्ये चहाड्या करीत इकडे तिकडे फिरू नको. आपल्या शेजाऱ्‍याच्या जिवावर उठू नको. मी यहोवा आहे.” (लेवीय १९:१६) आम्हाला ईश्‍वरी पसंती लाभायची आहे तर मग, आमच्या संभाषणात आम्ही ज्याच्याविषयीची बोलणी करीत असतो त्याच्याविषयी निंदा करता कामा नये.

१५. सर्वात मोठा निंदक कोण आहे, आणि घातक चहाड्यांमध्ये सहभागी होण्याचा परिणाम देवाशी असणाऱ्‍या आमच्या नातेसंबंधावर कसा होईल?

१५ घातक चहाड्या करण्यात सहभागी होऊ नये याचे आणखी एक कारण म्हणजे ते, यहोवा देवाचा प्रमुख निंदक, सैतानाचे अनुकरण करणारे ठरत असते. देवाच्या या आद्यशत्रूला “दियाबल” (ग्रीक, डा·याʹबो·लोस) हे उचितपणे नाव दिले गेले आहे, ज्याचा अर्थ “निंदक” असा होतो. हव्वेने या सैतानाच्या निंदक भाषणास कान दिला व त्यानुसार हालचाल केली तेव्हा पहिल्या मानवी जोडप्याला त्यांचा सर्वोत्तम मित्र गमवावा लागला. (उत्पत्ती ३:१-२४) आपण सैतानाच्या युक्त्यांना कधीही नमू नये तसेच घातक संभाषणात समाविष्ट होऊ नये, कारण यामुळे आपल्याला ईश्‍वरी नापसंती लाभेल व ते आम्हाला आमचा सर्वोत्तम मित्र, यहोवा देव यापासून दूर करील.

१६. कोणी निंदक ‘स्नेह्‍यांत फूट’ कशी पाडतो?

१६ द्वेषबुद्धिच्या चहाडखोरांचे आपण केव्हाही ऐकू नये, कारण हे लोक मित्रामित्रात फूट पाडीत असतात. चहाडी करणारा प्रकरण शिगेला नेत असतो, चुकीची माहिती देत असतो, खोटे बोलत असतो आणि राग चेतविणाऱ्‍या शब्दांचा मारा करीत असतो. तो समोरासमोर भाषण करण्याऐवजी पाठीमागे कुजबुजत असतो. मग, निराधार शंका वाढविल्या जातात. अशाप्रकारे, “कानास लागणारा (निंदक) मोठ्या स्नेह्‍यात फूट पाडितो.”—नीतीसूत्रे १६:२८.

१७. लहानसहान चहाड्यात देखील सहभागी न होण्याची दक्षता आपण का राखावी?

१७ लहानसहान चहाड्यात देखील समाविष्ट होण्याचे आपण टाळावे. ते का? कारण, कोणाची इजा करावी या हेतूने जरी एखादा शेरा दिला नसला तरी त्याचा पुनरूच्चार घातक ठरू शकतो. तो कोणा ईश्‍वरी भक्‍तीच्या माणसाची ख्याति डागाळू शकतो व त्याचे नाव वाईट करू शकतो. हे जर घडले आणि तुम्ही त्या कहाणीची सुरवात केली असल्यास किंवा ती दुसऱ्‍यांना सांगितली असल्यास तुम्हाला कसे वाटेल? लोक तुम्हाकडे त्रास निर्माण करणारा माणूस या नात्याने बघू लागतील व मग तुमचा सहवास टाळण्याचा प्रयत्न करतील.—पडताळा नीतीसूत्रे २०:१९.

१८. चहाडी एखाद्या माणसाला लबाड कसे बनविते?

१८ घातक चहाडीपासून स्वतःला आवरण्याचे आणखी एक कारण म्हणजे तुम्हाला लबाड हा किताब त्याद्वारे लावला जाण्याची शक्यता आहे. “कानी लागणाऱ्‍याचे (निंदकाचे) शब्द रुचकर पक्वान्‍नासारखे असतात, ते पोटात अगदी खोल शिरतात.” (नीतीसूत्रे २६:२२) तुम्ही लबाड्या गिळल्या व त्यांचाच पुनरूच्चार करू लागला तर काय? लबाडी ही खरी आहे असे जरी तुम्हाला वाटले असेल तरी तुम्ही शेवटी लबाडीच पसरविणारे होता. आणि जेव्हा त्यातील खोटेपणा प्रकट होतो तेव्हा तुम्ही लबाड दिसता. असे व्हावे असे तुम्हाला वाटते का? जे धार्मिक लबाड्या शिकवतात अशांना देव जबाबदार धरीत नाही का? होय, याचप्रमाणे तो लबाड बोलणाऱ्‍या निंदकांना देखील जबाबदार धरतो. येशूने इशारा दिलाः “माणसे जे जे रिकामटेकडे भाषण करतील त्याचा हिशेब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. कारण तू आपल्या बोलण्यावरून निर्दोष ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून दोषी ठरशील.” (मत्तय १२:३६, ३७, बाईंगटन) वस्तुतः “आपणातील प्रत्येक जण आपापल्या संबंधी देवाला हिशेब” देणार असल्यामुळे, तुम्ही खोटे बोलणारे, निंदक आहात असे त्याने तुम्हास सांगावे हे तुम्हाला आवडेल का?—रोमकर १४:१२.

१९. घातक चहाड्या कोणाचा घात करू शकतात हे का म्हणता येते?

१९ घातक चहाड्या न पसरविण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्या घातकी असतात. होय, त्या घात करणाऱ्‍या, अजाण माणसाची चांगली ख्याति नष्ट करणाऱ्‍या आहेत. काही जिव्हा ‘धारदार तरवारी’ प्रमाणे आहेत, आणि कडू शब्द हे सात्विक माणसांना भात्यातून काढलेल्या बाणासारखे मारले जातात. यासाठीच दाविदाने हे प्रार्थिलेः “दुष्टांच्या कटापासून, दुष्कर्म्यांच्या गुप्त मसलतीपासून मला लपीव. त्यांनी आपली जीभ तरवारीसारखी पाजळली आहे; सात्विकाला एकांतात मारावे म्हणून तीरांसारखा आपल्या कटु शब्दांचा नेम धरिला आहे.” (स्तोत्रसंहिता ६४:२-४) कोणा सहकाऱ्‍याविषयीचे हे वाईट बोलणे करण्यास जबाबदार बनण्याची तुमची इच्छा आहे का? ते इतके करणार का की, दाविदाने जी प्रार्थना केली ती करण्याची पाळी येणार? अधःपात करण्याच्या पातळीपर्यंत जाण्याचा दोष पत्करण्याची तुमची इच्छा आहे का?

२०. (अ) देवाच्या मंडळीचा जेथे विचार आहे तेथे पश्‍चाताप न दाखविणाऱ्‍या निंदकाचे काय होऊ शकते? (ब) चहाडी व निंदा याविषयी वडीलांनी कोणती दक्षता बाळगली पाहिजे?

२० निंदा करणाऱ्‍याला देवाच्या संस्थेतून बाहेर काढण्यात येते; तो पश्‍चाताप न दाखविणारा लबाड आहे या अर्थाने त्याला बहिष्कृत करण्यात येते. पण जे लहानसहान चहाड्या करतात अशांविषयीची ही गंभीर कृति आचरू नये. वडीलांनी निव्वळ चहाडी आणि द्वेषबुद्धि राखणारा निंदक यातील फरक स्पष्ट जाणला पाहिजे; त्यांनी सर्व गोष्टी प्रार्थनापूर्वकतेने पडताळल्या पाहिजेत. मानवी आस्थेमुळे प्रभावीत होणारी पण जी खोटी किंवा द्वेषमूलक नसते अशा चहाडीसाठी वडील बहिष्कृत करण्याचा अधिकार राखून नाहीत. ते प्रकरण योग्य मूल्यमापनाच्या बाहेर अधिक मोठे केले जाऊ नये. त्या चहाडीत निंदा ही निःसंशये गोवलेली आहे हे सिद्ध करण्यासाठी भक्कम साक्ष देणारे साक्षीदार असले पाहिजेत. (१ तीमथ्य ५:१९) पश्‍चाताप न दाखविणाऱ्‍या निंदकांना बहिष्कृत केले जाते की ज्यामुळे द्वेषमूलक चहाडीस आळा बसेल व मंडळीला पापाने भ्रष्टता लागण्यापासून वाचविले जाईल. (१ करिंथकर ५:६-८, १३) पण वडीलांनी उतावळीने कोणाला अशास्त्रीय कारणांच्या आधारावर बहिष्कृत करू नये. प्रार्थना व सूचना यांच्याकरवी ते त्या व्यक्‍तीला पश्‍चाताप करायला, क्षमा मागायला किंवा इतर सुधारणा करायला व आपल्या जिव्हेवर संयम ठेवण्यात प्रगति करण्यासाठी मदत करू शकतील

ती निंदा आहे का?

२१. कोणा अपराध्याविषयी चहाडी करण्यापेक्षा तुम्ही काय केले पाहिजे?

२१ एक सूज्ञ नीतीसूत्र म्हणतेः “लावालावी करीत फिरणारा (निंदक) गुप्त गोष्टी उघड करतो; पण ज्याच्या चित्ती इमान वसते तो गोष्ट गुप्त ठेवितो.” (नीतीसूत्रे ११:१३) याचा अर्थ, कोणी गुप्तपणे गंभीर पाप आचरीत आहे तर त्याविषयी बोलणे हे निंदा ठरू शकते का? नाही. पण, अर्थातच याविषयी चहाडी करू नये. तुम्ही प्रथम त्या अपराध्यास बोलावे व त्याला वडीलांची मदत घ्यायला सांगावी. (याकोब ५:१३-१८) पण तो याविषयी काही करीत नाही असे काही काळापर्यंत दिसले तर मंडळीच्या शुद्धतेची काळजी राखून असल्यामुळे ती माहिती तुम्ही वडीलांना कळवावी.—लेवीय ५:१.

२२. १ करिंथकर १:११ चहाडीविषयीची माहिती देत नाही असे आपण का म्हणू शकतो?

२२ या माहितीमुळे त्या अपराध्याला काही शिक्षा मिळेल, व ते आनंदाचे वाटणार नाही. पण ज्या व्यक्‍तीला शिक्षा मिळते तो, नंतर यामुळे नीतीमत्तेची फळे मिळवू शकतो. (इब्रीयांस १२:११) त्याने केलेले वाईट कर्म इतरांमध्ये चहाडी करणाऱ्‍या लोकांमध्ये नव्हे तर ते हाताळण्यासाठी ज्यांची नियुक्‍ती झालेली आहे अशांना कळविले पाहिजे. पौलाने करिंथ येथील ख्रिश्‍चनांना म्हटलेः “माझ्या बंधूंनो, तुम्हामध्ये कलह आहेत असे मला ख्लोवेच्या घराण्याकडून कळले आहे.” (१ करिंथकर १:११) त्या घरचे लोक आपल्या समविश्‍वासूंविषयी इतरांमध्ये चहाडी करीत होते का? नाही, पण या प्रकरणाचा वृत्तांत एका जबाबदार वडीलाला दिला गेला, जो या प्रकरणात समाविष्ट असणाऱ्‍यांना मदत देण्यासाठी व त्यांची पावले परत जीवनाच्या मार्गावर आणण्यासाठी साहाय्य देऊ शकत होता.

२३. आणखी कोणत्या प्रश्‍नाचा विचार व्हावयाचा आहे?

२३ आम्ही कोणाला घातक चहाड्यांपासून समाविष्ट न होण्यात मदत दिली तर ते त्याच्या भल्यासाठी करीत असतो. एक सूज्ञ नीतीसूत्र म्हणतेः “जो आपले तोंड सांभाळतो तो आपला जीव राखतो; जो आपले तोंड वासतो त्याच्यावर अरिष्ट येते.” (नीतीसूत्रे १३:३) यास्तव, घातक चहाड्यांपासून तसेच दुष्ट निंदेपासून स्वतःला आवरावे यासाठी चांगली कारणे आहेत. पण या घातक चहाड्यांना कसे चिरडून टाकता येईल? आमचा नंतर प्रकाशित होणारा लेख याविषयी माहिती देईल.

तुमचे उत्तर काय असेल?

◻ लहानसहान चहाड्या आणि निंदा यात फरक काय?

◻ चहाडी निंदा केव्हा होते?

◻ घातक चहाड्यांपासून स्वतःला आवर घालण्याची काही कारणे कोणती आहेत?

◻ कोणा व्यक्‍तीचा गंभीर अपराध कळविणे ही निंदा का होऊ शकत नाही?

[२७ पानांवरील चित्रं]

कोणा माणसाविषयी चहाडी करुन त्याजवर मागून हल्ला करण्याचा दोष तुम्हावर कधीही येऊ देऊ नका

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा