बाप्तिस्मा घेतलेले ख्रिस्ती या नात्याने ईश्वरी भक्ती आचरा
“हे देवभक्ता, तू . . . नीतीमत्त्व, ईश्वरी भक्ती . . . ह्यांच्या पाठीस लाग.”—१ तीमथ्य ६:११.
१. तुमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस कोणता या प्रश्नाचे तुम्ही कसे उत्तर देणार? ते तुम्ही का देता?
तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस कोणता? तुम्ही बाप्तिस्मा घेतलेले यहोवाचे साक्षीदार आहात तर तुमचे उत्तर निसंशये असे असेलः ‘माझ्या बाप्तिस्म्याचा दिवस!’ बाप्तिस्मा तुमच्या जीवनातील महत्त्वपूर्ण पाऊल आहे अशी तुमची खात्री झाली आहे. तुम्ही यहोवाला त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी स्वतःचे संपूर्ण व बिनशर्त समर्पण केले आहे याचे ते उघड चिन्ह आहे. तुमचा बाप्तिस्मा हा तुम्ही सर्वसमर्थ देव यहोवा याचे उपाध्याय म्हणून नियुक्त झाल्याची तारीख दर्शवितो.
२. (अ) ख्रिस्ती मार्गाक्रमणात बाप्तिस्मा ही शेवटली पायरी नाही हे कसे विवेचीत करता येऊ शकते? (ब) बाप्तिस्मा होण्याआधी तुम्ही कोणकोणती मूलभूत पावले घेतली?
२ तरीपण, तुमच्या ख्रिस्ती जीवनाक्रमणातील बाप्तिस्मा ही शेवटली पायरी आहे का? नव्हे! उदाहरणादाखल पाहू जाता, कित्येक देशात, विवाह हा योजना व तयारी (व बहुधा प्रणयाराधना) यांचा शेवट करतो. पण याच वेळी तो विवाहीत दांपत्य या नात्याने एका नव्या जीवनाची सुरवात दर्शवितो. याचप्रमाणे, तुमचा बाप्तिस्मा हा तुमच्या तयारीचा, ज्यामध्ये तुम्ही बरीच महत्त्वपूर्ण अशी मूलभूत पावले घेतलेली असतात त्या काळाचा शेवट दर्शवितो. तुम्हाला देव व ख्रिस्त यांजविषयीचे ज्ञान मिळालेले असते. (योहान १७:३) तुमचा यहोवा देवावर खरा देव या अर्थी व ख्रिस्तावर तुमचा तारणारा या अर्थाने तसेच पवित्र शास्त्रावर देवाचे वचन या नात्याने विश्वास बसलेला असतो. (प्रे. कृत्ये ४:१२; १ थेस्सलनीकाकर २:१३; इब्रीयांस ११:६) हा विश्वास तुम्ही तुमच्या गतकालीन मार्गाक्रमणाविषयीचा पश्चाताप करुन व नीतीमान मार्गाक्रमणाकडे वळून प्रदर्शित केलेला असतो. (प्रे. कृत्ये ३:१९) यानंतर तुम्ही यहोवाला त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्यासाठी आपले समर्पण करण्याचा निर्णय घेतला होता. (मत्तय १६:२४) सरतेशेवटी तुमचा बाप्तिस्मा झाला.—मत्तय २८:१९, २०.
३. (अ) बाप्तिस्मा हा देवास केल्या जाणाऱ्या समर्पित जीवनाची सुरवात आहे हे आपल्याला कसे प्रदर्शित करता येईल? (ब) कोणते प्रश्न उद्भवतात, आणि याची उत्तरे आम्हाला मोठ्या आस्थेची का वाटावीत?
३ यास्तव, तुमचा बाप्तिस्मा हा शेवट नव्हे तर देवास दिल्या जाणाऱ्या पवित्र सेवेच्या समर्पित जीवनाची सुरवात आहे. एका प्रामाण्याने म्हटले त्याप्रमाणे ख्रिस्ती जीवन हे ‘आरंभाची लहर व नंतर नेहमीची शिथिलता’ असे असता कामा नये. तेव्हा तुम्ही आपल्या बाबतीत, बाप्तिस्मा ही ‘आरंभाची लहर’ नाही हे कसे दाखवून देऊ शकाल? ईश्वरी भक्ती आचरण जीवनभर आचरून. ही ईश्वरी भक्ती काय आहे? ती आचरणे का जरुरीचे आहे? ती तुम्हाला आपल्या जीवनात अधिकपणे कशी वाढवता येईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला मोठ्या आस्थेची वाटली पाहिजेत, कारण यहोवाच्या येत असलेल्या न्यायाच्या दिवसात आपला बचाव व्हावयाचा आहे तर मग, आपली “ईश्वरी भक्ती”ची कृत्ये आचरणारे लोक अशी ओळख दिसून आली पाहिजे.—२ पेत्र ३:११,१२.
ईश्वरी भक्तीचा अर्थ
४. पौलाने तीमथ्याला काय करण्याचा सल्ला दिला, व त्यावेळी तीमथ्याची स्थिती कशी होती?
४ इ. स. ६१ ते ६४ च्या दरम्यान प्रेषित पौलाने तीमथ्य या ख्रिस्ती शिष्याला पहिले प्रेरित पत्र पाठवले. पैशाविषयीचे प्रेम कोणते धोके आणू शकते त्याचे वर्णन केल्यावर पौलाने लिहिलेः “हे देवभक्ता, तू ह्यापासून पळ, आणि . . . ईश्वरी भक्ती . . . ह्याच्या पाठीस लाग.” (१ तीमथ्य ६:९-११) यावेळी तीमथ्य हा तिशीच्या आरंभाचा आहे हे लक्षात घेणे मनोरंजक आहे. त्याने प्रेषित पौलासोबत खूप प्रवास केला होता. त्याला मंडळ्यातून देखरेखे व उपाध्य सेवकांची नियुक्ती करण्याची नेमणूक मिळाली होती. (प्रे. कृत्ये १६:३; १ तीमथ्य ५:२२) एवढे असतानाही, पौलाने या समर्पित व बाप्तिस्मा घेतलेल्या प्रौढ ख्रिस्ती माणसाला ईश्वरी भक्ती जोपासण्याचा सल्ला दिला.
५. “ईश्वरी भक्ती” या संज्ञेचा काय अर्थ होतो?
५ पौलाने “ईश्वरी भक्ती” हा जो शब्दप्रयोग वापरला त्याद्वारे त्याचा काय अर्थ होत होता? येथे वापरण्यात आलेल्या यु·सेʹबि·या या शब्दाचा शब्दशः अर्थ “चांगली श्रद्धा” असा होतो. या अर्थाविषयी आम्ही असे वाचतोः “यु·सेʹबि·या हा प्रासंगिकपणे लिखाणात येतो व तो समकालीन लिखाणात व्यक्तीगत धार्मिक भक्तीला सुचवितो. . . . तथापि, रोमी काळातील प्रचलित ग्रीक भाषेत त्याचा सर्वसाधारण अर्थ ‘निष्ठा’ असा धरला जाई. . . . ख्रिस्तीजनांच्या बाबतीत यु·सेʹबि·या ही देवाला दाखविण्यात येणारी सर्वोच्च निष्ठा आहे.” (ख्रिश्चन वर्डस्, लेखक नीगेल टर्नर) यास्तव, शास्त्रवचनात वापरण्यात आलेली “ईश्वरी भक्ती” ही संज्ञा यहोवा देवास निष्ठेने वाहिली जाणारी श्रद्धा किंवा भक्ती याला सूचित करते.
६. कोणी ख्रिस्ती त्याच्या ईश्वरी भक्तीचा पुरावा कसा देतो?
६ तथापि, ईश्वरी भक्ती ही नुसती उपासनेची भावना नव्हे. जसा “विश्वास क्रियांवाचून निर्जीव आहे” त्याचप्रमाणे ईश्वरी भक्तीची वक्तव्ये जीवनात दिसून आली पाहिजेत. (याकोब २:२६) न्यू टेस्टमेंट वर्डस् या प्रकाशनात विल्यम बर्कल यांनी लिहिलेः “[यु·सेʹबि·या व याजशी संबंधित असणारे शब्द] नुसत्या भयप्रेरणा व श्रद्धा यांचे वक्तव्य करीत नाहीत, तर ते भक्तीचा निर्देश करतात ज्यात भयप्रेरणा आहे आणि क्रियाशील आज्ञाधारकतेचे जीवन आहे जे श्रद्धेच्या अनुषंगाने असते.” यु·सेʹबि·या याची आणखी व्याख्या करताना आणखी म्हटले आहे की, ती “जीवनाच्या प्रत्येक भागात देवाची अगदी व्यावहारिक रितीने जाणीव ठेवणे” ही आहे. (द सेकंड एपिस्टल जनरल ऑफ पीटर ॲण्ड द जनरल एपिस्टल ऑफ ज्यूड, लेखक मायकल ग्रीन) अशाप्रकारे, ख्रिस्ती जनांनी आपले जीवन ज्या पद्धतीने व्यतित करतात त्याद्वारे यहोवाविषयी त्यांना केवढा जिव्हाळा वाटत असतो ते दाखविले पाहिजे.—१ तीमथ्य २:२; २ पेत्र ३:११.
पराकाष्ठेचा प्रयत्न हवा
७. तीमथ्याचा बाप्तिस्मा झाला असतानाही पौलाने जे त्याला ईश्वरी भक्तीच्या “पाठीस लाग” असे म्हटले त्याचा काय अर्थ होत होता?
७ तथापि, ईश्वरी भक्ती आचरणे व ती प्रदर्शित करणे यात काय काय समाविष्ठ आहे? त्यात बाप्तिस्मा घेणे एवढेच असते का? हे लक्षात घ्या की, तीमथ्याचाही बाप्तिस्मा झाला होता तरी त्याला सुद्धा ईश्वरी भक्तीच्या “पाठीस लाग [शब्दशः ‘पाठीस लागत राहा’]” असे आर्जविण्यात आले.a (१ तीमथ्य ६:११, किंग्डम इंटरलिनियर) तीमथ्याठायी ईश्वरी भक्तीचा अभाव होता असे पौल येथे सुचवीत नव्हता. उलटपक्षी, तो त्याच्याठायी ही भक्ती तत्परतेने तसेच उत्साहाने जोपासत राहण्याची गरज बिंबवीत होता. (पडताळा फिलिप्पैकर ३:१४.) स्पष्ट म्हणायचे तर हा जीवनभरचा मागोवा होता. इतर बाप्तिस्मा झालेल्या ख्रिश्चनांप्रमाणेच तीमथ्याला ईश्वरी भक्ती प्रदर्शित करण्यात सतत प्रगति करीत रहायचे होते.
८. ईश्वरी भक्ती आचरीत राहण्यासाठी पराकाष्ठेचा प्रयत्न जरुरीचा आहे हे पेत्र कसे दाखवितो?
८ ईश्वरी भक्ती आचरीत राहण्यासाठी समर्पित व बाप्तिस्मा घेतलेल्या ख्रिश्चनांनी पराकाष्ठेचे प्रयत्न करण्यास हवे. “ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी” बनण्याची आशा असलेल्या बाप्तिस्मा घेतलेल्या ख्रिश्चनांना लिहिताना प्रेषित पेत्र म्हणालाः “ह्याच कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची, सात्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात धीराची, धीरात ईश्वरी भक्तीची . . . भर घाला.” (२ पेत्र १:४-६) बाप्तिस्मा घेण्यासाठी विश्वास हा काही प्रमाणात लागतोच. तरीपण, बाप्तिस्म्यानंतर आम्ही नुसत्या नाममात्र ख्रिस्तयत्वावर संतुष्ट राहून चालणार नाही. याऐवजी आपण जसजसे ख्रिस्ती राहणीमानात प्रगति करीत राहू तसतसे आम्ही इतर गुणांचीही वाढ केली पाहिजे, ज्यात ईश्वरी भक्तीचा गुणही समाविष्ट आहे. तो आमच्या विश्वासास पूरक ठरु शकतो. याकरता, पेत्र म्हणतो की, होईल तितका प्रयत्न करण्याची गरज आहे.
९. (अ) ईश्वरी भक्ती आचरण्यासाठी जो प्रयत्न हवा त्याचे स्पष्टीकरण “भर घाला” याविषयीच्या ग्रीक शब्दात कसे केले गेले आहे? (ब) तेव्हा पेत्र आपल्याला काय करण्यास आर्जवीत आहे?
९ “भर घाला” यासाठी पेत्र ज्या ग्रीक शब्दाचा वापर करतो त्या ए·पि·खो·रे·जिʹओ याची मनोरंजक पार्श्वभूमी आहे व तो सातत्याने प्रयत्न करीत राहण्याची स्पष्टता देतो. हा शब्द खो·रे·जोसʹ या नामापासून बनला आहे व याचा अर्थ एका “वाद्यवृंदाचे नेतृत्व करणे” असा आहे. रंगमंचावरील नाटकात एका वाद्यवृंदास तालीम देणे व त्याची निगा राखण्यात येणारा सर्व खर्च करणाऱ्याचाही ते निर्देश करते. या लोकांनी आपल्या शहरावरील प्रेमाखातर ही जबाबदारी स्वेच्छेने पत्करलेली असते आणि यासाठी लागणारा सर्व खर्च आपल्या खिशातून दिलेला असतो. एक सुंदर प्रयोग सादर करण्यासाठी ती माणसे मोठ्या दिमाखाने हा भरपूर खर्च करीत असतात. या शब्दापासूनच पुढे “भर घालणे, मुबलकपणे पुरविणे” हा अर्थप्रयोग सुरु झाला. (पडताळा २ पेत्र १:११.) तद्वत, पेत्र आपल्याला ईश्वरी भक्तीचे केवळ काही प्रमाण नव्हे तर या मोलवान गुणाचे प्रदर्शन आपल्याला आहे तितक्या अधिक प्रमाणात दाखविण्यास आर्जवितो.
१०, ११. (अ) ईश्वरी भक्तीचे आचरण व प्रदर्शनासाठी प्रयत्न का आवश्यक आहेत? (ब) या लढतीत आपल्याला कसे विजयी होता येईल?
१० तरीपण, ईश्वरी भक्ती वाढविण्यासाठी व प्रदर्शित करण्यासाठी असा प्रयत्न का जरुरीचा आहे? कारण एक गोष्ट म्हणजे आपल्याला पतित शरीरासोबत सतत लढा द्यावा लागतो. “मानवाच्या अंतःकरणातील कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात,” त्यामुळे देवास आज्ञाधारक राहून क्रियाशीलपणे जीवन आचरीत राहणे हे सोपे नसते. (उत्पत्ती ८:२१; रोमकर ७:२१-२३) “ख्रिस्त येशूमध्ये ईश्वरी भक्तीने आयुष्यक्रमण करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल,” असे प्रेषित पौल म्हणतो. (२ तीमथ्य ३:१२) होय, देवाला संतुष्ट करणाऱ्या मार्गांनी आपले जीवन आचरणाऱ्या ख्रिश्चनाने जगापासून वेगळेच राहिले पाहिजे. त्याचे दर्जे वेगळेच व त्याची ध्येयेही वेगळीच असतात. यामुळे दुष्ट जगाकडील द्वेषास पात्र व्हावे लागते, याचा येशूनेही ईशारा दिला होता.—योहान १५:१९; १ पेत्र ४:४.
११ तरीपण, या लढतीत आपण विजयी होऊ शकतो; कारण “ईश्वरी भक्तीच्या लोकांना परीक्षेतून कसे सोडवावे . . . हे यहोवाला कळते.” (२ पेत्र २:९) आपण देखील ईश्वरी भक्ती आचरीत राहून आपला कार्यभाग पूर्ण करण्यास हवा.
ईश्वरी भक्ती आचरणे
१२. ईश्वरी भक्ती अधिक पूर्ण प्रमाणात आचरण्यासाठी कशाची जरुरी आहे असे पेत्र सूचित करतो?
१२ मग, ही ईश्वरी भक्ती तुम्हाला अधिक प्रमाणात कशी आचरता येईल? याचा संकेत प्रेषित पेत्र आम्हाला दाखवितो. पेत्राचे दुसरे पत्र १:५, ६ मध्ये आमच्या विश्वासाला ज्या गुणांची जोड हवी आहे त्याविषयीची यादी देताना तो ईश्वरी भक्तीच्या आधी अचूक ज्ञान या गुणाविषयी सांगतो. याच अध्यायात आधी त्याने असे लिहिलेः “ज्याने तुम्हाआम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले त्याच्या अचूक ज्ञानाच्या द्वारे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व ईश्वरी भक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत.” (२ पेत्र १:३) अशाप्रकारे पेत्राने ईश्वरी भक्तीचा संबंध यहोवाच्या अचूक ज्ञानासोबत असल्याचे दाखवून दिले.
१३. ईश्वरी भक्ती आचरण्यासाठी अचूक ज्ञानाची का गरज आहे?
१३ वस्तुतः अचूक ज्ञानाअभावी ईश्वरी भक्ती आचरणे अशक्य आहे. ते का? कारण ही ईश्वरी भक्ती यहोवाशी थेट संबंध दर्शवून आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे ती आमचे जीवन आम्ही ज्या पद्धतीने व्यतित करतो त्याकरवी प्रदर्शित होत असते. यहोवास व्यक्तीगतपणे, अगदी जवळून जाणण्यासाठी तसेच त्याचे सर्व गुण व मार्ग याजशी पूर्णपणे परिचित होण्यासाठी यहोवाच्या अचूक ज्ञानाची गरज आहे. याखेरीज, त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करण्यासाठीही त्याची गरज आहे. (इफिसकर ५:१) आम्ही यहोवाविषयी शिकून घेण्यासंबंधाने तसेच त्याचे मार्ग व गुण आमच्या जीवनात प्रवर्तित करण्यासाठी जितकी प्रगति दाखवतो तितक्या अधिकपणे आम्हाला त्याची ओळख घडते. (२ करिंथकर ३:१८; पडताळा १ योहान २:३-६.) यामुळे यहोवाठायी असणाऱ्या मोलवान गुणांविषयी अधिक खोल रसिकता परिणामित होते; हीच अधिक प्रमाणातील ईश्वरी भक्ती होय.
१४. अचूक ज्ञानाच्या प्राप्तीसाठी व्यक्तीगत अभ्यासाविषयीचा कोणता कार्यक्रम समाविष्ट असण्यास हवा व का?
१४ हे अचूक ज्ञान तुम्हाला कसे मिळू शकेल? यासाठी आडवाटा नाहीत. अचूक ज्ञानाच्या प्राप्तीसाठी आम्ही देवाच्या वचनाचा व पवित्र शास्त्राधारित साहित्याचा अभ्यास परिश्रमाने करणारे असले पाहिजे. अशा या व्यक्तीगत अभ्यासात पवित्र शास्त्र वाचनाचा कार्यक्रम, जो ईश्वरशासित उपाध्यपणाच्या शाळेत आयोजला आहे, तो असण्यास हवा. (स्तोत्रसंहिता १:२) पवित्र शास्त्र हे देवाकडील एक बक्षीस आहे, त्यामुळे आम्ही पवित्र शास्त्र अभ्यासाच्या अनुषंगाने व्यक्तीगतरित्या जे करतो त्याद्वारे या बक्षीसाविषयी आपल्याला किती आत्मीयता वाटते ते प्रदर्शित होते. तर मग, यहोवाने पुरविलेल्या आध्यात्मिक तरतुदींविषयी तुम्हाला वाटणारी रसिकता तुमच्या व्यक्तीगत अभ्यासाच्या सवयीकरवी कशी दिसून येते?—स्तोत्रसंहिता ११९:९७.
१५, १६. (अ) व्यक्तीगत अभ्यासाची ओढ लागण्यासाठी कशाने मदत मिळू शकते? (ब) व्यक्तीगत पवित्र शास्त्र अभ्यासाचा परिणाम ईश्वरी भक्तीमध्ये घडून यावयाचा आहे तर देवाच्या वचनाच्या एखाद्या भागाचे वाचन करतेवेळी काय करण्यास हवे?
१५ हे खरे की, वाचन व अभ्यास याविषयी काहींना त्रागा वाटतो. पण वेळ व परिश्रमाद्वारे तुम्ही व्यक्तीगत पवित्र शास्त्राभ्यासाविषयी आध्यात्मिक आवड वाढवू शकाल. (१ पेत्र २:२) यहोवाने तुम्हासाठी जे केले, जे करीत आहे व जे अद्याप करणार आहे त्याविषयी तन्मयतेने विचार कराल तेव्हा त्याच्याविषयी अधिक शिकून घेण्याविषयी तुमची अंतरिक ओढ आणखी वाढेल.—स्तोत्रसंहिता २५:४.
१६ पण या व्यक्तीगत पवित्र शास्त्र अभ्यासाचा हेतू तुमची ईश्वरी भक्ती वाढीस लावणे हा आहे तर मग, काही पृष्ठांचे वाचन करणे किंवा वाचलेली माहिती आपल्या मनात ठेवणे हे तुमचे उद्दिष्ट असू नये. उलटपक्षी, तुम्ही देववचनाच्या एका भागाचे वाचन करता तेव्हा वेळ देऊन त्या साहित्यावर मनन करावे व स्वतःला असे प्रश्न विचारावेतः ‘हा भाग मला यहोवाचे कनवाळू गुण व त्याचे मार्ग यांजविषयी काय शिकवितो? या बाबतीत मला यहोवासारखे अधिक सदृश्य कसे होता येईल?’
१७. (अ) होशेयच्या पुस्तकाद्वारे आपल्याला यहोवाच्या दयाळूपणाविषयी काय शिकायला मिळते? (ब) यहोवाच्या दयाळूपणाविषयीचे चिंतन केल्यास आम्हावर कसा परिणाम होईल?
१७ याचे एक उदाहरण पहा. काही काळाआधी आमच्या ईश्वरशासित शाळेतील पवित्र शास्त्र वाचनाचा भाग होशेय या पुस्तकावर होता. या पवित्र शास्त्र पुस्तकाचे वाचन केल्यावर तुम्ही स्वतःला विचारु शकताः ‘या पुस्तकाद्वारे मला यहोवाबद्दल व्यक्तीगतरित्या—त्याचे गुण व मार्ग—याविषयी काय शिकायला मिळते?’ नंतरच्या पवित्र शास्त्र लेखकांनी या भागाचा ज्या पद्धतीने वापर केला त्याकरवी आपल्याला यहोवाच्या कनवाळूपणाविषयी या होशेय पुस्तकातून बरेच शिकण्याजोगे आहे हे दिसेल. (पडताळा मत्तय ९:१३ होशेय ६:६ सोबत; रोमकर ९:२२-२६ होशेय १:१० व २:२१-२३ सोबत.) होशेयने आपली पत्नी गोमेर हिजसोबत जे दळणवळण राखले त्याद्वारे यहोवाने इस्राएलांना दया दाखविण्याची दाखवलेली तयारी कळते. (होशेय १:२; ३:१-५) इस्राएलात रक्तपात, चोऱ्या, व्यभिचार व मूर्तिपूजा यांना उत आला होता तरी यहोवा इस्राएलाच्या ‘अंतःकरणास धीर देऊन बोलला.’ (होशेय २:१३, १४; ४:२) यहोवा अशी दया दाखविण्याच्या बंधनात नव्हता तरीही त्याने, इस्राएल आपल्या पापीष्ठ मार्गाक्रमणाला सोडून देऊन अंतःकरणपूर्वक पश्चाताप व्यक्त करील असे अपेक्षून ती “मोकळ्या मनाने” दाखविली. (होशेय १४:४; पडताळा होशेय ३:३.) यहोवाच्या या अप्रतिम दयाळूपणाविषयी जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुमचे अंतःकरण उचंबळून येईल व त्याजशी तुमचे व्यक्तीगत नाते अधिकच दृढ होईल.
१८. होशेय पुस्तकात जोर देऊन सांगण्यात आलेल्या यहोवाच्या दयेविषयी चिंतन केल्यावर तुम्हाला स्वतःला काय विचारता येईल?
१८ तथापि, आणखी काही गोष्टींची गरज आहे. “जे दयाळू ते धन्य, कारण त्यांजवर दया दाखविली जाईल.” (मत्तय ५:७) यास्तव, होशेय पुस्तकात दाखविलेल्या यहोवाच्या दयाळूपणाविषयीचे चिंतन केल्यावर स्वतःस विचाराः ‘मी इतरांबरोबर जे दळणवळण राखून आहे त्यामध्ये मला यहोवाचे अधिक चांगल्याप्रकारे अनुकरण कसे करता येईल? माझ्याविरुद्ध पाप केलेल्या किंवा मला दुखवलेल्या कोणा बंधू वा भगिनीने मजकडे क्षमा मागितली तर मी ती “संतोषाने” करतो का?’ (रोमकर १२:८; इफिसकर ४:३२) तुम्ही मंडळीत नियुक्त वडील म्हणून असाल तर तुम्हाला स्वतःला हे विचारता येईलः ‘न्यायविषयक प्रकरणे हाताळताना जेव्हा अपराधी अंतःकरणपूर्वक पश्चातापाचा खरा पुरावा देत आहे तेव्हा मला यहोवाचे, जो “क्षमाशील” आहे त्याचे अधिक चांगल्याप्रकारे कसे अनुकरण करता येईल?’ (स्तोत्रसंहिता ८६:५; नीतीसूत्रे २८:१३) ‘दया दाखविण्यास आधार मिळावा म्हणून मी कोणत्या गोष्टीकडे पाहिले पाहिजे’?—पडताळा होशेय ५:४ व ७:१४.
१९, २०. (अ) पवित्र शास्त्राचा कसून अभ्यास केल्याचा काय परिणाम दिसतो? (ब) ईश्वरी भक्ती जोपासण्यास आणखी कोणती मदत आहे, आणि पुढचा लेख कशाची चर्चा करील?
१९ अशाप्रकारे हा परिश्रमी रुपाचा पवित्र शास्त्र अभ्यास केल्यावर तो किती प्रतिफळ देणारा ठरतो ते पहा. यहोवाच्या मूल्यवान गुणांविषयी तुमचे अंतःकरण केवढे भारावून येईल. तसेच या गुणांचे अवलंबन तुम्ही तुमच्या जीवनात केल्यास तुमचे यहोवाशी असणारे बंध अधिकच दृढ होतील. अशाप्रकारे तुम्ही यहोवाचे समर्पित व बाप्तिस्मा घेतलेले त्याचे सेवक या अर्थी ईश्वरी भक्ती आचरणारे व्हाल.—१ तीमथ्य ६:११.
२० या मोलवान गुणास जोपासण्याचे आणखी एक उदाहरण येशू खिस्ताचे आहे जे आम्हाला साहाय्यक ठरु शकते. तो ईश्वरी भक्तीचे परिपूर्ण उदाहरण होता. मग, येशूच्या उदाहरणाचे अनुकरण केल्यामुळे तुम्हाला ईश्वरी भक्ती आचरण्यात व ती प्रदर्शित करण्यात कशी साहाय्यक ठरु शकेल? पुढचा लेख या व आणखी काही प्रश्नांचे स्पष्टीकरण देईल.
[तळटीपा]
a द न्यू इंटरनॅशनल डिक्शनरी ऑफ न्यू टेस्टमेंट थिऑलॉजी हा संदर्भग्रंथ डाय·ओʹको (“पाठीस लागणे”) या शब्दाविषयी सांगतो की, ग्रीक व लॅटिन ग्रंथकारांच्या मते तो “खरेपणाने पाठीस लागणे, मागोवा घेणे, च्या मागे पळणे असा अर्थ देतो . . . व लाक्षणिकपणे तो आवेशाने पाठीस लागणे, काही मिळवण्याचा प्रयत्न करणे, काही संपादण्याचा यत्न करणे असा अर्थ देतो.”
तुमचा प्रतिसाद काय असेल?
◻ तुमच्या ख्रिस्ती मार्गाक्रमणात बाप्तिस्मा हे शेवटले पाऊल का ठरु शकत नाही?
◻ “ईश्वरी भक्ती”चा अर्थ काय, व याचा पुरावा तुम्हाला कसा देता येईल?
◻ ईश्वरी भक्ती आचरण्यासाठी कसून प्रयत्न करणे का जरुरीचे आहे?
◻ तुम्हाला पूर्ण स्वरुपात ईश्वरी भक्ती कशी आचरता येईल?