वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w93 ९/१ पृ. २६-३१
  • आपल्या धीरात ईश्‍वरी भक्‍तीची भर घाला

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपल्या धीरात ईश्‍वरी भक्‍तीची भर घाला
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ईश्‍वरी भक्‍ती काय आहे
  • ईश्‍वरी भक्‍ती आम्ही कशी प्राप्त करु शकतो?
  • घरात ईश्‍वरी भक्‍ती आचरणात आणणे
  • ईश्‍वरी भक्‍ती आणि सेवा
  • धीरात सुभक्‍तीची भर घाला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • बाप्तिस्मा घेतलेले ख्रिस्ती या नात्याने ईश्‍वरी भक्‍ती आचरा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • ईश्‍वरी भक्‍तीविषयी येशूचे उदाहरण अनुसरा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • ईश्‍वरी भक्‍तीचे पवित्र गूज शिकणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
w93 ९/१ पृ. २६-३१

आपल्या धीरात ईश्‍वरी भक्‍तीची भर घाला

“आपल्या विश्‍वासात . . . धीराची, धीरात सुभक्‍तीची [ईश्‍वरी भक्‍तीची, न्यू.व.] भर घाला.” —२ पेत्र १:५, ६.

१, २. (अ) नाझी नियंत्रणाधीन असलेल्या देशातील यहोवाच्या साक्षीदारांना १९३४ मध्ये काय झाले, आणि का? (ब) अशा निष्ठूर वागणूकीमध्ये यहोवाच्या लोकांचे काय झाले?

तो २०व्या शतकाच्या इतिहासातील काळा (दुःखाचा) काळ होता. त्याची सुरवात १९३४ मध्ये होऊन नाझी नियंत्रणाधीन असलेल्या देशात हजारो यहोवाच्या साक्षीदारांना अन्यायीपणे अटक करुन छळ-छावण्यात डांबण्यात आले. का बरे? कारण त्यांनी तटस्थ राहण्याचे धाडस केले होते व हिटलरला हायल म्हणण्यास नकार दिला होता. त्यांना कशी वागणूक दिली गेली? “इतर कोणत्याही समुहातील कैद्यांना . . . पवित्र शास्त्र विद्यार्थ्याप्रमाणे [यहोवाचे साक्षीदार] एस्‌ एस्‌-सैनिकांच्या क्रूरपणाचा सामना करण्यासाठी नेले जात नव्हते. तो क्रूरपणा न संपणाऱ्‍या शारीरिक आणि मानसिक छळाद्वारे दिसून येत होता, तो अशाप्रकारचा छळ होता ज्याचे वर्णन जगातील कोणतीही भाषा व्यक्‍त करू शकत नव्हती.”—कार्ल विटिग्‌, माजी जर्मन सरकारी अधिकारी.

२ साक्षीदारांचे काय झाले? डॉ. ख्रिश्‍चटीन ई. किंग यांनी त्यांच्या द नाझी स्टेट ॲन्ड द न्यू रिलिजन्स: फाइव्ह केस स्टडीज्‌ इन नॉन-कन्फर्ममिटी यात स्पष्टीकरण केले: “[इतर धार्मिक समुदायाच्या तुलनेत] केवळ यहोवाच्या साक्षीदारांविरुद्ध सरकार अपयशी झाले होते.” होय, शेकडोंसाठी याचा अर्थ मृत्यूपर्यंत धीराने टिकून राहणे असतानाही यहोवाचे साक्षीदार एकंदर समुदाय या नात्याने स्थिर राहिले.

३. खडतर परीक्षांत धीराने टिकून राहण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांना कशाने मदत केली?

३ केवळ नाझी छावण्यात नव्हे तर सर्व जगभर अशा परीक्षांमध्ये धीर धरण्यास यहोवाच्या साक्षीदारांना कशाने मदत मिळाली? त्यांच्या ईश्‍वरी भक्‍तीमुळे त्यांच्या स्वर्गीय पित्याने त्यांना धीराने टिकून राहण्यास मदत केली. प्रेषित पेत्र स्पष्ट करतो की “भक्‍तिमान लोकांस परीक्षेतून कसे सोडवावे . . . हे प्रभूला [यहोवा, न्यू.व.] कळते.” (२ पेत्र २:९) अशाच आधीच्या पत्रात पेत्राने ख्रिश्‍चनांना सल्ला दिला: “आपल्या विश्‍वासात . . . धीराची, धीरात सुभक्‍तीची (ईश्‍वरी भक्‍तीची) भर घाला.” (२ पेत्र १:५, ६) यास्तव, धीराचा ईश्‍वरी भक्‍तीसोबत निकटचा संबंध आहे. खरे पाहता, शेवटपर्यंत धीराने टिकून राहण्यासाठी, आम्ही ‘ईश्‍वरी भक्‍तीच्या पाठीस लागले’ पाहिजे, आणि ती प्रदर्शित केली पाहिजे. (१ तीमथ्य ६:११) परंतु ईश्‍वरी भक्‍ती आहे तरी काय?

ईश्‍वरी भक्‍ती काय आहे

४, ५. ईश्‍वरी भक्‍ती काय आहे?

४ ‘ईश्‍वरी भक्‍ती’ (यु․सेʹबई․या) यासाठी असलेले ग्रीक नामाचे शब्दशः भाषांतर “चांगले, योग्य आदरणीय” असे केले जाऊ शकते.a (२ पेत्र १:६, किंगडम इंटरलिनियर) हे देवासाठी मनःपूर्वक भावनेला सूचित करते. डब्ल्यू. ई. वाईन प्रमाणे यु․से․बिसʹ या विशेषणाचा शब्दशः अर्थ “अति आदरयुक्‍त,” जो “देवाच्या पवित्र भयाने मार्गदर्शित केलेली उर्जा, भक्‍तीच्या कार्यात तो वाक्यप्रयोग दिसतो” त्याला सूचित करते.—२ पेत्र २:९, Int.

५ या कारणामुळे, “ईश्‍वरी भक्‍ती” यहोवा देवाला आदर किंवा भक्‍ती देण्याला सूचित करते व त्याला जे संतोषविते ते करण्यास आम्हाला प्रवृत्त करते. आम्ही देवावर आमच्या हृदयापासून प्रीती करीत असल्यामुळे खडतर परीक्षांना तोंड देते वेळी देखील ते केले जाऊ शकते. ज्या मार्गाने आम्ही आमचे जीवन व्यतीत करतो त्यात यहोवासोबत असलेला आमचा निष्ठावान, व्यक्‍तिगत संबंध प्रदर्शित होतो. खऱ्‍या ख्रिश्‍चनांना प्रार्थना करण्याचे आर्जविले आहे जेणेकडून ते “सुभक्‍तीने (ईश्‍वरी भक्‍ती) . . . आपण शांतीचे आणि स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण कर”तील. (१ तीमथ्य २:१, २) शब्दकोशकार जे. पी. लावो आणि इ. ए. नीडा यांच्या मते “अनेक भाषांमध्ये १ तीमथ्य २:२ मधील [यु․सेʹबई․या] चे भाषांतर ‘देव अपेक्षितो त्याप्रमाणे जगणे’ किंवा ‘देवाने सांगितले आहे त्याप्रमाणेच आम्ही राहिले पाहिजे’ असे उचितपणे करता येऊ शकते.”

६. ईश्‍वरी भक्‍ती आणि धीर यांचा काय संबंध आहे?

६ धीर आणि ईश्‍वरी भक्‍ती मधील संबंध आम्ही आता चांगला समजू शकतो. ईश्‍वरी भक्‍तीसह—आम्ही जगावे असे जे देव अपेक्षितो—त्यामुळे आम्ही जगाच्या द्वेषांना ओढून घेतो, ज्यामुळे विश्‍वासाच्या कायम परीक्षा आणल्या जातात. (२ तीमथ्य ३:१२) आमच्या स्वर्गीय पित्यासोबत आमचा व्यक्‍तिगत संबंध नसेल तर, आम्हाला अशा परीक्षांत धीराने टिकून राहण्यासाठी प्रवृत्त होण्यास कोणताही मार्ग नसेल. शिवाय, यहोवा अशा मनःपूर्वक भक्‍तीला प्रतिसाद देतो. त्यांच्या ईश्‍वरी भक्‍तीमुळे, सर्व प्रकारचा विरोध असतानाही त्याला खुष करण्याचा प्रयत्न करतात अशांना स्वर्गातून पाहताना त्याला कसे वाटत असेल याची जरा कल्पना करा. तो “भक्‍तिमान (ईश्‍वरी भक्‍ती आचारणाऱ्‍या) लोकांस परीक्षेतून सोडवावे” म्हणून तयार आहे यात काही आश्‍चर्य नाही!

७. ईश्‍वरी भक्‍ती का वाढवली पाहिजे?

७ तथापि, आमचा जन्म ईश्‍वरी भक्‍तीसहीत झाला नाही, व ईश्‍वरी पालकांकडूनही ती आपोआप प्राप्त होत नाही. (उत्पत्ती ८:२१) उलटपक्षी, ती आम्ही वाढवली पाहिजे. (१ तीमथ्य ४:७, १०) आमच्या धीरात आणि आमच्या विश्‍वासात आम्ही ईश्‍वरी भक्‍तीची भर घालण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. पेत्र म्हणतो, याकरता “होता होईल तितका प्रयत्न” करणे आवश्‍यक आहे. (२ पेत्र १:५) तर मग आम्ही ईश्‍वरी भक्‍ती कशी प्राप्त करू शकतो?

ईश्‍वरी भक्‍ती आम्ही कशी प्राप्त करु शकतो?

८. प्रेषित पेत्राने म्हटल्याप्रमाणे, ईश्‍वरी भक्‍ती प्राप्त करण्याची गुरूकिल्ली कोणती आहे?

८ प्रेषित पेत्राने ईश्‍वरी भक्‍ती प्राप्त करण्याच्या गुरूकिल्लीची स्पष्टता केली. त्याने म्हटले: “देव व आपला प्रभु येशू ह्‍यांच्या ओळखीने तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळो. ज्याने तुम्हाआम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्त्विकतेसाठी पाचारण केले त्याच्या ओळखीच्याद्वारे, त्याच्या ईश्‍वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्‍तीस (ईश्‍वरी भक्‍ती) आवश्‍यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत.” (२ पेत्र १:२, ३) यास्तव आमच्या विश्‍वासात आणि धीरात ईश्‍वरी भक्‍तीची भर घालण्यासाठी, आम्ही यहोवा देव आणि येशू ख्रिस्ताविषयीच्या अचूक ज्ञानात वाढ केली पाहिजे, व सखोल ज्ञान घेतले पाहिजे.

९. देव आणि ख्रिस्ताविषयी अचूक ज्ञान असणे म्हणजे ते कोण आहेत हे माहीत असण्यापेक्षा त्यात अधिक गोवलेले आहे हे उदाहरणाद्वारे कसे सांगता येईल?

९ देव आणि ख्रिस्ताविषयीचे अचूक ज्ञान असण्याचा अर्थ काय होतो? साहजिकच त्याचा अर्थ केवळ ते कोण आहेत हे जाणण्यापेक्षा अधिक यात समाविष्ट आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला माहीत असेल की तुमचा शेजारी कोण आहे व कदाचित त्याचे नाव घेऊन देखील तुम्ही त्याला नमस्कार करत असाल. परंतु तुम्ही त्याला मोठ्या रक्कमेचे कर्ज देणार का? तो व्यक्‍ती कसा आहे हे चांगले माहीत झाल्याशिवाय तुम्ही ते देणार नाही. (पडताळा नीतीसूत्रे ११:१५.) अशाचप्रकारे, यथार्थपणे किंवा पूर्णपणे यहोवा आणि येशूला ओळखण्याचा अर्थ, ते अस्तित्वात आहेत असा विश्‍वास ठेवणे आणि त्यांची नावे माहीत असणे असा होत नाही. त्यांच्यासाठी मृत्यूपर्यंत धीराने परीक्षा सहन करण्याची तयारी दाखवण्यासाठी, आम्हाला त्यांची खरोखर घनिष्ट ओळख असली पाहिजे. (योहान १७:३) यात काय समाविष्ट आहे?

१०. यहोवा देव आणि येशूविषयी असलेल्या अचूक ज्ञानात कोणत्या दोन गोष्टी समाविष्ट आहेत, आणि का?

१० यहोवा आणि येशूविषयी अचूक किंवा पूर्ण ज्ञान मिळवण्यात दोन गोष्टींचा समावेश होतो: (१) त्यांना व्यक्‍तीप्रमाणे—त्यांचे गुण, भावना आणि मार्गांना ओळखणे—आणि (२) त्यांच्या उदाहरणाचे अनुकरण करणे होय. ईश्‍वरी भक्‍तीत यहोवा सोबत, मनःपूर्वक, व्यक्‍तिगत संबंध समाविष्ट आहे आणि हे आम्ही ज्याप्रकारे आमचे जीवन व्यतीत करतो त्याद्वारे प्रदर्शित केले जाते. यास्तव, ते प्राप्त करण्यासाठी आम्ही वैयक्‍तिकपणे यहोवाला ओळखले पाहिजे आणि मनुष्याच्या शक्यतेप्रमाणे त्याची इच्छा व मार्गांविषयी पूर्णपणे परिचित झाले पाहिजे. खरोखर, यहोवाच्या प्रतिरुपाचे आम्हाला निर्माण केले असल्यामुळे, त्याला ओळखण्यासाठी, आम्ही अशा ज्ञानाचा उपयोग करु व त्याच्यासारखे राहण्याचा प्रयत्न करू. (उत्पत्ती १:२६-२८; कलस्सैकर ३:१०) येशूने जे म्हटले व केले त्यात त्याने पूर्णपणे यहोवाचे अनुकरण केले असल्यामुळे, ईश्‍वरी भक्‍तीत वाढ करण्यासाठी येशूची यथार्थपणे माहिती असणे मूल्यवान मदत आहे.—इब्रीयांस १:३.

११. (अ) देव आणि ख्रिस्ताविषयी अचूक ज्ञान आम्हाला कसे घेता येईल? (ब) आम्ही जे काही वाचन करतो त्यावर मनन करणे का महत्त्वाचे आहे?

११ मग, देव आणि ख्रिस्ताविषयीचे अचूक ज्ञान आम्हाला कसे मिळू शकते? पवित्र शास्त्र आणि पवित्र शास्त्रावर आधारित असलेल्या प्रकाशनांचा परिश्रमपूर्वक अभ्यास करण्याद्वारे.b तथापि, आमच्या व्यक्‍तिगत पवित्र शास्त्राच्या अभ्यासामुळे आमच्या ईश्‍वरी भक्‍तीत वाढ करायची असल्यास, आम्ही ज्याचे वाचन केले आहे त्यावर मनन करणे, ते प्रदर्शित करणे किंवा त्यावर विचार करणे आवश्‍यक आहे. (पडताळा यहोशवा १:८.) असे करणे महत्त्वपूर्ण का आहे? याची आठवण ठेवा की, ईश्‍वरी भक्‍ती ही देवाबद्दल असणारी एक सुखावह व मनापासूनची भावना आहे. शास्त्रवचनात, मनन याचा वारंवार संबंध लाक्षणिक हृदयाशी—आंतरिक व्यक्‍तीसोबत केलेला आहे. (स्तोत्रसंहिता १९:१४; ४९:३; नीतीसूत्रे १५:२८) आम्ही वाचन केलेल्या गोष्टींना उचितपणे प्रदर्शित करु तेव्हा ते आमच्या आतंरिक व्यक्‍तिमत्त्वात उतरते, ज्यामुळे आमच्या भावनांना उद्युक्‍त केले जाते, व आमच्या विचारांवर प्रभाव पाडला जातो. तद्‌नंतरच अभ्यास यहोवासोबत असलेल्या आमच्या व्यक्‍तिगत नातेसंबंधाला बळकट करु शकतो आणि आव्हानात्मक परिस्थितीत किंवा खडतर परीक्षांना तोंड देत असताना देखील देवाला खूष करणाऱ्‍या मार्गानुसार जीवन व्यतीत करण्यास आम्हाला प्रवृत्त करील.

घरात ईश्‍वरी भक्‍ती आचरणात आणणे

१२. (अ) पौलाने सांगितल्याप्रमाणे, एखादा ख्रिस्ती ईश्‍वरी भक्‍ती घरामध्ये कशाप्रकारे दाखवू शकतो? (ब) खरे ख्रिस्ती, वृद्ध पालकांची काळजी का घेतात?

१२ ईश्‍वरी भक्‍ती सर्वप्रथम घरात आचरली पाहिजे. प्रेषित पौल म्हणतो: “कोणा विधवेला मुले किंवा नातवंडे असली तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांबरोबर सुभक्त्यनुसार (ईश्‍वरी भक्‍तीनुसार) वागून आपल्या वडिलधाऱ्‍या माणसांचे उपकार फेडावयास शिकावे, कारण हे देवाच्या दृष्टीने मान्य आहे.” (१ तीमथ्य ५:४) वृद्ध पालकांची काळजी घेण्याविषयी पौलाने उल्लेख केल्याप्रमाणे, ती ईश्‍वरी भक्‍तीची अभिव्यक्‍ती आहे. खरे ख्रिस्ती त्यांची काळजी, केवळ कर्तव्य आहे असे समजून घेत नाहीत तर ते त्यांच्या पालकांवर प्रीती करतात म्हणून त्यांची काळजी घेत असतात. याही पेक्षा अधिक म्हणजे, यहोवा कुटुंबाची काळजी घेण्याला किती महत्त्व देतो हे ते ओळखतात. त्यांच्या पालकांना मदतीची गरज असताना त्यांच्याकडे पाठ फिरवणे म्हणजे ‘ख्रिस्ती विश्‍वास नाकारण्यासारखेच’ आहे याची त्यांना पूर्ण समज आहे.—१ तीमथ्य ५:८.

१३. ईश्‍वरी भक्‍तीचे आचरण घरामध्ये करण्यात एक खरे आव्हान का आहे, परंतु एखाद्याच्या पालकांची काळजी घेतल्यामुळे कोणते समाधान मिळू शकते?

१३ हे मान्य आहे की, घरात सर्वदा ईश्‍वरी भक्‍ती आचरणे इतके सोपे नाही. कुटुंबातील सदस्य एकदुसऱ्‍यांपासून बरेच दूर राहत असतील. मोठी मुले त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेत असतील व कदाचित त्यांना आर्थिक दृष्ट्या खूप झगडावे लागत असेल. पालकांची काळजी घेण्याची जी परिस्थिती किंवा प्रमाण असेल त्यामुळे काळजी घेणाऱ्‍याच्या शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक आरोग्यावर ताण पडू शकतो. तरीसुद्धा, पालकांची काळजी घेतल्यामुळे केवळ त्यांचे ‘उपकार फेडतो’ असे नाही तर “स्वर्गातील आणि पृथ्वीवरील प्रत्येक वंशास . . . नाव देण्यात येते” त्या [यहोवाला] यामुळे आनंदित केले जाते हे जाणण्यामुळे आम्हाला खरे समाधान मिळते.—इफिसकर ३:१४, १५.

१४, १५. मुलांनी पालकांसाठी ईश्‍वरी काळजी घेतल्याचे एखादे उदाहरण सांगा.

१४ एका हृदयद्रावक उदाहरणाचा विचार करा. एलिस आणि त्याचे पाच भाऊ व बहिणींना घरात त्यांच्या पित्याची काळजी घेताना मोठ्या आव्हानाला तोंड द्यावे लागले. एलिस सांगतो की, “१९८६ मध्ये माझ्या वडिलाला झटका आला, त्यामुळे त्यांना पक्षाघात झाला.” त्यांच्या पालकाच्या गरजा पुरवण्यासाठी सहा मुलांनी मदत केली, त्यांना रोज अंघोळ घालणे व सारखे एकाच अंगावर झोपल्यामुळे येणारे फोड व त्यामुळे होणाऱ्‍या जखमा टाळण्यासाठी नियमितपणे ते बिछान्यावर त्यांची स्थिती बदली करीत. “आम्ही त्यांच्यासाठी वाचन करतो, त्यांच्यासोबत बोलतो, व त्यांच्यासाठी संगीत देखील वाजवतो. त्यांच्याभोवती काय चालले आहे हे त्यांना माहीत आहे की नाही याची आम्हाला खात्री नाही, तरीदेखील त्यांना सर्वकाही माहीत आहे असे आम्ही समजतो.”

१५ मुलांनी स्वतःप्रमाणेच त्यांच्या वडिलांची काळजी का घेतली बरे? एलिस पुढे सांगतो: “१९६४ मध्ये आमची आई वारल्यावर, पप्पानी स्वतः आम्हाला वाढविले. त्यावेळी आमचे वय ५ ते १४ वर्षे वयाच्या आत होते. तेव्हा आमची मदत करायला ते नेहमी तयार असायचे; व आता त्यांची मदत करायला आम्ही आहोत.” नक्कीच, अशी काळजी घेणे सोपे नाही, आणि मुले काहीवेळा नाराज देखील होतात. एलिस म्हणतो, “परंतु आम्हाला माहीत आहे की आमच्या वडिलांची समस्या तात्पुरती आहे.” “आम्ही अशा वेळेकडे पाहतो की जेव्हा आमच्या वडिलांचे आरोग्य पुनः चांगले होईल व आम्ही आमच्या आईबरोबर पुनः एकत्र येऊ.” (यशया ३३:२४; योहान ५:२८, २९) पालकासाठी अशा प्रकारची एकनिष्ठ काळजी घेतल्यामुळे ज्याने पालकांचा आदर करण्याची आज्ञा मुलांना दिली आहे त्याला किती बरे वाटू शकते!c—इफिसकर ६:१, २.

ईश्‍वरी भक्‍ती आणि सेवा

१६. सेवेत आम्ही जे काही करीत असतो त्याचे प्रमुख कारण कोणते असले पाहिजे?

१६ आम्ही, “त्याला सतत अनुसरावे” या येशूच्या निमंत्रणाचा स्वीकार केल्यावर राज्याची सुवार्ता घोषित करण्याची व शिष्य बनविण्याची ईश्‍वरी आज्ञा आम्हाला लागू होते. (मत्तय १६:२४; २४:१४; २८:१९, २०) या “शेवटल्या काळात,” सेवेत आमचा भाग असणे ही आमची ख्रिस्ती जबाबदारी आहे. (२ तीमथ्य ३:१) तथापि, प्रचार करण्याच्या आणि शिकवण्याच्या आमच्या मनोवृत्तीला केवळ नित्याचे काम किंवा जबाबदारी पेक्षा अधिक असे आम्ही समजले पाहिजे. आमच्या सेवेत आम्ही जे काही करतो किंवा किती प्रमाणात ती करतो त्याचे मुख्य कारण यहोवावर आमची मनापासून प्रीती आहे हे असले पाहिजे. येशूने म्हटले की “अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार.” (मत्तय १२:३४) होय, आमचे हृदय यहोवासाठी असलेल्या प्रीतीने भरून गेल्यास त्याच्याविषयी इतरांना साक्ष देण्यास आम्हाला ते भाग पाडील. देवावरील प्रीती ही आमची मनोवृत्ती असल्यास, आमची सेवा, आमच्या ईश्‍वरी भक्‍तीचे एक अर्थपूर्ण वक्‍तव्य असेल.

१७. आम्ही, सेवेसाठी योग्य मनोवृत्ती कशी वाढवू शकतो?

१७ सेवेसाठी आम्ही योग्य मनोवृत्ती कशी वाढवू शकतो? यहोवाने आम्हाला त्याच्यावर प्रीती करण्यासाठी दिलेल्या तीन कारणांवर गुणग्राहकतेने विचार करा. (१) यहोवाने आधीच आमच्यासाठी जे केले आहे त्यामुळे आम्ही त्याच्यावर प्रीती करतो. त्याने आमच्यासाठी पुरवलेली खंडणी यापेक्षा कोणतीही प्रीती मोठी नव्हती. (मत्तय २०:२८; योहान १५:१३) (२) यहोवा आमच्यासाठी आता जे करत आहे त्यामुळे आम्ही त्यावर प्रीती करतो. यहोवासोबत बोलण्यातला प्रशस्तपणा आम्हाला आहे, तो आमच्या प्रार्थनांना उत्तरे देतो. (स्तोत्रसंहिता ६५:२; इब्रीयांस ४:१४-१६) आम्ही राज्य आस्थेला प्राधान्य देत असल्यामुळे जीवनाच्या आवश्‍यक गरजांचा आनंद घेतो. (मत्तय ६:२५-३३) ज्या समस्यांचा आम्ही सामना करीत आहोत त्यांना तोंड देण्यासाठी निरंतर आम्हाला आध्यात्मिक अन्‍नाचा साठा मिळत आहे. (मत्तय २४:४५) आणि जगापासून खरेपणाने आम्हाला वेगळे करणाऱ्‍या जगभरातील ख्रिस्ती बंधूत्त्वाचा भाग असणे हा आमच्यासाठी एक आशीर्वादच आहे. (१ पेत्र २:१७) (३) यहोवा आमच्यासाठी आणखी काय करणार आहे यासाठी आम्ही त्याच्यावर प्रीती करतो. त्याच्या प्रीतीमुळे, खरे जीवन—भवितव्यातील सार्वकालिक जीवनावर आमचा चांगला आधार आहे. (१ तीमथ्य ६:१२, १९) आमच्यासाठी असलेल्या यहोवाच्या प्रीतीचा आम्ही विचार केल्यास, नक्‍तीच मग त्याच्याविषयी व त्याच्या उद्देशाविषयी इतरांना सांगण्यासाठी पूर्ण भाग घेण्यास आमची हृदये आम्हाला प्रवृत्त करतील! सेवेमध्ये आम्ही काय केले पाहिजे आणि ती किती केली पाहिजे याविषयी इतरांनी आम्हाला सांगण्याची गरज लागणार नाही. आम्हाला जे शक्य आहे ते करण्यास आमची हृदये आम्हाला प्रवृत्त करतील.

१८, १९. सेवेत भाग घेण्यासाठी एका बहिणीने कोणत्या अडखळणावर मात केली?

१८ आव्हानात्मक परिस्थितीत असतानाही, ईश्‍वरी भक्‍तीने चेतना मिळालेले हृदय आम्हाला बोलण्यास भाग पाडील. (पडताळा यिर्मया २०:९.) अतिशय लाजाळू असलेल्या स्टेल्ला नावाच्या एका ख्रिस्ती स्त्रीच्या उदाहरणावरून हे दाखविले आहे. जेव्हा पवित्र शास्त्राचा अभ्यास प्रथम तिने सुरू केला, तेव्हा तिला वाटले, ‘मी घरोघर कधीही जाऊ शकणार नाही’! ती स्पष्टता देते: “मी नेहमी फारच शांत होते. संभाषण सुरू करण्यासाठी मी स्वतः होऊन इतरांकडे जात नव्हते.” नियमित अभ्यास करीत असताना, यहोवासाठी तिची प्रीती वाढत गेली, व त्याच्याविषयी इतरांना बोलण्याची ज्वलंत इच्छा तिने वाढविली. “मला आठवते की मी माझ्या पवित्र शास्त्र शिक्षकाला म्हटले होते, ‘मला बरेच बोलावेसे वाटते परंतु मला जमत नाही, व ते मला त्रास देत होते.’ तिने मला जे म्हटले ते मी कधीही विसरणार नाही: ‘स्टेल्ला तुला बोलावेसे वाटते त्याबद्दल तू उपकार मान.’”

१९ लवकरच स्टेल्लाने शेजाऱ्‍यांना साक्ष देणे सुरू केले. नंतर तिने तिच्या आठवणीत राहील असे पाऊल उचलले-—पहिल्यांदाच तिने घरो-घरच्या सेवेत भाग घेतला. (प्रे. कृत्ये २०:२०, २१) तिला आठवते: “सादरता माझ्याकडे लिहिलेली होती. परंतु मी इतकी घाबरले होते की ती माझ्या समोर असताना देखील मला त्याकडे पाहायला भय वाटत होते!” आता ३५ वर्षांनंतर, स्टेल्लाचा अजूनही लाजाळू स्वभाव आहे. तथापि, तिला क्षेत्रसेवा आवडते आणि त्यात नियमितपणे तिचा चांगला सहभाग असतो.

२०. छळ किंवा तुरुंगवास देखील यहोवाच्या समर्पित साक्षीदारांची तोंडे बंद करु शकत नाही हे कोणत्या उदाहरणाद्वारे दिसते?

२० छळ आणि तुरुंगवास देखील यहोवाच्या समर्पित साक्षीदारांची तोंडे बंद करु शकत नाही. जर्मनीतील अर्नस्ट आणि हिल्डगर्ट सेलिगर यांच्या उदाहरणांचा विचार करा. त्यांच्या ख्रिस्ती विश्‍वासामुळे नाझी छळ छावण्यात तसेच कम्युनिस्ट तुरुंगात त्या दोघांनी मिळून ४० पेक्षा अधिक वर्षे घालविली. तुरुंगात देखील इतर कैद्यांना साक्ष देण्याचे त्यांनी चालू ठेवले. हिल्डगर्ट आठवतात: “तुरुंगाच्या अधिकाऱ्‍यांनी खासपणे माझे वर्गीकरण धोकेदायक असल्याप्रमाणे केले, कारण पहारा करणाऱ्‍या एका स्त्रीने म्हटले, मी सर्व दिवस पवित्र शास्त्राविषयी बोलले. यामुळे मला तळघरातील लहान खोलीत टाकले.” शेवटी त्यांना स्वातंत्र्य दिले गेले, बंधू व बहिण सेलिगर यांनी स्वतःला ख्रिस्ती सेवेत पूर्णवेळ समर्पित केले. बंधू सेलिगर यांचा १९८५ तर त्यांच्या पत्नीचा १९९२ मध्ये झालेल्या मृत्यूपर्यंत दोघानींही विश्‍वासूपणे सेवा केली.

२१. आमच्या धीरात ईश्‍वरी भक्‍तीची भर घालण्यासाठी आम्ही काय केले पाहिजे?

२१ देवाच्या वचनाचा परिश्रमपूर्वक अभ्यास करण्याद्वारे व मनन करण्यासाठी वेळ काढण्याद्वारे, आम्ही यहोवा देव आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्ताविषयीच्या अचूक ज्ञानात वाढ करु शकू. याच्या परिणामस्वरुपात आम्ही पूर्णपणे तो मूल्यवान गुण—ईश्‍वरी भक्‍ती संपादन करु. आमच्यावर ख्रिस्ती या नात्याने ज्या विविध परीक्षा येतात त्यात धीराने टिकण्यासाठी ईश्‍वरी भक्‍तीविना दुसरा पर्याय नाही. यास्तव, ‘आपल्या विश्‍वासात धीराचे, धीरात ईश्‍वरी भक्‍तीची भर घालण्यासाठी’ पेत्राने दिलेल्या सल्ल्याचे आपण सतत अनुकरण करू या.—२ पेत्र १:५, ६.

[तळटीपा]

a यु․सेʹबई․या विषयी विल्यम बार्कले यांनी निरीक्षले की: “हे, सेब या शब्दाचा [मूळ] भाग आहे, ज्याचा अर्थ आदर किंवा भक्‍ती असा होतो. यथायोग्य यासाठी यु हा ग्रीक शब्द आहे; यास्तव, यु․सेʹबई․या म्हणजे भक्‍ती, यथायोग्य आणि उचितपणे दिलेला आदर होय.”—न्यु टेस्टमेंट वर्डस.

b आमच्या ज्ञानात वाढ करण्यासाठी देवाच्या वचनाचा कसा अभ्यास करावा याच्या चर्चेसाठी ऑगस्ट १, १९९३ च्या टेहळणी बुरूज मधील पृष्ठे २० ते २५ पाहा.

c वयस्कर पालकांच्या बाबतीत ईश्‍वरी भक्‍ती कशी आचरली पाहिजे याच्या सविस्तर चर्चेसाठी डिसेंबर १, १९८७ चे टेहळणी बुरुज पहा.

तुमचे उत्तर काय आहे?

▫ ईश्‍वरी भक्‍ती काय आहे?

▫ धीर आणि ईश्‍वरी भक्‍ती यामध्ये काय संबंध आहे?

▫ ईश्‍वरी भक्‍ती प्राप्त करण्यासाठी कोणती गुरुकिल्ली आहे?

▫ एखादा ख्रिस्ती घरामध्ये ईश्‍वरी भक्‍ती कशी आचरू शकतो?

▫ सेवेत आम्ही जे काही करीत असतो त्याचे प्रमुख कारण कोणते असावयास हवे?

[३० पानांवरील चित्रं]

रॅव्हनस्ब्रुक येथील नाझी छळ-छावण्यात असताना यहोवाच्या साक्षीदारांनी धीर आणि ईश्‍वरी भक्‍ती दाखविली होती

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा