वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 २/१ पृ. २०-२५
  • सीडर सोहळ्यापासून ते तारणापर्यंत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सीडर सोहळ्यापासून ते तारणापर्यंत
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • वल्हांडण—तारणाचा सण
  • वल्हांडणाच्या यज्ञपशूपेक्षा अधिक
  • जीवन वाचविणारे रक्‍त
  • कोणते तारण व कोठे?
  • “नियुक्‍त वेळी”
  • “हा दिवस तुम्हाला स्मारकादाखल” असावा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • वल्हांडण सण आणि स्मारकविधी यांतल्या समानता व भिन्‍नता
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • प्रभूचे सांज भोजन—देवाचा आदर करणारा सण
    बायबल नेमके काय शिकवते?
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 २/१ पृ. २०-२५

सीडर सोहळ्यापासून ते तारणापर्यंत

“मी तारणाचा प्याला हाती घेऊन यहोवाच्या नावाचा धावा करीन.”—स्तोत्रसंहिता ११६:१३.

१. सर्वकाळ आवडीचे वाटणारे असे कोणते गाणे तुमच्या भवितव्यावर परिणाम करू शकते?

एका प्रदीर्घ, आनंदी भवितव्याबद्दल तुम्हाला वाटणाऱ्‍या आशेविषयीचे गीत गाताना तुम्हाला कसे वाटेल? असे हे गीत गायला केव्हाही आवडीचेच वाटणार. तरीपण आता तुम्ही, या गाण्याचा स्वर आनंदाने म्हणण्यात व त्याच्या अर्थाची समज समजून घेण्यात इतरांपेक्षा अधिक चांगल्या भूमिकेत आला आहात. यहुदी या गाण्याला हालेल (स्तुती) असे म्हणतात. स्तोत्रसंहिता ११३ ते ११८ पर्यंत रचण्यात आलेल्या या गायनात आम्हाला “हालेलूया” किंवा “याहची स्तुती करा” असे आर्जविण्यात आले आहे.

२. हे गाणे कोठे गायिले जाते व याचा सीडर सोहळ्याशी काय संबंध आहे?

२ यहुदी लोक हे हालेल गाणे त्यांच्या वल्हांडण सणामध्ये करतात. या गाण्याचा मूळारंभ, यज्ञार्पणासाठी देवाने जे मंदिर बांधायला सांगितले होते तेव्हापासून दिसतो. आज हेच गाणे यहुद्यांच्या घराघरातून वल्हांडण सणात व सीडर या भोजनप्रसंगी गायिले जाते. पण जे सीडर सोहळ्यात हे गाणे म्हणतात त्यापैकी बऱ्‍याच कमी लोकांना स्तोत्रसंहिता ११६:१३ मध्ये लिखित असणाऱ्‍या शब्दांचा खरा अर्थ माहीत आहे. तेथे म्हटले आहेः “मी तारणाचा प्याला हाती घेऊन यहोवाच्या नावाचा धावा करीन.” आता प्रश्‍न असा की, तारणाचा वल्हांणासोबत संबंध तो काय व तुमचे देखील तारण यात गोवलेले आहे का?

वल्हांडण—तारणाचा सण

३. सीडर सोहळ्याची पार्श्‍वभूमी कशी आहे?

३ मिसरामध्ये फारोच्या जाचाखाली इस्राएली लोक गुलाम होते हे आठवा. सरतेशेवटी, यहोवाने आपल्या लोकांची मुक्‍तता करण्यासाठी मोशेला सामोरे आणले. देवाने मिसरावर नऊ पीडा गुदरविल्यावर मोशेने दहाव्या पीडेची घोषणा केली. यहोवा प्रत्येक मिसरी घरातील ज्येष्ठपुत्राची हत्या करणार होता. (निर्गम ११:१-१०) पण इस्राएली वाचू शकणार होते. पण कसे? त्यांनी एक कोकरू वधून त्याचे रक्‍त दाराच्या बाह्‍या व कपाळपट्टीवर लावायचे होते, आत घरात कोकऱ्‍याचे मांस, बेखमीर भाकरी व कडू शाकभाजी यांचे भोजन करायचे होते. या सीडर सोहळ्यात देव त्यांच्या घरावरून “ओलांडून” जाणार होता; तो त्या घरातील ज्येष्ठपुत्रांना मारणार नव्हता.—निर्गम १२:१-१३.

४, ५. वल्हांडणाने पुष्कळांना कसे तारणाप्रत निरविले? (स्तोत्रसंहिता १०६:७-१०)

४ दहावी पीडा आरंभिली गेली तेव्हा फारोने मोशेला बोलावून म्हटलेः “तुम्ही व सगळे इस्राएल लोक माझ्या लोकातून निघून जा; . . . जाऊन यहोवाची सेवा करा.” (निर्गम १२:२९-३२) सर्व इब्री तसेच त्यांच्याविषयी जिव्हाळा राखणारा “मिश्र समुदाय” बाहेर पडल्यावर फारोने आपले मन बदलले व त्यांचा पिच्छा केला. तेव्हा देवाने आपल्या लोकांचा तांबड्या समुद्रातून अद्‌भुतरित्या बचाव केला, पण येथे फारो व त्याचे पिच्छा करीत असलेले सैन्य बुडून मेले.—निर्गम १२:३८; १४:५-२८; स्तोत्रसंहिता ७८:५१-५३; १३६:१३-१५.

५ तांबड्या समुद्रापाशी मोशाने इस्राएलांना म्हटलेः “भिऊ नका; स्थिर उभे राहा आणि यहोवा आज तुमचे जे तारण करील ते पाहा.” नंतर त्यांनी हे गीत गायिलेः “याह माझे बल, माझा स्तोत्रविषय झाला आहे, तो माझा उद्धारक झाला आहे. हाच माझा देव, स्तवनाने मी ह्‍याला सुशोभित करीन.” (निर्गम १४:१३; १५:२) होय, इस्राएलांची दहा पीडा तसेच तांबड्या समुद्रापाशी घडलेली मुक्‍तता ही तारण होती. या कारणास्तव, स्तोत्रकर्त्याने अगदी उचितपणे यहोवाला “पृथ्वीवर उद्धार करणारा” देव असे संबोधिले.—स्तोत्रसंहिता ६८:६, २०; ७४:१२-१४; ७८:१२, १३, २२.

६, ७. वल्हांडणाची प्रस्थापना का झाली, पण आज त्याचे पालन पहिल्या वल्हांडणापेक्षा वेगळ्या रितीने का होत आहे?

६ या तारणाचे स्मरण या अर्थी यहुद्यांनी वल्हांडण सण पाळायचा होता. देवाने म्हटलेः “हा दिवस तुम्हाला स्मारकादाखल होईल, ह्‍या दिवशी तुम्ही यहोवासाठी मेळा भरवून सण पाळावा; पिढ्यान्‌पिढ्या . . . पाळावा.” (निर्गम १२:१४) दर वल्हांडणाच्या भोजनप्रसंगी किंवा सीडर सोहळ्यात, बापाने आपल्या कुटुंबाला या तारणाविषयीचे स्मरण द्यायचे होते. यहोवाने म्हटलेः “तुमची मुलेबाळे तुम्हाला विचारतील की, ‘ह्‍या सेवेचा अर्थ काय?’ तेव्हा तुम्ही सांगा की, ‘हा यहोवाच्या वल्हांडणाचा यज्ञ आहे. त्याने मिसरी लोकांना मारिले व आमच्या घरांचा बचाव केला त्यासमयी तो मिसरातील इस्राएलांची घरे ओलांडून गेला.”—निर्गम १२:२५-२७.

७ यहुदी आजतागायत हा वल्हांडणाचा सीडर सोहळा पाळीत आहेत हे त्या अहवालाच्या ऐतिहासिकतेची व खरेपणाची पुष्टी देते. तथापि, यांच्या काही प्रथा आज, देवाने आधी जे मार्गदर्शित केले होते त्यापेक्षा भिन्‍न आहेत. द ओरिजिन ऑफ सीडर हे प्रकाशन म्हणतेः “वल्हांडण तसेच बेखमीर भाकरीचा सण याविषयी पवित्र शास्त्रात विस्तारीत चर्चा आहे. तथापि, नंतरच्या या मेळाव्याच्या आचरणात तशा विधींचे आचरण दिसत नाही. खासपणे पवित्र शास्त्रातील विधि वल्हांडणाच्या यज्ञार्पणावर केंद्रीभूत होता तर पवित्र शास्त्रानंतरच्या साहित्यात त्याला केंद्रभाग या अर्थाने दाखविले गेले नाही.” याचे प्रमुख कारण म्हणजे प्राण्यांच्या यज्ञार्पणासाठी यहुद्यांना मंदिर राहिले नव्हते.

८. आम्ही वल्हांडणाचा कोणत्या खास कारणास्तव विचार केला पाहिजे?

८ देवाने प्राचीन इस्राएलांना जे सण लावून दिले होते त्याचा ख्रिस्ती लोक लाभदायक रितीने अभ्यास करू शकतात.a पण आता वल्हांडणाच्या एका विशिष्ट भागाकडे आमचे खास लक्ष देण्याची गरज आहे. येशू यहुदी होता म्हणून त्याने वल्हांडणाचे आचरण केले. त्याने शेवटचा जो विधि आचरला त्यामध्ये ख्रिश्‍चनांसाठी ईश्‍वरी समारंभाचा एकमेव असा विधि लावून दिला, जो आहे, प्रभूचे सांजभोजन, म्हणजे येशूच्या मृत्युचा स्मारकविधी. हा ख्रिस्ती सोहळा वल्हांडणाशी संबंधित आहे.

वल्हांडणाच्या यज्ञपशूपेक्षा अधिक

९, १०. वल्हांडणाचा कोकरा हा कोणत्या अर्थी खास किंवा अप्रतिम अर्पण असा होता?

९ इब्रीयांस पत्र १०:१ आम्हास सांगते की, ‘नियमशास्त्र हे, ज्या चांगल्या गोष्टी पुढे होणाऱ्‍या आहेत, त्यांची छाया आहे.’ मॅक्लीनटॉक व स्ट्राँग यांचे एन्सायक्लोपिडिआ ऑफ बिब्लिकल, थिऑलॉजिकल, ॲण्ड एक्लेसियास्टिकल लिटरेचर हे प्रकाशन म्हणतेः “येणाऱ्‍या भावी गोष्टीविषयीची जी पडछाया नियमशास्त्रात आहे त्यामध्ये वल्हांणाच्या सणाची सर कशालाही येऊ शकणार नाही.” वल्हांडणाच्या कोकऱ्‍याचा अर्थ हा देवाने मिसरातून प्रथम ज्येष्ठपुत्रांची व नंतर सर्व इब्री लोकांची जी सुटका केली त्या संस्मरणापेक्षाही पुढे जातो.

१० हा कोकरा कित्येक बाबतीत अप्रतिम होता. उदाहरणार्थ, मोशेच्या नियमशास्त्राखाली पुष्कळशी अर्पणे व्यक्‍तीगतरित्या पापासाठी किंवा दोषासाठी वाहिली जात, व यात जनावराचे भाग वेदीवर होम करीत. (लेवीय ४:२२-३५) शांत्यर्पणातील काही मांस विधि करणाऱ्‍या याजकाला किंवा इतर याजकांना दिले जाई. (लेवीय ७:११-३८) तथापि, वल्हांडणात कोकरा वेदीवर वाहत नसे, ते लोकांचा समुदाय मिळून, जसे की एक कुटुंब अर्पण करीत व तेच त्याचे भक्षण करीत.—निर्गम १२:४, ८-११.

११. यहोवाने वल्हांडणाच्या कोकऱ्‍याविषयी कोणता दृष्टीकोण धरला होता, व तो कशास दर्शवीत होता? (गणना ९:१३)

११ यहोवाने वल्हांडणाच्या कोकऱ्‍याला इतके महत्त्व दिले होते की, त्याने त्याला ‘माझा यज्ञपशू’ असे संबोधिले. (निर्गम २३:१८; ३४:२५) प्रामाण्यांनी हे म्हटले की, “वल्हांडणाचे यज्ञार्पण यहोवाला सर्वोत्कृष्ट वाटणारे अर्पण होते.” हा कोकरा निःसशये येशूच्या यज्ञार्पणाकडे अंगूली दर्शवीत होता किंवा त्याला सूचित करीत होता. आम्ही हे सांगू शकतो कारण की, प्रेषित पौलाने येशूला “आपल्या वल्हांडणाचा यज्ञपशु” असे म्हटले आहे. (१ करिंथकर ५:७) येशूची “देवाचा कोकरा,” तसेच “वधिलेला कोकरा” अशी ओळख देण्यात आली होती.—योहान १:२९; प्रकटीकरण ५:१२; प्रे. कृत्ये ८:३२.

जीवन वाचविणारे रक्‍त

१२. पहिल्या वल्हांडण सणाच्या समयी कोकऱ्‍याच्या रक्‍ताने कोणती भूमिका पूर्ण केली?

१२ मागे, मिसरात कोकऱ्‍याचे रक्‍त तारणासाठी उपयुक्‍त ठरले. यहोवाने प्रथम जन्मलेल्यांना वधिले तेव्हा ज्या दाराच्या कपाळपट्टीवर रक्‍त होते ती घरे तो ओलांडून गेला. शिवाय, इब्री लोकांना आपल्या प्रथम जन्मलेल्यांच्या बाबतीत शोक करण्याची पाळी आली नव्हती, त्यामुळे ते तांबड्या समुद्रातून मुक्‍ततेप्रत वाटचाल करण्याच्या चांगल्या स्थितीत होते.

१३, १४. येशूचे रक्‍त कसे जीवन वाचविणारे व तारणासाठी जरुरीचे आहे? (इफिसकर १:१३)

१३ आजसुद्धा तारणाच्या बाबतीत रक्‍त समाविष्ट आहे व ते येशूचे ओतलेले रक्‍त आहे. “यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता,” तेव्हा येशूने मोठ्या लोकसमुदायाला म्हटलेः “जो माझा देह खातो व माझे रक्‍त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. कारण माझा देह खरे खाद्य व माझे रक्‍त खरे पेय आहे.” (योहान ६:४, ५४, ५५) यावेळी, सर्व यहुदी श्रोत्यांच्या लक्षामध्ये, येणारा वल्हांडण सण व मिसरात वापरण्यात आलेले रक्‍त यांचा विचार आला असावा.

१४ येशू यावेळी प्रभुच्या सांज भोजनामध्ये वापरल्या जाणाऱ्‍या बोधचिन्हांची चर्चा करीत नव्हता. ख्रिश्‍चनांसाठी हा नवा समारंभ या प्रसंगाच्या एक वर्षाने स्थापण्यात आला. त्यामुळे इ. स. ३२ मध्ये ज्या शिष्यांनी येशूचे ते बोलणे ऐकले होते त्यांना त्यावेळी याविषयी काहीच माहीत नव्हते. तथापि, तेव्हा येशू हे दाखवीत होता की, सार्वकालिक तारणप्राप्तीसाठी त्याचे रक्‍त जरुरीचे होते. पौलाने स्पष्टता केलीः “त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे . . . त्याच्या रक्‍ताच्या द्वारे खंडणी भरुन मिळविलेली मुक्‍ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे.” (इफिसकर १:७) येशूच्या रक्‍ताच्या आधारावर मिळालेली क्षमाच आम्हाला सार्वकालिक जीवन देऊ शकते.

कोणते तारण व कोठे?

१५. मिसरातील इब्री लोकांसाठी कोणते तारण व हक्क शक्य होते, पण कोणते नव्हते? (१ करिंथकर १०:१-५)

१५ प्राचीन मिसरात केवळ मर्यादित स्वरुपाचे तारण समाविष्ट होते. ज्यांनी मिसर सोडले त्यापैकी कोणालाही निर्गमनानंतर चिरकाल जीवनाची हमी देण्यात आली नाही. हे खरे की, देवाने लेव्यांची राष्ट्रासाठी याजक या अर्थी व यहुदाच्या वंशातील काहींची ऐहिक राजे म्हणून नेमणूक केली, पण हे सर्व मर्त्य होते. (प्रे. कृत्ये २:२९; इब्रीयांस ७:११, २३, २७) जो “मिश्र समुदाय” मिसरातून निघाला होता त्यालाही हे हक्क नव्हते, त्याला इब्री लोकांसोबत मिळून वचनयुक्‍त देशापर्यंत जाण्याची व देवाची भक्‍ती करीत साधारण रुपाचे जीवन जगण्याची आशा होती. तथापि, यहोवाच्या ख्रिस्ती-युगाआधीच्या सेवकांना ही आशा राखण्यासाठी आधार होता की, जेथे मानवजातीने राहावे असा देवाचा हेतू आहे त्या या पृथ्वीवर अविनाशी जीवन जगण्याचा आनंद कधी ना कधी त्यांना उपभोगता येईल. हे येशूने योहान ६:५४ मध्ये जे अभिवचन दिले आहे त्याच्या सहमतात असेल.

१६. कोणत्या प्रकारची तारणप्राप्ती लाभावी यासाठी देवाच्या प्राचीन सेवकांनी आशा धरली?

१६ देवाने आपल्या प्राचीन सेवकांपैकीच्या काहींना, पृथ्वीची निर्मिती वसाहतीसाठी करण्यात आली असून तिजमध्ये धार्मिक सदासर्वदा वास करतील हे प्रेरित लिखाण करण्यासाठी वापरले. (स्तोत्रसंहिता ३७:९-११; नीतीसूत्रे २:२१, २२; यशया ४५:१८) पण जर, खरे उपासक वारले तर त्यांना हे तारण कसे लाभणार? यांना देवाकरवी परत जीवन लाभून ते पृथ्वीवर परत येण्याद्वारे. याचे उदाहरण पाहता, ईयोबाने ही आशा व्यक्‍त केली की, त्याची आठवण ठेवली जाईल व त्याला परत जीवनासाठी बोलावले जाईल. (ईयोब १४:१३-१५; दानीएल १२:१३) अशाप्रकारे तारणाचा एक पैलू हा की, पृथ्वीवर सार्वकालिक जीवन मिळविणे.—मत्तय ११:११.

१७. इतर काहीजण कोणत्या प्रकारातील तारण मिळवतील असे पवित्र शास्त्र दाखविते?

१७ याचप्रमाणे स्वर्गातील जीवनासाठी देखील तारणप्राप्ती होणार असल्याचे पवित्र शास्त्र सांगते. येथेच येशू ख्रिस्त आपल्या पुनरुत्थानानंतर परतला. “तो . . . देवाच्या उजवीकडे आहे आणि त्याच्या स्वाधीन देवदूत, अधिकारी, व सत्ताधीश हे ठेवले आहेत.” (१ पेत्र ३:१८, २२; इफिसकर १:२०-२२; इब्रीयांस ९:२४) पण स्वर्गात घेतला जाणारा मानव येशू हा एकटाच नाही. देवाने हे उद्देशिले आहे की, तो पृथ्वीवरून अगदी थोडक्यांनाच घेणार. येशूने आपल्या प्रेषितांना म्हटले होतेः “माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, . . . मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो. आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन; ह्‍यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे.”—योहान १४:२, ३.

१८. स्वर्गीय जीवनासाठी तारणप्राप्ती होते यावर लक्ष देण्याजोगी कोणती कारणे आहेत?

१८ येशूसोबत स्वर्गात प्राप्त होणाऱ्‍या जीवनाचे तारण हे पहिल्या वल्हांडण प्रसंगी जे मर्यादित रुपाचे तारण साध्य झाले त्यापेक्षा अधिक भव्य स्वरुपाचे आहे. (२ तीमथ्य २:१०) कायदेशीर अशा शेवटल्या सीडर सोहळ्याच्या वेळी किंवा वल्हांडण सणामध्ये येशूने आपल्या अनुयायांसाठी एका नव्या समारंभाची प्रस्थापना करून दिली, जेथे स्वर्गीय जीवनप्राप्तीच्या तारणासाठी लक्ष केंद्रित करण्यात आले. त्याने प्रेषितांना म्हटलेः “माझ्या स्मरणार्थ हे करा.” (लूक २२:१९) हा समारंभ ख्रिश्‍चनांनी कसा साजरा करावा हे पाहण्याआधी आपण तो केव्हा करावा याचा प्रथम विचारविनिमय करू या.

“नियुक्‍त वेळी”

१९. वल्हांडण सण व प्रभुचे सांज भोजन यांची सांगड घालणे तर्कशुद्ध का आहे?

१९ येशूने म्हटले होतेः “मी दुःख भोगण्यापूर्वी हे वल्हांडणाचे भोजन तुम्हाबरोबर करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती.” (लूक २२:१५) त्याने यानंतर प्रभुच्या सांजभोजनाची प्रस्थापना केली, आणि याचेच पालन त्याच्या अनुयायांनी त्याच्या मृत्युचे स्मरण या अर्थी करायचे होते. (लूक २२:१९, २०) वल्हांडण वर्षातून एकदाच पाळण्यात येत असे. या कारणास्तव प्रभूचे सांजभोजन हे दरवर्षी करणे हे उचित आहे. पण केव्हा? वसंत ऋतुतील वल्हांडणाच्या वेळीच. याचा अर्थ हा की, जेव्हा येशू वारला तो वार अनुलक्षून म्हणजे शुक्रवारी न करता (यहुदी पंचांगानुसार) निसान १४ या तारखेला तो केला पाहिजे.

२०. यहोवाचे साक्षीदार निसान १४ या तारखेमध्ये का आस्थेवाईक आहेत?

२० यामुळेच पौलाने जेव्हा असे लिहिले की, “जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभुच्या मरणाची, तो येईपर्यंत घोषणा करता,” तेव्हा त्याच्या मनात निसान १४ हीच तारीख असावी हे स्पष्ट आहे. (१ करिंथकर ११:२६) यानंतर सुमारे दोन शतकभर पुष्कळ ख्रिश्‍चनांनी निसान १४ हीच तारीख पाळली, व त्यांना क्वार्टोडेसिमन्स असे म्हणत; याचा लॅटिनमधील अर्थ “१४ वा” असा होतो. मॅक्लीनटॉक व स्ट्राँग कळवतातः “आशिया मायनरमधील सर्व चर्चेस प्रभूच्या मरणाचा दिवस निसान महिन्याच्या १४ तारखेशी जुळणाऱ्‍या दिवसाशी साजरा करीत; या दिवशी प्रभूला वधस्तंभी दिले गेले असे प्राचीन चर्चचे आरंभापासून मत आहे.” आजही यहोवाचे साक्षीदार निसान १४ तारखेशी जुळणाऱ्‍या तारखेलाच प्रतिवर्षी प्रभूच्या सांजभोजनाचा विधी साजरा करतात. तथापि, काहींचे असे म्हणणे आहे की, हे, यहुदी आपला वल्हांडण ज्या तारखेस साजरा करीत त्यापासून भिन्‍न होऊ शकते. ते का बरे?

२१. वल्हांडणाच्या कोकऱ्‍याचे अर्पण केव्हा करायचे होते, पण आज यहुदी काय करतात?

२१ इब्री लोकांचा दिवस सूर्यास्ताला (साधारणपणे ६ वाजता) सुरु होऊन तो पुढच्या सूर्यास्ताच्या वेळेपर्यंत मोजण्यात येत असे. देवाने असे म्हटले की, निसान १४ ला “दोन सायंकाळच्या मध्ये,” वल्हांडणाचा कोकरा वधावा. (निर्गम १२:६,न्यू.व.) हे कधी समजायचे होते? आधुनिक यहुदी याचे प्रतिपादन रब्बींनी ग्राह्‍य धरलेल्या दृष्टीकोणास अनुसरून करतात की, निसान १४ ही तारीख संपण्याच्या बेतात असताना म्हणजे जेव्हा सूर्य अस्ताला जाण्यास आरंभ करतो (सुमारे ३ वाजता) ते सूर्यास्त होण्याच्या दरम्यान तो कोकरा वधावा. यामुळे ते आपला सीडर सोहळा सूर्यास्तानंतर म्हणजे निसान १५ तारखेच्या आरंभाला साजरा करतात.—मार्क १:३२.

२२. स्मारकविधीची तारीख ही यहुदी आपला वल्हांडण जेव्हा साजरा करतात त्यापासून वेगळी असण्याचे काय कारण असावे? (मार्क १४:१७; योहान १३:३०)

२२ पण आम्हाला या संज्ञेचा अर्थ वेगळेपणाने गृहीत धरण्याचे रास्त कारण आहे. अनुवाद १६:६ ने इस्राएली लोकांना स्पष्ट म्हटले होते की, “सूर्यास्ताच्या वेळी, संध्याकाळी वल्हांडणाचा यज्ञपशु अर्पावा.” (यहुदी तानख आवृत्ती) याचा अर्थ, “दोन संध्याकाळच्या मध्ये,” म्हणजे सूर्यास्तापासून (जो निसान १४ ला सुरु होतो) ते अंधार होईपर्यंतचा जो संधिप्रकाश असतो त्यामध्ये. प्राचीन काळच्या करैते यहुद्यांनीb तसेच आजच्या शोमरोन्यांनाहीc हाच अर्थबोध घेतलेला आहे. निसान १५ला नव्हे तर १४ रोजी “नियुक्‍त वेळी” वल्हांडणाच्या कोकऱ्‍याचे अर्पण झाले व तो तेव्हा खाण्यात आला हे स्वीकारल्यामुळे आमच्या स्मारकविधीची तारीख ही यहुदी तारखेपेक्षा वेगळी येते त्याचे हे कारण आहे.—गणना ९:२-५.

२३. यहुदी पंचांगास महिने का जोडले जातात व याची हाताळणी आधुनिक काळचे यहुदी कशी करतात?

२३ यहुद्यांच्या व आमच्या तारखेत फरक का पडतो याचे आणखी एक कारण म्हणजे त्यांनी पूर्वीच गृहीत धरलेले पंचाग होय, ही पद्धत इ.स. च्या चवथ्या शतकापर्यंत रूजू झाली नव्हती. या पंचांगाचा वापर करून ते निसान १ किंवा सणाची तारीख दशकांआधी किंवा शतकांआधीच ठरवून ठेवू शकतात. याशिवाय ऋतुंचे पंचागासोबत संतुलन रहावे यासाठी प्राचीन चांद्रपंचांगात वेळोवेळी १३ वा महिना जोडण्यात येत असे. सध्याच्या यहुदी पंचांगात हा महिना ठरवलेल्या ठिकाणीच जोडला जातो; १९ वर्षांच्या फेरीत, तो ३, ६, ८, ११, १४, १७ व १९ व्या वर्षी येतो.

२४, २५. (अ) येशूच्या काळी महिने कसे ठरवीत, तसेच अधिक मास कसा ठरविला जाई? (ब) प्रभुच्या सांजभोजनाची तारीख यहोवाचे साक्षीदार कशी ठरवतात?

२४ तथापि, एमिल श्रुरर म्हणतातः “येशूच्या काळी [यहुद्यांना] स्थिर असे पंचांग नव्हते, पण केवळ अनुभवावरील विश्‍वासाच्या आधाराने चंद्राची पहिली कोर दिसताच नव्या महिन्याची सुरवात जमेस धरीत व याचप्रमाणे निरिक्षणाच्या आधारावर” जरुरीप्रमाणे नवा महिना जोडीत असत. “वर्षाच्या समाप्तीच्या वेळेस, पुढचा वल्हांडण, वसंतऋतुतील रात्र व दिवस सारखा असणाऱ्‍या काळाच्या [साधारणपणे मार्च २१ च्या] आधी येईल असे दिसले तर निसानच्या आधी महिन्याची भर कमी करीत.” (द हिस्ट्री ऑफ द ज्युईश पीपल इन द एज ऑफ जीजस ख्राइस्ट, खंड १) अशाप्रकारे अधिक मास स्वाभाविकपणे येत असे; तो हेतुपुरस्सर जोडला जात नसे.

२५ यहोवाच्या साक्षीदारांचे नियमन मंडळ प्रभुच्या सांजभोजनाची तारीख प्राचीन पद्धतीस अनुसरून ठरवतात. निसान १ ही तारीख नव्या चंद्राची कोर, वसंतऋतुच्या दिवस व रात्र एकसारखी असणाऱ्‍या काळात यरुशलेमात सूर्यास्ताला केव्हा दिसू शकेल असे वाटते त्यावर ठरविण्यात येते. येथून १४ दिवस मोजल्यास निसान १४ तारीख येते, जी पौर्णिमेसोबत जुळणारी असते. (पहा द वॉचटावर, जून १५, १९७७, पृष्ठे ३८३-४.) या पवित्र शास्त्रीय पद्धतीस अनुलक्षून जगभर असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांना हे कळविण्यात आले आहे की, या वर्षीचा स्मारक विधी हा मार्च ३० रोजी सूर्यास्तानंतर उरकण्यात येईल.

२६. प्रभुच्या सांज भोजनातील आणखी कोणत्या गोष्टीकडे आम्ही आपले लक्ष लावण्यास हवे?

२६ ही तारीख निसान १४ सोबत जुळणारी आहे व याच वेळेसे येशूने शेवटला कायदेशीर असणारा वल्हांडण सण पाळला होता. पण स्मारकविधी साजरा करणे ही गोष्ट आमच्या लक्षात ते तारण आणून देते जे, यहुदी साजरा करीत असलेल्या सीडर सोहळ्यापेक्षाही श्रेष्ठ प्रतीचे आहे. यासाठीच, प्रभुच्या सांज भोजनप्रसंगी काय घडते, त्याचा अर्थ काय व आमचे तारण यासोबत कसे निगडीत आहे हे आम्ही सर्वांनी समजून घेतले पाहिजे.

[तळटीपा]

a पहा द वॉचटावर, फेब्रुवारी १५, १९८०, पृष्ठे ८-२४.

b मॅक्लीनटॉक व स्ट्राँग त्यांचे वर्णन “यहुदी सभास्थानातील अत्यंत जुना व अप्रतिम असा पंथ, ज्याचे लक्षणीय गुण म्हणजे कायद्यातील लिखित मजकुरानुरुप कटाक्षाने पालन करणे हे होते,” असे करतात.

c “ते संध्याकाळी जनावरास मारतात . . . मध्यरात्री कुटुंब एकत्र मिळून त्याचे मांस खातात . . . व मग राहिलेले मांस व हाडे सकाळ होण्याआधी जाळून टाकतात . . . काही प्रामाण्यांचे हे म्हणणे आहे की, शोमरोन्यांच्या धर्मास यहुदी रब्बींच्या शिकवणींचे वळण लागण्याआधी तो पवित्र शास्त्रीय धर्मासोबत निगडीत असावा.”—द ओरिजिन ऑफ द सीडर.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ वल्हांडणाचा संबंध तारणासोबत का उचितपणे आहे?

◻ वल्हांडणाच्या कोकरापेक्षा येशूचे यज्ञार्पण अधिक काही का करून दाखवू शकते?

◻ येशूच्या द्वारे कोणते तारण उपलब्ध होते?

◻ यहोवाचे साक्षीदार प्रभुच्या सांज भोजनाच्या विधीची योग्य वेळ कशी ठरवतात?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा