वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 २/१ पृ. २५-३०
  • स्मारकविधीच्या काळात आपले परिक्षण करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • स्मारकविधीच्या काळात आपले परिक्षण करणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “हे माझे शरीर आहे”
  • द्राक्षारस—अर्थ असणारा
  • स्मारकविधीच्या काळात परिक्षण करण्याची गरज
  • “माझ्या स्मरणार्थ हे करा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • प्रभूच्या सांज भोजनाचा विधी का पाळावा?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • प्रभूचे सांज भोजन कसे साजरे करतात?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • ख्रिस्ताचा स्मारकविधी आपण का साजरा करतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 २/१ पृ. २५-३०

स्मारकविधीच्या काळात आपले परिक्षण करणे

आपण आपला न्यायनिवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढावला नसता . . . आपल्यावर दंडाज्ञा येऊ नये.”—१ करिंथकर ११:३१, ३२.

१. खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी काय टाळण्याची आशा निश्‍चित राखावी व का?

यहोवाकडून प्रतिकूल न्यायदंड मिळावा ही शेवटली गोष्ट ठरावी असे ख्रिश्‍चनांनी अपेक्षिण्यास हवे. “सर्व जगाचा न्यायधीश” याला असंतुष्ट करण्यामुळे आम्हाला “जगाबरोबर दंडाज्ञा” मिळून आमचे तारण गमाविले जाईल. याचा अर्थ, आम्ही येशूसोबत स्वर्गात जीवन मिळविण्याची किंवा पृथ्वीवरील नंदनवनात अनंत जीवन मिळविण्याची आशा नष्ट होईल.—उत्पत्ती १८:२५; १ करिंथकर ११:३२.

२, ३. आमचा न्यायदंड प्रतिकूलपणे कसा होऊ शकतो; आणि याविषयी पौलाने काय म्हटले?

२ करिंथकरांस पहिल्या पत्रातील ११ व्या अध्यायात पौलाने असे एक क्षेत्र दाखविले की जेथे आपला न्याय होऊ शकतो. त्याने आपले शब्द अभिषिक्‍त जणांना उल्लेखून लिहिलेले असले तरी त्याची ही सूचना या काळाशी खासपणे सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आहे. आम्ही कोण आहोत याचे आम्ही स्वतः परिक्षण केले तर त्यामुळे आम्हास देवाची मर्जी लाभू शकते व न्यायदंड टळू शकतो. प्रभूच्या सांज भोजनाच्या वार्षिक समारंभाची चर्चा करताना पौलाने म्हटलेः

३ “ज्या रात्री प्रभु येशूला धरुन देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली; आभार मानून ती मोडली व म्हटलेः ‘हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा.’ मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटलेः ‘हा प्याला माझ्या रक्‍ताने झालेला नवा करार आहे; जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा.’ कारण जितक्यांदा तुम्ही भाकर खाता व हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभुच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता.”—१ करिंथकर ११:२३-२६.a

४. मार्च ३०, १९९१ रोजी सायंकाळी काय घडेल?

४ मार्च ३०, १९९१ रोजी सूर्यास्तानंतर यहोवाचे साक्षीदार ख्रिस्ताच्या मृत्युचा स्मारकविधी साजरा करतील. साधारणपणे एका मंडळीतील लोक एका ठिकाणी एकत्र होतात; यामुळे जे अद्याप साक्षीदार नाहीत अशा बाकीच्या लोकांनाही जागा असते. ती सभा कशी असेल? तेव्हा पवित्र शास्त्रीय भाषण दिले जाते. मग, प्रार्थना होते व त्यानंतर भाकर फिरविण्यात येते. परत एकदा प्रार्थना होते व द्राक्षारसाचा प्याला फिरविण्यात येतो. एखादी सांप्रदायिक पद्धत वा कडक नियम आचरण्यापेक्षा स्थानिक परिस्थितीस अनुलक्षून भाकरीच्या अधिक थाळ्या व द्राक्षारसाचे अधिक प्याले फिरविले जातात. मुख्य गोष्ट ही की, जरी बहुतेक सर्वच जण त्यात सहभागिता न घेता ती बोधचिन्हे तशीच पुढे जाऊ देतील तरी उपस्थित राहणाऱ्‍या सर्वांसाठी ही उपलब्ध केली जावीत. पण ही बोधचिन्हे काय आहेत व त्यांचा काय अर्थ होतो? याशिवाय, आम्ही कसे आहोत हे ठरविण्यासाठी आम्ही आधीच कोणकोणत्या गोष्टींचे परिक्षण करण्यास हवे?

“हे माझे शरीर आहे”

५, ६. (अ) येशूने भाकरीसंबंधाने काय केले? (ब) त्याने कोणत्या प्रकारातील भाकर वापरली?

५ स्मारकविधीच्या बाबतीत पौलाला “जे प्रभुपासून मिळाले” होते त्याचे आपण वाचन केले आहेच. याखेरीज, तीन शुभवर्तमान लेखकांचे लिखाण देखील उपलब्ध आहे, यांचेपैकी एक तर स्वतः, येशूने जेव्हा हा समारंभ प्रस्थापित केला तेव्हा उपस्थित होता. (१ करिंथकर ११:२३; मत्तय २६:२६-२९; मार्क १४:२२-२५; लूक २२:१९, २०) हे सर्व अहवाल सांगतात की, येशूने प्रथम भाकर घेतली, प्रार्थना म्हटली व मग मोडून ती शिष्यांमध्ये वाटली. ही भाकर काय होती? यालाच अनुलक्षून आज कशाचा वापर केला जातो? त्याचा काय अर्थ होतो किंवा ते कशाचे प्रतिनिधित्व करते?

६ यहुद्यांच्या वल्हांडणाच्या भोजनातून राहिलेले काही खाद्य होते, यापैकी एक बेखमीर भाकर होती, जिला मोशेने “बेखमीर भाकर म्हणजे दुःख स्मारकाची भाकर” असे म्हटले होते. (अनुवाद १६:३; निर्गम १२:८) ही भाकर, गव्हाचे पीठ कसलेही खमीर, मीठ, किंवा इतर मालमसाला न वापरता बनवली होती. ती बेखमीर (इब्री, मॅटस्‌.साहʹ) असल्यामुळे सपाट व ठिसूळ होती; ती खाऊ शकणाऱ्‍या योग्य आकारात तोडावयाची होती.—मार्क ६:४१; ८:६; प्रे. कृत्ये २७:३५.

७. स्मारक विधीप्रसंगी भाकर बनविण्यासाठी यहोवाचे साक्षीदार कशाचा वापर करतात?

७ येशूने प्रभूच्या सांजभोजनाच्या वेळी बेखमीर भाकरी वापरली, तशीच यहोवाचे साक्षीदार आज वापरतात. ज्यात माल्ट, कांदे किंवा अंडी यांचे मिश्रण करण्यात आले नाही अशी यहुदी नियमित रुपात वापरीत असलेली सपाट व ठिसूळ अशी बेखमीर भाकरी चालू शकते. (ज्या भाकरीत वर नमूद केलेल्या गोष्टींचे मिश्रण आहे ती “दुःखाची भाकर” या वर्णनानुरुप नसेल.) मंडळीतील वडील कोणाला गव्हाचे पीठ व पाणी यांच्या मिश्रणाने ती बेखमीर भाकरी तयार करण्यास सांगू शकतील. जर गव्हाचे पीठ उपलब्ध नसेल तर ही खमीर नसणारी भाकर जव, तांदूळ, मका, किंवा इतर धान्याच्या पिठापासून तयार करता येईल. हे पीठ लाटले जाते व त्याच्या पातळ पोळ्या करून त्या तव्यावर खूपच थोडे तेल लावून भाजाव्या.

८. बेखमीर भाकर हे योग्य बोधचिन्ह का आहे, व त्याची सहभागिता घेणारा काय सूचित करतो? (इब्रीयांस १०:५-७; १ पेत्र ४:१)

८ अशी ही भाकर योग्य ठरते, कारण तिजमध्ये खमीर (आंबट पदार्थ) नसते. पवित्र शास्त्र खमीराचा भ्रष्टता किंवा पाप सूचित करण्यासाठी उपयोग करते. मंडळीतील एका अनैतिक माणसाविषयी पौलाने अशी सूचना केलीः “थोडे खमीर सगळ्या गोळ्याला फुगविते. जुने खमीर काढून टाका म्हणजे तुम्ही बेखमीर व्हाल. आपला वल्हांडणाचा यज्ञपशू जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले. आपण सण पाळावा तो जुन्या खमिराने अथवा वाईटपणा व दुष्टपणा याने नव्हे तर सात्विकपणा व खरेपणा ह्‍या बेखमीर भाकरीने पाळावा.” (१ करिंथकर५:६-८; पडताळा मत्तय १३:३३; १६:६, १२.) बेखमीर भाकरी येशूच्या मानवी देहाचे उचित चिन्ह सादर करते, कारण तो “निष्ठावंत, निर्दोष, निर्मळ, पापी जनांपासून वेगळा” असा होता. (इब्रीयांस ७:२६) येशूने आपल्या प्रेषितांना असे म्हटले की, “हे घ्या व ही [भाकर] खा; हे माझे शरीर आहे,” तेव्हा तो स्वतःच आपल्या परिपूर्ण मानवी देहात त्यांच्यासमोर उभा होता. (मत्तय २६:२६, अ न्यू ट्रान्सलेशन ऑफ द बायबल, जेम्स मोफॅटतर्फे) भाकरीची सहभागिता घेणे याचा अर्थ, तो व्यक्‍ती त्याच्यासाठी देण्यात आलेल्या येशूच्या यज्ञार्पणावर विश्‍वास ठेवीत असल्याचे व त्याचा स्वीकार करीत असल्याचे सूचित करीत असतो. पण, यामध्ये आणखी काही समाविष्ट आहे.

द्राक्षारस—अर्थ असणारा

९. आणखी कोणत्या बोधचिन्हाचा वापर व्हावा असे येशूने म्हटले?

९ येशूने आणखी एक बोधचिन्ह वापरलेः “त्याने प्याला घेतला व देवाचे आभार मानून तो त्यांस दिला व म्हटलेः ‘तुम्ही सर्व यातून प्या; हे नव्या कराराचे माझे रक्‍त आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतिले जात आहे.’” (मत्तय २६:२७, २८, मोफॅट) पण त्या फिरविल्या जाणाऱ्‍या सहभागितेच्या प्याल्यात असे काय होते; आणि आम्ही स्वतः काय आहोत याचे परिक्षण करीत असता याचा काय अर्थ होतो?

१०. यहुदी वल्हांडण सणात द्राक्षारस कसा आला?

१० आरंभी मोशेने जेव्हा वल्हांडण सणाची माहिती पुरविली तेव्हा त्यात पेयाचा उल्लेख नव्हता. वल्हांडण सणात द्राक्षारस बऱ्‍याच काळानंतर आला असे कित्येक प्रामाण्यांचे मत आहे. ते साधारण इ.स.च्या दुसऱ्‍या शकात घडले असे ते म्हणतात.b काहीही असले तरी, पहिल्या शतकापर्यंत या भोजनात द्राक्षारसाचा वापर सर्वसाधारण बनला होता, आणि येशूने त्याच्या वापरास आक्षेप घेतला नाही. त्याने आपल्या स्मारकविधीची स्थापना करण्यामध्ये या वल्हांडणाचा द्राक्षारस वापरला.

११. प्रभुच्या सांज भोजनाच्या वेळी कशा प्रकारचा द्राक्षारस योग्य ठरतो?

११ द्राक्षाचा हंगाम होण्याच्या बऱ्‍याच काळानंतर यहुद्यांचा वल्हांडण सण येत होता; त्यामुळे येशूने सुगंध नसणारा रस नव्हे तर चांगला तांबडा द्राक्षारसाचा वापर त्याच्या रक्‍ताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी केला. (पडताळा प्रकटीकरण १४:२०.) ख्रिस्ताच्या रक्‍तास आणखी कशाची भर असण्याची जरूरी नव्हती, यासाठीच ब्रँडीचे मिश्रण असलेल्या द्राक्षारस तसेच मसाले आदिचे मिश्रणापेक्षा साधा द्राक्षारस योग्य ठरतो. हा द्राक्षारस कसा बनवीत, म्हणजे तो आंबत असताना काही साखर टाकिली जात होती का, तसेच तो वाईट न होण्यासाठी थोडेसे गंधकाम्लाचे क्षार टाकीत होते का वगैरे चिंता करण्याची गरज नाही.c पुष्कळ मंडळ्या व्यावसायिक तांबडा द्राक्षारस किंवा घरी बनवलेल्या द्राक्षारसाचा वापर करतात. द्राक्षारस व भाकर ही निव्वळ बोधचिन्हे किंवा लाक्षणिक गोष्टी आहेत त्यामुळे जर काही उरलेच तर ते घरी नेऊन इतर वेळी त्याचा आहार व पेय या अर्थाने वापर करता येईल.

१२. द्राक्षारसाला कोणता प्रातिनिधिक अर्थ आहे असे येशूने विवेचीत केले?

१२ येशूने वल्हांडणाच्या रात्री आपल्या रक्‍ताविषयी बोलणी केली तेव्हा मागे मिसरातील कोकऱ्‍याचे रक्‍त, उपस्थितांच्या लक्षात आले असावे. पण येशूने केवढी वेगळी तुलना केली याकडे लक्ष द्या. तो म्हणालाः “हा प्याला माझ्या रक्‍तात नवा करार आहे. ते रक्‍त तुम्हासाठी ओतिले जात आहे.” (लूक २२:२०) देवाने आधी इस्राएलाच्या दैहिक राष्ट्रासोबत एक करार केला होता व त्याची प्रस्थापना प्राण्यांच्या रक्‍ताच्या यज्ञार्पणाने करण्यात आली. त्या यज्ञार्पणांत तसेच येशूच्या रक्‍तात समांतरता दिसून येत होती. दोघांचा, देवाने आपल्या लोकांच्या राष्ट्रासोबत केलेल्या करारात वापर करण्यात आला. (निर्गम २४:३-८; इब्रीयांस ९:१७-२०) इस्राएली कराराचा एक मसुदा हा होता की, दैहिक इस्राएलांना राजे-याजकांचे एक राष्ट्र बनण्याचे भवितव्य उपलब्ध होते. (निर्गम १९:५, ६) तथापि, इस्राएल राष्ट्र यहोवाचा करार पाळून चालण्यात मागे पडले तेव्हा त्याने म्हटले की, तो ‘पहिला करार’ काढून एक “नवा करार” करणार. (इब्रीयांस ९:१, १५; यिर्मया ३१:३१-३४) येशूने आपल्या विश्‍वासू शिष्यांमध्ये जो द्राक्षारसाचा प्याला फिरविण्यासाठी दिला तो या नव्या कराराचे प्रतिनिधित्व करीत होता.

१३, १४. (अ) नव्या करारात असणे म्हणजे काय? (ब) कोणा माणसाने त्या बोधचिन्हात सहभागिता घेण्याचा काय अर्थ होता?

१३ या नव्या करारात घेण्यात आलेल्या ख्रिश्‍चनांचे मिळून राजे-याजकांचे आध्यात्मिक राष्ट्र तयार होते. (गलतीकर ६:१६) प्रेषित पेत्राने लिहिलेः “तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहा. ह्‍यासाठी की ज्याने तुम्हास अंधःकारातून काढून आपल्या अद्‌भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे.” (१ पेत्र २:९) अशा लोकांना कोणती तारणप्राप्ती होणार हे स्पष्ट आहे—येशूबरोबर सहराजे या नात्याने स्वर्गातील जीवन. प्रकटीकरण २०:६ याविषयी पुष्टी देऊन म्हणतेः “पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे . . . ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याच्याबरोबर एक हजार वर्षे राज्य करतील.”

१४ खरे म्हणजे, येशूने प्रेषितांना बोधचिन्हाची भाकर व द्राक्षारसाची सहभागिता घेण्यास सांगितल्यावर त्याने त्यांना म्हटले की, ते ‘त्याच्या राज्यात, त्याच्या मेजावर खातील व पितील आणि राजासनावर बसून इस्राएलांच्या बारा वंशाचा न्याय करतील.’ (लूक २२:२८-३०) तद्वत, स्मारकविधीच्या बोधचिन्हांची सहभागिता घेणे याचा अर्थ येशूच्या यज्ञार्पणावर विश्‍वास ठेवण्यापेक्षा अधिक आहे. जर सार्वकालिक जीवन मिळवावयाचे आहे, मग ते कोठलेही असो, त्यासाठी प्रत्येक ख्रिश्‍चनाने खंडणीचा स्वीकार केला पाहिजे व त्यावर विश्‍वास ठेवला पाहिजे. (मत्तय २०:२८; योहान ६:५१) पण बोधचिन्हांची सहभागिता घेणे हे तो नव्या करारात असून येशूसोबत त्याच्या राज्यात राहण्यासाठी निवडला गेला आहे असे सूचित करते.

स्मारकविधीच्या काळात परिक्षण करण्याची गरज

१५. येशूने देवाच्या सेवकांसाठी एका नव्या आशेची प्रस्तावना कशी केली?

१५ येशूच्या काळाआधी पृथ्वीवर हयात राहिलेल्या देवाच्या निष्ठावंत सेवकांना स्वर्गात जाण्याची आशा नव्हती हे मागील लेखात स्पष्ट करण्यात आले आहे. मानवाचे आरंभीचे घर असलेल्या या पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाची प्राप्ती व्हावी याकडे त्यांचे लक्ष होते. आत्मिक रितीने पुनरुत्थान होण्यात येशू ख्रिस्त हा पहिला होता; तसेच तो मानवजातीतून स्वर्गात घेतलेल्यांमधील पहिला झाला. (इफिसकर १:२०-२२; १ पेत्र ३:१८, २२) पौलाने याविषयीची पुष्टी दिली व म्हटलेः “जो नवीन व जीवनयुक्‍त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला त्या मार्गाने पवित्र स्थानात येशूच्या रक्‍ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे.” (इब्रीयांस १०:१९, २०) येशूने हा मार्ग उघडल्यावर आता यामधून कोण प्रवेश मिळविणार?

१६. जे भाकर व द्राक्षारस यांची सहभागिता घेतात अशांसाठी कोणते भवितव्य राखून ठेवलेले आहे?

१६ ज्या रात्री येशूने प्रभुच्या सांज भोजनाची स्थापना केली तेव्हाच त्याने आपल्या निष्ठावंत प्रेषितांना म्हटले की, तो त्यांच्यासाठी स्वर्गात जागा तयार करण्यासाठी जाणार. (योहान १४:२, ३) तसेच येशूने हे देखील म्हटल्याचे आठवा की, जे त्या भाकर व द्राक्षारसाची सहभागिता घेतील ते त्याच्या राज्यामध्ये असतील व राजासनावर बसून न्याय करतील. तर मग, ते केवळ प्रेषितच असतील का? नाही, कारण नंतर प्रेषित योहानाला हे कळाले की, इतर ख्रिस्ती देखील विजय मिळवतील व ‘येशूसोबत त्याच्या राजासनावर बसतील’ व त्या सर्वांचे मिळून एक ‘याजक राज्य तयार होऊन ते या पृथ्वीवर राज्य करतील.’ (प्रकटीकरण ३:२१; ५:१०) योहानाला हे देखील कळले की, जे “पृथ्वीवरुन विकत घेण्यात आलेले” आहेत ते किती असतील—१,४४,०००. (प्रकटीकरण १४:१-३) हा “लहान कळप” याचा मिळून बनलेला गट आहे व तो युगादिकालापासून आतापर्यंत देवाची उपासना केलेल्या व करीत असलेल्या सर्व उपासकांच्या तुलनेत फारच छोटासा असल्यामुळे त्याला स्मारक विधीच्या काळात खास दक्षता घेणे जरुरीचे आहे.—लूक १२:३२.

१७, १८. (अ) करिंथमधील काही ख्रिस्ती कोणत्या सवयीत गढले होते? (ब) खाणे व पिणे यात अतिरेकता करणे हे इतके का गंभीर होते? (इब्रीयांस १०:२८-३१)

१७ पौलाने ही गोष्ट करिंथकरांना लिहिलेल्या आपल्या पत्रात नमूद केली, जेव्हा की, काही प्रेषित हयात होते आणि देव ख्रिश्‍चनांना “पवित्र जन” होण्याचे पाचारण देत होता. पौलाने म्हटले की, सहभागिता घेणाऱ्‍या काहींमध्ये अनिष्ट प्रथा रूढ झाली होती. काही लोक या प्रसंगाआधी भरपूर खाऊन पिऊन येत असत की, ज्यामुळे या विधिमध्ये त्यांना झोप येऊ लागे व त्यांचे लक्ष केंद्रित राहात नव्हते. यामुळेच, ते भाकरीद्वारे चित्रित असणाऱ्‍या येशूच्या दैहिक शरीराला “न अनुलक्षून” बनत होते. हे इतके गंभीर होते का? होय! कारण अयोग्य रितीने सहभागिता घेण्यामुळे ते “प्रभूचे शरीर व रक्‍त यासंबंधाने दोषी” झाले होते. ते मानसिक तसेच आध्यात्मिकरित्या जागृत राहिले तर ‘ते स्वतःचे परिक्षण करू शकत होते व स्वतःवर दंड ओढावून आणू शकणार नव्हते.’—१ करिंथकर १:२; ११:२०-२२, २७-३१.

१८ पण त्या ख्रिश्‍चनांनी कशाचे परिक्षण करायचे होते व कसे? प्राथमिकरित्या, त्यांनी आपली स्वर्गीय जीवनासाठी १,४४,००० वारसदारांत असण्यासाठी पाचारण झाले असल्याचे आपले अंतःकरण व मन यात पूर्णतयः ओळखण्यास हवे होते. पण हे त्यांना कसे कळणार, तसेच प्रेषितांच्या काळापासून देव ज्याची निवड करीत आला आहे त्या या छोट्या गटात आपण आहोत असे आज पुष्कळांनी मानले पाहिजे का?

१९. १९८९ च्या स्मारकविधीमध्ये कोणती परिस्थिती प्रकट झाली?

१९ खरे म्हणजे आज खऱ्‍या ख्रिश्‍चनांपैकीच्या केवळ थोडक्या जणांनाच त्याविषयीची जाणीव होते. १९८९ मध्ये झालेल्या स्मारक विधीला यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यातून जगभर ९४,७९,००० पेक्षा अधिक लोक उपस्थित होते. पण केवळ ८,७०० जणांनीच आपल्याला देव “स्वर्गीय राज्यात तारील” अशी आशा असल्याचे व्यक्‍त केले. (२ तीमथ्य ४:१८) बाकीच्या प्रचंड समुदायाला—होय, उपस्थित असलेल्या इतर लाखो निष्ठावंत व आशीर्वादित ख्रिश्‍चनांना—हे कळाले की त्यांची आशा ही पृथ्वीवर सदासर्वदा जिवंत राहण्याची आहे.

२०. १,४४,००० लोकांना आपल्या पाचारणाची ओळख कशी मिळते? (१ योहान २:२७)

२० इ. स. ३३ च्या पेंटेंकॉस्टपासून देवाने १,४४,००० ची स्वर्गीय जीवनासाठी निवड सुरु केली. ती आशा तेव्हा नवी होती व ही येशूच्या काळाआधीच्या देवाच्या सेवकांनी धरली नव्हती, तर ज्यांची निवड झाली आहे त्यांना ती कशी कळू शकणार होती व त्या आशेची त्यांना कशी खात्री होणार होती? ते त्यांनी, देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे त्यांना जी साक्ष पुरविली त्याकरवी ओळखले. याचा अर्थ त्यांनी प्रत्यक्षात पवित्र आत्म्याला पाहिले असे नाही (कारण ती व्यक्‍ती नाही) तसेच हा आत्मा त्यांच्याशी बोलत असल्याचा मानसिक दृष्टांत त्यांना घडला व शिवाय आत्मिक क्षेत्रातून त्यांना वाणी ऐकायला आली असे काही नाही. पौल स्पष्ट करतो की, “तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची मुले आहोत. . . . वारीसही आहोत. म्हणजे देवाचे वारीस व ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगीत असलो तरच.”—रोमकर ८:१६,१७.

२१. (अ) आपली आशा स्वर्गीय आहे हे अभिषिक्‍तांना कसे कळते? (१ करिंथकर १०:१५-१७) (ब) अभिषिक्‍त जन कोणत्या प्रकारातील लोक असतात, आणि आपल्या आशेविषयी ते कसे नम्रभावाने वक्‍तव्य करतात?

२१ ही साक्ष किंवा खात्री त्यांचे विचार व आशा यांना पुनर्जागृती देते. ते अद्याप मानवच आहेत आणि यहोवाच्या ऐहिक निर्मितीतील चांगल्या गोष्टींचा आनंद घेत आहेत, तरीही त्यांच्या जीवनातील प्रमुख ध्येय व चिंता ही ख्रिस्तासोबत सहवारीस बनण्यासंबंधाने असते. त्यांना हा दृष्टीकोण भावनावश होऊन मिळाला नाही. ते सर्वसाधारण मानवासारखेच आहेत आणि आपला दृष्टीकोण व वागणूक यात तोल साधीत आहेत. पण देवाच्या आत्म्याद्वारे त्यांचे पवित्रीकरण घडले गेल्यामुळे त्यांना आपल्या पाचारणाची पुष्टी मिळाली आहे व त्याविषयी त्यांना कसलाही संशय वाटत नाही. आपण विश्‍वासू राहिलो तरच स्वर्गात आपले तारण होणार याची त्यांना कल्पना आहे. (२ थेस्सलनीकाकर २:१३; २ तीमथ्य २:१०-१२) येशूच्या यज्ञार्पणाचा त्यांच्यासाठी काय अर्थ होतो तसेच आपण पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त असणारे ख्रिस्ती आहोत ही जाणीव असल्यामुळेच ते अगदी नम्रभावाने स्मारकविधीच्या बोधचिन्हात सहभागिता घेतात.

२२. प्रभुच्या सांजभोजनास उपस्थित राहणारे बहुतेक काय ओळखतील?

२२ जे बहुतेक मार्च ३० रोजी होणाऱ्‍या समारंभास हजर राहतील त्यापैकी बहुतेकांना तशी आशा नाही, कारण देवाने त्यांचा आत्म्याने अभिषेक केलेला नाही व स्वर्गीय जीवनासाठी त्यांना पाचारण दिलेले नाही. आम्ही हे पाहिले आहेच की, देवाने १,४४,००० जणांना निवडण्याची सुरवात प्रेषितांच्या काळापासून केली होती. ही पाचारणाची निवड पूर्ण झाल्यानंतर जे देवाची उपासना करण्यासाठी सामोरे येतील अशांची आशा मोशे, दावीद, बाप्तिस्मा करणारा योहान तसेच इतर विश्‍वासू जण, जे येशूने स्वर्गातील जीवनासाठी मार्ग उघडा करण्याआधी वारले त्या सर्वांसारखीच असणार हे ग्राह्‍य वाटते. या कारणास्तव, आज लाखो निष्ठावंत व आवेशी ख्रिस्तीजन स्मारकविधीच्या बोधचिन्हांची सहभागिता घेत नाहीत. हे ख्रिस्ती आपण देवापुढे कोण आहोत, म्हणजे आपली वास्तविक आशा काय आहे ते ओळखतात. येशूचे रक्‍त व त्याचे शरीर यांचा लाभ त्यांना त्यांच्या पापांची क्षमा होण्यात व मग या पृथ्वीवर अनंतकाल जीवनाची प्राप्ती होण्यात घडून येईल.—१ पेत्र १:१९; २:२४; प्रकटीकरण ७:९, १५.

२३. स्मारकविधीचा काळ आनंदी मेळाव्याचा का असेल? (पडताळा २ इतिहास ३०:२१.)

२३ तर मग, आपण मार्च ३० रोजी होणाऱ्‍या आनंदी मेळाव्याकडे बघू या. तो आमचे परिक्षण करण्याचा काळ असेल पण आनंदाचाही असेल. आनंद हा त्या छोट्या संख्येला होणार ज्यांची आशा स्वर्गीय आहे व जे योग्यपणे व आज्ञाधारकपणे भाकर व प्याला यातून सहभागिता घेतील. (प्रकटीकरण १९:७) शिवाय त्या सायंकाळी लाखोंनी जमलेल्या आनंदी ख्रिश्‍चनांनाही मोठी धन्यता वाटेल, जे निरिक्षण करतील व शिकतील आणि त्या अर्थभरीत समारंभाची आठवण पृथ्वीवर दीर्घकाळासाठी जतन करून ठेवतील.

[तळटीपा]

a “ज्या रात्री त्याला धरून देण्यात आले तेव्हा प्रभु येशूने भाकर घेतली; उपकारस्मरण केले; त्याने ती मोडली व म्हटलेः ‘हे माझे शरीर तुम्हासाठी आहे, हे माझ्या स्मारकासाठी करीत जा.’ याचप्रमाणे जेवण संपल्यावर त्याने प्याला घेतला व म्हटलेः ‘हा प्याला नवा करार आहे; त्यावर माझ्या रक्‍ताने शिक्कामोर्तब झाला आहे; प्रत्येकदा तुम्ही तो प्याल तेव्हा तो माझ्या स्मारकादाखल प्या.’”—ॲन एक्स्पांडेड पॅराफ्रेज ऑफ द इपिस्टल ऑफ पॉल, एफ. एफ. ब्रुसतर्फे.

b या समारंभात द्राक्षारस का आला त्याविषयी एका प्रामाण्यांनी हे विवेचन दिलेः “[वल्हांडण सण] हा काही पुरुषांचा वार्षिक मेळा म्हणून नव्हता तर तो कौटुंबिक सण असा होणार असल्यामुळे द्राक्षारसाचे सेवन हे साहजिकपणे राहणार होते.”—द हिब्रु पासओवर—फ्रॉम द अर्लिएस्ट टाईम्स टू ए.डी. ७०, जे. बी. सेगलतर्फे

c द्राक्षारसाला रंग यावा वा चव यावी यासाठी प्राचीन काळापासून मीठ, अंड्यातील पांढरा बलक, व इतर पदार्थांचा वापर करीत. रोमी लोक द्राक्षारस बनविताना गंधकाम्लाचा क्षार टिकाऊपणासाठी वापरीत असत.

तुमचे उत्तर काय आहे?

◻ स्मारकविधीच्या वेळी बेखमीर भाकर का फिरविण्यात येते, व तिची सूचकता काय आहे?

◻ प्रभूच्या सांज भोजनप्रसंगी कोणता प्याला फिरविण्यात येतो, व तो कशाचे प्रतिनिधित्व करतो?

◻ स्मारकविधी समारंभाबद्दल परिक्षण करण्याची हाक का देण्यात आली आहे?

◻ तुम्ही येणाऱ्‍या स्मारकविधीकडे आपले लक्ष का लावून आहात?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा