वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 ७/१ पृ. ६-७
  • नरकाविषयीचे सत्य

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नरकाविषयीचे सत्य
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मृत्युनंतर शिक्षा नसते
  • पुनरुत्थानाद्वारे नरक रिकामा होणार
  • नरकाग्नीची आज काय स्थिती?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • एक सर्वसामान्य शिकवण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • नरक नेमके काय आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • नरक तप्त आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 ७/१ पृ. ६-७

नरकाविषयीचे सत्य

मरणानंतर यातना मिळते या विश्‍वासामागे असणारे उघड तत्त्व हे की, माणूस खरे पाहता मरत नसतो तर त्याचे शरीर मरते व काही तरी, ज्याला जीव किंवा आत्मा असे म्हणतात, ती वस्तु शरीराच्या मरणानंतर मागे राहात असते. हा विश्‍वास आपण मागील लेखात पाहिल्यानुसार मागे मेसोपोटेमियातील सुमेरियन व बाबेलोनी संस्कृतीपर्यंत जातो. नंतर तो ग्रीक लोकांनी ग्रहण केला आणि त्यांच्या प्लॅटो या तत्त्ववेत्याने या तत्त्वाला अधिक उजाळा दिला. मग, “शरीर व आत्मा” हा दुहेरी विश्‍वास धर्मत्यागी यहुद्यांचा बनला.

पण, ख्रिस्ती म्हणणाऱ्‍या लोकांनी या जीवनानंतरच्या विश्‍वासास केव्हा ग्रहण केले? येशू तसेच प्रेषितांच्या काळात तर खचितच नाही. एनसाक्लोपिडिआ युनिव्हर्सलिस हा फ्रेंच ज्ञानकोश म्हणतोः “[दुसऱ्‍या शतकातील] ॲपॉकलिप्स ऑफ पीटर हे पहिले ख्रिस्ती लिखाण होय, ज्यामध्ये नरकात पाप्यांना शिक्षा व यातना होतात असे वर्णन देण्यात आले आहे.”

खरे पाहिल्यास, आरंभीच्या चर्चपाळकांमध्ये नरकाविषयीचे पुष्कळ दुमत होते. जस्टीन मार्टर, अलेक्झांड्रियाचा क्लेमेंत, टर्टुलियन व सायप्रियन हे अग्नीनरकाच्या बाजूचे होते. ओरिजन्‌ याने नरकाला मुक्‍तता होऊ शकणारी जागा असा कल दिला व म्हटले की, नरकातील पापी ओघाओघाने वाचतील. याचे थोड्याफार प्रमाणात, नाझीयन्झस्‌चा ग्रेगरी व नायसाचा ग्रेगरी यांनी अनुकरण केले. पण ऑगस्टीनने तर नरकाच्या सौम्य दृष्टीकोनांना जणू नष्टच केले. अर्ली ख्रिश्‍चन डॉक्ट्रीन या पुस्तकात ऑक्सफर्डचे प्राध्यापक जे. एन. डी. केली यांनी लिहिलेः “पाचव्या शतकापर्यंत सर्व पाप्यांना या जीवनानंतर दुसरी कोणतीही संधी नाही हा कटु विश्‍वास आणि त्यांना खाऊन टाकणारा अग्नी हा कधी विझणार नाही हा विश्‍वास सर्वत्र प्रचलित बनला होता.”

परगेटरीसंबंधाने ऑरफस्‌—ए जनरल हिस्ट्री ऑफ रिलिजन्स म्हणतेः “भावी परमानंद किंवा सर्वनाश यामध्ये मध्यंतराचा परिक्षाकाल आहे असे प्रतिपादन सेंट ऑगस्टीनने केले. हा परिक्षाकाल म्हणजे आत्म्याचे अग्नीद्वारे होणारे शुद्धीकरण असे त्यांचे म्हणणे आहे. हे परगेटरी याचे ऑरफिक [मूर्तिपूजक ग्रीक] व व्हर्जिलियन [मूर्तिपूजक रोमी] तत्त्व आहे: याविषयी शुभवर्तमानात एकही शब्द नाही. . . . परगेटरीचे तत्त्व . . . सहाव्या शतकात तयार झाले आणि चर्चची तत्त्वप्रणाली म्हणून फ्लोरेन्सच्या परिषदेत (१४३९) याचा स्वीकार केला गेला.” न्यू कॅथोलिक एन्सायक्लोपिडिआ कबूल करतेः “परगेटरी हे कॅथोलिकांचे तत्त्व पवित्र शास्त्रवचनांवर नव्हे तर सांप्रदायावर आधारलेले आहे.” लिंबो याबद्दल रोमचे कार्डिनल रॅट्‌झिंगर कबूल करतात की, ते केवळ “वेदांतीय प्रमेय आहे.”

मृत्युनंतर शिक्षा नसते

पण, पवित्र शास्त्राबद्दल काय? मरणाच्या वेळी जीव शरीराला सोडतो व त्याला अग्नीनरकात किंवा परगेटरीमध्ये शिक्षा मिळते असे काही ते सांगते का? न्यू कॅथोलिक एन्सायक्लोपिडिआ म्हणतेः “मृत्युनंतर जीव बचावून राहतो ही कल्पना पवित्र शास्त्रात चटकन दृष्टीगोचर होणारी नाही. . . . जु[ना] क[रार] यामध्ये वर्णिण्यात आलेला जीव हा माणसाचा भाग नसून तो संपूर्ण मानव—जिवंत माणूस—आहे. याचप्रमाणे, न[वीन] क[रार] मध्ये त्याला मानवी जीवन, विशिष्ठ व्यक्‍तीचे जीवन असे संबोधण्यात आले आहे.”

असे आहे तर मग, मृत्युनंतरची शिक्षा तर गडपच झालेली दिसते. पवित्र शास्त्र म्हणतेः “जो जीव पाप करील तोच मरेल.” (यहेज्केल १८:४) ते असेही म्हणतेः “पापाचे वेतन मरण आहे.” (रोमकर ६:२३) या कारणास्तव, पवित्र शास्त्र, निगरगट्ट दुष्ट लोकांचा शेवट “गेहेन्‍ना,” “सार्वकालिक अग्नी,” किंवा “अग्नीचे सरोवर” यात होणार असल्याचे म्हणते ते केवळ त्यांना चिरकालिक मरण, “दुसरे मरण” मिळणार याविषयी अलंकारिक भाषेचा वापर करते.—मत्तय २३:३३; २५:४१, ४६; प्रकटीकरण २०:१४; २१:८;a पडताळा २ थेस्सलनीकाकर १:७-९.

पुनरुत्थानाद्वारे नरक रिकामा होणार

तर मग, नरक तप्त आहे का? पवित्र शास्त्राच्या मते, नाही. खरे म्हणजे, “नरक” असे कित्येक पवित्र शास्त्र आवृत्तीमध्ये जे भाषांतर करण्यात आले आहे त्या इब्री व ग्रीक शब्दांचा साधा अर्थ, मृत मानवजातीची सर्वसाधारण कबर असा होतो. ते यातना मिळणारे तप्त स्थळ नाही. उलट, ते विश्रांतीचे स्थळ आहे, जेथून मृत पुनरुत्थानाद्वारे बाहेर येतील. (उपदेशक ९:१०; प्रे. कृत्ये २४:१५) स्विट्‌झर्लंड येथील थिऑलॉजिकल फॅकल्टी ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ बॅसल तसेच पॅरीस येथील सोरबन येथील प्राध्यापक ओस्कर कल्लमन, “मृतांचे पुनरुत्थान होण्याविषयीची ख्रिश्‍चनांची अपेक्षा व जीवाच्या अमरत्वावरील ग्रीक विश्‍वास यातील आमुलाग्र फरक” स्पष्ट करतात. ते अगदी योग्यपणे म्हणतात की, “नंतरच्या ख्रिस्ती धर्माने या दोन्ही विश्‍वासामध्ये जे संधान जोडले ते . . . संधान म्हणून मुळी नव्हतेच, तर एकाचा त्याग [पवित्र शास्त्रातील पुनरूत्थान या शिक्षणाचा] आणि दुसऱ्‍याचा स्वीकार [मानवी जीव अमर असल्याचा मूर्तिपूजक विश्‍वास] होता.—तिरपे अक्षरवळण आमचे.

यहोवाच्या साक्षीदारांनी पुनरुत्थानावरील आपला विश्‍वास त्यागलेला नाही. त्यांनी जीवाच्या अमरत्वाच्या कल्पनेला आपली पसंती दाखवली नाही. यामुळे त्यांच्याठायी असणाऱ्‍या आनंदी भवितव्याची सहभागिता तुम्हासोबत करण्यामध्ये तसेच नरक हा काही तप्त नाही हे सत्य पवित्र शास्त्रातून सिद्ध करून दाखविण्यामध्ये ते आनंदच मानतील.

[तळटीपा]

a अग्नीनरकाच्या तत्त्वाच्या प्रतिपादनार्थ या तसेच इतर शास्त्रवचनांचा जो वापर केला गेला त्याच्या स्पष्टीकरणार्थ वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीतर्फे प्रकाशित करण्यात आलेले सद्य जीवन एवढेच सर्वकाही आहे का? हे पुस्तक बघा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा