वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 ७/१ पृ. ३
  • नरक तप्त आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नरक तप्त आहे का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • मिळती जुळती माहिती
  • नरकाग्नीची आज काय स्थिती?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • नरकाविषयीचे सत्य
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • एक सर्वसामान्य शिकवण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • नरक नेमके काय आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 ७/१ पृ. ३

नरक तप्त आहे का?

“एकोणिसशे साठीच्या काळात एके समयी नरक नाहीसा झाला होता,” असे ब्रिटनचे लेखक डेव्हिड लॉज यांनी सोल ॲण्ड बॉडीज्‌ या पुस्तकात म्हटले आहे. त्यांच्या या शब्दात दुसऱ्‍या महायुद्धानंतरच्या अनेक दशकातील कॅथोलिक व प्रॉटेस्टंट पंथीयांच्या विचारांचे प्रतिबिंब होते. काही काळ अनेक प्रमुख चर्चसंस्थांनी आधुनिक विचारसरणीचा पुरस्कार करता यावा यासाठी आपल्या तप्त नरक तत्त्वाच्या अधिकृत शिकवणीत सौम्य धोरण स्वीकारले होते.

लोकांच्या विचारात पापाविषयीची कल्पना अभ्राच्छादित बनल्यामुळे त्यांना मरणोत्तर शिक्षेची कल्पना अस्वीकृत बनली होती. रोमचे कार्डिनल रॅग्झीजर आपल्या १९८४ मधील मुलाखतीत म्हणाले होतेः “आमचे सुसंस्कृत जग . . . पापांच्या शिक्षेपासून लोकांचे विचार दूर करण्याच्या प्रयत्नात आहे; कारण हे एक असे सत्य आहे, ज्यात नरक किंवा परगेटरीमध्ये जाण्याचा विश्‍वास संबंधित आहे.”

तर मग, मरणानंतर परगेटरी किंवा नरकामधील शिक्षेबाबतच्या शिकवणूकीस डावलून पापाच्या वास्तविकतेवर विश्‍वास ठेवणे शक्य आहे का? ॲब्रिगे डी ला फोए कॅथोलिक (कॅथोलिक विश्‍वासाचा सारांश) नावे अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत फ्रान्सचे कार्डिनल डिकाऊट्रे असा प्रश्‍न करतातः “नरक आहे हा विश्‍वास बाळगणे आवश्‍यक आहे का?” याचे उत्तर हेः “नरकाचा हा भयगंडीत करणारा प्रश्‍न डावलणे शक्य नाही.” व्हॅटिकन कॉन्सिल २—अधिक अलिकडील चर्चसदस्यांचे दस्तऐवज (१९८२) म्हणजेः “देवाच्या लोकांचा करारनामा” व पुढे म्हणतेः “आमचा हा विश्‍वास आहे [की,] जे सर्व देवाच्या प्रेमास व कृपेस होकार देतात ते चिरकालिक जीवनात प्रवेश मिळवितील. जे शेवटपर्यंत नकार देतील अशांना न शमणाऱ्‍या अग्नीत टाकण्यात येईल.”

अशाप्रकारे, प्रतिकूल मतांना शाबीत करण्याचा हरप्रयत्न करूनही नरकाग्नी आजही कॅथोलिक शिकवणूकीचा मध्य व अधिकृत भाग आहे. सार्वकालिक अधःपाताच्या शिकवणूकीने ख्रिस्ती धर्मजगतातील अनेक चर्चसदस्यांठायी मानसिक “अस्वस्थता” व “गोंधळ” निर्माण झाला आहे. त्यांना, “देव प्रीती आहे,” या शिकवणूकीचा याबरोबर कसा मेळ आहे याचेच नवल वाटते. ते विस्मयाने विचारतातः ‘तप्त नरक ही खरोखरीच ख्रिश्‍चन तसेच बायबलमधील शिकवण आहे का? आणि जर नाही तर तिचा उगम कोठून आहे?’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा