वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 ७/१ पृ. ४-५
  • नरकाचा उगम

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नरकाचा उगम
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मेसोपोटेमियातील नरक
  • मिसरी व पौर्वात्य धर्म
  • ग्रीक, एट्रुस्कन व रोमी नरक
  • यहुदी लोक व इब्री शास्त्रवचने
  • नरकाविषयीचे सत्य
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • नरकाग्नीची आज काय स्थिती?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • नरक नेमके काय आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • एक सर्वसामान्य शिकवण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 ७/१ पृ. ४-५

नरकाचा उगम

“नरक” याचे स्पष्टीकरण देताना न्यू कॅथोलिक एन्सायक्लोपिडिआ म्हणते की, तो शब्द “कायमची शिक्षा झालेल्यांच्या स्थळाचे सूचक म्हणून वापरण्यात येतो.” एक प्रॉटेस्टंट एन्सायक्लोपिडिआ नरकाची संज्ञा देताना म्हणतो की तो “दुष्टांच्या भावी शिक्षेचे स्थळ” आहे.a पण, मरणानंतर अशा शिक्षेविषयीचे शिक्षण हे केवळ ख्रिस्ती धर्मजगतातील प्रमुख चर्चसंस्थापुरते मर्यादित नाही. हे ख्रिस्ती धर्मजगत अस्तित्वात येण्याच्या अनेक शतके आधीपासून प्रचलित आहे.

मेसोपोटेमियातील नरक

येशूच्या जन्माच्या दोन हजार वर्षांआधी, सुमेरी व बाबेलचे लोक जेथून परतणे नाही अशा अधोलोकावर विश्‍वास ठेवून होते. ही प्राचीन श्रद्धा सुमेरी व अकादी लोकांच्या “गिलगामेशचे महाकाव्य” तसेच “इश्‍तारची अधोलोकाकडे अधोगती” या दोन काव्यात प्रतिध्वनित होत होती. या अंधार कोठडीच्या मृतांच्या घराचे वर्णन करताना त्यात म्हटले आहेः “या गृही प्रवेश केल्यानंतर कोणीही ते सोडून बाहेर जात नाही.”

तेथील वातावरणाविषयी सांगताना एका अश्‍शुरी साहित्यात असे म्हटले आहेः “खालचे जग भयग्रस्त आहे.” एका अश्‍शुरी सरदाराला या भयग्रस्त स्थळाचे म्हणे ओझरते दर्शन घडले, ते पाहून तो म्हणतो की, त्याचे “पाय लटपटू लागले,” व जे पाहिले ते भयानक होते. या अधोलोकाचा राजा नरगालविषयी तो म्हणतोः “एका उग्र संतापी आरोळीने तो मजवर किंचाळला, ते एखाद्या बेफाम तुफानासारखे वाटले.”

मिसरी व पौर्वात्य धर्म

प्राचीन मिसऱ्‍यांठायी अमर जिवांची श्रद्धा होती, व अधोलोकांविषयी त्यांच्या वेगळ्याशा कल्पना होत्या. द न्यू एन्सायक्लोपिडिआ ब्रिटेनिका म्हणतेः “मिसऱ्‍यांच्या दफनविधीचे प्रवचन दुसऱ्‍या जगतात प्रवेश मिळविण्याचा मार्ग अनेक धोक्यांनी भरलेला आहे असे सूचित करते. जसे, भीतीदायक राक्षस, अग्नीमय दरी, अशा देवड्या ज्यांना जादुई किमयाविना पार करणे अशक्य आहे; आणि एका अशुभदर्शक नावाड्यास तोंड द्यावे लागते ज्याच्या हल्ल्यास केवळ जादूने उधळता येते.”

इण्डो-इराणी धर्माने मरणोत्तर शिक्षेबाबत विविध विश्‍वास राखलेले होते. हिंदू धर्मभावनेविषयी फ्रेंच एन्सायक्लोपिडिआ युनिव्हर्सालिस्‌ (विश्‍व शब्दकोश) म्हणतोः “हिंदूंच्या कल्पनेनुसार २१ प्रकारच्या नरकांचे विविध रुपातील वर्णन सापडते. पापी लोकांना जंगली श्‍वापदे तसेच सर्प गिळतात; कष्टदायक रितीने भाजतात; करवतीने तुकडे करतात, भूक व तहानेने छळतात, कढत तेलात टाकतात किंवा लोखंडी तसेच दगडी उखळीत कुटून चूर्ण केले जाते.”

जैन व बुद्ध या दोन पंथात नरकाविषयीच्या स्वकल्पना आहेत. येथे निगरगट्ट पाप्यांना छळले जाते. इराण किंवा पर्शियात ज्याची स्थापना झाली तो झोरोस्ट्रीयन पंथही नरक मानतो, पण तो थंडगार, कुजका व श्‍वासामुळे दुर्गंधमय वातावरणाचा आहे, येथे पापी जिवांना छळले जाते.

ही लक्षवेधी गोष्ट आहे की, मिसरी, हिंदू, जैन, बुद्ध तसेच झोरोस्ट्रीयन पंथांच्या नरकाच्या यातना सार्वकालिक असल्याचे दिसत नाही. कारण या धर्मांच्या मते ठराविक काळाच्या यातना, छळानंतर पाप्यांचे आत्मे, मानवी दैवघटनेच्या धार्मिक कल्पनेनुसार, कोणा इतर स्थळी किंवा स्थितीत स्थलांतरीत होतात. त्यांची नरकाविषयीची ही कल्पना कॅथोलिकांच्या परगेटरीसोबत सदृश्‍य असल्याची दिसते.

ग्रीक, एट्रुस्कन व रोमी नरक

प्राचीन ग्रीक लोक जीव बचावून राहतो हा विश्‍वास ठेवून होते. (सायके हा शब्द फुलपाखरूसाठीही वापरीत). ते हेडिज याला मृतांचे क्षेत्र मानीत आणि यावर याच नावाच्या देवाची सत्ता आहे असे मानत. सॉलोमन रेनॅच हे फ्रेंच प्रामाण्य आपल्या ओरफेस—ए जनरल हिस्ट्री ऑफ रिलिजन या पुस्तकात ग्रीक लोकांविषयी लिहितातः “हा विश्‍वास चोहोकडे पसरलेला होता की, तो (जीव) चारोन नावाड्याच्या नावेतून स्टायक्स नदी पार करुन पलिकडे अग्नीकुंडात प्रवेश करतो. त्या मृत जिवाच्या तोंडात एक ओबोलास (नाणे) असते जे त्या प्रवासाचे भाडे म्हणून दिलेले असते. तेथे अग्नीकुंडात तीन न्यायधीश सामोरे येतात. . . . मग जर त्याच्या अपराधामुळे गुन्हेगार ठरला तर त्याला टार्टरसमध्ये टाकले जाते. ग्रीक लोकांनी तर लिंबोचाही शोध लावला, जे मृत अर्भकाकरता निवासस्थान असावे; आणि परगेटरी, जेथे जिवांचे शुद्धीकरणासाठी साधी शिक्षा दिली जाते.” द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिआनुसार जे जिवात्मे टार्टरसमध्ये शेवटी प्रवेश करतात अशांना “कायम यातना भोगत तेथे राहावे लागते.”

इटलीमध्ये एट्रुस्कॅन नावाचे लोक आहेत, यांची संस्कृती रोमी लोकांच्या आधीची आहे, तेही मरणोत्तर शिक्षेवर विश्‍वास ठेवून आहेत. डिक्शनरे देस रिलिजन्स (धर्मांचा शब्दकोष) म्हणतेः “एट्रुस्कॅन आपल्या मृतांची जी एवढी काळजी घेतात ती त्यांच्या धर्मभावनेद्वारा व्यक्‍त होते. बाबेली लोकांप्रमाणे तेही या स्थळांबद्दल, मृतांच्या आत्म्यांना (मेनस्‌ना) छळणारी व निराश करणारी, अशी समज बाळगतात. त्यांच्या आप्तांनी भरपाईदाखल अर्पणे वाहावी हीच त्यांना सुटकेची गोष्ट ठरेल.” आणखी एक संदर्भ लिखाण सांगतेः “एट्रुस्कन लोकांच्या कबरांवर जी भयानक दृश्‍ये खोदलेली आहेत ती ख्रिश्‍चनांनी रंगविलेल्या नरकाच्या देखाव्यांची प्रेरक असावीत.”

रोमी लोकांनी एट्रुस्कन नरकाचा स्वीकार केलेला आहे व त्याला ऑरकस किंवा इनर्फनस्‌ म्हणतात. त्यांनी ग्रीक अधोलोकाचा राजा हेडिज याच्या दंतकथेला उचलून घेऊन त्याला ऑरकस किंवा प्लुटो असे म्हटले.

यहुदी लोक व इब्री शास्त्रवचने

येशूच्या काळाआधी हयात राहिलेल्या यहुद्यांविषयी काय? यांच्याविषयी एन्सायक्लोपिडिआ ब्रिटेनिका (१९७०) या ज्ञानकोशात असे वाचावयास मिळतेः “इ.स.पू. च्या ५व्या शतकापासून पुढील बराच काळ यहुदी लोक पर्शियन व ग्रीक लोकांच्या निकटसंबंधात होते, दोघांचे विचार मिळतेजुळते होते. . . . ख्रिस्ताच्या काळापर्यंत यहुद्यांनी हा विश्‍वास संपादला होता की दुष्ट जिवात्म्यांना मरणानंतर गेहेन्‍नाची शिक्षा होईल.” तरीपण, एन्सायक्लोपिडिआ जुडाईका म्हणतोः “गेहेन्‍नाची ही नंतर आलेली कल्पना शास्त्रवचनात कोठेही आढळत नाही.”

हे नंतरचे विधान बरोबर आहे. मरणानंतर जिवात्म्यास अग्नीनरकात शिक्षेस्तव टाकले जाते, अशी सूचना इब्री शास्त्रवचनात कोठेही सापडत नाही. ही भयसूचित शिकवण पवित्र शास्त्रातून नसून ती महाजलप्रलयानंतरच्या बाबेलोनी धर्मातून आहे. ख्रिस्ती धर्मजगतातील शिकवण सुरवातीच्या बाबेली उगमापासून आहे. कॅथोलिक पंथातील परगेटरीतील सुधारक कष्ट यातना, ही कल्पनाही सुरवातीच्या मिसरी तसेच पौर्वात्य धर्मशिकवणूकींकडे मागे वाटचाल करविते. लिंबो ही कल्पना ग्रीक दंतकथाची नक्कल आहे. मृतांसाठी प्रार्थना व अर्पणे वाहण्याची पद्धत एट्रुस्कन अनुसरीत.

पण, मरणानंतर जाणीवपूर्वक शिक्षा भोगण्याच्या शिकवणींचा मूळ आधार कोठून असल्याचे आढळते?

[तळटीपा]

a मॅक्लीनटॉक व स्ट्राँग यांचा सायक्लोपिडिआ ऑफ बिब्लिकल, थिऑलॉजिकल, ॲण्ड एक्लेसियास्टीकल लिटरेचर, खंड ४, पृष्ठ १६५.

[५ पानांवरील चित्रं]

डान्टेच्या “इन्फर्नो” मध्ये स्टायक्स नदी पार करण्याचे केलेले वर्णन

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा