वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 ६/१ पृ. ३-७
  • मोठी बाबेल पडली, तिचा न्याय करण्यात आला

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मोठी बाबेल पडली, तिचा न्याय करण्यात आला
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बाबेल पडली पण नष्ट झाली नाही
  • मोठी बाबेल पडते
  • बाबेलचा क्षयास जात असलेला जम
  • बाबेल—तिचा का न्याय झाला
  • आम्ही काय करावे?
  • मोठी नगरी उजाड झाली
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
  • कुप्रसिद्ध “वेश्‍या” तिचे पतन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • बाबेलोन—खोट्या उपासनेचे केंद्र
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • “मोठी बाबेल” कोण आहे?
    बायबल नेमके काय शिकवते?
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 ६/१ पृ. ३-७

मोठी बाबेल पडली, तिचा न्याय करण्यात आला

“तीपडली, मोठी बाबेल पडली, तिने आपल्या जारकर्माबद्दल क्रोधरुपी द्राक्षारस सर्व राष्ट्रांना पिण्यास लाविला!” “मोठी बाबेल पडली, ती भूतांची वस्ती व सर्व प्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय व सर्व प्रकारच्या अशुद्ध व ओंगळ पाखरांचा आश्रय अशी झाली आहे!”—प्रकटीकरण १४:८; १८:२.

केवढा धक्कादायक भविष्यवाद! “मोठी बाबेल पडली!” या विधानाने पवित्र शास्त्राच्या विद्यार्थ्यांमध्ये कित्येक शतकापासून मोठे कुतूहल निर्माण केले होते. पण हे तुम्हाला इतके आस्थेचे का वाटावे? कारण पवित्र शास्त्र भविष्यवादानुसार मोठ्या बाबेलला लाभणारी कर्मगति ही लवकरच मानवजातीस ग्रासून टाकणार आहे. या मासिकाच्या एप्रिल व मे अंकात आम्ही पाहिल्यानुसार या जम बसविणाऱ्‍या वेश्‍येची ओळख, सैतानाचे खोट्या धर्माचे जगव्याप्त साम्राज्य अशी देण्यात आली आहे.a

पण कोणत्या अर्थी ती पडली व केव्हा?

बाबेल पडली पण नष्ट झाली नाही

मोठ्या बाबेलच्या पतनाची संपूर्ण अर्थसूचकता समजून घेण्यासाठी प्रथमतः मागे इ. स. पू. ५३९ मध्ये प्राचीन बाबेल पडले तेव्हा काय घडले ते जाणून घेतले पाहिजे. त्यावेळेपावेतो देवाचे लोक इस्राएल जवळजवळ ७० वर्षे बंदिवासात होते. आता ते त्यांच्या संदेष्ट्यांच्या लिखाणानुरुप मुक्‍ततेची अपेक्षा धरुन होते. (यिर्मया २५:११, १२; २९:१०) जेव्हा पारसाचा राजा कोरेश याने बाबेलला पराजित केले व यहुद्यांना त्यांचे पवित्र नगर यरुशलेम येथे परतण्यास बंधमुक्‍त केले तेव्हा ते लोक किती हर्षित झाले असावेत बरे!—यशया ४५:१-४.

वस्तुतः यहुद्यांवर असणारे बाबेलचे वर्चस्व मोडून टाकण्यात आले होते तरी याचा अर्थ प्राचीन बाबेल नष्ट झाली असा नव्हता. इतिहासकार जोअन ओॲटस तिच्या बाबेलोन या पुस्तकात लिहितेः “कोरेशने बाबेलमध्ये विजयी प्रवेश मिळविला, लूट करण्यास मज्जाव केला आणि पारसाचा प्रांताधिकारी नेमला; धार्मिक संस्था व मुलकी व्यवस्थापनास सुव्यस्थित जोडले. . . . खरे तर, पारसाच्या सत्तेखाली बाबेलातील नागरिकांचे जीवन वरकरणी पाहता किंचितच बदलले गेले. धार्मिक जीवन टिकले गेले आणि व्यापार समृद्ध झाले.” अशाप्रकारे बाबेलचे पतन घडले होते तरी तिचे कार्यवहन चालूच राहिले; यात केवळ एक फरक घडून आला होता तो हा की, देवाचे लोक इस्राएल पुढे त्याच्या बंदीत राहिले नाही. त्यांनी यरुशलेमास परत येऊन खऱ्‍या भक्‍तीची पुनर्स्थापना केली.

साधारण इ. स. पू. ३३१ च्या सुमाराला थोर सिकंदर बादशहाने बाबेलात प्रवेश केला तेव्हा त्याचे तेथील नागरिकांनी भव्य स्वागत केले. बाबेलला आपल्या साम्राज्याची पूर्वेकडील राजधानी करण्याची इच्छा त्याने मनी बाळगली, पण ही महत्वाकांक्षा पूर्ण होण्याआधीच त्याला मृत्यु आला. याकरवी हेच दिसते की, इतक्या लांब काळापर्यंत बाबेल समृद्ध होते.

अशाप्रकारे इ. स. पू. ५३९ मध्ये बाबेलचे झालेले पतन याचा अर्थ ते अस्तित्त्वविरहित झाले असा नव्हता. पुढे काही शतके त्याने आपले अस्तित्त्व टिकवून धरले. तर मग, हेच, मोठ्या बाबेलच्या अनुषंगाने असणाऱ्‍या भविष्यवादांच्या बाबतीत कसे प्रतिबिंबीत होते?

मोठी बाबेल पडते

याची समांतरता लाक्षणिक मोठी बाबेल, जे खोट्या धर्मांचे जगव्याप्त साम्राज्य आहे त्यात दिसते. २० व्या शतकाच्या सुरुवातीस म्हणजे १९१९ च्या सुमाराला सध्याच्या यहोवाच्या साक्षीदारांना पण त्याकाळी पवित्र शास्त्र विद्यार्थी या नावाने ओळखल्या जाणाऱ्‍यांना खोट्या धर्माच्या चालीरिती व कल्पना यांच्या आध्यात्मिक बंदिवासातून मुक्‍त व्हावयाचे होते. त्रैकत्व व अमर आत्मा अशा खोट्या शिकवणूकीस धिक्कारले होते तरी ते अद्याप बाबेलच्या काही चालीरितीने दूषित होते. कित्येकांनी कीर्ती वाढविण्यात स्वधार्मिकतेची मनोवृत्ती वाढविली होती. काहींनी प्राणिमात्रास उंचाविले, तर काहींनी चार्लस्‌ टी रसेल या वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीच्या पहिल्या अध्यक्षांवर आपले लक्ष केंद्रित ठेवून व्यक्‍तीवादी मतप्रणाली निर्माण केली होती. पवित्र शास्त्राचा कोणताहि आधार नसताना ते वाढदिवस व नाताळ पाळीत होते. त्यांच्या विचारसरणीत क्रुस हा अग्रभागीच होता. एवढेच काय पण काही तर क्रुस व मुगुट याचे चित्र असलेले कार्ड परिधान करीत तर इतर ख्रिस्ती धर्मराज्यात आदराचे स्थान मिळविण्याची खटपट करीत होते. पण, रसेल यांच्या मृत्युनंतर १९१७ मध्ये अर्थभरीत परिवर्तन घडण्यास सुरुवात झाली.

त्या वर्षी वॉचटावर संस्थेने द फिनिश्‍ड मिस्ट्री या शिर्षकावर आधारीत प्रकटीकरण पुस्तकाचे स्पष्टीकरण प्रसिद्ध केले. या पुस्तकात ख्रिस्ती धर्मराज्याच्या धर्मगुरुंचा व ते त्यावेळी युरोपात सुरु असलेल्या महायुद्धात जो हस्तक्षेप करुन होते त्याचा मुखवटा दूर सारण्यात आला. यावेळी काही प्रॉटेस्टंट पाळक, जे मोठ्या बाबेलच्या कॅनडातील प्रतिनिधींशी संलग्न होते त्यांनी या पुस्तकातील काही अवतरणे आपल्या राजकीय सवंगड्यांकडे नेली आणि पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांना राजद्रोही या अर्थी ठपका ठेवला. मग, फेब्रुवारी १२, १९१८ रोजी कॅनडात वॉचटावर संस्थेवर बंदी घालण्यात आली.

अमेरिकेतील धर्मगुरु कॅनडातील आपल्या बंधूंचे उदाहरण अनुसरण्यात धिमे राहिले नाहीत. काही दिवसातच वॉचटावरची पवित्र शास्त्र आधारित प्रकाशने लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया येथे जप्त करण्यात आली. त्यानंतर मे १९१८ मध्ये वॉचटावर संस्थेचे नवे अध्यक्ष जे. एफ. रदरफोर्ड व वॉचटावरच्या इतर सात सदस्यांना धरपकडीचे वॉरंट काढण्यात आले. जूनमध्ये तातडीने या ख्रिस्ती माणसांना न्यायालयापुढे आणण्यात आले व दोषी ठरविले गेले. सात जणांना २० वर्षे तर एकास १० वर्षे तरुंगवासाची शिक्षा देण्यात आली. धर्मगुरुंची याविषयीची प्रतिक्रिया काय होती? मॉडर्न अमेरिकन रिलिजनः द आयरोनी ऑफ इट ऑल या पुस्तकात मार्टीन मार्टी म्हणतातः “धर्मगुरु रसेलपंथीयांविरुद्ध [नंतर ओळखण्यात येणारे यहोवाचे साक्षीदार] खवळले; त्यांना यहोवाच्या साक्षीदारांच्या पुढाऱ्‍यांवर वीस वर्षांची तुरुंगवासाची ठोठावण्यात आलेली शिक्षा ऐकून मोठा हर्ष झाला.” मोठ्या बाबेलचे प्रतिनिधी हसत होते. पण आपले हे हसू अल्पकालीन आहे व ते विरुद्ध बाजूस असणारा पक्ष हसू लागेल तेव्हा विरजेल याची त्यांना त्यावेळी कल्पना आली नाही.

अशाप्रकारे बाबेलचे लाक्षणिक दास्यत्व काही यहोवाच्या लोकांसाठी १९१८ मध्ये खरोखरीचा तुरुंगवास ठरले. अमेरिका, कॅनडा आणि इतर देशात पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांविरुद्ध छळाची लाट उसळली गेली. राष्ट्रीयवादी धर्मपुढाऱ्‍यांनी जमाव एकत्र करुन त्यांना शहराबाहेर हाकून देण्याचा प्रयत्न चालविला. पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांना त्यांनी खेचले व सोट्यांनी झोडपले. या अल्प प्रांजळ ख्रिस्तीजनांच्या बाबतीत अन्यायाचा लांच्छनास्पद अहवाल घडविला गेला.b

यानंतर १९१९ मध्ये बाजू अनपेक्षितरित्या उलटली. नोव्हेंबर १९१८ मध्ये महायुद्ध संपले. वॉचटावर संस्थेच्या पदाधिकाऱ्‍यांविरुद्ध ठोठावलेली शिक्षा न्यायाचा अपभ्रंश आहे या अर्थाने अपील करण्यात आले. यावेळी रदरफोर्ड व त्यांच्या सहकाऱ्‍यांची तुरुंगातून मुक्‍तता झाली तेव्हा धार्मिक वैऱ्‍यांची मान खाली पडली. मार्टीने म्हटले त्याप्रमाणेः “कर्मठ चर्च सदस्यात कसलाहि हर्षनाद दिसला नाही.” काही काळातच लावण्यात आलेले सर्व आरोप पूर्णपणे खोडून टाकण्यात आले. वाईट ग्रह राखणारे कॅथोलिक न्यायाधीश मार्टीन टी. मानटोन यांनी आठ साक्षीदारांचा जामीन नाकारुन त्यांना नऊ महिन्यासाठी अन्यायी तुरुंगवास दिला. या न्यायाधीशांना नंतर पोप पायस ११ वे यांनी “नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ सेंट ग्रेगरी द ग्रेट” हा किताब दिला. पण याच न्यायाधिशांना १९३९ मध्ये लाच घेण्याच्या कारणामुळे तुरुंगात जावे लागले तेव्हा त्यांचे पितळ उघडे झाले.

१९१९ मध्ये तरुंगातून सुटका झाल्यावर रदरफोर्ड व त्यांचे सहकारी वॉचटावर संस्थेच्या ब्रुकलिन येथील मुख्य दप्तरी परतले. ते यानंतर, जगाला तेव्हापर्यंत कल्पना येऊ शकली नाही त्या भव्य राज्य प्रचारकार्याच्या मोहीमेस संघटित करण्यात गुंतले. पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांनी आता मनुष्य भयाच्या बेड्या तोडल्या होत्या व आपण आता सर्व खोट्या धर्माच्या बाबतीत कोठे आहोत हे त्यांना स्पष्टरित्या दिसले. आता मोठी बाबेल त्यांचा निष्ठुर शत्रु बनली होती व तिचे झालेले पतन उघड करावयाचे होते. सर्व राष्ट्रांत खरी भक्‍ती पुनर्स्थापित करायची होती.

त्या निडर ख्रिस्तीजनांनी आपले घरोघरचे उपाध्यपण तीव्र केले. त्यांनी जाहीर मिरवणूका काढून, मोठी पत्रके गळ्यात वागवून खोट्या धर्मास सर्वत्र उघड केले. त्या पत्रकातील अक्षरे अशी होतीः “धर्म हा फास व गलबल्या आहे” व “देव व राजा ख्रिस्ताची सेवा करा.” जसे पुरातन बाबेलमध्ये घडले होते तसेच आताहि खोटा धर्म समृद्ध व कार्यहालचाल करीत राहिला, पण यहोवाच्या साक्षीदारांच्या अनुषंगाने मात्र मोठी बाबेल १९१९ मध्ये पतन पावली. ते बाबेलोनी जोखडातून मुक्‍त झाले होते!

बाबेलचा क्षयास जात असलेला जम

आता ७० वर्षानंतर पृथ्वीवरील पुष्कळ भागात, मोठ्या बाबेलच्या प्रभावाचा ऱ्‍हास होत असल्याचे आम्ही पाहू शकतो. अमेरिकेत दूरचित्रवाणी सुवार्तिक व धार्मिक पुरस्कर्त्यांनी भावनाप्रधान लोकांना चेतविले आहे तेथे धर्म बहरत आहे असे दिसते आहे हे खरे. तथापि, या काही जडवादी भोंदूंचा अलिकडेच मुखवटा दूर करण्यात येऊन त्यांचा कलंक जाहीर झाला आहे. रिपब्लिक कोरियामध्ये ख्रिस्ती राष्ट्रसमूहाची चर्चेस राजकारणात गढून गेलेली दिसत असता धर्म फोफावत असल्याचे दिसते आहे. अशाप्रकारे, मोठी बाबेल जरी “पडली” असली तरी अद्याप कार्यरत आहे.

तथापि, महायुद्ध संपल्यावर कर्मठ धर्माने जर्मन, डेन्मार्क, स्विडन व ब्रिटन या देशात त्याच्या प्रचंड अनुयायांना गमावल्याचे दिसत आहे. इटली, स्पेन आणि फ्रान्स यासारख्या कॅथोलिक देशात सुद्धा रुढीदायक कॅथोलिक पद्धत, पापांची कबुली व मास (विधि) ची उपस्थिती ऱ्‍हास पावत असल्याचे लक्षात आले आहे. पाळकपदासाठी शिक्षण घेणाऱ्‍यांची संख्या कोलमडली आहे. सध्याच्या पोपना, इतिहासात पूर्वी कोणाहि पोपला भासली नव्हती इतका जगभरातील प्रवास करण्याची आज जी गरज भासत आहे तीच चर्च केवढ्या संकटात सापडले आहे त्याचे लक्षण दर्शविणारी आहे.

याशिवाय, १९१७ पासून अधिक समाजवादी देशांनी धर्माला खाली खेचले व त्याचा गत राजकीय प्रभाव झुगारुन दिला. जागतिक स्थरावर पाहता, पारंपारिक धर्म द्वेष व रक्‍तपाताचे पुष्कळसे कारण आहे त्यामुळे कित्येक विचारवंतांनी सर्व धर्म, मग तो पाश्‍चिमात्य असो की पौर्वात्य, त्याला सोडून दिले आहे. होय, मोठी बाबेल ज्या लाक्षणिक पाण्यावर बसली आहे ते पाणी म्हणजे तिच्या नियंत्रणाखाली असणारे लोक आता कमी होत आहेत. मोठ्या बाबेलचा न्याय होत असून तिचा नाश जवळ येऊन ठेपला आहे.—प्रकटीकरण १६:१२; १७:१, १५.

बाबेल—तिचा का न्याय झाला

खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याचा न्याय करण्यासाठी यहोवाकडे कोणता आधार आहे? विविध धर्मांनी शाळा, रुग्णालये व धर्मार्थ कार्ये वाढविली आहेत हे पाहता देव त्याकडे कृपापसंतीनेच पाहणार असे काहीजण खात्रीने म्हणतील. पण यहोवा देव जगाच्या धर्मांवर जो उघड आरोप लावून आहे त्याच्या दृष्टीकोणातून बघता हे सर्व कसे दिसते? याकरता आपण तो आरोप व त्याचप्रमाणे धर्माच्या कारकीर्दीचे परिक्षण करु या.c

“सात वाट्या घेतलेल्या सात देवदूतांपैकी एकजण येऊन माझ्याबरोबर बोलू लागला. तो म्हणालाः ‘इकडे ये, म्हणजे अनेक जलप्रवाहावर बसलेल्या मोठ्या कळवंतिणीचा झालेला न्यायनिवाडा तुला दाखवितो. तिच्याबरोबर पृथ्वीवरील राजांनी जारकर्म केले आणि तिच्या जारकर्मरुपी द्राक्षारसाने पृथ्वीवर राहणारे मस्त झाले.’” (प्रकटीकरण १७:१, २) आमच्या मासिकाच्या एप्रिल व मे अंकात आधीच दाखविण्यात आल्याप्रमाणे, धर्माने राष्ट्रीय सत्ताधीश म्हणजे “पृथ्वीवरील राजे” यांच्यासोबत संगनमताने सबंध इतिहासभर लोकांचा जो घात घडवून आणला आहे त्याची तुलना आपमतलबी व जारकर्मी वेश्‍येसोबत खचितच करता येईल. पण आरोपपत्र पुढे म्हणतेः

“ती स्त्री पवित्र जनांच्या रक्‍ताने व येशूच्या साक्षीच्या रक्‍ताने मस्त झालेली माझ्या दृष्टीस पडली.” “होय, तिच्यामध्ये संदेष्ट्यांचे, पवित्र जनांचे व पृथ्वीवर वधलेल्या सर्वांचे रक्‍त सापडले.” (प्रकटीकरण १७:६; १८:२४) मोठ्या बाबेलवर रक्‍तदोषाचा आरोप लावलाच पाहिजे, कारण तिने शतकानुशतके खऱ्‍या ख्रिश्‍चनांना हुतात्मिक मरण दिले. यात, ज्यांनी पवित्र शास्त्राचे भाषांतर सर्वसामान्य लोकांच्या भाषेत करण्याचा प्रयत्न साधला व शिवाय ज्यांनी स्वतःपाशी पवित्र शास्त्र राखण्याचे व ते वाचन करण्याचे धाडस राखले त्यांचा देखील समावेश आहे. मोठी बाबेल आणखी रक्‍तदोषी आहे ते यासाठी की तिने अलिकडेच नाझी, फॅसिस्ट किंवा इतर हुकुमशहांच्या सत्तेखाली खऱ्‍या ख्रिस्तीजनांना कैदखान्यात व राजकीय बंद्यांच्या कोंडवाड्यात डांबून वधिले. हे लक्षात घ्या की, आरोपपत्रात “पृथ्वीवर वधलेल्या सर्वांचे रक्‍त” असेही म्हणण्यात आले आहे. याचा अर्थ हा की, यात त्या लाखोंचा देखील समावेश आहे ज्यांचे रक्‍त, धार्मिक असल्याचा दावा करणाऱ्‍यांकरवी इतिहासात जी युद्धे लढली गेली त्यात सांडण्यात आले.—पडताळा मत्तय २३:३४-३६; २ तीमथ्य ३:५.

मोठ्या बाबेलचा देव करीत असलेला न्याय तिच्या आणखी एका दोषाचे स्वरुप स्पष्ट करतो. न्याय निवेदन करतोः “सर्व राष्ट्रे तुझ्या चेटकाने ठकविली गेली.” (प्रकटीकरण १८:२३) ही लक्षवेधक गोष्ट आहे की, “चेटके” हा शब्द फार.मा.किया या ग्रीक शब्दाकरवी आला आहे, जो “मुख्यत्वे औषध, गुंगी द्रव्ये, मोहिनी विद्या तसेच विषबाधा, भूतविद्या याचा अर्थ सुचवितो.”d आध्यात्मिकदृष्ट्या पाहता, खोट्या धर्माने राष्ट्रांना दुष्ट शिकवण दिली, खोट्या दैवतांकडे बहकवून त्यांना खोटा विश्‍वास ठेवण्यास लाविले की ज्यामुळे त्यांचे लक्ष यहोवा व विश्‍वसार्वभौमत्वाच्या वादापासून विचलीत केले. जिवाच्या अमरत्वाच्या चुकीच्या शिकवणूकीने खोट्या धर्माने सर्व प्रकारची भूतविद्या व जादूटोणा, मृतांचे भय व पूर्वजांची भक्‍ती यांचा पाया घालण्याकडे निरविले. देवाने मोठ्या बाबेलचा केलेला धिक्कार पूर्णपणे न्याय्य आहे. योहानाने लिहिले त्याप्रमाणे “तिच्या पापांची रास स्वर्गापर्यंत पोहंचली आहे आणि तिची अन्यायाची कृत्ये देवाने लक्षात घेतली आहेत.”—प्रकटीकरण १८:५.

आम्ही काय करावे?

मोठया बाबेलच्या पतित व तिच्या न्याय केलेल्या स्थितीच्या अनुषंगाने बघता, सत्याच्या प्रांजळ भक्‍तांनी आता काय करावे? यशयाने प्राचीन बाबेलच्या अनुरोधाने केलेला भविष्यवाद सध्याच्या खोट्या धर्माच्या बाबतीत अधिक जोरदारपणे लागू पडतोः “निघा, निघा, तेथून निघून जा, अशुद्ध वस्तुला शिवू नका; तिच्यामधून निघून जा. यहोवाची पात्रे वाहणाऱ्‍यांनो, तुम्ही आपणास शुद्ध करा.” (यशया ५२:११) ही तातडीची हाक प्रकटीकरण १८:४ सोबत समरुप आहेः “मग, स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी मी ऐकली, ती म्हणालीः ‘माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापाचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हाला तिच्या पीडातील कोणतीही पीडा होऊ नये म्हणून तिच्यामधून [मोठ्या बाबेलमधून] निघा.’”

होय, खोट्या धर्मासोबतचे सर्व बंध तोडण्याची हीच वेळ आहे. पण, मोठ्या बाबेलमधून बाहेर पडल्यावर आम्ही कोठे जावे? यहोवाच्या खऱ्‍या भक्‍तीकडे, जी त्याच्या साक्षीदारांच्या संगतीत ऐक्याने केली जात आहे. पृथ्वीवरील सर्व राष्ट्रातील लाखो जन आधीपासूनच “यहोवाच्या डोंगरा”कडे झुंडीने येत आहेत. तुम्ही देखील यहोवाच्या साक्षीदारांसोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास करावा व खऱ्‍या भक्‍तीमध्ये येऊन मिळावे असे तुम्हाला निमंत्रण आहे.—यशया २:२-४; ४३:१०-१२.

आता प्रश्‍न राहतो की, मोठी बाबेल पडली व तिचा न्याय करण्यात आला आहे तर ईश्‍वरी आराखड्यानुसार पुढे काय ठाकले आहे? सैतानाच्या खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याचे काय होणार? आमचा यानंतरचा जुलै महिन्याचा अंक या प्रश्‍नांची पवित्र शास्त्र भविष्यवादाच्या एकवाक्यतेत उत्तरे देईल.

[तळटीपा]

a  मोठ्या बाबेलीस राजकीय सत्ता किंवा व्यापार म्हणता येणार नाही कारण ते तिजसाठी शोक करीत असल्याचे दाखविले आहे. (प्रकटीकरण १८:९-११) सैतानाच्या जगीक व्यवस्थीकरणाचा अजून एक प्रमुख भाग धर्म आहे. मोठ्या बाबेलचे भूतविद्येशी असणारे संबंध तिच्या धार्मिक ओळखीस पुष्टी देतात.—प्रकटीकरण १८:२३.

b  या छळाविषयीचा अधिक खुलासा यहोवाच्या साक्षीदारांचे १९७५ चे वार्षिक अहवाल पुस्तक यात पृष्ठे ९४-११९ मध्ये पाहता येईल.

c  या विषयाच्या खुलासेवार विचारविनिमयासाठी रेवलेशन—इटस्‌ ग्रॅण्ड क्लायमॅक्स ॲट हॅण्ड! या प्रकाशनातील २३५-७१ पृष्ठे पहा. हे प्रकाशन १९८८ मध्ये वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क तर्फे प्रकाशित करण्यात आले.

d  डब्ल्यु. ई. वाईन यांचा एक्स्पोझिटरी डिक्शनरी ऑफ न्यू टेस्टमेंट वर्डस्‌, खंड ४, पृष्ठे ५१-२.

[६ पानावरील चौकट]

धर्म आणि नाझी सत्ता

“हिटलरकडे . . . कॅथोलिक उप संस्थानिक म्हणून होता आणि आपल्या कारकिर्दीच्या पहिल्याच दिवसापासून फ्रँझ व्हॉन पेपेन नव्या जर्मन राष्ट्रास कॅथोलिक पंथाने पाठिंबा देण्यास लक्ष वेधवण्याचे उपकरण बनला. जर्मनच्या प्रत्येक भागात पेपेनने लोकांनी हिटलरला मुकाटपणे विश्‍वासू व आज्ञाधारक राहावे असा आजर्व करताना ऐकण्यात येत होते.”

“१९३३ च्या सुरुवातीस पुढील अधिकृत घोषणा कॅथोलिक पदाधिकाऱ्‍यांनी केली व जर्मनीत शिकविली, नंतर [फ्रँझ] व्हॉन पेपेनने मार्गदर्शित केलीः ‘आम्ही जर्मनचे कॅथोलिक, आमच्या संपूर्ण जिवाने व पूर्ण आत्मविश्‍वासाने अडॉल्फ हिटलर व त्याचे सरकार यांच्या पाठीशी उभे राहू. पितृदेशाविषयी असणारे त्यांचे प्रेम, त्यांचे बल व त्यांचा मुत्सद्दीपणा याविषयी आम्हाला विस्मय वाटतो. . . . जर्मन कॅथोलिक . . . यांनी तिसरे जर्मन राष्ट्र बळकट करण्यात क्रियाशील भाग घेतला पाहिजे.’”

फ्रँझ व्हॉन पेपेन हे ते जर्मनीत सेवा करीत असलेले नाझी सरकार आणि रोममधील व्हॅटिकन यांच्यात समेट साधण्याचे उपकरण बनले. या करारावर जुलै २०, १९३३ रोजी स्वाक्षऱ्‍या झाल्या. एका खास सरकारी बातमीपत्राने म्हटलेः “कार्डिनल व राज्याचे सचिव पेसेली [नंतरचे पोप पायस १२ वे] यांनी आज उप संस्थानिक व्हॉन पेपेन यांना द ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ पायस हा किताब बहाल केला . . . उप संस्थानिक व्हॉन पेपेन यांनी कार्डिनल व राज्याचे सचिव यांना जर्मन सरकारचे पांढऱ्‍या चिनी मातीचे स्मृतिचिन्ह बक्षिस दिले. . . . सर्व बक्षिसे या समर्पितास भूषवून होतीः ‘१९३३ च्या जर्मन साम्राज्याच्या समेटाचे स्मृतिचिन्ह.’”—सर्व अवतरणे फ्रँझ व्हॉन पेपेन—हीज लाईफ ॲण्ड टाईम्स या एच. डब्ल्यु. ब्लडरायान यांच्या पुस्तकातून आहेत.

[७ पानांवरील चित्रं]

बाबेल इ. स. पू. ५३९ मध्ये पडले तरीही ते कित्येक शतके एक शहर या अर्थी कार्यान्वित राहिले

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा