शास्त्रवचनामधील धडेः नहूम १:१-३:१९
देव सूड घेतो तेव्हा तारण शक्य होते
“थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल.” (स्तोत्रसंहिता ३७:१०) या शब्दांची पूर्णता नक्कीच होणार असे नहूम व हबक्कूक ही पवित्र शास्त्रातील पुस्तके जोर देऊन सांगतात. या धैर्यवान गृहस्थांनी त्यांच्या भविष्यवादाचे लिखाण यहुद्यांच्या राज्यकाळात इ. स. पूर्वीच्या सातव्या शकाच्या उत्तरार्धात लिहून पुरे केले.
प्रथम, नहूमद्वारे देवाकडील जे भविष्यवाद घोषित झाले त्यांना विचारात घेऊ. यात कोणते बोध आहेत ते पाहू.
देवाकडील सूड घेणे नक्की
यहोवास एकनिष्ठ भक्तीची अपेक्षा आहे. (निर्गम २०:५) अश्शुरची राजधानी निनवे विरुद्धच्या घोषणेत नहूमने हे स्पष्ट केले की जे शत्रू त्याला अशी भक्ती सादर करीत नाहीत अशांचा सूड घेतला जाईल. कारण त्याच्यापुढे पर्वत कंपायमान होतात व डोंगर विरघळतात, आणि पृथ्वी थडथड उडते. त्याच्या क्रोधाच्या संतापापुढे कोण उभा राहणार?—१:१-६.
आम्ही यहोवावर शरणदुर्ग म्हणून भाव ठेवू शकतो. होय, जे सर्व परमेश्वराचा आश्रय घेतात अशांना तो सुरक्षित ठेवतो. त्याच्या शत्रूंचे समूळ उच्चाटन झाल्यावर विपत्ति दुसऱ्यांदा येणार नाही. यहुदाकरता हा शुभसंदेश आहे की खऱ्या भक्तीत खंड पडणार नाही.—१:७-२:२.
अधार्मिकास यशप्राप्ती नाही. निनवेबाबत जे काही घडले त्यावरुन हे सिद्ध झाले. तिने गुलामांना ज्या क्रुरतेने वागविले, त्यामुळे ती “रक्तपाती नगरी” बनली होती. सिंहाच्या गुहेप्रमाणे भक्कम वेशीमागील ही शस्त्रसिद्ध नगरी सुरक्षित वाटत होती. पण देवाकडील न्यायदंडास अनुसरुन निनवे नाईल नदीच्या काठावरील नो-आमोन किंवा थेबच्या गतीने नाशास जाणार. तिजमधील पापामुळे अश्शुरची ही राजधानी उजाड होईल. या भविष्यवादांची पूर्णता जेव्हा बाबेलचा राजा नबो पोलासर आणि मेदचा झायझरेस यांच्या संयुक्त सेनेने निनवे इ. स. पू. ६३२ मध्ये हस्तगत केली त्यावेळी झाली.—२:३-३:१९.
शास्त्रवचनामधील धडेः हबक्कूक १:१—३:१९
हबक्कूकने हे जाणले की यहोवा आपल्या नेमलेल्या वेळी क्रुर विरोधकांच्या विरुद्ध हालचाल करील. पण, ‘धार्मिक तर आपल्या विश्वासूपणाने वाचेल.’ (२:४) तथापि, या भविष्यवादातून आपण आणखी कोणते धडे शिकू शकतो?
विश्वास राखणाऱ्यांना तारणप्राप्ती
यहोवा आपल्या सेवकांच्या विनवण्यांकडे कान देतो. हबक्कूक विचारतोः “हे यहोवा, मी किती वेळ [मदतीकरता] ओरडू? तू ऐकत नाहीस.” होय, न्याय राहिलेला नाही, आणि धार्मिकांना दुर्जन घेरीत असतात. पण देव ऐकत असतो व शिक्षेचे उपकरण म्हणून तो “खास्द्यांची उठावणी” करतो. तरी कोणा युद्धपिपासू शक्तीचा तो कसा उपयोग करील? संदेष्टा वाग्दंडाची अपेक्षा धरुन देवाकडील उत्तराची वाट पाहतो.—१:१-२:१.
केवळ धार्मिक व विश्वासूजन जिवंत राहतील. याचीच हमी, यहोवा हबक्कूकला देतो. विलंब लागत आहे असे दिसत असले तरी देवाच्या नेमलेल्या वेळी भविष्यवादित दृष्टांत “शेवटास जाण्याचा आपणच नेट” करील. राष्ट्रांना लुटणारा व गर्वाने फुगलेला शत्रू आपले ध्येय गाठू शकणार नाही. खास्द्यांना शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही हे तितकेच खरे.—२:२-५.
दुष्कर्म्यांचा धिक्कार असो
अधर्माची मिळकत, हिंसाचार आणि मूर्तिपूजा टाळा. का बरे? कारण, आपला माल नव्हे तरी तो बळकावून वाढवीत राहणे, कुमार्गाने कमाई करणे, रक्तपात करुन शहर उभारणे, हिंसक वृत्तीने इतरांना अपमानकारक पराजयाचे घोट पाजणे, आणि निर्जिव मूर्तींवर आपली भिस्त ठेवणे अशांवर अनर्थ नक्कीच ओढवणार. अशांच्या कृत्यांचा देव नायनाट करील. सबंध पृथ्वीला यहोवाच्या गौरवाची ओळख दिली जाईल; कारण त्याच्यापुढेच सर्वांनी स्तब्ध उभे राहिले पाहिजे.—२:६-२०.
तारणाकरिता यहोवावर धीराने विसंबून राहा. आपल्या प्रार्थनेत हबक्कूक देवाच्या सामर्थ्याच्या गतकालीन उदाहरणांची आठवण काढतो. त्यात, यहोवा पृथ्वीच्या मध्यभागातून चालत आहे व आपल्या क्रोधाने राष्ट्रांना तुडवीत आहे. तो आपल्या लोकांच्या तारणार्थ पुढे जात आहे. यामुळे भयचकित होऊन, हबक्कूक ‘त्या संकटाच्या दिवसाची शांतपणे वाट पाहण्याचे ठरवितो.’ कठीण काळास तोंड द्यावे लागले तरीही तो यहोवाठायी हर्ष पावेल आणि स्वतःला तारण देणाऱ्या देवाविषयी तो नित्य उल्लास करीत राहील.—३:१-१९.
[३१ पानावरील चौकट]
पवित्र शास्त्र वचनांचे परिक्षण
● १:४—बाशान, कर्मेल व लबानोन ही सुंदर, सुपीक व फलदायी स्थळे होती. त्यांनी शुष्क होणे म्हणजे जे त्यांच्यावर आश्रित होते त्यांच्याकरिता शोकांतिकेचा उव्वाच होता. हे, त्यांच्यावर यहोवाकडून येणाऱ्या क्रोधाच्या तीव्रतेची जाणीव देईल.
● १:१०—निनवे स्वतःला काटेरी झुडपाच्या गुंतावळी समान अभेद्य समजे, आणि तिने आपल्या महत्वाकांक्षेचा प्याला प्राशन केला होता; तरी वाळलेल्या धसकटाप्रमाणे ती भस्म होईल. याचप्रमाणे आधुनिक काळातील देवाच्या लोकांचे जे शत्रू ते यहोवाच्या क्रोधरुपी न्यायदंडापासून स्वतःला वाचवू शकणार नाहीत.
● २:६—निनवेवरील हल्ल्याचे वेळी मुसळधार पाऊस कोसळत होता म्हणून तैग्रीस नदीला पूर आला होता. यामुळे शहराचा एक भाग व वेशीचा एक भाग कोसळला होता. यामुळेच चढाई करणाऱ्यांना अश्शुरची राजधानी काबीज करणे सोपे गेले.
● २:११-१३—हिंस्र पशुसमान अश्शुऱ्यांनी प्रतिहल्ला चढविला व राष्ट्रांना आपले भक्ष्य बनविले. सिंह हा राष्ट्राचे द्योतक होता. निनवेच्या अवशेषात सिंहाचे अनेक पुतळे सापडले.
● ३:३, ४—एखाद्या वेश्येसमान निनवेने राष्ट्रांना मैत्रीकरता आणि मदतीसाठी गुळगुळीत बोलणी केली. पण ज्यांना या प्रकारच्या सापळ्यात जखडले होते त्यांना लवकरच तिच्या जुलमी जोखडांचा अनुभव आला, जो यहुद्यांचा राजा अहज्याबाबत दिसला.—२ इतिहास २८:१६, २०, २१.
[३२ पानावरील चौकट]
पवित्र शास्त्र वचनांचे परिक्षण
● १:२-४—यहोवा हा अधर्म सहन न करणारा देव आहे असा विश्वास असल्यामुळेच हबक्कूक त्याला हे विचारण्याचे धाडस करतो की त्याने दुष्टाईला का राहू दिले. आपल्या विचारात स्थिरस्थावरता आणण्यास तो तयार होता. (२:१) काही विशिष्ट गोष्टींना का मुभा दिली जाते याचे आम्हाला नवल वाटत असते तेव्हा यहोवाच्या नीतीमत्तेवरील आमच्या विश्वासाने आमचा समतोलपणा टिकविण्यात व त्याजवर विसंबून राहण्यात सहाय्य केले पाहिजे.—स्तोत्रसंहिता ४२:५, ११.
● २:५—बाबेलने एका संयुक्त माणसाप्रमाणे आपल्या युद्ध साहित्यांचा वापर करुन राष्ट्रांना जिंकले. कधी तृप्त न होणाऱ्या शिओल व मृत्युप्रमाणेच त्याने अधिक युद्ध मोहिमांची इच्छा धरली. (नीतीसूत्रे ३०:१५, १६ पडताळा.) जणूकाही मद्यप्राशनाच्या अतिरेकीने धुंद झाल्याप्रमाणे त्याला विजयाचा गर्व चढला. पण जेव्हा बाबेलचे इ. स. पू. ५३९ मध्ये पतन घडले तेव्हा त्याची युद्धे जिंकण्याची मेढी शमली.
● ३:१३—देवाठायी सुटका प्रदान करण्याचे जे सामर्थ्य आहे त्याचा त्याच्या निवडलेल्या व अभिषिक्त लोकांना म्हणजे इस्राएल राष्ट्राला वेळोवेळी अनुभव आला. (स्तोत्रसंहिता २८:८, ९) अनुकूल वेळी त्या राष्ट्राने मशीहा या देवाच्या स्वर्गीय “स्त्री”च्या “संताना”ला निपजविले. (उत्पत्ती ३:१५) याप्रमाणे, त्या “संताना”च्या शेष सदस्यांना म्हणजे आत्म्याने अभिषिक्त असणाऱ्या येशूच्या शिष्यांना यहोवा, सैतानाच्या व राष्ट्रांच्या हल्ल्यापासून वाचवील.—प्रकटीकरण १२:१७.
[३१ पानांवरील चित्रं]
अश्शुरी महालाचे भूगर्भशास्त्रज्ञ ए. एच. लेआर्ड यांनी काढलेले चित्र