वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 ६/१ पृ. ८-९
  • येशू एका विधवेचे दुःख निवारण करतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • येशू एका विधवेचे दुःख निवारण करतो
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • मिळती जुळती माहिती
  • येशू एका विधवेचे दुःख निवारण करतो
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • मरण पावलेल्यांना पुन्हा जिवंत करणारा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • येशूच्या चमत्कारांचे धडे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • येशूने केलेल्या चमत्कारांमधून आपण काय शिकू शकतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 ६/१ पृ. ८-९

येशूचे जीवन व उपाध्यपण

येशू एका विधवेचे दुःख निवारण करतो

शताधिपतीच्या चाकरास बरे केल्यावर येशू कफर्णहूमाच्या नैऋत्येकडे ३२ किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर असणाऱ्‍या नाईन गावाकडे निघतो. त्याच्यासोबत त्याचे शिष्य आणि लोकांचा मोठा समुदायदेखील जातो. संध्याकाळ होत आल्यावर ते नाईनच्या परिसरात येतात त्यावेळी त्यांना एक प्रेतयात्रा जाताना दिसते. एका तरुणाच्या मृत देहाचे दफन करण्यासाठी तो जमाव गावाबाहेर येत असतो.

या मृताच्या आईची स्थिती खरीच शोकदायक बनली आहे कारण ती विधवा आहे व मृत झालेला तिचा एकुलता एक मुलगा आहे. तिचा पति मरण पावल्यावर तिने कदाचित यात सांत्वन मानले असावे की निदान मुलगा तरी तिची काळजी घेईल. याच्यावरच तिने आपल्या आशा, इच्छा आणि मनोकल्पना विसंबून ठेवल्या असतील. पण आता तर तोही गेल्यामुळे सांत्वनाचा आधारच तुटला होता. तिचे दुःख इतके भारी आहे की लोक तिला आधार देत स्मशानभूमीत आणीत आहेत.

येशूची नजर या स्त्रीकडे जाते तेव्हा त्याला तिच्या दुःखाविषयी अत्यंत कळवळा वाटतो. याकरताच, कोमलतेने पण दृढतेने तो तिला म्हणतोः “रडू नको.” त्याच्या या बोलण्यामुळे लोकांचे लक्ष त्याच्याकडे जाते. तो जवळ जाऊन तिरडीस स्पर्श करतो तेव्हा तिरडी वाहणारे थांबतात. आता तो काय करणार याचे सर्वांनाच नवल वाटते.

येशूसोबत आलेल्या लोकांनी त्याला आजाऱ्‍यांना बरे करताना यापूर्वी पाहिले होते. पण कोणा मृताला उठविलेले त्यांनी कदाचित पाहिलेले नसावे. अशी ही गोष्ट तो करु शकेल काय? आता येशू त्या शवाला उद्देशून म्हणतोः “मुला, मी तुला सांगतो, उठ!” आणि तो मुलगा उठून बसला! तो बोलायला देखील लागला! येशूने त्याला त्याच्या आईकडे दिले.

तो तरुण मुलगा खरोखरीच जिवंत झाला आहे हे पाहून लोकांना मोठे आश्‍चर्य वाटते. ते मोठ्या आनंदाने म्हणतातः “आम्हामध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे.” दुसरे म्हणतातः “देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे.” या आश्‍चर्यकारक घटनेची बातमी लगेचच सबंध यहुदिया आणि इतर गावात पसरते.

बाप्तिस्मा करणारा योहान अद्याप तुरुंगात आहे. पण त्याचे शिष्य त्याच्याकडे जाऊन झालेल्या गोष्टीचे वर्तमान त्याला कळवतात. याला योहानाचा काय प्रतिसाद मिळतो? शिवाय, येशू जेथे आपला चमत्कार करुन दाखवितो तेथील लोकांचा काय प्रतिसाद आहे? आमच्या पुढील अंकात याची उत्तरे मिळतील. लूक ७:११-१८.

◆ येशू नाईन गावाजवळ येत असताना काय घडते?

◆ येशूला एकंदरीत परिस्थिती बघून कसे वाटते व तो काय करतो?

◆ येशूने केलेल्या चमत्काराविषयी लोक काय प्रतिसाद दाखवितात?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा