एक गूढ मोठी बाबेल ही वेश्या कोण आहे?
एक स्त्री, कुप्रसिद्ध वेश्या, जिने करोडो लोकांवर आपला जम बसवला, ती ठार झाली आहे, तिचा विनाश झाला आहे. पण ही काही सामान्य हत्या नाही. मग त्यात असामान्य असे ते काय आहे? हत्या घडवून आणणारे एक जनावर आहे, एक श्वापद. ते तिला नग्न करते, तिचे मांस खाते आणि आगीत भस्मसात होण्यास तिला सोडून देते. ही जम बसविणारी स्त्री कोण आहे? आणि ते श्वापद तिजवर का हल्ला करते? तिने असे काय केले आहे की ज्यामुळे तिला एवढा हिंसक नाश मिळाला?a—प्रकटीकरण १७:१६, १७.
हाच त्या गूढ गोष्टीची जिज्ञासा चेतविणारा आधार आहे; पण ते कोणा कादंबरीतील कारस्थान नाही. ती ऐतिहासिक वास्तविकता आहे जी काळाच्या ओघात पूर्ण होत आहे. यात तुम्हीही गोविलेले आहात कारण ही कुप्रसिद्ध वेश्या कदाचित सध्या तुमच्या जीवनावर प्रभाव टाकून असेल. तुमचे तिच्यासोबत राहाणे वा तिजपासून स्वतःला दूर ठेवणे यात तुमच्या जीवन मरणाचा प्रश्न समाविष्ट आहे. तर मग, ती कोण आहे?
या रहस्यमय स्त्रीचे ग्राहक
ही जीवघेणी आकर्षक स्त्री, तसेच निर्लज्जपणे कुकर्म करण्यास सोकावलेली स्त्री, हिचे वर्णन योहानाने प्रकटीकरण या पवित्र शास्त्राच्या भविष्यवादित पुस्तकात केलेले आहे. तेथे आम्ही वाचतोः “मग मी आत्म्याने संचरित झालो असताना [दूताने] मला रानात नेले. तेव्हा देवनिंदात्मक नावांनी भरलेल्या आणि सात डोकी व दहा शिंगे असलेल्या किरमिजी रंगाच्या श्वापदावर बसलेली एक स्त्री माझ्या दृष्टीस पडली. ती स्त्री जांभळी व किरमिजी वस्त्रे ल्यालेली होती; आणि सोने, मूल्यवान रत्ने व मोत्ये यांनी शृंगारलेली होती. तिच्या हातात अमंगळ पदार्थांनी व तिच्या जारकर्माच्या मळाने भरलेला सोन्याचा प्याला होता. तिच्या कपाळावर मोठी बाबेल, कळवंतिणीची व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई हे गूढ नाव लिहिलेले होते.”—प्रकटीकरण १७:३-५.
ही “मोठी बाबेल” मोठी भयानक स्त्री असली पाहिजे, कारण पहिल्याच वचनात असे म्हटले आहे की, ती “अनेक जलप्रवाहावर बसलेली” आहे. याचा काय अर्थ होतो? देवाच्या दूताने योहानास स्पष्ट केलेः “कळवंतीण बसली आहे तेथे जे जलप्रवाह तू पाहिले, ते लोक, जनसमूह, राष्ट्रे व निरनिराळ्या भाषा बोलणारे असे आहेत.” (प्रकटीकरण १७:१५) यात शंकाच नाही की ही जगव्याप्तपणे जम बसविणारी वेश्या आहे. ती सर्वसाधारण वेश्या नाही. ती तर, “कळवंतीणींची आई”, संघटनांची ठेकेदारीण आहे. जारकर्माची घडी येते तेव्हा ती हुकुम सोडते. पण तिचे स्वतःचेही काही गिऱ्हाईक आहेत.
मोठ्या कळवंतीणीचे आवडते गिऱ्हाईक कोण, याची स्पष्टता देवदूत आपणास करतो. तो काय म्हणतो? तो म्हणतो की, मोठ्या बाबेलसोबत “पृथ्वीवरील राजांनी जारकर्म केले आणि तिच्या जारकर्मरुपी द्राक्षारसाने पृथ्वीवर राहणारे मस्त झाले.” (प्रकटीकरण १७:२) ही खरीच मोहक, त्वरेने संबंध जोडणारी वेश्या दिसते, कारण हिने “पृथ्वीवरील राजांना”, जगाच्या राजकीय सत्ताधिशांनाही भुरळ पाडली आहे! तर मग, ती कोण असावी?
दूत म्हणतो की, तिला नाव आहे, गूढ नाव. ते आहेः “मोठी बाबेल.” तर आता तिची ओळख पटण्याचे दोन संकेत आपल्याला मिळाले आहेत—एक तिचे आवडते गिऱ्हाईक आणि दुसरे म्हणजे, मोठी बाबेल हे तिचे नाव. यामुळे आपल्याला कोणता निष्कर्ष मिळतो?
[तळटीपा]
a या गूढ स्त्रीविषयी हे आणि इतर जे प्रश्न उद्भवतात त्याविषयीची चर्चा टेहळणी बुरुजच्या चार अंकात केली जाणार, ज्यापैकीचा हा पहिला आहे.