वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 ४/१ पृ. ४-५
  • मोठ्या वेश्‍येचा मुखवटा काढण्यात येतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मोठ्या वेश्‍येचा मुखवटा काढण्यात येतो
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • युद्धपिपासू बाबेल
  • मोठी बाबेल तिची हत्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • मोठी बाबेल पडली, तिचा न्याय करण्यात आला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • मोठी नगरी उजाड झाली
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
  • बाबेलच्या नाशाबद्दल शोक व उल्लास
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 ४/१ पृ. ४-५

मोठ्या वेश्‍येचा मुखवटा काढण्यात येतो

सैतानाच्या नियंत्रणाखाली असणाऱ्‍या सध्याच्या जागतिक व्यवस्थीकरणात असे तीन घटक आहेत, ज्यांचा “या जगाच्या दैवताने” आपल्या कामास्तव वापर करुन घेतला आहे. ते घटक म्हणजेच, राजकीय सत्ता, मोठमोठाले व्यापारी नियंत्रण व त्यांचा प्रभाव आणि धर्म. हजारो वर्षांचा इतिहास दाखवितो की, हे तीन घटक बहुतेक प्रत्येक राजवटीत सातत्याने अस्तित्वात राहिले आहेत. तर मग, यापैकीचा कोणता शक्‍तीशाली उगम “कळवंतिणींची आई” हिचे प्रतिनिधित्वे करतो बरे?—२ करिंथकर ४:३, ४; प्रकटीकरण १२:९; १७:५.

येथे चर्चेत असणाऱ्‍या योहानाच्या दृष्टांताप्रमाणे राज्यकर्ते म्हणजे “पृथ्वीवरील राजे” अगदी स्वेच्छेने तिच्या जारकर्माच्या अंथरुणावर गेले. (प्रकटीकरण १८:३) (याविषयीचा ऐतिहासिक पुरावा पुढील पानांवर सादर करण्यात येईल.) याकरताच, जगव्याप्त राजकीय सत्ता मोठ्या बाबेलचे बोधचिन्ह ठरु शकणार नाहीत.

मग, मानवाच्या घडामोडीत आज महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्‍या मोठमोठ्या व्यापारांविषयी काय? यांचा आज कित्येक राष्ट्रात खात्रीने शक्‍तीशाली प्रभाव पडलेला आहे व त्यामुळे कोण श्रीमंत व कोण गरीब हे ठरविण्याचे काम व्यापाराने आपल्याकडे घेतले आहे. हा, मोठी बाबेल होऊ शकतो का? या प्रश्‍नाच्या उत्तरासाठी देवदूताने योहानाला एक महत्वपूर्ण असा संकेत दिला. त्याने मोठ्या थरारक घटनेची, बाबेलच्या पतनाची घोषणा केली! ती आपले गिऱ्‍हाईक व चाहते यांना गमावते; आणि यांना ती नावडती वाटते. तिला नियमित भेटी देणाऱ्‍यांमध्ये, “पृथ्वीवरील राजे” सोडता आणखी कोण होते? देवदूत सांगतोः “तिच्या जारकर्माबद्दलचा क्रोधरुपी द्राक्षारस सर्व राष्ट्री प्याली आहेत. पृथ्वीवरील राजांनी तिच्याबरोबर जारकर्म केले व पृथ्वीवरील व्यापारी तिने आपल्या विषयभोगास खर्चिलेल्या द्रव्यबळाने धनवान झाले.” होय, जगाचे व्यापारी यांना तिच्यासोबतच्या खरेदी विक्री व मैत्रीने आणि तिच्या “विषयभोगास खर्चिलेल्या द्रव्यबळाने” फायदा झाला. अशाप्रकारे जागतिक स्थरावरच्या व्यापारास ती प्रतिध्वनित करीत नाही.—प्रकटीकरण १८:३.

याप्रकारे, राजकीय सत्ताधीश व मोठा व्यापारी अधिकार व त्याचा प्रभाव हे त्यात बसत नाहीत, तर मग आता काय मागे राहिले आहे? “सर्व राष्ट्रे तुझ्या चेटकाने ठकविली गेली” या एका सामर्थ्यशाली घटकामुळे मोठ्या बाबेलची ओळख आपल्याला मिळू शकते. एकेकाळी शक्‍तीमान परंतु आता क्षय पावत असणाऱ्‍या या घटकाने पुरातन बाबेलच्या काळापासून आजवर राष्ट्रांची विचारसरणी व हालचाली यावर फारच प्रभाव टाकला आहे. याच घटकाने “पृथ्वीवरील सर्व राजांवर राज्य केले” व तो घटक म्हणजे, खोटा धर्म!—प्रकटीकरण १७:१८; १८:२३.

होय, काही प्रांजळ धार्मिक लोकांना हे धक्कादायक दिसेल, तरी मोठी बाबेल, कळवंतीणीची आई ही उपमा सैतानाच्या खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्यास लागू होते. ती जगाच्या धर्मांचे प्रतिक आहे ज्यांनी या किंवा त्या प्रकाराने राजकीय आणि आर्थिक सत्ताधीश घटकांसोबत संपूर्ण इतिहासात हातमिळवणी केली आहे.

युद्धपिपासू बाबेल

भविष्यवादित दृष्टांतानुसार मोठी बाबेल ही अशी मोठी वेश्‍या आहे जिने राष्ट्रांना, लोकांना व वंशाना रक्‍तसिंचित युद्धे, धर्मयुद्धे, कुटुंबातील सूड भावना यांना मंत्र, पवित्र पाणी, प्रार्थना व भडकवणाऱ्‍या देशभक्‍तीपर भाषणाने निरविले.a—प्रकटीकरण १८:२४.

तिचे धर्मगुरु व खासपणे तिचे धर्मोपदेशक लोकांना दोन महायुद्धे आणि इतर मोठ्या लढाईत महासंख्येने निरविण्यात राजकीय सत्ताधिशांचे स्वेच्छेचे उपकरण झाले. कॅथोलिकांनी कॅथोलिकांना, प्रॉटेस्टंट लोकांनी कर्तव्य तत्परतेने दुर्बल प्रॉटेस्टंटीयांना ठार केले, केवळ दोन महायुद्धात ५० ते ६० दशलक्ष जीव घेण्यात आले.

या प्रज्वलित २० व्या शतकात धर्माच्या परंपरेने द्वेष व मृत्यु यांना प्रसविण्याचे चालू ठेवले—केवळ ख्रिस्ती राष्ट्रसमूहात कॅथोलिकांविरुद्ध प्रॉटेस्टंटांचे नव्हे तर ख्रिस्तेत्तर जगतात देखील इस्लाम-यहुदी, हिंदू-इस्लाम, बुद्ध-हिंदू, शीख-हिंदू आणि इतर.

याचसोबत धर्माने “पृथ्वीच्या राजां”वर प्रबळ वर्चस्व राखण्याची नेहमीच इच्छा धरली होती. त्यांचे अस्तित्व आणि त्यांचे वारस याविषयी निर्णय घेण्याचा पराकाष्ठेचा प्रयत्न ठेवला होता. याविषयीच्या काही उदाहरणांचा आपण परामर्श घेऊ या.

[तळटीपा]

a  “पवित्र” धर्मयुद्धे (१०९६-१२७०), युरोपातील तीस वर्षांचे युद्ध (१६१८-४८), दोन महायुद्धे आणि भारताची फाळणी होताना २,००,००० हिंदू-मुस्लीमांची कत्तल (१९४८) ही धर्माच्या रक्‍तदोषाची काही उदाहरणे आहेत.

[४ पानांवरील चित्रं]

राजकारण, मोठा व्यापार आणि धर्म यापैकी कोण “मोठी बाबेल” हिचे प्रतिनिधित्व करते?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा