वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 ९/१ पृ. १०-१५
  • “हा थोर दिवस आहे”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “हा थोर दिवस आहे”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • चार घोडेस्वार
  • मंदिराचे मोजमापन
  • लहानशी गुंडाळी
  • “मंदिराचं वर्णन करून सांग”
    शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना!
  • यहेज्केल पुस्तकातील ठळक मुद्दे—भाग २
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • देवाच्या मंदिराकडे ‘चित्त लाव!’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • “त्यांस समजेल की मी यहोवा आहे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 ९/१ पृ. १०-१५

“हा थोर दिवस आहे”

“मी आत्म्याने संचरित होऊन प्रभूच्या दिवसात आलो.”—प्रकटीकरण १:१०.

१. आम्ही कोणत्या “दिवसा”मध्ये जगत आहोत व ही गोष्टी एवढी शिरशिरी भरविणारी का आहे?

“हाथोर दिवस आहे. पहा, राजा राज्य करीत आहे!” थरारुन सोडणारे हे उद्‌गार १९२२ मध्ये वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीच्या द्वितीय अध्यक्षांच्या तोंडून निघाले होते. आजही ते आमच्या अंगात शिरशिरी भरवितात. ते सतत आम्हास ही आठवण देत असतात की, आज आम्ही सबंध इतिहासातील अत्यंत खळबळजनक काळात, ज्या काळास पवित्र शास्त्र “प्रभूचा दिवस” असे संबोधिते, त्यात जगत आहोत. (प्रकटीकरण १:१०) हा खरोखरी, “थोर दिवस आहे” कारण हाच तो काळ आहे, ज्यात यहोवा, ख्रिस्तामार्फतच्या राज्याद्वारे आपल्या सर्व गौरवी उद्देशांची पूर्णता करील, आणि आपल्या पवित्र नामास सबंध सृष्टीसमोर पवित्र करील.

२, ३. (अ) प्रभूचा दिवस याची कालमर्यादा केवढी आहे? (ब) या दिवसाबद्दलची माहिती आम्हास कोठे सापडू शकते?

२ या दिवसाची सुरवात १९१४ मध्ये झाली, जेव्हा येशूला देवाच्या राज्याचा राजा म्हणून विधिपूर्वक सिंहासनावर बसविले. हा दिवस हजार वर्षांच्या राज्यकारकीर्दीच्या अंतास संपेल तेव्हा ख्रिस्त ‘त्याच्या देवपित्याला ते राज्य सोपून देईल.’ (१ करिंथकर १५:२४) विश्‍वासू ख्रिश्‍चन अनेक शतके या प्रभूच्या दिवसाची वाट पहात होते. सरतेशेवटी तो आता आलेला आहे! तर हा “थोर दिवस” याचा देवाच्या लोकांकरिता तसेच या एकंदर जगासाठी काय अर्थ होतो?

३ पवित्र शास्त्रातील जे पुस्तक आम्हास प्रभूच्या दिवसाबद्दलची समर्पक माहिती देते ते प्रकटीकरण आहे. या पुस्तकातील बहुतेक सर्व भविष्यवादांची पूर्णता प्रभूच्या दिवसात होत आहे. पण प्रकटीकरण हे, त्या भविष्यवादित पुस्तकांच्या मालिकेतील उच्च बिंदू आहे, जी सर्व त्या दिवसाबद्दल आम्हास माहिती देतात. जशी, यशया, यिर्मया, यहेज्केल आणि दानीएल ही काही इतर पुस्तके आहेत, जी त्याबद्दलची माहिती आम्हास देतात. अनेकदा ते जे काही म्हणतात ते आमचे प्रकटीकरणातील भविष्यवाद अधिक स्पष्टपणे समजविण्यात सहाय्य करतात. आपण पाहू या की, विशेषेकरुन यहेज्केलाचे पुस्तक खासपणे प्रकटीकरणाची जी पूर्णता प्रभूच्या दिवसात होत आहे त्याजवर कसा प्रकाशझोत टाकते.

चार घोडेस्वार

४. प्रकटीकरणाच्या ६ व्या अध्यायानुसार प्रभुच्या दिवसाच्या सुरवातीस काय घडले?

४ उदाहरणार्थ, प्रकटीकरणाच्या सहाव्या अध्यायात, प्रेषित योहान एका नाट्यपूर्ण दृष्टांताचे वर्णन करतोः “मग मी पाहिले तो पांढरा घोडा, आणि त्याजवर बसलेला एक स्वार दृष्टीस पडला. त्याच्याजवळ धनुष्य होते व त्याला मुगूट देण्यात आला; तो जिंकीत व आपला विजय पूर्ण करावयास निघाला.” (प्रकटीकरण ६:२) हा विजयी घोडेस्वार कोण आहे? तो दुसरा कोणी नसून येशू ख्रिस्त आहे, जो देवाच्या सिंहानाधिष्ठ राजा असा आहे व आपल्या शत्रूंवर विजयप्राप्तीकरता घोडदौड करीत आहे. (स्तोत्रसंहिता ४५:३-६; ११०:२) येशूच्या या विजयी घोडदौडीस मागे १९१४ मध्ये, प्रभूच्या दिवसाच्या अगदी सुरवातीला आरंभ झालेला आहे. (स्तोत्रसंहिता २:६) त्याचा पहिला विजय, सैतान व त्याच्या दुरात्म्यांना युद्धात पराजित करुन पृथ्वीच्या आसमंतात टाकण्यातील होता. मानवजातीकरता याचा परिणाम, “पृथ्वी व समुद्र यांवर अनर्थ ओढव”ण्यात दिसला.—प्रकटीकरण १२:७-१२.

५. पांढऱ्‍या घोड्यावरील स्वाराच्या मागोमाग कसल्या उग्र आकृती सामोऱ्‍या आल्या, आणि त्या प्रत्येक आकृतीस कोणते अधिकार देण्यात आले होते?

५ याच दृष्टांतात पुढे तीन उग्र आकृति दिसतातः एक अग्निवर्ण घोडा, जो युद्धाचे चिन्ह होता; काळा घोडा दुष्काळाचे चिन्ह होता; आणि एक फिक्का घोडा होता ज्याच्यावरील स्वाराला “मृत्यु” हे नाव दिलेले होते. या चवथ्या घोड्याबद्दल आपणास असे वाचण्यास मिळतेः “मग मी पाहिले, तो फिक्का घोडा, आणि त्यावर बसलेला एक पुरुष दृष्टीस पडला, त्याचे नाव ‘मृत्यु;’ त्याच्यामागून अधोलोक चालला होता. त्यांना तरवारीने, दुष्काळाने, मरणाने व पृथ्वीवरील श्‍वापदांकडून माणसांना मारण्याचा अधिकार पृथ्वीच्या चवथ्या भागावर दिलेला होता.”—प्रकटीकरण ६:३-८; मत्तय २४:३, ७, ८; लूक २१:१०, ११.

६. या तीन भयानक घोड्यांचा व त्यांजवरील स्वारांचा या भूतलावर कोणकोणता परिणाम दिसला?

६ १९१४ पासून दुष्काळ व रोगराई यांनी मानवाला भयंकर हैराण केल्याचे दिसते म्हणजेच भविष्यवादाची सत्यता पूर्ण झालेली आढळते. पण चवथ्या घोडेस्वाराला तर “पृथ्वीवरील श्‍वापदांकडून माणसांना मारण्याचा अधिकार” आहे. मग, १९१४ पासून लक्षात भरेल अशी ही गोष्ट घडत आहे का? यहेज्केलने दिलेल्या यासारख्याच भविष्यवादास विचारात घेतल्यास भविष्यवादातील हा भाग त्याच्या यथार्थतेत स्पष्ट होईल.

७. (अ) यहेज्केलने यरुशलेमाबद्दल काय भविष्यवाद केला? (ब) या भविष्यवादाची कशी पूर्णता झाली?

७ यरुशलेमाचा इ.स.पूर्वी ६०७ मध्ये नाश होण्याच्या कदाचित पाच वर्षे आधी आपले लिखाण करताना यहेज्केलाने यहुद्यांवर, त्यांच्या अधार्मिकतेमुळे भयानक दंड ओढवणार असल्याचा भविष्यवाद केला. त्याने प्रेरित होऊन लिहिलेः “तर मग, मी तरवार, दुष्काळ, हिंस्त्र पशु व मरी ही माझी चारी उग्र शासने (न्यायदंडाची उपकरणे) यरुशलेमातील मनुष्य व पशु यांचा संहार करण्यास त्यावर पाठवीन.” (यहेज्केल १४:२१; ५:१७) याची त्याकाळी शब्दशः पूर्णता झाली का? यात काय संशय की, शेवट जवळ येत असता यरुशलेमाने दुष्काळ व युद्धे यांच्याकडून अतोनात नुकसान सोसले. दुष्काळामुळे रोगराई पसरली होती. (२ इतिहास ३६:१-३, ६, १३, १७-२१; यिर्मया ५२:४-७; विलापगीत ४:९, १०) त्या काळी पशुंकरवी खरोखरीच्या पीडा गुदरल्या होत्या का? जर यिर्मयानेही त्याबद्दलचा भविष्यवाद केला आहे तर पशुंनी मनुष्यांना उचलून नेणे किंवा मारुन टाकणे यांची अनेक प्रकरणे घडली असावीत.—लेवीय २६:२२-३३; यिर्मया १५:२, ३.

८. प्रभूच्या दिवसात जंगली श्‍वापदांनी आतापर्यंत कोणती भूमिका पार पाडली?

८ मग, आजच्याबद्दल काय? प्रगतिशील देशात, एकेकाळी असलेले पशुंचे भय तितकेसे राहिलेले नाही. तथापि इतर देशात आजही हिंस्त्र पशू आपले सावज वेळोवेळी हेरतात, खासकरुन सर्प व मगर यांनाही “पृथ्वीवरील श्‍वापदात” जर अंतर्भूत केले, तर असे आकस्मिक मृत्यु आंतरराष्ट्रीय स्तरातील वृत्तांत जरी कालांतराने घडत असले तरी ते लक्षात घेण्याजोगे असतात. प्लॅनेट अर्थ्‌—फ्लड नामे पुस्तक भारत व पाकिस्तानात “विषारी सर्पांच्या दंशांनी अनेक मृत्यु” जरी पुरापासून बचावले, तरी घडत असतात, असे म्हणते. इंडिया टुडे नामक मासिक म्हणते की, पश्‍चिम बंगालमध्ये ६० स्त्रियांनी वाघाच्या हल्ल्यात आपल्या पतींना गमावले. असे दुःखद प्रसंग भविष्यकाळात, जेव्हा मानवी समाजाची घडी विस्कटेल व दुष्काळ संख्या वाढेल तेव्हा अधिक प्रमाणात घडतील. ह्‍या घटना सामान्य होतील.

९. या शतकात दुसऱ्‍या कोणत्या प्रकारच्या “पशूं”नी मानवजातीत हाहाःकार आणि व्यथा पसरविल्या आहेत?

९ पण यहेज्केल कोणा दुसऱ्‍याच प्रकारातील “पशु”चा उल्लेख करतो जेव्हा तो म्हणतोः “तिच्यात संदेष्ट्यांनी एकोपा (कट) केला आहे; भक्ष्य फाडून खाणाऱ्‍या गर्जणाऱ्‍या सिंहाप्रमाणे ते लोकांचे प्राण ग्रासून टाकतात; . . . तिच्यातले सरदार भक्ष्य फाडून खाणाऱ्‍या लांडग्यांसारखे आहेत.” (यहेज्केल २२:२५, २७) अशाप्रकारे, माणसे देखील हिंस्त्र पशुंसारखे वागतात आणि आमच्याच शतकात अशा या नरभक्षकांच्या कारवायामुळे मानवी समाजास केवढे क्लेश सोसावे लागले आहेत. अनेकांनी हिंस्त्र पशुसमान गुन्हेगारांचे व अतिरेक्यांचे हातून आपले जीव गमावले आहेत. होय, या “पृथ्वीवरील जंगली श्‍वापदां”मार्फत मृत्युने अनेक मार्गांनी असंख्य बळी घेतले आहेत.

१०. मृत्युस कारण असलेल्या गोष्टींच्या यादीत योहानाने जे युद्ध, दुष्काळ, मरी आणि श्‍वापदे यांना नोंदविले आहे ते आमचे काय पाहण्यात सहाय्य करते?

१० योहानाचा युद्ध, दुष्काळ, रोगराई व जंगली श्‍वापद यांचा दृष्टांत इ.स.पू. ६०७ मध्ये यरुशलेमला भोगाव्या लागणाऱ्‍या यातना आजच्या काळात घडणाऱ्‍या पुष्कळ गोष्टींशी समतोलत्व राखून आहे हे समजविण्यात मदत करतो. प्रभूचा दिवस हा अशा रितीने या जगाकरिता यातनांचा दिवस झाला आहे; कारण पहिला घोडेस्वार, सिंहासनावरील राजा याच्या अधीन होण्यास मानवी सत्ताधाऱ्‍यांनी पूर्णपणे नकार दिला आहे. (स्तोत्रसंहिता २:१-३) तरी देवाच्या लोकांबाबत काय? प्रभूच्या दिवसाचा त्यांच्याकरिता काय अर्थ होतो?

मंदिराचे मोजमापन

११. प्रकटीकरण ११:१ मध्ये योहानास काय करण्याची आज्ञा देण्यात आली व हे कोणत्या मंदिराबाबत होते?

११ प्रकटीकरण ११:१ मध्ये प्रेषित योहानाने म्हटले आहेः “नंतर काठीसारखा एक बोरु कोणीएकाने मला दिला, आणि म्हटलेः ‘उठ, देवाचे मंदिर, वेदी व त्यात उपासना करणारे लोक यांचे माप घे.” मंदिराचे घेतलेले हे दृष्टांतातील मोजमाप देवाच्या लोकांकरिता अर्थसूचक होते. पण, योहानाने कोणत्या मंदिराच्या पवित्र स्थानाचे मोजमाप घेतले? त्या यहुदीपंथाच्या मंदिराचे नव्हे, जेथे ख्रिश्‍चन होण्यापूर्वी योहान उपासना करण्यास जात असे. त्या मंदिराचा यहोवाने धिक्कार केला होता व इ.स. ७० मध्ये त्याचा नाश झाला. (मत्तय २३:३७-२४:२) तर ते मंदिर यहोवाच्या सर्वथोर आध्यात्मिक मंदिराची योजना होती. या लाक्षणिक मंदिरातील भूतल अंगणात अभिषिक्‍त ख्रिस्ती, सहयाजक म्हणून सेवा करतात.—इब्री ९:११, १२, २४; १०:१९-२२; प्रकटीकरण ५:१०.

१२. ते मंदिर कधी अस्तित्वात आले व पहिल्या शतकात त्याजबाबत कोणत्या घटना घडल्या?

१२ ते मंदिर इ.स. २९ मध्ये, जेव्हा येशूचा महायाजक म्हणून अभिषेक झाला त्यावेळी उदयास आले. (इब्रीयांस ३:१; १०:५) त्यात १,४४,००० सहयाजकांचा समावेश करण्यात येणार होता, आणि पहिल्या शतकात अशा पुष्कळांची निवड केली गेली. त्यांच्यावर शिक्के मारण्यात आले व त्यांचा मृत्युही विश्‍वासात झाला. (प्रकटीकरण ७:४; १४:१) पण जेव्हा ते पहिल्या शतकातील ख्रिश्‍चन मरण पावले तेव्हा ते आपापल्या कबरेत झोपून राहिले, त्यांचे तत्काळ स्वर्गास जाण्याकरता पुनरुत्थान झाले नाही. (१ थेस्सलनीकाकर ४:१५) पहिल्या शतकानंतर मोठ्या प्रमाणात धर्मभ्रष्टता अस्तित्वात आली, आणि सहयाजक या नात्याने अभिषिक्‍त झालेल्या ख्रिश्‍चनांभोवती हे धर्मभ्रष्टतेचे “गवत” जोमाने वाढू लागले. (मत्तय १३:२४-३०) तेव्हापासून या सर्व शतकात हे विचारणे काही वावगे होणार नव्हते की, १,४४,००० सहयाजकांची संख्या शिक्का मारुन पुरी होणार आहे का? जे विश्‍वासूपणात मेले त्यांचे स्वर्गीय मंदिर पवित्र स्थानात सेवा करण्यास पुनरुत्थान होणार का? दृष्टांतातील मंदिराचे मोजमाप घेणे या प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर होय, असेच देते. का बरे?

१३. योहानाने मंदिराच्या केलेल्या मोजमापामुळे कसली खात्री मिळाली, आणि प्रभूच्या दिवसाच्या आरंभाला काय घडले?

१३ कारण पवित्र शास्त्रातील भविष्यवादातील मोजमाप हे सर्वसाधारणपणे हेच सूचित करते की एखाद्या विशिष्ट गोष्टीबाबतचा यहोवाचा उद्देश तंतोतंतपणे पार पाडण्यात येईल. (२ राजे २१:१३; यिर्मया ३१:३९; विलापगीत २:८) अशाप्रकारे, मंदिर पवित्र स्थानाचे योहानाच्या दृष्टांतातील मूल्यमापन असा हवाला देत होते की, प्रभूच्याच दिवसात, मंदिराबाबतचे यहोवाकडिल जे सर्व उद्देश होते त्यांची पूर्तता होणार. याच्या एकवाक्यतेत व सर्व पुराव्यांना अनुसरुन, अभिषिक्‍तापैकी जे सर्व विश्‍वासूपणे निवर्तले होते त्या सर्वांचे त्यांना दिलेल्या अभिवचनानुसार स्वर्गीय पवित्र स्थानी जाण्याकरिता १९१८ पासून पुनरुत्थान होण्यास सुरवात झाली. (१ थेस्सलनीकाकर ४:१६; प्रकटीकरण ६:९-११) पण १,४४,००० मधील बाकीच्याबद्दल काय?

१४. पहिले जागतिक महायुद्ध घडण्याच्या आधी व ते घडत असताना अभिषिक्‍त ख्रिस्तीजनांना काय घडले?

१४ प्रभूच्या दिवसाची सुरवात होण्याच्या बराच काळ आधीपासून धर्मभ्रष्ट ख्रिश्‍चन धर्मराज्यातून बाहेर पडलेले अभिषिक्‍त ख्रिश्‍चन एका वेगळ्या संघटनेत गोळा होऊ लागले. त्यांनी १९१४ या सालाच्या महत्त्वाची घोषणा करुन त्यांच्या विश्‍वासूपणाचा एक उत्तम अहवाल सादर केला. पण पहिल्या जागतिक महायुद्धास सुरवात होताच त्यांच्यावर अनेक दबाव आले व त्यांचे “पायाखाली तुडविणे” सुरु झाले व याची शेवटली पायरी म्हणजे १९१८ मध्ये वॉचटावर सोसायटीच्या पदाधिकाऱ्‍यांना तुरुंगवास पत्करावा लागला आणि त्यांचे संघटीत प्रचार कार्य जवळजवळ बंद पडले. त्या काळात ते वास्तविकपणे “जिवे” मारले गेले. (प्रकटीकरण ११:२-७) मग या ख्रिश्‍चनांकरता मंदिर पवित्रस्थानाच्या मोजमापनाचा काय अर्थ होत होता?

१५. दृष्टांतीय मंदिराचे मोजमाप करण्याचा यहेज्केलाच्या दिवसातील देवाच्या लोकांकरता काय अर्थ होत होता?

१५ इ.स.पूर्वी ५९३ मध्ये, म्हणजेच यरुशलेमातील यहोवाच्या मंदिराचा नाश झाल्याच्या १४ वर्षांनंतर यहेज्केलाने दृष्टांतात यहोवाचे पवित्रस्थान पाहिले. त्याला ह्‍या मंदिराची विशाल फेरी करण्यास लावून त्यातील प्रत्येक गोष्टीचे बारकाईने माप कसे घेतले जाते हे पाहण्यास सांगितले. (यहेज्केल अध्याय ४०-४२) याचा अर्थ काय होतो? यहोवा स्वतः स्पष्टीकरण देतोः मंदिराचे मोजमाप हे यहेज्केलाच्या लोकांच्या होणाऱ्‍या सत्त्वपरिक्षणास सूचित करते. जर त्यांनी स्वतःस नमविले, त्यांच्या चुकांबद्दल पश्‍चाताप केला, आणि यहोवाकडिल कायद्यांच्या मोजणीत बसले तरच त्यांना मंदिराचे मोजमाप कथन केले जाईल. हे सर्व त्यांना प्रत्यक्षात त्या आशेत टिकून राहण्याचे प्रोत्साहन देईल की, एके दिवशी यहोवाच्या लोकांची बाबेलपासून सुटका होईल व ते परत यहोवाची त्याच्या यथार्थ मंदिरात भक्‍ती करु लागतील.—यहेज्केल ४३:१०, ११.

१६. (अ) योहानाने मंदिर पवित्रस्थानाचे मोजमाप घेण्याने मागे १९१८ मध्ये देवाच्या लोकास कोणती शाश्‍वती दिली होती? (ब) याची कशी पूर्णता झाली?

१६ तसेच १९१८ मध्ये जे सर्व ख्रिश्‍चन नाउमेद झाले त्यांनी स्वतःला नम्र व्हावे व काही चुका जर त्यांच्या हातून घडल्या असतील तर त्यांचा पश्‍चाताप करावा मगच ते त्यातून मुक्‍त होऊ शकतील व यहोवाचे आशीर्वाद मिळवू शकतील आणि त्याच्या मंदिर योजनेत संपूर्ण सहभागी होऊ शकतील. अगदी असेच घडले. प्रकटीकरण ११:११ नुसार, “ते आपल्या पायांवर उभे राहिले,” किंवा लाक्षणिकपणे त्यांचे पुनरुत्थान झाले. यहेज्केलमधील कथित पुनरुत्थानाचा दृष्टांत, यहुद्यांचे त्यांच्या स्वस्थानी पुनर्स्थापनेस अगाऊच सूचित करतो. (यहेज्केल ३७:१-१४) हे आधुनिक पुनरुत्थान देवाच्या लोकांची पुनर्स्थापना होण्याचे द्योतक ठरले म्हणजेच त्यांच्या नाउमेद व निष्क्रिय अवस्थेपासून त्यांना जागृत व सक्रिय अवस्थेत परतविणे की, ज्यायोगे ते यहोवाच्या सेवेत पूर्णपणे सहभागी होऊ शकतील. असे हे ‘पुनरुत्थान’ १९१९ मध्ये घडले.

लहानशी गुंडाळी

१७. (अ) प्रकटीकरण १०:१ मधील योहानाच्या दृष्टांताचे वर्णन करा. (ब) योहानाने पाहिलेला तो देवदूत कोण होता, आणि कोणत्या काळी हा दृष्टांत पूर्ण होणार होता?

१७ प्रकटीकरण १०:१ मध्ये योहानाने “एक बलवान देवदूत स्वर्गातून उतरताना पाहिला. तो मेघवेष्टीत असून त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते, त्याचे तोंड सूर्यासारखे व त्याचे पाय अग्निस्तंभकासारखे होते.” हे सर्व यहेज्केल आणि स्वतः योहानाने जे यहोवाचे दृष्टांत पाहिले होते त्यांच्यात साम्यता आढळते. (यहेज्केल ८:२; प्रकटीकरण ४:३) पण या दृष्टांतात योहानाने यहोवास नव्हे तर एका देवदूतास पाहिले. यास्तव तो यहोवाचा सर्वथोर देवपुत्र, येशू ख्रिस्त असावा जो “अदृश्‍य देवाची प्रतिमा आहे.” (कलस्सैकर १:१५) यापेक्षा अधिक म्हणजे, येशू हा “त्याचा उजवा पाय समुद्रावर व डावा पाय भूमीवर” अशा अवस्थेत अधिकार संपन्‍नतेत उभा असल्याचे चित्रित करते. याप्रकारे तो देवदूत, प्रभूच्या दिवसातील येशूचे प्रतिनिधित्व करतो.—पहा, स्तोत्रसंहिता ८:४-८; इब्रीयांस २:५-९.

१८. (अ) योहानाला काय खाण्याचा आदेश देण्यात आला? (ब) अशाच एका दृष्टांतात यहेज्केलास काय खाण्याची आज्ञा देण्यात आली व याचा काय परिणाम घडला?

१८ या भव्य दृष्टांतरुपी व्यक्‍तित्वात येशूच्या हाती एक लहानशी गुंडाळी आहे आणि योहानाला सांगण्यात आले की, ती गुंडाळी घे आणि खाऊन टाक. (प्रकटीकरण १०:८, ९) अशाप्रकारे, योहानालाही अगदी यहेज्केलासारखा अनुभव आला, ज्यात त्यालाही दृष्टांतरुपी गुंडाळी खाण्यास सांगितले होते. यहेज्केलच्या वस्तुस्थितीत स्वतः यहोवाने संदेष्ट्याच्या हाती गुंडाळी दिली होती व यहेज्केलने पाहिले होते की, “त्यात विलाप, शोक व आकांत ह्‍याविषयीचा लेख होता.” (यहेज्केल २:८-१०) यहेज्केल म्हणतोः “मी तो सेवन केला (खात असता) तो, तो माझ्या तोंडात मधासारखा मधुर लागला.” (यहेज्केल ३:३) गुंडाळी खाण्याचा यहेज्केलकरिता काय अर्थ सूचित होत होता?

१९. (अ) यहेज्केलाने गुंडाळी खाणे कशाचे प्रतिनिधित्व करीत होते? (ब) यहेज्केलला प्रचार करण्याच्या मिळालेल्या नेमणूकीतील कडू संदेश कोणाकरिता होता?

१९ हे स्पष्ट होते की, गुंडाळीत प्रेरित भविष्यवादित माहिती होती. जेव्हा यहेज्केलने ती गुंडाळी खाल्ली, म्हणजेच तो, हा संदेश एवढ्या व्यापकतेत जाहीर करण्याची नेमणूक स्विकारतो की तो त्याच्या अंगचा भाग बनतो. (यिर्मया १५:१६ पडताळा.) पण गुंडाळीतील प्रतिपादन इतरांकरिता मधुर नव्हते. ती गुंडाळी “विलाप, शोक व आकांत” यांनी भरलेली होती. हा एवढा कटु संदेश कोणाकरिता होता? आधीच, यहेज्केलास सांगितले होतेः “मानवपुत्रा, जा, इस्राएल घराण्याकडे जा आणि त्यांजजवळ माझी वचने बोल.” (यहेज्केल ३:४) नंतर यहेज्केलच्या संदेश प्रचाराचा व्याप वाढून त्यात सभोवतालच्या विदेशीय राष्ट्रांनाही समाविष्ट करण्यात आले.—यहेज्केल अध्याय २५-३२.

२०. योहानाने लहानशी गुंडाळी खाल्ली तेव्हा काय घडले, आणि तसे त्याने करण्याचा काय परिणाम झाला?

२० योहानाबद्दल पाहता, गुंडाळी खाण्याचे परिणाम त्याजसारखेच होते. तो म्हणतोः “तेव्हा मी देवदूताच्या हातातून ती लहानशी गुंडाळी घेतली व ती खाऊन टाकली. ती माझ्या तोंडात मधासारखी गोड लागली; तरी ती खाल्ल्यावर माझे पोट कडू झाले.” (प्रकटीकरण १०:१०) गुंडाळी खाणे योहानाकरताही गोड चवीचे होते. यहोवाचे वचन त्याच्याशी सहभागी झाले आहे याची जाणीव शिरशिरी भरविणारे होते. तरीही, त्या संदेशास कडुदवण्याचे वलय होते. पण तो कडवटपणा कोणाकरिता होता? योहानास सांगण्यात आले की, “बहुत लोक, राष्ट्रे, भाषा व राजे यांजविषयी तू पुनः संदेश दिला पाहिजे.”—प्रकटीकरण १०:११.

२१. (अ) १९१९ मध्ये अभिषिक्‍त ख्रिस्तीजनांनी असे काय केले जे योहानाने लहानशी गुंडाळी खाण्यासमान होते, व याचा काय परिणाम घडला? (ब) याचा ख्रिस्ती धर्मजगत व सर्वसाधारण जगावर काय परिणाम घडला?

२१ हे सर्व प्रभूच्या दिवसात कसे पूर्ण झाले? ऐतिहासिक पुराव्यानुसार, मागे १९१९ मध्ये विश्‍वासू ख्रिश्‍चनांनी, यहोवाची सेवा करण्याचा जो विशेष हक्क प्राप्त झाला त्याला एवढ्या पूर्णपणे स्विकारले की तो त्यांचा सहभागी बनला; आणि त्यात त्यांच्याकरता केवढा गोडवा होता. पण त्यांचेवरील हे आशीर्वाद आणि हक्क इतरांकरिता—खासकरुन ख्रिश्‍चन धर्मराज्यातील पाद्रीगटाकरता—कडुदवण्यासमान शाबीत झाले. का बरे? कारण हे अभिषिक्‍त विश्‍वासू ख्रिस्तीजन मोठ्या धैर्याने मानवजातीकरिताचा यहोवाकडील सबंध संदेश घोषित करीत होते. त्यांनी “राज्याची ही सुवार्ता” गाजविली, एवढेच नव्हे तर ख्रिश्‍चन धर्मराज्यातील व इतर सर्वसाधारण जगातील, आध्यात्मिक मृत परिस्थितीही उघड केली.—मत्तय २४:१४; प्रकटीकरण ८:१-९:२१; १६:१-२१.

२२. (अ) प्रभूच्या दिवसात आतापर्यंत यहोवाने कोणकोणत्या उच्चदर्जीय मार्गी अभिषिक्‍तांचा उपयोग करुन घेतला आहे? (ब) या प्रभूच्या दिवसाचा सैतानी जग आणि देवाचे लोक यांच्याकरता काय अर्थ झालेला आहे?

२२ या विश्‍वासू ख्रिस्तीजनांच्या गटाचा यहोवाकरवी १,४४,०००तील उरलेल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आणि जे पृथ्वीवरील जीवनाची आशा बाळगून असतील अशांच्या एका मोठ्या लोकसमुदायास एकत्रित करण्यात उपयोग करुन घेतला गेला. (प्रकटीकरण ७:१-४, ९, १०) यहोवाचे या पृथ्वीबाबत जे सर्व उद्देश ते पूर्ण करण्यात हा मोठा लोकसमुदाय एक महत्वाची भूमिका पार पाडीत आहे. यांच्या पदार्पणाने स्वर्गात व पृथ्वीवर, दोहोकडे मोठा आनंद झाला आहे. (प्रकटीकरण ७:११-१७; यहेज्केल ९:१-७) या कारणास्तव हा जो “थोर दिवस” आहे त्याचा जरी सैतानाच्या जगासाठी यातना भोगणे असा अर्थ होत असला तरी यहोवाच्या लोकांकरिता समृद्ध आशीर्वाद असा होतो. आपण पाहू या की, आता, यापुढे प्रभूचा दिवस पुढे पुढे आगेकूच करीत असता हे सर्व त्याच्या सत्यतेत कसे चालू राहील.

तुम्हाला स्पष्टीकरण देता येईल?

◻ प्रभूचा दिवस काय आहे?

◻ प्रभूच्या दिवसात “पृथ्वीवरील श्‍वापदे” कोणकोणती नाशकारक कृत्ये करण्यात सहभाग घेतात?

◻ योहानास मंदिराच्या पवित्रस्थानाचे मोजमाप करण्यास सांगण्याद्वारे यहोवाने कोणती शाश्‍वती पुरविली?

◻ योहानाने लहान गुंडाळी खाण्याचा १९१९ मधील अभिषिक्‍त शेषांकरिता काय अर्थ झाला?

◻ प्रभूच्या दिवसाचा देवाच्या लोकांकरिता आणि सर्वसाधारण जगाकरिता आतापर्यंत काय अर्थ होतो?

[१३ पानांवरील चित्रं]

योहानाने मंदिराच्या केलेल्या मापनाकरवी प्रभूच्या दिवसातील अभिषिक्‍तांना निश्‍चित खात्री मिळू शकली

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा