वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 १२/१ पृ. १९-२३
  • “अशांना प्रिय समजा”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “अशांना प्रिय समजा”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “दुसऱ्‍याला आदराने . . . माना”
  • एक वर्ग या नात्याने काम करणे
  • वडीलांच्या वर्गात आपसातील आदर
  • विभागीय देखरेख्यांविषयी योग्य सन्मान
  • “अशांना मान द्या”
  • ख्रिस्ती मंडळीचं काम कसं चालतं?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • ‘तुम्हामध्ये जे श्रम करतात त्यांचा सन्मान करा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • नेतृत्व करणाऱ्‍यांच्या आज्ञेत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • वडिलांनो, प्रेषित पौलच्या उदाहरणाचं अनुकरण करत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 १२/१ पृ. १९-२३

“अशांना प्रिय समजा”

“तुम्ही अशांना मान द्या.”—१ करिंथकर १६:१८.

१. खासपणे कोणत्या प्रकारच्या लोकांना पौलाने प्रिय मानले होते, आणि अशा एका ख्रिश्‍चनाविषयी त्याने काय लिहिले?

प्रेषित पौलाने ज्या लोकांना खासपणे प्रिय मानले होते आणि ज्यांचा मान त्याला वाटत होता ते असे लोक होते ज्यांनी आपली शक्‍ती कोणत्याही अटीविना यहोवाला व आपल्या बांधवांच्या कामी वाहिली होती. अशाच एका सहकर्म्याविषयी पौल म्हणालाः “प्रभूच्या ठायी त्याचे स्वागत पूर्ण आनंदाने करा, आणि अशांना प्रिय समजा; कारण . . . ख्रिस्तसेवेसाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला व तो मरता मरता वाचला.”—फिलिप्पैकर २:२९, ३०, न्यू.व.

२. कोण खास सन्मानास पात्र आहेत व का?

२ आज, जगभरात पसरलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या ५५,००० पेक्षा अधिक मंडळ्यांमध्ये असा ख्रिस्ती पुरुषवर्ग आहे जो आपल्या बांधवांमध्ये परिश्रमाने काम करीत आहे आणि म्हणून त्यांच्याविषयी आपल्याला रसिकता वाटली पाहिजे. अशा लोकांना आपण प्रिय समजले पाहिजे हे दाखवताना पौला म्हणालाः “बंधुजनहो, आम्ही तुम्हास विनंति करतो की, तुम्हामध्ये जे श्रम करतात, प्रभूमध्ये तुम्हावर असतात व तुम्हास बोध करतात त्यांच्या तुम्ही सन्मान करावा; आणि त्यांच्या कामामुळे त्यांना प्रीतीने अत्यंत मान द्यावा. तुम्ही आपसात शांतीने राहा.”—१ थेस्सलनीकाकर ५:१२, १३.

३. (अ) आम्हास एकमेकांसोबत कसे शांतीने राहता येईल? (ब) वडीलांनी कशाबाबतीत आपले उदाहरण राखले पाहिजे?

३ आम्हाला आमच्या मंडळीत शांतीने रहायचे आहे तर मंडळीतील सर्व बंधूभगिनींविषयी योग्य तो आदर तसेच कष्टाळू वडीलांविषयीही सन्मान देणे आवश्‍यक आहे. जसे ख्रिस्ती जीवनाच्या अनुषंगाने खरे आहे तसेच येथेही ख्रिस्ती वडीलांनी “कळपास कित्ते अस”ण्यास हवे. (१ पेत्र ५:२, ३) वस्तुतः आपल्या परिश्रमामुळे बांधवांकडून योग्य तो सन्मान मिळवण्याच्या पात्रतेचे असले तरी एकमेकांविषयी योग्य तो विचार राखण्याच्या बाबतीत वडीलांनी सुद्धा उदाहरण घालून दिले पाहिजे.

“दुसऱ्‍याला आदराने . . . माना”

४, ५. (अ) कष्टाळू वडीलांविषयी पौलाला आत्मीयता वाटत होती हे कशावरुन दिसते? (ब) त्याने रोममधील ख्रिस्तीजनांना काय लिहिले, आणि त्याचे हे शब्द खासपणे वडीलांना का लागू होतात?

४ प्रेषित पौलाने याविषयी आपले चांगले उदाहरण प्रस्तुत केले. आम्ही या आधीच्या लेखात पाहिले आहेच की, त्याने आपल्या बंधुभगिनींमध्ये चांगल्या गोष्टीच निरिक्षिल्या. याशिवाय त्याने कष्टाळू वडीलांना प्रीती व आदर दाखविण्याविषयी ख्रिश्‍चनांना उत्तेजन दिले इतकेच नसून त्याने स्वतःदेखील त्यांच्याविषयी असा सन्मान व्यक्‍त केला. अशांना त्याने प्रिय मानले.—पडताळा फिलिप्पैकर २:१९-२५, २९; कलस्सैकर ४:१२, १३; तीत १:४, ५.

५ पौलाने रोममधील ख्रिश्‍चनांना लिहिलेल्या पत्रात म्हटलेः “बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्‍याला आदराने आपणापेक्षा थोर माना. आस्थेविषयी मंद असू नका; आत्म्यात उत्सुक असा; यहोवाची सेवा करा.” (रोमकर १२:१०, ११) हे शब्द, प्रामुख्यत्वे ख्रिस्ती वडीलांना लागू होतात. इतर सर्व ख्रिश्‍चनांमध्ये त्यांनीच प्रथमतः एकमेकांना मान देण्यात पुढाकार घेतला पाहिजे.

६. (अ) वडीलांनी काय करण्याचे टाळावे व का? (ब) मंडळीला वडीलवर्गाविषयी वाटणारा आत्मविश्‍वास वडील कसा वाढवू शकतील?

६ आपल्या सह-देखरेख्यांविषयी कसलेही तुच्छतापूर्वक भाषण न करण्याची दक्षता वडीलांनी खासपणे घेतली पाहिजे. कोणत्याही वडीलापाशी सर्व ख्रिस्ती गुणांची उच्चतम पातळी नाही; कारण सर्वच अपूर्ण आहेत. काहीजण काही गुणात प्रवीण असल्याचे दिसतील पण तेच इतर गुणात ते अशक्‍त असतात. वडीलांठायी बंधुप्रेम तसेच एकमेकांसाठी कळवळा असला तर ते एकमेकांच्या दुर्बळतेस आपल्या नजरेत भरविणार नाहीत. आपल्या बांधवांशी होणाऱ्‍या संभाषणात ते इतर वडीलांविषयीच्या चांगल्या गुणांकडे निर्दश करतील. अशा पद्धतीने एकमेकांना मान देण्यात पुढाकार घेतल्यामुळे ते मंडळीला वडीलवर्गाविषयी वाटणारा आत्मविश्‍वास अधिक दृढ करतील.

एक वर्ग या नात्याने काम करणे

७. वडीलांना कशामुळे एकमेकांसोबत ऐक्याने काम करण्यास जमेल आणि हे ते कसे दाखवू शकतील?

७ बांधवांची सुधारणा व्हावी व त्यांना सेवेच्या कामी तयार करावे यासाठी ख्रिस्ताने पृथ्वीवरील त्याच्या मंडळीत जी “मनुष्यातील दाने” दिली त्याविषयी सांगितल्यावर प्रेषित पौलाने लिहिलेः “आपण प्रीतीने सत्याला धरुन मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्याप्रत सर्व प्रकारे वाढावे.” (इफिसकर ४:७-१५) ख्रिस्त हा मंडळीचा क्रियाशील मस्तक असून वडीलांनी त्याच्या अधिकारदर्शक उजव्या हाती स्वतःला अधीन ठेवले पाहिजे ही गोष्ट प्रत्येक वडील वर्गात ऐक्य घडवून आणीत असते. (इफिसकर १:२२; कलस्सैकर १:१८; प्रकटीकरण १:१६, २०; २:१) हा वडील वर्ग, पवित्र आत्मा, पवित्र शास्त्रीय तत्त्वे यांच्या माध्यमाने तसेच “विश्‍वासू व बुद्धीमान दासा”च्या नियमन मंडळाकरवी देण्यात येणाऱ्‍या नेतृत्वाकरवी येशूच्या मार्गदर्शनाची प्राप्ती करतील.—मत्तय २४:४५-४७; प्रे. कृत्ये १५:२, २८; १६:४, ५.

८. सर्व वडीलांनी काय आठवणीत ठेवावे, व ते एकमेकांचा मान कसा राखू शकतील?

८ वडील याची जाणीव राखतील की, कसलीही परिस्थिती हाताळताना वा कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या बाबतीत ख्रिस्त पवित्र आत्म्याच्या माध्यमाने वडीलवर्गापैकीच्या कोणाही वडीलाच्या मनास योग्य पवित्र शास्त्रीय तत्त्वाकडे निरवू शकतो. (प्रे. कृत्ये १५:६-१५) वडीलांच्या वर्गात कोणत्याही वडीलाला मक्‍तेदारी नाही. यास्तव, चर्चा केल्या जाणाऱ्‍या कोणत्याही विषयाच्या बाबतीत वडीलवर्गातील कोणीही वडील संबंधित पवित्र शास्त्रीय तत्त्व किंवा नियमन मंडळाद्वारे प्राप्त झालेली एखादी सूचना प्रस्तुत करतो तेव्हा ते काळजीपूर्वक श्रवण करण्यामुळे वडील एकमेकांचा मान राखतील.

९. (अ) कोणती आध्यात्मिक गुणवत्ता देखरेख्याला आपल्या सह-वडीलावर जम बसविण्याचे टाळण्यात सहाय्यक ठरेल? (ब) कोणी वडील स्वतःला “समंजस” असल्याचे कसे दाखवील; आणि याबाबतीत पहिल्या शतकातील नियमन मंडळाने कोणते उदाहरण घालून दिले?

९ ख्रिस्ती विनयशीलता, लीनता आणि नम्रता कोणाही वडीलाला आपल्या भावावर प्रभुत्व करण्यास व त्याच्यावर आपली मते लादण्यास बांध घालील. (नीतीसूत्रे ११:२; कलस्सैकर ३:१२) एखाद्या ख्रिस्ती देखरेख्यापाशी विशिष्ठ गोष्टीसंबंधाने दृढ व प्रामाणिक दृष्टीकोण असू शकेल. पण तेच, आपल्या सहवडीलापाशी त्याच गोष्टीविषयीचे भिन्‍न शास्त्रवचनीय व ईश्‍वरशासित कारण आहे असे दिसते तेव्हा तो स्वतःला ‘लहानातील एकाप्रमाणे’ वागवील आणि “समंजस” बनून बहुमत असणारा दृष्टीकोण ग्रहण करील.a (लूक ९:४८; १ तीमथ्य ३:३) तो पहिल्या शतकातील नियमन मंडळाच्या उदाहरणाचे अनुकरण करील. या मंडळाने, शास्त्रवचनीय चर्चा तसेच ख्रिस्ताने पवित्र आत्म्याद्वारे जे मार्गदर्शन दिले ते पाहिल्यावर आपले “एकमत” केले.—प्रे. कृत्ये १५:२५.

१०. (अ) मंडळीत होणारी वडीलांच्या वर्गाची नियुक्‍ती ही पवित्र शास्त्राधारित व्यवस्थेनुरुप आहे हे कशावरुन दिसते? (ब) या व्यवस्थेमागील फायद्याचे विवेचन ऑर्गनाइझ्ड टू अकम्प्लीश आवर मिनिस्ट्री हे पुस्तक कसे करते?

१० मंडळीमध्ये पुढाकार घेण्यासाठी प्रत्येक मंडळीत जी वडीलवर्गाची नेमणूक केली जाते ती आरंभीच्या ख्रिस्ती मंडळीच्या उदाहरणानुरुप आहे. (फिलिप्पैकर १:१; १ तीमथ्य ४:१४; तीतास १:५; जरुसलेम बायबल मध्ये तीतास १:५ च्या तळटीपेत “वडील” हा जो शब्द देण्यात आला आहे तो पडताळा.) या व्यवस्थेतील सूज्ञतेचा सारांश देताना ऑर्गनाइझ्ड टू अकम्प्लीश आवर मिनिस्ट्री हे प्रकाशन (पृष्ठ ३७ वर) म्हणतेः “काही वडील एखाद्या गुणाच्या बाबतीत इतरांमध्ये अधिक उल्लेखनीय असतील; पण तेच इतर वडील त्या गुणात प्रवीण असतील ज्याविषयी इतर अशक्‍त आहेत. तेव्हा याचा परिणाम हा की, सर्वसाधारणपणे वडीलांचा वर्ग आपणामध्ये ते सर्व सुंदर गुण सामावून आहे जे देवाच्या मंडळीच्या देखरेखीसाठी आवश्‍यक आहेत.”

वडीलांच्या वर्गात आपसातील आदर

११, १२. (अ) वडीलांचा वर्ग त्याचे सभासद वैयक्‍तीकपणे करु शकतात त्यापेक्षा अधिक कसे करुन दाखवू शकतो? (ब) ख्रिस्त येशू तसेच प्रेषित पौल यांनीही याच पद्धतीने वडीलांच्या वर्गाशी कसा व्यवहार राखला, आणि कोणती सूचना देण्यात आली?

११ वडीलांचा वर्ग शास्त्रवचनीय सत्त्व आहे ज्यामध्ये काही भागापेक्षा सर्वांचे प्रतिनिधित्व राहते. ते वडीलांच्या सभेसाठी एकत्र येतात आणि यहोवाचे मार्गदर्शन ख्रिस्त व पवित्र आत्म्याकरवी मिळावे म्हणून प्रार्थना करतात तेव्हा ते असे निर्णय घेऊ शकतात जे कदाचित, त्यांनी विशिष्ठांचे मत विचारले असते तर घेता आले नसते. वडील एकत्र येतात तेव्हा त्यांच्यातील विविध गुणवत्ता कार्य करु लागते आणि असे परिणाम निर्मिते जे त्या प्रकरणावर ख्रिस्ताचे मार्गदर्शन आहे असे प्रवर्तित करते.—पडताळा मत्तय १८:१९, २०.

१२ ख्रिस्ताने याच पद्धतीने वडीलांच्या वर्गांशी दळणवळण राखले आहे हे त्याने “सात तारे” किंवा आशिया मायनरमधील “सात मंडळ्यांचे देवदूत” यांना जे संदेश पाठविले त्याकरवी दिसते. (प्रकटीकरण १:११, २०) यापैकीचा पहिला संदेश इफिसच्या मंडळीला त्याचा ‘दूत’ किंवा अभिषिक्‍त देखरेख्यांचा वर्ग याद्वारे देण्यात आला. सुमारे ४० वर्षे आधी प्रेषित पौलाने इफिसमधील वडीलवर्गास एका खास सभेसाठी मिलेत येथे येण्यासाठी सांगितले होते. येथे त्याने त्यांना स्वतःकडे आणि कळपाकडे लक्ष देण्याचे स्मरण दिले.—प्रे. कृत्ये २०:१७, २८.

१३. वडीलांनी त्यांच्या स्थानिक वडील वर्गात त्याचप्रमाणे इतर वडील वर्गांच्या बाबतीत सामूहिकरित्या व्यवहार राखताना जो आत्मा दाखविला जातो त्याकडे का लक्ष देण्यास हवे?

१३ वडील वर्गाने आपणामध्ये तसेच आपल्या मंडळीमध्ये सुंदर व सरळ आत्मा राखण्याकडे लक्ष द्यावे. (प्रे. कृत्ये २०:३०) जसा एखादा ख्रिस्ती विशिष्ठ गुण प्रदर्शित करतो त्याचप्रमाणे वडीलांचा वर्ग आणि सबंध मंडळी यांजमध्ये विशिष्ठ आत्म्याचे प्रदर्शन होऊ शकते. (फिलिप्पैकर ४:२३; २ तीमथ्य ४:२२; फिलेमोन २५) कधीकधी असे आढळते की जे वडील एकमेकांना आपल्या मंडळीत आदर दाखवतात ते वडीलाच्या दुसऱ्‍या वर्गासोबत ते ऐक्य दाखवीत नाही. ज्या शहरात एकच सभागृह अनेक मंडळ्या वापरतात तेथे आयोजलेल्या सभा, क्षेत्राच्या सरहद्दी, राज्य सभागृहातील सामानसुमान लावणे इत्यादि गोष्टींबद्दल विविध वडीलवर्गात कधीकधी सहमत दिसत नाही. तेव्हा, जे तत्त्व वडीलांच्या प्रत्येक वर्गाला लागू आहे तेच म्हणजे विनयशीलता, लीनता व नम्रता या गुणांचे तत्त्व येथेही वडीलांच्या अनेक वर्गांना लागू होण्यास हवे. प्रेषित पौलाने सल्ला दिलाः “सर्वकाही उन्‍नतीसाठी असावे.”—१ करिंथकर १४:२६.

विभागीय देखरेख्यांविषयी योग्य सन्मान

१४. वडीलांच्या आणखी कोणत्या गटाला प्रिय समजण्यास हवे व का?

१४ यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यात आणखी एक पवित्र शास्त्राधारित व्यवस्था कार्यवाहित आहे व ती म्हणजे यांना विभागीय व प्रांतिय देखरेखे या फिरत्या वडीलांमार्फत दिल्या जाणाऱ्‍या भेटी. (प्रे. कृत्ये १५:३६; १६:४, ५) हे “चागल्या प्रकारे आपला अधिकार चालविणारे” वडील आहेत. तेव्हा इतर वडीलांप्रमाणेच ते “उपदेश व शिक्षण ह्‍या बाबतीत श्रम घेतात” म्हणून यांनाही “दुप्पट सन्मानास योग्य गणले जावे.”—१ तीमथ्य ५:१७.

१५. प्रवासी सुवार्तिकांच्या अनुषंगाने प्रेषित योहानाने कोणता सल्ला दिला?

१५ प्रेषित योहानाने त्याच्या तिसऱ्‍या पत्रात, दियत्रफेस “बंधुजनांचा स्वीकार करीत नाही” यासाठी त्याची कानउघाडणी केली. (वचन १०) हे प्रवासी ख्रिस्तीजन होते जे ‘यहोवाच्या नामाने बाहेर पडले होते.’ (वचन ७) यांना सुवार्तिक या नात्याने राज्याची सुवार्ता प्रसारीत करावी व ज्या शहरांना त्यांनी भेटी दिल्या तेथे मंडळ्या स्थापन कराव्या यासाठी बाहेर पाठविण्यात आले होते. योहानाने सूचना केली की, या फिरत्या प्रचारकांना ‘देवाला आवडेल अशा रितीने वाटे लावावे.’ (वचन ६) तसेच प्रेषिताने पुढे म्हटलेः “आपण अशांचा पाहुणचार करावा, म्हणजे आपण सत्यामध्ये त्यांचे सहकारी होऊ.” (वचन ८) अशांचे सन्मानाने स्वागत करायचे होते.

१६. पहिल्या शतकातील सुवार्तिकांसाठी गायसने जे ‘विश्‍वासू कृत्य’ केले होते त्याचे अनुकरण आज ख्रिश्‍चनांना कसे करता येईल, व हे का योग्य आहे?

१६ याचप्रमाणे आजही, नियमन मंडळाकरवी सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी तसेच मंडळ्यांना मदत देण्यासाठी पाठविण्यात येणाऱ्‍या प्रवासी देखरेख्यांचे सन्मानाने स्वागत व पाहुणचार होण्यास हवा. हे बांधव व त्यांची पत्नी (ते विवाहीत असल्यास, व बहुतेक आहेत) यांनी एका जागी सुस्थितीचे जीवन व्यतित करण्याचा त्याग केलेला असतो. ते जागोजागी प्रवास करतात व आपला आहार व विश्रांतीसाठी ते बांधवांच्या पाहुणचारावर अवलंबून असतात. ज्याने पहिल्या शतकात प्रेमळपणे अशा प्रवासी सुवार्तिक कार्य करणाऱ्‍यांचा अंगीकार केला होता त्या गायसविषयी योहानाने लिहिलेः “प्रिय बंधो, अनोळखी बंधुजनांसाठी तू जे काही करतोस ते विश्‍वासूपणे करतोस.” (३ योहान ५) याचप्रमाणे आजही, जे ‘यहोवाच्या नामासाठी’ प्रवास करतात अशांना प्रिय समजले गेले पाहिजे व त्यांना प्रेम आणि सन्मान दाखविण्यास हवा.

१७. नियमन मंडळाच्या भेट देणाऱ्‍या प्रतिनिधींच्या बाबतीत मंडळीच्या वडीलांना कसा सन्मान दाखवता येईल?

१७ नियमन मंडळाच्या या भेट देणाऱ्‍या प्रतिनिधींच्या बाबतीत वडीलांनी खासपणे सन्मान दाखविला पाहिजे. या लोकांना, मडळ्यांना, त्यांच्याठायी असणारी आध्यात्मिक गुणवत्ता व अनुभव, जो सहसा स्थानिक वडीलांपेक्षा अधिक विस्तारीत रुपाचा असतो त्यामुळे पाठविण्यात येते. काही फिरते देखरेखे हे भेट देणाऱ्‍या मंडळ्यातील काही वडीलांपेक्षा वयाने तरुण असतील. पण यामुळे त्यांचा सन्मान होण्यास नको असे वाजवी कारण नाही. स्थानिक वडील कोणा बंधूला उपाध्य सेवक किंवा वडील या नात्याने घाईने शिफारस करीत असतील त्याला कदाचित हे फिरते देखरेखे संयम घालू इच्छित असतील; कारण पौलाने तीमथ्याला जो इशारा दिला होता तो यांना माहीत असतो. (१ तीमथ्य ५:२२) स्थानिक वडीलांनी जो प्रस्ताव वा विवाद मांडला आहे त्याविषयी भेट देणाऱ्‍या देखरेख्याने योग्य विचार केला पाहिजे हे खरे. पण स्थानिक वडीलांनी देखील फिरत्या देखरेख्यांचे ऐकून घेण्याची व त्यांना असलेल्या विस्तारित अनुभवाचा लाभ प्राप्त करण्याची स्वेच्छा दाखविली पाहिजे. होय, यांनी “अशांना प्रिय समज”ले पाहिजे.—फिलिप्पैकर २:२९.

“अशांना मान द्या”

१८, १९. (अ) पौलाने आपल्या सहकर्म्यांविषयी कशी रसिकता व्यक्‍त केली? (ब) पौलाने आपल्या बंधूंच्या बाबतीत मनात अढी बाळगली नव्हती हे कोणत्या उदाहरणावरुन दिसते?

१८ करिंथकरांना लिहिलेल्या पहिल्या पत्रात पौलाने लिहिलेः “बंधुजनहो, तुम्हाला स्तेफनाच्या घराण्याची माहिती आहे; ते अखयाचे प्रथमफळ आहे; आणि त्यांनी आपणास पवित्र जनांच्या सेवेला वाहून घेतले आहे. अशांना आणि जो कोणी सेवेत साहाय्य करतो व श्रम करतो त्याला, तुम्ही मान्यता द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. स्तेफना, फर्तूनात व अखायिक हे आल्याने मला आनंद झाला आहे; कारण तुम्ही नसल्याची उणीव त्यांनी भरुन काढली आहे. कारण त्यांनी माझ्या व तुमच्या आत्म्यास हुरुप आणला आहे; म्हणून तुम्ही अशांना मान द्या.”—१ करिंथकर १६:१५-१८.

१९ पौलाठायी आपल्या बंधूजनांबद्दल, ज्यापैकीचे काही सुपरिचित नव्हते, केवढा उदार दृष्टीकोण होता. ते पवित्र जनांची सेवा करता यावी यासाठी “साहाय्य” तसेच ‘श्रम करीत’ होते म्हणून पौलाना खूप आवडत होते. याखेरीज, पौलाने झालेल्या गोष्टी विसरुन जाण्यात आपले भव्य उदाहरण राखले. पहिल्या सुवार्तिक फेरीत योहान मार्क याने पौलाची निराशा केली होती तरी पौलाने त्याची कलस्सैकरांच्या मंडळीला उबदारपणे शिफारस केली. (प्रे. कृत्ये १३:१३; १५:३७, ३८; कलस्सैकर ४:१०) रोममध्ये कैदी असताना पौलाने मार्कने तेथे यावे असे सुचविले, कारण तो म्हणालाः “[मार्क] सेवेसाठी मला उपयोगी आहे.” (२ तीमथ्य ४:११) त्याने मनात अढी धरली नव्हती!

२०. ख्रिश्‍चनांनी सर्वसाधारणपणे आणि वडीलांनी खासपणे विश्‍वासू देखरेख्यांविषयी आपणाठायी रसिकता आहे व ते ‘अशांना प्रिय समजतात’ हे कसे दाखवून द्यावे?

२० देवाच्या लोकात आज स्तेफनासारखे भक्‍तीमान देखरेखे आहेत जे आपल्या बांधवांची सेवा करीत आहेत. यांच्याठायीही मानवी अपूर्णता आहे हे खरे. तरीही ते “विश्‍वासू बुद्धीमान दास वर्ग” आणि त्याच्या नियमन मंडळासोबत “साहाय्य” करीत प्रचारकार्यात ‘श्रम घेत’ आहेत आणि आपल्या बांधवांना मदत देत आहेत. आम्ही ‘अशा प्रकारच्या लोकांना अधीन राहिले पाहिजे,’ त्यांच्याठायीच्या गुणांची कदर केली पाहिजे आणि त्यांच्या कमतरता शोधू नयेत. वडीलांनी आपल्या सहवडीलांना योग्य ती रसिकता व्यक्‍त करण्यात व त्यांना सन्मान दाखविण्यात पुढाकार घेतला पाहिजे. वडीलांनी एकमेकांना प्रेम व ऐक्याच्या आत्म्याने सहकार्य दिले पाहिजे. अशा विश्‍वासू बांधवांचे मोल सर्वच जाणतील आणि ‘अशांना प्रिय समजतील.’—फिलिप्पैकर २:२९.

[तळटीपा]

a  न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन रेफरन्स बायबलमधील तळटीप हे दाखविते की, १ तीमथ्य ३:३ मध्ये असणारा “समंजस” हा शब्द अशा ग्रीक शब्दाचे भाषांतर आहे ज्याचा शब्दशः “नमविणे” असा अर्थ होतो.

उजळणीसाठी प्रश्‍न

◻ पौलाने कोणत्या प्रकारच्या लोकांना प्रिय मानले, आणि आज कोण आमच्या खास विचारामध्ये असावेत?

◻ वडील एकमेकांचा सन्मान करीत आहेत हे ते कसे दाखवतील?

◻ वडीलवर्गाचा वैयक्‍तीक सदस्य आपल्यापरिने जे करु शकेल त्यापेक्षा वडीलांचा वर्ग अधिक का उरकू शकतो?

◻ वडीलांचा एक वर्ग दुसऱ्‍या वडीलांच्या वर्गास कोणत्या बाबतीत सन्मान प्रदर्शित करील?

◻ देखरेख्यातील कोणता वर्ग खासपणे प्रिय वाटला पाहिजे, आणि हा योग्य आदर कसा दाखविला जाऊ शकतो?

[१९ पानांवरील चित्रं]

वडीलांनी एकमेकांविषयीची योग्य रसिकता दाखविली पाहिजे

[२२ पानांवरील चित्रं]

प्रवासी देखरेख्यांविषयी प्रेम व आदर दाखवा

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा