आमच्या बंधुवर्गाविषयीची रसिकता
“बंधुजनांविषयीचा निर्दंभ कळवळा दाखवून . . . एकमेकांवर अंतःकरणापासून निष्ठेने प्रीती करा.”—१ पेत्र १:२२, न्यू.व.
१. यहोवाचे साक्षीदार खऱ्या ख्रिस्ती धर्माचे आचरण करीत आहेत हे कित्येक लोकांना कसे पटले?
प्रीती हा खऱ्या ख्रिस्तीयत्वाचा ठसा आहे. येशूने आपल्या शिष्यांसोबत केलेल्या शेवटल्या भोजनप्रसंगी याविषयी भर दिला व म्हटलेः “मी तुम्हास नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी; जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरुन सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहान १३:३४, ३५) पुष्कळ लोक जेव्हा प्रथमच यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात सभेला आले वा ते त्यांच्या मोठ्या अधिवेशनाला उपस्थित राहिले तेव्हा यहोवाचे साक्षीदार खऱ्या ख्रिस्ती धर्माचे आचरण करीत आहेत हे त्यांना पटले. येथे त्यांना प्रीती कार्यवाहित होत असलेली पहायला मिळाली आणि याद्वारे त्यांची खात्री झाली की, आपण येशूच्या खऱ्या अनुयायांमध्ये आहोत.
२. ख्रिस्ती धर्माचे लक्षवेधी चिन्ह, प्रीती याविषयी प्रेषित पौलाने काय म्हटले?
२ अस्सल ख्रिस्ती धर्माचे हे लक्षवेधी चिन्ह आज यहोवाच्या साक्षीदारांमध्ये दृश्यमान आहे याचा आम्हाला सर्वांना आनंद वाटतो. तरीपण, आरंभीच्या ख्रिस्तीजनांप्रमाणेच आम्हाला याची जाणीव आहे की, आमच्या बंधुजनाविषयी रसिकता व्यक्त करण्याचे अधिक मार्ग आपण नित्याने शोधण्यास हवेत. पौलाने थेस्सलनीकातील मंडळीला लिहिलेः “प्रभु तुमची प्रीती एकमेकांवर व सर्वांवर वाढवून विपुल करो.” (१ थेस्सलनीकाकर ३:१२) तर मग, आम्ही एकमेकांवरील प्रीती कशी वाढवू शकतो?
प्रीती आणि बंधुविषयीचा कळवळा
३. शुद्ध जीवनाक्रमणासोबत ख्रिश्चनांना आणखी कशाची गरज आहे असे प्रेषित पेत्राने म्हटले?
३ आशिया मायनरमधील ख्रिस्ती मंडळ्यांना लिहिलेल्या सर्वसाधारण पत्रात प्रेषित पेत्राने लिहिलेः “बंधुजनांविषयीचा निर्दंभ कळवळा [फि․ल․देल․फिʹया] दाखवून तुम्ही आपले जीव [अथवा, जीवन] सत्याच्या पालनाने शुद्ध करुन घेतले आहेत म्हणून एकमेकांवर अंतःकरणापासून निष्ठेने प्रीती [अ․गा․पाʹओ चे एक रुप] करा.” (१ पेत्र १:२२) पेत्र दाखवितो की, आमचे जीवन नुसते शुद्ध करुन चालणार नाही. तर सत्याचे पालन करण्यामध्ये नव्या आज्ञेचा देखील समावेश आहे ज्यामुळे बंधुजनांविषयीचा निर्दंभ कळवळा तसेच एकमेकांवरील निष्ठेची प्रीती प्रवर्तित होत असल्याचे दिसून आले पाहिजे.
४. आम्ही कोणते प्रश्न विचारावेत, आणि येशूने याबाबतीत काय म्हटले?
४ आमच्या बंधुजनांसाठी असणारी आमची प्रीती व रसिकता ही केवळ जे आम्हास आवडतात त्यांनाच दाखवावी का? अशांच्या बाबतीत आम्हाला मोठे औदार्य वाटते का व यांच्या उणीवांकडे आम्ही डोळेझाक करतो का? पण तेच ज्यांच्याविषयी आम्हाला स्वाभाविकदृष्ट्या इतके काही वाटत नाही अशांच्या काही चुका व पडती बाजू दिसली की लगेच त्याचा मोठा गवगवा करतो का? येशूने म्हटलेः “जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती [अ․गा․पाʹओ चे एक रुप] केली तर तुमचे प्रतिफळ काय? जकातदारही तसेच करतात ना?—मत्तय ५:४६.
५. ज्यांचा अर्थ “प्रीती” आणि “कळवळा” होतो त्या ग्रीक शब्दांतील फरकाविषयी एक पवित्र शास्त्र प्रामाण्य काय भाष्य करतात?
५ प्राध्यापक विल्यम बर्कले आपल्या न्यू टेस्टमेंट वर्डस् पुस्तकात “कळवळा” तसेच “प्रीती” या शब्दांचे ज्या ग्रीक शब्दांवरुन भाषांतर करण्यात आले आहे त्याविषयी भाष्य करताना म्हणतातः “[फि․लिʹया, म्हणजे “कळवळा,” तसेच याजशी संबंधित असणारे क्रियापद फि․लेʹओ] या दोन्ही शब्दात प्रेमळ उबदारपणा आहे. या दोहोंचा अर्थ, कोणाकडे तरी सहानुभूतिपूर्वक कळवळ्याने बघणे असा आहे. . . . पण तेच न[वीन] क[रार] मध्ये प्रीतीसाठी सर्वसाधारणपणे आढळणारे शब्द अगापे हे नाम व अगपन हे क्रियापद आहे. . . . फिलिआ हा सुंदर शब्द आहे पण तो उबदारपणा, जवळीक व सहानुभूति यासाठी उपयुक्त आहे. . . . अगापे याचा संबंध मनासोबत आहेः ही काही आमचे ह्रदयाचे ठोके पडतात त्याप्रमाणे उचंबळून येणारी भावना नव्हे तर ते असे तत्त्व आहे ज्याकरवी आम्ही निश्चयपूर्वक जीवन जगतो. अगापेचा सर्वाच्च संबंध इच्छेशी आहे. ती लढत, विजय आणि साध्यता आहे. कोणीही स्वाभाविकरित्या आपल्या वैऱ्यावर प्रीती करीत नाही. वैऱ्यावर प्रीती करायची म्हटले तर ती आमचा स्वाभाविक कल व भावना याविरुद्ध असणारी लढत आहे. ही अगापे . . . खरे पाहता अप्रिय गोष्टीवर प्रीती व्यक्त करणे, जे आम्हाला आवडत नाहीत अशांवर आपले प्रेम दाखविणे होय.”
६. (अ) आम्ही कोणते शोधक प्रश्न स्वतःला विचारले पाहिजेत? (ब) पेत्राच्या म्हणण्यानुसार, ज्याविषयी आम्हाला स्वाभाविकपणे आकर्षण वाटते त्यांच्यापुरताच कळवळा आम्ही मर्यादित का ठेवू नये?
६ शास्त्रवचने इतरांपेक्षा आमच्या काही बांधवांना उबदार भावना व्यक्त कराव्यात असे म्हणत असल्याचे निमित्त काढून आम्ही आमच्या भावना व्यक्त करण्याच्या बाबतीत बुद्धीवाद लढवितो का? (योहान १९:२६; २०:२) आम्हाला दाखवावयाचे आहे म्हणून कोणाविषयी तरी “थंड” प्रीती व्यक्त करायचा आमचा विचार आहे का, पण याचवेळी ज्यांच्याविषयी आम्हाला आकर्षण वाटते त्यांच्याविषयी मात्र अगदी उबदार बंधुप्रेम दाखवितो का? तसे आहे तर, पेत्राने दिलेल्या सदुपदेशाचा मुद्दा आम्ही गमावतो असे होईल. याचा अर्थ होईल की आम्ही सत्याच्या पालनाने आमचे जीवन हवे त्या प्रमाणात शुद्ध केलेले नाही. कारण पेत्र म्हणतोः “तुम्ही आपल्या ख्रिस्ती बंधुसाठी प्रामाणिक कळवळा वाटू देऊन सत्याच्या पालनाने आपले जीवन शुद्ध केले आहे तर मग, आपल्या पूर्ण शक्तीने एकमेकांवर अंतःकरणपूर्वक प्रेम व्यक्त करा.”—१ पेत्र १:२२, द न्यू इंग्लिश बायबल.
“बंधुविषयीचा निर्दंभ कळवळा”
७, ८. “निर्दंभ” असे ज्या शब्दाचे भाषांतर करण्यात आले आहे त्या शब्दाचे मूळ काय आहे, आणि पेत्र या संज्ञेचा का वापर करतो?
७ प्रेषित पेत्र याच्याही पुढे जातो. तो म्हणतो की, आमचा बंधूंविषयीचा कळवळा दांभिक नसावा. “निर्दंभ” हा शब्द ज्या ग्रीक शब्दापासून भाषांतरीत आहे तो नकारात्मक रुपातील आहे जो रंगमंचावर मुखवटा धारण करुन काम करणाऱ्या पात्राला अनुलक्षून आहे. मुखवटे धारण केल्यामुळे या कलाकारांना अमूक प्रकारातील विविध भूमिका करता येत होत्या. कालांतराने या शब्दाचा दांभिक, फसवा, ढोंगीपणा असा लाक्षणिक अर्थ घेण्यात आला.
८ तर आता, मंडळीतील आमच्या काही बंधूभगिनींच्या बाबतीत आम्हाला अंतर्यामी कसे वाटते? सभेला आल्यावर आम्ही त्यांच्याकडे बघून उसनवारीचे स्मित करतो आणि लगेच दुसरीकडे बघतो का? किंवा आम्ही त्यांचे मुळीच अभिवादन करीत नाही? तसे आहे तर आम्ही करीत असलेल्या “सत्याच्या पालना” विषयी काय, ज्याने आमचे जीवन खरे पाहता शुद्ध करुन आमच्या सह ख्रिस्ती बांधवांविषयी प्रामाणिक कळवळा दाखवायला प्रवृत्त केले पाहिजे? “निर्दंभ” या शब्दाचा वापर करुन पेत्र हे दर्शवीत होता की, आमच्या बंधूंसाठी दाखविण्यात येणारा कळवळा हा दिखाऊ किंवा नाटकी नसावा. तो खरा, अंतःकरणापासून असावयास हवा.
“अंतःकरणापासून निष्ठेने”
९, १०. आम्ही एकमेकांवर “निष्ठेने” किंवा “विस्तीर्ण” प्रीती केली पाहिजे असे पेत्राने म्हटले त्याचा काय अर्थ होतो?
९ पेत्र पुढे म्हणतोः “एकमेकांवर अंतःकरणापासून निष्ठेने [वस्तुतः “विस्तीर्ण”] प्रीती करा.” जे आम्हाला स्वभावतः आवडतात आणि ज्यांना आपण आवडतो त्यांच्याविषयी प्रेम दाखविण्यासाठी आपले अंतःकरण विस्तीर्ण करण्याची काही गरज नाही. पण पेत्र आपल्याला एकमेकांवर “विस्तीर्ण” प्रीती करायला सांगतो. ख्रिश्चनांमध्ये जी अ․गाʹपे प्रीती व्यक्त होत असते ती आमच्या शत्रूंसंबधाने दाखविण्यात येणारी वैचारिक, कारणासाठी असणारी प्रीती नसते. (मत्तय ५:४४) तर ती जिवापाड प्रीती असते व याकरता प्रयत्न लागतात. त्यासाठी आपले अंतःकरण विस्तीर्ण करुन प्रशस्त करावे लागते ते याकरता की जे स्वभावतः आम्हाला आकर्षक वाटत नाहीत अशांना देखील आपल्या अंतःकरणी सामावून घ्यावे.
१० फ्रिट्झ रेनेकर आपल्या लिंग्विस्टीक की टू द ग्रीक न्यू टेस्टमेंट या पुस्तकात १ पेत्र १:२२ मध्ये भाषांतरीत झालेल्या “निष्ठेने” किंवा “विस्तीर्ण” या शब्दाविषयी भाष्य करतात. ते लिहितातः “यात उत्कटता, आवेश (कोणतीही गोष्ट हलकेपणाने नव्हे तर ताण देऊन करणे) याची मूलभूत कल्पना सामावलेली आहे.” ताण देणे याचा अर्थ “शक्य आहे तितके विस्तीर्ण करणे” असा होतो. तेव्हा एकमेकांवर अंतःकरणापासून प्रेम करणे म्हणजे आमचा हा बंधूविषयक कळवळा सर्व ख्रिस्ती बांधवांसाठी प्रदर्शित करावा म्हणून शक्य तितक्या अधिक प्रमाणात स्वतःला परिश्रमाने देणे. आमच्या काही बंधू व भगिनींना आमच्या कोमल कळवळ्यात आम्हाला बसविण्यासाठी जागा दिसत नाही का? तर मग, आम्ही स्वतःला विस्तीर्ण केले पाहिजे.
“विशाल करा”
११, १२. (अ) प्रेषित पौलाने करिंथ येथील ख्रिश्चनांना कोणता सल्ला दिला? (ब) पौलाने याविषयी आपले चांगले उदाहरण कसे प्रस्तुत केले?
११ अशी ही गरज करिंथकरांच्या मंडळीत आहे असे प्रेषित पौलाला आढळले. तेथील ख्रिस्तीजनांना त्याने लिहिलेः “तुम्हाबरोबर बोलण्यास आमचे तोंड मोकळे झाले आहे, आमचे अंतःकरण विशाल झाले आहे. संकुचित अंतःकरणाविषयी म्हणाल तर तुमचीच अंतःकरणे संकुचित आहेत; आमचे नाही. तेव्हा तुम्हाला आपली मुले समजून मी असे सांगतो की, तुम्हीही आमची परतफेड करण्यासाठी आपली अंतःकरणे विशाल करा.”—२ करिंथकर ६:११-१३.
१२ आमचे सर्व बंधू व भगिनी सामावू शकतील इतके आमचे अंतःकरण कसे विशाल करता येईल बरे? पौलाने याविषयी उत्तम उदाहरण मांडले. त्याने नेहमीच आपल्या बांधवाविषयी चांगुलपणाचा प्रयत्न साधला, आणि त्याने त्यांना आपल्या मनात त्यांच्या चुकांमुळे नव्हे तर त्यांच्या चांगल्या गुणामुळे ठेवले होते. रोममधील ख्रिश्चनांना लिहिलेल्या पत्राचा शेवटला अध्याय याची प्रचिती देतो. तर आता आपण रोमकरांस पत्राचा १६ वा अध्याय तपासून पाहू की त्यात प्रेषित पौलाची आपल्या बंधुभगिनींविषयी असणारी सरळ मनोवृत्ती कशी दिसते.
उबदार रसिकता
१३. पौलाने फीबीविषयी आपली रसिकता कशी व्यक्त केली व का?
१३ पौल आपल्या तिसऱ्या सुवार्तिक यात्रेत असताना इ. स. ५६ च्या सुमाराला त्याने करिंथमधून रोमकरांना पत्र लिहिले. हे पत्र त्याने जवळच्याच किंख्रिया मंडळीतील फीबी नावाच्या ख्रिस्ती स्त्रीला सुपुर्द केले होते असे दिसते. ती तेव्हा रोमला निघाली होती. (वाचा वचने १, २.) पौल रोममधील बांधवांना केवढ्या उबदारपणे तिची शिफारस करतो ते लक्षात घ्या. हिने बहुतेक ख्रिश्चनांचे तसेच प्रेषित पौलाचे देखील, ते सर्व किंख्रिया या वर्दळीच्या बंदरातून प्रवासामध्ये असताना सहाय्य केले होते. फीबी ही इतरांप्रमाणे पापी व अपूर्ण होती व तिच्याठायी काही अशक्तपणा होता. पण रोमच्या मंडळीला फीबीच्या या अपूर्णतेविषयीची माहिती देण्याऐवजी पौलाने त्यांना म्हटले की, “तुम्ही पवित्र जनांस योग्य असा तिचा प्रभूमध्ये स्वीकार करावा.” ही केवढी सुंदर व सरळ मनोवृत्ती!
१४. पौलाने प्रिस्का व अक्विला यांजविषयी कोणत्या दयावंत गोष्टी म्हटल्या?
१४ आता ३ऱ्या वचनापासून ते १५ वचनापर्यंत पौल २० पेक्षा अधिक ख्रिश्चनांचे नाव घेऊन तसेच तो इतर काहींना वैयक्तीकपणे आणि सामूहिकपणे आपल्या सदिच्छा पाठवितो. (वाचा वचने ३, ४.) पौलाला प्रिस्का (किंवा, प्रिस्किल्ला; पडताळा प्रे. कृत्ये १८:२) तसेच अक्विला यांजविषयी जो बंधुप्रेमाचा कळवळा वाटला तो तुम्हास दिसतो का? या जोडप्याने पौल संकटात सापडला तेव्हा आपला जीव धोक्यात घातला होता. आता तो येथे या सहकर्म्यांचे आभार मानीत होता तसेच परराष्ट्रीयात असणाऱ्या सर्व मंडळ्यांचे सुद्धा आभार त्यांना कळवीत होता. अशा या अंतःकरणपूर्वक अभिवादनामुळे अक्विला व प्रिस्किला यांना केवढे भारावल्यासारखे वाटले असेल!
१५. अंद्रोनीक व युनिया यांना अभिवादन कळवताना पौलाने आपले औदार्य व नम्रता कशी प्रकटविली?
१५ ख्रिस्ताच्या मृत्युनंतर लगेच एक किंवा दोन वर्षांनी पौल भक्तीमान ख्रिस्ती बनला होता. त्याने रोमच्या मंडळीला पत्र लिहिले तोपर्यंत ख्रिस्ताने याचा राष्ट्रांसाठी असणारा प्रेषित म्हणून कित्येक वर्षे वापर केला होता. (प्रे. कृत्ये ९:१५; रोमकर १:१; ११:१३) तरीपण त्याचे औदार्य तसेच त्याची नम्रता पहा. (वाचा वचन ७.) त्याने अंद्रोनीक व युनिया यांच्याविषयी म्हटले की, ते “प्रेषितांमध्ये [पाठविलेल्यामध्ये] नामांकित आहेत” तसेच हेही मान्य केले की, ते त्याच्यापेक्षा अधिक काळ ख्रिस्ताची सेवा करीत होते. खरेच, येथे हेवा किंवा द्वेष्यवृत्तीचा साधा अंशही दिसत नाही!
१६. (अ) रोममध्ये राहणाऱ्या इतर ख्रिश्चनांच्या बाबतीत पौल कोणत्या दयावंत पद्धतीने बोलला? (ब) ही सर्व अभिवादने ‘निर्दंभ बंधुप्रेमाचा कळवळा’ अशी होती असे आपण का समजू शकतो?
१६ आम्हाला अपैनत, आंप्लियात व स्ताखु या आरंभीच्या ख्रिश्चनांविषयी बहुधा काहीच माहीत नाही. (वाचा वचने ५, ८, ९.) पण या तिघा जणांस पौलाने ज्या पद्धतीने अभिवादन कळविले त्यावरुन हे तिघेही जण विश्वासू लोक होते असे दिसते. त्यांनी पौलाच्या मनात इतकी प्रियता मिळविली होती की या प्रत्येकाला पौलाने “माझा प्रिय” असे म्हटले. पौलाने अपिल्लेस तसेच रूफ यांच्याविषयी देखील दयावंतपणे लिहिले व यांचा अनुक्रमे “ख्रिस्तामध्ये पसंतीस उतरलेला” व “प्रभुमध्ये निवडलेला” असा उल्लेख केला. (वाचा वचने १०, १३.) या दोघा ख्रिश्चनांना केवढ्या चांगल्या शुभेच्छा त्याने कळवल्या! पौल स्पष्टवक्ता होता हे आपल्याला माहीत आहे तेव्हा त्याने येथे जे काही म्हटले ते औपचारिक नव्हते हे आपल्याला कळू शकते. (पडताळा २ करिंथकर १०:१८.) शिवाय हेही लक्षात घ्या की, पौल रूफच्या आईला सलाम कळविण्यास विसरला नाही.
१७. पौलाने आपल्या भगिनींविषयी केवढी गाढ रसिकता व्यक्त केली?
१७ यामुळे पौलाला आपल्या भगिनींविषयी केवढी रसिकता वाटत होती ते समजते. रूफच्या आईव्यतिरिक्त पौलाने सहापेक्षाहि अधिक ख्रिस्ती स्त्रियांचा उल्लेख केला. फीबी व प्रिस्का यांच्याविषयी त्याने जे लिहिले ते आपण आधीच पाहिले आहे. पण तेच तो मरीया, त्रुफैना, त्रुफासा व पर्सिस यांजविषयीही केवढा उबदार बंधूप्रेमाचा कळवळा लिहितो. (वाचा वचने ६, १२.) या कष्टाळू भगिनींनी आपल्या बांधवांसाठी जे “फार श्रम केले” ते जाणून पौलाचे अंतःकरण भरुन आले होते. बंधुभगिनींमध्ये अपूर्णता होती तरीही पौलाने जी अंतःकरणपूर्वक आपली रसिकता व्यक्त केली ते पाहणे केवढे उभारणीकारक वाटते!
आमच्या बांधवांच्या हेतूबद्दल शंकेखोर असू नये
१८. आम्हाला पौलाचे अनुकरण कसे करता येईल, पण यासाठी काय करावे लागेल?
१८ आमच्या मंडळीतील प्रत्येक बंधू व भगिनीच्या बाबतीत काहीतरी चांगले शोधण्याचा पौलासारखा प्रयत्न का करु नये? काहींच्या बाबतीत ही समस्या दिसणार नाही. काहीजणांच्या बाबतीत थोडेसे संशोधन करावे लागेल. तर मग, त्यांच्याशी चांगला परिचय करुन घ्यावा यासाठी त्यांच्यासोबत काही वेळ का घालवू नये? तुम्हाला त्यांच्यातील प्रेमळ गुण नक्कीच दिसतील, आणि कोण जाणे, त्यांनाही तुमच्याविषयी पूर्वी नव्हती इतकी रसिकता व्यक्त करावीशी वाटेल.
१९. आम्ही आमच्या बांधवांच्या हेतूविषयी का संशय धरु नये, आणि यहोवा आम्हापुढे त्याच्या प्रेमाविषयीचे कोणते उदाहरण ठेवून आहे?
१९ आम्ही आमच्या बंधूंच्या हेतूविषयी शंका धरु नये. सर्वांचे यहोवावर प्रेम आहे; तसे नसते तर त्यांनी त्याला आपले जीवन समर्पित केले नसते. शिवाय, कशामुळे त्यांना जगाकडे मागे वळण्यापासून, त्याचे आरामशीर मार्ग आचरण्यापासून दूर ठेवते बरे? ते त्यांनी यहोवा, त्याची नीतीमत्ता आणि ख्रिस्ताकरवी असणारे त्याचे राज्य याविषयी बाळगलेले प्रेम आहे. (मत्तय ६:३३) पण या सर्वांना विविध मार्गाने आपला विश्वासूपणा टिकविण्यासासाठी मोठी लढत द्यावी लागत आहे. याकरताच यहोवा त्यांच्यावर प्रीती करतो. (नीतीसूत्रे २७:११) त्यांच्याठायी चूका व अपयश असले तरी तो यांचा आपले सेवक म्हणून स्विकार करतो. असे आहे तर मग, यांना आपल्या कळवळ्यात न स्वीकारणारे आम्ही कोण?—रोमकर १२:९, १०; १४:४.
२०. (अ) पौलाने रोमकरांना लिहिलेल्या पत्राच्या आधारे पाहता आम्ही केवळ कोणाविषयी शंका धरु शकतो, आणि याविषयी कोणाचे मार्गदर्शन आपल्याला सुरक्षितपणे अनुसरता येईल? (ब) अन्यथा आम्ही आमच्या सर्व बांधवांविषयी कोणता दृष्टीकोण धरावा?
२० ज्याविषयी आम्ही संशय धरावा असा इशारा पौल आम्हाला देतो ते आहेत, “फुटी व अडथळे घडवून” आणणारे व “तुम्हाला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध” जाणारे. पौल म्हणतो की, आपण अशांवर लक्ष ठेवावे व अशांना टाळावे. (रोमकर १६:१७) मंडळीच्या वडीलांनी अशा लोकांना मदत दिली असणार. (यहुदा २२, २३) यासाठीच अशा कोणाचा आपण सहवास टाळावा की काय हे कळण्यासाठी आपण वडीलांवर विसंबून राहू या. त्याखेरीज, आम्ही आमच्या सर्व बांधवांना, ते निर्दंभ प्रीतीचे हक्कदार आहेत हे समजण्यास हवे आणि यांना आपण अंतःकरणापासून निष्ठेने प्रीती दाखवावी.
२१, २२. (अ) आम्हापुढे काय उभे आहे? (ब) कोणत्या परिस्थिती उद्भवू शकतील, त्यामुळे काय करण्याची ही नामी वेळ आहे? (क) आमच्या पुढील लेखात कशाविषयीचा विचार केला जाणार आहे?
२१ सैतान, त्याचे दुरात्मे व त्याचे संपूर्ण जागतिक व्यवस्थीकरण आम्हाविरुद्ध आहे. हर्मगिद्दोन हे आम्हापुढे उभे आहे. त्याची सुरवात गोग मागोगच्या हल्ल्याने होईल. (यहेज्केल अध्याय ३८, ३९) त्यावेळी आम्हाला आमच्या बंधूंची पूर्वी नव्हती इतकी अधिक गरज भासणार. ज्यांच्याविषयी आम्हाला इतकी रसिकता वाटत नाही, कदाचित त्यांच्याच मदतीची गरज भासते आहे असे आपल्याला दिसेल. किंवा कदाचित यांनाच आमच्या मदतीची गरज राहील. तर मग, आमच्या सर्व बंधूजनांविषयी आमची रसिकता वाढविण्याची व ती विस्तीर्ण करण्याची हीच नामी वेळ आहे.
२२ आमच्या बंधूजनांविषयी दाखविण्यात येणाऱ्या रसिकतेमध्ये अर्थातच मंडळीतील वडीलांविषयीचा योग्य तो सन्मान येतो. याविषयी वडीलांनी देखील सर्व बंधूजनांविषयी रसिकता दाखविली पाहिजे इतकेच नाही तर त्यांनी आपल्या सह-वडीलांना देखील ती दाखविण्यात उदाहरणशील असले पाहिजे. या विषयाबद्दलचा विचारविनिमय पुढील लेखात करण्यात येईल.
उजळणीसाठी मुद्दे
◻ खऱ्या ख्रिस्ती धर्माचे लक्षणीय चिन्ह कोणते आहे?
◻ प्रीती आणि बंधुप्रमोचा कळवळा ही दोन्हीही का अत्यावश्यक आहेत?
◻ आम्ही एकमेकांवर “निष्ठेने” व “विस्तीर्णपणे” कशी प्रीती करु शकतो?
◻ पौलाने आपल्या बंधू व भगिनींविषयीची रसिकता रोमकराच्या पत्राच्या १६व्या अध्यायात कशी दर्शविली?
◻ आमच्या बांधवांच्या हेतूविषयी आम्ही शंकास्पद का नसावे?
[१६ पानांवरील चित्रं]
तुम्हाला ज्यांच्याविषयी स्वाभाविक आकर्षण वाटत नसेल त्यांच्यामधील प्रेमळ गुण शोधण्याचा प्रयत्न करा