वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 १२/१ पृ. १३
  • ग्रीसवर एक दृष्टीक्षेप

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ग्रीसवर एक दृष्टीक्षेप
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 १२/१ पृ. १३

ग्रीसवर एक दृष्टीक्षेप

ग्रीसच्या आरंभीच्या रहिवाशांना आयोनियन म्हणत. ही समज आहे की, त्यांना हे नाव त्यांचे पूर्वज यावान (इब्री, या․वानʹ) याजकडून मिळाले. हा याफेथचा पुत्र व नोहाचा नातू होता. (उत्पत्ती १०:१, २) पवित्र शास्त्रात ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनात ग्रीसला हेल․लासʹ असे संबोधिले आहे. तो एक खडकाळ व डोंगरवटीचा प्रदेश आहे. त्याचा काही भाग दाट जंगलवृक्षाने भरलेला आहे. बऱ्‍याच काळापासून ग्रीक लोक कुशल नावाडी होते.

प्राचीन काळच्या ग्रीक लोकांची अनेक दैवते होती. यांना मानवी रुपात व अति रुपवान पद्धतीत वर्णिण्यात येत असे. ही दैवते खाणे, पिणे व निजणे या सर्व गोष्टी करीत असे समजले जाई. तसेच त्यांना पवित्र व अमर मानले जात असे. याखेरीज यांना शीलभ्रंष व अपहार करता येत असे व ते फसवणूक व गुन्हे करण्यास समर्थ असत हेही मानले जाई. अशा या दंतकथा कदाचित जलप्रलयाआधीच्या काळात घडलेल्या प्रसंगाच्या विपर्यस्त आठवणी असू शकतील, त्या काळी बंडखोर देवपुत्रांनी पृथ्वीवर रुपांतरित शरीराने प्रवेश केला व येथील मानवकन्यांशी समागम करुन नेफिलीम नावाच्या शक्‍तीमान संततीस जन्म दिला, आणि सबंध पृथ्वी हिंसाचाराने भरविली.—उत्पत्ती ६:१-८, १३.

इ.स.पू. च्या चवथ्या शतकात मासेदोनियाचा फिलिप, सिकंदर बादशहाचा पिता, याने पूर्वीच्या स्वतंत्र ग्रीक शहर-राज्यांना संघटित करण्यास सुरवात करुन या सर्वांना मासेदोनियाच्या सत्तेखाली आणले. इ.स.पूर्वीच्या दुसऱ्‍या शतकात ग्रीस हा एक रोमी प्रांत बनला आणि ग्रीक संस्कृती सबंध रोममध्ये पसरली.

त्या काळी पसरलेल्या को․इनʹ ग्रीक भाषेने भूमध्य समुद्राभोवतालच्या सबंध प्रदेशात ख्रिस्ती सुवार्ता प्रचार वेगाने होण्यात मोठा हातभार लावला.

प्रेषित पौलाने आपल्या दुसऱ्‍या व तिसऱ्‍या मिशनरी फेरीत मोसेदोनिया व ग्रीसला भेटी दिल्या. त्याने फिलिप्पै, थेस्सलनीका, करिंथ व बिरुया येथे ख्रिस्ती मंडळ्या स्थापिल्या. सीलास, तीमथ्य, तीत व सुरवातीच्या इतर ख्रिश्‍चनांनी येथे शिक्षण दिले. आज ग्रीसमध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या ३२० पेक्षा अधिक मंडळ्या आहेत व २३,००० पेक्षा अधिक देवाच्या राज्याचे घोषक आहेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा